Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Chandrapur Weather Update । मुसळधार पावसाचा तडाखा: चंद्रपूर जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

    Chandrapur Weather Update

    Chandrapur Weather Update :चंद्रपूर २५ सप्टेंबर २०२५: जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इरई धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे एकूण पाच दरवाजे उघडण्यात आले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

    चंद्रपुरात भूकंप? नेमकं काय घडलं?

    इरई धरणाची स्थिती आणि नदीकाठच्या गावांना सूचना

    सध्या इरई धरणाची पाणी पातळी २०७.३७५ मीटर पर्यंत पोहोचली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्यासाठी आधी तीन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले होते. आता, आणखी दोन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. Irai Dam Water Release Chandrapur

    प्रशासनाने नदीकाठच्या गावांना विशेषतः सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी नदीपात्र ओलांडू नये आणि जनावरांना नदीकाठी सोडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व संबंधितांनी ही माहिती त्यांच्या संपर्कातील सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    मुसळधार पाऊस: शाळा-महाविद्यालये बंद

    जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज (२५ सप्टेंबर २०२५) जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. ज्या शाळा सकाळी सुरू झाल्या आहेत, त्यांना सकाळी ११ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सूचना सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी (BDO) आणि शिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. Chandrapur Schools Holiday Rain

    नागभीड तालुक्यात दुर्देवी घटना: एकाचा मृत्यू

    नागभीड तालुक्यातून एका दुर्देवी घटनेची माहिती समोर आली आहे. नागभीड तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी असलेले धर्मा देवाजी शेंडे (वय अंदाजे ६५) यांचा त्यांच्या घराशेजारील विहिरीवर असलेल्या मोटरपंपाला विजेचा धक्का (करंट) लागून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी घडली. धर्मा शेंडे यांच्या नावे गोविंदपूर येथे शेती आहे. तहसीलदार नागभीड यांनी या घटनेची माहिती दिली आहे.

  • Immediately declare a wet drought | चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकट: मुख्यमंत्र्यांकडे तातडीची मागणी

    Immediately declare a wet drought

    Immediately declare a wet drought : चंद्रपूर – २३ सप्टेंबर २०२५ – महायुती सरकारने राज्यातील अनेक जिल्ह्यांना ओला दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले चंद्रपूर जिल्हा या घोषणेतून वगळला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

    भद्रावती केंद्रीय विद्यालयाची इमारत जीर्ण, खासदार धानोरकर यांची तात्काळ कारवाई

    जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतजमिनी वाहून गेल्या, घरांची व शेतीमालाची हानी झाली. शेतकरी कर्जबाजारीपणात सापडला असून आर्थिक संकट गडद झाले आहे.

    या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश दादाजी चोखारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून तातडीने चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

    निवेदनातील प्रमुख मागण्या :

    • चंद्रपूर जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा.
    • बाधित शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत, कर्जमाफी व तातडीने दिलासा द्यावा.
    • शेतीपयोगी साधनसामग्री व घरांचे नुकसान भरून काढण्यासाठी विशेष पॅकेज द्यावे.

    निवेदनाची प्रत कृषीमंत्री यांनाही पाठविण्यात आली आहे.
    शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी चोखारे यांनी केली आहे.

  • All India primary teachers TET mandatory । टीईटी अनिवार्य निर्णयामुळे शिक्षकांची चिंता; राज्य सरकारने हस्तक्षेप करावा

    All India primary teachers TET mandatory

    All India primary teachers TET mandatory : चंद्रपूर २३ सप्टेंबर २०२५ – सर्वोच्च न्यायालयाने शाळांमध्ये शिकवणाया शिक्षकांना १ सप्टेंबर २०२५ पासून टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. या निर्णयामुळे लाखो शिक्षकांमध्ये निराशा आणि गोंधळ निर्माण झाला आहे. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सतीश बावणे यांनी पत्रकार परिषदेत या समस्येवर उपाय म्हणून राज्य सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

    त्यांनी स्पष्ट केले की १ सप्टेंबर २०२५ रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयामुळे शाळांमधील सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करने अनिवार्य केले आहे. राज्य नियमांनुसार सेवा देणाया शिक्षकांसाठी, त्यांचा सेवा कालावधी आणि मागील पात्रता काहीही असो, टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. पाच वर्षांपेक्षा कमी सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अशक्य आहे. TET exam compulsory for in-service teachers

    उभ्या वाहनाला चारचाकी वाहनांची धडक, तरुणी ठार २ जखमी

    जर पाच वर्षांपेक्षा कमी सेवा असलेला शिक्षक पदोन्नतीची मागणी करत असेल तर त्यांना टीईटी उत्तीर्ण झाल्याशिवाय पात्र मानले जाणार नाही. आरटीई कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी नियुक्त झालेल्या आणि निवृत्तीपूर्वी पाच वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असलेल्या सेवारत शिक्षकांना निर्धारित वेळेत टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक असेल.

    तर शिक्षणाच्या गुणवत्तेवरही विपरीत परिणाम

    सेवारत शिक्षकांसाठी आणि त्यांच्या पदोन्नतीसाठी टीईटी अनिवार्य करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेने तीव्र दुःख आणि नाराजी व्यक्त केली. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना याला असंवैधानिक आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांच्या विरुद्ध मानते. यामुळे केवळ सेवारत शिक्षकांचे मनोधैर्य खचू शकते असे नाही तर शिक्षण पद्धती आणि शिक्षणाच्या गुणवत्तेवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. Primary teachers association TET government intervention

    एनसीटीई आणि न्यायालयांनी सुरुवातीपासूनच टीईटीच्या मुद्द्याचा गैरसमज केला आहे. खरं तर जेव्हा मुलांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा, २००९ (आरटीई कायदा) लागू करण्यात आला तेव्हा देशभरात अनेक अपात्र पैरा शिक्षक कार्यरत होते. शिक्षण हक्क कायदा, २००९ च्या कलम २3 अंतर्गत अशा शिक्षकांची भरती करणे आवश्यक असल्याने पात्रता चाचणी सुरू करण्यात आली आणि ती अनिवार्य करण्यात आली.

    शाळा बंद होण्याची आणि विलीनीकरण होण्याची शक्यता

    राज्यात आधीच पात्र शिक्षकांची तीव्र कमतरता आहे. परिणामी, सार्वजनिक शिक्षण हा संविधानानुसार मूलभूत अधिकार असूनही, लोकांच्या नजरेत त्याची विश्वासार्हता कमी होत आहे. यामुळे शाळा बंद होण्याची आणि विलीनीकरण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे देशातील सार्वजनिक शिक्षणाची स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

    दुर्दैवाने, सरकार आणि न्यायालये या निर्णयांमुळे शिक्षकांच्या आणि सरकारी अनुदानित शाळांच्या मनोबलावर नकारात्मक परिणाम होतो या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करत आहेत. वरील कारणांमुळे, भारतातील शालेय शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेने राज्य सरकारला या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

  • MBBS student suicide note | टोकाचं पाऊल, मला व्यवसाय करायचा होता पण..

    MBBS student suicide note

    MBBS student suicide note : नवरगाव, चंद्रपूर (२३ सप्टेंबर २०२५): शिक्षणासाठी साडेपाच वर्षे आणि लाखो रुपये खर्च करण्याऐवजी मला व्यवसाय करायचा होता, अशी सुसाइड नोट लिहून अनुराग अनिल बोरकर (२०) या ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे नवरगाव येथे घडली. विशेष म्हणजे, अनुराग त्याच दिवशी सकाळी शिक्षणासाठी गोरखपूरला निघणार होता.

    चंद्रपुरात चक्काजाम आंदोलन, बच्चू कडू यांची उपस्थिती

    अभ्यासू विद्यार्थ्याची सुसाइड नोट

    अनुराग हा नवरगाव येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल बोरकर यांचा मुलगा असून, तो अभ्यासात अत्यंत हुशार होता. त्याने नीट युजी २०२५ परीक्षेत ओबीसी कॅटेगरीमधून १४७५ वा रँक मिळवून ‘एमबीबीएस’मध्ये प्रवेश मिळवला होता. शिक्षणासाठी गोरखपूरला जाण्याची त्याची सर्व तयारी झाली होती.

    मंगळवारी सकाळी त्याची आई त्याला उठवण्यासाठी गेली असता, तो खोलीत नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता, त्याच्या खिशात एक सुसाइड नोट सापडली.

    त्या सुसाइड नोटमध्ये त्याने लिहिले होते, “साडेपाच वर्षे वेळ आणि ‘एमबीबीएस’साठी लागणारा पैसा खर्च करण्यापेक्षा मला व्यवसाय करायचा होता, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे.“

    परिसरात शोककळा

    पोलिसांनी शवविच्छेदनानंतर अनुरागवर नवरगाव येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

  • Swachhata Hi Seva 2025 campaign । स्वच्छ भारताच्या दिशेने मोठे पाऊल : चंद्रपूरमध्ये 25 सप्टेंबरला महाश्रमदान

    Swachhata Hi Seva 2025 campaign

    Swachhata Hi Seva 2025 campaign : चंद्रपूर (प्रतिनिधी) दिनांक 23/9/2025 – “17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2025” या कालावधीत “स्वच्छता ही सेवा2025” अंतर्गत गाव स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत असून, गावात शाश्वत स्वच्छता नांदावी याकरिता गाव श्रमदानातून स्वच्छ करणे गरजेचे आहे .यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक गावात 25 सप्टेंबर रोजी “एक दिवस, एक घंटा, एक सोबत” या उपक्रमा अंतर्गत महाश्रमदान मोहीम राबविण्यात यावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंह यांनी केले आहे.

    “एक दिवस, एक घंटा ,एक सोबत”

    “एक दिवस, एक घंटा ,एक सोबत” या उपक्रमांतर्गत 25 सप्टेंबर 2025 रोजी प्रत्येक गावात महाश्रमदान मोहीम आयोजित करायची असून, या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी, कार्यालय, संस्थात्मक इमारती, व्यावसायिक व बाजारपेठे ,सार्वजनिक वाहतूक केंद्रे, प्रमुख रस्ते ,महामार्ग, पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानके, धार्मिक अध्यात्मिक स्थळे ,प्राणी संग्रहालय, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य ,ऐतिहासिक वास्तू ,वारसा स्थळे, नदी किनारे ,घाट, नाले इत्यादी ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदान मोहिमेतून स्वच्छ करायचे आहे.

    चंद्रपूर जिल्हा परिषदेची भन्नाट योजना कमवा व शिका

    या मोहिमेत एनसीसी , एनएसएस तथा शासकीय कर्मचारी यांनी सुद्धा स्वतःहून सहभाग नोंदवायचा आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गाव एकाच दिवशी स्वच्छ केले जाणार आहे. या उपक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन गाव स्तरावरील महाश्रमदान मोहीम यशस्वी करावी व आपल्या गावातील सार्वजनिक परिसर स्वच्छ करावा.असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह व प्रकल्प संचालक जल जीवन मिशन मच्छिंद्रनाथ धस यांनी केले आहे.

  • Namo Shetkari Mahasamman Nidhi scheme । सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे कंत्राटी संगणक चालकांचे मानधन मार्गी

    Namo Shetkari Mahasamman Nidhi scheme

    Namo Shetkari Mahasamman Nidhi scheme : चंद्रपूर (२३ सप्टेंबर २०२५) : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांच्या पुढाकारामुळे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातील कंत्राटी संगणक चालकांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी 15.35 कोटी इतका निधी वितरीत करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून रखडलेले मानधन मिळणार आहे. यासाठी कंत्राटी संगणक चालकांनी आ. श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

    चंद्रपुरात महिला बचत गटाच्या मासिक बैठकीत सिमेंट रेलिंग कोसळली, ३ महिला जखमी

    कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातील कंत्राटी कर्मचारी कंत्राटी तत्वावर काम करतात. यामध्ये पुरुषांसोबतच महिलांचाही समावेश आहे. हे सर्व कर्मचारी प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना नोकरीत सुरक्षितता नाही. शिवाय मानधनही कमी आहे आणि ते वेळेवर मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित वेळेत मानधन मिळावे, यासाठी आ. श्री. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला.

    आ. मुनगंटीवार यांनी यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. कंत्राटी कर्मचारी वर्षानुवर्षांपासून शासकीय कामकाज करत आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीत असुरक्षितता तर असतेच पण मानधनही कमी असते. इतर शासकीय सोयी सुविधादेखील मिळत नाहीत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना अनेकवेळा पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लोटुनही अनुदान न आल्याचे कारण पुढे करत मानधनापासून वंचित ठेवले जाते. दर महिन्याच्या एक तारखेला मानधन मिळावे, अशी कंत्राटी कर्मचाऱ्यांची दीर्घकालीन मागणी आहे. हे सर्व कर्मचारी निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांतील आहेत. नियमित मानधन न मिळाल्याने त्यांना सामाजिक संघर्षाला नेहमीच तोंड द्यावे लागते,’ याकडे आ. श्री. मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले होते. Government contract workers payment issue

    आमदार मुनगंटीवार यांच्या पुढाकारानंतर अखेर कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने एक शासन निर्णय जारी केला असून, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी 15.35 कोटी इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. Maharashtra contract employees salary issue

    कर्मचाऱ्यांनी मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार

    पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी योजनेअंतर्गत जिवती येथे कार्यरत असलेले कंत्राटी संगणक चालक के. एम.कोटनाके यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त करत आ. सुधीर मनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. ‘गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून आमचे मानधन मिळण्याबाबत अडचणी होत्या. ही अडचण सोडवण्या संदर्भात आम्ही आ. मुनगंटीवार यांच्याकडे जाऊन समस्या सांगितली. त्यांनी तातडीने या विषयाचा पाठपुरावा केला आणि आमची मोठी अडचण दूर केली,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

  • Chandrapur Zilla Parishad Earn and Learn Program । चंद्रपूरमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘कमवा व शिका’ योजनेतून बीबीए व इंटर्नशिप एकत्र

    Chandrapur Zilla Parishad Earn and Learn Program

    Chandrapur Zilla Parishad Earn and Learn Program : चंद्रपूर, दि. 22 : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नु) यांच्या बी.बी.ए. (सर्व्हिस मॅनेजमेंट) या दूरस्थ पदवी अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील निवडक गुणवंत आणि होतकरु मागासवर्गीय (SC / ST /VJ/NT) विद्यार्थ्यांकरीता सन 2022-23 पासून ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या विविध विभागामध्ये पदवी शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळत आहे. यंदाच्या वर्षापासून सुद्धा काही होतकरू मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तीन वर्षासाठी ‘डिजिटल आणि एआय सुलभक’ म्हणून प्रशासकीय काम करण्याची संधी मिळणार आहे.

    महाकाली मंदिरात घटस्थापना, आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात

    इग्नुच्या या कार्यानुभवावर आधारित तीन वर्षांची इंटर्नशिप गरजू पात्र विद्यार्थ्यांना देऊन, त्यांना केलेल्या कामाच्या बदल्यात विद्यावेतन देणारी ‘कमवा व शिका’ ही नाविन्यपूर्ण योजना यंदाच्या वित्तीय वर्षापासून पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्हा परिषदेतर्फे राबविली जाणार आहे. सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी केलेल्या कामापोटी प्रत्येक महिन्यासाठी पहिल्या वर्षी 8 हजार रुपये, दुसऱ्या वर्षी 9 हजार रुपये आणि शेवटच्या वर्षासाठी 10 हजार रुपये इतके विद्यावेतन अदा केले जाईल. सदर योजनेमध्ये सलग तीन वर्षे समाधानकारकरित्या केलेले काम आणि तिसऱ्या वर्षाच्या शेवटी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची बीबीए ही पदवी आणि तीन वर्षे काम केल्याचे चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या वतीने कार्यानुभवाचे प्रमाणपत्र, असा विद्यार्थ्यांचा दुहेरी फायदा होणार आहे. SC ST students earn while learn scheme Chandrapur

    योजनेचा लाभ घ्या

    चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागातील 18 ते 30 वयोगटातील नुकत्याच बारावी पास झालेल्या, संगणक आणि विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) टूल्स चा प्रभावी वापर करता येणाऱ्या गुणवंत व होतकरू मागासवर्गीय (अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती /विमुक्त जाती / भटक्या जमाती) विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी केले आहे.

    सदर योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 26 सप्टेंबर 2025 अशी असून त्यासाठी https://tinyurl.com/ondzpibba2025 ही ऑनलाईन लिंक चंद्रपूर जिल्हा परिषद यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्याचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

  • Chandrapur Babupeth Women Meeting News । महिला बचत गट बैठक दरम्यान रेलिंग कोसळले, ३ महिला जखमी

    Chandrapur Babupeth Women Meeting News

    Chandrapur Babupeth Women Meeting News : चंद्रपूर २२ सप्टेंबर २०२५ – चंद्रपुर शहरातील विविध भागात सध्या महिला बचत गटांची संख्या जोमाने वाढत आहे, महिला आत्मनिर्भर व्हाव्या असा बचत गटाचा उद्देश्य असतो मात्र काही वेळा गटाच्या माध्यमातून राजकारणाचा डाव साधण्याचे काम होत असते, चंद्रपूर शहरातील बाबुपेठ भागातील महिला कांग्रेस अध्यक्ष चंदा वैरागडे यांच्या निवासस्थानी २१ सप्टेंबर रोजी बचत गटाची मिटिंग आयोजित केल्या गेली होती, सदर मिटिंग ची वेळ हि रात्री ८.३० ते ९.३० च्या दरम्यान वैरागडे यांच्या घरावरील छतावर सदर मिटिंग आयोजित केली मात्र काही वेळातच सिमेंट रेलिंग कोसळल्याने ३ महिला खाली कोसळल्या. यामुळे एकच खळबळ उडाली होती. Chandrapur Women SHG Political Discussion

    घरबसल्या पैसे कमवायचे आहे? तर वाचा हि बातमी

    महिला कांग्रेस अध्यक्ष व बचत गटाच्या अध्यक्षा चंदा वैरागडे ह्या मागील काही वर्षांपासून बचत गट चालवितात, त्या निमित्ताने त्या महिलांच्या मिटिंग आयोजित करीत असतात. २१ सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी त्यांनी महिलांची बैठक आयोजित केली होती, या बैठकीत १५० ते २०० महिला उपस्थित झाल्या होत्या. वैरागडे यांच्या छतावर जागा होत नसल्याने त्यांनी शेजारी असलेले वैरागडे यांच्या घरावरील छताचा वापर महिलांना बसण्यासाठी केला होता, त्या छतावर सिमेंटच्या रेलिंग होत्या, काही वेळातच ती रेलिंग कोसळली आणि त्यासोबत ३ महिलाही खाली पडल्या. Roof Collapse Incident

    अचानक घडलेल्या या घटनेमुळे बैठकीत उपस्थित महिला घाबरल्या, आणि तात्काळ त्या महिलांना रुग्णालयात पाठविण्याचे प्रयत्न करण्यात आले, महिलांना वेळेवर उपचार मिळाल्याने त्या बचावल्या मात्र इतक्या रात्री बैठक आयोजित केल्याने उपस्थित महिला संतापल्या होत्या, परिसरातील महिलानुसार जर बैठकीत उपस्थित झाले नाही तर गटातून काढून टाकणार त्यामुळे त्या महिला बैठकीत आल्या होत्या.

    विशेष बाब म्हणजे सध्या या बचत गटाच्या बैठकीत कांग्रेस पदाधिकारी यांची उपस्थिती लाभत असल्याने आता हा महिलांचा बचत गट कि राजकीय गट या चर्चाना उधाण आले आहे, आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हि बैठक आयोजित करण्यात आली होती का? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

    महिलांचे रक्षण करणे माजी जबाबदारी – चंदा वैरागडे

    आमच्या बचत गटाची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती, पावसाचे दिवस असल्याने पायऱ्या ह्या सैल झाल्या होत्या, त्यामुळे महिलांचा पाय घसरला, त्यांना किरकोळ जखमा झाल्या, मात्र या घटनेमुळे माझी बदनामी करण्याचे षडयंत्र काहींनी चालविले, आम्ही चांगलं काम करीत आहो हे कुणाला पाहवत नाही आहे. आम्ही इतक्या वर्षात महिलांचे मोठे संघटन उभे केले त्यामुळे हि विरोधकांना खुपणारी बाब आहे. सर्व महिला सुरक्षित असून त्यांची रुग्णालयातून सुट्टी करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत आम्ही जागरूक असून त्यांचे रक्षण करणे माझी जबाबदारी आहे.

  • Chandrapur Mahakali Temple Navratri 2025 । अश्विन नवरात्रीची सुरुवात, महाकाली मंदिरात हजारो भाविकांची गर्दी

    Chandrapur Mahakali Temple Navratri 2025

    Chandrapur Mahakali Temple Navratri 2025 : चंद्रपूर – आजपासून अश्विन नवरात्रीची सुरुवात झाली, चंद्रपुरातील ऐतिहासिक महाकाली मंदिरात घटस्थापना करण्यात आली, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी पहाटेपासूनच मंदिर परिसरात उपस्थिती दर्शविली होती. २२ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजताच मंदिर परिसरातील दालन उघडण्यात आले, गाभाऱ्यात जाऊन थेट दर्शन मिळणार यासाठी हजारो भाविक सकाळपासून रांगेत लागले होते.

    मनसे तालुकाध्यक्षावर शिस्तभंगाची कारवाई करीत पदमुक्त

     ऐतिहासिक काळातील गोंडराजा विरशाहची पत्नी राणी हिराईने सुमारे इ.स.१७०४ पुर्वी असलेल्या लहान मंदिराच्या मुळ बांधणीच्या चार खांबावर, पुर्वेस व पश्चिमेस जोडले. खांब तयार केल्यावर सध्याचे कमानयुक्त असणारे मंदिराचे बांधकाम करण्यात आले. राजा विरशाहाच्या पराक्रमाचे प्रतीक म्हणून राणी हिराईने चैत्रपोर्णिमेला महाकाली देवी उत्सवाची सुरवात केली. नांदेड येथील देवी उपासक राजाबाई देवकरिनस याने १८८० साली चैत्रपोर्णिमेला भक्तासोबत १५ दिवस उत्सवरूपी उपासना केली.  Ashwin Navratri 2025 Chandrapur Updates

    नवरात्रीमधील नियोजन काय?

    महाकाली मातेच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक, जलाभिषेक केला जातो. मातेवर पारंपरिक दागदागिने चढवले जातात. यानंतर घटस्थापना केली जाते. नंतर दररोज देवीचा दुग्धाभिषेक, जलाभिषेक केला जातो. दुपारी नैवेद्य दाखवला जातो. तर, रात्री आरती केली जाते. अष्टमीला हवन केला जातो. हे अनुष्ठान नवमीपर्यंत सुरू असते. 

    यावेळी मंदिर व्यवस्थापनेतील मुख्य पुजारी यांनी माहिती दिली कि आजपासून सुरु झालेल्या अश्विन नवरात्रीमध्ये मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अनेक सोयीसुविधा केल्या आहे. दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना कसलीही समस्या उदभवणार नाही याची आम्ही काळजी घेत असल्याचे सांगितले. सोबतच नवरात्री दरम्यान आंध्रप्रदेश, मराठवाडा व इतर राज्यातून भाविक मोठ्या संख्येतून दर्शनासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

  • Rahul Balamwar MNS Chandrapur । मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवारांचा मोठा निर्णय! ब्रह्मपुरी तालुकाध्यक्ष सूरज शेंडे पदमुक्त

    Rahul Balamwar MNS Chandrapur

    Rahul Balamwar MNS Chandrapur : चंद्रपूर/ब्रह्मपुरी – चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या नेतृत्वात संघटना वाढीचे काम जोमात सुरु आहे, मात्र संघटन वाढीमध्ये अडथळा व पक्षाच्या हितास बाधा आणणारे विरुद्ध बालमवार यांनी शिस्तभंगाची कारवाई करीत पदावरून हकालपट्टी केली आहे.

    चंद्रपूर भाजपात गटबाजीचे ग्रहण

    मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्याकडे वरोरा, चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राची जबाबदारी आहे, या भागात मनसेचे काम व संघटन वाढी चांगली सुरु आहे, ब्रह्मपुरी तालुकाध्यक्ष सूरज शेंडे यांनी पक्षविरोधी काम केल्याने बालमवार यांनी शेंडे याना पदमुक्त केले आहे. तसे पत्र आज २१ नोव्हेम्बर रोजी बालमवार यांच्याकडून जारी करण्यात आले आहे.

    तात्काळ पदमुक्त

    पक्षविरोधी काम करण्याच्या कृतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमी आक्रमक असतात, जर कुणी पक्षाच्या हिताला बाधा पोहचेल असे काम केल्यास त्याला सरळ घरचा रस्ता दाखवा असे आदेश आहे. त्या आदेशाला अनुसरून मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी ब्रह्मपुरी तालुकाध्यक्ष सूरज शेंडे यांना तात्काळ पदमुक्त केले आहे. पक्षासोबत प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मनसे नेहमी न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र विरोधात काम केल्याने तात्काळ कारवाईचा बडगा शेंडे यांच्यावर पक्षाच्या वतीने बालमवार यांनी उगारला आहे.