Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Chandrapur News : शिक्षक जितेंद्र लेनगुरे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानीत

    Chandrapur News : शिक्षक जितेंद्र लेनगुरे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानीत

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई या संस्थेच्या प्रेरणेणे राज्यस्तरीय गुणरत्न गौरव पुरस्कार महासम्मेलन २०२३ करिता चंद्रपूर जिल्हातील मुल तालुका येथील शिक्षक श्री जितेंद्र लेनगुरे यांची निवड करण्यात आली असून त्यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

     

    हा पुरस्कार मुल येथील आठवडी बाजार लोकार्पण सोहळा येथील कार्यपक्रमात नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर, वधी जिल्हा महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते २६ जानेवारी २०२४ रोजी स्मृती चिन्ह, प्रमानपत्र, पदक व मानवस्त्र देऊन सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी माजी जी.प. अध्यक्षा संध्याताई गुरनुले, माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, माजी न.प. उपाध्यक्ष नंदू रणदिवे आदी गणमान्य व्यक्तीची उपस्थिती होती.

     

     

    यापूर्वी जि. प. चंद्रपूरच्या वतीने २०२० मधे आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे. जितेंद्र लेंनगूरे हे सामाजीक, शैक्षणिक व सांस्कृतीक कार्यात नेहमीचं सक्रिय राहून काम केल्याने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते स्वतःच्या वडीलांच्या स्मृती दिनानीमीत्य होतकरू विद्यार्थ्यांना व गरुजू लोकांना साहित्याचे वाटप करतात, २०२१ ला जुनासूरला येथे ६० ब्लैकेट वाटप केले. २०२२ व २०२३ यावर्षी जुणासूर्ला, बोडांला खुर्द, भांजाळी व चक दुगाळा येथे 100 पाणी क्यान वाटप केले.असे कौतुकास्पद उपक्रम दरवर्षिच आपल्या वाढदिवसाच्या औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यंना वाटप करतात. तसेच शालेय साहित्याचे वाटप केले आहे. असे उपक्रम शेवटच्या क्षणापर्यंत सुरु सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे ते सामाजीक, शैक्षनिक सांस्कृतीक कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असतात. संघटनात्मक कार्यात पुढाकार घेतात.

     

    श्री.जितेंद्र लेंनगूरे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सामाजिक कार्यकर्ते माजी प्राचार्य बंदुभाऊ गुरनुले, कांग्रेस तालुका अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार गुरुभाऊ गुरनुले, नांदुभाऊ रणदिवे, माजी जी.प. सदस्य प्रा. रामभाऊ महाडोरे, कांग्रेस राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी संजय गांधी नी.यो.सदस्य राकेश ठाकरे, प्रा.विजय लोंनबले, माजी न.प.उपाध्यक्ष चंद्रकांत चतारे , किशोर कापगते, माजी नगराध्यक्ष वासुदेव लोनबले, माजी न.प. सभापती प्रशांत समर्थ, दिलीप कुंतावार,प्रकाश शेंडे,शिक्षक, नागेंद्र नेवारे, रामचंद्र मेश्राम, सरपंच रणजित समर्थ, मनोज बेले, राजू खामनकर,लक्ष्मण खोब्रागडे, उमाकांत दोडके, चित्तरंजन वाढई, बलराम वाळके इत्यादींनी जितेंद्र लेनगुरे यांचे अभिनंदन केले आहे.

  • Union Interim Budget 2024 : विकासाचा नव्हे तर आगामी निवडणुकीचा हा अर्थसंकल्प – डॉ. अभिलाषा गावतुरे

    Union Interim Budget 2024 : विकासाचा नव्हे तर आगामी निवडणुकीचा हा अर्थसंकल्प – डॉ. अभिलाषा गावतुरे

    News34 chandrapur

    चंद्रपूर – केंद्र सरकारचे अंतरिम अर्थसंकल्प आज केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारमन यांनी आज सादर केला, आजचे अर्थसंकल्प निव्वळ आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर केले अशी प्रतिक्रिया डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी दिली आहे.

     

    अतिश्रीमंत उद्योगपतींच्या गरीब देशात प्रस्तुत केलेलं २०२४ चे बजट व १० वर्षाच्या आर्थिक वाटचालीचे रिपोर्ट कार्ड म्हणजे समोरच्या निवडणुका लक्षात घेऊन सामाजिक न्याय, आर्थिक सहिष्णुता, महिला सन्मान, विकसित भारत सारख्या शब्दांची नुसती लखोरी अर्थमंत्री निर्मला सितारमन कडून वाहिली गेली.

     

    दरवर्षी शेतकरी, कष्टकरी, महिला, युवा, विद्यार्थी यांच्या तोंडाला पाने पुसणारा हा बजट मुळातच कुठले ठोस योजना व त्यांची अंमलबजावणी करताना दिसत नाही. अर्थमंत्री आरोग्याच्या बाबतीत उपलब्ध मानवी संसाधन व पायाभूत सेवांना बळकट करण्यापेक्षा नवे फसवे स्वप्न दाखवीत आहेत. शेतकऱ्याला हमी भाव नाकारून सन्मान योजनेच्या नावाखाली भीक देणे म्हणजे बळीराजाचा अपमान आहे. Union finance minister nirmala sitaraman

     

    शिक्षणाला बजेट नाकारुन,चांगल्या दर्जाचे प्राथमिक व उच्च शिक्षण नाकारून युवकाना स्किलइंडिया सारखे फसवे कार्यक्रम म्हणजे वेठबिगारी ला लावण्याचा प्रकार आहे. जर २५ टक्के लोक गरिबी रेषेच्या वर आले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले तर ८० कोटी लोकांना मोफत राशन ची देण्याची गरज का पडत आहे? या देशातील बहुसंख्य असलेला ओबीसी, एससी,एसटी यांचा देशातील उद्योग व देशातील साधन संपत्तीवर किती हिस्सा? महाज्योती, सारथी योजनेसाठी पुरेसा बजट नाही. Budget 2024

     

    उच्चशिक्षणामध्ये महिलांचे प्रमाण वाढले पण व्यावसायिक शिक्षण घेऊन किती महिला सक्षम झाल्या याचे आकडे नाहीत! गेल्या ५ वर्षात प्रवेश मिळविलेले १३००० बहुजन विद्यार्थी IIT सारख्या संस्थांमधून बाहेर का फेकल्या गेले त्याचे उत्तर नाही! एकीकडे शाळा चालविणे व युवकाना पगार देणे परवडत नाही म्हणून शाळा बंद व नोकऱ्या कंत्राटी करणे , महांगाई वर न बोलणे , विकासाच्या नावावर फक्त भंपक बाजी करणे या सगळ्यागोष्टीला जनता कंटाळली आहे व हे बजट विकासाचे बजेट नसून फक्त इलेक्शन बजेट आहे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी दिली आहे.

  • Budget 2024 : आकड्यांचा खेळ मांडून भ्रमनिरास करणारा अर्थसंकल्प – आमदार प्रतिभा धानोरकर

    Budget 2024 : आकड्यांचा खेळ मांडून भ्रमनिरास करणारा अर्थसंकल्प – आमदार प्रतिभा धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 1 फेब्रुवारीला केंद्र सरकारचे अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केल3 मात्र हा अर्थसंकल्प भ्रमनिरास करणारा असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली आहे.

     

     

    आज मांडण्यात आलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा जन सामान्यांची फसवणूक करणारा आहे. आकड्यांचा खेळ मांडून अर्थ मंत्री निर्मला सीतारामण यांनी स्वतःची व सरकारची पाठ थोपटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. समोरील निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून मांडलेला हा अर्थसंकल्प असल्याचे दिसून येत आहे.

     

     

    या अर्थसंकल्पात युवक, शेतकरी यांच्या करीता कुठलेही स्थान नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे अर्थमंत्री ग्रामीण भागातील नागरीकांचे उत्पन्न वाढल्याचे सांगत आहे तर दुसरीकडे स्वतः च 80 करोड नागरीकांना अन्नधान्य पुरवत असल्याचे सांगत आहे. यावरुन केंद्र सरकारचा खोटारडेपणा जनतेसमोर येत आहे. भविष्यात आवास योजना अस्तित्वात आणू हे सांगून गरीब नागरिकांना गाजर दाखवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.

  • Shivani Wadettiwar : कामगार क्षेत्रात शिवानी वडेट्टीवार यांच्या “विजयी क्रांतीला” सुरुवात

    Shivani Wadettiwar : कामगार क्षेत्रात शिवानी वडेट्टीवार यांच्या “विजयी क्रांतीला” सुरुवात

    News34 chandrapur

    चंद्रपूर –  औद्योगिक जिल्हा म्हणून सर्व दूर परिचित असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कारखाने सुरू आहेत. मात्र स्थानिक भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीय कामगारांचा भरणा तसेच स्थानिकांना अल्प वेतनात तसेच अनियमित काम देत कामगारांची थट्टा करणाऱ्या सिमेंट कंपनी व्यवस्थापना विरोधात विजय क्रांती संघटनेने मोठे आंदोलन उभे केले. या आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तथा विजय क्रांती संघटनेच्या अध्यक्षा शिवानी वडेट्टीवार यांनी केले. विजय क्रांती संघटनेने हाती घेतलेल्या कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाला मोठे यश आले असून कंपनी व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेतल्याने कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या. यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात वाढते औद्योगीकरण हे जिल्ह्याच्या विकासात भर टाकणारे असले तरी मात्र येथे कार्यान्वित झालेल्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये प्रचंड प्रमाणात कामगारांची अवहेलना होत आहे. स्थानिक भूमिपुत्रांना डावलून तसेच प्रकल्पग्रस्त व इतर कंत्राटी कामगार यांना नियमित कामावर न घेता तसेच कामावर घेत असल्यास त्यांना अल्प वेतन देऊन त्यांची आर्थिक पिळवणूक गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील कंपनी व्यवस्थापनाकडून होत आहे. अशातच कामगारांच्या प्रश्नांना घेऊन वेळोवेळी आंदोलने करणारी जिल्ह्यातील नामवंत विजय क्रांती कामगार संघटना यांनी कटाक्षाने कंपनी व्यवस्थापनाच्या पिळवनुकी विरोधात गेल्या दोन दिवसापासून आंदोलन छेडले. यात विजय क्रांती कामगार संघटनेचे नांदा फाटा येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी, उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनी, व घुगुस येथील एसीसी सिमेंट कंपनी या कंपन्यांच्या विरोधात संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलनाद्वारे निदर्शने करण्यात आली.

     

    तर विजय क्रांती संघटनेच्या सर्वेसर्वा तथा प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. याची गंभीर दखल घेत चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज तीनही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांना बोलवून तसेच विजय क्रांती कामगार संघटनेच्या अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार व त्यांचे सहकारी यांना निमंत्रित करून यावर विस्तृत चर्चा करण्यात आली.

     

    पार पडलेली चर्चा ही कामगाराच्या हिताची ठरली असून यात कंत्राटी कामगारांच्या वेतनाबाबतचा प्रश्न तसेच त्यांना नियमित काम देण्यात यावे व स्थानिक भूमिपुत्रांच्या मागण्या याबाबत करण्यात आलेली सकारात्मक चर्चा यावर कंपन्या व्यवस्थापनांनी नरमाई घेत येत्या 1 एप्रिल 2024 पासून सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे लेखी स्वरूपात दोन दिवसाचे आत जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येईल अशी भूमिका घेतल्याने कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.हे विजय क्रांती कामगार संघटनेचे मोठे यश असून कामगारांच्या यशस्वी लढा सार्थक ठरल्याचे मत विजय क्रांती संघटना अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार यांनी कळविले आहे.

     

    जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीस प्रामुख्याने विजय क्रांती संघटनेच्या अध्यक्षा शिवानी वडेट्टीवार, कार्याध्यक्ष प्रवीण लांडगे, विजय क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे,युवक काँग्रेसचे शिवा राव, बल्लारपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल करीम शेख, युवक काँग्रेसचे चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडुर, उपाध्यक्ष रमेश शेख, युवक काँग्रेसचे कुणाल चाहारे,सचिन कत्याल, भानेश जंगम, प्रफुल जाधव, शालिनी भगत ,कुणाल गाडगे, राजेश नक्कनवार प्रामुख्याने उपस्थित होते.

     

    हा विजय म्हणजे कामगारांच्या संघटित लढ्याची यश – शिवानी वडेट्टीवार
    चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक व अंबुजा या सिमेंट कंपन्यातील कामगार तसेच घुगुस येथील एसीसी सिमेंट कंपनी मधील कामगार यांनी विजय क्रांती कामगार संघटनेवर विश्वास ठेवून आमचे नेतृत्वात कंपनी व्यवस्थापना विरुद्ध संघटित होऊन जो लढा दिला हे त्या लढ्याचे फलित असून आता कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांची आर्थिक पिळवणूक होणार नाही. अन्याय विरुद्ध लढा असे विजय क्रांती कामगार संघटनेचे ब्रीद असून कामगारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्राधान्य क्रमाने प्रयत्नशील राहू व लवकरच कामगारांना अपेक्षित वेतन व काम मिळेल. असे प्रतिपादन प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस तथा विजय क्रांती कामगार संघटनेच्या अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर प्रतिक्रिया देताना मत व्यक्त केले.

  • Bear In Chandrapur City : चंद्रपुरात अस्वलीने ठोठावले चिकन सेंटरचे शटर

    Bear In Chandrapur City : चंद्रपुरात अस्वलीने ठोठावले चिकन सेंटरचे शटर

    News34 chandrapur

    चंद्रपूर- शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या भिवापूर वार्डातील सुपर मार्केट जवळ अस्वलाच्या धुमाकूळामुळे नागरीकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. भिवापूर वार्डातील एका दुकानात नागरीक बचावासाठी गेले असता अस्वलीने त्या दुकानात शिरकाव करण्याचा प्रयत्न केल्याचा सीसीटीव्ही कॅमेरे व्दारे दिसून येत आहे. Bear in city

     

    31 जानेवारीला मध्यरात्री 12.30 वाजता अचानक एक अस्वल नागरिकांच्या मागे लागली, त्यावेळी नागरिकांनी जवळील इंडियन चिकन सेंटरमध्ये धाव घेतली, वेळेवर नागरिक आत शिरल्याने तात्काळ शटर बंद केल्याने काही अनुचित घटना यावेळी घडली नाही. Wild animal सदर संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

     

     

    मागील महिन्यात अंचलेश्वर मंदिर व लालपेठ भागात अस्वलांचा मुक्तपणे संचार सुरू आहे, नागरिकांनी अनेकदा सदर बाब वनविभागाला सांगितली मात्र त्यांचा काही प्रतिसाद मिळत नाही आहे, त्यामुळे एकदिवस अनुचित घटना घडल्यावर वनविभाग जागा होणार जे निश्चित.

     

    रात्रीच्या सुमारास जंगलातून अस्वल रस्ता भटकली असावी त्यामूळे ती वारंवार शहराकडे धाव घेत आहे.

  • IPS Transfer : चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांनी पोलीस अधीक्षक पदी आयपीएस अधिकाऱ्यांची एंट्री

    IPS Transfer : चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांनी पोलीस अधीक्षक पदी आयपीएस अधिकाऱ्यांची एंट्री

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे वाऱ्यावर गेली आहे, त्यांतच चंद्रपूर जिल्ह्यात प्रोमोटेड पोलीस अधीक्षक आले, मात्र आता अनेक वर्षांनी जिल्ह्यात तरुण IPS ची एंट्री होणार आहे. IPS transfer

     

    गृह विभागाने आज राज्यातील अनेक IPS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले त्यामध्ये चंद्रपूर पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांची बदली परभणी जिल्ह्यात झाली, आता चंद्रपूर जिल्ह्यात नागपूर शहर उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांची वर्णी लागली आहे. Chandrapur ips transfer

     

    मागील पोलीस अधीक्षकांचा कार्यकाळ बघता जिल्ह्यात गुन्हेगारी मोठया प्रमाणात गुन्हेगारी वाढली, गोळीबार, खून व संघटित गुन्हेगारीने जिल्ह्यात डोकं वर काढलं आहे, अनेक पोलीस अधीक्षकांनी यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला मात्र आजही सर्व अनियंत्रित आहे, अश्यात चंद्रपूर जिल्ह्यात आयपीएस अधिकारी मुमक्का सुदर्शन यांची एंट्री होत आहे.

  • Scam worth lakhs in Chandrapur : चंद्रपुरातील या पतसंस्थेत 49 लाखांची अफरातफर

    Scam worth lakhs in Chandrapur : चंद्रपुरातील या पतसंस्थेत 49 लाखांची अफरातफर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दैनंदिन आर्वती ठेव, आरडी खाते उघडत नागरिक आपल्या मेहनतीचे पैसे बँक किंवा पतसंस्थेत जमा करतात मात्र त्यांच्या पैश्यावर पतसंस्थेतील संचालक, अध्यक्ष हे डल्ला मारतात, असाच एक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला आहे. या पतसंस्थेत तब्बल 48 लाख रुपयांची अफरातफर करण्यात आली आहे. Cooperative Credit Institutions

     

     

    फिर्यादी रमणकुमार निमकर, सनदी लेखापाल यांचे लेखी रिपोर्ट वरून पो.स्टे. रामनगर जिल्हा चंद्रपूर येथे अपराध क्रमांक २११/२०२३ कलम- ४०६,४०९, ४२०,३४ भा. द. वि. सहकलम ३ महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम १९९९ अन्वये चंद्रपूर जिल्हा मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चंद्रपूर रजिस्टर नंबर १५४ मधील गैरव्यवहार प्रकरणी संचालक मंडळ, कर्मचारी, अभिकर्ता / एजंट नामे १) राजाराम तुकाराम भडके, व्यवस्थापक २) गौतम केशम जीवने, अध्यक्ष ३) अजित राजाराम भडके, उपाध्यक्ष ४) विवेक आत्माराम नळे, संचालक ५) लोकचंद रेदुलील लिव्हारे, संचालक ६) देवराव राघोबा पिंपळकर, संचालक ७) सुभद्रा अनिल निरापुरे, संचालक ८) गीता वासुदेव दास, संचालिका ९) गीता विजय पालनवार, संचालिका १०) रवींद्र दामोदर बारेकर, अभिकर्ता/ लिपिक यांनी दिनांक ०१.०४.२०१९ ते दिनांक ३१.०३.२०२१ या कालावधीमध्ये ४९,४८,१७८/- रुपयांचा गैरव्यवहार तथा अफरातफर केल्याने त्यांच्याविरुद्ध सदरचा गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर करीत आहे. Chandrapur scam

     

     

    सदर संस्थेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी दैनंदिन ठेव, आवर्ती ठेव व मुदत ठेव अशा योजनेमध्ये रकमेची गुंतवणूक केलेली आहे परंतु सदर पतसंस्थेकडून गुंतवणूकदारांची रक्कम परत केलेली नाही अशा गुंतवणूकदारांच्या रकमेच्या याद्या तयार करणे सुरू आहेत.

     

    तरी ज्या गुंतवणूकदारांनी रक्कम परत मिळाली नाही अशा गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचे कागदपत्र (गुंतवणुकीचे एफ डी सर्टिफिकेट, रक्कम जमा केल्याच्या पावत्या, आधार कार्ड, पॅन कार्ड ज्या खात्यावर पैसे पाहिजे आहेत त्या बँक खात्याचे पासबुकच्या प्रथम पाण्याची झेरॉक्स प्रत) इत्यादी माहितीसह परिशिष्ट १ प्रमाणे फार्म भरून देणे करिता आर्थिक गुन्हे शाखा पो.स्टे. दुर्गापूर परिसर पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर येथे दिनांक ०१-०२- २०२४ ते दिनांक १०-०२-२०२४ दरम्यान यावे. याकरिता अशी बातमी सर्व वर्तमानपत्र सोशल मीडियावर प्रकाशित करण्यात येत आहे.

  • Chandrapur Municipal Corporation : मराठा सर्वेक्षण कार्यात निष्काळजीपणा, सर्व्हेक्षण प्रगणक निलंबित

    Chandrapur Municipal Corporation : मराठा सर्वेक्षण कार्यात निष्काळजीपणा, सर्व्हेक्षण प्रगणक निलंबित

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाच्या कामात दुर्लक्ष केल्याने सर्वेक्षण प्रगणक सुनील माळवे यांना निलंबित करण्यात आले असुन सदर सर्वेक्षण हे महत्वाचे शासकीय कार्य असल्याने मुदतीत व काटेकोरपणे करण्याचे निर्देश चंद्रपूर मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत. Maharashtra State Commission for Backward Classes

     

    महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी कुटुंबातील नागरिकांचे सर्वेक्षण २३ जानेवारी पासुन केले जात आहे. या कामात चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ४९ पर्यवेक्षक व ७३९ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.Maratha survey work

     

    सदर कर्मचाऱ्यांना रीतसर प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले.मात्र प्रगणक म्हणुन जबाबदारी देण्यात आलेले सुनील माळवे यांनी प्रशिक्षण पुर्ण करून सुद्धा काम स्वीकारले नाही.अनेकवेळा सुचना देऊन देखील काम सुरु न केल्याने त्यांच्यावर निलंबनाची सक्त कारवाई करण्यात आली.

     

    सर्वेक्षणात मनपा तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली असुन आतापर्यंत ५६ हजार २४६ कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. नागरिकांचे सहकार्य मिळावे यासाठी सर्वेक्षणाची माहिती ध्वनी यंत्रणा,वृत्तपत्रे,समाज माध्यमांद्वारे सर्वत्र देण्यात आली आहे. आता सर्वेक्षणास २ दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळाला असला तरी ते निश्चित कालावधीत व काटेकोरपणे होणे आवश्यक असल्याने कुठल्याही स्वरूपाची हयगय खपवुन घेतली जाणार नसल्याचे चंद्रपूर मनपा आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे.

  • Chandrapur Industrial pollution : चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक प्रदूषण – राजेश बेले

    Chandrapur Industrial pollution : चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक प्रदूषण – राजेश बेले

    News34 chandrapur

    चंद्रपूर: चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिक प्रदूषणामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचा आरोप करत संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष राजेश बेले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांना निवेदन दिले आहे.

     

     

    निवेदनात बेले यांनी म्हटले आहे की, या तीन जिल्ह्यांतील औद्योगिक कंपन्यांकडून होणारे वायू आणि जल प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रदूषणामुळे दमा, हृदयविकार, डोळे, त्वचा, कर्करोग, नवजात शिशु मृत्यू, टीबी आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.

     

     

    बेले यांनी आरोप केला आहे की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव अश्विन धकणे, हवा प्रदूषण नियंत्रण प्रधान दिग्दर्शक वि. एम. मोटघरे, प्रधान वैद्यकीय वैदयानिक अधिकारी विश्वजीत ठाकूर आणि प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांनी या प्रदूषण रोखण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही. उलट, या अधिकाऱ्यांनी कंपन्यांसोबत साठगाठ करून प्रदूषण रोखण्यास टाळाटाळ केली आहे.

     

    बेले यांनी या अधिकाऱ्यांवर उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

     

    या तीन जिल्ह्यांतील वाढत्या औद्योगिक प्रदूषणाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्य सरकारने या प्रदूषणाला रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

  • Rahuri Advocate Murder News : अधिवक्ता संरक्षण कायदा लागू करा – चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन

    Rahuri Advocate Murder News : अधिवक्ता संरक्षण कायदा लागू करा – चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दि. २५/०१/२०२४ रोजी अहमदनगर जिल्हयातील राहुरी तालुक्यातील अधिवक्ता राजाराम आढाव व त्यांची पत्नी सौ. मनिषा आढाव या वकील दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती, या घटनेमुळे राज्य हादरले, अधिवक्ता दाम्पत्यावर असा हल्ला होणे हे एक कृरकृत्य होते या घटनेचा निषेध करीत चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने निषेध दर्शवित जिल्हाधिकारी गौडा यांना अधिवक्ता यांच्या संरक्षणार्थ अधिवक्ता संरक्षण कायदा लागू करण्याबाबत निवेदन दिले. Advocate couple murder case

     

    आरोपींनी आधी आढाव दाम्पत्याचे अपहरण करीत 5 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती, पैसे न मिळाल्याने आढाव दाम्पत्याची हत्या करीत त्यांचा मृतदेह विहिरीत फेकून दिला होता, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली असता सर्व आरोपीना अटक करण्यात आली. Chandrapur district bar association

    चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन 30 जानेवारीला अधिवक्ता संघाने निषेध करीत अश्या घटना पुन्हा होऊ नये यासाठी अधिवक्ता यांच्या संरक्षणार्थ कठोर कायदे करण्याची गरज आहे अशी माहिती बार असोसिएशनचे सचिव खडतकर यांनी दिली आहे.