Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Maratha Reservation : ओबीसी समाजावरील अन्याय सहन करणार नाही, तो अध्यादेश परत घ्या – आमदार धानोरकर

    Maratha Reservation : ओबीसी समाजावरील अन्याय सहन करणार नाही, तो अध्यादेश परत घ्या – आमदार धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – महाराष्ट्र शासनाने मराठा आंदोलनाचा धस्का घेऊन कुठलाही विचार न करता अध्यादेश काढून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न केला असल्याने हा ओबीसीं वरचा अन्याय आहे, अशी भावना आ. प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली. Maratha reservation

     

     

    अलीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने आंदोलनाचे हत्यार  उपसले होते त्यांची आरक्षणाची मागणी योग्य असली तरी त्यांना ओबीसी समाजातून आरक्षण देण्यात येऊ नये असे आमचे मत होते. परंतू मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव मुंबईत येताच  शासनाने ओबीसी समाजातील बांधवांचा कुठलाही विचार न करता मराठा समाजातील नागरीकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय अध्यादेश काढून घेण्यात आला. Mla pratibha dhanorkar
    अप्रत्यक्षरीत्या ओबीसी समाजाची दिषाभूल करुन ओबीसी समाजावर अन्याय केला आहे. हा अन्याय ओबीसी बांधव सहन करणार नसून ओबीसी समाजासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचे मत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले आहे.
    मराठा आरक्षणासाठी शासनाने सर्वेक्षण सुरु केले असून त्यातून जातनिहाय आकडेवारी समोर येणार आहे. 2011 पासून जनगणना झाली नसून या सर्वेक्षणाचा आधार घेऊन शासनाने ओबीसी समाजाच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवावी असे देखील मत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले. शिंदे सरकार ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष करीत असून कुठल्याही ओबीसींच्या मागण्या पुर्ण होत नसल्याची खंत आमदार महोदयांनी व्यक्त केली आहे. ओबीसींची वस्तीगृह अद्यापही सुरु झाली नाही. शासकीय पदभरती अद्यापही अपुर्ण आहे. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही. यावर उपाय करायचा सोडून सरकार मराठा समाजासाठी ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे, हे चूकीचे असून या विरोधात मोठे आंदोलन उभारुन ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार धानोरकर यांनी सांगितले.
    यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा कुठलाही विरोध नसल्याचे सांगून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे. परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये. येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयाच्या अुनषंगाने ओबीसी समाजाचे प्रश्न मांडणार असल्याचे आमदार धानोरकर यांनी सांगितले.
  • Residential Ashram School : भाजप नेत्याच्या निवासी आश्रम शाळेतील 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

    Residential Ashram School : भाजप नेत्याच्या निवासी आश्रम शाळेतील 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्यातील मूल तालुक्यातील सुशी दाबगाव येथील जिजामाता प्राथमिक निवासी आश्रम शाळेतील वर्ग 7 वि मध्ये शिकणारी 12 वर्षीय मिताली केशव कोंडागुर्ले चा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली.

    मृतक विद्यार्थिनी ही गडचिरोली जिल्ह्यातील मरपल्ली गावातील निवासी आहे, विशेष बाब म्हणजे शाळेतील प्रबंधकाने मिताली चा मृत्यू झाल्यावर सदर बाब तिच्या कुटुंबाला सांगितली. Residential Ashram School

     

    मागील 6 दिवसापासून मिताली ची प्रकृती बरी नव्हती, मात्र शाळा व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केले, 31 जानेवारीला शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात मिताली ने सहभाग घेतला होता, सोमवारी कार्यक्रमाची तयारी करीत असताना मिताली अचानक कोसळली, त्यानंतर तिला प्राथमिक उपचार केंद्रात नेण्यात आले, त्यानंतर मूल उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिला चंद्रपूर रेफर केले, मात्र चंद्रपुरात पोहचण्याआधी वाटेत मिताली चा मृत्यू झाला.

     

    याबाबत शाळेतील मुख्याध्यापक यांनी कुटुंबाला कसलीही माहिती दिली नाही, मिताली चा मृत्यू झाल्यावर तिच्या कुटुंबाला याबाबत माहिती देण्यात आली, ही बाब संदेह उपस्थित करणारी आहे.

     

    याप्रकरणात शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी शाळेतील शिक्षकावर कारवाई करीत शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे.
    शाळा व्यवस्थापनाने मिताली च्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले, याबाबत आम्ही लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती गिर्हे यांनी दिली.

     

    विशेष म्हणजे ही आश्रमशाळा चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाजप नेत्या संध्या गुरनुले यांची आहे, त्यामुळे सदर प्रकरणात कमालीची गुप्तता पाळली गेली.

     

    मिताली चे शवविच्छेदन झाल्यावर आई-वडील गावी मृतदेह नेत असताना त्याठिकाणी चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत दाखल झाले, आधीच मुलगी गेल्याचा कोंडागुर्ले दाम्पत्याला धक्का पोहचला होता आणि त्यामध्ये पोलीस निरीक्षकांनी गडचिरोली जिल्ह्यातील छोट्याशा गावातून मुलीचा मृतदेह नेण्यासाठी दाखल झालेल्या नातेवाईकांना निघा इथून म्हणून त्यांना दम दिला, मुलीचा मृत्यू कसा झाला? त्याबाबत कुटुंबाला माहिती नाही आणि पोलीस निरीक्षकाच्या अश्या वागण्याने खाकी ची माणुसकी संपली की काय? असा प्रश्नचिन्ह यावेळी उपस्थित होतो.

    याबाबत संस्था अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शाळेची चूक नसल्याचे सांगितले.

    हलगर्जीपणा केला नाही : संध्या गुरनुले
    याबाबत आश्रमशाळेच्या संस्थेच्या अध्यक्ष तसेच जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ही घटना दुर्दैवी असून यात हलगर्जीपणा बाळगला नसल्याचे त्यांनी सांगितले. मुलीची तब्येत बरी नव्हती तेव्हा तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले होते. औषध दिल्यावर तिच्यात सुधारणा झाली होती. यानंतर सोमवारी नृत्याचा सराव करताना तिला चक्कर आली. तिला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले मात्र वाटेत तिचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती मुलीच्या कुटुंबाला देण्यात आली होती. मात्र मृत्यूचे नेमके कारण हे शवविच्छेदन अहवालातुनच समोर येणार आहे, असे त्या म्हणाल्या.

     

    या प्रकरणी मूल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे, प्रकरणाचा पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

  • MCOCA Act : शिवा वझरकर हत्याकांड चंद्रपूर, VIP ट्रिटमेंट आणि मोक्का

    MCOCA Act : शिवा वझरकर हत्याकांड चंद्रपूर, VIP ट्रिटमेंट आणि मोक्का

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 25 जानेवारीला युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली होती.
    शिवा च्या हत्येनंतर सरकारनगर परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, पोलिसांनी वेळेवर त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. Justice for shiva wazarkar

     

    एक क्षुल्लक वाद आणि त्या वादातून शिवा वर 8 जणांनी हल्ला केला, आधी पोटात चाकू खुपसला नंतर त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, नागरिकांनी त्याला रुग्णालयात नेले मात्र तोवर शिवा चा मृत्यू झाला होता.

     

    शिवा च्या पोटात चाकू खुपसणारा सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलगा हिमांशू कुमरे होय, चाकू चा वार झाल्यावर शिवा जमिनीवर कोसळला त्यावेळी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करणारे स्वप्नील काशीकर, रिजवान पठाण, चैतन्य आसकर, नाजीर खान, रोहित पितरकर, सुमित दाते अन्सार खान हे होते.

     

     

    पोलिसांनी या प्रकरणी सर्व 8 आरोपीना अटक केली आहे, हिमांशू ने शिवा ला तुझ्या वडिलांची औकात काय? 300 रुपये रोजीने जाणारा तुझा बाप असे हिनवले होते, त्या कारणावरून हे हत्याकांड घडले. Shivsena chandrapur

     

     

    मात्र ज्याप्रकारे हे हत्याकांड घडलं त्यावरून सर्व नियोजनबद्ध पध्दतीने कट रचून घटना घडविण्यात आली असा आरोप शिवा च्या कुटुंबानी केला आहे.

     

    शिवा च्या कुटुंबाची पालकमंत्री मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेत आरोपीवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते, सर्व आरोपीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे.

     

    29 जानेवारीला शहरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक येथे शिवा ला सर्वपक्षीय श्रद्धांजली देण्यात आली, यावेळी आरोपीना फाशी ची शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी करण्यात आली.

     

    घटनाक्रम काय?

    25 जानेवारीला शिवा च्या मोबाईल वर हिमांशू ने कॉल करीत त्याच्या वडीलाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले, आणि वाद चिघळला, शिवा याबाबत हिमांशू ला जाब विचारण्यासाठी गेला, सरकार नगर येथील शिवसेना प्रणित वाहतूक सेनेचा माजी पदाधिकारी स्वप्नील काशीकर याच्या कार्यालयासमोर वाद सुरू झाला.

     

    हिमांशु ने तब्बल 20 ते 40 युवकांचा घोळका जमवून ठेवला होता, शिवा आपल्या काही सहकाऱ्यासोबत त्याठिकाणी हिमांशू ला जाब विचारायला गेला, आधी बाचाबाची त्यांनतर शिवा ने हिमांशू च्या कानाखाली लावली आणि लगेच हिमांशू ने धारदार चाकूने शिवा वर हल्ला केला, या हल्ल्यात शिवा ठार झाला.

     

    पोलिसांनी ताबडतोब कारवाई करीत 8 आरोपीना अटक केली, मात्र पोलीस कस्टडी मध्ये असताना पोलिसांनी आपली मैत्री कायम ठेवत आरोपीना VIP ट्रीटमेंट दिली, ही बाब वरिष्ठांना कळताच त्यांनी तात्काळ काही कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केली.

     

    Vip ट्रीटमेंट ही आरोपीसाठी काही नवी नव्हती, याआधी स्वपिल काशीकर ने गोंडपीपरी येथील कुलथा नदीच्या घाटावर स्थानिक सरपंच व तंटामुक्त समिती अध्यक्ष सहित गावकऱ्यांना मारहाण केली होती, त्यावेळी स्वप्नील काशीकर व इतर आरोपीवर एट्रोसिटी व प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विविध कलम दाखल झाले होते, विशेष बाब म्हणजे गोंडपीपरी चे तत्कालीन ठाणेदार यांच्याशी त्यावेळी सम्पर्क साधला असता त्यांनी सांगितले की स्वप्नील काशीकर हा फरार आहे, आम्ही त्याच्या मागावर असून लवकर तो पोलीस कस्टडी मध्ये असेल असे सांगितले होते, मात्र आरोपी काशीकर याचा मोबाईल तेव्हा सुरू होता, पण तो पोलिसांच्या हाती लागला नाही आणि सदर गंभीर गुन्ह्यात तो महिन्याभरात जामिनावर बाहेर आला होता.

     

    काशीकर याची पोलिसांसोबत चांगलीच मैत्री होती, याबाबत News34 कडे पुरावे सुद्धा उपलब्ध आहे.

    गंभीर गुन्ह्यात आरोपी सहज सुटतो, सामान्य नागरीक अश्या गुन्ह्यात अडकल्यावर त्याला आत गेल्याशिवाय पर्याय नाही, मात्र काहींचा अपवाद वगळता.

     

    जर काशीकर या गंभीर गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला नसता तर आज हे हत्याकांड कदाचित घडले नसते.

    यामध्ये दोष द्यायचा कुणाला? ज्याप्रकारे आज राजकीय क्षेत्रात गुंड पक्षप्रवेश करीत आहे, त्या पद्धतीने आज संघटित गुन्हेगारी घडत आहे, भाई ने बोल दिया तो काम करना पडेगा अशी अवस्था आज तरुणाईची झाली आहे.

     

    मागचा पुढचा विचार न करता तरुणाई काहीपण करायला तयार असते ही सुरुवात काही वर्षांपूर्वी चंद्रपुरात सुरू झाली होती व आजही ती सुरूच आहे. आज शिवाच्या मारेकऱ्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी मागणी केली मात्र या नेत्यांनी कधीतरी शहरात वाढत असलेल्या संघटित गुन्हेगारीला विरोध केला काय? यावर सामान्य नागरिकांना एकदा तरी विचार करायला हवा.

     

    शिवा च्या मारेकऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा अशी मागणी होत आहे, मात्र तो कायदा काय आहे हे आपण जाणून घेऊया…

    टाडा’ या कायद्याच्या धर्तीवर 1999 मध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (Maharashtra Control of Organised Crime Act) म्हणजेच ‘मोक्का’ कायदा बनवलाय.

    हा कायद्याचा वापर कधी केला जातो?

    गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलीसांकडून प्रथम समज दिली जाते. पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॅार्डवर येतो. आरोपीवर अटकेची तसच नंतर तडीपारीचीही कारवाई होते. अशा आरोपींना अटक केली जाते. तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलीसांना मोक्का अंतर्गत कारावाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

     

    मोक्का कधी लावला जातो?

    गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलीसांकडून प्रथम समज दिली जाते. पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॅार्डवर येतो. आरोपीवर अटकेची तसच नंतर तडीपारीचीही कारवाई होते. अशा आरोपींना अटक केली जाते. तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलीसांना मोक्का अंतर्गत कारावाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

    कोणावर मोक्काची कारवाई होते ?

    हफ्ता वसुली, खंडणीसाठी अपहार, सुपारी देणे, खून, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी यांच्यासारखे संघटीत गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो. मोक्का लावण्यासाठी गु्न्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते. टोळीतील एकट्या गुन्हेगाराने किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो. तसंच अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या 10 वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर झालेलं असणं बंधनकारक आहे. पोलीसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळते. या काद्यान्वये गुन्हेगाराला लवकर जामीन नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्षे तुरुंगात राहतात आणि त्यामुळे त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची संघटित टोळी मोडकळीस आलेली असते.

    मर्डर, खंडणी, 307, दरोडा, खंडणीचा प्रयत्न, घुसखोरी आणि तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा मागील दहा वर्षाचा इतिहास असणे कारवाईसाठी अवश्यक आहे. ज्यात दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणे आणि पूर्वी तीन किंवा त्याहून जास्त शिक्षा झालेली असणे. अशा गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्या ज्यांचा हिंसाचार, आर्थिक फायद्यासाठी जे गुन्हा करतात अशा गुन्हेगारांवरती महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते.

    शिक्षा काय?

    मोक्का लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही. भारतीय दंड विदान संहीतेच्या लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल तीच सिक्षा मोक्काच्या कलम 3 (1) नुसार देता येईल. ही सिक्षा किमान 5 वर्षे ते जन्मठेपेपर्यंत राहते. त्याचबरोबर किमान दंड हा पाच लाखांपर्यांतचा असतो. तसंच दोषींची मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद या कायद्यात आहे. संघटीत गुन्हेगारी करुन जर आर्थिक फायदा घेतला जात असेल कींवा टोळी तयार करुन जर गुन्हेगरी करत असाल तर त्या संदर्भात मोक्काची तरतूद केली आहे.

  • Female Feticide Chandrapur : गर्भलिंग निदान होत असलेल्या सोनोग्राफी केंद्रावर कडक कारवाई करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

    Female Feticide Chandrapur : गर्भलिंग निदान होत असलेल्या सोनोग्राफी केंद्रावर कडक कारवाई करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्यात स्त्रीभ्रूणहत्या टाळून लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातील दरी कमी करण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. याकरीता बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या केंद्राची गोपनीय माहिती घेऊन गर्भलिंग निदान चाचणी होत असलेल्या सोनोग्राफी केंद्रावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात दक्षता पथकाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. Female Feticide Chandrapur

     

     

    मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संग्राम शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे, अधिष्ठाता डॉ. कांबळे, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद किन्नाके, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर, सहाय्यक सल्लागार कैलाश उईके आदी उपस्थित होते.

     

     

    जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्राची माहिती अदयावत ठेवावी. जिल्ह्यात एक व दोन मुलीवर किती गर्भपात झाले? याची काटेकोरपणे तपासणी करावी व याबाबत सखोल माहिती घ्यावी. संबंधित यंत्रणेने जिल्ह्यातील तसेच मनपा क्षेत्रातील प्रत्येक सोनोग्राफी केंद्राला भेट देऊन तपासणी करावी. यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी, पोलीस विभागाने बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या केंद्राची गोपनीय माहिती घ्यावी. सदर केंद्र दोषी आढळून आल्यास पीसीपीएनडीटी कायद्यान्वये कार्यवाही करावी. Chandrapur collector

     

     

    जिल्ह्यातील स्त्री-पुरुषांचे लिंग गुणोत्तर संतुलित राहण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. यासाठी महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृतपणे लिंगनिदान होत असल्यास कठोर कारवाई करावी. जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व्यापक जनजागृती करावी. सोनोग्राफी केंद्र तसेच गर्भपात केंद्रावर माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावावेत, अशा सूचना देखील जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी बैठकीत संबंधित यंत्रणांना दिल्या. Pregnancy diagnosis

     

     

    राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जिल्हा कृती दल समितीचा आढावा:

    राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागाची भूमिका महत्त्वाची आहे, यासाठी शिक्षण विभागाने प्रत्येक शाळा व महाविद्यालय स्तरावर नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. तसेच या मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

     

     

    सदर मोहीम 13 फेब्रुवारी तर मॉप अप दिन 20 फेब्रुवारी 2024 रोजी राबविण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक विभागांनी आपापली जबाबदारी पार पाडावी. तालुकानिहाय लाभार्थ्यांची यादी उपलब्ध ठेवावी. वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्याबाबत नियोजन करावे. शाळाबाह्य विद्यार्थी देखील सुटता कामा नये. जंतनाशक गोळ्या वितरित करण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांचा तालुकानिहाय टेबल तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी यावेळी संबधित यंत्रणाना दिल्या.

  • Shiva Wazarkar Murder : शिवा वझरकर च्या मारेकऱ्यांवर मोक्का लावा – सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

    Shiva Wazarkar Murder : शिवा वझरकर च्या मारेकऱ्यांवर मोक्का लावा – सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 25 जानेवारीला शहरातील सरकारनगर भागात ठाकरे गटाचे युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात 8 आरोपीना अटक केली होती.

     

    त्यानंतर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 28 जानेवारीला वझरकर कुटुंबाची भेट घेतली होती, त्यावेळी वझरकर कुटुंबानी आरोपीवर मोक्का लावण्याची मागणी केली, यावर पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पोलीस प्रशासनाला उचित कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

     

    आज प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकात स्व.शिवा वझरकर याना सर्वपक्षीय श्रद्धांजली देण्यात आले, हजारो युवकांनी यावेळी शिवाच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती पेटवत श्रद्धांजली दिली.

     

    यावेळी ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी माहिती दिली की आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही अधिक तीव्र आंदोलन करणार, आज आम्ही शांत पध्दतीने आंदोलन करीत आहो जर प्रशासनाने आमच्या मागणीवर दुर्लक्ष केले तर आम्ही चंद्रपूर जिल्हा बंद पाडू असा इशारा गिर्हे यांनी यावेळी दिला.

     

     

    आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात अजित पवार गटाचे राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, कांग्रेस इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, शिंदे गट शिवसेना महिला जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकूर, महानगरप्रमुख भरत गुप्ता आदींची उपस्थिती होती.

  • Chandrapur strike march : लॉयड्स मेटल कंपनीवर धडकला भव्य मोर्चा

    Chandrapur strike march : लॉयड्स मेटल कंपनीवर धडकला भव्य मोर्चा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : जिल्ह्यातील घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र, शेतकरी व बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी कंपनीवर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सुमारे १००० हून अधिक आंदोलक सहभागी झाले होते.आंदोलकांनी कंपनीच्या गेटसमोर ठिय्या मांडला आणि आंदोलन सुरू ठेवले आहे. पोलिसांनी आंदोलकांना कोर्टाचे आदेश दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलकांनी त्यास विरोध केला.

     

    या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस नेते व भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश चोखारे यांनी केले. या मोर्चात कंपनीकडून स्थानिक सुशिक्षित व बेरोजगार युवकांना नोकरी देणे, कंपनीच्या प्रदूषणामुळे होणारे नुकसान भरपाई देणे, कंपनीच्या CSR फंडाचा योग्य वापर करणे, कंपनीच्या अतिक्रमण हटवणे, कंपनीच्या भोंगळ कारभाराची चौकशी करणे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीत कायमस्वरूपी रोजगार देणे, कंपनीचे जड वाहतूक शहराच्या मध्यभागातून बंद करणे, स्थानिक महिला बचत गटांना कंपनीच्या CSR फंडाच्या माध्यमातून घरेलू उद्योगाकरिता प्राधान्य देणे आदी मागण्या करण्यात आल्या.

     

    आंदोलकांनी चेतावणी दिली की, जर कंपनीने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ते आणखी तीव्र आंदोलन करण्यास तयार आहेत.

     

     

    यावेळी आयोजक माजी सदस्य ग्रामपंचायत घुघुस पवन अगदारी, सुधाकर बांदुरकर माजी उपसरपंच ग्रामपंचायत घुघुस, हेमंत उरकुडे, शेखर तंगडपल्ली, प्रेमानंद जोगी, लखन हिकरे, तोफिक शेख, सुरज बहुराशी, सिनू गुडुला,
    सुधाकर बांदुरकर, हेमंत उरकुडे, म्हातरदेवी सरपंच संध्याताई पाटील, पंचायत समिती सदस्य रजीता पवनकुमार आगदरी, पवन चांकपुरे, दिलीप ठाकरे, दिलीप मत्ते, बबन सावे, अमोल आत्राम, शंकर उईके, तुळशीराम दरेकर, सुरज बहुरिया, साखरवाही सरपंच नागेश बोंडे, घोनाडच्या सरपंच संगीता मत्ते, गणेश आवारी, संजय टिपले, दिनेश टिपले, हसिम खान, संतोष बांदुरकर, हितेश लोडे, दिनेश भोगले, भास्कर सोनेकर, सुधाकर वारारकर, रमेश काळे, श्यामराव उपरे, यांचे सह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

     

     

    या मागण्यांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

    * घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील स्थानिक सुशिक्षित व बेरोजगार युवक व युवतींना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरीत सामावून घेणे.
    * लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देणे.

     

    * लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या प्रदूषणामुळे लोकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो, म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चौकशी करून कंपन्यांवर कारवाई करणे.

     

    * लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून अनेक वर्षापासून घुग्घूस ते पांढरकवडा पांदन रस्ता आणि घुग्घूस ते सेनगाव पांदन रस्तावर केलेला अतिक्रमण हटवणे.

     

    * लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीने शहर व ग्रामीण भागात सन २०१३ पासून ते आजपर्यंत CSR फंडातून केलेल्या खर्चाची कार्याची चौकशी करणे.
    * जिल्ह्याधिकारी यांनी सदर लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या भोंगळ कारभाराची सखोल चौकशी करून कारवाई करणे.
    * विस्तारीकरणात ज्या शेतकऱ्याच्या जमिनी कंपनी अधिग्रहित करते त्या जमिनींचा मोबदला हा शेतकऱ्यांना थेट मिळावा.

     

    * कंपनीचे अधिकारी यांनी विस्तारीकरणाच्या जनसुनानीच्या नोटिफिकेशनमध्ये जाहीरपणे सांगितले की कंपनीच्या परिसरात किमान दोन लाख वृक्षारोपण करण्यात आले असे खोटे व चुकीची माहिती सादर केलेल्या कंपनीवर कडक कारवाई करणे.
    * प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीत कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा आणि त्यांना योग्य पगार किमान ₹२०,००० ते ₹२५,००० रुपये देण्यात यावे.

     

    * कंपनीची स्थापना ज्यावेळी झाली त्यावेळी अनेक लोकवस्तीचे पुनर्वासन करताना सर्वे क्रमांक १६७ आराजी ६३.६७३७ चौ.मी. एकूण ६२ प्लॉट रहिवासा करिता पुरावतीत आहे. जमिनीचे पट्टे देऊ असे खोटे आश्वासन कंपनी मार्फत देऊन त्या लोकवस्तीना स्थलांतरित करण्यात आले.

     

    * लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे जड वाहतूक शहराच्या मध्यभागातून होत असल्याने दुर्घटनाला आमंत्रण नाकारता येत नाही. म्हणून कंपनीचे जड वाहतूक शहराच्या मध्यभागातून बंद करण्यात यावे.

     

    * स्थानिक महिला बचत गटांना कंपनीच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून घरेलू उद्योगाकरिता प्राधान्य द्यावे.

  • Chandrapur Health Camp : येणाऱ्या काळात आरोग्य सुविधेचा लाभ मिळणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    Chandrapur Health Camp : येणाऱ्या काळात आरोग्य सुविधेचा लाभ मिळणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तथा दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क रोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन चंद्रपुरातील सिटी शाळेत 28 जानेवारीला करण्यात आले आहे.या शिबिराचे सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आले. Health camp chandrapur

     

    यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांचेसह भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार होते.

     

     

    महाआरोग्य शिबिरात सकाळी 9 वाजतापासून विविध आजारांनी ग्रस्त नागरिकांनी आपली नोंदणी केली, त्यानंतर नागरिकांची आरोग्य तपासणी सावंगी मेघे मधून आलेल्या तज्ञ डॉक्टरांनी केली. Savangi meghe

     

    कार्यक्रमाच्या आयोजन प्रसंगी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी उपस्थित नागरिकांना आरोग्य ही सेवा म्हणून करण्याचा आम्ही संकल्प केला आहे, काही महिन्यात चंद्रपुरातील शासकीय रुग्णालयाची इमारतिमध्ये आपल्याला चांगला उपचार मिळेल अशी व्यवस्था त्याठिकाणी करण्यात आली आहे.

     

    आपल्या शरीरात विविध आजार घर करू लागले आहे, कारण आपण आपल्या जीवनशैलीत अनेक बदल केले आहे, आईच्या हातचं जेवण सोडत आपण ऑनलाइन हॉटेलमधील जेवण करायला लागलो आहे, त्यामुळे विविध आजाराला सुद्धा आपण यासोबत आमंत्रण देत आहोत, सध्या कॅन्सर चे रुग्ण झपाट्याने वाढत आहे, मात्र आपण यावर उपचार करणे शक्य होईल यासाठी आपन किमोथेरपी ची मोफत व्यवस्था केली आहे.

     

     

    आयोजित महाआरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी यावेळी लाभ घेतला.

  • Shiva Wazarkar Murder : शिवा वझरकर च्या मारेकऱ्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करा

    Shiva Wazarkar Murder : शिवा वझरकर च्या मारेकऱ्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 25 जानेवारीला चंद्रपूर शहरातील सरकारनगर येथे ठाकरे गटाचे युवासेना शहर प्रमुख 25 वर्षीय शिवा वझरकर याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती, या हत्याकांडाने चंद्रपूरात पुन्हा संघटित गुन्हेगारी वाढली असे चित्र पुढे आले होते. Shiva wazarkar murder

     

     

    पोलिसांनी या प्रकरणी 8 आरोपीना अटक केली, आरोपीमध्ये सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलगा हिमांशू कुमरे, माजी वाहतूक सेना जिल्हाप्रमुख स्वप्नील काशीकर व इतर आरोपींचा समावेश आहे. Chandrapur police

     

     

    28 जानेवारीला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वझरकर कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली.

     

     

    या भेटीत शिवा च्या आई-वडिलांनी आरोपीवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी केली, विशेष म्हणजे काही नागरिकांनी आरोपीवर मोक्का लावण्याची मागणी केली आहे, नागरिकांच्या मागणीवर पालकमंत्री मुनगंटीवार पोलीस प्रशासनाला काय निर्देश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Sudhir Mungantiwar News : पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने मूल येथे 100 खाटांचे 107 कोटीचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर

    Sudhir Mungantiwar News : पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने मूल येथे 100 खाटांचे 107 कोटीचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : जिल्ह्यात आरोग्याच्या उत्तमोत्तम सुविधा असाव्यात, येथील रुग्णांना उपचारासाठी नागपूर, मुंबईच्या चकरा माराव्या लागू नये तसेच स्थानिक स्तरावरच रुग्णांना अत्यल्प दरात आरोग्याच्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार नेहमीच प्रयत्नशील असतात. याच अनुषंगाने मुल येथीाल 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे 100 खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून मुल येथे आता 100 खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभे राहणार आहे. यासाठी शासनाने 107 कोटी 29 लक्ष रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेला मंजुरी दिली असून तसा शासन निर्णय जारी केला आहे. Guardian minister sudhir mungatiwar

     

    सद्यस्थितीत मूल येथील उपजिल्हा रुग्णालय 50 खाटांचे आहे. या रुग्णालयाचे 100 खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे आता मुल येथे 100 खाटांचे नवीन उपजिल्हा रुग्णालय स्थापित होणार आहे. सदर रुग्णालय हे तळमजला आणि त्यावर तीन माळे असे एकूण 15 हजार चौ. मीटरवर तर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांसाठी 4 मजली निवासस्थान राहणार आहे. तसेच 100 खाटा करिता लागणारी नवीन पदनिर्मिती या रुग्णालयासाठी करण्यात येईल. यामध्ये नेत्रतज्‍ज्ञ, बालरोगतज्‍ज्ञ, स्त्रीरोगतज्‍ज्ञ, अस्थिरोगतज्‍ज्ञ, सर्जन, भूलतज्‍ज्ञ आणि इतर वैद्यकीय अधिकारी अशी एकूण 14 वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे निर्माण होतील. सोबतच चतुर्थ श्रेणी कर्मचारी, परिचारिका, तांत्रीक पदेसुद्धा पदे निर्माण होतील. Hospital chandrapur

     

     

    रुग्णालयामध्ये राहणार अत्याधुनिक सोयीसुविधा : रुग्णालयामध्ये नवीन विशेषउपचार कक्ष, सर्व प्रकारच्या विशेषज्‍ज्ञ सेवा पुरविता येणे शक्य होईल. या ठिकाणी डोळ्यांच्या व अस्थिरोग शस्त्रक्रियासाठी नवीन शस्त्रक्रियागृह निर्माण करण्यात येणार आहे. नव्याने कार्यान्वित होणाऱ्या विशेष उपचार कक्षाकरिता आधुनिक वैद्यकीय उपकरणे व यंत्रसामुग्री उपलब्ध होतील. या ठिकाणी डिजिटल सोनोग्राफी तसेच एक्स-रे आणि सर्व प्रकारच्या प्रयोगशाळा चाचण्या होतील. सुसज्ज माता-बाळ उपचार यंत्रणा, अपघात विभागात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व साधनसामुग्री, बाह्य रुग्ण विभागामध्ये रुग्णांचा ऑनलाईन डाटा गोळा करणे. गंभीर शस्त्रक्रियेसाठी आय.सी.यू, मॉड्यूलर ऑपरेशन कक्ष, महिला, पुरुष व बालकांसाठी तसेच गरोदर माता व बाळंतपण झालेल्या मातांसाठी स्वतंत्र कक्ष, मॉड्यूलर औषधी वितरण कक्ष, ब्लड बँक, आयुर्वेद, युनानी व होमीओपॅथी रुग्णांच्या उपचारासाठी बाह्य व आंतररुग्ण सेवा, पिण्याचे शुध्द पाणी व स्वच्छतेच्या उपाययोजना राहणार आहे.

     

     

    रुग्णांच्या नातेवाईकांसाठीसुध्दा सुविधा : रुग्णालयात रुग्णांसोबत येणा-या नातेवाईकांसाठी जेवणाची, बसण्याची व आराम करण्यासाठी सर्व सुविधायुक्त प्रतिक्षा कक्ष, नातेवाईकांसाठी स्वतंत्र शौचालय, आंघोळीकरीता बाथरुम, रुग्णांचे नातेवाईक तसेच रुग्णालयामधील अधिकारी व कर्मचा-यांसाठी स्वतंत्र वाहनतळ व्यवस्था राहणार आहे.

  • Chandrapur News सर्वांगिण विकासातून मुल तालुका महाराष्ट्रात अव्वल करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    Chandrapur News सर्वांगिण विकासातून मुल तालुका महाराष्ट्रात अव्वल करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर: मुल तालुक्यात विविध लोकोपयोगी विकासकामे हाती घेण्यात आली आहे. मुख्य रस्ता, पाणीपुरवठा योजना, स्टेडियम, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, तसेच शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, कृषी महाविद्यालय, महिलांच्या पंखांना बळ देणारे सर्वोत्कृष्ट शुरवी महाविद्यालय यासारखे मोठे प्रकल्प उभे राहत आहे. मुल तालुक्याचा चेहरा- मोहरा बदलविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असून सर्वांगिण विकासातूनच हा तालुका महाराष्ट्रात अव्वल करण्याच्या दृष्टीने कार्य करण्यात येत असल्याचे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. minister sudhir mungantiwar

     

    मुल नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, मूलचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार रवींद्र होळी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यशवंत पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत वसुले, प्रभाकर भोयर, रत्नमाला भोयर, चंदू मारगोनवार, नंदू रणदिवे आदी उपस्थित होते.

     

    देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो शहिदांनी प्राणाची आहुती दिली, असे सांगून ना.सुधीर मुनगंटीवार म्हणाले, देशाला संविधान अर्पण होऊन 74 वर्षे पूर्ण झालीत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दायित्व, कर्तव्य व जबाबदाऱ्या संविधानामध्ये लिखित स्वरूपात दिल्या. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष असून मुलचा गौरव वाढवीत छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलाची निर्मिती करण्यात आली. Mul nagar Parishad

     

     

    सर्वप्रथम जेव्हा स्व.दिलीप पारधी यांच्यासमवेत मुल येथे आठवडी बाजार बघण्यासाठी आलो. तेव्हा चिखल, कच्चा रस्ता व घाणीचे साम्राज्य होते. आता या ठिकाणी सुसज्ज अशा आठवडी बाजाराची निर्मिती करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले या नावाने हे आठवडी बाजार सेवेसाठी लोकार्पित करीत आहे. महात्मा फुलेंनी “शेतकऱ्यांचा आसूड” हे पुस्तक लिहून शेतकऱ्यांसाठी असलेला भाव व्यक्त केला. हा बाजार येथील शेतकरी बांधवासाठी निश्चितच सेवा देईल,असा विश्वास ना .श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

     

     

    महर्षी वाल्मिकीच्या नावाने मुख्य रस्त्यावर प्रवेशद्वार उभारण्यात आले. प्रवेशद्वाराची निर्मिती व्हावी, यासाठी भोई समाजाच्या नागरिकांची मागणी होती. सदर प्रवेशद्वारासाठी 50 लक्ष रुपये मंजूर केले. मात्र, जागेअभावी 25 लक्ष रुपये खर्च करून गेटची निर्मिती झाली. या प्रवेशद्वारातून जातांना महर्षी वाल्मिकीचे स्मरण निश्चितच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शिल्लक 25 लक्ष रुपयात श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने दुसरे अटल गेट उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

     

     

    22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली. मंदिर ट्रस्टचे सचिव श्री.चंपतराय यांनी संकलित केलेल्या पवित्र वस्तूबाबत माहिती देतांना चंद्रपूर जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या लाकडाचा उल्लेख केला. ‘सियावर रामचंद्र की जय’ या अकरा अक्षरी मंत्राचा देशात पहिला विश्वविक्रम झाला. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद करण्यात आली. प्रभू श्रीरामचंद्रांच्या नावात चंद्र आहे, त्या चंद्रपूर जिल्ह्यानेच हा विश्वविक्रम केला. रामायणात रावणाने सीतामातेचे हरण केले तेव्हा एक जटायु होता. प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या औचित्याने ताडोबात 10 जटायू सोडण्यात आले. त्याठिकाणी त्यांचे संवर्धन व त्यांच्या अधिवासामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल, असेही ते म्हणाले.

     

     

    पुढे बोलतांना श्री. मुनगंटीवार म्हणाले, दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर शहीद स्मारकाची (म्युरल) निर्मिती करण्यात आली. या स्मारकामध्ये शहीद भगतसिंगाची प्रतिकृती आहे. स्वातंत्र्यासाठी “मेरा रंग दे बसंती चोला” म्हणत भगतसिंग हसत-हसत फासावर गेले. ते स्मारक येथील तरुण-तरुणींच्या आयुष्याचे उद्दिष्ट ठरवेल. या तरुणांमध्येही देशासाठी काही करावयाचे आहे, हा भाव निर्माण होईल.

     

     

    मूल येथे मुख्य रस्ता, कर्मवीर मा.सा. कन्नमवार सभागृह, तहसील कार्यालय, पंचायत समितीची इमारत, पाणीपुरवठा योजना, स्टेडियम, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, इको पार्क, स्विमिंग टॅंक, आठवडी बाजार असे विविध विकासकामे तालुक्यात झाली. 100 खाटांच्या मुल उपजिल्हा रुग्णालयाला मान्यता मिळाली. सोमनाथ येथे भव्य कृषी महाविद्यालय उभे राहत आहे. तसेच मुलींसाठी शुरवी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. येणाऱ्या 5 वर्षात जिल्ह्यातील महिलांच्या पंखांना बळ देणारे शुरवी महाविद्यालय सर्वोत्कृष्ट होईल. जगातल्या उत्तम विद्यापीठाशी हे महाविद्यालय जोडण्यात येईल. या माध्यमातून मुलची विद्यार्थिनी प्रशासकीय अधिकारी होऊन मुलचा गौरव वाढवेल.

     

     

    चंद्रपुरातील मोरवा येथे फ्लाईंग क्लब सुरू करण्यात येत असून एअरपोर्ट विकसित करण्यात येत आहे. गरीब कुटुंबातील मुलगीही वैमानिक व्हावी आणि ती चंद्रपूर जिल्ह्यातील असावी, असा निश्चय केला आहे.चंद्रपूर विकासाच्या बाबतीत इतर जिल्ह्याच्या तुलनेत पुढे आहे. मात्र, मागील दोन वर्षात जिल्हा विकासाच्या बाबतीत मागे राहिला. त्यामुळे जे मागे राहिले ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले. मुल येथे 28 तलाठी कार्यालय होत आहे. 600 कोटी रुपयांच्या एस.एन.डी.टी विद्यापीठाला मान्यता आणली व 62 कौशल्याधारीत प्रशिक्षण महिलांना देण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी निधी मंजूर केला आहे. मुल पोलीस स्टेशनचे डिझाईन तयार करण्यात येत असून पोलिसांचे निवासस्थान देखील उत्तम करण्यात येईल. तसेच मुल तालुक्यातील नागरिकांचे पट्टे व घरकुलांचा प्रश्न देखील निकाली काढण्यात येईल. मुल तालुका महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट असला पाहिजे, हा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्य करण्यात येत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

     

    मुल नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांचे लोकार्पण

    9 कोटी रुपये निधीतून 61 गाळ्याचे छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल उभारण्यात आले. यामध्ये तळ मजल्यावार 23 गाळे, पहिला व दुसरा मजला प्रत्येकी 19 गाळे, तसेच प्रसाधनगृह, जिना, लिफ्ट, स्ट्रक्चरल ग्लेझींग, अतंर्गत व बाह्य विद्युतीकरण व सोलर सिस्टीम आदी सुविधा करण्यात आल्या आहे.नगर परिषद मुल येथे वैशिष्ट्यपुर्ण निधीतून 25 लक्ष रु. खर्ची करुन मुख्य रस्त्यावरील वाल्मिकी नगरातील स्वागत गेटचे बाधंकाम करण्यात आले. तसेच नगर परिषदांना वैशिष्ट्यपुर्ण कामासाठी विशेष अनुदानातुन आठवडी बाजार व मटन मार्केटचे बांधकाम करण्यात आले. यामध्ये भाजी बाजारासाठी 45 आच्छादीत ओटे, मटन मार्केटसाठी 8, चिकनसाठी  14 गाळे, फिश मार्केट स्लॉटरच्या इमारतीचे बांधकाम, पेव्हींग  ब्लॉक, पाईप नाली, सुरक्षाभिंतीचे बांधकाम करण्यात आले.आदींचे लोकार्पण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

     

    ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

    गिरीजाबाई मेश्राम, रामाजी मेश्राम, काशिनाथ बावनकर, महादेव कर्नेवार, अंबादास अमदूर्तीवार नागरिकांचा पालकमंत्री श्री मुनगंटीवार यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव तर आभार सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता श्री. साखरे यांनी मानले.