illegal liquor transport from Madhya Pradesh । 🚨 “Madhya Pradesh मधून चंद्रपुरात आली विदेशी दारूची अवैध खेप!

illegal liquor transport from Madhya Pradesh

illegal liquor transport from Madhya Pradesh : चंद्रपूर – १५ ऑगस्ट प्रत्येक नागरिक स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करीत होता मात्र याचा फायदा काही गुन्हेगारी वृत्ती अवैध कामे करण्यास तयार होती मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या चपळतेने त्यांचा गुन्हा हाणून पाडला. स्थानिक गुन्हे शाखेने मध्यप्रदेश राज्यातून येणाऱ्या विदेशी दारू असा एकूण ५ लाख ११ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पकडला. यावेळी दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे.

बाबुपेठमध्ये मेफेड्रोन पावडर ची वाहतूक, दोघांना अटक

मध्यप्रदेश या राज्यातून अवैध दारूची वाहतूक चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मध्ये होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती, माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध ठिकाणी नाकेबंदी केली, मौजा बाम्हणी रोडवर नाकाबंदी सुरु असताना चारचाकी वाहन क्रमांक mh०३ AW ५८७७ येताना दिसले, त्या वाहनाला थांबविता त्याची झडती घेतली असता त्यामध्ये १५ पेट्या रॉयल स्टॅग विदेशी दारू ७२० बॉटल १८० एमएल किंमत १ लाख ८७ हजार व २ पेट्या रॉयल स्टॅग विदेशी दारू १९० बॉटल ९० एमएल किंमत २४ हजार रुपये, दारूची वाहतूक करणारे वाहन सहित एकूण ५ लाख ११ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोघांना अटक

सदर गुन्ह्यात ३१ वर्षीय प्रफुल प्रकार घरडे राहणार हनुमान नगर ब्रह्मपुरी व २७ वर्षीय अक्षय रुपचंद पिल्लेवार राहणार देलनवाडी ब्रह्मपुरी यांना अटक करण्यात आली, दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांवये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे. illegal alcohol trafficking on Independence Day

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंभोरकर, सर्व्हेश बेलसरे व पोलीस कर्मचारी जयंता चुनारकर, नितेश महात्मे, गणेश भोयर, प्रदीप मडावी, अजित शेंडे आणि दिनेश अराडे यांनी केली.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *