महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.
monuments for Gond heroes in Chandrapur : चंद्रपूर (२५ ऑगस्ट २०२५) – जिल्ह्यातील आदिवासींच्या मागण्यांवर जिल्हा प्रशासन गंभीर नाही. त्यामुळे आदिवासी प्रशासनावर प्रचंड संतापले आहेत. जर प्रशासनाने या समस्या लवकरात लवकर सोडवल्या नाहीत तर आदिवासी संघटनांना रस्त्यावर उतरून जनआंदोलन सुरू करावे लागेल असे संकेत गोंडवाना गणतंत्र पक्षाचे नामदेव शेडमाके यांनी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा प्रशासनाला दिले.
त्यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्याला गोंडराजाचा इतिहास आहे. ज्या महापुरुषांनी आपले बलिदान दिले त्यांच्या आदर्शांना आणि बलिदानांना लक्षात ठेवून गिरनार चौकात क्रांतिकारी शहीद बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांचे स्मारक आणि पुतळा उभारावा आणि चौकाला बाबुराव शेडमाके चौक असे नाव द्यावे, जटपुरा गेटजवळ राजमाता राणी हिराई यांचे स्मारक आणि पुतळा उभारावा आणि राणी हिराई चौक असे नाव द्यावे,
गोंडराज यादवशाह महाराज आत्राम यांचे स्मारक
चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटचे गोंडराज यादवशाह महाराज आत्राम यांचे स्मारक आणि पुतळा चंद्रपूरच्या बसस्थानक परिसरात बसवावे आणि चौकाला त्यांचे नाव द्यावे, अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपूर आणि लगतच्या परिसरातील शेतकयांच्या शेतजमिनी संपादित करून शेतकयांना योग्य मोबदला द्यावा, सिमेंट कंपनीचे व्यवस्थापक जबरदस्तीने खोदकाम करत आहेत आणि ते त्वरित थांबवण्याची मागणी नामदेव शेडमाके यांनी पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषदेत बापूजी मडावी, नामदेव शेडमाके, जितू मडावी, राजेंद्र धुर्वे, राजेंद्र मेरस्कोल्हे उपस्थित होते.
District stadium swimming pool coach controversy : चंद्रपूर (२५ ऑगस्ट २०२५) – शहर जिल्हा स्टेडियममधील जलतरण तलावात प्रशिक्षक म्हणून काम करणाया श्रीकांत बल्की यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांशी केलेल्या गैरवर्तनामुळे स्पर्धे दरम्यान शालेय विद्यार्थ्याचे नुकसान झाले आहे. येथे आलेल्या दुसया स्विमींग प्रशिक्षकाशी झालेल्या वादात शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमकी दिल्यामुळे प्रशिक्षक श्रीकांत बल्की वर कार्रवाई करण्याची मागणी आयोजित पत्रकार परिषदेत राकेश कुमार रॉय आणि पालक अनिल झाडे यांनी केली आहे.
सध्या श्रीकांत बल्की आणि राकेश कुमार रॉय दोघेही जिल्हा स्टेडियमच्या स्मिमींग पुल येथे प्रशिक्षणार्थींना पोहण्याचे प्रशिक्षण देतात. जिल्हा स्टेडीअम वर जिल्हास्तर वर आणि महानगरपालिके कडून आंतरशालेय जलतरण स्पर्धा सुरू आहे. येथे, खेळाडू विद्यार्थ्यांची शासन मार्फत नोंदणी करण्यात आली आहे. रविवार २४ ऑगस्ट रोजी शहरातील एका शाळेतील 13 वर्षीय विद्यार्थ्याची जलतरण स्पर्धा होती. District stadium swimming coach threat controversy
शिवीगाळ व मारण्याची धमकी
शाळेने या स्पर्धेसाठी विद्यार्थ्याची ऑनलाइन नोंदणी केली होती. परंतु रविवारी हा विद्यार्थी स्पर्धेसाठी स्विमिंग पूलमध्ये पोहोचला आणि स्पर्धेची तयारी करत होता. तेव्हा प्रशिक्षक बल्की यांनी स्पर्धा पोर्टलवर त्याचे नाव नोंदणीकृत नसल्याने तो स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाही असे सांगून विद्यार्थ्याला निराश केले. यादरम्यान, शाळेचे शिक्षक, प्रशिक्षक राकेश रॉय प्रशिक्षक श्रीकांत बल्की यांच्याकडे पोहोचले आणि कारण विचारले असता, बल्की यांनी दोघांनाही शिवीगाळ केली आणि मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप राकेशकुमार रॉय यांनी पत्रकार परीषदेत केला.
यादरम्यान, प्रशिक्षक बल्की यांच्या चुकीच्या वर्तनामुळे पालक अनिल झाडे यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पत्रकार परीषदेत राकेश कुमार रॉय, अनिल झाडे, मंजुषा झाडे, सुनीता टोंगे, पल्लवी वानखेडे हे उपस्थित होते.
NHM contract staff indefinite strike Maharashtra : चंद्रपूर : (२५ ऑगस्ट २०२५) राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती तसेच एकता संघटनेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी ‘बेमुदत कामबंद’ आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या दि. १४/०३/२०२४ रोजीच्या निर्णयानुसार नियमित शासन सेवेत समायोजन व बदली धोरण, वेतनवाढ, ईपीएफ, आरोग्य व अपघात विमा आदी लागू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट देऊन पत्राद्वारे आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला.
प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “सार्वजनिक आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी अनेक वर्षांपासून अखंड सेवा बजावत आहेत. शासनाने या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, यासाठी मी आमदार असताना सातत्याने प्रयत्न केले आहेत. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या विधानसभेत मांडल्या होत्या. विशेषतः १० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणासाठी मी सभागृहात ठाम आवाज उठवला होता. या पाठपुराव्यामुळेच सरकारने नियमितीकरणाचा आदेश जारी केला.” Maharashtra NHM staff indefinite strike
त्या पुढे म्हणाल्या, “परंतु अत्यंत खेदाने सांगावे लागते की, आदेश असूनही परिचारिकांसह अनेक कर्मचाऱ्यांचे आजतागायत नियमितीकरण झालेले नाही. हे फक्त निराशाजनकच नाही, तर त्यांच्या निष्ठावंत परिश्रमांचा व योगदानाचा अवमान आहे.”
या लढ्यात कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन देत प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, “कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण हा त्यांचा हक्क आहे. या हक्कासाठी लढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. तुमच्या या लढ्यात मी खंबीरपणे तुमच्या सोबत उभी आहे. तुमच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी मी पुन्हा एकदा संसदेत आणि केंद्र सरकारकडे ठोस पाठपुरावा करेन.” यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आंदोलन कर्त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले.
आंदोलक कर्मचाऱ्यांनी शासनाने या विषयाकडे तातडीने लक्ष देऊन त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.
Human-bear conflict in Chandrapur : चंद्रपूर (२५ ऑगस्ट २०२५) – चंद्रपुरातील जुनोना गावात २३ ऑगस्ट रोजी जंगलात पाने तोडण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्रावर अस्वलीने हल्ला केला होता, या हल्ल्यात वडील अरुण कुकसे व मुलगा विजय कुकसे गंभीर जखमी झाले होते. अरुण कुकसे यांना नागपुरातील एम्स मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र २५ ऑगस्ट रोजी अरुण कुकसे यांचा मृत्यू झाला.
२३ ऑगस्ट रोजी अरुण व विजय कुकसे पिता-पुत्र जुनोना जंगलात पाने तोडण्यासाठी गेले असता अरुण कुकसे वर अस्वलीने हल्ला केला, वडिलाला वाचविण्यासाठी विजय ने अस्वलीचा सामना केला मात्र अस्वलीने दोघांना पंज्यात पकडत जखमी केले, यावेळी दोघांनी आरडाओरडा केला असता गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेत, अस्वलीला हाकलण्यास सुरुवात केली मात्र अस्वलीने दोघांना सोडले नाही. wildlife incident Junona forest
उपचारादरम्यान मृत्यू
गावकर्यांनी हातात दंडुके घेत अस्वलीला हाकलण्याचा प्रयत्न केला, तासभरानंतर अस्वलीने दोघांना सोडले, यावेळी अरुण कुकसे हे गंभीर जखमी झाले होते, गावकर्यांनी दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले, वडील अरुण हे गंभीर जखमी असल्या कारणाने त्यांना तात्काळ नागपुरातील एम्स मध्ये दाखल करण्यात आले. आज २५ ऑगस्ट रोजी सकाळी अरुण कुकसे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या मुलगा विजय रुग्णालयात उपचार घेत आहे.
अस्वलाच्या हल्ल्यांनंतर वनविभागाने कसोशीने प्रयत्न करीत अस्वलाला जेरबंद केले होते, मात्र अस्वल गंभीर जखमी असल्याने २४ ऑगस्ट रोजी अस्वलाचा मृत्यू झाला. जुनोना गावातील नागरिकांनी मागणी केली आहे कि मृतक अरुण कुकसे यांच्या परिवाराला २५ लाख रुपये आर्थिक भरपाई तर मुलगा विजय ला वनविभागात नोकरी द्यावी अशी मागणी केली केली आहे.
Shantidham cremation center : चंद्रपूर – रहमतनगर ईरई नदी घाटावर अंत्यसंस्कार व्यवस्था पाहणायां शांती धाम संस्थेत भ्रष्टाचार आणि महिला छळवणुकीचे गंभीर आरोप इथे लाकडाचा टॉल चालविणारी स्नेहा गर्गेलवार यांनी पत्रपरीषदेत केला आहे. तसेच संस्थेचे कर्मचारी आणि पदाधिकायांविरोधात काही खुलासे समोर आणले आहे.
तीने पत्रपरीषदेत माहीती दिली की, तीचे वडील नरेंद्र गर्गेलवार यांच्या नावाने संस्थेशी करार करून लाकडाचा टॉल सुरू होता. मात्र संस्थेतील कर्मचारी हरीश गोडे याने कारस्थान रचल्यामुळे झालेल्या मानसिक तणावामुळे नरेंद्र गर्गेलवार यांचा नोव्हेंबर २०२४ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर स्नेहा हिने व्यवसाय स्वतः हाती घेतला.
स्नेहा ने सांगितले की, “मी व्यवसाय प्रामाणिकपणे चालवते, तरी हरीश गोडे माझ्यावर वाईट नजर ठेवतो, मजुरांना धमकावतो आणि माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला छळतो.” हरीश गोडेवर पूर्वीही विनयभंगाचा गुन्हा नोंद असल्याची माहिती समोर आली. तरीही संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक वासलवार आणि सचिव घनशामसिंह दरबार यांच्याकडून त्याला पाठबळ मिळत असल्याचा आरोप स्नेहा ने केला आहे. Shantidham trust corruption
न्यायालयाचा अवमान, व्यवसायात अडथळे
याशिवाय, गर्गेलवार कुटुंबीयांचा करार न्यायालयात प्रलंबित असताना स्थगिती आदेश असूनही संस्थेने टॉल बंद करण्याचे पत्र दिले. न्यायालयाचा अवमान करून स्नेहाच्या व्यवसायात अडथळे आणले जात असल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांकडे तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे स्नेहाने सांगितले.
यारदम्यान मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी संस्थेतील गैरव्यवहार उघड करताना सांगितले की, १९९६ ते २०२० दरम्यान संस्थेचे ऑडिट झाले नाही. रथ, बैंड, मेटाडोर यांचे दर मनमानी वाढवून मृतकांच्या कुटुंबियांकडून अतिरिक्त रक्कम वसूल केली जाते. कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊनही हिशेब नाही असा आरोप त्यांनी केला.
त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष, सचिव, कर्मचारी हरीश गोडे आणि इतरांवर महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्नेहा गर्गेलवार हिने केली आहे.
daylight tiger attack on cow : घुग्घुस, चंद्रपूर 24 ऑगस्ट 2025:घुग्घुस शहरालगत असलेल्या नकोडा गावाजवळ वाघाच्या हल्ल्यात एका गाईचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना रविवारी (24 ऑगस्ट 2025) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
नकोडा येथील वेकोलि मॅगझीनजवळ ही घटना घडली. वाघाने अचानक एका गाईवर हल्ला केला. वाघाने गाईला गंभीर जखमी करून काही अंतरापर्यंत ओढत नेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु उपचारापूर्वीच गाईचा मृत्यू झाला. ही घटना दिवसाढवळ्या घडल्यामुळे स्थानिक नागरिक अधिकच धास्तावले आहेत.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टीम, ज्यात वनरक्षक सुनीता मकणी आणि इतर कर्मचारी होते, त्यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी केली. पाहणीदरम्यान वाघाचे स्पष्ट ठसे (पगमार्क) आढळून आले.
दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यामुळे नकोडा, घुग्घुस आणि आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आज जनावरावर हल्ला झाला, उद्या नागरिकांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वनविभागाने या परिसरात गस्त वाढवून वाघाला पकडण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
bear attack Chandrapur forest video footage : चंद्रपूर: चंद्रपूरजवळील जुनोना गावात शनिवारी सकाळी एक थरारक घटना घडली. जंगलात पाने तोडण्यासाठी गेलेल्या वडील आणि मुलावर अचानक एका अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात अस्वल आपल्या पंजाने त्यांना पकडत सतत हल्ला करताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुनोना गावातील अरुण कुकसे हे त्यांचा मुलगा विजयसोबत जंगलात पाने गोळा करण्यासाठी गेले होते. अचानक झुडपातून आलेल्या अस्वलाने सर्वात आधी अरुण यांच्यावर हल्ला केला. वडिलांना वाचवण्यासाठी गेलेल्या विजयवरही अस्वलाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. विजयने सांगितले की, अस्वलाने वडिलांवर हल्ला करताच त्याने काठीने अस्वलावर वार केले, पण अस्वलाने त्याच्यावरही हल्ला केला आणि त्यानंतर काय झाले, ते त्याला आठवत नाही. bear-human conflict Chandrapur
हल्ल्याचा व्हिडीओ
या घटनेदरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी आरडाओरडा करत लाठी-काठी आणि दगडांनी अस्वलाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अस्वल आधी विजय व नंतर अरुणवर हल्ला करत राहिले. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, गावकऱ्यांनी पूर्ण ताकदीने अस्वलावर वार केले, तरीही अस्वल अरुण यांना आपल्या पंजात पकडून होते. अखेर गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नांनंतर अस्वल अरुण यांना अर्धमेलेल्या अवस्थेत सोडून जंगलात पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि जखमी पिता-पुत्राला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी अरुण यांची गंभीर स्थिती पाहून त्यांना पुढील उपचारांसाठी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले आहे, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, मुलगा विजयची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
MLA Kishor Jorgewar on virugiri andolan : चंद्रपूर – थकीत वेतन आणि रोजगाराच्या मागणीसाठी विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी कंपनीच्या आवारातील १६५ मीटर उंच चिमणीवर चढून सुरू केलेले प्रकल्पग्रस्त कामगारांचे ‘वीरुगिरी’ आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतः आंदोलनस्थळी धाव घेतली आणि तब्बल चार तास ठिय्या मांडून कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यात समन्वय साधत मागण्या मान्य करून घेतल्या आहे. त्यानंतर आंदोलांची यशस्वी सांगता झाली आहे.
आमदार जोरगेवार यांच्या मध्यस्थीनंतर १०३ प्रकल्पग्रस्तांना १० सप्टेंबरपासून सहा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीवर कामावर घेण्याचे कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले. तसेच सहा महिन्यांनंतर सर्व प्रकल्पग्रस्तांना स्थायी स्वरूपात सामावून घेण्याचेही मान्य करण्यात आले. आमदारांच्या उपस्थितीत कंपनी व्यवस्थापनाने याबाबत लिखित हमी दिल्याने आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही, या ठाम भूमिकेसह आमदारांनी कंपनी व्यवस्थापनाला स्पष्ट शब्दांत सुनावले आणि तोडगा निघेपर्यंत आंदोलनस्थळ सोडले नाही हे विशेष. chimney protest workers permanent jobs guarantee
या प्रसंगी महसूल विभागचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव, तहसीलदार ओमकार ठाकरे, घुग्घुस ठाणेदार राउत, कंपनी व्यवस्थापनाचे आशिष नरळ, दीपक गुप्ता, भाजप नेते नामदेव डाहुले, कामगार नेते प्रवीण लांडगे, महामंत्री मनोज पाल, घुग्घुस शहर अध्यक्ष संजय तिवारी, रवि गुरनुले, दशरथसिंह ठाकुर, प्रवीण गिलबिले, मुन्ना लाढे, देवानंद वाढई, उसगाव सरपंच निविदा ठाकरे, उपसरपंच मंगेश आसुटकर, मंडळ अध्यक्ष विनोद खेवले, धनंजय ठाकरे, इमरान खान, आशिष माशिरकर, संजय नूने, स्वप्निल वाढई, राजकुमार गोडसेलवार, महेश लढ्ढा, दत्तु जोगी आदींची उपस्थिती होती.
२००८ साली गुप्ता एनर्जी कंपनीने उसगाव परिसरात प्रकल्प उभारणीसाठी १०३ शेतकऱ्यांची जमीन संपादित केली होती. बदल्यात त्यांना कंपनीत स्थायी रोजगार देण्यात आला. मात्र २०१५-१६ मध्ये कंपनी अचानक बंद पडली व २०१७ साली दिवाळखोर घोषित झाल्याने अनेकांचे वेतन थकीत राहिले. नंतर कंपनीचा कारभार विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी कंपनीकडे गेला. कंपनी सुरू झाल्यावर प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले गेले होते. मात्र ते पाळले गेले नाही. उलट बाहेरील कामगारांना कामावर घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संताप निर्माण झाला. contract jobs followed by permanent employment
अखेर २३ ऑगस्ट रोजी विजयक्रांती कामगार संघटनेचे प्रवीण लांडगे यांच्या मार्गदर्शनात प्रकल्पग्रस्त महेंद्र वडस्कर, भारत खनके, सुधाकर काळे, सुरेंद्र विके, रमेश सोनेकर, अनिल निखाडे, सुनील जोगी व उमाकांत देठे या आठ जणांनी मध्यरात्री चिमणी वर चढून जीव धोक्यात घालून ‘वीरुगिरी’ आंदोलन छेडले. MLA Kishor Jorgewar on virugiri andolan
परिस्थिती गंभीर होत असताना आमदार किशोर जोरगेवार आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि कंपनी व्यवस्थापनालाही चर्चेसाठी बोलावले. ही भूमिपुत्रांची जमीन आहे. त्यांनी आपले घर, शेती देऊन प्रकल्प उभा केला आहे. आता त्यांच्याच मुलांना दारात उभे ठेवणे हा अन्याय आहे. कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही, असे ठाम शब्दांत आमदार जोरगेवार यांनी कंपनी व्यवस्थापनाला बजावले. आमदारांच्या ठाम भूमिकेमुळे व मध्यस्थीमुळे चर्चा यशस्वी ठरली. चार तास ठिय्या मांडून त्यांनी मागण्या मान्य करून घेतल्यानंतर अखेर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आंदोलनाची यशस्वी सांगता झाली आहे.
Bail Pola festival Chandrapur : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील साखरवाही येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही बैलपोळा उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला आमदार किशोर जोरगेवार उपस्थित राहून सहभागी झाले. यावेळी त्यांनी बैलजोडीची पूजा करून सन्मान केला तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले, “बैलपोळा हा केवळ धार्मिक वा पारंपरिक सण नसून शेती संस्कृतीचा आत्मा आहे. शेतकरी आणि बैल यांची जोडी ही अन्नधान्य निर्मितीमागील खरी ताकद आहे. त्यांच्या श्रमांचा सन्मान करून आपण कृतज्ञतेची भावना व्यक्त करतो. महाराष्ट्राची ही परंपरा बैलांप्रती असलेले प्रेम, आपुलकी, निष्ठा आणि निसर्गाशी असलेले घट्ट नाते अधोरेखित करते.”
तसेच त्यांनी पुढे सांगितले की, बैलांचा सन्मान करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनातील त्यांच्या महत्त्वाची कबुली देणे होय. त्यांच्या श्रमांशिवाय शेती अपूर्ण आहे, म्हणूनच बैलपोळा हा सण म्हणजे त्यांच्या त्याग, श्रम आणि निष्ठेला मानाचा मुजरा अर्पण करण्याचा सोहळा असल्याचे ते म्हणाले.
employment generation 135 percent success : चंद्रपूर, दि. 22 : राज्यातील युवक-युवतींना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देऊन स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने शासनाने 1 ऑगस्ट 2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) सुरू केला. या योजनेत सन 2024-25 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या नेतृत्वात उल्लेखनीय कामगिरी करत 135.38 टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे.
उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी दिलेल्या अभिनंदन पत्रानुसार, चंद्रपूर जिल्ह्याची ही उद्दिष्टपूर्ती जिल्हा प्रशासनाचे सक्षम नेतृत्व जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या नेतृत्वात, यंत्रणेमधील प्रभावी समन्वय आणि अधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शक्य झाली आहे. जिल्ह्यातील युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम मोलाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करण्यात आले असून 2025-26 मध्ये देखील या योजनेद्वारे अधिकाधिक युवक-युवतींना उद्योजकतेसाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.