Rajabhau Khobragade centenary Chandrapur । बाबासाहेबांचे मानसपुत्र राजाभाऊ खोब्रागडे शताब्दी वर्ष : पुतळा परिसर नूतनीकरणाने उजळला

Rajabhau Khobragade centenary Chandrapur

Rajabhau Khobragade centenary Chandrapur : चंद्रपूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची १०० वी जयंती २५ सप्टेंबर रोजी साजरी होत आहे. या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून चंद्रपूर शहरातील त्यांच्या पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण आणि नूतनीकरण केले जात आहे. सदर पुतळ्याचे सुशोभीकरण अश्विनी खोब्रागडे यांच्या पुढाकारामुळे होत आहे.

महाकाली महोत्सवाची तयारी, आमदार जोरगेवार यांनी केले मंडप पूजन

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या सून, अश्विनी खोब्रागडे यांच्या मागणीनुसार आणि स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या आमदार निधीतून हे काम सुरू आहे. अश्विनी खोब्रागडे यांनी निवडणुकीपूर्वी, किशोर जोरगेवार अपक्ष आमदार असताना, त्यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केला होता आणि त्यांनी तो तात्काळ मंजूर केला होता. यामुळे पुतळा परिसरात वाढीव जागेसह संरक्षक भिंतीचे (वॉल कंपाऊंड) बांधकाम सुरू झाले आहे.

अश्विनी खोब्रागडे यांचा पुढाकार

यापूर्वी पुतळा परिसरातील भिंत तिरपी असल्याने कार्यक्रमांसाठी जागा अपुरी पडत होती. ही समस्या लक्षात घेऊन अश्विनी खोब्रागडे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना निवेदन दिले होते. आमदारांनी तात्काळ ही मागणी मान्य करून महानगरपालिका आयुक्तांना निर्देश दिले, आणि भिंतीचे बांधकाम सुरू झाले. Barrister Khobragade 100th birth anniversary

या कामाबद्दल अश्विनी खोब्रागडे आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे विचारमंच मित्र परिवाराने आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले आहेत. तसेच, आमदार जोरगेवार यांचे पत्र प्राप्त झाल्यानंतर अश्विनी खोब्रागडे, निखिलेश खोब्रागडे, मुन्ना खोब्रागडे आणि गुफरानभाई यांनी महानगरपालिका आयुक्त व उपायुक्त यांची भेट घेऊन त्यांचेही आभार मानले.

या कामामुळे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी समारंभाची तयारी अधिक जोमाने सुरू झाली असून, परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *