Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • चंद्रपुरात घडला असा गुन्हा की, पोलीस अधीक्षकांनाही करावे लागले हे आवाहन

    चंद्रपुरात घडला असा गुन्हा की, पोलीस अधीक्षकांनाही करावे लागले हे आवाहन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – डिजिटल युगात गुन्हेगारी सुद्धा आधुनिक झाली आहे, आज गुन्हेगारीच्या युक्तीला तोड नसल्याचे दिसत आहे, ती गुन्हेगारी ऑनलाइन असो की ऑफलाईन, असाच एक गुन्हा चंद्रपुरात घडला, स्थानिक गुन्हे शाखेने अश्याच एका टोळीचा पर्दाफाश केला आहे.

     

     

    नागरिकांच्या नावावर फायनान्स ने दुचाकी वाहन खरेदी करीत ते वाहन दुसऱ्या व्यक्तीला विकण्याचा गोरखधंदा तीन युवकांनी सुरू केला होता, मात्र स्थानिक गुन्हे शाखेमुळे हे घबाड पुढे आले.

     

    असे होते गुन्हेगारीचे स्वरूप

    नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे राहणारा आरोपी क्रमांक 1 आशिष सहारे व त्याचे सहकारी आरोपी 2 मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील पवन साहू, आरोपी क्रमांक 3 संदीप कनासिया बालाघाट मध्यप्रदेश येथे राहणारे हे तिघेजण एकमेकांचे मित्र, तिघांनी मिळून नव्या गुन्ह्याची योजना आखली.

     

    नागभीड येथे राहणारा आशिष सहारे याने गावातील गरीब नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढणे सुरू केले, यामध्ये नारायण पर्वते यांच्या नावावर चारचाकी वाहन घेतले, पर्वते यांचे सर्व कागदपत्रे सोबत घेत त्यावर कर्ज सुद्धा घेतले, आणि नंतर तेच वाहन दुसऱ्याला विकले, वाहन घेणाऱ्याला त्या वाहनांचे कागदपत्रे मिळाले नाही.

     

    काही दिवसांनी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पर्वते यांच्याकडून वाहनांचे हफ्ते मागायला आले, मात्र मी वाहन घेतले नाही असे त्यांनी सांगितले, नंतर फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सर्व माहिती पर्वते यांना दिली, आपली फसवणूक झाली असल्याचे कळताच याबाबत पोलीस तक्रार करण्यात आली.

     

    गुन्ह्याची गंभीरता बघता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्याकडे वर्ग केला.

    स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पथक गठीत केले, सखोल तपास केल्यावर यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने 1 स्कॉर्पिओ, 1 ट्रॅक्टर व 14 दुचाकी असे तब्बल 16 वाहने किंमत 32 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

     

    स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना अटक करीत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये कलम 420 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे.

     

    जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्र परदेशी यांनी याबाबत जनतेला आवाहन केले की वाहन खरेदी करताना शोरूम मधून वाहनाची सखोल माहिती घ्यावी, कागदपत्रांची पडताळणी करावी, वाहन मिळवून देतो असे कुणी सांगितले तर पुढील व्यक्तीला आपली कागदपत्रे देऊ नका, त्यासंबंधाने कुणी आपल्याकडे आले की जवळच्या पोलीस स्टेशनला याबाबत माहिती द्यावी.

     

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, सपोनि नागेशकुमार चतरकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी दीपक डोंगरे, गणेश भोयर, संजय वाढई, गोपीनाथ नरोटे, सतीश बगमारे, प्रदीप मडावी व सायबर पोलिसांनी केली.

  • चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी कार्यालय रामभरोसे

    चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी कार्यालय रामभरोसे

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी कार्यालय वाऱ्यावर आहे. प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव वारंवार कोणतीही पूर्वसूचना न देता सुटीवर जातात. यामुळे कार्यालयाचे काम बेभरवसे सुरू आहे. याबाबत संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

     

    प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांनी गेल्या काही महिन्यांत अनेकदा सुट्टी घेतली आहे. या सुट्ट्यांचे नियोजनही त्यांनी केलेले नसते. त्यामुळे कार्यालयात कामकाजाची अडचण निर्माण होते.
    याशिवाय, कार्यालयातील फील्ड अधिकारी देखील कामात दिरंगाई करीत आहेत. यामुळे कारखाने आणि औद्योगिक प्रकल्पांवर नियमांचे पालन केले जात नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होण्याची भीती आहे.

     

    बेले यांनी प्रादेशिक अधिकारी आणि फील्ड अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, पर्यावरणाचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

  • विदर्भ तेली समाज महासंघाच्या विदर्भ सचिवपदी श्रीहरी सातपुते यांची निवड

    विदर्भ तेली समाज महासंघाच्या विदर्भ सचिवपदी श्रीहरी सातपुते यांची निवड

    News34 chandrapur

    चिमूर – राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष श्रीहरी सुभाषराव सातपुते यांची प्रा रमेश पिसे यांच्या शिफारसीनुसार विदर्भ तेली समाज महासंघाच्या पूर्व विदर्भ सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.

     

    तेली समाजाच्या न्याय हक्कासाठी व समाज संघठनेसाठी लढणारी संघटना विदर्भ तेली समाज महासंघाचे कार्य वाढविण्याकरिता संघटनेचे उद्दिष्ट समांजा पर्यंत पोहचविण्याकरिता विदर्भ तेली समाज महासंघचे मुख्य संघटक प्रा रमेश पिसे यांच्या सिफारसीनुसार केंद्रीय अध्यक्ष रघूनाथ शेंडे यांनी चिमूर येथील श्रीहरी सुभाषराव सातपुते यांची विदर्भ तेली समाज महासंघाच्या पूर्व विदर्भ सचिव पदी नियुक्ती केली.

     

    श्रीहरी सातपुते राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष असून व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा सहचिटणीस आहेत. मुख्य संघटक प्रा रमेश पिसे. केंद्रीय सचिव संजय सोनटक्के. सत्यशोधक महिला महासंघाच्या राज्य अध्यक्षा वंदना वंनकर. प्रा. महादेव पिसे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.

     

    यावेळी धनराज मुंगले. राजू अगडे. भास्कर बावनकर. ईश्वर डुकरे. ऍडव्होकेट धनराज वंजारी. प्रवीण सातपुते. रामदास कामडी. प्राध्यापक पितांबर पिसे. कवडु लोहकरे. प्रभाकर पिसे. तुळसीदास भूरर्से माधुरी रेवतकर. ममता डूकरे. भावना बावनकर. वर्षा शेंडे. यामिनी कामडी. पुष्पा हरने. कांचन खाटीक. व सर्व समाज बांधवांनी अभिनंदनाचा वर्षाव केला

  • चंद्रपूर जिल्ह्यात 4 वाघांचे मृत्यू

    चंद्रपूर जिल्ह्यात 4 वाघांचे मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प अंतर्गत येणाऱ्या कोळसा वनपरिक्षेत्रात सकाळी 2 वाघांचे मृतदेह आढळून आले, आतापर्यंत या महिन्यात तब्बल 4 वाघांचा मृत्यू तर 1 बिबट चा मृत्यू झाला.
    यामध्ये 1 बोर्डा,1 भद्रावती तर 2 कोळसा येथे वाघांचे मृत्यू झाले आहे.

     

    राज्यात सर्वाधिक जास्त संख्या असलेल्या वाघाचा जिल्हा म्हणून ताडोबा अभयारण्य याचं नाव येत, मात्र या ताडोब्यात वाघाला अधिवास क्षेत्र कमी पडत आहे, त्यामुळे वाघांच्या झुंजी वाढत आहे.

     

    कोळसा वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र झरी पाणघाट खातोडा तलाव क्षेत्रात आज सकाळी वनरक्षक गस्त करायला गेले असता त्यांना 2 वाघांचे मृतदेह त्याठिकाणी आढळून आले.

     

    2 वाघाचा मृत्यू हा झुंजीत झाला असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे, पूर्णपणे शाबूत असलेला वाघ हा T-142 नर असून त्याचे अंदाजे वय 6 ते 7 वर्षे आहे.

     

    दुसरा वाघ हा कमी वयाचा असून त्या वाघांचे अंशतः मास भक्ष्य केले आहे, दुसरा वाघ हा T-92 या वाघिणीचा मादी बच्चा आहे, त्याच वय हे अंदाजे 2 वर्षे आहे.

     

    दिनांक 20 जानेवारी ते 21 जानेवारीला रात्रीच्या दरम्यान वाघांची झुंज झाली असावी असा अंदाज आहे, सदरील वाघांचे मृतदेह TTC सेंटर येथे शवविच्छेदन साठी पाठविण्यात आले असून 23 जानेवारीला मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार.

    दोन्ही वाघांचे DNA नमुने सुद्धा घेण्यात आले आहे, मोका पंचनामा करतेवेळी कोर चे उपसंचालक नंदकिशोर काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी वृंदन कातकर, बंडू धोत्रे, मुकेश भांदककर, डॉ खोब्रागडे आदींची उपस्थिती होती.

  • जनतेला दिलेल्या अभिवचनाची पूर्तता हेच आमचे कर्तव्य – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    जनतेला दिलेल्या अभिवचनाची पूर्तता हेच आमचे कर्तव्य – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर –  लोकप्रतिनिधी म्हणजे जनता व प्रशासन यामधील दुवा आहे. जनसेवकाने सामान्य नागरिकांच्या समस्यांना सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहावे. जनतेने दाखविलेला विश्वास याला जाऊ देता जनतेच्या विश्वासावर खरे उतरणे व जनतेला दिलेल्या अभिवचनाची पूर्तता करणे हेच आमचे आद्य कर्तव्य असून नागरिकांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले ते ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा येथील भूती नाल्यावर उंच फुलाचे बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

     

    आयोजित भूमिपूजन सोहळ्यास उद्घाटक म्हणून राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार ,ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजेश कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रभाकरजी शेलोकर ,काँग्रेस युवक विधानसभा अध्यक्ष सोनू नाकतोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिता पारधी, सरपंच दौलत ढोंगे, उपसरपंच सोनाली सूर्यवंशी, अनुसूची जाती सेल अध्यक्ष प्रमोद मोटघरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ब्रह्मदेव दिघोरे,पोलीस पाटील उसलवार, ग्रा. प .सदस्य ज्योती ढोंगे ,वैशाली राऊत, मिसार , दिघोरे प्रामुख्याने उपस्थित होते.

     

    यावेळी मार्गदर्शनपर बोलताना तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष खेमराज तिडके यांनी विरोधी पक्षनेते तथा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मतदारसंघात केलेल्या सोयी सुविधांची माहिती देत नागरिकांच्या दैनंदिन भेडसावणाऱ्या समस्यांना पूर्णविराम देणे हेतू राबविण्यात येणाऱ्या विजयदूत या संकल्पनेची परिपूर्ण माहिती उपस्थित ग्रामवासी यांना दिली. तर विरोधी पक्षनेते तथा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांचे कार्य व तत्परता तसेच नागरिकांप्रति असणारी सेवाभावी वृत्ती यावर प्रकाश टाकत माजी जि. प. सदस्य डॉ. राजेश कांबळे यांनी मार्गदर्शन केले.

     

    मार्गदर्शनपर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, पावसाळ्यात बेटाळा गावाच्या भूती नाल्यावरील पूल पूर्णतः पाण्याखाली येऊन गावाचा संपर्क तुटतो अशातच गेल्या अनेक वर्षात अनेकांच्या शेळ्या, गाय, बैल, गोधन व पशुधन वाहून गेले. सोबतच पुराच्या पाण्यात माणूसही वाहून गेल्याची दुर्दैवी घटना येथे घडली आहे. अशातच मी मंत्री असताना विशेष बाब अंतर्गत अर्थसंकल्पात सदर पुलाकरिता 9.5 कोटी निधी मंजूर करून घेत उंच पुला बांधकामकरिता प्रशासनाकडून मंजुरी मिळवून घेतली. तसेच बेटाळा येथे समाज सभागृह, नवीन अंगणवाडी बांधकाम, सिमेंट रस्ते नाल्या व नागरिकांच्या मूलभूत सुविधांना घेऊन विशेष अशा योजना मंजूर करून दिल्या. जनतेच्या प्रमुख समस्या सोडविणे हे लोकप्रतिनिधीचे आद्य कर्तव्य असून दिलेल्या अभिवचनाची पूर्तता हीच आमची ओळख आहे.असे ते यावेळी म्हणाले.

     

    याप्रसंगी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते नवीन पुलाचे बांधकाम नवीन अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण तसेच विजय भाऊ सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी प्रामुख्याने बहुसंख्य बेटाळावासी नागरिक व महिला उपस्थित होते.

  • चंद्रपूर जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्व्हेक्षण, 4 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

    चंद्रपूर जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्व्हेक्षण, 4 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्य शासन व महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्व्हेक्षणाचे काम 23 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.

     

    सर्व्हेक्षणाच्या कामाकरीता चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, शिक्षक व इतर कर्मचारी असे एकूण 4008 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कृषी अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, मंडळ अधिकारी व इतर असे एकूण 270 अधिका-यांची पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

     

    सर्व्हेक्षणाच्या अनुषंगाने आयोगाकडून नियुक्त पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट येथील प्रशिक्षकांकडून 20 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय नोडल अधिकारी तसेच प्रत्येक तालुका प्रशिक्षकांना तसेच 21 व 22 जानेवारी रोजी तालुकास्तरावर सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात आले.

     

     

    घरोघरी येऊन सर्व्हेक्षणाचे कामकाज करणा-या प्रगणकांना आयोगाकडून ओळखपत्र देण्यात आले आहे. या सर्व्हेक्षणात जिल्ह्यातील सर्व कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्यात येणार असून मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाकरीता प्रश्नावली निश्चित करण्यात आली आहे. सदर सर्व्हेक्षण हे मोबाईल ॲपद्वारे होणार आहे. तरी प्रगणकाच्या घरभेटीवेळी कुटुंबातील सज्ञान सदस्याने घरी थांबून सर्व्हेक्षण करणा-यास सहकार्य करावे व विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी केले आहे.

  • बाबूपेठ येथे मकरसंक्रात निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

    बाबूपेठ येथे मकरसंक्रात निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ आणि फातिमा शेख यांच्या जयंतीचे औचित्याने मकर संक्रांती निमित्य राज राजेश्वर,गायत्री,महाकाली, श्री संताजी, माऊली, सहेली, सखी, जिजाऊ, परिवार, रणरागिणी, सावित्रीबाई फुले महिला बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू कार्यक्रम तसेच महिलांच्या विविध स्पर्धा एकांकिका नाटक,एकपात्री नाटिका शिवमंदिर बगीचा बाबूपेठ येथे आयोजित करण्यात आले.

     

    उदघाटनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ चंदाताई वैरागडे ,संस्थापक अध्यक्ष महिला बचत गट,प्रमुख अतिथी सौ.अनिता बोबडे,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका,सौ सारिका कुचनकर शिक्षिका, सौ यशोधराताई पोतनवार
    सामाजिक कार्यकर्त्या, सौ,कामिनी बावणे सामाजिक कार्यकर्त्या,सोनम मडावी लोकमत सखी मंच जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

     

    सर्वप्रथम उपस्थित सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन ,तसेच स्वागत नृत्य ,सौ.तृप्ती राजूरकर ,स्पर्शू राजूरकर यांनी करून स्वागत करण्यात आले.मकर संक्रांत निमित्य संगीत खुर्ची,विविध स्पर्धा घेण्यात आल्या, त्यानंतर एकपात्री नाटिका स्पर्धेत सावित्रीबाई फुले यांची भूमिका सौ. चंदाताई वैरागडे यांनी तर ज्योतिबा फुले यांची भूमिका त्यांचे पती श्री मनोज वैरागडे यांनी केली.

     

    मोबाईल चे दुषपरिणाम वर आधारित अतिशय उत्तम एकांकिका नाटिका स्नेहल अंबागडे, कांचन लेंडागे लीलाताई बुटले,तेजु पोडे,राणी लेंडागे,नम्रता मोरे,सुरेखा बुटले शीतल लेंडागे,इत्यादी महिलानी वेगवेगळ्या वेशभूषेत सादर करून उपस्थित महिला प्रेक्षकाना मंत्रमुग्ध केले.शिक्षक सेवानिवृत्त सौ.सरोजताई चांदेकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. अपर्णा धकाते यांनी केले,उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातुन मोलाचे मार्गदर्शन केले.

     

    कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे यांनी महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच त्यांच्या अंगी असलेल्या कला गुणाना वाव मिळावा तसेच कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे स्टेज डेरिंग आणि त्यांचा आत्मविश्वास वाढल्यामुळे समाजात वावरताना कुठल्याही कठीण प्रसंगाला त्या घाबरू नये यासाठीच दरवर्षी आम्ही अश्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करीत असतो आणि मोठ्या संख्येने महिला प्रत्येक स्पर्धेत स्व खुशीने सहभागी होतात याचा खरोखरच मला आनंद आहेत असे मनोगतातून व्यक्त केले.

     

    तब्बल पाच तास चाललेल्या कार्यक्रमाला महिलांची भरगच्च उपस्थिती होती, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सरोज चांदेकर व आभार शुभांगी कंदलवार यांनी केले. उपस्थित सर्व महिलांना सौ.चंदा वैरागडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन परीचयाचे पुस्तक मकरसंक्रांत निमित्य वाटप करून हळदीकुंकू कार्यक्रम आटोपून शेवटी सर्वाना स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या कार्यक्रमाला बचत गटातील सर्व महिलांनी सहकार्य केले.

  • भाजपा कार्यकर्त्यांचा काॅंग्रेस पक्षात प्रवेश

    भाजपा कार्यकर्त्यांचा काॅंग्रेस पक्षात प्रवेश

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी – केंद्रातील मोदी सरकार केवळ धर्माच्या नावाखाली राजकारण करत आहे. विकास मात्र बाजूला अडगळीत पडला आहे. देशातील महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे जनता त्रस्त झाली असुन भाजपाला सोडचिठ्ठी देत ब्रम्हपूरी तालुक्यातील चौगान येथील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

     

    विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विकासकामांवर व खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांच्या नेतृत्वाखाली चौगान येथील भाजपा कार्यकर्त्यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

     

    यावेळी पक्षप्रवेश कार्यक्रमाला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ राजेश कांबळे, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, चौगान ग्राम काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष पंकज तिडके यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

     

    यावेळी विरोधीपक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सर्व नवप्रवेशित नागरिकांच्या गळ्यात काॅंग्रेस पक्षाचा दुप्पटा घालून पक्षात स्वागत करतांना ते म्हणाले की, पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे काॅंग्रेस पक्षात स्वागत असुन प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सदैव कटीबध्द असुन आपल्या समस्या, अडचणी माझ्या पर्यंत घेऊन यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

     

    पक्ष प्रवेश केलेल्यांमध्ये गणेश प्रधान, भोजराज प्रधान, नंदु नवघडे, मन्साराम बुराडे, प्रभाकर मैंद, नरेश ठाकरे, भाऊराव भाकरे, उमेश बुराडे, प्रदीप सोंदरकर, कैलास बुराडे, गोपाल बुराडे, गायत्री बुराडे, नंदिनी ठाकरे, हेमलता सोंदरकर, माणिक अर्जुनकार, मनोहर मेश्राम, हिवराज भोगेवार, विजय सहारे, पुरुषोत्तम पिलारे, सविता भोगेवार, संजय मैंद, अविनाश चौधरी, ज्योत्स्ना बुरांडे, अनिता वाटकर यांसह अन्य नागरिकांचा समावेश आहे.

  • ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात 10 जटायू दाखल

    ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात 10 जटायू दाखल

    News34 chandrapur

    चंद्रपूर – देशातून विलुप्त होत असलेली प्रजाती म्हणजे गिधाड ज्याला आपण रामायणात जटायू म्हणून बघितले आहे, त्याच्या संवर्धनाचा विडा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उचलला आहे.

    22 जानेवारीला अयोध्या येथे होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा पूर्वी आज ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प येथील झरी कोर झोन मध्ये 10 जटायू संवर्धनासाठी सोडण्यात आले.

     

    बॉम्बे हिस्ट्री नॅचरल सोसायटी तर्फे ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प मध्ये 10 गिधाड पक्षी संवर्धनासाठी देण्यात आले यावेळी सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण परदेशी सह वनविभागाचे बडे अधिकारी चंद्रपुरात दाखल झाले होते.

     

    वनमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते आज 10 गिधाड पक्ष्यांना संवर्धनासाठी मुक्त करण्यात आले, सदर जटायू हे राजस्थान राज्यातून आणण्यात आले असल्याची माहिती वनमंत्री मुनगंटीवार यांनी दिली आहे.

     

    देशात आधी 4 कोटी संख्या असलेल्या गिधाड पक्षी (स्वच्छता दूत) आज 60 हजाराच्या संख्येपेक्षा खाली आला आहे, या पक्षाचे जलद संवर्धन व्हावे यासाठी वनविभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे, या प्रजातीचे योग्य संवर्धन झाले तर ताडोब्यात येणाऱ्या पर्यटकांना गिधाडाचे दर्शन होणार. अशी माहिती वनमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

  • Telecommunications : नंदकिशोर रणदिवे यांची चंद्रपूर जिल्हा दूरसंचार सल्लागार समिती सदस्यपदी नियुक्ती

    Telecommunications : नंदकिशोर रणदिवे यांची चंद्रपूर जिल्हा दूरसंचार सल्लागार समिती सदस्यपदी नियुक्ती

    Telecommunications गुरू गुरनुले मुल – भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मुलं नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांची दुरसंचार मंत्रालय भारत सरकारच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली.

    अवश्य वाचा : पाण्यासाठी शिवसैनिक आक्रमक, ताबा सुटला अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकले गढूळ पाणी

    Telecommunications नंदकिशोर रणदिवे हे मुलं तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आहेत. सोबतच त्यांनी मुलं नगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणुनही कामकाज बघितले आहे. त्याच्या अनुभवाचा फायदा दुरसंचार विभागातील अडचणी आणि दुरसंचार विभागाच्या ग्राहकांना येणाऱ्या अडीअडचणी सोडण्यासाठी त्याच्या अनुभवाचा फायदा व्हावा हया उद्देशाने त्यांच्यावर ही महत्वाची जबाबदारीं सोपवीण्यात आली.

    त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री नाम. सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष नाम. हंसराज अहिर यांना दिलें आहे. नंदकिशोर रणदिवे यांच्या नियुक्तीचे तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केले असुन त्याचे कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे. रणदिवे हे मागील अनेक वर्षांपासून भाजप पक्षात सक्रियपणे काम करीत आहे, त्यांची कामाप्रती असलेला प्रामाणिकपणा बघता त्यांना त्या कामाचे फळ मिळाले आहे.

    नंदकिशोर रणदिवे हे नाव मूल तालुक्यातील सर्वांना परिचित असलेले नाव आहे, राजकारण असो की समाजकारण यामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो, रणदिवे हे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम बघतात, त्यांनी नगर परिषदेचे उपाध्यक्ष पद भूषविले आहे.  त्यांच्या नियुक्तीमुळे मूल तालुक्यातील भाजप पदाधिकारी सदस्यांनी त्यांचा अभिनंदन मारीत भविष्यातील पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहे.

    दुरसंचार विभागातील नागरिकांच्या काही समस्या असतील तर त्यांनी मला थेट संपर्क करावा असे आवाहन रणदिवे यांनी केले आहे.