महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.
Majhi Ladki Bahin yojana labharthi verification : चंद्रपूर, दि. 29 : महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू करण्यात आली आहे.
शासनाकडून जिल्हास्तरावर या योजनेच्या लाभार्थींचे वय पडताळणी यादी व एका परिवारातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी यादी प्राप्त झाली आहे.
यंत्रणेस सहकार्य करा
त्याअनुषंगाने बाल विकास प्रकल्प अधिकारी शहरी व ग्रामीण यांच्यामार्फत अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांच्याकडून लाभार्थींचे पडताळणीचे कार्य सुरू आहे. या पडताळणीकरिता यंत्रणेस सहकार्य करावे. जेणेकरून लाभार्थीचे शासन स्तरावरून थांबविलेले लाभ पूर्ववत सुरू करता येईल.
अधिक माहिती करिता तालुका स्तरावरील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय तथा जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, यांनी केले आहे.
responsive governance Adi Karmayogi Abhiyan : चंद्रपूर, दि. २९ ऑगस्ट २०२५ : सन 2047 पर्यंत विकसीत भारत घडविण्यासाठी, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवा व लोककेंद्रीत विकासाची पुर्तता होणे आवश्यक आहे. त्यासाठीच प्रतिक्रियाशील सुशासन कार्यक्रमाचा भाग म्हणून केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालयाने ‘आदि कर्मयोगी अभियान’ सुरू केले आहे. या अभियानात चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहावा, यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य समन्वयातून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरच्या वतीने नियोजन सभागृह येथे आयोजित तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. पुढे जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, ‘आदि कर्मयोगी अभियान’ हे केंद्र शासनाचे अतिशय महत्वाकांक्षी अभियान आहे. या अंतर्गत मास्टर ट्रेनर तयार करून तसेच लोकांचा सहभाग घेऊन प्रत्येक आदिवासी गावातील समस्यांची मांडणी असलेले डॉक्युमेंट तयार केले जाईल. जेणेकरून ‘विकसित भारत – 2047’ च्या व्हीजन डॉक्युमेंटमध्ये त्याचा समावेश करता येईल. त्यासाठी राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि ग्रामस्तरावर तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. Adi Karmayogi capacity building tribal change leaders
योजनांचे एकत्रिकरण करून व्हीजन डॉक्युमेंट होणार तयार
या अभियानात 1. पीएम जनमन योजना, 2. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, 3. राष्ट्रीय सिकलसेल उच्चाटन मोहीम आणि 4. एकलव्य निवासी शाळांचा विस्तार आणि शिष्यवृत्ती या व इतर योजनांचे एकत्रिकरण करून व्हीजन डॉक्युमेंट तयार करावयाचे आहे. मुख्य म्हणजे यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांची मुख्य जबाबदारी राहणार आहे. केंद्र आणि राज्य स्तरावरून या अभियानाचा नियमित पाठपुरावा सुरू असून 2 ऑक्टोबर 2025 च्या ग्रामसभेत हा आराखडा मंजूर करून घ्यावयाचा आहे. त्यामुळे यात प्रत्येक यंत्रणेचा सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी योग्य समन्वय व सुक्ष्म नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या. Adi Sewa Kendra tribal service centres scheme
प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानात चंद्रपूर जिल्ह्यातील 167 गावे तर पीएम जनमन योजनेत 68 गावांचा समावेशा आहे. आदिवासी गावांमध्ये आरोग्य, शिक्षण, पोषण, रोजगार, पाण्याची उपलब्धता करणे आाणि शासनाशी संपर्क ठेवण्यासाठी ‘आदि कर्मयोगी अभियान’ सुरू करण्यात आले आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. कार्यशाळेला सर्व विभागांचे प्रमुख, जिल्हास्तरीय तज्ज्ञ प्रशिक्षक, गटविकास अधिकारी, नोडल अधिकारी आदी उपस्थित होते. 20 lakh change leaders Adi Karmayogi mission
‘आदि कर्मयोगी अभियानाबाबत माहिती’
आदिवासी भागात तळागाळातील शासन व सेवा वितरणामध्ये आमुलाग्र परिवर्तन घडविणे, आदिवासी समुदायांना सशक्त करण्यासाठी प्रतिक्रियाशील सुशासन कार्यक्रमांतर्गत नेत्यांचे कॅडर निर्माण करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. सेवा, समर्पण आणि संकल्प या तत्वावर हे अभियान राबविले जाणार असून आदिवासी भागांमध्ये प्रतिसादक्षम शासन आणि शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहचवली जाईल. भारतामध्ये 10.5 कोटी आदिवासी नागरीक आहेत, जे 30 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये राहतात. या आदिवासी समुदायांच्या सक्षमीकरणासाठी संपूर्ण भारतात 20 लक्ष परिवर्तनशील नेत्यांचे मिशन आधारीत कॅडर निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.
Chota Matka Tiger : (28 ऑगस्ट 2025)चंद्रपूर:ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील (बफर) गंभीर जखमी वाघ T-126 ला यशस्वीरित्या जेरबंद करण्यात आले आहे. खडसंगी वनपरिक्षेत्रातील कंपार्टमेंट क्र. ५१ मध्ये ही बचाव मोहीम राबवण्यात आली. वाघाला पुढील उपचारांसाठी चंद्रपूर येथील ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC) मध्ये हलवण्यात आले आहे.
१२ मे, २०२५ रोजी ताडोबातील खडसंगी बफर परिक्षेत्रात T-126 आणि T-158 या दोन वाघांमध्ये जोरदार संघर्ष झाला होता. या लढाईत T-158 वाघाचा मृत्यू झाला, तर T-126 गंभीर जखमी झाला होता.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) आणि तांत्रिक समितीच्या शिफारशीनुसार, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी T-126 वाघाला जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. मानवी-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आणि अनुचित घटना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
वनसंरक्षक आणि क्षेत्र संचालक श्री प्रभू नाथ शुक्ल आणि उपसंचालक (बफर) श्री आनंद रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या शीघ्र कृती दलाने (RRT) सहायक वनसंरक्षक श्री. अनिरुद्ध ढगे यांच्या देखरेखीखाली ही बचाव मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान वाघाला कमीत कमी इजा होईल याची पूर्ण काळजी घेण्यात आली.
गणेशोत्सव 2025 : २,५०० पोलीस दल सज्ज – जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था कडक
Festival of Ganesh Chaturthi (२७ ऑगस्ट २०२५) : चंद्रपूर – आज देशात विविध ठिकाणी गणरायाचे जल्लोषात आगमन झाले असून चंद्रपूर जिल्ह्यात एकूण १४ हजार ८३१ गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये खाजगी व घरगुती १२ हजार ९७५ गणेश मूर्ती, सार्वजनिक गणेश मूर्ती स्थापना लहान मंडळ ८७३, मोठे मंडळ ६१३ तर एक गाव एक गणपती ३७६, जिल्ह्यातील एकूण सार्वजनिक गणेश मूर्ती १ हजार ८४७ ठिकाणी विराजमान झाली आहे. गणेशोत्सव काळात जिल्ह्यात अप्रिय घटना घडू नये यासाठी २ हजार ५०० पोलीस अधिकारी, अंमलदार महिला/पोलीस सह १ हजार होमगार्ड्स पुढील ११ दिवस कर्तव्य बजावणार आहे. police deployment Chandrapur 2500 officers
चंद्रपूर जिल्ह्याच्या खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी आज गणरायाचे आगमन करण्यात आले आहे. Ganpati peace prayers Chandrapur leaders
महाराष्ट्र सदैव सुजलाम्-सुफलाम् राहो
माजी मंत्री व आमदार मुनगंटीवार यांनी सहकुटुंब श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करून पूजन केले. ‘श्री’च्या आगमनाने संपूर्ण घर भक्तिभावाच्या दिव्य लहरींनी न्हाऊन निघाले. महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, दीन-दुर्बल व पीडित जनतेच्या कल्याणासाठी अखंड सेवा करण्याची शक्ती लाभो. महाराष्ट्र सदैव सुजलाम्-सुफलाम् राहो, अशी प्रार्थना श्री गणरायाच्या चरणी मुनगंटीवार यांनी केली.
गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते वरोरा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात गणपती बाप्पाची विधिवत स्थापना करण्यात आली. यावेळी पारंपारिक पद्धतीने पूजा-अर्चा करून बाप्पाचे पूजन करण्यात आले. या मंगलमय प्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत मानस धानोरकर आणि पार्थ धानोरकर उपस्थित होते, ज्यामुळे या सोहळ्याला कौटुंबिक आणि उत्साहाचे स्वरूप आले होते.
नागरिकांच्या आयुष्यात आनंदाची भरभराट होवो
गणेश चतुर्थीच्या पावन दिवशी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणरायाचे मंगल आगमन झाले. यावर्षीचे हे ९५ वे वर्ष असून, जोरगेवार कुटुंबीयांनी १९३० पासून ही परंपरा जपली आहे. आता त्यांच्या चौथ्या पिढीने ही पवित्र परंपरा पुढे नेली आहे.
सकाळी शुभ मुहूर्तावर संपूर्ण कुटुंबासह गणरायाची प्राणप्रतिष्ठा करून शास्त्रोक्त विधी-विधानानुसार पूजा-अर्चा करण्यात आली. गणेशाच्या मंगलमय आगमनाने घरात आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा नांदू दे, अशी प्रार्थना सर्वांनी केली.
या पावन प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी गणरायाच्या चरणी सर्व शेतकऱ्यांना भरपूर पिके, चांगले उत्पन्न, निसर्गाची साथ आणि सुरक्षित भविष्य मिळावे, तसेचसर्व नागरिकांच्या जीवनात सुख-समृद्धी, आरोग्य, धनधान्य आणि आनंदाची भरभराट होवो अशीप्रार्थना केली
free health camps Maharashtra Ganpati festival : चंद्रपूर (२७ ऑगस्ट २०२५) – श्री. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचे भान ठेवत जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा प्रशासनाच्या वतीने “श्री गणेश आरोग्य अभियान” अंतर्गत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2025 या कालावधीत शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या ठिकाणी ही शिबिरे भरविण्यात येणार आहेत.
या शिबिरांमधून नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला, आयुष्यमान कार्ड काढणे तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती मिळणार आहे. Free Ganesh festival community health camp
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला डॉ. हेमचंद कन्नाके (निवासी वैद्यकीय अधिकारी), डॉ. निवृत्ती जिवने (वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय), डॉ. मौहनिश गिरी (जिल्हा आरोग्य विभाग), डॉ. भूषण जैन (जिल्हा समन्वयक, मुख्यमंत्री सहाय्यता निधी), डॉ. रुपेश कुमारवार (क्षेत्रीय व्यवस्थापक), डॉ. इंद्रजीत किल्लेदार (जिल्हा समन्वयक, महात्मा जोतीबा फुले जन व आयुष्यमान भारत योजना), डॉ. कविश्वरी कुंभलकर (अध्यक्ष, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष) यांसह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक मंडपांना भेट देतात. त्यामुळे थेट लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवून आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्याचा हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चिंचोळे यांनी सांगितले.
शिबिरांत सहभागी गणेश मंडळे :
* चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ
* जोड देऊळ गणेश मंडळ, पठाणपुरा, चंद्रपूर
* रेणुका माता गणेश मंडळ, भानापेठ, चंद्रपूर
* युवक गणेश मंडळ, गंजवार्ड, चंद्रपूर
* श्री हिवरपुरी सर्वोदय सार्वजनिक गणेश मंडळ, चंद्रपूर
* जय हिंद गणेश मंडळ, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर
शिबिरांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आपले आधारकार्ड तसेच शासकीय आरोग्य योजनांशी संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यावेळी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री आरोग्य योजना आदींबाबतही माहिती दिली जाणार आहे.
ashram school staff salary delay Maharashtra : चंद्रपूर : (२७ ऑगस्ट २०२५) राज्यातील आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे माहे जुलै व ऑगस्टचे वेतन अजूनही झालेले नाहीत. सणासुदीचे दिवस असल्यामुळे शासनाने माहे ऑगस्टचे वेतन गणेश चतुर्थीपूर्वी करण्याचे आदेश काढलेले असतांना अपुऱ्या तरतुदीमुळे संपूर्ण राज्यातील विजाभज आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे जुलैचेच वेतन झालेले नाही त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष आहे. माहे जुलै व ऑगस्टच्या वेतनासाठी भरीव तरतूद उपलब्ध करून देण्याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी इतर मागास बहुजन कल्याण व वित्त विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून मागणी केली आहे. Sudhakar Adbale demands salary release for ashram schools
तर कर्मचाऱ्यांच्या हातात दमडीही शिल्लक राहणार नाही
इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत आश्रमशाळांचे वेतन हे नेहमीच एक ते दोन महिने उशिराने होत असते. दोन महिन्यापासून वेतन मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांची गृह कर्जे, वाहनकर्जे, एलआयसीचे हप्ते व बँकांच्या इतर कर्जांचे हप्ते यावर बँकांना अतिरिक्त व्याजाचा भरणा करावा लागतो. सणासुदीचे दिवस असूनही असेच पगार उशिरा होत राहिले तर बँका कर्मचाऱ्यांच्या एकाच महिन्याचे पगारातून दोन दोन कर्जाचे हप्ते कपात करतात परिणामी कर्मचाऱ्यांच्या हातात दमडीही शिल्लक राहत नाही. त्यामुळे आश्रमशाळा कर्मचारी सतत आर्थिक विवंचनेत असतो.
सणासुदीचे दिवस असल्यामुळे जुलै व आगष्टचे वेतन अनुदान तात्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी प्रधान सचिव, इतर मागास बहुजन कल्याण व वित्त विभाग यांना पत्र देऊन केलेली असून सर्व कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत.
indefinite hunger strike against liquor store : चंद्रपूर (२७ ऑगस्ट २०२५)- चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घोषित होण्यापूर्वी ३५० बार व देशी दारूचे दुकाने होते, दारूबंदी झाल्यावर अनेकांनी आपली दुकाने दुसऱ्या जिल्ह्यात स्थानांतरित केली होती, ७ वर्षांनंतर जिल्ह्याची दारूबंदी उठली आणि उत्पादन शुल्क विभागाने दारू दुकानाचा बेकायदेशीर परवाना वाटप करण्याचे काम सुरु केले. ७ वर्षांनी जिल्ह्यात तब्बल ७५० च्या वर दारू दुकानांची संख्या वाढली आहे.
असेच कोरपना मध्ये नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांनी देशी दारूच्या दुकानाला बेकायदेशीर ना हरकत प्रमाणपत्र देत गावातील वातावरण खराब करण्याचे काम केले असा आरोप कोरपना शहर वासियांनी केला. देशी दारू दुकान तात्काळ गावातून हटविण्यात यावे या मागणीकरिता शेतकरी संघटनेचे कोरपना तालुका उपाध्यक्ष पद्माकर नथ्थूजी मोहितकर २८ ऑगस्टपासून कोरपना तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहे. women safety concerns
दारू दुकानाविरोधात अनेक तक्रारी, प्रशासन गप्प
दारूचे दुकान हटवावे याकरिता संवैधानिक मार्गाने तक्रार, धरणे, मोर्चे व अनेक आंदोलने करण्यात आली मात्र त्याची साधी दखलही घेण्यात आली नाही. दारू दुकानांमुळे महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना व्यसन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दुकानांमुळे महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
मागण्या काय?
२८ मे रोजी नगर पंचायतीने दारू दुकानाला दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करावे.
मुख्याधिकारी धुमाळ यांना निलंबित करावे.
अवैध बांधकामाची मोका चौकशी करून मुख्याधिकारी यांनी बांधकाम पूर्णत्वाचे दिलेल्या प्रमाणपत्राबाबत कारवाई करावी.
४ जुलै व २१ जुलै २०२५ रोजी महिला व पुरुषांच्या स्वाक्षरीनिशी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे तक्रार केली असून अद्यापही जिल्हाधिकारी यांनी कोरपना वासियांच्या तक्रारींवर कसलाही निर्णय घेतला नाही, याकरिता स्वतंत्र भारत पक्ष समर्पित शेतकरी संघटना तालुका उपाध्यक्ष पद्माकर मोहितकर यांनी नागरिकांच्या तक्रारींवर शेवटचा लढा देण्यासाठी बेमुदत आमरण उपोषणाचे हत्यार उगारले असून २८ ऑगस्ट पासून तहसील कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात होणार आहे. जोपर्यंत दारूचे दुकान गावातून हटणार नाही तोपर्यंत माझा लढा सुरु राहणार अशी प्रतिक्रिया मोहितकर यांनी दिली आहे.
Nazul holders permanent patta order : चंद्रपूर – (२६ ऑगस्ट २०२५) – आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई मंत्रालयात बैठक घेऊन चंद्रपूर आणि घुग्घुस येथील नझूल धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची प्रक्रिया गतीशील करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठीच्या सर्वेक्षणाकरिता पाच एजन्सी नियुक्त करून त्याचा खर्च खनिज विकास निधीतून करण्याचे निर्देशही ना. बावनकुळे यांनी दिले असून सहा महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
चंद्रपूर आणि घुग्घुस येथील नझूल धारकांना कायमस्वरूपी घरपट्टे देण्यात यावेत, तसेच विविध विषयांवर बैठक घेण्यात यावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मुंबई मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीला आमदार किशोर जोरगेवार, महसूल विभागाचे सहसचिव संजय बनकर, अवर सचिव आश्विनी यमगर, चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा उपस्थित होते. तर महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डी. एस. कुंभार, तहसीलदार विजय पवार, मनपाचे अप्पर आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त चीद्रावार, संजय गांधी योजनेंतर्गत तहसीलदार सीमा गजभिये, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी गायकवाड आदी अधिकारी व्हिसीच्या माध्यमातून उपस्थिती होती. Nazul land permanent pattas process
नागरिकांची सतत मागणी
चंद्रपूर शहरात नझूल जागेवर मोठी लोकवस्ती असून या नागरिकांकडे कायमस्वरूपी पट्टे नसल्याने त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील ५० ते ७० वर्षांपासून वास्तव्यास असूनही पट्टे न मिळाल्याने येथील नागरिक सतत मागणी करत होते. याच मागणीसंदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी शासनाशी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचे फलित स्वरूप महसूल मंत्री यांनी सदर विषयावर बैठक घेतली. या बैठकीत सर्वेक्षण पूर्ण झालेल्या ७०० नागरिकांना तात्काळ पट्टे वाटप करण्याचे आदेश देण्यात आले.
सर्व्हेसाठी पाच एजन्सींची नियुक्ती करण्याचे आदेश
चंद्रपूर शहरात 39 झोपडपट्टी नझुलच्या जागेवर असल्याची नोंद मनपाकडे आहे. यातील 14 झोडपट्टांचे सर्वेक्षण झाले आहे. तर उर्वरित झोडपट्टींचे सर्वेक्षण सुरु आहे. मात्र सध्या एकाच एजन्सीमार्फत सर्वेक्षण सुरू असल्याने काम संथ गतीने सुरू असल्याचे आमदार जोरगेवार यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी पाच एजन्सींची नियुक्ती करण्याचे आदेश दिले. सर्वेक्षणाचा खर्च खनिज विकास निधीतून करण्याचेही निर्देशही यावेळी देण्यात आले. त्यामुळे आता शहरातील जवळपास १८ हजार घरांना पट्टे मिळणार आहेत. त्यासोबतच घुग्घुस येथील नझूल धारक नागरिकांनाही पट्टे देण्यात येणार आहेत.
याशिवाय संजय गांधी योजनेंतर्गत तहसीलदारांची रिक्त पदे तातडीने भरून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले. तसेच नझूल प्रकरणांसाठी स्वतंत्र तलाठी नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. घुग्घुससाठी स्वतंत्र क्रीडांगणाची जुनी मागणी आमदार जोरगेवार यांनी बैठकीत मांडली. त्यानुसार जागेची अडचण दूर करून प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. याशिवाय घुग्घुस परिसरात अप्पर तहसील कार्यालयासही मंजुरी देण्यात आली असून त्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी चंद्रपूरला जाण्याची गरज भासणार नाही. nazul land survey agencies
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारामुळेच या बैठकीत मतदार संघातील प्रश्न प्राधान्याने चर्चेत आले. त्यांच्या ठाम भूमिकेमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांना गती मिळणार असून चंद्रपूर-घुग्घुस परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या बैठकीला चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ देवतळे, नामदेवभाऊ डाहुले, भाजपा महामंत्री रवींद्र गुरनुले, शाम कणकम, सविताताई दंडारे, घुग्घुस शहराध्यक्ष संजय तिवारी, माजी नगरसेविका कल्पनाताई बगुलकर, आदी मान्यवर उपस्थित होते. Nazul holders permanent patta order
MSEDCL Ganeshotsav electrical safety advisory :चंद्रपूर:- २६ ऑगस्ट २०२५ – ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष करत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची तयारी शिगेला पोहोचली आहे. गल्लोगल्ली उभारले जाणारे भव्य मंडप, त्यावर केलेली आकर्षक रोषणाई, आणि मनमोहक देखावे यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.
या उत्सवाला झगमगाट देणारी विद्युत ऊर्जा ही जितकी आवश्यक आहे, तितकीच ती सुरक्षितपणे हाताळणे महत्त्वाचे आहे. उत्साहाच्या भरात विजेच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. यंदाच्या उत्सवात गणेशभक्त आणि मंडळांनी समन्वयाने काम करत, विजेचा वापर सुरक्षितपणे केल्यास, हा उत्सव खऱ्या अर्थाने विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने उजळून निघेल. Ganesh festival safe electricity tips
मंडळांसाठी महत्त्वाची नियमावली: सुरक्षा हाच पहिला मान
गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आणि कोणत्याही संभाव्य अपघाताला टाळण्यासाठी, गणेश मंडळांनी काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
तात्पुरत्या वीज जोडणीसाठी आवश्यक कागदपत्रे:
मंडळाने तात्पुरत्या वीज जोडणीसाठी महावितरण कडे अर्ज करताना खालील कागदपत्रे तयार ठेवावीत: • महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र: हे प्रमाणपत्र तुमच्या मंडळाची नोंदणी कायदेशीर असल्याची खात्री करते. temporary power connection Ganesh Festival • पोलिस परवानगी: मंडप उभारणी आणि वीज जोडणीसाठी पोलिसांची परवानगी घेणे अनिवार्य आहे. • वीज मागणी अर्ज आणि वीजसंच मांडणी अहवाल: महावितरणकडे तात्पुरत्या वीज जोडणीसाठी रीतसर अर्ज करण्यासोबतच वीज जोडणी सुरक्षितपणे करण्यात आल्याचा अहवालही सादर करणे महत्त्वाचे आहे.
सुरक्षा उपाययोजना आणि खबरदारी:
• पुरेसे अंतर राखा: मंडप, रोषणाई आणि देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिन्यांपासून सुरक्षित अंतर ठेवा. वितरण रोहित्रे (Transformers) आणि इतर विद्युत यंत्रणेपासून पुरेशा अंतरावर मंडप उभारा. • तज्ञ व्यक्तींची मदत: वीज जोडणीसाठी फक्त मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदारांची नेमणूक करा. ते सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करतील याची खात्री करा. licensed electrician Ganesh pandal wiring safety • सुरक्षित उपकरणे वापरा: योग्य इन्सुलेशन (Insulation) असलेले वायर्स, फ्यूज आणि सर्किट ब्रेकर्सचा वापर करा. विजेच्या सुरक्षिततेमध्ये कोणतीही तडजोड करू नका. • आपात्कालीन मदत: कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरीत संपर्क साधण्यासाठी, आपल्या कार्यक्षेत्रातील महावितरणच्या स्थानिक शाखा अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवा.
महावितरणचे आवाहन: घरगुती दरात वीज आणि ऑनलाईन पेमेंट
राज्य वीज नियामक आयोगाने गणेश मंडळांना मोठा दिलासा दिला आहे. • घरगुती दरात वीज: मंडळांना तात्पुरती वीज जोडणी आता घरगुती वापराच्या दराने उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांच्यावरील आर्थिक भार कमी होईल. • ऑनलाईन अनामत रक्कम: तात्पुरत्या वीज जोडणीसाठी मंडळांना मंजूर वीजभाराप्रमाणे अनामत रक्कम भरावी लागते. ही रक्कम ऑनलाईन भरल्यास, गणेशोत्सव संपल्यावर वीजबिलाची रक्कम वजा करून उरलेली रक्कम त्वरित परत केली जाईल. यामुळे मंडळांना रक्कम परत मिळवण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही. महावितरणने मंडळांना ही रक्कम ऑनलाईन पद्धतीनेच भरण्याचे आवाहन केले आहे. MSEDCL Ganeshotsav electrical safety advisory
गणेशभक्तांनी घ्यावयाची काळजी: जागरुकता हेच खरे भक्तित्व
गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्तानेही सुरक्षिततेची जबाबदारी घेणे महत्त्वाचे आहे. • ओल्या हातांनी स्पर्श टाळा: पावसाळ्यात किंवा ओले हात असताना कोणत्याही विद्युत उपकरणाला किंवा दिव्यांच्या माळेला स्पर्श करू नका. • उघड्या तारांपासून सावधान राहा: मंडपात किंवा परिसरात उघड्या पडलेल्या किंवा लटकलेल्या तारांपासून दूर राहा. • मुलांची काळजी घ्या: लहान मुलांना विद्युत रोषणाई किंवा कोणत्याही विजेच्या उपकरणाजवळ जाऊ देऊ नका. त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करा.
गणेशोत्सव हा केवळ आनंद आणि उत्साहाचा नाही, तर सामाजिक जबाबदारीचाही उत्सव आहे. मंडळांनी आणि गणेशभक्तांनी एकत्र येऊन विजेच्या सुरक्षिततेचे नियम पाळल्यास, हा उत्सव खऱ्या अर्थाने निर्विघ्नपणे साजरा होईल. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत, त्यांच्या या गुणाला आपण सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून खरा मान देऊया. यंदाच्या उत्सवात ‘सुरक्षिततेची वीज’ वापरून ‘आनंदाची रोषणाई’ करूया!
Protest in Chandrapur against Manoj Jarange : चंद्रपूर (२६ ऑगस्ट २०२५) – मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत आहे, मात्र त्यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत अपशब्द वापरल्याने भाजप संतापली असून चंद्रपुरात भाजप नेते अशोक जीवतोडे यांनी जरांगे पाटलांचा निषेध करीत त्यांच्या प्रतिमेवर जोडे हाणले.
भाजप ओबीसी नेते अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात शहरातील वरोरा नाका चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले, भाजप नेते जीवतोड म्हणाले कि आधीपासून जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे असा हट्ट करीत आहे, मात्र ते शक्य नाही. आम्ही ओबीसी त्यांची घुसखोरी कशी यशस्वी होऊ देणार नाही.
घुसखोरी हाणून पाडू
आंतरवाली सराटी मधून सुरु झालेलं जरांगे पाटलाचे आंदोलन आता मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे, अश्यावेळी पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बाबतीत अपशब्द वापरले हे भाजप सहन करणार नाही. जरांगे पाटलांचे आंदोलन व ओबीसी प्रवर्गात करू पाहत असलेली घुसखोरी आम्ही हाणून पाडू अशी प्रतिक्रिया अशोक जिवतोडे यांनी दिली.
निषेध आंदोलनात ओबीसी समाजाचे नेते, भाजप पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.