Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • prohibited criminals ban during festival । 🚔 गणेशोत्सवात शांततेसाठी चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई – 540 गुन्हेगार हद्दपार

    prohibited criminals ban during festival

    prohibited criminals ban during festival : चंद्रपूर ५ सप्टेंबर २०२५ – २७ ऑगस्टपासून राज्य व देशात गणेशोत्सवाची धूम सुरु आहे, लाखो भाविक दररोज श्री गणेशाचे दर्शन घेत असून या उत्सवात विघ्न पडू नये याकरिता पोलिसांनी कम्बर कसली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता भंग करणारे तब्बल ५४० गुन्हेगारी वृत्तीच्या इसमांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

    शासनाच्या निर्णयाची चंद्रपुरात होळी

    शांततेत उत्सव साजरा होणार

    सण उत्सव साजरे करीत असताना शांतता व सलोखा अबाधित ठेवण्यासाठी पोलीस सदैव प्रयत्नशील असतात, मात्र समाजातील विघातक प्रवृत्ती आपली या शांततेत विघ्न टाकण्याचे काम करीत असतात, सध्या चंद्रपूर जिल्ह्यात गणेश उत्सवाची धुमधाम सुरु आहे, ६ सप्टेंबर रोजी अनंतचतुर्दशी ला गणेश विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे, यानिमित्ताने जिल्ह्यातील लाखो भाविक मिरवणुकीत सहभागी होतात. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. police ban repeat offenders during Ganesh immersion

    जिल्ह्यात सामाजिक सलोखा कायम रहावा याकरिता पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन प्रभारी यांनी आपापल्या पोलीस स्टेशन हद्दीत शांतता भंग करणारे एकूण ५४० इसमांविरुद्ध कलम १६३ (२) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अन्वये गुन्हगेरे वृत्तीच्या इसमांना पोलीस स्टेशन हद्दीत येण्यास मनाईचा हुकूम व्हावा असे प्रस्ताव तयार करीत उपविभागीय कार्यालयात पाठवून तब्बल ५४० इसमाविरुद्ध हद्दपार चा आदेश पारित करण्यात आला.

  • Maratha OBC inclusion controversy |मराठा समाजाच्या OBC करणावर वादळी वातावरण; चंद्रपुरात शासन निर्णयाची होळी

    Maratha OBC inclusion controversy

    Maratha OBC inclusion controversy : चंद्रपूर – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेत शासन निर्णय काढला, मराठे आता थेट ओबीसी मध्ये शिरणार याविरुद्ध ओबीसी समाजाने दंड थोपटले आहे. चंद्रपुरात सकल ओबीसी समाजाने शासन निर्णयाची होळी केली. मराठा समाजाचे ओबीसीकरण म्हणजे ओबीसी समाजावर अन्याय आहे हा निर्णय सरकारने तात्काळ रद्द करावा अशी मागणी ४ सप्टेंबर रोजी झालेल्या आंदोलनात ओबीसी समाजाने केली.

    चंद्रपुरात पावसामुळे पूल वाहून गेला

    गांधी चौकात सकल ओबीसी समाजाच्या वतीने शासनाने मराठा समाजाच्या बाजूने काढलेल्या जीआर ची होळी करण्यात आली.हैद्राबाद गॅझेट मधील नोंदीच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे म्हणजे ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची थेट घुसखोरी आहे, हि घूसखारी आम्ही सहन करणार नाही, जात प्रमाणपत्र मिळविण्याची एक पद्धत सामाजिक न्याय विभाग व महसूल प्रशासनाने निश्चित केली आहे. मात्र शासनाने मराठा समाजाच्या बाबतीत नियमांची पायमल्ली केली आहे. OBC activists protest Maratha OBC decision

    निर्णय रद्द करा

    जर ४८ तासांच्या आत शासनाने मराठा समाजाबाबत घेतलेला शासन निर्णय रद्द केला नाही तर राष्त्री मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांना चंद्रपूर जिल्हा व राज्यात फिरू देणार नाही, ते आयोगाचे अध्यक्ष असून त्यांनी तात्काळ महाराष्ट्र शासनाला सदर निर्णय रद्द करण्याचे आदेश द्यावे, अन्यथा आम्ही अहिर यांना घेराव टाकू.

    आयोजित आंदोलनात पप्पू देशमुख, रामू तिवारी, नंदू नागरकर, प्रवीण पडवेकर, मनीषा बोबडे, अनिल डहाके, अजय वैरागडे, चंदा वैरागडे, कुसुम उदार व विविध जातीय संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  • Chandrapur bridge collapse due to heavy rain । चंद्रपूरात मुसळधार पावसाने पूल वाहून गेला; खासदार धानोरकर यांची मागणी काय?

    Chandrapur bridge collapse due to heavy rain

    Chandrapur bridge collapse due to heavy rain : चंद्रपूर : चंद्रपुरातील पठाणपुरा ते भिवापूर वॉर्डला जोडणारा झरपट नदीवरील पूल जोरदार पावसामुळे वाहून गेल्याने, स्थानिक MP Pratibha Dhanorkar खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पत्र पाठवून पुलाची उंची वाढवून नव्याने बांधकाम करण्याची सूचना केली आहे.

    वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

    हा पूल कोसळल्यामुळे पठाणपुरा आणि भिवापूर या दोन महत्त्वाच्या वॉर्डमधील नागरिकांचा थेट संपर्क तुटला आहे. यामुळे बाबुपेठ आणि भिवापूर वॉर्डमधून पठाणपुरात ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत आहे. पायी चालणेही शक्य नसल्यामुळे, नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात वाढली आहे. Chandrapur bridge collapse news

    भाविकांसाठीही अत्यंत महत्त्वाचा

    या संदर्भात बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, “हा पूल केवळ वाहतुकीसाठीच नाही, तर चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली यांच्या यात्रेदरम्यान भाविकांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावरून मोठ्या संख्येने वाहतूक वळवली जाते, त्यामुळे हा पूल तातडीने आणि सुरक्षितपणे बांधणे आवश्यक आहे.”

    त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्तांना या गंभीर समस्येची दखल घेऊन, युद्धपातळीवर पुलाचे बांधकाम सुरू करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होईल आणि आगामी काळात महाकाली यात्रेदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.

  • flood relief shelter arrangements । 📢 चंद्रपूरकरांनो सतर्क राहा! पूरग्रस्तांसाठी मदत केंद्रे आणि आपत्कालीन क्रमांक जाहीर

    flood relief shelter arrangements

    flood relief shelter arrangements : चंद्रपूर 03 सप्टेंबर –  मुसळधार पावसामुळे ईरई धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शहरातील काही ठिकाणी पूर सदृश परिस्थिती 2 सप्टेंबरच्या रात्री निर्माण झाली होती. त्यामुळे शहरातील 29 नागरिकांना मनपा आपत्ती व्यवस्थापन चमूने महात्मा ज्योतिबा फुले शाळेत हलवून त्यांच्या निवारा व भोजनाची व्यवस्था केली आहे, त्याचप्रमाणे ईरई नदीतुन मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी येत असल्याने जलशुद्धीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले असुन पाणीपुरवठा नियमित होतपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपुन वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. Chandrapur disaster management 

    व्यावसायिक पायलट होण्याची सुवर्णसंधी, राज्य सरकार देणार ३७ लाख रुपये

    2 सप्टेंबरच्या रात्री रहमत नगर व घुटकाला परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे या परिसरातील 29 नागरिकांना  मनपा आपत्ती व्यवस्थापन चमूने सुरक्षित स्थळी हलविले आहे.पुढील काही दिवस सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा असल्याने मनपा अधिकारी कर्मचारी 24 तास अलर्ट मोडवर असुन नदी पात्रा लगतच्या नागरिकांनी कुठलीही जोखीम न घेता जवळच्या मनपा शाळेत आश्रय घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेने केले आहे.

    मनपा शाळेत आश्रयास असलेल्या नागरिकांसाठी शाळेत जेवण,पिण्याचे पाणी,झोपण्याची सोय,आरोग्य व्यवस्था तसेच इतर आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या असुन या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार प्रथमोपचार व औषधे देण्यात येत आहेत. तसेच पुराच्या पाण्याची पातळी कमी झालेल्या रहेमत नगर, फिल्टर प्लांट परिसरात साफ सफाई करुन ब्लीचिंग व लिंडेन पावडर टाकुन स्वच्छता करण्यात आली आहे. वाढते पाणी पाहता सर्वांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घेण्याचे तसेच आपातकालीन प्रसंगी 07172254614,07172259406 (101),8975994277,9823107101 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. flood relief shelter arrangements

    आपत्ती प्रसंगी या मनपा शाळांमध्ये घेता येईल आश्रय –


    महात्मा ज्योतिबा फुले प्राथ. शाळा, घुटकाळा वार्ड, डॉ. जाकिर हुसेन उर्दू प्राथ. शाळा, दादमहल वार्ड, शहिद भगतसिंग प्राथ. शाळा, भिवापूर वार्ड, लोकमान्य टिळक कन्या प्राथ. शाळा, पठाणपूरा रोड, लोकमान्य टिळक प्राथ. शाळा, काळाराम मंदीर, समाधी वार्ड, डॉ. राजेंन्द्र प्रसाद प्राथ. शाळा, भानापेठ वार्ड,महाकाली कन्या प्राथमिक शाळा, महाकाली मंदिर वार्ड, रामचंद्रनगर हिन्दी प्राथ. शाळा, जटपूरा वार्ड,सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक शाळा, जटपूरा वार्ड, स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा, वंडगाव वार्ड, लालपेठ कॉलरी मराठी प्राथ. शाळा, बंगाली कॉलनी, भिवापूर वार्ड,महाकाली कॉलरी प्राथ. शाळा, महाकाली कॉलरी, महात्मा गांधी कन्या प्राथ. शाळा, रैय्यतवारी वार्ड,पी.एम.श्री. सावित्रीबाई फुले उच्च प्राथ. व माध्यमिक शाळा, नेताजी चौक, बाबुपेठ

  • how to get pilot license with state subsidy । ✈️ फक्त 10% खर्चात व्यावसायिक पायलट होण्याची संधी – राज्य सरकारची मोठी मदत

    how to get pilot license with state subsidy

    how to get pilot license with state subsidy : चंद्रपूर, दि. 3 : नागपुर फ्लाईंग क्लब अंतर्गत चंदपुर फ्लाइंग स्टेशन समितीच्या वतीने चंद्रपुर जिल्ह्यातील 12 वी उतीर्ण (गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयासह उत्तीर्ण) झालेल्या 2 विद्यार्थ्यांना व्यावसायिक  पायलट लायसन्स प्रशिक्षणाकरीता विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी करीता राज्य शासनाकडून 90 टक्के अनुदान (अदांजे 37 लक्ष) रुपये प्राप्त होणार असून उर्वरित 10 टक्के रक्कम (अंदाजे 4 लक्ष रुपये) निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी स्वतः भरावयाची आहे. याबाबतचा अधिक तपशील व  अर्जाचा नमुना www.chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

    गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका सज्ज

    असे आहे वेळापत्रक : 

    1) अर्ज सादर करावयाचा कालावधी 1 ते 16 सप्टेंबर 2025, 2) परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देणे 24 सप्टेंबर, 3) लेखी परीक्षा 27 सप्टेंबर 2025 रोजी, 4) लेखी परीक्षेचा निकाल  परिक्षा संपल्यानंतर, 5) जिल्हा समितीद्वारे कागदपत्र पडताळणी  30 सप्टेंबर 2025

    परीक्षा शुल्क : ऑनलाईन पध्दतीने प्रत्येक विद्यार्थी 1 हजार रुपये

    लाभार्थी/उमेदवार निकष :

     1) उमेदवार महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असावा / असावी. 2) उमेदवाराची वयोमार्यादा किमान 18 वर्षे ते 28 असावी. (01.01.2024 रोजी), 3) 12 वी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्रख्‍ रसायनशास्त्र आणि गणित हे विषय घेऊन अनुसुचीत जमाती करीता किमान 65 टक्के गुणासह व अमागास करीता किमान 75 टक्के गुणासह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील. 4) उमेदवार इयता 10 वी नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत क्षेत्रातून उतीर्ण झालेला असेल अशा उमेदवारांना ग्रामीण क्षेत्रातील समजण्यात येईल. pilot license training application Chandrapur 2025

    अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे :

     1) महाराष्ट्र राज्याचे विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील डोमीसाईल (अधिवास) प्रमाणपत्र 2) जन्मतारखेचा दाखला 3) 10 वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र व मार्कशिट 4) 12 वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र व मार्कशिट 5) मुख्याध्यापक / शाळेचे प्राचार्य / राजपत्रित अधिकारी यांनी दिलेले चारित्र्याचे प्रमाणपत्र 6) चंद्रपूर जिल्ह्याचे स्थानिक रहिवासी असल्याबाबतचे तहसिलदार यांचे रहिवास प्रमाणपत्र 7) आधार कार्ड, 8) अनुसुचीत जमातीच्या प्रवर्गाकरीता जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र  how to get pilot license with state subsidy

    9) अंतिम प्रवेशपात्र झालेल्या उमेदवारांनी DGCA Approved Medical Practitioner यांच्याकडून Medical Certificate व पोलीस विभागाकडून चारित्र्याचे प्रमाणपत्र प्राप्त करुन सादर करणे आवश्यक राहील  10) अंतिम प्रवेश झालेले उमेदवार अनु. क्र.8 व 9 मधील प्रमाणपत्रे विहीत मुदतीत सादर करु शकणार नाहीत, त्यांचे प्रवेश रद्द करण्यात येतील.

    ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत 

    : 1) प्रस्तुत पदांकरीता फक्त http://chandaflying.govbharti.org या अधिकृत संकेतस्थळावरून विहित पध्दतीने भरलेले ऑनलाईन पध्दतीने केलेले अर्ज स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. सदर संकेत स्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी स्वतः उमेदवाराची राहिल. 2) पात्र उमेदवाराला वेब बेस्ड ऑनलाईन अर्ज http://chandaflying.govbharti.org या वेबसाईटद्वारे 1 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर 2025 या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील. 90 percent subsidy pilot training Maharashtra

    3) अर्ज करतांना, शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे. तथापि, ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांची पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास व भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील व याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही.

    अधिक माहितीकरीता www.chanda.nic.in या संकेतस्थळावर संपर्क करावा. तसेच इच्छुक पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी केले आहे.

  • Ganesh visarjan chandrapur preparations । चंद्रपुरातील गणेश विसर्जनासाठी महानगरपालिका सज्ज

    Ganesh visarjan chandrapur preparations

    Ganesh visarjan chandrapur preparations चंद्रपूर 03 सप्टेंबर – शहरात 06 सप्टेंबर अनंत चतुर्दशी रोजी होणारा श्रीगणेश विसर्जन सोहळा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेचे 100 हुन अधिकारी कर्मचारी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात कार्यरत आहेत. विसर्जनाच्या दिवशी गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने प्रियदर्शिनी चौक ते जटपुरा गेट,जिल्हा परिषदेच्या एका बाजुस विसर्जनाच्या दिवशी दुकाने लावण्यास प्रशासनद्वारे मनाई करण्यात आली आहे.  

    दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा, अखेर बल्लारपूर पोलिसांनी केली अटक

        विसर्जन स्थळाची आयुक्त विपीन पालीवाल यांनी पाहणी केली व सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. प्रशासनाद्वारे विसर्जन सुरळीत होण्याच्या दृष्टीने शहरातील विसर्जन मार्गावरील पावसामुळे निर्माण झालेले खड्डे भरून काढण्यात येत आहेत. विसर्जन मिरवणुकीचा मार्ग तसेच वाहतुक व्यवस्थेची माहिती नागरीकांपर्यंत पोहचविली जात आहे. मिरवणुकी दरम्यान अनुचित घटना घडु नये याकरीता विसर्जन मार्गांवर विविध ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. Ganesh festival immersion preparations

    मनपा सज्ज

        विद्युत विभागामार्फत सर्व कृत्रिम तलाव, जटपुरा गेट, मुख्य मार्ग, विसर्जन मार्ग, विसर्जन स्थळ तसेच संपूर्ण शहरात आवश्यक त्या ठिकाणी पुरेशी लाईट व्यवस्था तसेच जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आरोग्य विभागामार्फत आरोग्य पथकाच्या चमु वैद्यकीय सेवा देण्यास पूर्ण वेळ विसर्जनस्थळी राहणार असुन गांधी चौक, जटपुरा गेट व दाताळा रोडवरील मुख्य विसर्जन स्थळी अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात येत आहे.

    जटपुरा गेट येथे गणेश मंडळांच्या स्वागतासाठी मंडप व स्टेज उभारणी करण्यात येणार आहे. यांत्रिकी विभागामार्फत वाहन व्यवस्था सांभाळण्यात येत असुन विसर्जन स्थळी लागणारे पिण्याचे पाणी, फिरते शौचालय कार्यरत ठेवण्यात येणार आहे. Ganesh immersion security measures

    निर्माल्य कलश व कुंडात 4481 घरघुती मुर्तींचे विसर्जन

      अग्निशमन विभागामार्फत आपत्ती व्यवस्थापन चमु पुर्ण वेळ तैनात राहणार असुन मोठे सर्च लाईट, फिरे अँड रेस्क्यु व्हेइकल, पावर बोट,लाईफ जॅकेट लाईफ सेव्हींग ट्युब्ज , क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात 25 कृत्रिम कुंड व 25 निर्माल्य कलश उभारण्यात आले असुन 4481 घरघुती मुर्तींचे विसर्जन त्यात केले गेले आहे. मनपाद्वारे केल्या गेलेल्या जनजागृतीने यावर्षीसुद्धा एकही पीओपी मुर्तीचा वापर नागरिकांनी केला नाही.

         स्वच्छता विभागाद्वारे रस्त्यांची नियमित सफाई करण्यात येत असुन रस्त्यावर व विसर्जन स्थळी कचरा जमा राहु नये यादृष्टीने घनकचरा संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे. कृत्रीम तलावातुन निघणारे पाणी,निर्माल्य यांचे पावित्र्य राखून कम्पोस्टिंगसाठी पाठविले जाते तसेच माती ही बगिच्यात वापरण्यात येईल अथवा मुर्तीकारांना वाटप करण्यात येते. ईरई नदी या मुख्य विसर्जन स्थळाची स्वच्छता दररोज केली जात आहे. विसर्जनानंतर त्याच रात्री सर्व रस्ते स्वच्छ करून सकाळी सर्वांना स्वच्छ रस्त्याचा वापर मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी मिळतो.  

    ganesh festival immersion

      गणेशोत्सवात गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या या मनपाने सुरु केलेल्या एक खिडकी योजनेद्वारे देण्यात आल्या होत्या. विसर्जन स्थळी गर्दी होऊ नये व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणुन बॅरिकेटिंग लावण्यात आले आहे, गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावणाऱ्यांनी मनपाची परवानगी घेऊनच स्टॉल लावावा लागणार असुन त्यांना व्यवस्थेकरिता स्वयंसेवक आणि स्टॉल जवळ पुरेसे डस्टबिन ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. Ganesh idol immersion CCTV monitoring Chandrapur

    त्याचप्रमाणे शहरातील घरगुती मूर्तींचे विसर्जन पूर्णपणे घरी अथवा कृत्रिम कुंडातच केले जाणार असुन इरई नदीजवळील विसर्जन कुंडात केवळ मोठ्या सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन करणाऱ्यांनाच परवानगी असल्याचे मनपाद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे.गणेशोत्सव प्रसंगी महानगरपालिकेद्वारे ही सर्व कार्ये दरवर्षी पार पाडली जातात. यावर्षीसुद्धा श्री गणेशोत्सव हा शांततेत व आनंदात पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.


     

     


       
       

  • chota matka health update । Chota Matka Health Update: आरोग्यात मोठी सुधारणा, उपचार सुरूच

    chota matka health update

    chota matka health update : चंद्रपूर ३ सप्टेंबर २०२५ : १३ मे रोजी वाघ T-158 सोबत झालेल्या संघर्षात गंभीर जखमी झालेल्या T-126 या अंदाजे १० वर्षीय वाघाला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर (TTC) मध्ये हलवण्यात आले आहे. या झटापटीत T-158 वाघ मृत्युमुखी पडला होता.

    चंद्रपूर भाजपात पेंडाल वाद, अनंतचतुर्दशीला भाजपचे २ पेंडाल

    या घटनेनंतर, T-126 हा वाघ वारंवार मानवी वस्तीच्या जवळ दिसू लागला, ज्यामुळे त्याच्या आणि स्थानिक गावकऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला होता. सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वन विभागाने २७ ऑगस्ट रोजी बफर क्षेत्रातील खडसंगी परिक्षेत्रातून त्याला पकडून जेरबंद केले.

    छोटा मटका वाघाच्या हाडाला फ्रॅक्चर

    TTC येथे दाखल केल्यानंतर, वाघाच्या आरोग्याची सखोल तपासणी करण्यात आली. यामध्ये पॅथॉलॉजिकल, हिस्टॉलॉजिकल, आणि रेडिओलॉजिकल चाचण्यांचा समावेश होता. या तपासण्यांमध्ये कोणताही संसर्ग, पू किंवा फोड आढळले नाहीत. मात्र, एक्स-रे अहवालानुसार, त्याच्या डाव्या पुढील पायाच्या मनगटापासून कोपरापर्यंतच्या लांब हाडाला फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, त्याच्या सुळ्यांनाही दुखापत झाली आहे. Chandrapur TTC tiger fracture rehabilitation case

    वन्यजीव तज्ज्ञ आणि पशुवैद्यकांच्या मते, या गंभीर दुखापतीमुळे T-126 ला तात्काळ जंगलात सोडणे शक्य नाही. त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी दीर्घकालीन उपचार आणि पुनर्वसनाची आवश्यकता आहे. सध्या, टीटीसी, चंद्रपूर येथे पशुवैद्यकांची टीम त्याच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याच्या उपचारासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे.

  • Chandrapur BJP pandal dispute । चंद्रपुरात अनंतचतुर्दशीला भाजपचे दोन पेंडाल, मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार समर्थक आमने-सामने

    Chandrapur BJP pandal dispute

    Chandrapur BJP pandal dispute : चंद्रपूर २ सप्टेंबर २०२५ – मागील २३ वर्षात चंद्रपूरच्या राजकारणात जे घडलं नाही ते वर्ष २०२५ मध्ये घडणार आहे, या मागील कारण राजकीय पक्षातील उभी फूट आहे. ६ सप्टेंबर रोजी अनंतचतुर्दशी निमित्त राज्यसहित चंद्रपुरात गणेश मूर्ती विसर्जन सोहळा होतो, या सोहळ्यात गणेश भक्त व मंडळाचे स्वागत करण्यासाठी राजकीय पक्ष आपले भव्य पेंडाल उभारतात. चंद्रपुरात या आधी कांग्रेस पक्षाचे दोन पेंडाल असायचे मात्र यंदा भाजपचे २ पेंडाल असणार आहे ते सुद्धा आजूबाजूला.

    भद्रावती कृषी बाजार समिती संचालकांचा भाजपात प्रवेश

    पेंडाल वादाने चंद्रपूर शहर भाजपात आज मोठी खळबळ उडाली होती, चंद्रपूर भाजपचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार हे माजी भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांना दिलेल्या पेंडाल ची परवानगी रद्द करण्याच्या मागणीसाठी चंद्रपूर मनपा कार्यालयात गेले होते. भाजप मागील २३ वर्षांपासून लोकमान्य टिळक हायस्कुल समोर गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी पेंडाल उभा करते. मात्र यंदा चंद्रपूर विधानसभेच्या भाजपची सूत्रे आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे आल्याने भाजपचे नवे अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी आपल्यातर्फे मनपा कार्यालयात पेंडाल च्या जागेसाठी अर्ज केला मात्र त्या जागेची परवानगी राहुल पावडे भाजपचे माजी महानगर अध्यक्ष यांना दिली असल्याचे कळले, विशेष म्हणजे पावडे यांच्या नावाने दोन जागेची परवानगी होती. BJP infighting Chandrapur Ganesh pandal permissions

    मुनगंटीवार-जोरगेवार समर्थकांचा वाद पुन्हा उफाळला

    चंद्रपूर भाजपचे महानगर अध्यक्ष कासनगोट्टूवार यांनी यावर आक्षेप घेत सदर परवानगी अधिकृतपणे महानगर अध्यक्षांच्या पत्रावर आम्हाला मिळावी असे निवेदन मनपाला दिले. यावर काही काळ मनपामध्ये चांगलाच वाद निर्माण झाला होता. राहुल पावडे यांनी आपल्या नावावर दोन ठिकाणी पेंडाल परवानगीच्या नावाने अतिक्रमण केले सदर परवानगी रद्द केली नाही तर आम्ही सदर अतिक्रमण हटवू असा इशारा दिल्यावर एका जागेची परवानगी रद्द करण्यात आली. मात्र यामुळे प्रथमच भाजपचे दोन पेंडाल उभे राहणार असल्याने भाजपातील गटबाजी यानिमित्ताने पुन्हा पुढे आली आहे. विशेष बाब म्हणजे यावेळी दोन्ही स्वागत पेंडाल मध्ये भाजपचे आजी-माजी पदाधिकारी आमने सामने असणार आहे. Chandrapur pandal politics BJP factions clash

    भाजपात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न

    भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी प्रतिक्रिया दिली कि भाजप हा एकसंघ पक्ष आहे मात्र राहुल पावडे भाजपात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्याबाबत आम्ही प्रदेश भाजपला याबाबत माहिती देऊ. चंद्रपूर जिल्ह्याच्या भाजपच्या राजकारणात माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील वाद हा जगजाहीर आहे. आमदार किशोर जोरगेवार यांचा राजकीय प्रवास हा भाजपमधून सुरु झाला, मात्र विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्याने त्यांनी शिवसेनेची वाट धरली होती, विधानसभा निवडणुकीत जोरगेवार यांचा पराभव झाला मात्र त्यानंतर त्यांनी वर्ष २०१९ मध्ये अपक्ष निवडणूक लढवीत भाजप व कांग्रेस उमेदवाराला पराभवाची धूळ चारत निवडणूक जिंकले. Chandrapur BJP pandal dispute

    वर्ष २०२४ मध्ये त्यांनी अनेक संघर्ष करीत सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भाजपात प्रवेश करीत निवडणूक जिंकली, मात्र दोघांचा वाद हा कायम राहिला. चंद्रपूर महानगर भाजप कार्यकारणीत आमदार जोरगेवार यांच्या समर्थकांची वर्णी लागल्याने मुनगंटीवार समर्थकांत असंतोष पसरला. त्यामुळे माजी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुनगंटीवार यांच्यासोबत जाणे पसंत केले. आजही महानगर भाजपच्या कार्यक्रमात मुनगंटीवार समर्थक जात नाही. आजच्या पेंडाल वादात मुनगंटीवार व जोरगेवार समर्थक आमनेसामने आले होते. अनंतचतुर्दशी ला भाजपच्या स्वागत पेंडाल मध्ये नेमकं काय घडणार हे ६ सप्टेंबर रोजी पुढे समजेल.

  • Chandrapur flood water enters 250 houses । अतिवृष्टीमुळे पडोली गावातील आमटा वॉर्डात 250 घरांना फटका, आमदार जोरगेवार यांचा दौरा

    Chandrapur flood water enters 250 houses

    Chandrapur flood water enters 250 houses : चंद्रपूर २ सप्टेंबर २०२५ – कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील पडोली येथील आमटा वॉर्ड परिसरात जवळपास 250 घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. या घटनेत नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनंतर भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने मदतकार्य सुरू असून नागरिकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत हलविण्यात आले आहे. दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांनी आज मंगळवारी अधिकाऱ्यांसह सदर परिसराची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या.

    जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसे एकमेव पर्याय, चंद्रपुरात मनसेचा पक्षप्रवेशाचा धडाका

    यावेळी तहसीलदार विजय पवार, बीडीओ संगीता भांगडे, भाजप नेते नामदेव डाहुले, मंडळ अध्यक्ष विनोद खेवले, नकुल वासमवार, राकेश पिंपळकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    नागरिकांचे नुकसान

    कालपासून चंद्रपूरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी शिरले असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह ग्रामीण भागाचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पडोली येथील आमटा वॉर्डातील स्थितीचीही त्यांनी पाहणी केली. MLA Kishor Jorgewar Chandrapur flood relief efforts

    chandrapur flood relief efforts

    आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूलकित सिंह यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आवश्यक सूचना केल्या. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या तसेच संबंधित अधिकारी व प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट आदेश दिले.

    सध्या सर्व प्रभावित नागरिकांची तात्पुरती व्यवस्था जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात आली असून त्यांना जेवण, पाणी व इतर आवश्यक सुविधा पुरवल्या जात आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतर प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू होईल. प्रभावित नागरिकांना शक्य तितकी मदत व दिलासा मिळावा, यासाठी मी सातत्याने प्रशासनाशी समन्वय साधत आहे, असे आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.

  • Erai dam gates opened alert villages Chandrapur । मुसळधार पावसाने चंद्रपूर जिल्हा बेहाल, अनेक मार्ग बंद

    Erai dam gates opened alert villages Chandrapur

    Erai dam gates opened alert villages Chandrapur : चंद्रपूर (२ सप्टेंबर २०२५) – मागील २४ तासात चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे, जिल्ह्यातील अनेक मार्ग पावसामुळे बंद करण्यात आले असून, जिल्ह्यात एकूण सरासरी ५० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. इरई धरणाचे सातही दरवाजे उघडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

    राजुरा विधानसभा क्षेत्रातील बोगस मतदार व ६१ लाख रुपयांचा वाली कोण?

    १ सप्टेंबर रोजी सायंकाळपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती, या पावसामुळे इरई धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने २ सप्टेंबर ला सकाळी ७ वाजता धरणाचे ३ दरवाजे १ मीटर ने तर ४ दरवाजे ०.७५ मीटरने उघडण्यात आले आहे.

    इरई धरणाचे दरवाजे उघडल्याने या गावांना सतर्कतेचा इशारा

    पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना आणि इतर इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. असे आवाहन चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.

    अनेक मार्ग बंद, प्रशासनाची बचाव मोहीम

    कारवा-बल्लारपूर रोड वरील नाल्याला आलेल्या पुरामुळे १२ नागरिक अडकले होते, याबाबत बल्लारपूर प्रशासनाला माहिती मिळताच रात्री १२ वाजता तहसील कार्यालय बल्लारपूर मध्ये उपलब्ध असलेले बचाव साहित्य सोबत घेत कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुखरूपपणे कारवा मधील सोमाजी नाईक आश्रम शाळा मध्ये थांबण्याची व्यवस्था केली त्यांनतर तहसील कार्यालयाच्या वाहनाने नागरिकांना बल्लारपूर मध्ये पोहचविण्यात आले. Chandrapur heavy rain rescue operation update

    road close

    मार्ग बंद

    चंद्रपूर, धानोरा ते भोयेगाव मार्गावरील पुलावर पाणी आल्याने सदर मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे, मूल तालुका – फिस्कुटी ते चिचाळा नदी पुलावरून पाणी जात असल्याने सदर मार्ग बंद, चिरोली केळझर मार्ग बंद, चिंचोली गावाजवळील रेल्वे बोगद्यात पाणी असल्यामुळे काटवन ते मूल मार्ग बंद, काटवन ते मुल येण्याकरिता मारोडा हा पर्यायी मार्गाचा नागरिकांनी अवलंब करावा. वरोरा तालुका – कोसरसार ते बोडखा रस्ता बंद, अर्जुनी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने चारगाव ते खुर्द अर्जुनी मार्ग बंद, मौजा सुर्ला ते जामगाव बु मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद. भद्रावती तालुका – मौजा गुंजाला नाल्यावर पाणी जास्त वाढलेले असून नाल्या शेजारील काही घरात पाणी शिरलेलं आहे, मौजा गुंजाला कचराळा वाहतूक रस्ता बंद. Chandrapur musaldhaar rain impact villages

    flood alert

    कोरपना तालुका – इरई भारोसा मार्ग बंद, भोयेगाव धानोरा मार्ग पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद करण्यात आला आहे. बल्लारपूर तालुका – पळसगाव-कवडजी मार्गावरील रंगीत यांच्या शेताजवळील पूल तीन फूट उंच पाण्याने डुबून असल्याने रहदारी बंद करण्यात आली आहे. इरई नदीवरील पुलावर पाणी आल्यामुळे मौजा चारवट माना चंद्रपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. काटवली ते बामणी मार्ग बंद.