Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Chandrapur National Lok Adalat case settlements । 📌 चंद्रपूर जिल्हा न्यायालयात १०६७ प्रकरणांचा निपटारा – लोकअदालतीचा यशस्वी उपक्रम

    Chandrapur National Lok Adalat case settlements

    Chandrapur National Lok Adalat case settlements : चंद्रपूर, दि. १३ सप्टेंबर २०२५ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आज दि. १३ सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालयासह सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.

    दुकानात शिरला ट्र्क एक ठार

    या लोकअदालती चे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा समृध्दी भीष्म यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.

    १०६७ प्रकरणे यशस्वीरित्या निकाली

    लोकअदालतीत एकूण ९५३७ प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे व १५६६२ दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ८५५ प्रलंबित व २१२ दाखलपूर्व अशी एकूण १०६७ प्रकरणे यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली.

    १ कोटी २८ लक्ष ६१ हजार ६०७ इतकी रक्कम वसूल

    यामध्ये मोटार अपघात दाव्यांची २८ प्रकरणे निकाली काढून २ कोटी ५१ लक्ष ४५ हजार रुपये इतकी नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. दाखलपूर्व प्रकरणांमधून १ कोटी २८ लक्ष ६१ हजार ६०७ इतकी रक्कम वसूल करण्यात आले. धनादेश अनादरित झालेल्या ६६ प्रकरणांचा निकाल लावण्यात आला, तर कामगार व औद्योगिक न्यायालयातील १ प्रकरण निकाली निघाले.

    lok adalat chandrapur

    या लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहकार्य केले, अशी माहिती  एस. एस. इंगळे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांनी दिली.

  • Nagpur-Chandrapur Highway । नागपूर-चंद्रपूर महामार्ग: ट्रक थेट दुकानात घुसला; एकाचा मृत्यू

    Nagpur-Chandrapur Highway

    Nagpur-Chandrapur Highway : चंद्रपूर, ( १३ सप्टेंबर २०२५) – चंद्रपूर जिल्ह्यातील नागपूर–चंद्रपूर महामार्गावर असलेल्या टेमुर्डा येथील मुख्य चौकात शनिवारी (दि. १३ सप्टेंबर २०२५) पहाटे एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका १६ चाकी ट्रकने (क्रमांक यूपी ७२ सीटी ७८१७) नियंत्रण गमावले आणि तो थेट रस्त्यावरील दुभाजक तोडून बाजूच्या ‘शिवकृपा मेडिकल’ आणि ‘तेजस्विनी क्लिनिक’ या दवाखान्याच्या टिनशेडवर आदळला. या अपघातात मेडिकलच्या शेडमध्ये झोपलेल्या एका अज्ञात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

    इरई धरणाचे दरवाजे उघडले, १ मीटरने पाण्याचा विसर्ग सुरु

    काय घडले नेमके?

    पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रकमध्ये धडक इतकी जोरदार होती की, मेडिकलच्या लोखंडी शेडचा चक्काचूर झाला. त्याचबरोबर बाजूला असलेले विठ्ठल काळे यांचे भाजीपाल्याचे शेडही उद्ध्वस्त झाले. अपघातानंतर ट्रकचा चालक आणि क्लिनर घटनास्थळावरून पळून गेले. Fatal accident

    अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्यांनी पाहिले की, शेडमध्ये झोपलेला तरुण ट्रकखाली दबला गेला होता आणि त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या वर्षातील या ठिकाणी घडलेला हा सातवा अपघात आहे, त्यामुळे प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.

    ‘मोठा अनर्थ’ टळला

    स्थानिक नागरिकांनी सांगितले की, अपघाताच्या आदल्या रात्री म्हणजे १२ सप्टेंबर रोजी याच ठिकाणी सुमारे २५-३० लोक झोपलेले होते. जर हा अपघात एका दिवसाने झाला असता, तर मोठी जीवितहानी झाली असती, असा अंदाज वर्तवला जात आहे.

    या चौकात दररोज मच्छी बाजार, फळ-भाजीपाला विक्रेते, नाश्ता सेंटर आणि इतर लहान व्यवसाय चालतात, त्यामुळे येथे नेहमीच मोठी गर्दी असते. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने या चौकात वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

  • chandrapur flood latest update |मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पूरस्थिती; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    chandrapur flood latest update

    chandrapur flood latest update : चंद्रपूर १३ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे, यामुळे वर्धा व इरई नदीचा जलस्तर वाढला असून अनेक ठिकाणी पुराचा धोका वाढला आहे, इरई धरण परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

    पुरात अडकली बस, बसमध्ये होते ७० विद्यार्थी

    इरई धरणाचे ७ दरवाजे उघडले

    चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने धरणाचे सातही दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले आहे. यामुळे नदीकाठील पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना आणि इतर इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. पुलावरून पाणी जात असल्यास कुणीही पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, जनावरांना नदीकाठी चरण्यास सोडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. flood warning Errai dam villages

    जीर्ण इमारत कोसळली, २ मुली बचावल्या

    संततधार पावसामुळे बल्लारपूर शहरातील १०० वर्षे जुनी असलेली जीर्ण इमारतीचा मोठा भाग शुक्रवारी रात्री कोसळला, बल्लारपूर वस्ती विभागातील गांधी चौकाच्या नजिक असलेला गुप्ता यांच्या घराचा रस्त्याकडील पूर्ण भाग कोसळला. यावेळी मार्गावरून जात असलेल्या दोन मुली थोडक्यात वाचल्या. मलब्याखाली दबलेली काही दुचाकी वाहने अग्निशमन दलाच्या पथकांनी काढले आहे.अजूनही काही दुचाकी वाहने ढिगाऱ्याखाली दबलेली आहेत.या दुर्घटनेत कोणतीही वित्तहानी वा जिवीतहानी झालेली नाही. 100-year old building collapse in Ballarpur
    रस्ता बंद करून बॅरीगेटिंग करण्यात आले.त्या ठिकाणी १ सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले. इमारतीत राहणाऱ्या दोन कुटुंबांपैकी १ कुटुंब त्यांच्या नातेवाईकाकडे थांबले असून १ कुटुंबाची राहण्याची व्यवस्था लोक मंगल कार्यालयात केली आहे. जेसीबी आणि ट्रॅक्टर लावून मलबा काढण्याबाबत सूचन देण्यात आल्या. सदर इमारत खूप जुनी असल्याने अगदी जीर्ण झालेली आहे.

    बस पाण्यात

    दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी अंदाजे वेळ 18.15 वाजता चंद्रपूर आगाराची बस क्रमांक MH40 N 9426 भादुर्ली ते मुल येत असताना रेल्वेपटरी खालील बोगद्या मध्ये गाडी आली असता अंदाजे एक ते दोन फूट पाणी असल्याने बस निघू शकेल असे समजून चालकाने गाडी काढण्याचा प्रयत्न केला असता सायलेन्सरला पाणी लागल्यामुडे गाडी बंद पडली व पाऊस वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्याने गाडीच्या रेडिएटर पर्यंत पाणी आले असून गाडी अडकून आहे. सदर गाडीत तीन प्रवासी प्रवास करत होते. सदर प्रवासी व चालक वाहक सुखरूप आहे.
    सदर घटना चालकाच्या निष्काळजी पणामुळे घडलेली आहे. घटनास्थळी आगार व्यवस्थापक, चंद्रपूर, विभागीय वाहतूक अधिकारी, सहाय्यक यंत्र अभियंता हे यांत्रिक कर्मचाऱ्यांसाह गाडी काढणायासाठी पोहोचले होते. chandrapur flood latest update

    bus in water

    ३ कामगारांचे रेस्क्यू

    आज दिनांक 13सप्टेंबर रोजी अंकुश डिव्हिजन तरफदार वय २८ राह. नरेंद्रपूर तालुका चामुर्शी जिल्हा गडचिरोली 2) आशिष आनंदलाल शहा, वय ३५, राह. लालपेठ चंद्रपूर, 3) शुभजीत शंकर देवनाथ वय ३१, राह. सुभाष ग्राम तालुका चामुर्शी जिल्हा गडचिरोली हे सर्व लॉईड मेटल कंपनीचे लेबर कंपनीचे पाणी पुरवठ्याचे काम करीत असताना म्हातारदेवी गावा जवळील वर्धा नदीला पूर आल्याने दि. 12.09.25 चे रात्री पासून नदीमध्ये अडकून होते. वरील अडकलेल्या लोकांना आज दिनांक 13.09.2025 रोजी चंद्रपूर जिल्हा पोलीस रेस्क्यू पथक मधील बोट चालक – पीएसआय अशोक गर्गेलवार, रेस्क्यू पथक मधील पोलीस हवालदार मनोज हांडे , उमेश बनकर, प्रमोद डोंगरे, गिरीश मरापे, वामन नक्षीने, लीलाधर करमे, राजाराम गायकवाड, सुमेध घडसे यांनी बोटच्या साह्याने सुखरूप बाहेर काढले.

    rescue

    वरोरा : निमसडा मार्ग बंद झालेला आहे. निमसड्याचे 32 शाळेचे विद्यार्थी व 25 ग्रामस्थ अडलेले असून त्यांची व्यवस्था वर्धा पावर कंपनीमध्ये करण्यात आली आहे. वरोरा तालुक्यातील सोईत – कोसारा पुलावर 5 फूट पाणी आल्याने सदरचा मार्ग पूर्णतः बंद करण्यात आला आहे. road closure warnings flood

  • Chandrapur ZP president reserved for SC woman | 1962 पासूनचा इतिहास बदलणार, चंद्रपूर ZP अध्यक्षपदासाठी अनुसूचित जाती महिला वर्गाला आरक्षण

    Chandrapur ZP president reserved for SC woman

    Chandrapur ZP president reserved for SC woman : चंद्रपूर – वर्ष २०२२ नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाना मुहूर्त मिळाला नाही, नुकतेच सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागल्यावर निवडणुकीची लगबग सुरु झाली. आज १२ सप्टेंबर रोजी राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. first SC woman chairperson for Zilla Parishad Chandrapur history

    पंजाब राज्यात अस्मानी संकट, चंद्रपुरातील मुस्लिम बांधवांचा मदतीचा हात

    चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला म्हणून घोषित करण्यात आले, चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्षपदावर वर्ष १९६२ पासून आतापर्यंत २४ अध्यक्ष विराजमान झाले आहे.

    वर्ष १९६२ ते वर्ष २०२२ पर्यंत हे होते अध्यक्ष

    • अब्दुल शफी कार्यकाळ – १२ ऑगस्ट १९६२ ते ११ ऑगस्ट १९६७, पुन्हा वर्ष १९६७ ते १३ सप्टेंबर १९७२
    • वामनराव गड्डमवार कार्यकाळ – १४ सप्टेंबर १९७२ ते २० जून १९७९
    • देवराव मुसळे कार्यकाळ – २१ जून १९७९ ते १० एप्रिल १९८०
    • सुभाष धोटे – ११ एप्रिल १९८० ते २४ एप्रिल १९८०
    • राजाभाऊ जोगी – २५ एप्रिल १९८० ते ११ ऑगस्ट १९८०
    • सुभाष धोटे – १२ ऑगस्ट १९८० ते १ सप्टेंबर १९८०
    • अरुण तुम्पल्लीवार २ सप्टेंबर १९८० ते २५ ऑगस्ट १९८२
    • प्रशासकीय कालावधी – २६ ऑगस्ट १९८२ ते २१ मार्च १९८२
    • उमाजी बगडे – २१ मार्च १९९२ ते १ डिसेम्बर १९९२
    • चंद्रकांत गोहोकार – २ डिसेम्बर १९९२ ते ३० डिसेम्बर १९९२
    • प्रकाश पाटील मारकवार – ३१ डिसेम्बर १९९२ ते २१ डिसेम्बर १९९५
    • दिगंबर गुरकुडे – २६ डिसेम्बर १९९५ ते ८ फेब्रुवारी १९९६
    • प्रकाश पाटील मारकवार – ९ फेब्रुवारी १९९६ ते २० मार्च १९९७
    • एम.के. परचाके – २१ मार्च १९९७ ते २० मार्च १९९८
    • पी.एस.गावंडे – २१ मार्च १९९८ ते २१ मार्च १९९९
    • सुधाकर कुंदोजवार – २१ मार्च १९९९ ते २० मार्च २००२
    • डॉ. निळकंठराव काळे – २१ मार्च २००२ ते १८ मार्च २००५
    • वैशाली वासाडे – १९ मार्च २००५ ते २० मार्च २००७
    • संतोषसिंह रावत – २१ मार्च २००७ ते २५ नोव्हेंबर २००९
    • सतीश वारजुरकर – २६ नोव्हेम्बर २००९ ते २० मार्च २०१२
    • संतोष कुमरे – २१ मार्च २०१२ ते २० सप्टेंबर २०१४
    • संध्याताई गुरनुले – २१ सप्टेंबर २०१४ ते २० मार्च २०१७
    • देवराव भोंगळे – २१ मार्च २०१७ ते ४ जानेवारी २०२०
    • संध्याताई गुरनुले – ५ जानेवारी २०२० ते २० मार्च २०२२

    वर्ष १९६२ ते वर्ष २०२२ या कालावधीत चंद्रपूर जिल्हा परिषदेत फक्त तीन वेळा महिला अध्यक्षपदी विराजमान होत्या, आता प्रथमचं अनुसूचित जाती महिला वर्गाला आरक्षण मिळाल्याने राजकीय हालचाली सुरु झाल्या आहे. सध्याचं पक्षीय वातावरण बघता जिल्हा परिषद निवडणुकीत चांगलीच चुरस बघायला मिळणार आहे. Chandrapur district council president reservation SC woman announced

  • Mukhyamantri samruddha Panchayat raj abhiyan । मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात चंद्रपूर जिल्हा अव्वल असावा – पालकमंत्री डॉ. उईके

    Mukhyamantri samruddha Panchayat raj abhiyan

    Mukhyamantri samruddha Panchayat raj abhiyan : चंद्रपूर, दि. 12 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. 100 दिवसांचे आणि 100 गुणांचे हे उत्कृष्ट अभियान असून यात प्रत्येक ग्रामपंचायत सक्षम होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी या अभियानात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून आपला जिल्हा राज्यात अव्वल राहील, यासाठी सुक्ष्म नियेाजन करावे, अशा सुचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिल्या.

    आमदार मुनगंटीवार यांनी अपघातग्रस्तांचे वाचविले प्राण

    जिल्हा परिषदेच्या वतीने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सर्वश्री सुधाकर अडबाले, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके (पंचायत), नुतन सावंत (सामान्य), शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेश पाताळे, अश्विनी केळकर (प्राथ्.) मान्याची वाडी गावचे (ता.पाटण, जि. सातारा) सरपंच रविंद्र माने आदी उपस्थित होते. Chief Minister Samruddha Panchayatraj campaign success

    यावेळी पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, या अभियानामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायती अधिक सक्षम, पारदर्शक, जलसमृध्द, उपजिविका विकास, सामाजिक न्याय आदी बाबतीत स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल. लोकसहभागातून ज्या ग्रामपंचायती उत्कृष्ट कार्य करतील त्यांना जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर सन्मानित करण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ सेवा पंधरवड्यापासून म्हणजे 17 सप्टेंबर पासून सुरू होईल. संपूर्ण राज्यात 100 दिवस म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात चंद्रपूर जिल्हा राज्यात प्रथम राहील, असा विश्वास पालकमंत्री डॉ. उईके यांनी व्यक्त केला. 100 day 100 score gram panchayat development planning

    ग्रामपंचायतींनी ध्येय ठेवून काम करावे : सरपंच रविंद्र माने

    मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान हे गावाचा चेहरा मोहरा बदलविणारे अभियान आहे. केवळ उत्पनावर ग्रामपंचायत चालत नसते तर वेगवेगळ्या अभियानात सहभागी होऊन पुरस्काराच्या माध्यमातून आपण आपली ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकतो. पुरस्काराच्या रकमेतून गावाचा व गावातील प्रत्येक कुटुंबाचा विकास करणे शक्य आहे. मात्र त्यासाठी ग्रामपचांयतींनी ध्येय ठेवून काम करावे, असा सल्ला केंद्र आणि राज्य शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत मान्याची वाडी (ता. पाटण, जि. सातारा) चे सरपंच रविंद्र माने यांनी उपस्थित सरपंचांना दिला. एकदिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते.

    पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अतिशय उत्कृष्ट अभियान आहे. आतापर्यंत राबविलेल्या सर्व अभियानाचा यात सारांश आहे. प्रत्येक अभियान हे वर्षभरासाठी असते मात्र हे अभियान केवळ 100 दिवसांचे व 100 गुणांचे आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने 8 मुद्यांवरील 50 प्रश्नांवर काम करायचे आहे. पुढील 100 दिवस प्रत्येक सरपंचांनी गावातच राहून हे अभियान यशस्वी करावे तसेच जिल्ह्यासाठी पुरस्कार प्राप्त करावे, असे आवाहनही त्यांनी केले. CM Panchayatraj scheme

    यावेळी आमदार सुधाकर अडबाले, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच आदी उपस्थित होते.

    आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार वाटप : 

    सन 2024-25 चे आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार रंजना मुळे,  (ग्रा. पं. वढा, चंद्रपूर), विजय पचारे (ग्रा.पं. मुधोली / पळसगाव सी./वडाळा तु. भद्रावती), सचिन घारगे, (ग्रा.प.मेसा/ वनोजा,  वरोरा), आनंद गलबले, (ग्रा.पं. चेकजाटेबार, चिमुर), ऋषीश्वर औरासे,  (ग्रा.पं.  वांद्रा/ आक्सापुर, ब्रम्हपूरी) यांच्यासह 15 जणांना देण्यात आला.

    सन 2023-24 च्या पुरस्कारप्राप्त अधिका-यांमध्ये अनिता दुधे (ग्रा.पं.  धानोरा, चंद्रपूर), जयश्री चंदनखेडे (ग्रा.पं. चालबर्डी/ चपराळा, भद्रावती), विद्या गिलबीले, (ग्रा.पं. आंनदवन, वरोरा), भगवंत नरड,(ग्रा.पं. बोथली (वहा) चिमुर), मंगेश गोवर्धन, (ग्रा.पं बेलगांव जाणी/ तोरगांव खु.,  ब्रम्हपूरी) यांच्यासह 15 अधिकारी तर सन 2022-23 चे आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार प्रकाश पवार ,(ग्रा.पं. पिंपळखुट, चंद्रपूर), राजेन्द्र अवघड, (ग्रा.पं. घोनाड,  भद्रावती), विद्या गिलबीले, (ग्रा.पं. आनंदवन, वरोरा), विठ्ठल नखाते, (ग्रा.पं. कळमगांव, चिमुर),  होमदेव तलांडे , (ग्रा.पं. बरडकिन्ही, ब्रम्हपूरी) यांना देण्यात आला.                

  • Muslim community helping flood relief Punjab । घुग्घुस मधील मुस्लिम बांधवांकडून 2.20 लाखांची मदत पंजाब पूरग्रस्तांसाठी

    Muslim community helping flood relief Punjab

    Muslim community helping flood relief Punjab : चंद्रपूर – वर्ष २०२५ मध्ये देशातील पंजाब या राज्यात आस्मानी संकट कोसळले, पंजाब राज्यात आलेल्या पुराने लाखो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले, अनेकांचा मृत्यू झाला, या संकटातून सदर नागरिक बाहेर निघावे यासाठी देशपातळीवरून मदत होत असून चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस मधून मुस्लिम बांधवानी सामाजिकतेचे भान राखत एक कर्तव्य म्हणून छोटीशी मदत पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी गोळा केली आहे.

    पुराचा धोका, चंद्रपूर भोयेगाव मार्ग बंद

    घूग्घूस येथील मुस्लिम बांधवान कडून पंजाबमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी 2 लाख 20 हजार 786 रुपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे. समस्त मुस्लिम बांधवाच्या सहकार्याने 2,20,786 रुपयांचा निधी गुरुद्वारा सिंह सभा घुग्गुस यथे जमा करणात आला आहे.

    सामाजिक कार्य

    यात प्रामुख्याने आजम खान, मोमीन शेख, अनिस सिद्दीकी, इर्शाद कुरेशी, बाबू सिद्दीक़ी,अज़हर शेख ,सानू सिद्दीकी ,मुस्लिम खान, इस्लाम अहमद, इकरार भाई, जुबेर शेख, फैझान खान आणी समस्त मुस्लिम बांधव यांनी देणगी गोळा करण्यासाठी हातभार लावला.

  • Irai dam gates opening alert villages । मुसळधार पावसामुळे इरई धरणाचे दरवाजे उघडले, नदीकाठावरील गावांना इशारा

    Irai dam gates opening alert villages

    Irai dam gates opening alert villages : चंद्रपूर ११ सप्टेंबर २०२५ – काही दिवसांची विश्रांती घेतल्यावर चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमन झाल्याने जिल्ह्यातील काही भाग हा अस्तव्यस्त झाला आहे. मागील ३ दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरवात झाली. त्यामुळे वर्धा व इरई नदीचा जलस्तर वाढल्याने काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

    चंद्रपुरातील या शिक्षकांचा होणार सन्मान

    ग्रामीण व शहरी भागात पावसाचा जोर वाढल्याने वर्धा नदीचा जलस्तर वाढल्याने चंद्रपूर-भोयेगाव मार्ग पूर्णतः बंद झाला, यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ११ सप्टेंबर रोजी दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने सदर मार्ग हा बंदच आहे. Chandrapur weather alert for rising river water levels

    ३ दिवसांपासून येत असलेल्या पावसाने इरई धरणाच्या पातळीत वाढ झाल्याने गुरुवारी ११ सप्टेंबर रोजी सकाळी इरई धरणाचे तीन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले होते. दुपारी पुन्हा दोन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा काही दरवाजे उघडण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने सूचित करण्यात आले आहे.

    नागरिकांनो सतर्क रहा

    इरई धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने नदी काठावरील पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

  • Chandrapur teacher awards 2025 । चंद्रपूर जिल्ह्यातील या शिक्षकांचा होणार सन्मान

    Chandrapur teacher awards 2025

    Chandrapur teacher awards 2025 : चंद्रपूर, दि. 11 सप्टेंबर २०२४ : जिल्हा परिषद ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने 12 सप्टेंबर रोजी 11 वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह येथे मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळा, आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार वितरण सोहळा, संपूर्णता अभियान सन्मान पुरस्कार वितरण सोहळा आणि जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण  सोहळा होणार आहे.

    चंद्रपुरात १५० किलो प्लॅस्टिक जप्त

    जिल्ह्यातील 15 पंचायत समितीमधून निवड समितीद्वारे जिल्हा शिक्षक पुरस्काराकरिता शिक्षकांची निवड  झाली आहे.

    प्राथमिक विभागात

    • 1. प्रदीप टिपले, जि. प. उ. प्रा. आदर्श शाळा, चिंचाळा (ता. चंद्रपुर), 2. सविता झाडे जि. प. प्रा. शाळा गोंदेडा (चिमूर), 3. कुणाल दुधे जि. प. प्रा. शाळा बेलगाव,(देश) (वरोरा), 4. राजकुमार मुन जि. प. उ. प्रा. शाळा चिखली, (बु.) (जिवती), 5 गीता  साखरे जि. प. उ. प्रा. शाळा फिस्कूटी, (मूल), 6 कामिना  आत्राम  जि. प. उ. प्रा. शाळा बेलगाव, (सावली), 7. प्रशांत साखलवार  जि. प. उ. प्रा. शाळा आंबेधानोरा, (पोंभुर्णा), 8. अजय  मुसळे जि. प. उ. प्रा. शाळा चिरादेवी, (भद्रावती), 9. सुनिल पोटे जि. प. प्रा. शाळा कळमना, (बल्लारपुर), 10. गोवर्धन टिकले जि. प. उ. प्रा. शाळा जुगनाळा, (ब्रह्मपुरी), 11. अर्चना मरघडे जि. प. उ. प्रा. शाळा, पळसगाव ,(खुर्द) (नागभीड), 12. सुभाष  पावडे जि. प. प्रा. शाळा, परसोडी, (गोंडपिपरी), 13. धनराज  दुर्योधन जि. प. उ. प्रा. शाळा, भुरकुंडा (बु.) (राजुरा), 14. मंगला  उरकुडे  जि. प. उ. प्रा. शाळा, कढोली (खुर्द) (कोरपना), 15.अ. अजीज अ. मुजीब शेख  जि. प. उ. प्रा. शाळा, नाचनभट्टी, (सिंदेवाही).

    अपंग/विशेष/कला शिक्षक पुरस्कार राहुल वैद्य जि. प. उ. प्रा. आदर्श शाळा, चिंचाळा, (चंद्रपुर) यांना तर :- माध्यमिक विभाग पुरस्कार राजू हिवंज  जि. प. हायस्कूल तथा कनिष्ठ महा. भद्रावती यांना जाहीर करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अश्विनी केळकर यांनी कळविले आहे. district teacher award primary school Chandrapur

  • Jan Suraksha Bill black law । ‘काळा कायदा’ तात्काळ रद्द करा!, महाविकास आघाडीचा हल्लाबोल

    Jan Suraksha Bill black law

    Jan Suraksha Bill black law : चंद्रपूर, १० सप्टेंबर २०२५ – महाराष्ट्र सरकारने पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या जनसुरक्षा विधेयक २०२४ विरुद्ध आज चंद्रपूरच्या गांधी चौकात महाविकास आघाडीने तीव्र आंदोलन केले. हे विधेयक लोकशाहीच्या मूल्यांना मुठमाती देणारे असून, हुकूमशाही प्रवृत्तीला खतपाणी घालणारे असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. विरोधकांनी या कायद्याला ‘काळा कायदा’ असे ठामपणे घोषित केले आहे.

    या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश रामू तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे सुरेश पचारे, कम्युनिस्ट पक्षाचे अरुण भेलके, तसेच महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    घुग्गुस मध्ये जनसुरक्षा विधेयक विरोधात महाविकास आघाडी चे निदर्शने

    जनतेचा आवाज दडपणार

    आंदोलनात सहभागी सर्व मान्यवरांनी एकमुखाने सांगितले की, “राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा कायदा घाला घालतो. आधीच अस्तित्वात असलेल्या कायद्यांद्वारे सुरक्षा व्यवस्थापन शक्य आहे; त्यामुळे नवीन कायद्याची गरजच नव्हती. हा कायदा नक्षलवाद्यांच्या नावाखाली जनतेचा आवाज दडपण्यासाठी वापरण्यात येणार आहे. Maha Vikas Aghadi protests Jan Suraksha Bill

    सरकारविरोधात बोलणाऱ्यांना, पत्रकारांना तुरुंगात टाकण्यासाठी या कायद्याचा गैरवापर होईल. जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. जर हा कायदा मागे घेतला गेला नाही, तर राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. 

  • Rajura Voter Fraud Case । राजुरा बोगस मतदार नोंदणी, माहितीसाठी प्रशासनाची ना!, कारवाई नाही तर न्यायालयीन लढा

    Rajura Voter Fraud Case

    Rajura Voter Fraud Case : मुंबई – ९ सप्टेंबर २०२५ – भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने हातात हात घालून मतचोरी केल्याचे एकाएका मतदार संघातील घोटाळे काँग्रेस पक्ष उघड करत आहे. राहुल गांधी यांनी महादेवपुरा मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश करून भाजपा व आयोगाच्या भ्रष्ट युती पुढे आणली आहे. महादेवपुराप्रमाणे मतचोरीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही झाला असून याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे पण ११ महिने झाले तरी अद्याप यावर कोणतीच कारवाई होत नाही. या मतचोरी प्रकरणी पुढील एका महिन्यात कारवाई करावी अन्यथा काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद मागेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे. Rajura voter fraud exposed

    चंद्रपूर जिल्हा कांग्रेस प्रभारीपदी आमदार अभिजित वंजारी यांची निवड

    गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मतचोरीची माहिती देताना काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले की, लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या ५ महिन्यांच्या कालावधीत राजुरा मतदारसंघात ५५ हजार मतदारांची वाढ करण्यात आली. राजुरा मतदारसंघात १ ऑक्टोबर २०२४ ते १५ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ११ हजार ६६७ ऑनलाईन बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली होती.

    तक्रार दाखल मात्र कारवाई नाही

    यासंदर्भात काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी रितसर तक्रार दाखल केल्यानंतर ६८५३ मते डिलिट करण्यात आली. याप्रकरणी एफआयआर ही दाखल करण्यात आला आहे. पण पुढे काहीच कारवाई केलेली नाही. ही ऑनलाईन बोगस मतदार नोंदणी करण्यात आली त्याचे IP address, email id आणि मोबाईल नंबर ची माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे पण आजपर्यंत ती देण्यात आलेली नाही. ही माहिती दिल्यास चोर कोण, हे उघड होईल म्हणून पोलीस व प्रशासन माहिती देत नाही. bogus voter registration Rajura

    अतुल लोंढे पुढे म्हणाले की, राजुरा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवाराकडे ६१ लाख रुपये व निवडणूक साहित्य सापडले. निवडणूक आयोगाच्या FST पथकाने ही कारवाई केली आहे, गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. पण आजपर्यंत यावरही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. मतचोरी प्रकरणी काँग्रेस उमेदवार सुभाष धोटे यांनी निवडणूक आयोग, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्याकडे वारंवार निवेदन देऊनही कारवाई संदर्भात काहीच हालचाल केली जात नाही. मतचोरी प्रकरणी काँग्रेस जनतेच्या न्यायालयात लढा देत आहेच पण न्यायालयातही लढा देऊ, असे अतुल लोंढे म्हणाले.

    चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राजुरा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष धोटे यांनीही यावेळी मतचोरीप्रकरणाची सविस्तर माहिती दिली.