Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • चंद्रपुरातील दुर्गापुरात सुरू असलेला हा सट्टा बाजार कुणाचा?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दुर्गापूर हा भाग वन व सांस्कृतिक कार्यमंत्री, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील मतदार संघ, मात्र या मतदार संघात अवैध धंद्याचा सध्या बोलबाला सुरू आहे.

    जुगार असो की सट्टा हे कार्य या भागात खुलेआम सुरू आहे, मात्र पोलीस यावर कारवाई करणे टाळत आहे, पण का? हे उत्तर तर खुद्द पोलीस विभाग देऊ शकतो.

     

    2 वर्षांपूर्वी दुर्गापूर भागात जाकीर नावाच्या इसमाने सट्टा व जुगार खुलेआम सुरू केला होता, ते सुद्धा पोलीस स्टेशनच्या अवघ्या 200 मीटर अंतरावर, पण त्यावेळी News34 ने जाकीर च्या अवैध धंद्याचा पर्दाफाश केला.

     

    तत्कालीन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी तात्काळ जाकीर व कैलास चा जुगार व सट्टा बंद पाडला, मात्र 2 वर्षे गेल्यावर आज जाकीर पुन्हा या धंद्यात सज्ज झाला.

    त्याने त्याच ठिकाणी सट्टा बाजार सुरू केला आहे, ते सुद्धा दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या 200 मीटर अंतरावर, ही बाब पोलिसांना माहीत नसेल काय?

    जाकीर हा सट्टा धंद्यातील मास्टर आहे, त्याने यापूर्वी असे अनेक उद्योग केले आहे, त्याने पुन्हा सुरू केलेला हा सट्टा कुणाच्या संमतीने सुरू आहे.

    ही बाब काही दिवसात समोर येईलच, News34 ने याआधी दुर्गापुरातील सट्टा व्यवसायी महाराज च्या धंद्याचं बिंग फोडलं होते.

    सध्या दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये नवे पोलीस निरीक्षक जीत्तावार रुजू झाले आहे, त्यांनी नागपुरातील स्थानिक गुन्हे शाखेत कामगिरी बजावली आहे, पण त्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या या अवैध धंद्याचं काय?

    मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा सट्टा बाजार पोलिसांच्या नजरेस पडला नाही काय? कुणाच्या संमतीने हे अवैध धंदे दुर्गापुरात सुरू आहे.

    पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या या अवैध धंद्याना जबाबदार कोण आहे? हा थेट प्रश्न पालकमंत्री मुनगंटीवार यांना लवकरचं विचारण्यात येईल.

    या बातमीमध्ये दुर्गापुरातील जाकीर च्या सट्टा बाजाराची कहाणी आहे, दुसऱ्या भागात दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा अवैध धंद्याची पोलखोल आम्ही करणार आहोत, ते बघून तुम्ही सुद्धा कपाळावर हात ठेवणार…पुढील दिवसात दुसरा भाग…क्रमशः

  • चंद्रपुरात रविवारी ओबीसी समाजबांधवांचा महामोर्चा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या वादाची ठिणगी चंद्रपुरात पण पडली आहे, मराठा समाजाच्या जालन्यात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांची मागणी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे ही मागणी चुकीची आहे. त्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ विरोध करीत आहे.

     

    याविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने व इतर ओबीसी संघटना व जातीय संघटना तर्फे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन नये व कुणबी प्रमाणात देवू नये, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय सर्वे कऱण्यात यावा, ओबीसी समाजाचे वसतीगृह तात्काळ सुरू करन्यात यावे , ओबीसी(विजे, विमाप्र, इत्यादी) समाजात तब्बल 423 च्या वर जाती आहे त्यामध्ये आता मराठा आले तर आपल्याला समाजाला न्याय मिळणार नाही.

     

    सोमवार पासून11 सप्टेंबर ला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे व 17 सप्टेंबर ला राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसी मोडणाऱ्या सर्व जात संघटनेच्या वतीने चंद्रपुरात महामोर्चा काढण्यात येणार आहे.

     

    या दरम्यान दिनांक 16 सप्टेंबर ला शहरात बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते, मोर्चात सहभागी व्हावें असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासघाचे महासचिव सचिन राजूरकर, समनवयक डॉ अशोक जीवतोडे, धानोजे कुणबी समाजाचे ऍड पुरुषोत्तम सातपुते, बबनराव फंड, कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, प्रा अनिल शिंदे, विदर्भ तेली महासंघाचे प्रा सूर्यकांत खनके, माळी महासंघाचे डॉ संजय घाटे ,चंद्रपूर माळी समाजाचे अध्यक्ष राजू बनकर , ओबीसी सेवा संघाचे अनिल डाहाके, राजेश बेले,सतीश मालेकर, शाम राजुरकर, शैलेश जुमडे, शाम लेडे, अक्षय येरगुडे , ऍड देवा ,पाचभाई, मनीषा बोबडे, यांनी केले आहे.

  • मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या पण ओबीसी मधून नाही – आमदार धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर येथे ओबीसी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांनी 11 सप्टेंबरपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. ओबीसींची जनगणना करणे, कुणबी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण न देणे यासारख्या प्रमुख मागण्यांसाठी ते आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाच्या उपोषण मंडपाला आमदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.

     

    तसेच “कोणत्याही प्रकारची घाई न करता ओबीसी संघटनांशी चर्चा करून निर्णय घ्यावा आणि संविधानिक ओबीसी प्रवर्गाची बिहार राज्याप्रमाणे जातनिहाय जनगणना करावी. विद्यार्थी वसतीगृह तत्काळ सुरू करावे. मागासवर्गीय आयोगाला निधी व इतर बाबी उपलब्ध करून द्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

     

    याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, शहर काँग्रेस जिल्हाध्य्क्ष रामू तिवारी, ओबीसी अध्यक्ष राहुल चौधरी, डॉ. शरयू बबन तायवाडे, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ अध्यक्ष इंजि. सुषमा भंड, साधना बोरकर, वृंदा विकास ठाकरे, नंदा उदयराव देशमुख, मनीषा बोबडे, श्रीधरराव मालेकर, प्रभाकर दिवसे, अरविंद मुसळे यांची उपस्थिती होती.

    आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आंदोलनस्थळी जाऊन टोंगे यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यांची माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, ओबीसींच्या अनेक वर्षांपासून अनेक मागण्या प्रलंबित आहेत. ओबीसींची जनगणना करणे ही सर्वात महत्वाची मागणी आहे. मात्र, अजूनही ओबीसींची जनगणना झाली नाही. यामुळे ओबीसींना त्यांच्या हक्कांपासून वंचित राहावे लागत आहे.

     

    आमदार धानोरकर यांनी सांगितले की, मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही. मात्र, कुणबी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देणे हे योग्य नाही. यामुळे ओबीसींचे आरक्षण कमी होईल. त्यामुळे मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.

     

    आमदार धानोरकर यांनी सांगितले की, टोंगे यांचे आंदोलन हे ओबीसींच्या हक्कांसाठी लढण्याचे एक महत्त्वाचे आंदोलन आहे. त्यांना पूर्ण पाठिंबा देण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत.

  • महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची सहविचार सभा संपन्न

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दिनांक 13 सप्टेंबर बुधवारला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर (ग्रामिण) प्राथमिक व माध्यमिक ची सहविचार सभा नागो गाणार माजी शिक्षक आमदार नागपूर विभाग तथा राज्य कार्याध्यक्ष शिक्षक परिषद यांच्या प्रमुख उपस्थितीत व विशाल देशमुख उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) तसेच कल्पना चव्हान शिक्षाणाधिकारी (माध्य.)जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या समवेत पार पडली. यात अनेक विषयावर चर्चा करण्यात आली.

    ⚡️आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची डीसीपीएस रक्कम एनपीएस मध्ये जमा करण्यात यावी-
    ⚡️सन 2022-23 मधील भविष्य निर्वाह निधी लेखे मिळण्याबाबत
    ⚡️ वैद्यकीय देयके, सेवानिवृत्त लाभ, सातवा वेतन आयोग हफ्ता यासाठी निधी उपलब्ध करण्यात यावा-
    ⚡️ आदिवासी क्षेत्रात कार्यरत माध्यमिक शाळेतील सर्व कर्मचारी वृंदाना एकस्तर वेतनश्रेणी व प्रोत्साहन भत्ता लाभ देणेबाबत-

    ⚡️श्री. अमोल नवघरे व इतर यांना स्थायी आदेश देण्यात होत असलेल्या विलंबाबाबत –
    ⚡️ नियुक्ती जात प्रवर्ग निवड यादी शिक्षकांना उपलब्ध करून देणेबाबत

    सेवानिवृत कर्मचार्‍याचे उपदान,सेवानिवृती प्रकरणे,वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव,खाते मान्यता प्रस्ताव,अनुकंप तत्वावर नियुक्ती प्रकरणे,अशीसमेंटचे प्रस्ताव,वैद्यकिय बिलाचे प्रस्ताव,भ.नि.नि.वेतन पथक याबाबतची कारवाई,सेवाजेष्ठता क्रम निश्चिती प्रकरणे,काही वैयतिक कर्मचार्‍याची प्रकरणे,दप्तर दिरंगाई कायदयाची अंमलबजावणी तत्परतेने करावी, माहीती अधिकार -2005 माहीती देणे,इंग्रजी माध्यमाच्यां शाळातील सर्व कर्मचार्‍याना शासन निर्णया नुसार वेतन व भत्ते, इतर सुविधा पुरविण्याबाबत, अशा अनेक समस्यावर सभेत चर्चा करण्यात आली.
    काही प्रकरणे निकाली काढण्यात आली.
    उर्वरीत प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन शिक्षाणाधिकारी कल्पना चव्हान यांनी दिले.

     

    या सभेला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग अध्यक्ष अजय वानखेडे, कार्यवाह सुभाष गोतमारे, कोषाध्यक्ष संतोष सुरावार,कार्यालय मंञी सुधिर वारकर,उपाध्यक्ष मधुकर मुप्पीडवार,सहसंघटनमंत्री रामदास गिरटकर, कार्यालयीन मंत्री सुधीर वारकर, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विलास खोंड, जिल्हा कार्यवाह दिलीप मॅकलवार,संघटण मंञी किशोर टेंर्भूणे,राजुरा तालुका अध्यक्ष अविनाश पिपंळशेंडे, पोभुंर्णा तालुका कार्यवाह संदिप बदलवार, कार्यालय मंञी विलास वरभे,पेचे सर,साव सर,काॕन्व्हेंट विभाग प्रमुख विवेक आंबेकर ,प्राथमिक जिल्हा कार्यवाह अमोल देठे, चंद्रपूर तालुका कार्यवाह सतीश डांगरे, खाजगी प्राथमिक अध्यक्ष सरिता सोनकुसरे, कार्यवाह विकास नंदुरकर,व संबधीत कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

  • ग्रामपंचायतीने परवानगी नाकारल्यावरही सुरू झाले बिअर बार

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – मुल तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या राजोली येथील फ्रेंड्स कॉलनीत बियर बार सुरू होत असल्याबद्दलची माहिती ग्राम पंच्यायत राजोलीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी फ्रेंड्स कॉलनीतील नागरिकांनी लेखी अर्जाद्वारे दिली. आणि संपूर्ण राजोली वाशियांची तारांबळ उडाली.

     

    गावात असो वा हद्दीत बियर बार सुरू करण्यात येऊ नये गावातील शांतता व सुव्यवस्था कायम राहावी विद्यार्थी दारूच्या आहारी जातील गाव बिघडेल भविष्यात गाव गावासारखे शांत राहणार नाही. यासाठी ग्राम पंचायतीने दिनांक २३/८/२०२३ रोजी दुपारी १२ वाजता ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले.

     

    सभेत विषय क्रमांक ७/१ नुसार मौजा राजोली येथील फ्रेंड्स कॉलनीत सुरु होत असलेल्या बियर बारची परवानगी नाकारण्यात यावी. याविषयावर चर्चा करतांना ग्राम पंचायतीने आतापर्यंत कोणत्याही बियर बारला कुठलीही परवानगी किंवा नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. अशी माहिती सभेला उपस्थित असलेल्या अनेक ग्रामस्थांना देण्यात आली. असे असताना सुद्धा परत फ्रेंड्स कॉलनीमध्ये सदरचा बियर बार सुरु होऊ नये, यासाठी बियर बारची परवानगी नाकारण्यात यावी.

     

    याबाबतचे पत्र तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात यावे असे ठरविण्यात आले. ठराव सर्वानुमते मंजूरही करण्यात आला. असे असताना देखील राजोली ग्राम पंचायत हद्दीत मुजोरीने स्वामी गोल्डन बार अँड रेस्टॉरंट व स्वामी गार्डन बार अँड रेस्टॉरंट असे दोन बार सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. मौजा राजोली गावाला पूर्वीपासूनच राजकीय वारसा लाभलेला असून गाव राजकीय दृष्ट्या संवेदनशील जरी असले तरी सुद्धा अजूनही गावात शांतता व सुव्यवस्था कायम राखली जात आहे.

     

    पक्षीय मतभेद सोडले तर गावाच्या हितासाठी, नागरिकांच्या कल्याणासाठी आजही गाव एक होतांना दिसून येत आहे. गावात तंटे,भांडण कमी प्रमाणात आहेत. आणि पुढेही गाव असेच शांत व सुव्यवस्थित राहावे अशी संपूर्ण ग्रामस्थांची इच्छा आहे.

     

    यासाठी आदर्श ग्राम पंचायतीने दिनांक २९/२०२३ रोजी जिल्हाधिकारी चंद्रपूर, जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर यांना लेखी पत्र ग्रामसभेच्या ठरावानुसार फ्रेंड्स कॉलनीतील सुरु होत असलेले बियर बार ची परवानगी त्वरित रद्द करण्यात यावी आशयाचे पत्र ग्रामस्थांच्या वतीने व हितासाठी राजोली ग्राम पंचायतीचे सरपंच जितेंद्र लोणारे यांनी दिले आहे.

  • चंद्रपुरातील अमृत योजनेच्या कंत्राटदारास काळ्या यादीत टाका – हंसराज अहिर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – अमृतजल नळ पाणी पुरवठा योजना ही मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नातील महत्वाकांक्षी योजना असतांनाही चंद्रपूर महानगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार व नियोजनशुन्यतेमुळे 2021 पर्यंत पुर्णत्वास जाणारी ही योजना अजुनही भरकटत असून लोकांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याने संबंधित दोषी कन्सट्रक्शन कंपनी व मालकाला संपूर्ण महाराष्ट्रातून काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या संदर्भात घेतलेल्या समिक्षा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिलेत.

    सदर योजनेबाबत महानगरातील मागासवर्गीय, दलित नागरीकांच्या तसेच भाजप पदाधिकारी खुशाल बोन्डे , विनोद शेरकी यांचेकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

     

    या तक्रारींची दखल घेवून हंसराज अहीर यांनी दि. 15 सप्टें. 2023 रोजी शासकीय विश्रामगृहात मनपा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची याप्रश्नी समिक्षा बैठक घेतली. बैठकीस मनपा आयुक्त विपीन पालीवाल, मजीप्रा चे कार्यकारी अभियंता संजय अष्टगी, मुख्य अभियंता महेश बारई, उपअभियंता बोरीकर, भाजप नेते खुशाल बोंडे, माजी महापौर अंजली घोटेकर, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, राजु घरोटे, रविंद्र गुरनुले उपस्थित होते.

     

    अमृतचे कार्य करणाऱ्या संतोष कन्सट्रक्शन कंपनीने या कामात प्रचंड घोळ करीत कामे पुर्ण न करता पैसे घेवून पळ काढल्याने या योजनेवर 240 करोड खर्ची घालुनही लोकांना पाणी मिळत नाही ही अत्यंत गंभीर बाब असून या महा. जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची अक्षम्य चूक व हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे अहीर यांनी म्हटले. कामाची प्रगती, गुणवत्ता तपासणी न करता मजीप्राच्या शिफारसीने तत्कालीन मनपा आयुक्तांनी अपूर्ण काम व योजना पुर्णत्वास न गेली असतांना कंत्राटदाराला अपूर्ण कामाचे व आगावू रक्कम दिल्याची बाब उघडकीस आली असून हा प्रकार अक्षम्य आहे. त्यामुळे सदर कंत्राटदारास त्वरीत काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी. या विषयी पुढील महिण्यात या योजनेसंदर्भात जनसुनावणी घेण्यात येणार असल्याचेही हंसराज अहीर यांनी सांगीतले.

     

    सुरूवातीला सदर योजना 2019 पर्यंत पुर्णत्वास जाण्याचा करार होता. मात्र शासनाने या करारास 2 वर्षे मुदतवाढ दिल्याने ही योजना 2021 पर्यंत पुर्णत्वास जाणे अपेक्षीत असतांना हे काम वेळेत पुर्ण करून घेण्यास असमर्थ ठरल्याचे अधिकाऱ्यांनी समिक्षा बैठकीत मान्य केले. त्यावेळी अहीर यांनी नाराजी व्यक्त करतांनाच अधिकाऱ्यांनी कंपनीला अप्रत्यक्षपणे सहकार्यच केल्याचे अहीर यांनी अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला. त्यांनी योजनेविषयी गंभीर स्वरूपाच्या अनेक बाबींवर भाष्य करीत सदर कंपनीला तातडीने बोलावून काम पूर्ण करण्याच्या सुचना कराव्या अन्यथा पोलिस तक्रार करावी, अतिरिक्त दंडाची आकारणी करावी, आगावू अदा केलेली रक्कम वसूल करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश दिले. संतोष कन्सट्रक्शन कंपनीच्या विषयात अडकून न पडता सदर योजना कशी मार्गी लावता येईल याविषयी नियोजन करण्याची सुचनाही अहीर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केली.

     

    उपस्थित नगरसेवकांनीही यावेळी त्यांच्या भागातील तक्रारींचा पाढा वाचला. बैठकिस नगरसेवक राजेंद्र अडपेवार, जयश्रीताई जुमडे, शाम कनकम, मायाताई उईके, प्रदिप किरमे, संजय कंचर्लावार, शितल आत्राम, रवी आसवाणी, कल्पनाताई बगुलकर, विठ्ठल डुकरे, रवी लोणकर, पूनम तिवारी, महेंद्र जुमडे, सुभाष आदमने, नकुल आचार्य उपस्थित होते.

  • यंग चांदा ब्रिगेडचा कलाकार राष्ट्रवादी कांग्रेसच्या गोटात

    News34 chandrapur

    चंद्रपूर – वर्ष 2019 ला यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी प्रचंड मताधिक्य मिळवीत चंद्रपूर विधानसभेच्या आमदार पदी विराजमान झाले होते.

     

    मात्र त्यांच्या काटेरी वाट्यात संघर्ष करणारे शिलेदार आमदार जोरगेवार यांची साथ सोडून जात आहे, आधी विशाल निंबाळकर व आता यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप यांनी आमदार जोरगेवार यांची साथ सोडत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेसची घड्याळ हातात बांधली.

     

    कलाकार हा मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी कांग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य व शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्या संपर्कात होता. 13 सप्टेंबर ला नागपुरात पार पडलेल्या राष्ट्रवादी कांग्रेसच्या विदर्भ पदाधिकारी मेळाव्यात कलाकार मल्लारप यांनी आमदार रोहित पवार व सलील देशमुख यांच्या उपस्थिती मध्ये असंख्य युवकांसहित राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये प्रवेश केला.

     

    यावेळी सुधाकर कातकर, बेबीताई उईके, राकेश सोमाणी, मुनाज शेख, हरिनाथ यादव, अरुण निमजे, राजेंद्र आखरे, जयंत टेम्भूर्डे उपस्थित होते.

  • शेतकऱ्यांनी जाणून घेतलं हिरव्या सोन्याचं महत्व

    News34 chandrapur

    चंद्रपूर: बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली आणि आत्मा कार्यालय, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय निवासी बांबू लागवड प्रशिक्षण कार्यशाळा राज्यभरातील शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात वन अकादमी,चंद्रपूर येथे संपन्न झाली.

     

    हिरवं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांबूच्या पर्यावरणीय महत्त्वा सोबतच सामाजिक, आर्थिक व औद्योगिक महत्त्व लक्षात घेऊन तसेच वनेतर क्षेत्रावर बांबूचे क्षेत्र जास्तीत जास्त वाढावे यासाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीचे शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे या उद्देशाने आयोजित सदर कार्यशाळेचे उद्घाटन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर यांच्या हस्ते झाले.

     

    या कार्यशाळेत शाश्वत विकासासाठी पर्यावरण पूरक बांबू शेती व मूल्य संवर्धनाच्या संधी, व्यापारी दृष्ट्या बांबू लागवडीमध्ये अन्नद्रव्यवस्थापन, बांबू रोपवाटिका व्यवस्थापन, आत्मा कार्यालयाच्या योजना व शेतकरी उत्पादक कंपनी तयार करणे, बांबू लागवड प्रात्यक्षिके, बांबू बाजारपेठ व उद्योग, बांबू प्रक्रिया उद्योग, शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या योजना, बांबू विपणन व व्यवस्थापन आदी विषयावर कृषी वनशेती संशोधन प्रक्षेत्र नागपूर चे प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय इलोरकर, डॉ. प्रशांत राऊत, डॉ. आरती देशमुख, बीआरटीसी चे वनपरिक्षेत्र अधिकारी आकाश मल्लेलवार, सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी जी.सी. मेश्राम, बांबू विकास मंडळाचे सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी श्रीनिवास माडभुशी मंडळ कृषी अधिकारी गणेश मादेवार, बांबूटेक ग्रीन सर्विसेसचे संचालक अन्नपूर्णा धुर्वे, अनिल दहागावकर, वनपाल विलास कोसनकर यांनी सखोल मार्गदर्शन केले.

     

    प्रशिक्षणा दरम्यान शेतकऱ्यांना चिचपल्ली स्थित बांबू सेटममध्ये बांबू लागवडीच्या प्रात्यक्षिकांसोबतच बांबूच्या विविध प्रजातींची ओळख करून देण्यात आली. या कार्यशाळेत राज्यभरातून विविध जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले. बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या वतीने वर्षभर अश्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असून राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी यांनी त्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन केंद्राचे संचालक अविनाश कुमार यांनी केले आहे

  • रविंद्र टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाला कुणबी युवा चंद्रपूर संघटनेचे जाहीर समर्थन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : मागील पाच दिवसांपासून मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये. तसेच ओबीसींच्या रखडलेल्या विषयांना घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष रवींद्र टोंगे हे अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत.

     

    महाराष्ट्रातील सर्वात मोठा समजला जाणारा मराठा समाजाला जर कुणबी मधून ओबीसी आरक्षण दिले गेले. तर ओबीसी मधील जवळपास अडीच ते तीन हजार जातीतील विद्यार्थ्यांना वरती हा अन्याय होईल म्हणून या रास्त मागणीला घेऊन ते उपोषण करत असून त्यांच्या या उपोषणाला आज कुणबी युवा चंद्रपूर संघटनेकडून जाहीर समर्थन तथा पाठिंबा देण्यात आले. तसेच ओबीसी समाजाला शासनाने कमजोर समजू नये.

     

    जर ओबीसी समाजाविरुद्ध चुकीचे निर्णय घेण्यात आले तर त्याचे पडसाद महाराष्ट्रात गंभीर उमटतील याची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यावी, असा इशारा कुणबी युवा चंद्रपूर तर्फे देण्यात आला या वेळेला युवा जिल्हा समन्वयक श्री. राजू कुडे, संदेश खडसे, ॲड. प्रफुल मुरकुटे, सुप्रीत कुडे, विश्वनाथ पाल, सुधीर पिंगे, दिनेश देरकर, मोहन दरेकर तसेच अनेक युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • OBC आंदोलकांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सोबत चर्चा करणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – विविध मागण्यांना घेवून राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनाला भेट देत आंदोलकांच्या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या पर्यंत पोहचवू असे आश्वासन दिले आहे.

     

    मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ठ करु नये, महाराष्ट्र सरकारने बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करावा, ओबीसी विद्यार्थांकरिता प्रत्येक जिल्हात मुला मुलींकरिता स्वतंत्र वसतीगृह व स्वाधार योजना सुरु करावी या प्रमूख मागण्यांना घेऊन राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

     

    दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी उपोषण पेंडालाला भेट देत उपोषणकर्ते रवींद्र टोंगे यांची भेट घेतली आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी टांगे यांच्या प्रकृतीची विचारणा करत त्यांच्या संपूर्ण मागण्या समजून घेतल्या आहे. शिंदे – फडणवीस सरकार ओबीसी समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्नशिल आहे. आंदोलकांच्या भावना आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत पोहचविणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.