Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Chandrapur Pollution : रासायनिक द्रव्याच्या नमुन्यामध्ये फेरफार, चौकशी करा – राजेश बेले

    Chandrapur Pollution : रासायनिक द्रव्याच्या नमुन्यामध्ये फेरफार, चौकशी करा – राजेश बेले

    News34 chandrapur

    चंद्रपूर: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. Air pollution

     

    प्रादेशिक अधिकारी श्री. तानाजी यादव आणि प्रभारी वैज्ञानिक अधिकारी श्री. बिपीन भंडारी यांच्यावर M/s. Sunflag Iron and Steel Co. Ltd. बेलगाव अंडरग्राऊंड कोळसा खाणी प्रकल्पामुळे घातक रासायनिक द्रव्यांच्या नमुन्यांमध्ये फेरफार करण्याचा आरोप आहे. 16 जानेवारी 2024 रोजी घेतलेल्या नमुन्यांच्या विश्लेषण अहवालात हे फेरफार करण्यात आले असल्याचे आरोप आहे. Chandrapur heavy pollution

     

     

    श्री. बेले यांच्या म्हणण्यानुसार, हे दोन्ही अधिकारी 2023 पासून पदावर आहेत आणि त्यांच्या कार्यकाळात अनेक जल आणि वायू प्रदूषणाच्या नमुन्यांमध्ये फेरफार करण्यात आले आहेत. यामुळे औद्योगिक कंपन्यांना फायदा झाला आहे आणि पर्यावरणाचे नुकसान झाले आहे.

     

     

    या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी श्री. बेले यांनी केली आहे.

  • Chandrapur Janta Raja : चंद्रपुरात स्वागत गेट लावण्यावरून वादाचे महानाट्य

    Chandrapur Janta Raja : चंद्रपुरात स्वागत गेट लावण्यावरून वादाचे महानाट्य

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपुरात 2 फेब्रुवारी पासून सांस्कृतिक मंत्रालय व चंद्रपूर मनपाच्या वतीने जाणता राजा महानाट्याला सुरुवात झाली मात्र त्या महानाट्य आधी चंद्रपुरात स्वागत गेट लावण्यावरून नव नाट्य नागरिकांना मुख्य मार्गावर बघायला मिळाले. Janta raja play

     

    2 फेब्रुवारीला दुपारी भाजप व यंग चांदा ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची बघायला मिळाली. Chandrapur political drama

     

    स्थानीक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहाच्या समोर नाटक बघायला येणाऱ्या नागरिकांसाठी भव्य स्वागत गेट उभारले, त्याठिकाणी 2 बाजूने स्वागत गेट उभारण्याची परवानगी आमदार जोरगेवार यांच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती मात्र त्यावेळी भाजप व आमदार जोरगेवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये स्वागत गेट लावण्यावरून नवा वाद सुरू झाला.

     

    दोन्ही गटाच्या बाचाबाची नंतर एकीकडे आमदार जोरगेवार यांचे स्वागत गेट तर दुसऱ्या बाजूला पालकमंत्री मुनगंटीवार यांचे स्वागत गेट लावण्यात आले.

  • Shiva Wazarkar Chandrapur : शिवा वझरकर हत्याकांडातील आरोपीच्या कार्यालयातून शस्त्रसाठा जप्त

    Shiva Wazarkar Chandrapur : शिवा वझरकर हत्याकांडातील आरोपीच्या कार्यालयातून शस्त्रसाठा जप्त

    News34 chandrapur

    चंद्रपूर – आठवडाभरापूर्वी घडलेल्या शिवा वझरकर या व्यक्तीच्या खुनाच्या आरोपातील आरोपी स्वप्नील काशिकरच्या कार्यालयातून शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे. ही मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. या घटनेने चंद्रपूर महानगरात खळबळ उडाली आहे. Chandrapur news

     

    25 जानेवारी ला चंद्रपुर शहरातील रामनगर पोलिस स्टेशन हद्दीतील अरविंदनगर परिसरात ७-८ इसमांनी मिळून शिवा वझरकर या इसमाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. या घटनेने चंद्रपुर महानगरात एकच खळबळ माजली होती. सदर गुन्ह्याचे गांभिर्य पाहून या घटनेचा तपास गुन्ह्याचा पोलीस अधिक्षकानी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकरिता वेगवेगळी पथके तयार करून सदर गुन्ह्यातील आठ आरोपीतांना अटक केली. Shiva wazarkar chandrapur

     

     

    अटकेतील आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांचेवर विविध गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्यात आरोपी हे पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून यातील मुख्य आरोपी स्वप्नील काशिकर याचा रेतीचा तसेच ट्रांसपोटींगचा व्यवसाय आहे. यातील मृतक हा यापुर्वी स्वप्नील काशिकर याचे कडेच ठेकेदारीचे काम करायचा. पुढे चालून वर्चस्वाच्या तसेच पैशाच्या व्यवहाराच्या कारणावरून स्वप्नील काशिकार याचे ऑफीसचे समोरील मोकळ्या जागेतच शिवा वाझरकरची हत्या करण्यात आली.

     

    पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान स्वप्नील काशिकर याचे ऑफीसची झडती घेतली असता त्याचे ऑफीसचे सोफ्यातून एक लोखंडी तलवार, एक एअर गन, ऑफीस टेबलचे खाली एक लोखंडी तलवार, एक स्टीलचे खंजीर असा मोठा शस्त्रसाठा मिळून आला. सदरचा शस्त्रसाठा स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेण्यात आला. सदर शस्त्रसाठा कुठून आणला याबाबत आरोपीतांकडून सखोल तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.

     

    ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात सपोनि. जितेंद्र बोबडे, सपोनि. नागेशकुमार चतरकर, सपोनि. किशोर शेरकी, सपोनि. विकास गायकवाड, पोउपनि. विनोद भुरले, पोहवा. सुधिर मत्ते, पोशि. नितीन रायपुरे, मिलींद जांभुळे, प्रमोद कोटनाके, चापोहवा. प्रमोद डंभारे, चापोशि. रूषभ बारसिंगे यांनी केली.

  • Chandrapur Wcl News : एक ही डिस्पैच नम्बर के दो आदेश, चंद्रपुर वेकोलि कार्यालय का मामला

    Chandrapur Wcl News : एक ही डिस्पैच नम्बर के दो आदेश, चंद्रपुर वेकोलि कार्यालय का मामला

    News34 chandrapur

    चंद्रपूर – कोल इंडिया की अनुषंगी कंपनी वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड मे कार्यरत कर्मचारियों द्वारा लिपिक ग्रेड 3 के लिए आवेदन किये थे। उक्त पद के लिए 4 फरवरी को परीक्षा हेतु 28 कर्मचारियों को परीक्षा के दिन कार्यमुक्त करने के आदेश वेकोलि चंद्रपुर क्षेत्र के प्रशासन विभाग द्वारा 29/30 जनवरी को निकाला था ।
    जिसमे 29 जनवरी की तारीख प्रिंट और 30 जनवरी की तारीख हाथोंसे लिखा गया है।

     

     

    आदेश में खास बात यह है कि एक ही दिन एक ही डिस्पैच क्रमांक के दो अलग अलग आदेश निकाले है। जिसमे 27 कर्मचारियों की संख्या वाले आदेश में 28 नंबर दर्शाया गया जिसे गौर से देखने पर यह पता चला कि अनुक्रमांक 7 के बाद 9 दर्शाया गया और एक कर्मचारी का नाम हटाया गया औऱ उस आदेश पर कार्मिक प्रबंधक / प्रशासन द्वारा साइन किया यह आदेश अब सवालो के घेरे में आ चुका है। अधिकारियों को गिनती सीखने की जरूरत होने की चर्चा कर्मचारियों में है

     

    क्योंकि एक ही कार्यालय आदेश की कॉपी दोबारा निकाली गई, खास बात यह है कि वरिष्ठ अधिकारी इतनी बड़ी गलती को नजरअंदाज कैसे कर सकते है।

  • Congress News :  तालुका काँग्रेसच्या वतीने हळदीकुंकू स्नेहमिलन महिला मेळावा सप्पन्न

    Congress News : तालुका काँग्रेसच्या वतीने हळदीकुंकू स्नेहमिलन महिला मेळावा सप्पन्न

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले
    मुल – मकरसंक्रांतीच्या निमित्ताने महिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी मूल तर्फे हळदी कुंकू आणि स्नेह मिलन मेळावा तालुका कांग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला.

     

    सदर मेळाव्याचे उद्घाटन राजमाता आई जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन स्नेह मिलन सोहळ्याचे अध्यक्षा सौ. ममता रावत, प्रमुख मार्गदर्शक सोनाली रत्नावार, माजी जी.प. सदस्या मंगला आत्राम, पल्लवी कन्नमवार, रश्मी गांगरेड्डीवार, सौ. चेतना येनुरकर, चंदा कामडी, माधुरी गुरनुले, यांनी मनोगत व्यक्त करतांना कांग्रेस मजबूत करावे असा सल्ला दिला. तसेच कांग्रेस विचार सरणीच्या महिलांनी एकत्र येऊन संघटन मजबूत करून येत्या निवडणुकीत स्त्रीशक्ती दाखऊन द्यावी असे मनोगत मंगला आत्राम यांनी केल्या.
    उपस्थित महिलांना काँग्रेसच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी हळदी कुंकू लावून भेट वस्तू भेट दिल्या.

     

    यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना काँग्रेसने सुरु केलेल्या शासनाच्या योजनाच्या माध्यमातुन महिलांचा आर्थिक व सामाजिक विकास साधावा. अडचंणं आल्यास आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे अभिवचन यावेळी महिलांना दिले. कार्यक्रमाचे आयोजन महिला काँग्रेस पक्षांचे तालुका अध्यक्ष रुपाली संतोषवार, शहर अध्यक्षा नलिनी आडपवार, शामलता बेलसरे, समता बनसोड, राधिका बुक्कावार, यांनी परिश्रम घेतले. संचालन माजी नगर सेविका लीना फुलझेले यांनी केले तर आभार शामलता बेलसरे यांनी मानले. हळदी कुंकुम स्नेह मिलन सोहळ्याला शेकडो महिला उपस्थित होते.

  • Aap Party News : बल्लारपुर शहरात “वाळू विक्री” कायदेशीर की बेकायदेशीर? -रविकुमार पूप्पलवार

    Aap Party News : बल्लारपुर शहरात “वाळू विक्री” कायदेशीर की बेकायदेशीर? -रविकुमार पूप्पलवार

    News34 chandrapur

    बल्लारपुर – आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांचे अधिकाऱ्यांपुढे प्रश्न उपस्थित केला आहे कि, तीन-चार महिन्या पासून बल्लारपूर शहरात घर बांधकामासाठी मुबलक प्रमाणात वाळू मिळत नाही आहे, अनेक नागरिकांच्या घरांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत दिसून येत आहे. घराचं बांधकाम करणारे मालक आणि बांधकाम कंत्राटदार व मजूर या वाळू पुरवठाच्या समस्येने त्रस्त आहेत.

     

     

    गावात कायदेशीर वाळू उपलब्ध नसून अवैध वाळू मात्र मुबलक प्रमाणात मुबलक दरात उपलब्ध कशी होत आहे?, असा प्रश्न देखील पुप्पलवार यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. शहरात आजकाल एक टाटा एस भरून अवैध वाळू तीन ते चार हजार रुपया दरात विक्री केली जात आहे. बल्लारपूर शहरातील जनते समोर “मरता क्या ना करता” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, तरी बल्लारपूर शहरातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पोलीस प्रशासन आणि संबंधित अधिकारी या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

     

     

    बांधकामासाठी जनतेला कायदेशीर वाळू उपलब्ध करून देण्याची तरतूद कोण करणार याकडे दुर्लक्ष करण्याचे कारण काय? शहरात अवैध वाळू विक्रीला कोण प्रोत्साहन देत आहे? शहरात अवैध वाळू कोठून येत आहे? कोणाद्वारे याचा पुरवठा केला जात आहे , हे अधिकाऱ्यांना माहीत नाही का? आज प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात हा प्रश्न पडतो आहे. अशाप्रकारे शहरातील तसेच आसपासच्या परिसरातील रेती समस्येबाबत आपचे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • Shivsena Chandrapur News : शिवसेनेच्या स्नेहमीलन कार्यक्रमात महिलांची लक्षणीय उपस्थिती

    Shivsena Chandrapur News : शिवसेनेच्या स्नेहमीलन कार्यक्रमात महिलांची लक्षणीय उपस्थिती

    News34 chandrapur

    बल्लारपूर:- बल्लारपूर येथील मंगलमूर्ती लॉन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माननीय श्री संदिप भाऊ गिऱ्हे यांचे संकल्पनेतून महिला शिवसेना आघाडी च्या वतीने महिला विधानसभा समन्वयक कल्पना ताई गोरघाटे, नगरसेविका रंजीता ताई बीरे, तालुका अध्यक्ष मीनाक्षी ताई गलघट, शहर अध्यक्ष ज्योती ताई गेहलोत, माजी नगरसेविका सुवर्णाताई मुरकुटे, युवती सेना शहर अध्यक्षा अंजली ताई सोमबंसी,करुणाताई शेगोकार, लावारी उपसरपंच राजुरकर ताई, उप शहर अध्यक्षा वैष्णवी ताई लिचोडे, प्रगती ताई झुल्लारे, ज्योतीताई गुप्ता, व इतर महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांच्या माध्यमातून मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिला मेळावा व हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हजारोच्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला.

     

     

    कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे, उपजिल्हा प्रमुख सिक्की भैय्या यादव, तालुका प्रमुख प्रकाश भाऊ पाठक, युवासेना समन्वयक प्रदीप भाऊ गेडाम, शहर प्रमुख बाबा शाहू ,डॉ. हजारे मॅडम, अधिवक्ता मेघा भाले, मुख्यध्यापिका शमीम मॅडम या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी जिजा फाँऊडेशन अध्यक्षा मनस्वी ताई गिऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभली व त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेत असतो , सर्वानी मिळून मिसळून राहणे गरजेचे आहे तसेच आपल्या भागातील महिलांच्या कोणत्याही समस्या असतील तर आम्ही तुमच्या सोबत कायम आहोत असे आश्वासन दिले. या कार्यक्रमात महिला आघाडीच्या वतीने महिलां साठी विविध उपक्रम, विविध स्पर्धा तसेच हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले व विविध स्पर्धांमध्ये विजयी अनेकांनी यश मिळवले.

     

    या कार्यक्रमात बल्लारपूर शहरातील तसेच ग्रामीण भागातील महिलांनी हजारो च्या संख्येने सहभाग घेतला. या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला. कार्यक्रमास मार्गदर्शन करतानी जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे व उपजिल्हा प्रमुख सिक्की यादव यांनी सर्व महिला पदाधिकारी तसेत महिलांचा व मंगल मुर्ती लॉन च्या संचालक प्रशांत मेश्राम यांचे आभार प्रकट केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी उप शहर प्रमुख आनंद हनमंत्तु , सचिन अंबादे,रामू मेदरवार, शेख युसूफ, प्रभाकर मुरकुटे,दिनेश लिचोडे , बॉबी कादासी, सुरेंद्र संधू,प्रेम गेहलोत,अनिकेत बेलखोडे, सोनु श्रीवास,अबील जोग, सोनू बेनी, सुधीर कालापेल्ली, मल्लेश अण्णा, धर्मा बानोत , तुलसी बानोत, सह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

  • Shivsena Thackeray Group : असंख्य युवकांचा शिवसेना पक्षात प्रवेश

    Shivsena Thackeray Group : असंख्य युवकांचा शिवसेना पक्षात प्रवेश

    Shivsena Thackeray Group पोंभुर्णा : शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणावर व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत. शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीप गिरहे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या मार्गदर्शनात व तालुकाप्रमुख आशिष कावटवार यांच्या नेतृत्वात देवाडा बुज येथील असंख्य युवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

    12 वी शिक्षण पूर्ण झालं तर हा अभ्यासक्रम निवडा

    Shivsena thackeray group पक्षप्रवेश कार्यक्रमात युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी पक्षाचे ध्येयधोरणे व आज राजकारणात युवकांचा सहभाग अत्यन्त गरजेचे असल्याचे सांगितले.

    पोम्भूर्ण तालुका प्रमुख आशिष कावटवार यांनी ज्यापद्धतीने शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे पक्ष वाढीसाठी अहोरात्र मेहनत करीत आहे त्यासारखं आपल्याला सुद्धा शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न करायचे असे असे स्पष्ट केले.

    आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात असंख्य युवक उपस्थित होते.

    आगामी विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या विरोधात लढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, त्यापूर्वी आतापासून संदीप गिर्हे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात शिवसैनिकांची फौज तैयार करीत आहे.

    सध्या विविध ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी संघटना मजबुतीकरण हे काम गिर्हे सातत्याने करीत आहे, विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात शिवसेना आपला भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे.

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना हक्काचा नेता मिळावा अशी आशा नागरिकांनी आपल्या मनात ठेवली आहे, त्याकरिता संदीप गिर्हे हे मेहनत करीत कार्यकर्ता व संघटन जोमात वाढवीत आहे.

  • Live Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या संमिश्र प्रतिक्रिया

    Live Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या संमिश्र प्रतिक्रिया

    News34 chandrapur

    २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्‍ट्र करण्‍याच्‍या दृष्‍टीने असलेला अर्थसंकल्‍प – ना. सुधीर मुनगंटीवार

    आज देशाच्‍या अर्थमंत्री मा. निर्मलाजी सितारामन यांनी देशाचा अंतरीम अर्थसंकल्‍प सादर केला. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्‍ट्र करण्‍याच्‍या दृष्‍टीने असणा-या योजना ही या अर्थसंकल्‍पाची विशेषता आहे. मागील १० वर्षात देशाच्‍या सर्व घटकांच्‍या सर्वांगिण विकासासाठी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदींनी अनेक योजना चालविल्‍या, ज्‍यामुळे गरीब, तरूण, महिला, शेतकरी, दिव्‍यांग यांच्‍या जिवनात आमुलाग्र बदल झाला आहे. या अर्थसंकल्‍पात पुढील ५ वर्षात गरीबांसाठी २ कोटी घरे बांधल्‍या जातील तसेच मध्‍यमवर्गीयांसाठी गृहनिर्माण योजनेचा विचार केला जात आहे. रूफटॉप सोलर प्‍लॅन अंतर्गत १ कोटी घरांना ३०० युनिट दर महिन्‍याला मोफत मिळणार आहे. याशिवाय कृषी, रेल्‍वे, स्‍कील इंडिया, महिला, युवा या सगळयांसाठी अनेक योजनांची घोषणा करण्‍यात आली. मी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व अर्थमंत्री मा. निर्मलाजी सितारामन यांचे या उत्‍तम अर्थसंकल्‍पाबद्दल अभिनंदन करतो.

     

    देशाचा शास्वत व सर्वसमावेशक विकास साधणारा अर्थसंकल्प – हंसराज अहीर

     

    चंद्रपूर/यवतमाळ :- देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला जी सितारमन यांनी सन 2024-25 करीता संसदेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पातून देशाला विकसीत राष्ट्रांच्या रांगेत आणण्याचे ध्येय अंतर्भूत असून हे अर्थसंकल्प गरीब, महिला, युवक व बळीराजाला समर्पित असून या अर्थसंकल्पाद्वारे माननिय मोदी सरकारच्या ‘सर्वांची साथ, सर्वांचा विकास व सर्वांचा विश्वास’ या धोरणाशी सुसंगत असल्याची प्रतिकीया राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या अर्थसंकल्पावर व्यक्त केली आहे.

    देशातील पायाभूत सुविधांसाठी 11.11 लक्ष कोटींची तरतूद विकासाला नवी दिशा देणारी ठरेल 7 लक्ष रूपये वार्षिक उत्पन्नावर करदात्यांना करसुट देण्यात आली असल्याने मोठ्या संख्येतील लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. गेल्या 10 वर्षात सरकारने 390 कृषी विद्यापीठ, 7 आयआयटी, 7 आयआयएम व 3 हजारहून अधिक आयटीआय संस्थांची उभारणी केली. जीएसटीमुळे एक देश एक बाजार ही संकल्पना यशस्वीपणे साकार करण्यात सरकार यशस्वी ठरले. महिला सशक्तीकरण, ग्रामिण महिलांना 70 टक्के घरे, शेती क्षेत्रातून 3 लक्ष कोटीचा व्यापार, 80 कोटी लोकांना मोफत शिधा देण्यात सरकार सफल झाले आहे.

    युवकांना सुवर्णकाळ लाभण्यासाठी 50 वर्षांसाठीच्या बिनव्याजी कर्ज योजनेसाठी 1 लक्ष कोटीची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यास 517 नवीन विमानमार्ग प्रस्तावित केले आहे. नव्या वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना 9 ते 14 वर्षीय मुलींसाठी गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधासाठी लस, सोलर पॅनलद्वारे 1 कोटी घरांना महिनाभरात 300 युनिट मोफत विज पुरविण्याचे धोरण, आशा सेविकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ, उच्च शिक्षणात महिलांचा टक्का वाढविण्याचे धोरण, मुद्रा योजनेतून महिला उद्योजकांना 30 कोटी कर्ज वितरण, देशात गोदामांची उभारणी, किसान संपदा योजनेतून 38 लक्ष शेतकऱ्यांना लाभ देण्याचे धोरण, 5 वर्षात ग्रामिण क्षेत्रात 2 कोटी घरांची उभारणी करण्याचा मनोदय सरकारने या अर्थसंकल्पातून व्यक्त केला असून अमृत कालात शास्वत व सर्वसमावेशक विकास, उत्पादकतेत वृध्दी संसाधनात गुंतवणूक हे सरकारचे धोरण शक्तीशाली अर्थव्यवस्थेला चालना देणारे असल्याचे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.

     

    विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थहीन अर्थसंकल्प; अंतरिम नसून अंतिम अर्थसंकल्प

    विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे केंद्रीय अर्थसंकल्पावर टीकास्त्र

    मुंबई :- देशातील शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य जनता यांची फसवणूक करणारा, नोकरदार, मध्यमवर्गीय यांच्या खिशावर डल्ला मारणारा, करदात्यांचे पाकीट मारण्याची परंपरा जपणारा अर्थहीन अर्थसंकल्प आज केंद्र सरकारने सादर केला आहे. विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारने भारतीयांच्या माथी मारला आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करून पुन्हा एकदा विकसित भारताचे दिवास्वप्न दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे. हा अर्थसंकल्प अंतरिम नसून अंतिम असल्याचे टीकास्त्र विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी डागले आहे.

    केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर श्री. वडेट्टीवार यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना सडकून टीका केली आहे.

    श्री. वडेट्टीवार म्हणाले की, भांडवलदारांच्या पाठीशी उभे राहणारे हे सरकार असून फक्त भाजपचे उद्योजक स्नेही मित्र फायद्यात आहेत. कॉर्पोरेट टॅक्स कमी केला पण सर्वसामान्यांना करात कोणतीही सूट देण्यात आली नाही.यावरून सरकार कोणाचे भल करते हे स्पष्ट होते. राज्यातील नेत्याप्रमाणे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मी पुन्हा येईन, अशी भाषा वापरली परंतु हा अर्थसंकल्प अंतरिम नसून अंतिम आहे. गेल्या 9 वर्षात मोदी सरकारच्या योजना अपयशी ठरल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे अजून पूर्ण नाहीत. सामाजिक न्याय देणारे सरकार, असा डांगोरा केंद्र सरकार पिटत असले तरी ओबीसी, एसी, एसटी विद्यार्थ्यांना इथे शिष्यवृत्ती मिळत नाही. एकीकडे सरकार दावा करते की २५ कोटी जनतेला दारिद्र्य रेषेबाहेर काढले. दुसरीकडे आम्ही ८० कोटी जनतेला मोफत धान्य देतो, हे सरकारकडून सांगितले जाते. यातील विरोधाभास स्पष्ट आहे. म्हणजे देशात गरिबीची संख्या वाढली आहे. आजच्या अर्थसंकल्पात युवकांसाठी, बेरोजगार बाबत काही ठोस मांडलेले नाही. देशात धार्मिक उन्माद करून या सरकारने युवकांना देशोधडीला लावले आहे. त्यामुळे
    बेरोजगार युवक म्हणजे सक्षम युवक का? असा सवाल श्री. वडेट्टीवार यांनी केला आहे.

     

    सरकार महिलांच्या सक्षमीकरणाची भाषा करते पण दुसरीकडे महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ रोखण्यात, मणिपूरमधला हिंसाचार रोखण्यात सरकार अपयशी आहे. देशात आणि राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली आहे. या सरकारच्या काळात शेतकरी उध्वस्त झाला. अजूनही शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळत नाही. कापूस, सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. पीक विम्याचा देशातील केवळ ४ कोटी शेतकऱ्यांना फायदा होतोय. पीक विम्याने शेतकऱ्यांचे भले होते की, पीक विमा कंपन्यांचे? राज्यात पीक विमा कंपन्यांचे भले करण्याऱ्या मंत्र्यांनी स्वतःची तिजोरी भरण्याचे काम केले आहे. हे महाराष्ट्रातील चित्र असेल तर देशात काय चित्र असेल? असे सवाल श्री. वडेट्टीवार यांनी उपस्थित केले आहेत.

    श्री. वडेट्टीवार म्हणाले की, देशातील शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, गरीब, वंचित, उपेक्षित घटक देशोधडीला लागणार आहे. कृषी, उद्योग, रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा, गुंतवणूकदार, बांधकाम व्यवसाय या सर्व क्षेत्राचे भविष्य अंधःकारमय आहे. गरीब-श्रीमंतीची दरी वाढवणार हा अर्थसंकल्प आहे. परकीय गुंतवणुकीचा सरकारचा दावा खोटा असून रोजगार गमावलेल्या कोट्यवधी युवकांच्या आशा आकांशा धुळीस मिळाल्या आहेत. मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक बांधवांवर अन्याय करण्याची परंपरा, या अर्थसंकल्पातही कायम आहे. प्राप्तीकर उत्पन्नमर्यादेत वाढ होईल अशी अपेक्षा होती. परंतु ही आशा देखील मावळली आहे. कष्टकरी मजूरांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी सरकारने मदत केली नाही. केंद्रीय अर्थमंत्री दिवा स्वप्ने दाखवत आहेत. आत्मस्तुतीने भारावलेले केंद्रीय अर्थमंत्र्याचे भाषण अच्छे दिन प्रमाणे आभासी होते. पंतप्रधानांनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवले. हे स्वप्न जसे भंगले तसेच हा अर्थसंकल्प सर्वसामान्याचे स्वप्न धुळीस मिळविणारा, जुन्या कढीला नव्याने ऊत आणणारा आहे. अशा शब्दात श्री. वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारचे वाभाडे काढले.

     

    आजचा अर्थसंकल्प विकसित राष्ट्राचा पाया, राज्याच्या विकासाला मिळणार गती – आ. किशोर जोरगेवार

    आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प बेरोजगार, युवक, महिला, गरिब आणि शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून सादर करण्यात आला आला असून यात जिडीपी वाढीकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. याचा नक्कीच महाराष्टाला फायदा होणार आहे. या अर्थसंकल्पाचा एकंदरीत विचार केला असता आजचा अर्थसंकल्प हा विकसित राष्ट्राचा पाया असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.

     

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली आहे. यात आज सादर करण्यात आलेला केंद्रीय अर्थसंकल्पामुळे राज्याच्या विकासाला आणखी गती प्राप्त होणार आहे. या सरकाच्या कार्यकाळात 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले आहे, नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर केंद्र सरकारचा भर राहिला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे. सूर्योदय योजनेंतर्गत एक कोटी लोकांच्या घरात सौर रूफटॉप यंत्रणा बसवली जाणार आहे.त्यामुळे ३०० युनिट पर्यंतची वीज सदर कुटुंबियांना मोफत मिळण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. तसेच पुढील पाच वर्षांत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आणखी 2 कोटी घरांचे बांधकाम पूर्ण केले जाईल त्यामुळे अनेकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार योजना आणणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. 10 वर्षात महिलांना 30 कोटी रुपयांचे मुद्रा कर्ज देण्यात आले आहे. विविध क्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढला आहे. आज सादर केलेल्या अर्थसकंल्पात आर्थिक क्षेत्र मजबूत होणार असून लोकांसाठी नवीन संधी वाढणार असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.

     

    शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष! – आमदार सुधाकर अडबाले यांची टीका

    केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शिक्षण क्षेत्राला भरीव तरतूद नसल्याबद्दल आमदार सुधाकर अडबाले यांनी तीव्र टीका केली आहे. ते म्हणाले, “हा अर्थसंकल्प केवळ देखावा आहे आणि सर्वसामान्य मुलांना मूलभूत शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो.”

    अडबाले यांनी पुढे म्हटले, “शिक्षण हे देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. परंतु, केंद्र सरकार शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष करत आहे. शिक्षणासाठी निधी कमी करणं हे निश्चितच चिंताजनक आहे.”

    “या अर्थसंकल्पामुळे शिक्षण क्षेत्रावर अनेक नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना शिक्षण घेणे अधिक कठीण होईल,” असंही ते म्हणाले.

    अडबाले यांनी केंद्र सरकारला शिक्षण क्षेत्रासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याची आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.

     

    अर्थसंकल्प हा जन सामान्यांची फसवणूक करणारा – दिनेश चोखारे 

    या बजेटमध्ये वाढत्या महागाईबद्दल तरतूद नाही. शेतीविषय धोरणांसंदर्भात कुठल्याही प्रकारची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यात येणार आहे. त्यांची आर्थिक तरतूद दाखवण्यात आलेली नाही. तसेच लघुउद्योगांसाठी कुठल्याही प्रकारची ठोस धोरणे नसल्याने अर्थ व्यवस्थेला हवा तेवढा उपयोग होऊ शकलेला नाही. आज सादर झालेला अर्थसंकल्प हा जन सामान्यांची फसवणूक करणारा आहे. या अर्थसंकल्पात बेरोजगार युवक, शेतकरी, जनसामान्यांकरीता कुठलेही स्थान नसल्याचे दिसून येत आहे.

    दिनेश दादापाटील चोखारे
    प्रदेश कार्याध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ
    उपाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर
    माजी सभापती तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर

     

    सर्वसामान्य जनतेला दिशाभूल करणारा अंतरिम अर्थसंकल्प – प्रवीण खोब्रागडे,राष्ट्रीय अध्यक्ष-अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष

    निवडणुकीच वर्ष असल्या कारणाने या अंतरिम अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस झाला असे वाटते,
    सर्वसामान्य जनतेच्या विशेष हाती काही लागलेला नाही म्हणून त्यांचा भ्रमनिरास झाला आहे.शेती,क्षिक्षण आणि आरोग्य यावर अधिक तरतूद करणे अपेक्षित होते,बेरोजगार तरुणांसाठी विशेष निधीची तरतूद करून बिन व्याजी किंवा कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे ती प्रत्यक्षात उतरते का हे येणार वेळ सांगणार आहे असे मत अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खोब्रागडे यांनी व्यक्त केले.

     

     

    शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राकडे दुर्लक्ष, प्रदूषणावरही उपाययोजना नाही – राजेश वारलुजी बेले

    चंद्रपूर: आज सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर ओबीसी नेते राजेश बेले यांनी टीका केली आहे. बेले यांनी म्हटले आहे की, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात अपेक्षित तरतूद करण्यात आलेली नाही. प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही ठोस तरतूद नसल्याची टीकाही त्यांनी केली.

    बेले यांनी म्हटले की, “शिक्षण आणि आरोग्य हे देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहेत. मात्र, या क्षेत्रांसाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात आलेली नाही. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुधारणा न झाल्यास देशाची प्रगती खुंटण्याची शक्यता आहे.”

    त्यांनी पुढे म्हटले की, “प्रदूषण ही आज देशासमोरची सर्वात मोठी समस्या आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. मात्र, प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही ठोस योजना आखण्यात आलेली नाही.”

    बेले यांनी सरकारला शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रासाठी अधिक तरतूद करण्याची आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

  • Sarpanch sanghatna : सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी राहुल मुरकुटे, उपाध्यक्ष रणजित समर्थ व सचिव पदी मुरलीधर चुधरी यांची निवड

    Sarpanch sanghatna : सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी राहुल मुरकुटे, उपाध्यक्ष रणजित समर्थ व सचिव पदी मुरलीधर चुधरी यांची निवड

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – मुल तालुक्यातील ग्राम पंचायत सरपंच संघटना अतिशय पावरफुल असून तालुक्यातील सरपंच यांच्या मागण्या व ग्राम पांच्यायातीचा व गावाचा विकास यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून विकास करण्यासाठी प्रयत्न करण्याचे काम करीत असते. त्याच मुल तालुका ग्राम पंचायत संघटनेची दिनांक 1-2-2024 रोज गुरवारला पं. स.मुल येथील सभागृहात सरपंच संघटना मुल तालुका स्तरीय नवीन कार्यकारणी गठित करण्यासाठी सभा आयोजित केलेली होती.

     

    सदर सभेला मुल तालुक्यातील समस्त सन्माननीय सरपंच महोदय यांनी भाग घेतला.यात सरपंच संघटना मुल तालुका अध्यक्ष पदी श्री राहुल गजानन मुरकुटे सरपंच ग्रामपंचायत ताडाळा तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांची निवड करण्यात आली.

     

     

    तसेच उपाध्यक्ष जुना सुरला येथील सरपंच रंजित समर्थ, सचिव म्हणून मुरलीधर चुधरी, तर सहसचिव म्हणून उसराला महिला सरपंच प्रियांकाताई नर्मलवार, कोषाध्यक्ष्य कोमलताई रणदये, संघटक पदी सुशी येथील सरपंच अनिलभाऊ सोनुले ,कायदेशीर सल्लागार म्हणून नांदगाव सरपंच एड. हिमानिताई वाकुडकर ,तसेच सदस्य म्हणून वासुदेव वाघ,चांगदेव केमेकर,शिल्पाताई भोयर, वैशालीताई निकोडे,जस्मिताताई लेनगुरे,यशवंत खोब्रागडे अशा प्रकारे कार्यकारणीची निवड करून नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली.

     

    सरपंच संघटना निवड करण्यासाठी सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी ग्रामविस्तार अधिकारी श्री. विजय यारेवार साहेब, श्री.येरमे साहेब ग्रामविस्तार अधिकारी आकुलवार साहेब, साहरे साहेब, गजभे साहेब वरील सर्व अधिकारी उपस्थितीत राहून सहकार्य केले.

     

    नव निर्वाचित सरपंच संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव,सहसचिव, व कार्यकारिणीच्या समस्त सदस्यांचे तालुक्यातील सर्व सरपंच,उपसरपंच सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.