Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Chandrapur Dahi Handi । दहीहंडी हा केवळ खेळ नाही..तर संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक – आ. किशोर जोरगेवार

    Chandrapur Dahi Handi

    Chandrapur Dahi Handi : चंद्रपूर – दहीहंडी हा फक्त खेळ नाही तर भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जिवंत प्रतीक आहे. आपल्या इतिहासात आणि धर्मपरंपरेत दहीहंडीचे विशेष स्थान आहे. श्रीकृष्णाच्या बाललीलांतून धैर्य, साहस, चिकाटी आणि ऐक्याचा जो संदेश मिळतो, तोच आज या उत्सवातून युवकांना अनुभवायला मिळतो. आजच्या पिढीने हा उत्सव केवळ मनोरंजन म्हणून पाहू नये, तर त्यातून मिळणारे संस्कार आणि जीवनमूल्य आत्मसात करावेत, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी केले.

    चंद्रपुरातील या मनपा शाळेला मिळणार १० कोटी रुपयांचा निधी

    कृष्णजन्माष्टमी निमित्त तिरंगा क्रिकेट क्लब आणि शिवस्वाभिमान बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने तुकूम येथे दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, माजी नगरसेवक सुरेश पचारे, सतीश भिवगडे, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री रवि गुरनुले, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, वर्षा कोटेकर, सतीश तायडे, प्रा. निलेश बेलखेडे, जसबीरसिंग बोपारा, सिकंदर खान आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

    युवकांना एकत्र आणून समाजात सकारात्मकता पसरविण्याचे मोठे काम

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, विकासकामांनी शहराची ओळख निर्माण होत असते, हे सत्य असले तरी पारंपरिक व धार्मिक उत्सव देखील शहराची ओळख निर्माण करण्यासाठी आवश्यक आहेत. आपण चंद्रपूरात महाकाली महोत्सवाला सुरुवात केली आहे. त्यामुळे चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची महती देशपातळीवर पोहोचली आहे. येथील भाविकांची संख्या लक्षणीय वाढत आहे. आज आपण दहीहंडी स्पर्धेचे उत्तम आयोजन केले आहे. तिरंगा क्रिकेट क्लब आणि शिवस्वाभिमान बहुउद्देशीय संस्थेने अशा पारंपरिक उत्सवाचे आयोजन करून केवळ धार्मिक परंपरा जोपासली नाही, तर युवकांना एकत्र आणून समाजात सकारात्मकता पसरविण्याचे मोठे काम केले आहे. अशा उपक्रमांमधून आपली संस्कृती जिवंत राहते आणि समाजातील बंधुभाव वृद्धिंगत होतो. Cultural values in Dahi Handi

    ते पुढे म्हणाले की, युवकांनी पथक तयार करताना जसा एकमेकांवर विश्वास ठेवून मानवी पिरॅमिड उभारला, तसाच विश्वास, साहस आणि एकोप्याने आपण समाज उभारायला हवा. हाच खरा दहीहंडी उत्सवाचा संदेश आहे. दहीहंडी आपल्याला साहस आणि परिश्रमांशिवाय यश मिळत नाही, ही शिकवण देते. युवकांनी ही शिकवण आपल्या जीवनात उतरवली पाहिजे. अशा उत्सवांमुळे आपल्याला संस्कृतीची जाणीव तर होतेच, पण समाजातील ऐक्य, बंधुता आणि आपुलकी अधिक बळकट होते, असे ते यावेळी म्हणाले. दहीहंडी स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

  • Ganesh idol exhibition Chandrapur । 🌟 यंदाचा उत्सव खास! चांदा क्लबमध्ये मिळणार मातीच्या गणेश मूर्तींचे अनोखे कलेक्शन 🌿

    Ganesh idol exhibition Chandrapur

    Ganesh idol exhibition Chandrapur : चंद्रपूर – आगामी श्रीगणेशोत्सव काळात यंदाही चांदा क्लब येथे श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले असुन श्री गणेश मूर्ती दुकानांवर होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये व नागरिकांना सहजतेने मूर्ती खरेदी करून घरी नेता याव्या या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी सांगितले.  

    चंद्रपूर मनपा आयुक्त जाणार जपान दौऱ्यावर

        लवकरच गणेशोत्वास सुरवात होणार असुन मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात अधिकांश घरी गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. मूर्ती विक्री करणारे अनेक मूर्तिविक्रेते हे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी गणेशमूर्तीची विक्री करत असल्याने नागरिकांना मूर्ती खरेदीस गर्दीच्या ठिकाणी जाण्याशिवाय पर्याय नसतो.यावर उपाय म्हणुन यावर्षी मागील वर्षी प्रायोगिक तत्वावर चांदा क्लब येथील प्रशस्त मैदानावर मूर्तिकारांना मूर्तिविक्रीसाठी जागा मनपाने उपलब्ध करून दिली होती व त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. यावेळॆस मागणी असल्याने सिटी हायस्कूल जवळील जुन्या विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली आहे, मात्र त्याशिवाय इतर फुटपाथ अथवा रस्त्यावर विक्रेत्यांना पूर्णपणे मनाई आहे.  

    रस्त्यावर मूर्ती विक्री केल्यास कारवाई

         चांदा क्लब येथे येथे व्यवस्था  करण्यात येणार येणार असुन स्टॉल्स, पेंडॉल व्यवस्था मूर्ती विक्रेत्यांना स्वतः करावयाची आहे. विद्यूत व्यवस्थेसाठी पॉईंट, फिरते शौचालय,स्वच्छतेची व्यवस्था,पाणी टँकर मनपा प्रशासनातर्फे करून दिली जाणार आहे. नोंदणी न करता मूर्ती विक्री व साहित्य विक्री करणाऱ्यावर तसेच मनपाने निश्चित करून दिलेल्या जागेशिवाय इतरत्र विशेषतः फुटपाथवर अथवा रस्त्यावर मुर्ती विक्री करून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. Chandrapur Clay Ganesh idol exhibition 2025    


         मूर्ती खरेदीस नागरिकांची गर्दी, वाहनांची गर्दी, खरेदीस पुरेसा वेळ न मिळणे, दुचाकी वाहन सोबत असेल तर वाहन उभे करायला जागेचा प्रश्न,चारचाकी वाहन असेल तर सुरक्षित जागी वाहन उभे करून खरेदीस दूर पायी चालत जावे लागते.सोबत परिवाराचे सदस्य असतील तर खरेदी करतांना होणारा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. चांदा क्लब येथील प्रशस्त मैदानावर मूर्तिकारांना मूर्तिविक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याने एकाच जागी मातीच्या गणेश मूर्तीची अनेक दुकाने उपलब्ध होणार असुन नागरिकांना इतरत्र कुठेही गर्दीच्या जागी न जाता मोकळ्या जागेत आपल्या परिवारासहित खरेदीचा आनंद घेता येणार आहे. Chanda Club Ganesh idol exhibition 

         चांदा क्लब येथील मूर्तिकांरांकडून मूर्ती विकत घेणाऱ्या नागरिकांना लकी ड्रॉ कुपन दिले जाणार असुन यातील 8 भाग्यवान विजेत्यांना घरगुती उपयोगी वस्तु इस्त्री, मिक्सर स्वरूपाची बक्षिसे मिळणार आहेत. गर्दीमुक्त मोकळ्या वातावरणात श्री गणेशाचे आगमन होण्याच्या दृष्टीने नागरिकांनी चांदा क्लब येथुन मूर्ती खरेदी करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.   

  • APGDUM Japan study tour । जपान दौर्‍यातून चंद्रपूर मनपाला मिळणार शहरी विकासाची नवी क्रांती!

    APGDUM Japan study tour

    APGDUM Japan study tour : चंद्रपूर 17 ऑगस्ट – महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामार्फत Advanced Post Graduate Diploma in Urban Management (APGDUM) या पदव्युत्तर अभ्यासक्रमांतर्गत 19 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2025 या कालावधीत जपान येथे परदेशी अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला आहे. या अभ्यासदौऱ्यास 14 ऑगस्ट 2025 रोजी शासनमान्यता देण्यात आली चंद्रपूर मनपा आयुक्त विपीन पालीवाल व उपायुक्त मंगेश खवले यात सहभागी होणार आहेत.  

    चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात ५० हजार बोगस मतदार

       या अभ्यासदौऱ्यात राज्यातील विविध नगररचना विभाग, महानगरपालिका व शहरी विकास क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी सहभागी होत असुन जपानमधील शहरी विकास, स्थानिक स्वराज्य व्यवस्था व आधुनिक नागरी सेवांचा प्रत्यक्ष अनुभव घेणार आहेत.या दौऱ्याचे आयोजन पुण्यातील Association of Friends of Japan (AFJ) या संस्थेमार्फत करण्यात आले असून यशदा, पुणे यांचे शैक्षणिक मार्गदर्शन लाभले आहे. Chandrapur urban management training Japan

    दौऱ्याचा उद्देश –

    या परदेशी अभ्यासदौऱ्याचा प्रमुख उद्देश म्हणजे जपानसारख्या प्रगत देशातील शहरी प्रशासन व व्यवस्थापन पद्धतींचा अभ्यास करून महाराष्ट्रातील शहरी विकास कार्य अधिक सक्षम, शाश्वत व नागरिकाभिमुख बनवणे हा आहे. जपानमधील कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, वाहतूक नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, हरित विकास, सांस्कृतिक वारसा जतन या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय अनुभव आत्मसात करून त्यांचा महाराष्ट्रातील शहरी प्रशासनात उपयोग करण्याची संधी या दौऱ्यातून मिळणार आहे. तसेच, शहरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी तंत्रज्ञानाचा वापर, शाश्वत विकासाचे मॉडेल, नागरिकांच्या सहभागावर आधारित शासनव्यवस्था, व पर्यावरणपूरक प्रकल्प राबविण्याच्या पद्धतींचा अभ्यास या अभ्यासदौऱ्याचा भाग असेल.

    दौऱ्याची ठळक वैशिष्ट्ये –

    टोकियोतील आसाकुसा व सेन्सो-जी मंदिर भेट, शहरी नियोजन व पर्यटन विकासाचा अभ्यास.
    नारा पार्क व क्योटो (किंकाकुजी) येथे सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा संवर्धनाची पाहणी.
    ओसाका किल्ला व शिंबाशी येथे शहरी प्रशासनाशी संबंधित चर्चासत्रे.
    शिराहामा येथील कचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प भेट.
    स्थानिक स्वराज्य संस्था अधिकारी व जपानमधील तज्ञांशी चर्चा.

    चंद्रपूर शहराला होणारा फायदा –

    या परदेशी अभ्यासदौऱ्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्त व उपआयुक्तांना जपानमधील अत्याधुनिक शहरी विकास अनुभवण्याची संधी मिळणार आहे. तेथील सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करून चंद्रपूर शहरात स्वच्छता व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, पर्यावरणपूरक प्रकल्प आणि नागरिकाभिमुख सेवांच्या उन्नतीसाठी त्याचा थेट उपयोग होईल.

    या अभ्यासदौऱ्यामुळे चंद्रपूर शहराचा शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नागरिकांच्या जीवनमान उन्नतीसाठी सकारात्मक दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

  • Congress claims bogus voters increase । Chandrapur लोकसभा मतदारसंघात 50,000 बनावट मतदार

    Congress claims bogus voters increase

    Congress claims bogus voters increase : चंद्रपूर – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचांदूर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला खासदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

    यावेळी भाषणात माजी आमदार सुभाष धोटे यांनी धक्कादायक आरोप करताना सांगितले की, “माझ्या राजुरा विधानसभा मतदारसंघात तब्बल 20 हजार बोगस मते वाढविण्यात आली. तक्रारी नंतर त्यापैकी 6 हजार 700 बोगस मतदार वगळले गेले असले तरी शिल्लक मते कायम राहिली. यातूनच भाजपचा उमेदवार केवळ 3 हजार मतांनी निवडून आला. यावरून निवडणूक आयोग बदमाश असल्याचे स्पष्ट होते,” असा दावा त्यांनी केला.

    नदीत फुटबॉल चा खेळ, दोघांचा मृत्यू

    ५० हजार बोगस मतदार

    धोटे पुढे म्हणाले की, “माझ्याकडे ऑनलाइन नोंदणीद्वारे ही बोगस मते वाढविण्यात आल्याची माहिती आली असून याबाबत मी राजुरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. फक्त राजुरा मतदार संघातच नाही तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात तब्बल 50 हजार बोगस मते वाढविण्यात आली आहेत. राहुल गांधी जे सांगत आहेत ते सत्य आहे,” असेही ते म्हणाले. fraudulent voters accusation

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष सज्ज असून “प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन बोगस मते ओळखून त्यांना वगळण्याचे काम काँग्रेस करणार,” असा निर्धार धोटे यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला

  • Chandrapur police officers honored । चंद्रपूर गुन्हे शाखेतील उत्कृष्ट पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव

    Chandrapur police officers honored

    Chandrapur police officers honored : चंद्रपूर – १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाला चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांचा पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. वर्ष २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेतील सत्कारमूर्ती अधिकारी व अंमलदार कार्यरत आहे.

    मध्यप्रदेश राज्यातून आली अवैध दारूची खेप, स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई

    स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनोद गजानन भुरले यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर, मूल, घुग्गुस, गोंडपिपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध जनावर तस्करी कारवाईत एकूण २७८ गोवंश जनावरांची सुटका करीत एकूण ३ लाख ७५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरी व घरफोडीचे एकूण ३१ गुन्हे उघडकीस आणत चोरीस गेलेला सोन्या चांदीचा मुद्देमाल एकूण ८८ लाख ६९ हजार ९०० रुपये हस्तगत करीत महत्वाची कामगिरी बजावली. Chandrapur Police performing excellently

    ८५० बेपत्ता नागरिकांना आणले शोधून

    स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक संतोष ज्ञानेश्वर निंभोरकर यांनी वर्ष २०२५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घरून निघून गेलेल्या, पळून व हरवलेल्या तसेच पळवलेल्या एकूण ८५० मुलं/मुली, महिला व पुरुष यांचा शोध लावत त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या सर्व आव्हानात्मक गुन्ह्याचा तपास अतिशय चपळतेने निंभोरकर यांनी केला. Chandrapur police achievements

    crime branch

    स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अंमलदार किशोर रतन वाकाटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बनावटी देशी दारू वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांची गोपनीय माहिती काढत एकूण ३ आयशर ट्र्क मधील बनावट दारूच्या ९३५ पेट्या किंमत ६२ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    chandrapur crime branch

    या तीन उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री अशोक उईके यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देत गौरविण्यात आले.

    सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात केली.

  • bamboo QR code initiative at Chandrapur । QR कोड स्कॅन करा आणि जाणून घ्या चंद्रपूरातील दुर्मीळ बांबू प्रजातींचे रहस्य 🌿

    bamboo QR code initiative at Chandrapur

    bamboo QR code initiative at Chandrapur : चंद्रपूर, दि. 16 : बांबु संशोधन प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली परिसरात बांबू सेटम येथे ‘क्यूआर कोड बेस्ड’ माहिती प्रणालीचे उद्घाटन प्रधान मुख्य वनसंरक्षक (संवर्धन) तथा वन अकादमीचे संचालक एम.एस. रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्राचे संचालक एम. एन. खैरनार, विभागीय वन अधिकारी ज्योती पवार, वन अकादमीचे सत्र संचालक संजय दहिवले, भारती रेड्डी तसेच संस्थेचे कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    चंद्रपुरात मनसेचे खड्ड्याविरोधात अनोखे आंदोलन

    या प्रणालीअंतर्गत प्रत्येक बांबू प्रजातीसमोर लावलेला क्यूआर कोड स्कॅन केल्यावर पर्यटक, संशोधक आणि विद्यार्थी आपल्या मोबाईलवर त्या प्रजातीची वैज्ञानिक, स्थानिक व वापराविषयीची सविस्तर माहिती पाहू शकतील. ही माहिती मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. या उपक्रमामुळे पर्यटकांच्या अनुभवात वाढ होऊन, विद्यार्थ्यांना व संशोधकांना अभ्यासासाठी मौल्यवान माहिती सहज उपलब्ध होईल.  ही अभिनव संकल्पना संचालक एम.एस.रेड्डी यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली आहे. bamboo research training centre QR info system

    बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या प्रगतीकरिता केलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम मेश्राम, हस्तकला निर्देशक किशोर गायकवाड,  पर्यवेक्षिका योगिता साठवणे, माहिती तंत्रज्ञान सहाय्यक दिपा बिसेन यांचा तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला.

    बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्राचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व

    यावेळी श्री. रेड्डी यांनी बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्राचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व अधोरेखित केले. विविध तंत्रज्ञानाचा वापर करून वंचित व दुर्बल घटकांना त्यांच्या जीवन उन्नतीसाठी सक्षम करणे, तसेच केंद्राच्या माध्यमातून युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, ही या केंद्राची मोठी भूमिका आहे. बांबू हा पर्यावरणपूरक, टिकाऊ व बहुउपयोगी नैसर्गिक संसाधन असून बांधकाम, फर्निचर, हस्तकला, कागद व ऊर्जानिर्मिती यांसह अनेक उद्योगांत त्याचा व्यापक वापर होऊ शकतो. यासाठी या केंद्राच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले गेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

    कार्यक्रमाचे संचालन वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. मल्लेलवार यांनी तर आभार वनपाल विलास कोसनकर वनपाल यांनी मानले.

  • MNS protest against potholes । आमची मागणी आहे स्पष्ट, खड्डे करा नष्ट, चंद्रपूर मनसेचे अनोखे आंदोलन

    MNS protest against potholes

    MNS protest against potholes : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस नागपूर महामार्गावरील खड्डेमय रस्त्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पडोली येथे अनोखे आंदोलन केले. पावसामुळे रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे आणि अनेकांना जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्यामुळे अखेर मनसेने स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

    ४८ तासात घरफोडीचे गूढ उकलले

    “आमची मागणी आहे स्पष्ट, खड्डे करा नष्ट” अशा घोषणा देत, मनसेच्या कार्यकर्त्यांनी “स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे झाली, तरीही खड्ड्यांसाठी अजूनही सुरू आहे आमचा संघर्ष” अशा आशयाचे टी-शर्ट परिधान करून आपला निषेध नोंदवला.

    फक्त मलमपट्टी

    मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी सांगितले की, अनेक तक्रारी करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. केवळ डागडुजी करून नागरिकांच्या त्रासावर मलमपट्टी केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्त करावेत, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

    या आंदोलनात मनसेचे जिल्हा सचिव किशोर मडगूलवार, तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

  • Chandrapur development schemes 2025 । 🌟 चंद्रपूर 2025: नव्या विकास योजनांनी जिल्ह्याचा चेहरा बदलेल – पालकमंत्री उईके

    Chandrapur development schemes 2025

    Chandrapur development schemes 2025 : चंद्रपूर, दि. 15 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित, महिला, युवक – युवती यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून काम करीत आहे. यात चंद्रपूर जिल्हाही मागे नाही. शासन आणि प्रशासनाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. असे असले तरी विकासाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जिल्हा अग्रेसर ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

    राज्याचा हिरा लंडनमध्ये चमकणार, सुधीर मुनगंटीवार यांचा कोहिनुर ऑफ इंडिया ने सन्मान

    भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

    सुरवातीला शहिदांचे स्मरण करून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, आधुनिक कालखंडाच्या इतिहासात 1857 च्या पहिल्या भारतीय स्वातंत्रलढ्याचे पडसाद चंद्रपूर जिल्ह्यातही पडले. आदिवासींच्या जमिनीवर इंग्रजांनी जबरदस्तीने कब्जा केल्यानंतर शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांनी इंग्रजांविरुध्द युध्द पुकारले. 1942 च्या चिमूर क्रांतीमुळे चंद्रपूर हे केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात नावारुपास आले.

    आपल्याला हे स्वातंत्र शहिदांच्या बलिदानातनू मिळाले आहे. त्यामुळे स्वातंत्र्याचे सुराज्यात रुपांतर करण्यासाठी शासन- प्रशासन कटिबध्द आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या महसूल सप्ताहादरम्यान 73 महाराजस्व अभियान शिबिरांतर्गत 5 हजार 392 विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यात ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी नोंदणी झालेल्या शेतक-यांची संख्या 3 लक्ष 2 हजार 882 असून ही टक्केवारी 97.89 आहे. Chandrapur 73 revenue campaign benefits

    पुढे पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, ‘प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान’ अंतर्गत आदिम जमातींच्या नागरिकांकरिता 482 घरकुल मंजूर करण्यात आले आहे. ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत जिल्ह्यात एकूण 83 शिबिर आयोजित करण्यात आले. यात विविध प्रकारचे 15 हजार 853 दाखले देण्यात आले. आदिवासी भगिनींच्या सक्षमीकरणासाठी आणि सन्मानासाठी ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना’ राबविण्याचा धोरणात्‍मक निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. Chandrapur Prime Minister Janjati Mahabhiyan houses 482 beneficiaries

    जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत २३२ गावांची निवड

    प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 49 कोटी 70 लक्ष रकमेचा 20 वा हप्ता जिल्ह्यातील 2 लक्ष 48 हजार 540 शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आला आहे. माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत जिल्हयातील सर्व 824 ग्रामपंचायतीची नोंदणी करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण 232 गावांची निवड करण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा दोन अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 561 गावांची निवड झाली आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा एकूण 1372 विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. रमाई आवास शहरी व ग्रामीण योजनेचे एकूण 847 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. Chandrapur AgriStack farmer ID registration

    शासनाने 6 ऑगस्ट, 2025 पासून सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री ग्रामसमृध्द पंचायतराज अभियानात’ सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी उस्फूर्त सहभाग नोंदवावा. तसेच दुस-यांना जीवनदान देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदान व नेत्रदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.

    तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते ‘नशामुक्त अभियान’च्या फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच यावेळी तंबाखु सेवन प्रतिबंधबाबत शपथ घेण्यात आली.

    विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या नागरिकांचा सन्मान : 

    यावेळी मान्यवरांच्या हस्ते वीरपत्नी वैक्कमा भिमनपाल्लीवार, वीरनारी अरुणा रामटेके, पार्वती डाहुले, छाया नवले, वीरपिता बाळकृष्ण नवले, नायब सुभेदार शंकर मेंगरे यांच्यासह डॉ. संदीप पिपरे, डॉ. भास्कर सोनारकर, आर.आर. आबा सुंदरग्राम योजनेंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल ग्रामपंचायत वांद्रा (ता. ब्रम्हपुरी), कळमना (राजुरा) यांचा तसेच अवयवदान केलेल्या नागरिकांचे नातेवाईक ज्ञानेश्वर बोबडे, माधुरी भटवलकर, भारती नवघरे, महादेव जंपलवार, प्रतिक पारखी, नंदू हेमणे, एकांश कोटगले यांचा मान्यवरांनी शाल, सन्मानपत्र देऊन सत्कार केला.

  • Chandrapur women send 30000 rakhis to CM । 🌸 चंद्रपूरच्या भगिनींकडून मुख्यमंत्री फडणवीस यांना ३० हजार राख्या

    Chandrapur women send 30000 rakhis to CM

    Chandrapur women send 30000 rakhis to CM : चंद्रपूर – भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या महिला आघाडीच्या वतीने आज शुक्रवारी जैन भवन येथे रक्षाबंधन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या विशेष सोहळ्यात चंद्रपूर मतदारसंघाच्या वतीने पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके यांच्या मार्फत तब्बल ३० हजार राख्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आल्या. भगिनींनी मुख्यमंत्री यांच्याप्रती असलेला विश्वास, प्रेम आणि संरक्षणाची भावना या उपक्रमातून व्यक्त केली.

    स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ

    या कार्यक्रमाला आदिवासी विभाग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके, चंद्रपूर मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार अनिल सोले, भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्ष छबु वैरागडे, भाजप नेते प्रकाश देवतळे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, नामदेव डाहुले, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकुर, वंदना हातगावकर, महामंत्री मनोज पाल, रवि गुरुनुले, सविता दंढारे,  युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, मंडळ अध्यक्ष रवि जोगी, प्रदीप किरमे, अॅड. सारिका संदुरकर, स्वप्निल डुकरे, अरुण तिखे, अॅड. राहुल घोटेकर, माजी नगरसेविका कल्पना बबुलकर, पुष्पा उराडे, शितल आश्रम, शितल गुरनूरे, वनिता डुकरे, वंदना तिखे, सायली येरणे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. Chandrapur Raksha Bandhan grand event

    महिलांच्या स्वावलंबनासाठी राज्य सरकारचे विविध उपक्रम

    यावेळी बोलताना पालकमंत्री अशोक उईके म्हणाले कि, रक्षाबंधन हा भगिनींच्या सन्मान आणि सुरक्षिततेचे प्रतीक आहे. आज चंद्रपूरच्या भगिनींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ३० हजार राख्या पाठवून आपला विश्वास व्यक्त केला आहे, हा क्षण अभिमानाचा आहे. मुख्यमंत्री स्वतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहेत. राज्य सरकार महिलांच्या शिक्षण, आरोग्य, स्वावलंबनासाठी विविध उपक्रम राबवत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

    या कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, भगिनींचा विश्वास हा माझ्यासाठी प्रेरणेचा स्रोत आहे. आज या कार्यक्रमातून भगिनींनी केवळ आमच्याच नाही तर थेट मुख्यमंत्री यांच्याप्रती विश्वासाचा पवित्र धागा पाठवून एक सुंदर संदेश दिला आहे. आमच्या लाडक्या ताईंच्या सुरक्षिततेसाठी, न्यायासाठी आणि सन्मानासाठी आम्ही प्राथमिकतेचे काम करू, असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. Chandrapur Raksha Bandhan

                या कार्यक्रमात लहान मुलींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनी राखी बांधून सणाचे महत्त्व अधोरेखित केले. अखेरीस ३० हजार राख्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्याची औपचारिक घोषणा करत हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. विशेष म्हणजे अल्पसंख्यांक महिला आघाडीच्या वतीने ही 2 हजार राख्या मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आल्यात.  या कार्यक्रमाला महिला भगिनींची शेकडोंच्या संख्येने उपस्थिती होती.

  • Sudhir Mungantiwar Kohinoor of India Award । राज्याचा हिरा लंडनमध्ये चमकणार

    Sudhir Mungantiwar Kohinoor of India Award

    Sudhir Mungantiwar Kohinoor of India Award : चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनमधून भारतात आणणण्याचे ऐतिहासिक कार्य करणारे आ. श्री. मुनगंटीवार यांना त्याच लंडनच्या भूमिमध्ये ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ‘लोकमत’च्या वतीने सोमवार दि. १८ ऑगस्ट रोजी लंडन येथे आयोजित ‘ग्लोबल इकॉनामिक कन्व्हेन्शन’मध्ये आ. श्री. मुनगंटीवार यांना हा सन्मान बहाल करण्यात येईल. Sudhir Mungantiwar

    चंद्रपूरकरांना स्मार्ट मीटर चा करंट

    ‘लोकमत’च्या ‘ग्लोबल इकॉनामिक कन्व्हेन्शन’ या प्रतिष्ठित सोहळ्याचे हे दुसरे वर्ष असून, गेल्या वर्षीं हा सोहळा सिंगापूर येथे झाला होता. या वर्षी लंडनमध्ये होणाऱ्या या कन्व्हेन्शनमध्ये भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने होणाऱ्या प्रगतीवर चर्चा होणार आहे. भारताच्या आर्थिक धोरणांचे विश्लेषण, जागतिक व्यापारातील भूमिका, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांचा विकास आणि हरित ऊर्जा यांसारख्या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.

    या सोहळ्यात ‘कोहिनूर ऑफ इंडिया’, ‘भारत भूषण’, ‘महाराष्ट्र रत्न’, ‘ग्लोबल सखी’ आणि ‘गुजरात रत्न’ अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. हे पुरस्कार त्यांच्या कार्याची जागतिक पातळीवर दखल घेण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी दिले जाणार आहेत. Kohinoor of India Award

    आ. श्री. मुनगंटीवार यांना राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी ‘लोकमत कोहिनूर ऑफ इंडिया’ हा जाहीर करण्यात आला.‘देशाच्या विकास आणि प्रगतीमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आपले मनःपूर्वक आभार. या जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित व्यासपीठावर आपल्या विलक्षण कार्याचा उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,’ असे पत्र आ. श्री. मुनगंटीवार यांना ‘लोकमत’ माध्यम समूहाचे चेअरमन श्री. विजय दर्डा यांच्याकडून प्राप्त झाले आहे.

    यापूर्वी अनेक पुरस्काराने गौरव

    आ. श्री. मुनगंटीवार यांना यापूर्वी देखील अनेक पुरस्कार व सन्मान बहाल करून गौरविण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने मानाची डी.लिट. प्रदान करण्यात आली. पर्यावरण व वन्यजीव तसेच संस्कृती व ऐतिहासिक वारसा संवर्धन क्षेत्रात आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिलेल्या योगदानासाठी ही डी.लिट. प्रदान करण्यात आली. गोंडवाना विद्यापीठ स्थापन व्हावे यासाठी आ. श्री. मुनगंटीवार यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्याच विद्यापीठातर्फे डी.लिट. जाहीर होणे हा देखील एक विलक्षण योगायोग ठरला. Sudhir Mungantiwar

    १९९९ मध्‍ये राष्‍ट्रकुल संसदिय मंडळाच्‍या वतीने विधानसभेतील उत्‍कृष्‍ट आमदार, २००८ मध्‍ये अंध कल्‍याणाच्‍या क्षेत्रात उल्‍लेखनिय काम केल्‍याबद्दल राष्‍ट्रीय दृष्‍टीहीन संघाच्‍या वतीने जी.एल. नर्डेकर स्‍मृती पुरस्‍कार, वृक्षारोपण मोहीमेच्या संदर्भात किर्लोस्‍कर वसुंधरा अवार्ड, लोकसेवा आणि विकास संस्‍थेचा कर्मवीर मासा कन्‍नमवार मेमोरियल अवार्ड, दैनिक लोकमतचा महाराष्‍ट्रीयन ऑफ द इयर, इंडिया टूडे समुहाद्वारा दोन वेळा बेस्‍ट फायनान्‍स मिनिस्‍टर पुरस्‍कार, आफ्टरनुन व्‍हॉइस या संस्‍थेद्वारे बेस्‍ट परफॉर्मिंग मिनिस्‍टर पुरस्‍कार, जे.सी.आय. महाराष्‍ट्र तर्फे मॅन ऑफ द इयर पुरस्‍कार, फेम इंडिया तर्फे उत्‍कृष्‍ट मंत्री पुरस्‍कार अशा प्रतिष्‍ठेच्‍या पुरस्‍कारांनी त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आले. Sudhir Mungantiwar

    आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्री पदाच्या कार्यकाळात ४ लिम्का रेकॉर्डसह ‘सियावर रामचंद्र की जय’ ही अक्षररचना व ‘ग्रीन भारतमाता’ साकारण्यासाठी २ गिनेस बुक ऑफ रेकॉर्ड मिळाले, विक्रमी वृक्षलागवडीसाठी देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये विशेष उल्लेख केला, तसेच त्यांच्या कार्यालयाला देशातील पहिला आयएसओ दर्जा प्राप्त झाला. वित्तमंत्री म्हणून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘आज तक’ व ‘इंडिया टुडे’ने त्यांना ‘बेस्ट फायनान्स मिनिस्टर इन इंडिया’ म्हणून गौरविले, स्व. अरुण जेटली यांच्या हस्ते सन्मानित केले गेले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ११,९७५ कोटी रुपयांचा महसुली आधिक्य असलेला ऐतिहासिक अर्थसंकल्प त्यांनी सादर करून देशात अभूतपूर्व नोंद केली.