Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • चंद्रपूर जिल्ह्यात वाघिणीचा मृत्यू

    News34 chandrapur

    मूल :- तालुक्यांतील फीस्कुटी येथील पपलु वामन शेंडे हे जगदिश गावतुरे रा. चंद्रपूर यांची शेती करतात. आज मंगळवार ला सकाळी ७:३० चे दरम्यान महीला मजुर नींदन करण्यासाठी त्याचे शेतात गेले असता त्यांना तीथे एक वाघ मृतावस्थेत आढळला.

    त्यांनी ही माहिती शेतमालकाला दिली. शेतमालकाने फीस्कुटी चे सरपंच मार्फत ही माहिती पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिली. माहीती मिळताच वनाधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पाहणी केली असता दोन ते अडीच वर्षाची वाघीण असल्याचे निदर्शनास आले.

    नुकतेच रविवारी सायंकाळी मूल-सिंदेवाही मार्गावर वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याने वनविभागात खळबळ उडाली होती. अज्ञात वाहनाच्या धडकेत या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात होते. वनविभागाने त्या दिशेने तपास सुरू केला असतानाच आज फिस्कुटी शेतात अडीच वर्षाची वाघीण मृत अवस्थेत आढळली आहे. त्याचा तपास वनविभाग करीत आहे.

  • चंद्रपुरात 925 किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त

    News34 chandrapur

    चंद्रपूर  – चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे बिनबा गेट परिसरातील शांती ट्रेडर्स या गोदामावर धाड टाकुन ९२५ किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले असुन प्लास्टीकचा साठा करणाऱ्या सरवन सिंग राठोड यांच्याकडुन ५ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

    सदर कारवाई आयुक्त यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ.अमोल शेळके,प्रदीप मडावी,संतोष गर्गेलवार,शुभम खोटे      यांच्या उपस्थितीत अतिक्रमण पथक व स्वच्छता विभागातर्फे करण्यात आली असुन सदर गोदाम मालकास पुन्हा प्लास्टीकचा साठा व वापर न करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.

     

    प्लास्टीक बंदीसाठी मनपा मार्फत ” उपद्रव शोध पथक ” ( NDS ) तयार करण्यात आले असुन सदर पथकाद्वारे पालिका क्षेत्रातील सर्व प्रतिष्ठाने, दुकानांवर कारवाई सुरु आहे.दरम्यान प्लास्टीक पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास ५ हजारांचे बक्षिस दिल्या जाणार आहे.

     

    एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.

     

    चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिलेले असुन प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियमाअंतर्गत मनपाच्या तीनही झोननिहाय कारवाईत संयुक्तपणे मोहीम राबवून शहरातील व्यवसाय प्रतिष्ठाने, दुकाने यांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

  • कांग्रेसच्या जनसंवाद यात्रेचा समारोप

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानव्ये जनसंवाद पदयात्रेचा शुभारंभ मुल येथील गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चारखासंघ पुण्यभूमीतून काँग्रेस नेते सी.डी.सी.डी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला.

    लोकभावना जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ह्या जनसंवाद पदयातत्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या हुकूमशाहीने सुरु असलेल्या महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकरी दुष्काळ, वन्यप्राण्यांचे हल्ले, भ्रष्टाचार, लोकशाहीची हत्या संबंधित मुद्यावर मुल तालुक्यातील समस्त गावे पिंजून काढून राष्ट्रीय नेते खासदार राहुलजी गांधी यांनी दिलेला संदेश प्रतेक गावात प्रतेक घरा – घरात चर्चेद्वारे पोहचविण्यात आला.

     

    जनसंवाद यात्रेचा समारोप आकापुर, टेकाडी चीमढा गावातून कांग्रेस नेते सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष यांचे नेतृत्वात असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत भव्य जनसंवाद रॅली काढून ग्रा.पं.सरपंच कालिदास खोब्रागडे यांचे अध्यक्षतेखाली चिमढा गावात क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचे पुतळ्यासमोर करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार,माजी सभापती व संचालक काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष घनश्याम येनुरकर,उपसभापती राजेंद्र कन्नमवार,विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष संदीप कारंमवार, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण नेते दीपक वाढई, सेवादलाचे जेष्ठ नामदेवराव गावतूरे, उपस्थित होते.

     

    समारोपीय कार्यक्रम निमित्त तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी जनसंवाद यात्रेबाबत राहुलजी गांधी यांचा संदेश आपल्या संवादातून सविस्तरपणे समजाऊन सांगितला.तर ओबीसी कांग्रेस सेलचे राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी यांनीही केंद्र व राज्य सरकार जनतेची पिळवणूक कशी करीत आहे.शिक्षण सुद्धा विकत असल्याने तुम्ही आतातरी जागृत होणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. समारोपीय कार्यक्रमाचे आभार शहर अध्यक्ष सुनील शेरकी यांनी केले.

     

    यात्रेत व समारोपीय कार्यक्रमाला युवक अध्यक्ष पवन नीलमवार,युवक शहर अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार,एन. टी.सेल अध्यक्ष गणेश गेडाम, महिला शहर अध्यक्ष नलिनी आडपवार,सचिव शामला बेलसरे,कोषाध्यक्ष राधिका बुक्कावार,सदस्य सीमा भसारकर समता बनसोड, विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष अरविंद बोरुले, उपसरपंच साहिल येंनगंटीवार, योगेश लेंनगूरे, साजिद शेख, गंगाधर घुगरे, ईश्वर लोनबले चिमढा ग्रा. पं.सर्व सदस्य, व असंख्य महिला पुरुष,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नाही, राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत – डॉ. अशोक जीवतोडे

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणार नाही त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, अजित पवार, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार व सर्व पक्षीयांचे डॉ. अशोक जीवतोडे यांनी जाहीर आभार मानले आहे.

     

    काल (दि.११) ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत सर्व पक्षीय बैठक मुंबई येथे पार पडली. त्या बैठकीत सर्व पक्षीय नेत्यांतर्फे असे ठरले की, ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्या जाणार नाही. मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील ओबीसी प्रवर्गाला धक्का लागू न देता मराठ्यांना आरक्षण दिले जावे असे मान्य केले. यासाठी त्यांचे जाहीर आभार डॉ. अशोक जीवतोडे यांनी मानले.

     

    मात्र या निमित्ताने बिहारच्या धरतीवर जात निहाय जनगणना करावी, विद्यार्थ्यांना वसतिगृह सुरू करावे व स्वाधार योजना सुरू करावी या व इतर मागण्या देखील सरकारने मान्य कराव्या असे मत देखील ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केले.

     

    सोबतच काल (दि.११) ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून मराठ्यांना ओबीसी समाजात समाविष्ट करू नये, याबाबत चर्चा केली. तसेच नागपूर येथे सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात सहभाग घेवून मार्गदर्शन केले.

     

    त्यानंतर मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी ओबीसी समाजाला चर्चेसाठी बोलवावे, असे पत्र देखील देण्यात आले आहे, असे डॉ. अशोक जीवतोडे यांनी सांगितले.

  • तर होमगार्ड बंदोबस्तात दिसणार नाही – होमगार्ड संघटनेचा शासनाला इशारा

    News34 chandrapur
    चंद्रपूर : राज्यात ४५ हजारांवर होमगार्ड कर्मचारी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून विविध उत्सवात बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र, होमगार्ड कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात आहे. कोणतेही कारण नसताना कामावरून काढणे, वेतन उशिराने देणे, कारणे दाखवा नोटीस बजावणे असे प्रकार सुरू असून, अनेक मागण्याही शासनाकडे प्रलंबित आहे.

     

    या सर्व समस्यांवर १५ सप्टेंबरपर्यंत तोडगा काढण्यात यावा, अन्यथा गृहविभागाच्या सर्वच बंदोबस्तांवर बहिष्कार घालण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासंघाचे व्यवस्थापकीय अध्यक्ष डॉ. प्रतापराव मोहिते पाटील यांनी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

    इंग्रज काळापासून राज्यात होमगार्ड ही संकल्पना असित्वात आहे. गृहविभागाच्या अंतर्गत हा विभाग असून, या विभागातील कर्मचारी अगदी तुटपुंज्या मानधनावर सेवा देत आहेत. होमगार्ड यांना ३६५ दिवस नियमित काम देण्यात यावे, बॉम्बे होमगार्ड ॲक्टमध्ये सुधारणा करण्यात यावी, पोलीस विभागाप्रमाणे होमगार्डसाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करण्यात यावी, होमगार्डला लोकसेवकाचा दर्जा देण्यात यावा, होमगार्डच्या पाल्यांना प्रशासकीय सेवाभरतीमध्ये अनुकंपातत्वावर नियुक्ती देण्यात यावी, होमगार्डच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करण्यात यावे आदी २० मागण्यांसाठी होमगार्ड महासंघाने मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण आंदोलन केले होते.

     

    यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी होमगार्डच्या मागण्यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिष्टमंडळाची भेट घालून मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढू असे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले होते. मात्र, दहा दिवस लोटूनही अद्याप कोणतीही चर्चा होमगार्ड महासंघासोबत करण्यात आली नाही. त्यामुळे राज्यभरातील होमगार्डमध्ये आक्रोश आहे. १५ सप्टेंबरपर्यंत निर्णय घेण्यात यावा, अन्यथा आगामी सण, उत्सवाच्या बंदोबस्तात होमगार्ड सहभागी होणार असा इशारा देण्यात आला आहे.

     

    होमगार्डच्या मुंबई कार्यालयातील कनिष्ठ अधिकारी विजय पवार हे जिल्हा कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून होमगार्ड कर्मचाऱ्यांची पिळवूणक करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आली.

     

    होमगार्ड वेल्फेअर फंडात ८ कोटींचा निधी असून, हा निधी होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी असताना त्या निधीचा कर्मचाऱ्यांसाठी वापर केला जात नाही, असा आरोपही यावेळी डॉ. प्रतापराव मोहिते पाटील यांनी केला आहे. पत्रकार परिषदेल चैतन्य मासूरकर, वीरेंद्र उके, राम बेलसरे, निखिल करवाडे, आर.एम. मोडक, विनोद गुनशेट्टीवार उपस्थित होते.

  • पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केला आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ

    News34 chandrapur

    चंद्रपूर : पुढील आठवड्यापासून गणरायाच्या आगमनाने सणासुदीला सुरुवात होत आहे. हे दिवस आनंद आणि उत्सवाचे असून या उत्सवात गरीब कुटुंब देखील सहभागी व्हावे, या उद्देशाने राज्यातील १ कोटी ६२ लक्ष कुटुंबांना (५ कोटी लोकसंख्या) आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक सामान्य माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच सरकारचे मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

     

    शहरातील जटपुरा गेट येथील स्वस्त धान्य दुकानात गणेशोत्सवनिमित्त आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, भाजपा महानगराचे अध्यक्ष राहुल पावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे, चंद्रपूरचे तहसिलदार विजय पवार, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी पांडुरंग माचेवाड, डॉ. मंगेश गुलवाडे, रामपाल सिंह, अंजली घोटेकर, छबु वैरागडे, रवी आसवानी, संदीप आवारी, संजय कंचर्लावार, शितल आत्राम, रवि गुरनुले, राहुल घोटेकर, रवि लोणकर, स्वस्त धान्य दुकानदार विजय बेले, अनिल बनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

     

    बाजारभावापेक्षा कमी दराने केवळ १०० रुपयांमध्ये हा आनंदाचा शिधा मिळणार आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘राज्य सरकारने गेल्यावर्षी दिवाळीमध्ये आणि यावर्षी गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव व इतर सणांमध्ये आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत, उत्सवाच्या दिवसात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचा हा एक प्रयत्न आहे. राज्य सरकार पूर्ण शक्तीने सामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे असून नागरिकांनी सुद्धा विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच पदाधिकाऱ्यांनी या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवाव्या.’ सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना सणानिमित्त राज्य शासनाकडून ‘आनंदाचा शिधा’ किट वाटप करण्यात येणार आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेचे १ लक्ष ३९ हजार ७५० लाभार्थी आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील २ लक्ष ७७ हजार २५० लाभार्थी असे एकूण ४ लक्ष १७ हजार लाभार्थी आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याकरीता ४ लक्ष ४ हजार ४९० आनंदाचा शिधा संच उपलब्ध झाला आहे. या कार्यक्रमाला चांद सय्यद, शीतल गुरुनुले, सविता कांबळे, सचिन कोतपल्लीवार, विठ्ठल डुकरे, दिनकर सोमलकर, अरूण तिखे, शिला चव्‍हाण, यांच्यासह वॉर्डातील नागरीक उपस्थित होते.

    ८९० कुटुंबांना मोफत आनंदाचा शिधा

    जटपुरा वॉर्ड क्रमांक १, रामनगर रोड, चंद्रपूर येथील वॉर्डात जवळपास ८९० कुटुंब आहेत. या सर्व कुटुंबांना मोफत आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. ८९० कुटुंबांचे प्रत्येकी १०० रुपये याप्रमाणे एकूण ८९ हजार रुपये यावेळी पक्षाच्या वतीने देण्यात आले. दुकानदारांनी संबंधित कुटुंबांना आनंदाचा शिधा देताना त्यांच्याकडून एकही रुपया घ्यायचा नाही, अशी स्पष्ट सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

    असा आहे आनंदाचा शिधा

    चनाडाळ १ किलो, रवा १ किलो, साखर १ किलो आणि पामतेल १ लीटर अशा चार पॅकेटचा हा आनंदाचा शिधा आहे. मशीनवर अंगठा लावताना आपल्या पिशवीत चार पॅकेट असल्याची लाभार्थ्यांनी खात्री करावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली.

    पालकमंत्री यांच्या हस्ते वाटप

    गणेशोत्सवानिमित्त पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वॉर्ड क्रमांक १ मधील लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. यात लता सिडाम, शहनाज हुसैन, प्रभुदास तेलमासरे, मरीयम शेख, मोहसीन शेख, लता बेले, मिरा तिवारी, संगिता लोखंडे, वासुदेव इटनकर, संजय रामटेके, अशोक शेंडे यांचा समावेश होता.

    गरिबांसाठी विविध योजना

    केंद्र व राज्य सरकारने गरिबांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना ना. श्री. मुनगंटीवार यांनी केली. संजय गांधी निराधार योजनेमध्ये सुरुवातीला मानधन ६०० रुपये होते. अर्थमंत्री झाल्यानंतर यात वाढ करून १२०० रुपये करण्यात आले. तर आता राज्य शासनाने हे अनुदान १५०० रुपये केले आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखांवरून आता ५ लाखांपर्यंत वाढविण्यात आली असून नागरिकांना ५ लक्षपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे.

     

  • चंद्रपूर मनसे जिल्हाध्यक्ष बालमवार यांचा वाढदिवस रक्तदान शिबिराने साजरा

    News34 chandrapur

    चंद्रपूर/पोम्भूर्णा – चंद्रपूर जिल्हा मनसे अध्यक्ष राहुल बालमवार यांच्या वाढदिवसानिमित्त मनवीसे तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी तब्बल 49 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

     

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर चे तडफदार नागरिकांच्या हाकेला धावून जाणारे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

     

    महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे पोम्भूर्णा शहर अध्यक्ष पवन बंकावार व तालुका अध्यक्ष आशिष नैताम यांनी बालमवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

    रक्तदान शिबिरात युवकांनी आपली अभूतपूर्व उपस्थिती दर्शवित रक्तदान कार्यक्रमात सहभागी होत रक्तदान केले, यावेळी तब्बल 49 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

     

    आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राहुल बालमवार, मनवीसे चंद्रपूर तालुका अध्यक्ष विवेक धोटे, जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, प्रकाश नागरकर, मयूर मंदारकर, कृष्णा गुप्ता, आकाश तिरुपतिवार, निखिल कन्नाके, रोशन भडके, राजू गेडाम, महेश नैताम, विवेक विरुटकर, सुजित परचाके आदि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील या अभियंत्यांची शासनाने घेतली दखल

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    उप विभागीय अभियंता प्रशांत वसुले यांचा उत्कृष्ट अभियंता म्हणुन होणार शासनाकडून सन्मान

    मूल : स्थानिक सार्वजनिक बांधकाम उपविभाग येथील उप विभागीय अभियंता प्रशांत चंद्रकांत वसुले यांना सन 2021-22 या कालावधीमध्यें अभियंता म्हणून उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल शासनाने वैयक्तिक पुरस्कार जाहीर केला असून येत्या अभियंता दिनी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सन्मानीत करण्यांत येणार आहे. Pwd chandrapur

     

    सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत रस्ते, पुल, विविध विभागांच्या इमारती व इतर सार्वजनिक बांधकाम करण्यांत येतात त्यांची संकल्पना तयार करून व इतर माध्यमांचा उपयोग करून संकल्पनाचित्रे बनवताना तसेच सार्वजनिक इमारतीच्या विद्युतीकरणाची काम करतांना तांत्रिक कौशल्य पणाला लागते आणि ज्यामुळे अश्या अभियंत्यांची सेवा समाजाला भविष्यात फायदयाची ठरते.

     

    अश्या अभियंत्यांचे प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्य लक्षात घेऊन भारतरत्न सर विश्वेश्वरया यांच्या 15 सप्टेंबर या जन्मदिनी पाळण्यात येणा-या अभियंता दिवशी त्यांचा वैयक्तिक पुरस्कार देवून सन्मान करण्यांत येते. याकरीता 8 जानेवारी 2018 पासून सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूल येथे सेवारत असलेले उप विभागीय अभियंता प्रशांत वसुले यांची शासनाने सन 2021-22 या वर्षाकरीता उत्कृष्ट अभियंता म्हणून निवड केली आहे.

     

    सेवेच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले यांनी उपविभागातंर्गत विकासाच्या दृष्टीकोनातून अनेक बांधकाम पुर्ण केली असून जिल्हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कार्यात प्रशांत वसुले यांचे योगदान तेवढेच महत्वाचे आहे. नवीन प्रशासकिय इमारत, स्व. कर्मवीर कन्नमवार सांस्कृतिक सभागृह, पत्रकार भवन, तालुका क्रिडा संकुलाचा विकास, नगर परिषदेचे निर्माणाधिन असलेले भव्य व्यापारी संकुल, नगर परिषदेची दोन मजली शाळा इमारत याशिवाय अलीकडेच लोकार्पण झालेले विश्राम गृह अश्या अनेक वास्तुंच्या निर्मिती शिवाय तालुक्यात वाहणा-या नदयांवरील पुल, चिरोली-सुशी आणि मारोडा-भादुर्णी मार्गावर निर्माण करण्यांत आलेले पुल कम बंधारे अश्या बांधकामाच्या अनेक योजना उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले यांनी सहकारी अभियंत्याच्या सहकार्याने पुर्णत्वात नेल्या असून तालुक्याच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे आहे.

     

    येत्या 15 सप्टेंबर रोजी प्रशांत वसुले यांचा मुंबई येथे होणा-या शासकिय कार्यक्रमात सन्मान करण्यांत येणार असल्याने मूल तालुक्याच्या लौकीकात पुन्हा भर पडली आहे. हे विशेष

     

  • 100 रुपयात महिनाभर चालवा सायकल

    News34 chandrapur

    चंद्रपूर  – राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर शहरात इंधनविरहित पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चंद्रपूर महानगरपालिकेने महत्वाचे पाउल उचलले आहे. शहरात सायकल चालविण्यास प्रोत्साहन मिळावे व नागरिकांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा, यासाठी शहरात राजीव गांधी उद्यान येथे ‘ शेअरिंग बायसिकल ‘ (सार्वजनिक सायकल सुविधा) हा उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवार ७ सप्टेंबर रोजी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आला.  Chandrapur municipality news

    100 रुपयात सायकल चालवा

    या उपक्रमाअंतर्गत २० सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या असुन राजीव गांधी उद्यान पठाणपुरा येथे नोंदणी व मासिक शुल्क भरून नागरिकांना भाडेतत्त्वावर सायकलींचा वापर करता येणार आहे. यासाठी अगदी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार असुन केवळ १०० रुपयात महिनाभर सायकल चालविता येणार आहे.

    सायकल प्रेम जागविण्याचा नवा मार्ग

    आज शहरात वाहनांची गर्दी होत असतांना अनेक गरजुंना वाहतुकीची साधने उपलब्ध नाहीत किंबहुना ते घेऊ शकत नाही. अश्यावेळेस इतर सार्वजनिक वाहतुकींच्या साधनांचा वापर करण्याऐवजी सायकल हा कुठल्याही प्रकारचे वायु प्रदूषण न करणारा सोपा पर्याय आहे. तसेच माफक शुल्कात उपलब्ध असल्याने सहज वापरण्याजोगा आहे.बाईक प्रेमी तरुणाईत सायकलप्रेम जागविण्याचा दृष्टीने मनपातर्फे सायकल शेअरिंग प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आले आहे.

     

    पैश्याची होणार बचत

    शहरात मोठ्या प्रमाणात कामगार, महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी येत असतात. रिक्षा किंवा इतर साधनांसाठी मोजाव्या लागणाऱ्या पैशांपेक्षा हा उपक्रम अधिक किफायतशीर ठरणार असल्याने अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

     

    याप्रसंगी माजी नगरसेवक नंदू नागरकर,अश्विनी अलगमवार,नीता आढोणे,वैशाली आढोणे,अनुराधा काळमेघ,वर्षा सोनटक्के रेखा रामटेके,रोहिणी काळमेघ,वर्षा खनके,पवन पुथोडे,प्रगती गुळकरी,पुष्पा नागरकर,प्रकाश चहारे,अनिता दुरटकर,रवींद्र नेरकर, अंजली साठोणे,प्राप्ती दहीवडे,माधुरी मेश्राम व परिसरातील नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.

  • शिवसेना म्हणते आता होऊ द्या चर्चा

    News34

    भद्रावती : वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) द्वारा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविल्या जात आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून थेट जनतेत जावून त्यांच्याशी विविध रूपाने नाळ जोडण्याचा प्रयत्न शिवसेना (ऊबाठा) पक्ष करीत आहे. याच पठडीतला “होऊ द्या चर्चा” हा थेट जनतेत जावून मतदारांना बोलत करणारा उपक्रम पक्षातर्फे घेण्यात आलेला आहे. त्याची सुरुवात शेतकऱ्यांचा वर्षातील सर्वात मोठा बैल पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.

     

    सदर उपक्रमाच्या माध्यमातून विद्यमान बोलघेवड्या राज्य सरकारच्या कामाची व योजनांची पुरेपुर कल्पना जनतेला यावी, या उद्देशाने बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड करण्यासाठी “होऊ द्या चर्चा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

     

    या उपक्रमाबद्दल माहिती देताना रविंद्र शिंदे म्हणाले की, उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यात अडीच वर्षे मुख्यमंत्री राहून जन-कल्याणकारी कार्य केले. ठाकरे सरकारने  शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली. त्यांच्या कारकिर्दीत कोविड-१९ चा प्रादुर्भाव देशभरात पसरलेला होता. त्या दरम्यान कोरोणा काळातील त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली. संयमी राहून कामांचा धडाका त्यांनी राज्यात राबविला होता. त्याउलट ज्या आमदारांना शिवसेनेने बनविले तेच पक्षाला बेईमान झाले व विद्यमान सरकार स्थापन केले.

     

    “खोटे बोला पण रेटून बोला”, या उक्तीप्रमाणे केवळ बोलघेवडेपणा करून सध्या राज्य सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे. विद्यमान राज्य सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर यावा. फक्त कागदावर व सरकार मधील नेत्यांच्या तोंडावर असलेल्या योजनांचा भांडाफोड व्हावा, गद्दारांची गद्दारी व एक फुल दोन हाफ सरकारचे अपयश जनतेसमोर आणावे, या हेतूने सदर उपक्रम जनतेत जावून राबविल्या जात असल्याचे रविंद्र शिंदे यांनी सांगितले आहे.

    शिवसेना (ऊबाठा) पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक जनतेत जावून ठाकरे सरकार व शिंदे सरकार या दोन्ही सरकारच्या काळातील कारकिर्दीची तुलनात्मक चर्चा या उपक्रमाच्या माध्यमातून करणार असून जनतेच्या मनातील उत्कृष्ठ सरकार कोणते, हे जाणून घेणार आहे.

    जनतेनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना (ऊबाठा) वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले आहे.