Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • मासे पकडण्याच्या नादात युवकाने गमावला जीव

    News34 chandrapur

    (प्रशांत गेडाम)
    सिंदेवाही- सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार येथील तलावात मासे पकडायला गेलेल्या तरुणाचा तलावाच्या पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना आज 13 सप्टेंबर ला बुधवारी सकाळी 7-30 वाजताचा सुमारास उघडकीस आली आहे.

    मृतक नाव प्रफुल देविदास मेश्राम वय -34 वर्ष, रा. कच्चेपार ता. सिंदेवाही, असे असुन हा डाव्या पायाने व डाव्या हाताने अपंग असुन तो वस्तीमधील मित्रांसोबत सोबत कच्चेपार गावाशेजारी असणाऱ्या गाव तलावात मासे पकडण्यास गेला होता. मासे पकडण्याकरिता मृतक प्रफुल मेश्राम व त्याचे सोबती तलावात मच्छिमारीचे जाळे टाकुन तलावात उतरले व मासे पकडु लागले.

     

    प्रफुल मेश्राम हा मासे पकडण्याकरिता तलावाच्या खोल पाण्यात गेला परंतु तो डाव्या हाताने व डाव्या पायाने अपंग असल्याने व त्याला पोहता येत नसल्याने तो तलावाचे पाण्यात बुडुन मरण पावला.

    मृतकाच्या भावाने तोंडी रिपोर्ट वरुन सिंदेवाही पोलीसांनी सदरचा मर्ग दाखल करून तपासात घेतला आहे, मृतदेह शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे पाठवले आहे पुढील तपास सिंदेवाही चे ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलीस करीत आहेत.

  • तृतीयपंथी दाढी कशी करतात? गौरी सावंत यांनी सांगितलं सत्य

    News34

    मुंबई/ नुकत्याच ott वर प्रदर्शित झालेल्या ताली या वेबसिरीज च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेली गौरी सावंत यांनी वृत्त वाहिनीवर दिलेली मुलाखत चर्चेचा विषय बनली आहे.

     

    तृतीयपंथी यांच्या जीवन शैलीवर त्यांनी प्रकाश टाकत अनेक गुपित उघड केली आहे. यातच सर्वात महत्वाची बाब म्हणजे तृतीयपंथी दाढी कशी करतात? यामागील त्यांनी सत्य सांगितले आहे.

     

    दाढी करणे हे अनेकांसाठी नित्याचे काम आहे, परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की ट्रान्सजेंडर महिलांसारखे तृतीयपंथी ही प्रक्रिया कशी नेव्हिगेट करतात? गौरी सावंत, एक प्रमुख कार्यकर्त्या आणि ट्रान्सजेंडर समुदायाच्या सदस्या, या विषयावर प्रकाश टाकतात.

     

    गुरू किंवा गुरू शोधणे ही त्यांच्याकडे असलेली चैनी नाही यावर सावंत भर देतात. त्याऐवजी, ते उपलब्ध असलेल्यांकडून शिकतात. बहुतेक लोकांना त्यांच्या पालकांच्या घरी साडी कशी घालायची किंवा व्यवस्थित बसायचे हे शिकवले जात असताना, सावंत यांच्या गुरूंनी तिला या पारंपारिक पद्धतींची गुंतागुंत शिकवली. मात्र, जसजशी दाढी वाढू लागते, तसतसे नवे आव्हान निर्माण होते.

     

    चेहऱ्यावरील केस काढणे सोपे काम नाही, विशेषतः महिलांसाठी. एका वेळी एक केस उपटण्यासाठी चिमटा वापरण्याचा अनुभव सावंत सांगतात. ती स्पष्ट करते की ही प्रक्रिया वेळखाऊ पण आवश्यक आहे. शरीरात पुरुष संप्रेरकांची उपस्थिती चेहर्यावरील केस काढणे अधिक आव्हानात्मक बनवते. सावंतचे गुरू धीराने या तंत्राचे प्रात्यक्षिक करतात, तिच्या मांडीवर झाकण ठेवून काळजीपूर्वक प्रत्येक केस मुळापासून काढून टाकतात.

     

    दोन रुपयांच्या ब्लेडने मुंडण करणे आणि केस मुळापासून उपटणे यातील फरक सावंत अधोरेखित करतात. शेव्हिंगला दररोज पुनरावृत्तीची आवश्यकता असताना, मुळापासून केस उपटणे दीर्घकाळ टिकणारे परिणाम देते, अंदाजे 15 दिवसांनी पुन्हा वाढ होते.

     

    हे मौल्यवान धडे ट्रान्सजेंडर समुदायातील गुरूंनी दिले आहेत. ते ट्रान्सजेंडर महिलांसमोरील अनन्य आव्हाने समजून घेतात आणि त्यांना आत्मविश्वासाने जगामध्ये नेव्हिगेट करण्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकवतात.

  • विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

    News34 chandrapur

    चंद्रपूर :-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांचा दिनांक 10 सप्टेंबरला वाढदिवस मनसे कार्यकर्त्यांनी थाटात साजरा केला असतांना त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसे तालुका संघटक मनोज तांबेकर यांच्या नेत्रुत्वात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश कार्यक्रम पार पडला.

     

    यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा सचिव किशोर मडगुलवार मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे.विधी विभाग जिल्हा अध्यक्ष मंजु लेडांगे जनहित कक्ष विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील गुढे. रमेश काळबांधे,ता, अध्यक्ष प्रकाश नागरकर विवेक घोटे करन नायर मयुर मदनकर क्रिष्णा गुप्ता प्रविन शेवते पीयूष धुपे, राज वर्मा. वर्षा भोंबले व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

     

    स्थानिक विश्रामगृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात हा पक्ष प्रवेश घेण्यात आला असुन चंदू भगत. रहसुद्दिन शेख. विनोद धाबेकर. नागोजी सोनवणे. रवी बावणे. दिनकर बांगडे, शेरुभाई, नमसिन भाई. ओमजी शर्मा, कवडू चिंचोलकर, दत्ता उम्बरकर, विलास दांडेकर. अर्जुन खोब्रागडे व आश्विन देठे यांचा जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी पक्षाचा दुपट्टा खांद्यावर टाकून पक्ष प्रवेश घेतला यावेळी पक्ष स्थरावर त्यातील कार्यकर्त्यांवर जबाबदारी देण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

  • चंद्राबाबू नायडू यांना अडचणीत आणणारा स्किल डेव्हलपमेंट घोटाळा आहे तरी काय?

    News34 chandrapur

    आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळ) ची स्थापना आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर झाली.  ही सार्वजनिक-खाजगी भागीदारी असून राज्यातील तरुणांना कौशल्य आणि प्रशिक्षित करणे हा तिचा उद्देश आहे.  प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हाही त्याचा उद्देश आहे.

       त्यासाठी कौशल्य विकास महामंडळाने तंत्रज्ञान कंपन्यांशी करार केले.  यामध्ये सीमेन्स आणि डिझाईन टेक सिस्टम्स सारख्या कंपन्यांचाही समावेश आहे.

       सीमेन्स इंडस्ट्रियल सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​मुख्यालय नोएडा येथे आहे.  या कंपनीसोबत झालेल्या करारानुसार आंध्र प्रदेशात सहा ठिकाणी कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात आली.  येथे युवकांचे कौशल्य विकसित करून त्यांना प्रशिक्षण दिले जाते.

       आंध्र प्रदेश सरकारने दहा टक्के खर्च सरकार उचलणार असून उर्वरित ९० टक्के रक्कम सीमेन्स कंपनी अनुदान म्हणून देणार असल्याचे सांगितले होते.

     सरकार आणि सिमेन्स यांच्यातील या करारानंतर आंध्र प्रदेशातील अनेक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात आली.  यामध्ये आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयाचाही समावेश आहे.

    सीमेन्स 2017 पासून कौशल्य विकास महामंडळासोबत काम करत आहे.  करारानुसार, सीमेन्सला तांत्रिक सहाय्य द्यावे लागेल.  मात्र कंपनीने ती दिली नसल्याचा आरोप होत आहे.

       या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, कंपनीने तांत्रिक मदत केल्याचे कागदपत्रांमध्ये नोंदवले गेले आहे.

       आंध्र प्रदेश सरकारने कौशल्य विकास उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यासाठी सीमेन्स आणि डिझाईन टेकसोबत 3356 कोटी रुपयांचे करार केले आहेत.  करारानुसार, या प्रकल्पातील 90 टक्के हिस्सा टेक कंपन्यांना घ्यायचा होता, परंतु हे प्रकरण पुढे सरकले नाही.

       या कराराअंतर्गत कौशल्य विकासासाठी सहा क्लस्टर तयार केले जाणार होते आणि प्रत्येक क्लस्टरसाठी 560 रुपये खर्च केले जाणार होते.  तत्कालीन चंद्राबाबू नायडू सरकारने आपल्या हिश्श्याच्या दहा टक्के म्हणजेच ३७१ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती.

       आंध्र प्रदेश सरकारने आपला हिस्सा भरला होता.  आंध्र प्रदेशातील CID ने डिसेंबर 2021 मध्ये कौशल्य विकासासाठी जारी केलेल्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करत प्रथम गुन्हा नोंदवला होता.

       सीमेन्सने प्रकल्पाची किंमत कृत्रिमरित्या 3,300 कोटी रुपये वाढवल्याचा आरोप सीआयडीने केला होता.  या आरोपावरून सीमेन्सशी संबंधित जीवीएस भास्कर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

       आंध्र प्रदेश सरकारने सीमेन्स इंडस्ट्रियल सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेडला ३७१ कोटी रुपये दिले होते.  या सॉफ्टवेअरची खरी किंमत केवळ 58 कोटी रुपये असल्याचा सीआयडीचा आरोप आहे.

       या करारात कौशल्य विकास महामंडळाच्या वतीने महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गंता सुब्बाराव आणि लक्ष्मीनारायण यांच्यासह एकूण २६ जणांवर सीआयडीने गुन्हा दाखल केला होता.  नंतर यातील दहा जणांना अटकही करण्यात आली.

       आता याप्रकरणी आंध्र प्रदेश सीआयडीने चंद्राबाबू नायडूंनाही अटक केली आहे.

  • वीज बिल तर भरतायं, मग दंड का देता?

    News34 chandrapur

    चंद्रपूर/मुंबई – राज्यामध्ये चालू आर्थिक वर्षात दरमहा सरासरी १२ लाख घरगुती वीज ग्राहकांनी वीज बिल तर भरले पण बिल भरण्याची मुदत न पाळल्यामुळे त्यांना दंड भरावा लागला. वीज ग्राहकांनी वेळेत बिल भरून दंड टाळावा, तसेच वेळेपूर्वी आणि ऑनलाईन बिल भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले. How to pay electric bill online?

     

    उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार ग्राहकांना वीजबिलातील सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे.

     

    लोकेश चंद्र म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२३ नंतर महावितरणचे विविध वर्गवारीतील दरमहा सरासरी एकूण १३ लाख ८९ हजार असे ग्राहक आढळले आहेत की, ज्यांनी नियमितपणे वीजबिले भरली पण बिल भरण्याच्या देय दिनांकानंतर बिल भरल्याने त्यांना सव्वा टक्का दंड द्यावा लागला. यामध्ये १२ लाख ३१ हजार घरगुती ग्राहक आहेत. व्यावसायिक ग्राहकांची संख्या १ लाख ३३ हजार आहे तर औद्योगिक ग्राहकांची संख्या १७ हजार आहे.

     

    महावितरणच्या वीज बिलावर मुदतीचा स्पष्ट उल्लेख असतो. बिल अथवा देयक दिनांकापासून २१ दिवसात बिल भरायचे असते. त्याची स्पष्ट मुदत देय दिनांक नावाने दिलेली असते. त्यानंतर बिल भरले तर सव्वा टक्का दंड द्यावा लागतो. हा दंड टाळण्यासाठी देय दिनांक (ड्यू डेट) पर्यंतच बिल भरावे.

     

    महावितरणच्या ग्राहकांनी तत्पर बिल भरणा, ऑनलाईन पेमेंट व गो ग्रीनची सुविधा वापरली तर त्यांना वीजबिलात मोठी सवलत मिळते. वीज ग्राहकांनी मुदतीपूर्वी वीजबिलाचा भरणा केला तर त्यांना प्रॉम्प्ट पेमेंटसाठी अर्थात तत्पर बिल भरणा केल्याबद्दल एक टक्का सवलत मिळते. हे बिल भीम ॲप, गुगल पे, पेटीएम किंवा बँकेच्या ॲपवरून किंवा महावितरणच्या वेबसाईटवरून किंवा महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे असे ऑनलाईन पद्धतीने भरले तर पाव टक्का सवलत मिळते. याखेरीज ग्राहकांनी छापील कागदी बिलाच्या ऐवजी ईमेलने बिल स्वीकारण्याचा गो ग्रीनचा पर्यावरण पूरक पर्याय निवडला तर प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळते.

     

    सध्या महावितरणचे साठ टक्के ग्राहक ऑनलाईन बिल भरतात. विजेची बिले ऑनलाईन भरणे आणि ती दिलेल्या मुदतीच्या आधी भरणे हे वीज ग्राहकांना सहज शक्य आहे. त्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाचतात आणि बिलात सवलत मिळते.

  • चंद्रपुरातील रस्त्यावर वाहन धारकांची दादागिरी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहनांची संख्या चिंतेची बाब बनली आहे, शहरातील मुख्य मार्गावर नागरिक कमी आणि वाहने जास्त फिरत असल्याचे चित्र नजरेत पडत आहे.

     

    चंद्रपूर शहरात वाहतूक व्यवस्था सध्या पूर्णतः कोलमडली आहे, मुख्य मार्गावरील रस्त्याच्या कडेला वाहनांची गर्दी आपल्या नजरेत रोज पडते, मात्र हे मानवाद्वारे केलेले अतिक्रमण वाहतूक विभागाला दिसत नाही काय?

     

    अंचलेश्वर गेट ते जटपुरा गेट दरम्यान हजारो वाहने दररोज ये-जा करतात, सकाळी 11 व सायंकाळी 5 वाजेदरम्यान मुख्य मार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते, वाहनांना गाडी पार्क करण्यासाठी जागा मिळत नसल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केल्या जाते.

     

    वाढत्या अनियंत्रित वाहतुकीवर सध्या शासन प्रशासनातील अधिकारी गंभीर दिसत नाही, मुख्य मार्ग तर सोडा शहरातील ज्युबिली शाळा चौक ते जयंत टॉकीज या मार्गावर 4 चाकी वाहन मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला असतात, हा मार्ग आपत्कालीन सेवेसाठी वापरला जातो, विशेषतः शासकीय रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेला हा एकमेव सोपा मार्ग आहे मात्र यावर सुद्धा वाहन धारक अतिक्रमण करून ठेवतात.

     

    या वाहन अतिक्रमनावर वाहतूक विभागाने कारवाई करीत शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, चंद्रपुरातील रस्ते कुणाचे हा News34 चा पहिला भाग आहे, शहरातील अनेक समस्या आता आम्ही आपल्यासमोर घेऊन पुन्हा नक्की येऊ….तोपर्यंत नियमित वाचत रहा News34…

  • भीषण अपघातात 11 प्रवाश्यांचा मृत्यू

    News34chandrapur

    राजस्थान – लखनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग 21 वर पहाटे 5 वाजता भीषण अपघात घडला, या अपघातात एकूण 11 जणांचा मृत्यू झाला.

     

    भावनगर वरून मथुरे ला जाणाऱ्या बसमध्ये 30 ते 40 प्रवासी होते, मात्र सकाळच्या सुमारास भरतपूर आग्रा मार्गावर बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे वाहन चालकाने बस महामार्गावर थांबवित, दुरुस्ती करीत होते.

     

    रस्त्याच्या कडेला बस उभी केल्याने प्रवासी सुद्धा बसच्या बाहेर निघाले मात्र तितक्यात भरधाव असलेल्या ट्रक ने बस ला मागून धडक देत प्रवाश्यांना चिरडले, यामध्ये तब्बल 11 प्रवाश्यांचा मृत्यू झाला.

     

    मृतकामध्ये 6 महिला व 5 पुरुषांचा समावेश आहे, सर्व मृतक हे भावनगर गुजरात मधील रहिवासी होते, 12 च्यावर प्रवासी या अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे.

     

    अपघातानंतर इतर वाहन चालकांनी रस्त्यावर पडलेल्या मृतदेहांना बघून वाहन थांबवित पोलिसांना सूचना दिली काही वेळ महामार्गावर वाहतूक व्यवस्था कोलमडली होती, माहिती मिळताच 5 पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

    जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

    News34 chandrapur

    चंद्रपूर  : जिल्ह्यात 14 सप्टेंबर 2023 रोजी पोळा, 15 सप्टेंबर रोजी तान्हा पोळा, तसेच दि. 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. त्यासोबतच अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद हे महत्वाचे धार्मिक सण/ उत्सव 28 सप्टेंबर रोजी म्हणजेच एकाच दिवशी येत असल्याने त्यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दि. 13 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजतापासून ते दि. 17 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत तसेच दि. 19 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजतापासून ते दि. 1 ऑक्टोंबर 2023 च्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू करण्यात आले आहे.

     

    या कालावधीत सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, तसेच सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविण्याबाबत, सभेचे आयोजन व मिरवणूक काढण्याबाबत, त्याठिकाणी रस्ते निश्चित करण्याबाबत, लाऊड स्पीकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी कळविले आहे.

     

    हे आहेत पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांचे अधिकार:

    मिरवणूक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांच्या वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पूजास्थानाच्या जवळ लोकांच्या वागणुकीस निर्बंध घालण्याचे अधिकार, मिरवणुकीस बाधा होणार नाही याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पूजास्थळी लोकांच्या वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजवणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे आदी निर्बंध घालण्याचे अधिकार, रस्ते व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर लाऊड स्पीकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार, तसेच कलम 33, 35,37 ते 40,42,43 व 45 मुंबई पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सूचना देण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहे.

     

    सदर आदेश लागू असतांना सभा, मिरवणुकीत वाद्य वाजवणे, लाऊड स्पीकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घ्यावी.

     

    सर्व बाबतीत पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. सदर आदेश दि. 13 सप्टेंबरचे रात्री 12 वाजेपासुन दि. 17 सप्टेंबर 2023 च्या रात्री 12 वाजेपर्यंत तर दि. 19 सप्टेंबरचे रात्री 12 वाजेपासुन ते दि. 1 ऑक्टोंबर 2023 च्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीपर्यंत अंमलात राहील. असे पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी कळविले आहे.

     

  • चंद्रपुरातील या उड्डाणपूलाचे बांधकाम कासवगतीने

    News34 chandrapur

    घुग्घूस : येथील चंद्रपूर यवतमाळ – पुणे महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर रेल्वे गेट क्रं 39 वर आर.के. मथानी या कंपनीच्या वतीने रेल्वे उड्डाणपूल निर्माणाचे कार्य अत्यंत कासवगतीने व निकृष्ट दर्जाचे शुरु असून या रस्त्यावर दररोज नागरिकांच्या होणाऱ्या अपघाताने आक्रोशीत झालेल्या घुग्गुस काँग्रेस कमिटीतर्फे शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता रस्त्यावर बेशरमची झाडे लावून कंपनी विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

     

    व यानंतर कंपनीच्या कार्यालयात कंपनी अधिकारी मनन जोशी याला घेराव घालण्यात आला संतप्त वातावरण लक्षात घेता पोलीस निरीक्षक आसिफराजा यांनी पोलीस दलासह आर.के मथानी कार्यालयात पोहचत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

     

    मात्र कंपनी जो पर्यंत रस्ता दुरूस्तीचे काम करीत नाही तो पर्यंत आम्ही जाणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यानी घेतली असता जोशी यांनी गणेशोत्सव शुरु होण्यापूर्वी रस्ता नीटनेटका करून देण्याचे आश्वासन दिल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी परतीचा मार्ग धरला

    आर.के .मथानी कंपनीने सदर पूल निर्माण करण्याची मुद्दत ही एक वर्षाची असतांना दोन वर्षे लोटून ही अर्धे ही काम झालेले नाही.

     

    राजीव रतन कडून वणी कडे जाणारे तसेच महातरदेवी कडे जाणारा रस्ता व बस स्थानकाकडे येणाऱ्या रस्त्यावर मोठं – मोठे खड्डे पडलेले असून यामध्ये दररोज दुचाकी,चारचाकी वाहन व पादचारी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.
    तसेच हा रस्ता पूल निर्माणा करिता बंद असल्याने स्थानिक ट्रान्सपोर्टरचे ही अतोनात नुकसान होत आहे
    रस्त्यांची दुरुस्ती व पुलाचे कार्य जलदगतीने करण्यासाठी काँग्रेस तर्फे आजचा आंदोलन करण्यात आले.

     

    सदर आंदोलनात काँग्रेस जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, जिल्हा महिला उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद,जिल्हा महिला सचिव पुष्पा नक्षीने,जिल्हा सचिव दुर्गा पाटील, एस.सी.सेल शहर अध्यक्ष दिप्तीताई सोनटक्के, महिला सचिव मंगला बुरांडे,संध्या मंडल, सरस्वती कोवे,राधाबाई गोगला,मीना श्रीवास्तव, आईशा शेख, मीराबाई तुरणकार, राजकुमारी निषाद, प्रतिभा उईके, ज्येष्ठ काँग्रेस नेते शामराव बोबडे, शेख बाबा कुरेशी, सैय्यद अनवर, सुधाकर बांदूरकर,अलीम शेख, अनिरुद्ध आवळे,मोसीम शेख,शमीउद्दीन शेख, रोशन दंतलवार, रोहित डाकूर, विशाल मादर,युवा नेते अनुप भंडारी,विजय माटला, आकाश चिलका,अरविंद चहांदे, थॉमस अर्नाकोंडा, शहजाद शेख,अभिषेक सपडी, बालकिशन कुळसंगे, भैय्या भाई,दिपक कांबळे, सुनील पाटील, बल्ली भाई, कुमार रुद्रारप,विशाल नागपुरे, साहिल सैय्यद,नाणी मादर, नितीन मानकर, अकबर शेख,शहशाह शेख,अंकुश सपाटे,रंजित राखुंडे व मोठ्या संख्येने नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

  • चंद्रपूर शहरातील हे वाळूचे डोंगर कुणाचे?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – खनिज संपत्तीने संपन्न असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात या खनिजांची सर्रास लूट सुरू आहे, मग ते कोळसा असो की रेती प्रशासनाची नजर चुकवून आज जिल्ह्यात अनेक राजकीय रेती माफिया तयार झाले आहे.

     

    सध्या वाळू घाटाचे लिलाव झाले नसले तर अवैध रित्या अनेक ठिकाणी वाळूचा उपसा सुरू आहे, यावर प्रशासन कारवाईच्या नावावर मौन पाळून बसली आहे.

    वाळू माफियामुळे जिल्ह्यातील अनेक नदी, नाल्याचे पात्र वळविण्यात आले, याचा फटका अनेक नागरिकांना सुद्धा बसला आहे, 10 जून पर्यंत वाळू उपसा सुरू होता मात्र त्या काळात वाळू माफियांने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करीत शहरातील अनेक भागात वाळूची अवैध साठवणूक करून ठेवली आहे.

    चंद्रपूर शहरातील पागल बाबा नगर या परिसरात आपल्याला अनेक ठिकाणी अवैध वाळूचे लहान मोठे पहाड सहज दिसून येतील, सध्या तरी खनिकर्म व तहसील प्रशासनाने वाळूच्या साठवणुकीची कुणालाही परवानगी दिली नसली तरी वाळू माफिया प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हे अवैध काम करीत आहे.

     

    ज्या प्रमाणे पुष्पा चित्रपटात रक्त चंदनाची तस्करी करीत मोठे सिंडिकेट तयार करीत अवैध व्यापार दाखविला त्या प्रमाणे चंद्रपुरात वाळू माफियांनी सुद्धा आपलं वेगळं सिंडिकेट तयार केलं आहे, रात्रौ नंतर हे वाळू माफियांचे सिंडिकेट आपल्या घोषित जागेवर वाळूची साठवणूक करतात आणि सकाळ होताच त्या वाळू ला दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात येते.

     

    पागलबाबा नगर परिसरात अनेक वाळू माफियांनी विविध प्लॉटवर अवैध वाळूची साठवणूक करून ठेवली आहे, यावर प्रशासनाने आपले बांधलेले हात मोकळे करीत त्यांच्यावर कारवाई करीत शासनाचा बुडालेला महसूल वसूल करावा. विशेष म्हणजे हे वाळूचे डोंगर शहरात व ग्रामीण भागात सुद्धा आहे याची प्रशासनाने दखल घ्यावी.

    याबाबत तहसीलदार विजय पवार यांची भेट घेतली असता त्यांनी माहिती दिली की सध्या कुणालाही वाळूची साठवून करण्याची परवानगी दिलेली नाही.