Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • prenatal sex determination । 🚨 चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा : बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर कडक कारवाई!

    prenatal sex determination

    prenatal sex determination : चंद्रपूर – ९ सप्टेंबर २०२५ –  गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्राचा वापर करून बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान करणे व गर्भपात करणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी  विनय गौडा जी.सी. यांनी दिले.

    जिल्हाधिकारी कार्यालयातील विस कलमी सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, डॉ.भास्कर सोनारकर, डॉ. नयना उत्तरवार तसेच आरोग्य विभागातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    दूरसंचार विभागाचे केबल चोरणारी टोळी जेरबंद

    जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान केंद्रांविषयी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. माहितीच्या आधारे खातरजमा होऊन संबंधित व्यक्ती किंवा केंद्राविरुद्ध खटला दाखल झाल्यास माहिती देणाऱ्यास शासनातर्फे 1 लाख रुपये व चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 25 हजार रुपये, असे एकूण 1 लाख 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. तसेच, स्टींग ऑपरेशनसाठी सहभागी होणाऱ्या गर्भवती महिलेस न्यायालयीन खटला दाखल झाल्यानंतर शासनातर्फे 1 लाख व महापालिकेतर्फे 25 हजार रुपये, असे एकूण 1 लाख 25 हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. reward for reporting illegal fetal sex

    सर्व अल्ट्रासाऊंड केंद्रे, रुग्णालये व दवाखान्यांची काटेकोर तपासणी करावी, बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्टींग ऑपरेशन्स वाढविणे, सर्व सोनोग्राफी केंद्रांची दर तीन महिन्यांनी तपासणी करणे, तसेच 12 आठवड्यांपेक्षा अधिक गर्भपात करणाऱ्या केंद्रांना आवर्जून भेट देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

    शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सर्व कागदपत्रे, अहवाल व नोंदवही काटेकोर तपासावीत, यामध्ये निष्काळजीपणा होऊ नये, आवश्यकतेनुसार पोलिस विभाग व इतर शासकीय कर्मचाऱ्यांचे सहकार्य घ्यावे, असेही त्यांनी सुचविले. district collector orders unregistered ultrasound center raids

    टोल फ्री द्वारे माहिती द्या

    जन्मापूर्वी मुलगा किंवा मुलगी आहे हे जाणून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा बेकायदेशीर कृत्याची माहिती नागरिक खालील टोल फ्री क्रमांक व माध्यमांद्वारे देऊ शकतात : 18002334475 (शासन टोल फ्री हेल्पलाईन), 104 (आरोग्य टोल फ्री क्रमांक), 18002574010 (मनपा टोल फ्री क्रमांक), व्हॉट्सॲप : 8530006063, संकेतस्थळ : www.amchimulgimaha.in, तक्रार निवारण ॲप :  https://grievance.cmcchandrapur.com /complaint_registration/add इत्यादी.

    गर्भलिंग निवडीच्या प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी जनजागृतीबरोबरच कायद्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाने “मुलगी वाचवा, मुलगी शिकवा” या अभियानासाठी हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

  • OBC Welfare Committee Re-appointment । खासदार प्रतिभा धानोरकर यांची पुनर्नियुक्ती, ओबीसी हक्कांसाठी नवा आत्मविश्वास!

    OBC Welfare Committee Re-appointment

    OBC Welfare Committee Re-appointment : चंद्रपूर ९ सप्टेंबर २०२५ : खासदार प्रतिभा धानोरकर यांची इतर मागासवर्गीयांच्या कल्याण विषयक समितीवर (२०२५-२६) सदस्य म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे, ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी या समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा भक्कम आवाज ऐकायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लोकसभा सचिवालयाने १ सप्टेंबर, २०२५ रोजी यासंदर्भात अधिकृत पत्र जारी केले.

    आमदार अभिजित वंजारी चंद्रपूर जिल्हा कांग्रेस प्रभारी

    ही महत्त्वाची समिती २९ ऑगस्ट, २०२५ रोजी ‘समाचार भाग-दोन’ द्वारे जाहीर करण्यात आली होती. लोकसभा अध्यक्षानी या समितीच्या अध्यक्षपदी खासदार गणेश सिंह यांची नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातील सदस्यांचा समावेश आहे.

    दुसऱ्यांदा या समितीवर संधी

    खासदार प्रतिभा धानोरकर यांना दुसऱ्यांदा या समितीवर संधी मिळाल्यामुळे त्यांच्या मागील कामाची दखल घेतल्याचे स्पष्ट होते. याआधीही त्यांनी संसदेत ओबीसी समाजाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. विशेषतः ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना यांसारख्या लोकहितकारी विषयांवर त्यांनी सातत्याने जोर दिला होता. त्यांची ही पुनर्नियुक्ती ओबीसी समाजाच्या हितासाठी एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.

  • Maharashtra Congress District In-charge । 🚀 चंद्रपूरमध्ये काँग्रेसला बळकटी, आमदार वंजारी यांची प्रभारीपदी नियुक्ती

    Maharashtra Congress District In-charge

    Maharashtra Congress District In-charge : चंद्रपूर ९ सप्टेंबर २०२५ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी यांची चंद्रपूर शहर व ग्रामीण जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबाबतचे अधिकृत पत्र प्रदेश काँग्रेसकडून जारी करण्यात आले आहे.

    चंद्रपुरात केबल चोरी करणाऱ्या बाहेर राज्यातील टोळक्याला अटक

    प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार

    प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांसाठी प्रभारी नेमण्यात आले असून ब्रह्मपुरी व वरोरा विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून आ. वंजारी यांच्यावरच जबाबदारी देण्यात आली आहे. राजुरा विधानसभेसाठी हैदर अली दोसानी, चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी श्री. मुजीब पठाण (नागपूर), बल्लारपूर विधानसभा क्षेत्रासाठी उमाकांत अग्निहोत्री, तर चिमूर विधानसभा क्षेत्रासाठी श्री. विश्वजीत कोवासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी या नियुक्तीचे पत्र जारी केले असून, जिल्हा प्रभारी व विधानसभा प्रभारी यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी तातडीने संपर्क साधून संघटनात्मक बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत.
    या नियुक्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या संघटनात्मक कामकाजाला नवे बळ मिळेल, तसेच आगामी राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेस पक्ष मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

  • skill development courses by government । राज्यातील 75 हजार युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी

    skill development courses by government

    skill development courses by government : चंद्रपूर, दि. 8 सप्टेंबर २०२५ (News३४) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी 75 वा वाढदिवस असून कौशल्य विभाग रोजगार आणि स्वयंरोजगार सेवा पंधरवडा साजरा करत आहे. या अनुषंगाने राज्यातल्या सुमारे 75 हजार युवक आणि युवतींना कौशल्यविषयक प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. येत्या 17 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत हा पंधरवडा सुरू राहणार असून 1 ऑक्टोबरला राज्यातील 419 आयटीआयमध्ये अभ्यासक्रमांचा शुभारंभ केला जाणार आहे.

    आदि कर्मयोगी प्रशिक्षण कार्यशाळेचे जिल्हाधिका-यांच्या हस्ते उद्घाटन

    कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात राज्यातील आयटीआयमध्ये रोजगाराच्या जागतिक संधी उपलब्ध करून देणारे अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही आता अत्याधुनिक अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू होत आहेत. कौशल्य विकासाद्वारे युवक व युवतींचे सक्षमीकरण हा यामागचा मूळ उद्देश आहे. मात्र अनेकांना नियमित कार्यशाळेत जाऊन  वेळेअभावी किंवा इतर कारणास्तव प्रशिक्षण घेण्याची संधी मिळत नाही.  skill development courses

    अशा होतकरू युवकांना आणि युवतींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  प्रत्येक जिल्ह्यात अल्पकालीन अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आयटीआयच्या नियमित वर्गाच्या व्यतिरिक्त इतर वेळेत हे अभ्यासक्रम घेण्यात येतील.

    राज्यातील आयटीआयमध्ये सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसोबतच  अतिशय अल्पदरात युवक आणि युवतींना रोबोटिक, सौर ऊर्जा तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आणि व्यक्तिमत्व आणि सामाजिक विकासासंदर्भात अत्याधुनिक अभ्यासक्रम चालवले जाणार आहेत. उद्योगांना पूरक स्वयंरोजगाराच्या संधी या अल्पकालीन अभ्याक्रमाच्या माध्यमाने तरुणांना उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे सध्या आयटीआयचे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींकडून या अभ्यासक्रमांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

    येथे करा नोंदणी :

      https://admission.dvet.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर राज्यातल्या प्रत्येक  जिल्ह्यात सुरू होत असलेल्या अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती तसेच प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे. अल्पकालीन अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर युवकांना रोजगाराच्या संधीबाबत आणि स्वयंरोजगाराची माहितीही संबंधित आयटीआय संस्थेत दिली जाणार आहे. उपलब्ध जागांचा विचार करता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार असून युवकांनी त्वरित या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

  • Adi Karmayogi Abhiyan tribal development । आदि कर्मयोगी प्रशिक्षण कार्यशाळेचे जिल्हाधिकारी गौडा यांच्या हस्ते उद्घाटन

    Adi Karmayogi Abhiyan tribal development

    Adi Karmayogi Abhiyan tribal development : चंद्रपूर, दि. 8 सप्टेंबर २०२५ : प्रतिक्रियाशील सुशासन कार्यक्रमाच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत सेवा व लोककेंद्रीत विकासाची पुर्तता करण्यासाठी केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालयाने ‘आदि कर्मयोगी अभियान’ सुरू केले आहे. या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आदिवासी गावांचा आराखडा तयार होणार आहे. जेणेकरून सन 2047 च्या विकसीत भारताच्या संकल्पनेत त्याचा समावेश करता येईल. त्यामुळे लोकसहभागातून आपल्या जिल्ह्याचे उत्कृष्ट ‘व्हीजन डॉक्युमेंट’ तयार करा, अशा सुचना  जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.

    वाघाच्या जबड्यात पत्नी, पटीने वाघाशी केले दोन हात

    एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरच्या वतीने वन अकादमी येथे आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर तसेच इतर प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

     ‘आदि कर्मयोगी अभियान’ हे केंद्र शासनाचे अतिशय महत्वाकांक्षी अभियान आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, या माध्यमातून आदिवासी समाजाकरीता असलेल्या 1. पीएम जनमन योजना, 2. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, 3. राष्ट्रीय सिकलसेल उच्चाटन मोहीम आणि 4. एकलव्य निवासी शाळांचा विस्तार आणि शिष्यवृत्ती योजना तसेच आदिवासी बांधवांसाठी असलेल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या इतर योजनांवर आधारीत लोकसहभागातून उत्कृष्ट गावनिहाय आराखडा तयार करावयाचा आहे. त्यासाठी राज्यस्तर, जिल्हा, तालुकास्तर मास्टर ट्रेनर तयार करण्यात येत आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून आपापल्या गावस्तरावर योग्य प्रशिक्षण द्यावे. या तीन दिवसाच्या प्रशिक्षणाचा चांगला फायदा करून संपूर्ण प्रक्रिया समजावून घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी प्रशिक्षणार्थ्यांना केल्या. PM Janman Yojana benefits for tribal communities

    pm janman yojana benefits for tribal communities

    मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह म्हणाले, ‘आदि कर्मयोगी’ हे अभियान सेवा, समर्पण आणि संकल्प यावर आधारीत आहे. आदिवासी बांधवांसाठी चार मुख्य योजनांवर मास्टर ट्रेनरची ही जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. प्रशिक्षण हे आपले कौशल्य विकसीत करण्यासाठी असते, त्यामुळे त्याचा योग्य लाभ घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

    प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानात चंद्रपूर जिल्ह्यातील 167 गावे तर पीएम जनमन योजनेत 68 गावांचा समावेश आहे. आदिवासी गावांमध्ये आरोग्य, शिक्षण, पोषण, रोजगार, पाण्याची उपलब्धता करणे आाणि शासनाशी संपर्क ठेवण्यासाठी ‘आदि कर्मयोगी अभियान’ सुरू करण्यात आले आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून गावांचे नियोजनबध्द आराखडे तयार करावयाचे आहेत, असे त्यांनी सांगितले. Tribal empowerment programs by Ministry of Tribal Affairs

    सदर कार्यशाळेकरीता 9 जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनरसह एकूण 120 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यात ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, वनविभाग, महावितरण, आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग आणि जि.प. पंचायत विभागाचा समावेश होता.

     असे आहे ‘आदि कर्मयोगी अभियान’:

     आदिवासी भागात तळागाळातील शासन व सेवा वितरणामध्ये आमुलाग्र परिवर्तन घडविणे, आदिवासी समुदायांना सशक्त करण्यासाठी प्रतिक्रियाशील सुशासन कार्यक्रमांतर्गत नेत्यांचे कॅडर निर्माण करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. सेवा, समर्पण आणि संकल्प या तत्वावर हे अभियान राबविले जाणार असून आदिवासी भागांमध्ये शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहचवली जाईल. आदिवासी समुदायांच्या सक्षमीकरणासाठी संपूर्ण भारतात 20 लक्ष परिवर्तनशील नेत्यांचे मिशन आधारीत कॅडर निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.

  • Latest tiger attack news from Chandrapur । सोमनाथ पर्यटनस्थळाजवळ वाघाचा हल्ला, धाडसी पतीचा प्रयत्न व्यर्थ, पत्नीचा मृत्यू

    Latest tiger attack news from Chandrapur

    Latest tiger attack news from Chandrapur चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एका ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमनाथ पर्यटन स्थळाजवळील बाबा आमटे प्रकल्पाच्या क्वार्टरमध्ये घडली.

    नेमकं काय घडलं?

    अन्नपूर्णा बिलोणे (५२) आणि त्यांचे पती तुलसीराम बिलोणे हे बाबा आमटे प्रकल्पाच्या क्वार्टरमध्ये राहत होते. आज पहाटे ४.३० वाजता अन्नपूर्णा त्यांच्या घराच्या अंगणात भांडी घासत होत्या. त्याचवेळी एका वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. Villager woman killed by tiger attack

    सावली तालुक्यात धुमाकूळ घालणारी नरभक्षी वाघीण जेरबंद

    पतीचा धाडसी प्रयत्न

    अन्नपूर्णा यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांचे पती तुलसीराम तातडीने बाहेर आले. त्यांनी पाहिले की वाघाने अन्नपूर्णा यांच्या गळ्याला पकडले आहे. घाबरून न जाता, तुलसीराम यांनी आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी वाघाशी दोन हात केले. त्यांनी अन्नपूर्णा यांचे पाय धरून त्यांना खेचण्याचा प्रयत्न केला, पण वाघाच्या ताकदीसमोर त्यांचा जोर कमी पडला. शेवटी, त्यांनी जवळच पडलेली एक काठी घेऊन वाघावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यानंतर वाघ तिथून पळून गेला, पण दुर्दैवाने अन्नपूर्णा यांचा जागीच मृत्यू झाला होता. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २९ नागरिकांनी वाघाच्या हल्ल्यात आपला जीव गमावला असून यामध्ये २७ वाघाच्या हल्ल्यात तर एक-एक हत्ती व अस्वलच्या हल्ल्यात बळी गेला.

    प्रशासकीय कार्यवाही

    घटनेची माहिती मिळताच मुल पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. तात्काळ, मेजर राष्ट्रपाल कातकर, धनराज नेवारे, वेदनाथ करंबे यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुल उप-जिल्हा रुग्णालयात पाठवला. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन मृत महिलेच्या पतीला तात्काळ २०,००० रुपयांची मदत दिली.

    या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

  • boy drowns during Ganesh immersion । चंद्रपूर गणेश विसर्जन दु:खद अपघात, १८ वर्षीय तरुणाचा इरई नदीत बुडून मृत्यू

    boy drowns during Ganesh immersion

    boy drowns during Ganesh immersion : चंद्रपूर – ७ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर शहरात ६ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन पार पडलं, मात्र या आनंद व उत्साहाच्या वातावरणात विघ्न आलं, दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीत गणेश विसर्जन करताना १८ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ७ सप्टेंबर रोजी आपत्ती व्यवस्थापन व पोलीस कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम राबवित मुलाचा मृतदेह बाहेर काढला. १८ वर्षीय दीक्षांत राजू मोडक असे मृतकाचे नाव आहे.

    चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    चंद्रपूर व शहरातील इतर भागात गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात सुरु होते, दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भटाळी पूल इरई नदीच्या पात्रात सुद्धा विसर्जन सुरु होते, बेताल चौक दुर्गापूर मध्ये राहणारा १८ वर्षीय दीक्षांत राजू मोडक हा आपल्या घरी असताना दुपारी त्याच्या मित्राने फोनद्वारे गणेश विसर्जनाला जाऊ असे म्हणत बोलाविले, ते दोघेही घराजवळील बावणे यांच्या गणेश विसर्जनाला गेले.

    शोधमोहिमेत मिळाला मृतदेह

    दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान भटाळी पुलावर इरई नदीच्या पात्राजवळ मित्र व इतर नदी पात्रात उतरले असता दीक्षांत व एकाचा तोल गेला, त्याचवेळी दुसऱ्या मुलाला वाचविण्यास यश आले मात्र दीक्षांत बुडाल्याने तो पाण्याबाहेर आला नाही, तात्काळ याबाबत पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. बचाव पथकाने दीक्षांत चा शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही. रात्र झाल्याने पोलिसांनी शोधमोहीम थांबविली. Irai river drowning incident during Ganesh immersion

    ७ सप्टेंबर रोजी पुन्हा शोधमोहीम राबवली असता सकाळी १० वाजताच्या सुमारास शोध पथकाला दीक्षांत चा मृतदेह मिळाला, दीक्षांत च्या मृत्यूने दुर्गापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुर्गापूर पोलिसांनी याप्रकरणी मार्ग दाखल केला आहे.

  • Ganesh immersion laser light violation । 🚨 गणेश विसर्जनात लेझर लाईटचा वापर! पोलिसांच्या आदेशाकडे डीजे चालकांचे सपशेल दुर्लक्ष

    Ganesh immersion laser light violation

    Ganesh immersion laser light violation : चंद्रपूर – ६ सप्टेंबर २०२६ – चंद्रपुर जिल्ह्यात वेगवेगळ्या तारखेला गणेश मूर्ती विसर्जन वेगवेगळ्या तारखेला आयोजन करण्यात आले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत हजारो नागरिक सहभागी होतात मात्र यावेळी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका नागरिकांना बसला आहे. मुख्य मार्गावर स्ट्रीट व हायमास्ट लाईट बंद आहे. आणि विशेष बाब म्हणजे २१ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षकांनी लेझर लाईट वापरावर प्रतिबंध असल्याचा आदेश निर्गमित केला होता, त्या आदेशाला डीजे चालकांनी केराची टोपली दाखवली आहे.

    गणेश विसर्जनाच्या पूर्व संध्येला चंद्रपुरात युवकाची भाईगिरी, चाकू काढत नागरिकांना धमकी

    मानवी जीविताला धोका, आरोग्य, सुरक्षितता व गोंधळ सह भांडणे निर्माण करीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाने मिरवणुकीत लेझ लाईट वापरास प्रतिबंध केला असा आदेश सुद्धा निर्गमित करण्यात आला होता. मात्र गणेश उत्सवाच्या धामधुमीत डीजे चालकांनी पोलिसांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर केलाच. Violation of Chandrapur police order

    चंद्रपूर शहरातील ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीत अनेक डीजे चालकांनी लेझर लाईटचा वापर केल्याचे दिसून येत आहे, यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

    लेझर लाईटचे दुष्परिणाम काय?

    लेझर लाईटमुळे अंधत्व येणे, डोळे निकामी होणे, आरोग्याला धोका आणि गोंधळाची स्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) अन्वये 27 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2025 या कालावधीत आयोजित मिरवणुकीमध्ये लेझर लाईटच्या वापरास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे पोलिस अधिक्षकांच्या आदेशात नमुद आहे.

  • Ganesh Visarjan electrical safety guidelines । महत्वाची सूचना, गणेशोत्सवात सुरक्षितता प्रथम – विसर्जनावेळी विजेपासून कशी घ्याल काळजी?

    Ganesh Visarjan electrical safety guidelines

    Ganesh Visarjan electrical safety guidelines : चंद्रपूर :- ५ सप्टेंबर २०२५ – यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. मिरवणुका, डीजे आणि ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं विसर्जन केलं जातं मात्र या आनंदाच्या वातावरणात विद्युत सुरक्षेची काळजी घेणे खूप महत्त्वाचा आहे. अनेकदा विजेच्या तारा, खांब आणि इलेक्ट्रिक उपकरणांमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत आणि विसर्जन स्थळी विद्युत अपघात टाळण्यासाठी काही महत्त्वाचे नियम पाळण्याचे आवाहन महावितरण ने केले आहे.

    मराठा समाजाचे ओबीसीकरण, चंद्रपुरात शासन निर्णयाची होळी

    Avoid electrical accidents during Ganesh Visarjan immersion

    मिरवणूक सुरू करण्याआधी मंडळाने ठरवलेला मार्ग व्यवस्थित तपासा. रस्त्यात असलेले विजेचे खांब, लोंबकळणाऱ्या तारा, ट्रांसफार्मर आणि ओपन जंक्शन बॉक्सची माहिती आधीच घ्या. शक्य असल्यास विजेच्या तारांना स्पर्श होणार नाही अशा कमी उंचीच्या वाहनांचा वापर करा.

    विद्युत उपकरणे आणि सजावट

    मंडपातील विद्युत सजावट आणि मिरवणुकीतील लाइटिंगसाठी योग्य दर्जाच्या आणि सुरक्षित उपकरणांचा वापर करा. निकृष्ट दर्जाच्या तारा किंवा जोडण्या वापरू नका. शक्यतो प्रमाणित (एग मार्क) असलेली सामग्रीच वापरा. जनरेटर किंवा बॅटरीचा वापर करताना ते योग्य ठिकाणी ठेवा आणि त्यांच्या वायर्स सुरक्षित आहे त्याची खात्री करा. पाण्यात किंवा ओल्या जागेवर कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर टाळा. Ganesh Visarjan generator and wiring safety

    मिरवणुकीतील सावधगिरी

    मिरवणुकीत जनरेटर ट्रॉलीवर असेल तर ती इतर वाहनांपासून सुरक्षित अंतरावर ठेवा. मिरवणूक मार्गावर असलेले विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा तारांच्या जवळ येताच मोठा आवाज किंवा ढोल ताशांचा गजर थांबवा. मूर्तीची उंची जास्त असेल तर विजेच्या तारांपासून सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी मिरवणुकीच्या पुढे जाणारे स्वयंसेवक ठेवा.

    पाण्यात असताना

    विसर्जन करताना मूर्तीसोबत कोणतीही विद्युत उपकरणे किंवा लाइटिंग चे साहित्य पाण्यात टाकू नका. तुम्ही पाण्यात उतरून विसर्जन करत असाल तर तुमच्या शरीराचा विजेच्या कोणत्याही तारांशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्या. पाण्यात उतरण्याआधी मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे काढून ठेवा.
    तुम्हाला कुठेही तुटलेल्या वायर्स, ओपन जंक्शन बॉक्स किंवा विजेची ठिणगी पडताना दिसली तर तात्काळ त्या ठिकाणच्या पोलिसांना किंवा महावितरण ला कळवा अशावेळी त्या जागेपासून सुरक्षित अंतर ठेवा आणि इतर लोकांनाही सावध करा.

  • blood moon lunar eclipse 2025 । खग्रास चंद्रग्रहण 2025: भारतात कधी, कुठे आणि किती वेळ दिसणार ‘रेड मून’?

    blood moon lunar eclipse 2025

    blood moon lunar eclipse 2025 : चंद्रपूर – 7 सप्टेंबर रोजी भारतातून खग्रास चंद्र ग्रहण दिसणार असून खगोल आणि विज्ञान अभ्यासकांना हे ब्लड मून,रेड मून पाहण्याची चांगली संधी मिळणार आहे.रात्री 9.57 मिनिटांनी खंडग्रास ग्रहणाला सुरवात होऊन 12.22 वाजेपर्यंत ते पाहता येईल अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुप चे अध्यक्ष प्रा सुरेश चोपने ह्यांनी दिली आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात ५४० इसमांना केले हद्दपार

    ह्या वर्षी फारसे ग्रहण भारतातून दिसले नाही.त्यामुळे हेच खग्रास चंद्र ग्रहण चांगल्या पद्धतीने पाहण्याची संधी मिळणार आहे. हे ग्रहण एकूण 5 तास 27 मिनिटे दिसणार आहे,त्यात छायाकल्प चंद्रग्रहनाची सुरवात रात्री 9 वाजता होईल. खंडग्रास ग्रहणाची सुरुवात 9.57 वाजता होईल तर खग्रास ग्रहण रात्री 11 वाजता सुरू होईल आणि ते रात्री 12.22 वाजेपर्यंत दिसेल. ह्याच दरम्यान चंद्र लाल रंगाचा दिसेल म्हणून त्याला ब्लड मून, रेड मुन असे म्हटल्या जाते. Chandra Grahan 2025

    खग्रास स्थिती ही 2 तास 7 मिनिटांची असेल. आकाशात ढगाळ हवामान नसेल तर त्या ठिकाणी खूप सुंदर ग्रहण पाहता येईल. कुठलीही अंधश्रद्धा न बाळगता ग्रहणाचा खगोलीय आणि वैज्ञानिक पद्धतीने निरीक्षण आणि अभ्यास करावा असे आवाहन सुद्धा प्रा सुरेश चोपणे ह्यांनी केले आहे.

    21 सप्टेंबर ला शेवटचे सूर्यग्रहण

    21 सप्टेंबर ला ह्या वर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण दिसणार आहे,परंतु ते भारतातून दिसणार नाही. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक, अटाटिक आणि न्यूझीलंड ह्या देशातील काही भागातूनच ही सूर्यग्रहण पाहता येणार आहे अशी माहिती स्काय वॉच ग्रुप तर्फे देण्यात आली आहे.