महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.
ब्रह्मपुरी – केंद्रातील मोदी सरकार केवळ धर्माच्या नावाखाली राजकारण करत आहे. विकास मात्र बाजूला अडगळीत पडला आहे. देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे जनता त्रस्त झाली असुन काॅंग्रेस पक्षाकडे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा कल वाढलेला असुन ब्रम्हपूरी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो महिला, युवक व पुरुषांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. Chandrapur congress
राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विकासकामांवर व खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून सदर पक्षप्रवेश करण्यात आला आहे. Modi government
यावेळी पक्षप्रवेश कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी जि.प.अध्यक्ष सतीश वारजूरकर, गडचिरोली काॅंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष हसन गिलानी, गडचिरोलीचे माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जि.प.सदस्य डॉ. राजेश कांबळे, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, नगरसेवक डॉ. नितीन उराडे, शहर काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे व महीला काँग्रेसच्या सुधाताई राऊत यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये शहरातील हनुमाननगर, गांधीनगर, सुंदरनगर, संत रविदास चौक, पेठवार्ड, गौतमनगर या प्रभागासह तालुक्यातील नान्होरी, अऱ्हेरनवरगाव येथील महिला, युवक व पुरुषांचा समावेश आहे.
चंद्रपूर : सात वर्षाच्या चिमुकलीला जन्मापासूनच श्रवणदोष होता. आपल्या लेकीला ऐकायला येत नसल्याचे कळल्यापासून कुटुंबीय हताश होते. एक शस्त्रक्रिया तर आटोपली, पण शंभर टक्के श्रवणदोष दूर होण्यासाठी कॉक्लर न्युक्लियस ८ साऊंड प्रोसेसर घेण्यासाठी आर्थिक अडथळा निर्माण झाला. अशात वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार देवदूतासारखे धावून आले आणि तात्काळ मदतीचे आदेश दिले. आई-वडिलांनी आवाज दिल्यानंतर चिमुकलीने प्रतिसाद दिला आणि कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा होता.
राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे मुक्काम पोस्ट पिपरी तालुका कोरपना येथील एका सात वर्षीय चिमुकली युवानी तिखट हिला पुन्हा ऐकण्याचे वरदान प्राप्त झाले आहे. ती जन्मापासूनच दोन्ही कानांनी ऐकण्यास असमर्थ होती. युवानीवर कॉक्लर इम्प्लांट सर्जरी करण्यात आली होती. परंतु ऐकू येण्यासाठी न्युक्लियस साऊंड प्रोसेसर इम्प्लांटवर राहणे नितांत गरजेचे होते. शस्त्रक्रियेनंतर मिळालेले साऊंड प्रोसेसर खराब झाल्याने तिला पुन्हा ऐकण्यास अडथळा येऊ लागला. कॉक्लर न्युक्लियस साऊंड प्रोसेसर घ्यायला जवळपास ७ लक्ष ५० लक्ष रुपयांचा खर्च होता. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबियांसाठी एवढा पैसा जमवणे केवळ अशक्य होते.
त्यामुळे तिखट कुंटुंबाने राजुरा येथे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची भेट घेतली. देवराव भोंगळे यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांना यासंदर्भात सहकार्य करण्याची विनंती केली .ना. श्री. मुनगंटीवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता युवानीला आर्थिक मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. विशेष बाब म्हणून जिल्हा वार्षिक योजना सन २०२३ -२४ या निधीतून ७ लक्ष ५० हजार रूपये मंजूर करण्याचे आदेश ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. निधी प्राप्त होताच कॉक्लर न्युक्लियस साऊंड प्रोसेसर घेऊन देण्यात आल्याने तिला आता पुन्हा ऐकायला येऊ लागले आहे.
श्री. मुनगंटीवार नव्हे देवदूतच!
कॉक्लर इम्प्लांटमुळे १०० टक्के श्रवणदोष असलेल्या मुलांनाही ऐकू यायला लागते. परंतु शस्त्रक्रिया झाल्यानंतर लागण्यात येणाऱ्या कॉक्लर न्युक्लियस साऊंड प्रोसेसर महागडे असल्याने अनेक पालकांपुढे आर्थिक गणित जुळविण्याचे मोठे आव्हान असते. अशात ना. श्री. सुधीर मुनगंटीवार देवदूतासारखे धावून आल्याने युवानीचा आता ऐकता येणे शक्य झाले आहे. तिखट कुटुंबीयांसह कोरपना तालुक्यातील नागरिकांनी देखील ना. श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.
चंद्रपूर – राज्यात सर्वाधिक वाघांची संख्या असलेला जिल्हा म्हणून आज चंद्रपूरची ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पामुळे ओळख आहे, वर्ष 2023 मध्ये ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात ठाकूर बंधूनी ऑनलाइन तिकीट विक्री च्या नावाने ताडोबा प्रशासनाची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली होती, मात्र आता पुन्हा काही पर्यटकांची जंगल सफारी च्या नावाने फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुर्गापूर पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. Tadoba tiger project
छत्रपती संभाजी नगर येथे राहणारे 54 वर्षीय मनीष बावसकर यांनी जून 2023 ला बावसकर कुटुंब व नातेवाईक असे एकूण 18 जणांसाठी ताडोबा सफारी केयुज कडुकर या इसमाकडून बुक केली होती. यासाठी 25 मार्च महिन्यात केयुज कडुकर यांच्या फोन पे वर बावसकर यांनी तब्बल 25 हजार 500 रुपये, 27 मार्च 3 हजार रुपये व 14 एप्रिलला 10 हजार 400 रुपये असे एकूण 38 हजार 900 रुपये पाठविले होते. Jungle safari
काही अपरिहार्य कारणामुळे बावसकर हे ताडोबा सफारी साठी येऊ शकले नाही, बावसकर यांनी पुन्हा ताडोबा सफारीसाठी कडुकर यांच्यासोबत सम्पर्क साधला आधीचे पैसे कडुकर यांचेकडे जमा होते, त्यांनतर बावसकर यांनी नोव्हेंबर 2023 ला 5 हजार फोन पे द्वारे कडुकर यांना पाठवीत 27 जानेवारी 2024 ची ताडोबा बुकिंग कन्फर्म केली. Online booking
27 जानेवारीला बावसकर कुटुंब हे सफारी साठी ताडोबा येथील मोहरली गेटजवळ आले असता त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्याला बुकिंग चे तिकीट दाखविले असता कर्मचाऱ्यांनी ते बोगस असल्याचे सांगितले, आपली फसवणूक झाली असे बावसकर यांच्या लक्षात आले, त्यांनी तात्काळ याबाबत दुर्गापूर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.
दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला असता काही तासात आरोपी केयुज कडुकर ला अटक करण्यात आली.
पोलीस तपासात कडुकर यांनी 6 जानेवारीला मुंबई येथील 58 वर्षीय राकेश वाजपेयी यांचीसुद्धा अश्याच प्रकारे फसवणूक केली होती, फिर्यादी बावसकर व वाजपेयी यांची कडुकर यांनी बुकिंग च्या नावाखाली तब्बल 66 हजार 400 रुपयांनी फसवणूक केली, पोलिसांनी आरोपी कडुकर यांच्यावर कलम 420, 66(ड) व माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अनव्ये गुन्हा दाखल केला.
याबाबत वनविभाग सध्या काही बोलायला तयार नाही, मात्र आरोपी केयुज कडुकर यांचे 5 वर्षांपूर्वी ताडोबा येथे होम स्टे होते, मात्र त्यांच्या बोगस कामामुळे वनविभागाने कडुकर यांचे होम स्टे बंद केले होते, त्यांनतर सुद्धा सफारीसाठी आलेल्या पर्यटकांशी ओळखी करीत पुन्हा ताडोबा मध्ये यायचं असेल तर मला सम्पर्क करा मी सफारी बुकिंग करतो असे दर्शवायचा.
सदरची यशस्वी कारवाई दुर्गापूर पोलीस निरीक्षक लता वाडीवे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश मोहतुरे, पोलीस कर्मचारी खुशाल खेडेकर, योगेश शार्दूल, योगराज काळसरपे, प्रमोद डोंगरे, मनोहर जाधव यांनी केली.
पोलिस दल आणि पोलिस दलातील कर्मचारी कौतूकापेक्षा टीकेचे धनी होत आले आहेत. त्यात त्यांचा संवेदनशील. कार्यतत्पर. आणि समाजाभीमुख. चेहरा अभावानेच समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर नित्याच्या कर्तव्यापलीकडे जाऊन बांधिलकी जपणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सत्कार महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप चिमूर तर्फे करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलिस स्टेशन चिमूर येथे 24 तास कर्तव्य बजावनाऱ्या पोलिस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव. पोलिस निरीक्षक मनोज गभने. पोलिस उपनिरीक्षक प्रीती मरकाम व उपस्थित सर्व पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार टायगर ग्रुप शहर अध्यक्ष रोहन नन्नावरे. शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते. दिव्यवंदणा आधार फाऊडेशनचे अध्यक्ष शुभम पसारकर यांचे उपस्थित संपन्न झाला. यावेळी विकास जांभूले, कुणाल खीरडकर, सौरभ चटपकर, अक्षय इटणकर, प्रफुल बोंडे, पवन झाडे, विशाल शेंडे, सूरज कांकलवार. निखिल गिरी, पवन डोंगरवार उपस्थित होते.
पोलिस हा राज्यसरकारचा कर्मचारी असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मांलमत्तेची रक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही त्यांना अधिकार आहे. पोलिसामुळे आपण सुरक्षित आहोत. परंतूच त्यांचे जीवन खूपच असुरक्षित आहे. त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप चिमूर तर्फे चिमूर पोलिस बांधवांचा आगळा वेगळा सत्कार करण्यात आला आहे.
चंद्रपूर – गणतंत्र दिवसाच्या पूर्व संध्येला उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे युवासेना शहरप्रमुख शिवा वझरकर याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी त्याच्या सरकार नगर येथील राहत्या घरी जात कुटुंबीयांची सांत्वन भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेसी यांना दुरध्वनी वरुन संपर्क साधत महत्वपूर्ण सूचना केल्या आहे. यावेळी कॉंग्रस नेत्या चित्रा धांगे, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रतिमा ठाकूर, शिवसेना महानगर प्रमुख भरत गुप्ता, यांची उपस्थिती होती.
गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास शिवा वझरकर सरकार नगर येथे अग्रवाल कोचिंग क्लासेसजवळ एकाला भेटायला गेला होता. तिथे दोघांमध्ये चर्चा सुरू असताना आरोपी घटनास्थळी आला व शिवा वझरकर यांच्यावर चाकूने वार केले. यात वझरकर गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला गंभीर अवस्थेत सरकार नगर येथील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आले. तिथे उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरने मृत घोषित केले. या घटनेनंतर सरकार नगर तुकुम येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणी काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी शिवा यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी घडलेल्या घटनेची संपुर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्र सिंह परदेसी यांच्याशी दुरध्वनी वरुन संपर्क साधत संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला. चंद्रपूर शहर शांत आहे. ही शांतता अबाधित राहिली पाहिजे. आपण या प्रकरणाची उच्च अधिकार्याकडून चौकशी करावी यासह अनेक महत्वपूर्ण सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षक यांना केल्या आहे.
चंद्रपूर – सामाजिक न्याय विभागाने , अनुसूचित जाती /जमाती , इतर मागास प्रवर्ग , विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी अधिसूचना काढली असून या अधिसूचना मध्ये बरेच बदल केली आहे व ओबीसी ( विजा , भज, व विमाप्र ) अनुसूचित जाती/ जमाती, इतर समाजाची जातनिहाय जनगणना करण्यासाठी 7 फेब्रुवारी 2024 ला ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूची जमाती, विजा, भज व विमाप्र समजा तर्फे महामोर्चाचे आयोजन केले आहे, मोर्चाची नियोजन बैठक धनोजे समाज सभागृह वडगाव रोड,चंद्रपुर येथे ऍड पुरुषोत्तम सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. Gazette of Maharashtra Govt
महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग ( जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन ) अधिनियम २००० मध्ये बदल कारणासाठी सरकारने राजपत्र काढले असून त्या मुळे प्रमाणपत्र मिळण्यास बोगसगिरी होण्याचे प्रमाण जास्त होऊ शकते , म्हणून राजपत्र रद्द करून घेण्यासाठी आणि ओबीसी ( विजा , भज , विमाप्र ) “अनुसूचित जाती /जमाती व इतर समाजाची जात निहाय जनगणनेच्या मागण्यांवर महामोर्चा निघणार आहे.cast wise census
या बेठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघ,आदिवासी विकास परिषद,आदिवासी संघर्ष कृती समिती(सर्व जमाती व संघटना संलग्नीत), बहुजन समता पर्व व सर्व SC,ST, OBC, VJ ,NT &SBC समाजातील संघटना तर्फे सचिन राजूरकर, डॉ संजय घाटे, नंदू नागरकर, दिनेश चोखारे , अनिल धानोरकर , प्रमोद बोरीकर, जयदीप रोडे,राजेश नायडू, विजय नळे, राजू अडकीने, मनीष चौधरी, दिनेश कष्टी, देवराव सोनपित्तरे, रणजित डवरे,अजय बलकी, योगेश बोबडे, एस बी मटाले , राजू मारांडे, अरुण देऊलकर, निळकंठ पावडे, सुनील आवारी, उमेश काकडे, शाम लेडे ,अशोक बनकर,प्रा सूर्यकांत खणके , प्रा शिंदे सर, रवींद्र टोंगे, प्रमोद बोरीकर, सतीश भिवगडे , कृष्णा मसराम, विनोद ताजने, देवा पाचभाई,मनीषा बोबडे, गोमती पाचभाई, स्नेहल चौथाले उपस्थित होते.
चंद्रपूर – शहरातील चारचाकी वाहन चोरांचा कारनामा ऐकून आपणही काही वेळासाठी चक्रावून जाणार, कारण त्या चोराने ग्रामीण भागातून चारचाकी वाहन चोरी करीत सदर वाहन चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात ठेवले, मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेने त्याचा भांडाफोड झाला. Chandrapur news
जिल्ह्यात चोरीच्या गुन्ह्यात छडा अनेक प्रयत्नांनंतर लागतो, असे काही गुन्हे जिल्ह्यात घडले होते मात्र ते उघडकीस न आल्याने पोलीस अधीक्षक परदेशी यांनी त्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला. Local crime branch
24 जानेवारीला गस्तीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा चारचाकी वाहन कमी किमतीमध्ये विकण्याकरिता ग्राहक शोधत आहे, दुचाकीवर फिरत असलेल्या त्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत विचारपूस केली.
26 वर्षीय वैभव डोंगरे, राहणार मोखाडा तालुका सावली असे त्या इसमाचे नाव होते, त्याने व मित्रांनी मिळून चारचाकी वाहन सावली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरले अशी कबुली दिली व कुणाला त्या वाहनाबाबत थांगपत्ता लागू नये यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात वाहन पार्क करून ठेवले.
चोरी केलेले वाहन टाटा अल्ट्राज क्रमांक Mh34 BV 1302 स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातून जप्त केले, स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी क्रमांक MH14EX 6646 व चारचाकी वाहन असा एकूण 3 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि बोबडे, गायकवाड, पोलीस कर्मचारी नितीन साळवे, प्रकाश बलकी, सुभाष गोहोकार, मिलिंद जांभुळे यांनी केली.
चंद्रपूर : भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आजपासून सुरू झाले आहे. संविधानाने आपल्याचा जसे अधिकार दिले, तसेच कर्तव्य आणि दायित्वाचीसुध्दा जाणीव करून दिली आहे. या देशासाठी प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्याचा मंगलकलश ज्यांनी आपल्या हाती दिला आहे, त्या शहिदांचे स्मरण करून देशाला व लोकशाहीला पुढे नेण्यासाठी स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
पोलिस मुख्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार सुधाकर अडबाले, किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम. यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
भयमुक्त, भूकमुक्त, विषमतामुक्त भारत हा भाव संविधानात आहे, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सर्व व्यसनांपासून मुक्त होऊन अमृत कलश हातात घेण्याचा संकल्प करणे, हाच खरा प्रजासत्ताक दिन आहे. आपल्याकडे नुकत्याच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ट नियोजन केले. त्यासाठी जिल्हाधिकारी व संपूर्ण प्रशासन अभिनंदनास पात्र आहे. अयोध्या येथे झालेल्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला चंद्रपूरकरांनी ‘सियावर रामचंद्र की जय’ हा मंत्र लिहून एक आगळावेगळा विश्वविक्रम केला. त्याची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडमध्ये नोंद झाली आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता वाघांच्या संरक्षणासोबतच जटायूचे संवर्धन करण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा असून 1 लक्ष 84 हजार हेक्टरवर धानाची शेती केली जाते. राज्य सरकारने आता धानाचा बोनस वाढवून 20 हजार रुपये हेक्टरप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत 40 हजार रुपये मंजूर केले आहे. ऐकार्जुना येथे 31 कोटी 90 लक्ष रुपयांत भाजीपाला संशोधन केंद्र उभे राहणार आहे. अजयपूर येथे पंजाब नॅशनल बँकेने 15 कोटी रुपये शेतीपयोगी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. सोमनाथ (ता. मूल) येथे कृषी महाविद्यालयासाठी 135 कोटींची मान्यता प्राप्त झाली आहे. येत्या दोन वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात 5001 कि.मी. चे बळीराजा समृध्दी मार्ग शेतपाणंद रस्ते पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी मोरवा (ता. चंद्रपूर) येथे फ्लाईंग क्लब स्थापन करून त्याचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे. केंद्रशासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेच्या 542.05 कोटीच्या मलनि:स्सारण प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र संग्राम सैनिक कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
विविध मिशनच्या माध्यमातून जिल्ह्याचा कायापालट : ‘मिशन फिट’ अंतर्गत जिल्ह्यात आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती देण्यात आली आहे. 140 खाटांचे कॅन्सर हॉस्पीटल तसेच बल्लारपूर येथे कामगारांसाठी 100 खाटांचे ई.एस.आय.सी. हॉस्पीटल उभे राहात आहे. ‘मिशन स्वावलंबन’ अंतर्गत पी.एम. विश्वकर्मा योजना, कौशल्य विकासासाठी निधीची तरतुद करण्यात आली आहे. तसेच एम.आय.डी.सी.च्या धर्तीवर आता एफ. आय.डी.सी. ची निर्मिती होणार असून 48 कोटी रुपये मंजूर झाले आहे. ‘मिशन कल्पवृक्ष’ अंतर्गत बांबु पॅलेटचा उपयोग करण्यासाठी वनशेती, बांबु शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
जिल्ह्यात विकासाची 225 कामे : चंद्रपूर जिल्ह्यात अपूर्ण राहिलेल्या पायाभुत सुविधांचा विकास वेगाने पूर्ण करून आरोग्य संस्थांचे बळकटीकरण, शिक्षण, सिंचन, जैव विविधता उद्यान, दळणवळणाची उपलब्धता आदींची कामे त्वरीत पूर्ण करण्यात येत आहे. तसेच सैनिकी शाळा, वन अकादमी, देखनी बसस्थानके, अनेक ठिकाणी ई- लायबरी, बॉटनिकल गार्डन, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, नियोजन भवन, कोषागार भवन, अभ्यासिका, वसतीगृहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा क्रीडा संकुल, वन विभागाची आकर्षक विश्रामगृहे, इको पार्क, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण भागातील काँक्रीट रोड असे जवळपास 225 कामे सुरू आहेत. यापैकी काही पूर्ण झाली असून काही प्रगतीपथावर आहे.
महानाट्य व महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाची नव्या पिढीला जाणीव करून देण्यासाठी चंद्रपूर येथे 2, 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी ‘जाणता राजा’ हे महानाट्य आणि 17, 18 व 19 फेब्रुवारी रोजी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
ना . मुनगंटीवार यांच्या हस्ते सन्मानित मान्यवर : विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आश्विनी लोनगाडगे, विष्णुवर्धन येरनी, राहुल पोहाणे, सुहास बनकर, 67 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा व्हॉलीबॉल स्पर्धेतील सखी दोरखंडे, सई घिवे, कौशल्य, रोजगार व नाविण्यता विभागातर्फे विवेक अटलकर, अमियो दास, प्रिती पर्वे, सुरज गौरकार, प्रशंसनीय सेवेबद्दल पोलिस महासंचालकांचे विशेष सेवापदक पोलिस उपअधिक्षक राधिका फडके, पोलिस निरीक्षक सर्वश्री राजेश मुळे, शिवाजी कदम, प्रवीणकुमार पाटील, महेश कोंडावार, भरोसा सेलच्या पोलिस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे, पोक्सो कायद्याची प्रभावी जनजागृती केल्याबद्दल दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तसेच विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, उत्कृष्ट आशा स्वयंसेविका म्हणून ममता भिमटे, यशोदा राठोड, संदेश मामीडवार आदींचा समावेश होता.
चंद्रपूर – अरविंद नगर येथे राहणारा ठाकरे गट युवासेना शहर प्रमुख 25 वर्षीय शिवा वझरकर यांची 25 जानेवारीला निर्घृणपणे हत्या करण्यात आली, या प्रकरणी 3 आरोपीना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे. Chandrapur yuvasena
तुझा बाप 300 रुपये रोजीने पोह्याच्या ठेल्यावर काम करतो, तुझी औकाद काय? हे वाक्य आहे हिमांशू कुमरे याच, त्याने शिवा वझरकर याला या शब्दात हिनवले, यावरून दोघांचा मोबाईल वर वाद झाला.
हिमांशू आपल्याला असा का बोलला, याबाबत जाब विचारायला गेलेला शिवा गेला पण तो परतलाच नाही, 25 जानेवारीला अग्रवाल कोचिंग सेंटर जवळील स्वप्नील काशीकर यांच्या कार्यालयात शिवा ची धारदार शस्त्राने वार करीत हत्या करण्यात आली. Ram nagar police station
स्वप्नील काशीकर याच्या कार्यालयात शिवा पोहचला त्याठिकाणी हिमांशू कुमरे आपल्या सहकाऱ्यांसोबत आधीच पोहचून होता, शिवा ने हिमांशू ला जाब विचारला असता आधी दोघांची बाचाबाची झाली, त्यानंतर वाद वाढत असताना दोघेही काशीकर याच्या कार्यालयाच्या बाहेर आले, आणि वाद मारहानी पर्यंत पोहचला.
त्यामध्ये स्वप्नील काशीकर ने हिमांशू कुमरे ला कार्यालयात नेले हिमांशू जेव्हा बाहेर परतला त्यावेळी त्याच्या हातात धारधार शस्त्र होते.
अचानक हिमांशू ने शिवा च्या पोटात धारदार शस्त्राने वार केला, यामध्ये शिवा खाली कोसळला, त्यानंतर हिमांशू, स्वप्नील काशीकर, रिझवान पठाण, चैतन्य आसकर, रोहित पितरकर, नाझीर खान, सुमित दाते, अन्सार खान यांनी लाथा-बुक्क्यांनी शिवा ला मारहाण करणे सुरू केले.
शिवा सोबत आलेले हिवराळें यांनी तात्काळ शिवा ला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, पोलिसांनी आतापर्यंत या घटनेत 4 आरोपीना अटक केली असल्याची माहिती आहे.
स्वप्नील काशीकर हा 2 दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता, गोंडपीपरी येथील कुलथा रेती घाटावर स्वप्नील ने सरपंच व तंटामुक्त समिती अध्यक्षला बेदम मारहाण केली होती, त्या प्रकरणात स्वप्नील काशीकर वर एट्रोसिटी व प्राणघातक हल्ला कलम 307 अंतर्गत गुन्हे दाखल झाले होते, मात्र तो जामिनावर बाहेर आला कसा हा एक शोधाचा विषय आहे, स्वप्नील च्या जामीनामागे मोठं अर्थकारण दडल्याची माहिती आहे.
स्वप्नील काशीकर याला वाहतूक सेना जिल्हाप्रमुख पदावरून गोंडपीपरीच्या प्रकरणानंतर डिसेंबर महिन्यात पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी वझरकर हत्याकांडात दोषी असलेल्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांनी सदर प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे, या हत्याकांडाला कसलेही राजकीय अँगल नसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पोलिसांनी या प्रकरणात 8 आरोपीवर कलम 302 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे, आरोपीमध्ये हिमांशू कुमरे हा सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलगा आहे.
चंद्रपूर – शहरातील सरकारनगर भागात ठाकरे गट युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर ची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, या हत्येने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणात पोलिसांनी राजकीय पक्षातील माजी पदाधिकारी व सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाला अटक केली आहे.
घटनेनंतर सरकार नगर तुकुम येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती, गर्दी ने आरोपीच्या वाहनाची तोडफोड केली, विशेष बाब म्हणजे दोन्ही आरोपी काही दिवसांपूर्वी हाफ मर्डर च्या केस मधून जामिनावर बाहेर आले होते.
मृतक व आरोपी यामध्ये काही वाद झाला होता, त्याबाबत बोलण्याकरिता मृतक आरोपीला भेटायला गेला होता, मात्र त्याठिकाणी बाचाबाची झाली आणि वाद वाढला, सदर वादात युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांच्या पोटात धारदार शस्त्राने हल्ला केला, त्या हल्ल्यात शिवा वझरकर जागीच ठार झाला.
शिवा हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता.
या प्रकरणी फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहे.
घटनेनंतर पोलीस अधीक्षक परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, बल्लारपूर, घुग्घुस, भद्रावती व चंद्रपूर पोलीस दाखल झाले होते.