Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Chandrapur OBC leaders statements । ओबीसी आरक्षणावरील भीती दूर करा; सचिन राजुरकरांच्या निवेदनातून मागण्या

    Chandrapur OBC leaders statements

    Chandrapur OBC leaders statements : चंद्रपुर २१ सप्टेंबर २०२५ – महाराष्ट्र शासनाने 2 सप्टेंबर 2025 रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे व हैद्राबाद गॅझेटियर लागू केल्यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागला नाही असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस वारंवार सांगत असले तरी ओबीसी नेते व शासनातील मंत्री आरक्षणाला मोठा धक्का लागल्याचे सांगत आहे तर तिकडे मनोज जरांगे पाटील गुलाल उधळून मराठा जिंकल्याचे सांगत आहे यामुळे ओबीसी समाज द्विधा मनस्थिती मध्ये असून पुरता घाबरलेला आहे. Maharashtra OBC reservation 2025

    आदिवासी शेतमजुरांची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पालकमंत्री उईके

    खरे तर हैद्राबाद गॅझेटियर मध्ये सामूहिक नोंदी आहे, वैयक्तिक नोंदी नाही आणि कुणबी प्रमाणपत्र वैयक्तिक नोंदी शिवाय देता येत नाही असे असताना सुद्धा 17 सप्टेंबर पासून मराठवाड्‌यातील हिंगोली, धाराशिव व बीड येथे हैद्राबाद गॅझेटियर वरून कुणबी प्रमाणपत्र वाटल्याचे वेगवेगळे चॅनलवरून सांगितल्या जात आहे त्यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    ओबीसी समाजात पसरले भीतीचे वातावरण

    या संदर्भातील खालील मागण्याकडे आपण जातीने लक्ष देऊन त्या अमलात आणाव्यात या करिता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तर्फे महसुल मंत्री बावनकुळे यांना निवेदना द्वारे खालील मागण्या करण्यात आल्या आहे.

    • १) कोणत्याही परिस्थितीत मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये तसेच मराठ्‌यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये.
      २) हाताने खाडाखोड करून चुकीच्या व खोट्या पुराव्याच्या आधारे कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये.
      ३) केवळ प्रतिज्ञापत्राच्या आधारे कुणबी दाखले देण्यात येऊ नये.
      ४) खोट्या नोंदी तपासण्यासाठी मंत्र्यांची समिती नेमण्यात यावी. ५) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी मधून निवडणूक लढवितांना केवळ जात पडताळणी प्रस्ताव, जात पडताळणी विभागाकडे सादर केल्याच्या पावतीवर निवडणूक लढण्यासाठी परवानगी न देता सोबत कुणबी जातीचा उल्लेख असलेले महसूल कागदपत्र जोडणे बंधनकारक करण्यात यावे.
      ६) 2 सप्टेंबर 2025 च्या शासन निर्णयामधील शेवटच्या पेरेग्राफ मध्ये गावातील, कुळातील व नातेसंबंधातील व्यक्ती म्हणजे कोण ? याचा अर्थ स्पष्ट करावा. असे ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजुरकर यांनी ही मागणी केली आहे. Maratha quota Maharashtra GR

    निवेदन देतांना ओबिसी योद्धे रवींद्र टोंगे, मनिषा बोबडे, महासचिव महिला महासंघ, किसान महासंघाचे रणजीत डवरे, धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष श्रीधर मालेकर , सचिव अतुल देऊळकर त्यांचे सर्व संचालक मंडळ सोबत, ओबीसी विध्यार्थी महासंघाचे दिपक पिंपळशेंडे, सुमित देवाळकर, प्रशांत पिंपळशेंडे, उदय टोंगे,सूरज देवाळकर, उमेश श्रीरसागर, चंद्रशेखर देवाळकर, हर्षल टोंगे उपस्थित होते.

  • Chandrapur tribal loan fraud । चंद्रपुरात 50 लाखांचा घोटाळा : कोलाम आदिवासी शेतकऱ्यांच्या नावाने बनावट कर्ज उचल

    Chandrapur tribal loan fraud

    Chandrapur tribal loan fraud : चंद्रपूर, दिनांक 21 : जिवती तालुक्यातील कोलाम आदिवासी शेतमजुरांच्या नावे बनावट सातबारा तयार करून पीक कर्जाची उचल व फसवणूक करणा-यांना कदापी सोडणार नाही. याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहे, असे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले. 

    चंद्रपूर भाजपमध्ये गटबाजी, मनपा निवडणुकीत डोकेदुखी वाढणार

    चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना, जिवती, गडचांदूर या तालुक्यातील 32 किंवा त्यापेक्षा जास्त आदिवासी कोलाम शेतमजुरांच्या अज्ञानाचा फायदा घेत तसेच त्यांना सरकारी अनुदानाचे आमिष दाखवून आरोपी विनायक राठोड याने या शेतमजुरांकडून त्यांचे पासपोर्ट फोटो व आधारकार्ड गोळा केले. सरकारकडून अनुदान मिळण्याची नवीन योजना आली आहे. मी तुम्हाला योजनेचे पैसे मिळवुन देतो, असे सांगुन कोलाम आदिवासी शेतमजुरांच्या अज्ञानाचा व भोळेपणाचा फायदा घेतला.

    लाखोंच्या वर कर्जाची उचल

    गोळा केलेल्या पासपोर्ट व आधारकार्डच्या आधारे बनावट सातबारा तयार केला. तसेच  पीक कर्जासाठी आवश्यक असणारे इतर कागदपत्रेसुध्दा तयार केली. गडचांदूर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत आदिवासी शेतमजुरांना बोलावून राठोड याने त्यांची स्वाक्षरी आणि अंगठे फाईलवर घेतले. या आधारावर राठोड याने प्रत्येक शेतमजुरांच्या नावे किमान 1 लक्ष 60 हजार ते 1 लक्ष 70 हजार रुपयांपर्यंत पीक कर्ज मंजूर करून घेतले. crop loan fraud

    मारोतीगुडा (ता. जिवती) येथील बालाजी सुरेश सिडाम यांना बँकेत बोलावून पीक कर्जाचे 1 लक्ष 60 हजार रुपये काढण्यास सांगून त्यापैकी केवळ 10 हजार रुपये सिडाम यांना दिले व उर्वरीत रक्कम स्वत:जवळ ठेवून घेतली. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे कर्मचारी थकीत कर्जवसुलीकरीता सिडाम यांच्याकडे आले असता, आपण अशा प्रकारचे कोणतेही कर्ज घेतले नाही, असे त्यांनी सांगितले. बँकेत चौकशी केल्यावर त्यांना समजले की जुलै 2021 मध्ये विनायक राठोड याने आधारकार्ड आणि इतर कागदपत्रांच्या आधारावर बनावट सातबारा तयार केला आणि पीक कर्जाची रक्कम लंपास केली. विशेष म्हणजे आरोपी विनायक राठोड याने आजुबाजुच्या गावातील 32 किंवा त्यापेक्षा जास्त आदिवासी कोलाम शेतमजुरांच्या नावे बनावट सातबारा करून अंदाचे 50 ते 55 लक्ष रुपयांची फसवणूक केली आहे. fake satbara forgery Chandrapur   

    याप्रकरणी बालाजी सिडाम यांच्या तक्रारीवरून, विनायक राठोड विरुध्द 15 सप्टेंबर 2025 रोजी गडचांदूर पोलिस ठाण्यात कलम 420, 465, 468 आणि 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात आदिवासींच्या नावे बोगस कागदपत्रे तयार करणा-यांविरुध्द कठोर कारवाई करावी, असे निर्देश  पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

  • Chanda revenue mitra chatbot launch Chandrapur । चंद्रपूरमध्ये ‘चांदा महसूल मित्र’ चॅटबोटचे उद्घाटन – सर्व सेवा आता ऑनलाईन

    Chanda revenue mitra chatbot launch Chandrapur

    Chanda revenue mitra chatbot launch Chandrapur : चंद्रपूर दिनांक 20 : राज्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत महसूल विभागातर्फे सेवा पंधरवाडा  राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शेतरस्त्यांचे मॅपिंग करणे, त्यांचे अतिक्रमण काढणे, राष्ट्रीय महामार्ग प्रमाणे रस्त्यांना क्रमांक देणे, सर्वांना घरे आदी  बाबी करण्यात येणार आहे. महसूल खाात्याबद्दल नागरिकांमध्ये आदराची भावना आहे. त्याला तडा जाऊ देऊ नका. लोकाभिमुख प्रशासनासाठी अतिशय गांभिर्याने काम करा, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी यंत्रणेला दिले

    चंद्रपुरात सोमवारपासून भाऊ चा दांडिया .

    जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागांतर्गत, भुमी अभिलेख, मुद्रांक नोंदणी आदी बाबींचा आढावा घेतांना ते बोलत होते. बैठकीला सर्वश्री आमदार किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, संतोष थिटे (चिमूर), निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार आदी बैठकीला उपस्थित होते. farm road numbering scheme Chandrapur

    शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते मोकळे होणे गरजेचे

     सेवा पंधरवडा अंतर्गत पाणंद रस्त्यांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत पाणंद रस्त्यांना क्रमांक देण्यात येणार आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाप्रमाणेच शेतकऱ्यांच्या पाणंद रस्त्यांना क्रमांक देणारे महाराष्ट्र्र हे देशातील पहिले राज्य आहे. पुढील काळात या रस्त्यांवर अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी. राज्याचा जीडीपी वाढवायचा असेल तर शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते मोकळे होणे गरजेचे आहे. शेतात पाणी, वीज, रस्ता असेल तर शेती करण्याकडे ओढा वाढेल. revenue department service fortnight Chandrapur

    महसूल अधिकाऱ्यांनी गावात जाऊन लोकांच्या समस्या सोडवाव्यात. शासनाची भूमिका घेऊन प्रशासन आपल्या गावात आले, असे गावकऱ्यांना म्हटले पाहिजे. सामान्य आणि गरीब जनतेला चांगल्या सुविधा देणे हे आपले कर्तव्य आहे. गतिमान, पारदर्शक प्रशासन राबविण्यासाठी यंत्रणेने सजग असावे. शासकीय कामासाठी लोकांना कोणताही त्रास होता कामा नये. घरकुल पासून कोणीही वंचित राहू नये, एकही शेतकरी पांदण रस्त्याविना राहू नये, याची काळजी घ्यावी. जनतेला भेटण्याचे फलक कार्यालयात लावा. लोकांशी संपर्कात रहा. शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करा.

    पुढे महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, महानगरपालिका, नगरपालिका हद्दीमध्ये ज्या झोपडपट्टी आहेत, त्यांची जमीन सुद्धा नियमित करण्यात येईल. सरकारी जागेवरील सर्व घरांचा सर्वे करण्यात येणार आहे. चंद्रपूर शहरातील 55 झोपडपट्टीधारकांना कायदेशीर घरे देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. पुढील पाच वर्षात देशातील सर्वोत्कृष्ट महसूल खाते महाराष्ट्राचे असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. .आपल्या चांगल्या कामाचे सादरीकरण करा. महसूल विभागाच्या संकेतस्थळावर हे सादरीकरण अपलोड करा. Chanda revenue mitra chatbot launch Chandrapur

    कृत्रिम वाळू धोरणानुसार शासकीय बांधकामात 50 टक्के वाळू अनिवार्य करण्यात आली आहे. कृत्रिम वाळू प्रकल्पासाठी  जास्तीत जास्त प्रयत्न करा. प्रत्येक जिल्ह्यात किमान 50 प्रकल्प लागले पाहिजे.  महसुली अर्धन्यायीक प्रकरणे तीन महिन्यात निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. शेतकऱ्यांनी त्वरीत फार्मर आयडी करून घ्यावी. विशेष सहाय्य योजनेचा सर्व निधी डीबीटीवर देण्यात येतो. प्रत्येक घरी जाऊन 100 टक्के डीबीटी करण्यासाठी या पंधरवड्यात यंत्रणेने घरोघरी जावे, अशा सुचनाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी विभागाचे सादरीकरण केले.

    chanda mitra

    चांदा महसूल मित्र चॅटबोटचे उद्घाटन :

     महसूल विभागाच्या विविध सेवा ऑनलाईन पध्दतीने नागरिकांना माहित व्हाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या चांदा महसूल मित्र चॅटबोटचे (फोन नं. 9284061588) उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

  • overburden royalty waiver Chandrapur । चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय लवकरच?, खासदार प्रतिभा धानोरकरांचा पुढाकार

    overburden royalty waiver Chandrapur

    overburden royalty waiver Chandrapur : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे असलेले पांदण रस्ते दुरुस्त करण्यासाठी, कोळसा खाणींमधून निघणाऱ्या ‘ओव्हर बर्डन’ (माती आणि दगड) वरील रॉयल्टी माफ करून ते विनामूल्य उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या भेटीत त्यांनी या संदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर  बावनकुळे यांना एक पत्र दिले. या गंभीर प्रश्नावर लवकरच सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन महसूलमंत्र्यांनी दिले आहे.

    लाईव्ह संगीतावर होणार दांडियाची धूम, सोमवारपासून भाऊंचा दांडिया

    तर शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होणार

    जिल्ह्यात कोळसा खाणींमुळे मोठ्या प्रमाणात ‘ओव्हर बर्डन’चे ढिगारे तयार झाले आहेत. यामुळे नद्यांचा नैसर्गिक प्रवाह बदलला असून, पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. याच ‘ओव्हर बर्डन’चा उपयोग खराब झालेल्या पांदण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतो, असे खासदार धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल.

    पत्रात, पांदण रस्त्यांच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘ओव्हर बर्डन’ वरील सर्व रॉयल्टी माफ करून ते स्थानिक प्रशासनाद्वारे शेतकऱ्यांना किंवा ग्रामपंचायतींना विनामूल्य उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. महसूलमंत्र्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हा निर्णय झाल्यास, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि जिल्ह्याची एक मोठी पर्यावरणीय समस्या सोडवण्यासही मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

  • Bhaucha Dandiya Chandrapur । भाऊचा दांडिया : लाइव्ह संगीतावर दांडियाची धमाल – तरुणाईसाठी खास आकर्षण

    Bhaucha Dandiya Chandrapur

    Bhaucha Dandiya Chandrapur : चंद्रपूर २० सप्टेंबर २०२५ : शहराच्या सांस्कृतिक जीवनात उत्साहाची नवी लहर आणण्यासाठी चंद्रपूरमध्ये सोमवार, २२ सप्टेंबरपासून खासदार सांस्कृतिक महोत्सवांतर्गत ‘भाऊचा दांडिया’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विशेष उपस्थितीत हा अकरा दिवसांचा रंगारंग कार्यक्रम चांदा क्लब मैदानावर होणार आहे.

    दिव्यांगांना व्यवसायासाठी लाखोंचे अनुदान

    दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रेरणेतून या दांडियाची सुरुवात झाली होती, आणि ती परंपरा आजही अखंड सुरू आहे. या महोत्सवात गरबा-दांडियाचा मनमुराद आनंद लुटण्यासोबतच स्पर्धकांना दोन दुचाकी आणि रोख बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

    पहिल्यांदाच लाइव्ह संगीतावर दांडियाचे आयोजन

    नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित हा महोत्सव केवळ मनोरंजनाचे साधन नसून, तो समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याचा एक मंच आहे. विशेषतः तरुणाईचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी पहिल्यांदाच लाइव्ह संगीतावर दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिक्षण, क्रीडा, कला आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. garba dandiya competition prizes Chandrapur

    हा महोत्सव २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत चालणार आहे. ‘भाऊचा दांडिया’मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत, ज्यात दोन विजेत्यांना दुचाकी आणि इतर रोख बक्षिसे दिली जातील. चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने या महोत्सवात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि बाळू धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

  • financial aid for poor patients Chandrapur । आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना मोठा आधार – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून लाखोंची मदत

    financial aid for poor patients Chandrapur

    financial aid for poor patients Chandrapur : चंद्रपूर, दि. 19 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारासाठी दिलासा मिळत असून, मागील आठ महिन्यांच्या कालावधीत एकूण 64 रुग्णांना 57 लाख 48 हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.

    चंद्रपूर नागपूर महामार्गावर कार ने घेतला पेट

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या देखरेखीखाली कार्यरत असलेल्या जिल्हा कक्षामार्फत ही मदत वितरित करण्यात आली. जानेवारी ते जुलै या कालावधीत 54 रुग्णांना 47 लाख 48 हजार, ऑगस्टमध्ये 7 रुग्णांना 6 लाख, तर 15 सप्टेंबरपर्यंत 3 रुग्णांना 4 लाख रुपये इतकी मदत मंजूर करण्यात आली आहे.

    सदर निधीतून हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस व अस्थिमज्जा प्रत्यारोपण, कॅन्सर उपचार, कॉकलियर इम्प्लांट, अस्थिबंधन, गुडघा व खुब्याचे प्रत्यारोपण, नवजात शिशु व बालकांच्या शस्त्रक्रिया तसेच अपघातग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी सहाय्य दिले जाते. निधी प्राप्त न झाल्यास रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपचाराची पर्यायी माहिती दिली जाते. government support for transplant surgeries

    वार्षिक उत्पन्न 1 लाख 60 हजार रुपयांपेक्षा कमी

    निधीसाठी पात्रता निकषांनुसार अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. वार्षिक उत्पन्न 1 लाख 60 हजार रुपयांपेक्षा कमी असावे व उपचार सरकारी/धर्मादाय/मान्यताप्राप्त रुग्णालयात झालेले असावेत. आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव संबंधित रुग्णालयाकडून सादर होऊन जिल्हा कक्षामार्फत मंत्रालयाकडे पाठविला जातो. समिती परीक्षणानंतर निधी मंजूर केला जातो.

    संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक 1800 123 2211, संकेतस्थळ cmrf.maharashtra.gov.in तसेच प्रशासकीय इमारत, पहिला मजला, चंद्रपूर आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कक्षाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कविश्वरी कुंभलकर यांनी केले आहे.

  • Rajabhau Khobragade centenary Chandrapur । बाबासाहेबांचे मानसपुत्र राजाभाऊ खोब्रागडे शताब्दी वर्ष : पुतळा परिसर नूतनीकरणाने उजळला

    Rajabhau Khobragade centenary Chandrapur

    Rajabhau Khobragade centenary Chandrapur : चंद्रपूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची १०० वी जयंती २५ सप्टेंबर रोजी साजरी होत आहे. या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून चंद्रपूर शहरातील त्यांच्या पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण आणि नूतनीकरण केले जात आहे. सदर पुतळ्याचे सुशोभीकरण अश्विनी खोब्रागडे यांच्या पुढाकारामुळे होत आहे.

    महाकाली महोत्सवाची तयारी, आमदार जोरगेवार यांनी केले मंडप पूजन

    बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या सून, अश्विनी खोब्रागडे यांच्या मागणीनुसार आणि स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या आमदार निधीतून हे काम सुरू आहे. अश्विनी खोब्रागडे यांनी निवडणुकीपूर्वी, किशोर जोरगेवार अपक्ष आमदार असताना, त्यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केला होता आणि त्यांनी तो तात्काळ मंजूर केला होता. यामुळे पुतळा परिसरात वाढीव जागेसह संरक्षक भिंतीचे (वॉल कंपाऊंड) बांधकाम सुरू झाले आहे.

    अश्विनी खोब्रागडे यांचा पुढाकार

    यापूर्वी पुतळा परिसरातील भिंत तिरपी असल्याने कार्यक्रमांसाठी जागा अपुरी पडत होती. ही समस्या लक्षात घेऊन अश्विनी खोब्रागडे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना निवेदन दिले होते. आमदारांनी तात्काळ ही मागणी मान्य करून महानगरपालिका आयुक्तांना निर्देश दिले, आणि भिंतीचे बांधकाम सुरू झाले. Barrister Khobragade 100th birth anniversary

    या कामाबद्दल अश्विनी खोब्रागडे आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे विचारमंच मित्र परिवाराने आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले आहेत. तसेच, आमदार जोरगेवार यांचे पत्र प्राप्त झाल्यानंतर अश्विनी खोब्रागडे, निखिलेश खोब्रागडे, मुन्ना खोब्रागडे आणि गुफरानभाई यांनी महानगरपालिका आयुक्त व उपायुक्त यांची भेट घेऊन त्यांचेही आभार मानले.

    या कामामुळे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी समारंभाची तयारी अधिक जोमाने सुरू झाली असून, परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

  • Leopard attack child death Gadbori । गडबोरीत बिबट्याचा हल्ला : आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

    Leopard attack child death Gadbori

    Leopard attack child death Gadbori : सिंदेवाही, १९ सप्टेंबर – सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात गुरुवारी सायंकाळी एका आठ वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

    प्रशिक बाबन मानकर (८) असे मृत मुलाचे नाव आहे. तो गावातील मस्कार्‍या गणपतीच्या सामुदायिक भोजनासाठी गेला होता. रात्री साडेसातच्या सुमारास जेवण झाल्यावर तो आपल्या काकासोबत घराकडे, किल्ला रोडवरून परत येत असताना बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घेतली.

    शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

    ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याने मुलाला जबड्यात पकडले आणि जवळच्या टेकडीकडे ओढत नेले. जमावामध्ये प्रचंड घबराट पसरली. लोकांनी बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रशिकला वाचवता आले नाही. त्याचा मृतदेह आज (१९ सप्टेंबर) गडबोरी टेकडीजवळ सापडला. घटना घडल्यावर गडबोरी गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती, मागील २ दिवसापासून बिबट परिसरात दिसत होता, याबाबत गावकऱ्यांनी वनविभागाला माहितीही दिली होती मात्र त्यांनी यावर हतबलता दाखवली. गडबोरी गावातील नागरिक वनविभागवर चांगलेच संतापले होते. Sindewahi leopard attack news

    आतापर्यंत ३२ नागरिकांचा मृत्यू

    या घटनेमुळे संपूर्ण गावावर दु:खाचे सावट पसरले आहे. दरम्यान, वन विभाग आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३२ नागरिकांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून यामध्ये २९ वाघ, २ बिबट व एक अस्वलाच्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

    संतापलेल्या ग्रामस्थांनी बिबट्याला तात्काळ पकडण्याची आणि रहिवाशांच्या सुरक्षिततेची खात्री देण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

  • Mata Mahakali Festival 2025 । आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते महाकाली महोत्सव मंडप पूजन

    Mata Mahakali Festival 2025

    Mata Mahakali Festival 2025 : चंद्रपूर १८ सप्टेंबर २०२५ – २७ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या श्री माता महाकाली महोत्सवानिमित्त आज श्री माता महाकाली महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते मंडप पूजन करण्यात आले. माता महाकाली पटांगणात आयोजित या महोत्सवात पाच दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

    दिल्लीमध्ये राहुल गांधींची पत्रकार परिषद आणि खळबळ चंद्रपुरात

    या मंडप पूजन कार्यक्रमाला श्री माता महाकाली महोत्सवाचे उपाध्यक्ष सुनील महाकाले, सचिव अजय जैस्वाल, सहसचिव बलराम डोडानी, विश्वस्त मिलिंद गंपावार, संजय बुरघाटे, अजय वैरागडे, राजू शास्त्रकार, भारतीय जनता पार्टी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, दशरथ ठाकूर, तुषार सोम, सविता दंडारे, प्रदीप किरमे, अरुण तिखे, वंदना तिखे, दुर्गा वैरागडे, विमल काटकर, नीलिमा वणकर, चंद्रशेखर देशमुख, दिगंबर चिमुरकर, कल्पना शिंदे, ताहीर हुसैन, प्रवीण कुलटे आदीची उपस्थित होते.

    ३० सप्टेंबरला नगर प्रदक्षिणा व पालखी

    दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्रात श्री माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला २७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून ३० सप्टेंबरला नगर प्रदक्षिणा व पालखी काढण्यात येणार आहे. महोत्सवाची तयारी उत्साहात सुरू असून आज मंदिर परिसरात विधीवतरीत्या मंडप पूजन करण्यात आले. Mahakali festival schedule and programs

    शारदीय नवरात्राच्या पावन पर्वावर आयोजित श्री माता महाकाली महोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा संगम ठरणार आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह पाहणी करून येथील व्यवस्थेचा आढावा घेतला. दरवर्षी प्रशासनाकडून महोत्सवाला मोठे सहकार्य मिळत असते. यंदाही महोत्सव समितीसोबत समन्वय साधून उत्तम नियोजन करावे, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या. Chandrapur religious events 2025

    यावेळी प्रभारी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, अति. आयुक्त चंदन पाटील, अति. पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, शहर पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार, शहर अभियंता रवींद्र हजारे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. अमोल शेळके, उपअभियंता (यांत्रिकी) रवींद्र कळंबे, उपअभियंता (विद्युत विभाग) प्रगती भुरे, सहायक अभियंता (स्थापत्य विभाग) आशिष भारती, सहायक अभियंता (स्थापत्य विभाग) वैष्णवी रिठे, सहायक अभियंता (स्थापत्य विभाग) अतुल भसारकर आदी अधिकारी उपस्थित होते.

  • Rahul Gandhi press conference evidence । राहुल गांधी यांची पत्रकार परिषद दिल्लीत आणि गोंधळ चंद्रपूर जिल्ह्यात

    Rahul Gandhi press conference evidence

    Rahul Gandhi press conference evidence : चंद्रपूर – देशाचे लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी आधी मतचोरी व आता मतदारांची नावे वगळणे व नव्याने नावे वाढविण्यात आल्याबाबत पत्रकार परिषद घेत पुरावे सादर केले. गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर चंद्रपूर जिल्हा प्रशासनात अनेक हालचाली सुरु झाल्या व थेट आमच्यामुळेचं बोगस मतदार नोंदणी टळली असे स्पष्टीकरण राजुरा मतदार नोंदणी अधिकारी रविंद्र माने यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे. Rahul Gandhi press conference evidence

    चंद्रपूर मनपाला मिळाला नवा आयुक्त

    राजुरा विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ६ हजार ८६१ बोगस मतदार नोंदणी करण्यात आली होती. विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर छायाचित्र मतदार यादीस 06 ऑगस्ट 2024 रोजी प्रारूप आणि दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी अंतीम प्रसिध्दी देण्यात आली. दिनांक 01 सप्टेंबर 2024 पासून सर्व विधानसभा मतदार संघात निरंतर मतदार नोंदणी संबंधाने अर्ज निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात आली होती. निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 70 – राजूरा विधानसभा मतदार संघामध्ये 01 ते 17 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये नव्याने मतदार नोंदणी संदर्भात 7592 अर्ज प्राप्त झाले. fake voters Rajura constituency

    सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, राजूरा यांनी सदर अर्जाची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत चौकशी केली. चौकशीअंती एकूण 6861 अर्जामधील अर्जदार, संबंधित यादीवरील पत्यावर नसणे /अर्जदार अस्तित्वात नसणे अर्जदारांचे फोटो व पुरावे नसणे इत्यादी कारणावरून उपरोक्त अर्ज, रितसर नामंजूर करण्यासाठी परवानगी मिळण्याकरिता जिल्हा कार्यालयास 17 ऑक्टोबर 2025 रोजी प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर सदर वाढीव बोगस मतदारांची नावे वगळण्यात आली होती.

    fake voters rajura

    याबाबत प्रशासनाने १९ ऑक्टोबर रोजी राजुरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपी विरोधात लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 व विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते मात्र तक्रारीला आज जवळपास १ वर्षे होत आहे, परंतु या प्रकरणी अजूनही तपास सुरु आहे. सदर प्रकरणाचा तपास झाला नाहीतर कांग्रेस पक्ष न्यायालयात जात दाद मागणार अशी माहिती माजी आमदार सुभाष धोटे यांनी दिली आहे, वर्ष २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे देवराव भोंगळे यांनी कांग्रेसचे सुभाष धोटे यांचा ३ हजार ५४ मतांनी पराभव केला होता. Rajura election controversy

    विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने १८ सप्टेंबर ला अधिकृत निवेदन जारी केले त्यामध्ये प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बोगस मतदार नोंदणी टळली अशी माहिती देण्यात आली.

    फोन कट

    यावर जिल्हाधिकारी विनय गौडा यांचेशी संपर्क साधत या प्रकरणी माहिती विचारली असता ते म्हणाले कि याबाबत आम्ही रीतसर प्रेस रिलीज केलेली आहे, सध्या पोलीस विभाग याचा रीतसर तपास करीत आहे, प्रश्नाने याबाबत पोलीस तक्रार केली होती त्याच काय झालं? ते म्हणाले कि आम्ही पोलीस विभागाला रिमाइंडर केलं आहे, तपासाला जवळपास वर्षे पूर्ण होत आहे मात्र अद्याप काही झालं नाही यावर जिल्हाधिकारी यांनी बोलणे टाळले आणि फोन कट केला. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी यावर काही प्रतिसाद दिला नाही. bogus voter registration

    आयपी एड्रेस बाबत संभ्रम

    राजुरा विधानसभा मतदार संघात झालेली बोगस मतदार नोंदणी मध्ये अनेकांची नावे हि बाहेर राज्यातील होती. आम्ही तहसीलदार यांना तक्रार दिली त्यानंतर बोगस मतदारांची नावे वगळण्यात आली मात्र त्यानंतर सुद्धा राजुरा विधानसभेत ११ हजार नावे बोगस होती ती प्रशासनाने वगळली नाही, हा प्रकार राजुरा विधानसभेत घडला तसा राज्यातील विविध मतदारसंघात घडला असेल हे नक्की आहे. याबाबत आम्ही पोलीस प्रशासनाशी बोललो कि हि नोंदणी कुणी केली तर ते म्हणतात कि आम्हाला निवडणूक आयोगाने आयपी ऍड्रेस दिला नसल्याने आम्ही काही करू शकत नाही अशी प्रतिक्रिया माजी आमदार सुभाष धोटे यांनी दिली आहे.

    असा प्रकार घडला नाही

    राजुरा विधानसभेचे आमदार यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हणाले कि मतदार यादीत काही मते वाढविण्याचा प्रकार घडला होता त्यावेळी आमच्या पक्षातील अध्यक्षाने तक्रार केली तेव्हा प्रशासनाने सदर नोंदी यादीमधून काढून टाकली होती मात्र त्यावेळी मतदारसंघात नवीन मते नोंदणी व वगळण्याचा कसलाही प्रकार झाला नाही, यावर निवडणूक आयोग आपली अधिकृत माहिती देणारच.