Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा – आमदार प्रतिभा धानोरकर

    शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा – आमदार प्रतिभा धानोरकर

    News34 chandrapur

    भद्रावती:- भारतातील जास्तीत जास्त लोकसंख्या ग्रामीण भागात विखुरली असून शासनातर्फे त्यांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ प्रत्येकाला मिळावा यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत आ. प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले.

     

    महाराष्ट्र शासनाच्या निर्देषानुसार विविध विभागाचा आढावा घेण्यासाठी दि. 17 जानेवारी 2024 रोजी स्वागत सेलिब्रेशन येथे वार्षिक आमसभेचे आयोजन पंचायत समिती भद्रावती यांच्या मार्फत करण्यात आले होते. यावेळी तालूक्यातील शासनाच्या विविध विभागाच्या कामाचा आढावा आ. प्रतिभाताई धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

     

    शासनातर्फे देण्यात येणारा निधी व त्यातून होणारे विकास कामे वेळेवर झाले पाहिजे यासाठी या आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ नागरीकांपर्यंत पोहचतो कि नाही याचा देखील आढावा घेण्यात आला. यावेळी आ. प्रतिभाताई धानोरकर यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरीकांना वेळेवर मिळाला पाहीजे. तसेच शेवटच्या घटकांना देखील शासनाच्या माध्यमातून न्याय देण्याकरीता आपण कटीबध्द असल्याचे सांगितले.

     

    यावेळी त्यांनी सन 2021-2022 व 2022-23 या दोन वर्षातील चालू असलेल्या विकास कामांवर देखील चर्चा केली. त्यासोबतच गावातील सरपंच व नागरीकांना येण्याऱ्यां समस्यांचे निराकरण तातडीने करावे असे निर्देश विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

     

    या सभेच्या बैठकीला मंचावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मीना सांळुके, गट विकास अधिकारी सपकाळ, सहाय्यक गट विकास अधिकारी सावसाकडे तसेच भद्रावती तालुका शहर कॉग्रेस चे अध्यक्ष सुरज गावंडे, भद्रावती ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत काळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भास्कर ताजणे, पंचायत समिती माजी सभापती प्रविण ठेंगणे, सुधीर मुळेवार, पंचायत समिती माजी उपसभावती भोजराज झाडे, सरंपच संघटनेचे अध्यक्ष नयन जांभुळे, राजु डोंगे, महेश मोरे यासह सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, इत्यादी पदाधीकारी व शासकीय विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

  • बस चालकाची अशीही मुजोरी

    बस चालकाची अशीही मुजोरी

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – गडचिरोली डेपोची मुल गोंडपिपरी चालणारी बसमध्ये दिनांक १९/१/२०२४ रोजी सकाळी ७ वाजता गोंडपीपरीसाठी बस प्रवासी घेऊन निघाली बसमधे अनेक प्रवासी बसले होते. बस चालक बस इतकी भरधाव वेगाने चालवत होता की रस्त्यावर एखादा खड्डा आला तर बसमधील प्रवासी सीटवरून उसळून जात होते. याचा त्रास प्रवाशी बांधवांना होत होता.

     

    याबाबत बस मधील प्रवासी चालकाच्या त्रासापाई नवेगाव मोरे येथे उतरुन गेले तर काही प्रवासी दीघोरी फाट्यावर उतरले. त्यामधे काही प्रवासी बेंबाळचे होते. त्यात माजी सरपंच विजय बोम्मावार व अन्य प्रवासी होते.

     

    बस चालकाचा बस चांलवतांनाचा सपाटा पाहून अखेर माजी सरपंच विजय बोम्मावार यांनी बस चालक श्री. पेन्दोर यांना बस हळू चालविण्याची विनंती केली तरी देखील बस चालक प्रवाशांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. अशी तोंडी तक्रार प्रवाशांनी आमच्या प्रतिनिधी जवळ केली आहे. अशा मुजोर बस चालकावर परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

  • चंद्रपुरात श्री रामाच्या नावाचा होणार विश्वविक्रम

    चंद्रपुरात श्री रामाच्या नावाचा होणार विश्वविक्रम

    News34 chandrapur

    चंद्रपूर – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून 20 जानेवारीला चंद्रपुरात राम नामाचा विश्वविक्रम होणार आहे, यासाठी चांदा क्लब मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे.

    22 जानेवारीला अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी मध्ये श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे, मात्र त्याआधी चंद्रपुरात श्री रामाचा गजर होणार असून त्याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.

    सियावर रामचंद्र की जय हे 11 अक्षरी शब्द हजारो पणत्यांनी सजनार आहे, यासाठी महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे, भाजप नेते ब्रिजभूषण पाझारे यांच्या देखरेखीत ही तयारी सुरू आहे.

     

    20 ते 22 जानेवारी दरम्यान चंद्रपुरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे, विशेष बाब म्हणजे सियावर रामचंद की जय या शब्दांना सजविणारे प्रथम मानकरी 18 पगड जातीचे नागरिक असणार.

  • Ayodhya : हंसराज अहीर यांना अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

    Ayodhya : हंसराज अहीर यांना अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

    Ayodhya चंद्रपूर / यवतमाळ – पुण्यभूमी अयोध्या नगरीत दि. 22 जानेवारी 2024 रोजी मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीरामजींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून या स्वर्णीम, ऐतिहासीक सोहळ्याच्या निमंत्रणाचा मान मिळाल्याने अतिव आनंद झाला, जीवन कृतार्थ झाले.

    23 हजार महिलांचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज नामंजूर

    Ayodhya या भव्यदीव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच लोकसभा मतदार क्षेत्रातील नागरीकांमध्ये अतिव आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. मला मिळालेल्या निमंत्रणाबद्दल सर्व संबंधित आदरणीयांचा कायम ऋणी राहील. अशा भावना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केल्या.

    सर्व श्रीराम भक्तांनी 22 तारखेला श्रीराम ज्योती प्रज्वलित करून दिपोत्सव साजरा करावा असे आवाहन सुध्दा त्यांनी केले आहे.

    देशात अति महत्वाच्या व्यक्तींना श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा चे निमंत्रण दिले जात आहे, त्या सूचित चंद्रपूर जिल्ह्याचे माजी खासदार, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री व ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचे नाव आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील प्रथम व्यक्ती हंसराज अहिर यांना या दैदिप्यमान सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्याने चंद्रपूरचे नाव सुद्धा या क्रमात आले आहे. भाजप पक्षात व इतर कार्यात हंसराज अहिर हे नेहमी सक्रीयतेने सहभाग घेतात, केंद्र सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी नागरिकांचे काम प्राधान्याने केले होते, त्यामुळे अहिर हे नागरिकांमध्ये लोकप्रिय झाले आहे. विशेष बाब म्हणजे अहिर ओबीसी आयोगाचे या अध्यक्ष झाल्यावर त्यांनी समाजबांधवांच्या अनेक समस्या अग्रक्रमाने सोडविल्या आहे. आजही ते विविध जनसुनावणी द्वारे ओबीसी बांधवांच्या समस्या सोडविण्याचे काम करतात.

  • एकलव्य मॉडल रेसिडेंशियल स्कूल मध्ये प्रवेशासाठी प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षेचे आयोजन

    एकलव्य मॉडल रेसिडेंशियल स्कूल मध्ये प्रवेशासाठी प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षेचे आयोजन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – आदिवासी विकास विभागातंर्गत कार्यान्वित असलेल्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याकरीता प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा रविवार, दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 2 या कालावधीत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, जांभुळघाट (ता.चिमूर) या ठिकाणी घेण्यात येणार आहे. प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षेचे आवेदनपत्र सादर करण्याचा अंतिम दि. 10 फेब्रुवारी 2024 आहे.

     

    इयत्ता 6 वीच्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व इयत्ता 7 ते 9 वीच्या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरून काढण्यासाठी चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 5वी, 6 वी ते 8 वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित/आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

     

    ज्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी आहे, अशा प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांचे पालक,शिक्षक व मुख्याध्यापकांनी सविस्तर माहिती व परीक्षा आवेदन पत्रासाठी नजीकच्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा येथील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प कार्यालय, चिमूर येथे संपर्क करावा.

     

    जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेमधील अनुसूचित व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांनी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये प्रवेश घ्यावा, असे चिमूर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी एम.व्हि. डुले यांनी कळविले आहे.

  • शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूर येथे धरणे आंदोलन

    शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूर येथे धरणे आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्ष यांच्या वतीने शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांंच्या नेतृत्वात दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. आज संपुर्ण महाराष्ट्रात कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी धरणे दिले.

    चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे झालेल्या धरणे आंदोलनात माजी आमदार ॲड.वामनराव चटप, निळकंठ कोरांगे, कपिल इद्दे, प्रा. सुरेश मोहितकर, सुधीर सातपुते, प्रभाकर ढवस, मारोती बोथले, रवी गोखरे, अरुण नवले, ज्योत्स्ना मोहितकर, पौर्णिमा निरंजने, सुनील बावणे, वैभव अडवे, अरुण सातपुते, किशोर दांडेकर, मधुकर चिंचोलकर, सुरेश राजूरकर, विकास दिवे, मदन खामनकर, शेेख इस्माईल, अनिल कौरासे, नरेश सातपुते, सचिन बोंडे, नरेंद्र मोहारे, सुरेश आस्वले, कृष्णदेव नांदे, रवींद्र हिरडे, केशव चिकणकर, देवेंद्र हेपट, दिलीप आसेकर, गोविंदा गेडाम, विजय मरसकोल्हे, प्रभाकर जोगी, प्रा. सतीश मोहितकर, बबन रणदिवे, गुड्डू काकडे यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.
    या आंदोलनानंतर शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन मा. पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांना चंद्रपूर जिल्हाधिकारी यांचे मार्फत पाठविण्यासाठी देण्यात आले.

     

    या निवेदनाद्वारे सर्व शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी व शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे म्हणून सक्तीची कर्जवसुली बंद करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी, शेतीसाठी पूर्णवेळ व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा, वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेतातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय करावेत अन्यथा नुकसान भरपाई द्यावी, इतर वन्य प्राण्यांप्रमाणे सर्पदंशाने मृत्यू धारकांचे वारसदारांना आर्थिक मदत देण्यात यावी.

     

    पीक विम्याचा योग्य लाभ देणारी योजना अंमलात आणावी व तातडीने नुकसान भरपाई द्यावी, पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी छत्तीसगड मध्ये धानाला हमीभावापेक्षा ४०% जास्त भाव देवून तर मध्यप्रदेशात गव्हाला हमी भावापेक्षा ३०% जास्त भाव देवून खरेदी करण्याची ” मोदी गॅरंटी” ची घोषणा केली, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात कापूस व सोयाबीन ला हमीभावापेक्षा ३०% जास्त दर देवून खरेदी करावी तसेच ज्यांनी विक्री केली त्यांना वाढीव रक्कम बॅक खात्यात जमा करावी, स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती तातडीने करावी, वन हक्क कायद्यात वन जमिनीवर अतिक्रमीत शेतकऱ्यांना पट्टा देतांना असलेली तीन पिढ्यांची व २५ वर्षाची एक पिढी या अटी वन हक्क कायद्यातून वगळाव्या, जीवती येथे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी तथा व्यवहार न्यायाधीश ( कनिष्ठ स्तर ) न्यायालयाची तात्काळ निर्मिती करण्यात यावी, बल्लारपूर – सुरजागड व गडचांदूर – आदीलाबाद या रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करून द्यावा, बल्लारपूर – आष्टी – आलापल्ली – सुरजागड या राज्य मार्गाचे भाग आष्टी ते आलापल्ली – सुरजागड मार्गाचे सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करण्यात यावे, जबरानजोत शेतकऱ्यांना तात्काळ पट्टे वितरित करण्यात यावे इत्यादी तेरा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

  • आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने महाकाली मंदिरात स्वच्छता अभियान

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने महाकाली मंदिरात स्वच्छता अभियान

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 22 जानेवारीला अयोध्या येथे श्री प्रभु रामाची प्राणप्रतिस्थापना करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यांतर आज चंद्रपूरातील माता महाकाली मंदिर येथे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

    यावेळी चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त विपिन पालिवाल, महाकाली मंदिराचे विश्वस्त सुनिल महाकाले, माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, कोषाध्यक्ष पवण सराफ, मिलींद गंपावार, यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारे, आदिवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथे, करणसिंग बैस, तापोष डे, दिपक पदमगीरवार, विनोद अंनतवार, हेरमन जोसेफ, प्रकाश पडाल, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, अस्मिता डोणारकर, आशा देशमुख, चंदा ईटनकर, वंदना हजारे, अनिता झाडे, शांता धांडे, माधुरी बावणे, सतनाम सिंग मिरधा, शंकर दंतुलवार, ताहिर हुसेन, किशोर बोल्लमवार, नकुल वासमवार, मुकेश गाडगे, अॅड परमहंस यादव, बादल हजारे आदींची उपस्थिती होती.

     

    येत्या 22 जानेवारीला अयोध्येत आयोजित रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेची तयारी जोरात सुरु आहे. महाराष्ट्रातही 22 जानेवारीला राज्यभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान राज्यभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात यावे असे आवाहण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत आमदार किशोर जोरगेवार यांनीही मंदिरामध्ये स्वच्छता मोहिम सुरु केली असुन याची सुरुवात चंद्रपूरची आराध्य दैवत असलेल्या माता महाकालीच्या मंदिरातून करण्यात आली आहे.
    आज गुरुवारी सकाळी 8 वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत महाकाली मंदिर परिसर स्वच्छता मोहिमेला सुरवात करण्यात आली.

     

     

    यात चंद्रपूर महानगरपालिका प्रशासन, श्री महाकाली माता महोत्सव समिती, यंग चांदा ब्रिगेड सामाजिक संघटनेने सहभाग घेतला होता. यावेळी मंदिर परिसर संपूर्ण स्वच्छ करण्यात आला. स्वत: आमदार किशोर जोरगेवार यांनीही या मोहिमेत सहभाग घेत स्वच्छता केली.
    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात स्वच्छता मोहिम सुरु केली आहे. मुंबई येथुन या माहिमेला सुरवात झाली. आपण विकासाची कामे करत असतो सोबतच स्वच्छता हा ही महत्वाचा विषय राहिला आहे. त्यामुळे शहर स्वच्छ करण्याच्या दृष्टीकोणातुन आज महाकाली मंदिर येथून या मोहिमेची सुरवात झाली आहे. माता महाकालीचे देवस्थान चंद्रपूकरांसाठी श्रध्दा स्थान आहे.

     

    येथे हजारो भाविक दररोज येत असतात. त्यामुळे हा परिसर स्वच्छ आणि सुंदर राहीला पाहिजे. या ठिकाणी आल्यानंतर मानसाला मन शांती मिळत असते. त्यामुळे या ठिकाणाहुन आम्ही या स्वच्छता मोहिमेची सुरवात करत असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असून नागरिकांनीही या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत आपले शहर स्वच्छ ठेवावे असे आवाहण यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांना केले आहे. तर उद्या सकाळी आठ वाजता काळाराम मंदिर येथे स्वच्छाता अभियान राबविण्यात येणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

  • चंद्रपुरात 20 जानेवारीला अनुसूचित जाती / जमातीची व ओबीसींची संयुक्तिक बैठक

    चंद्रपुरात 20 जानेवारीला अनुसूचित जाती / जमातीची व ओबीसींची संयुक्तिक बैठक

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सामाजिक न्याय विभागाने , अनुसूचित जाती /जमाती , इतर मागास प्रवर्ग , विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी अधिसूचना काढली असून यावर आक्षेप मागवले आहे. त्यामळे या अधिसूचनेवर चर्चा करण्यासाठी 20 जानेवारी 2024 ला आय. एम. ए हॉल ,चंद्रपुर येथे दुपारी 12 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे.

     

    महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग ( जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन ) अधिनियम २००० च्या नुसार २७ डिसेंबर २०२३ रोजी अधिसूचना प्रकाशित झाली आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे. त्यावर विचारमंथन करणे हे काळाची गरज आहे.अन्यथा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात बोगस गिरी होईल.

     

    त्यामुळे जर एससी.एसटी.ओबीसी एकत्र येऊन ह्यावर निर्णय घेतला नाही तर बहुजन समाजाचे पतन झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या अधिसूचनेवर आक्षेप नोंदवण्यासाठी शनिवारी दिनांक 20 जानेवारी 2024 ला आय . एम. ए हॉल ,चंद्रपुर सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपुर जवळ दुपारी 12:00 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे.

     

    या बेठकीला बहुजन बांधवानी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघ, आदिवासी संघर्ष कृती समिती(सर्व जमाती व संघटना संलग्नीत), बहुजन समता पर्व व सर्व SC,ST, OBC, VJ ,NT &SBC समाजातील संघटना तर्फे उपस्थित राहण्याचे आवाहन सचिन राजूरकर, डॉ संजय घाटे, डॉ दिलीप कांबळे,डॉ ईसादास भडके, भोला मडावी , मनोज आत्राम , कृष्णा मसराम यांनी केले आहे.

  • माणुसकी सह “ती” सुद्धा मरण पावली

    माणुसकी सह “ती” सुद्धा मरण पावली

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मूल – 16 जानेवारीला चंद्रपूर कडून गोंदिया कडे जाणाऱ्या दुपारी 3-३० वाजताच्या रेल्वे गाडी समोर मूल शहरातील विवाहितेने उडी घेत आत्महत्या केली, सदर मृत्यूचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आल्यावर विविध प्रश्न उपस्थित झाले आहे, सदर व्हिडीओ आपण बघितला तर आपल्या मनात नागरिकांची माणुसकी मरण पावली हे निश्चित लक्षात येईल.

    https://youtu.be/z5JcUNFl-b8?si=KokBeD-Bh7hZHVYr

     

    रेल्वे येत असताना गेट पडले, शहरातील वार्ड क्रमांक 4 येथे राहणारी स्नुषा उर्फ कुणाली नरेश कामडे ही 26 वर्षीय विवाहिता, गेट जवळ आली मात्र ती रेल्वे गेट ओलांडत नव्हती, काही वेळ ती तिथेच उभी राहली, अनेकांना प्रश्न ही पडला असेल ही महिला तिथं का उभी आहे मात्र कुणीही तिला काही विचारण्याची हिंमत दाखवली नाही, रेल्वे आल्यावर स्नुषा ने त्यापुढे स्वतःला झोकून दिले,

     

    हा सर्व मृत्यूचा तमाशा नागरिकांनी आपल्या डोळ्यांनी बघितला मात्र माणुसकी मरण पावल्याने कुणीही स्नुषा ला तिथून थांबविले नाही.

     

    ह्या सर्व घटनेची सीसीटीव्ही फुटेज पुढे आली आहे, आजच्या आधुनिक युगात कोण काय करत? याकडे कुणाचं लक्ष नाही कदाचित कुणी स्नुषा ला हटकले असते तर ती नक्कीच वाचली असती.

  • चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रशांत विघ्नेश्वर, सचिवपदी प्रविण बतकी यांची निवड

    चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रशांत विघ्नेश्वर, सचिवपदी प्रविण बतकी यांची निवड

    Chandrapur Press club : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण संघटना असलेल्या चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाची आमसभा (सर्वसाधारण सभा) आज, १७ जानेवारी रोजी उत्साहाच्या वातावरणात पार पडली. या सभेत २०२३-२४ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या निवडणुकीत अनुभवी आणि उत्साही पत्रकार प्रशांत विघ्नेश्वर यांची चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

    निवडणूक – आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

    या निवडणुकीमुळे संघाला नवे नेतृत्व मिळाले असून, पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नवी ऊर्जा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

    उपाध्यक्ष योगेश चिंधालोरे, सचिव प्रवीण बतकी, संघटन सचिव बाळू रामटेके, सहसचिव एजाज अली, कोषाध्यक्ष सुरेश वर्मा, कार्यकारिणी सदस्य रोशन वाकडे, प्रशांत देवतळे,प्रकाश देवगडे, सुनिल बोकडे, संदिप पाचभाई यांची निवड करण्यात आली.

    निवडणूक अधिकारी म्हणून प्रा. डॉ . योगेश्वर दुधपचारे यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित कार्यकारिणीचे माजी अध्यक्ष मजहर अली, पंकज मोहरील, कमलेश सातपुते यांच्या सह संघाच्या सदस्यांनी अभिनंदन केले. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या नव्या कार्यकारणीत अनेक उत्साही पत्रकारांची निवड झाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

    नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यासाठी संघाचे माजी अध्यक्ष मजहर अली, पंकज मोहरील, कमलेश सातपुते यांच्यासह संघाच्या सर्व सदस्यांनी व जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. तरुण आणि अनुभवी पत्रकारांचा समन्वय असलेल्या या नवीन कार्यकारिणीमुळे संघाच्या कामाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. पत्रकारितेचे उच्च मापदंड कायम ठेवून संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी ही कार्यकारिणी सक्रिय राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.