Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • भटाळी खुल्या कोळसा खाणीत विशालकाय डंपर झाला रोलबॅक

    भटाळी खुल्या कोळसा खाणीत विशालकाय डंपर झाला रोलबॅक

    News34 chandrapur

    चंद्रपूर – वेकोली चंद्रपुर क्षेत्रातील भटाळी ओपन कास्ट कोळसा खाणीत पहिल्या पाळीत अचानक विशाल काय डंपर रोल बॅक झाला, या दुर्घटनेत एक कामगार जखमी झाला आहे.

    17 जानेवारीला भटाळी खुल्या खाणीत काम करताना डंपर रोल बॅक झाला, या घटनेत डंपर चालक वासुदेव थेरे हे गंभीर जखमी झाले , त्यावेळी उपस्थित वेकोली कर्मचाऱ्यांनी थेरे यांना बाहेर काढत शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. थेरे हे भटाळी ओपन कास्ट खाणीत डंपर ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे.

     

    या घटने बद्दल अधिक माहिती कारिता वेकोली भटाळीचे उप क्षेत्रीय प्रबंधक यांना संपर्क केला असता त्यांनी सदर डंपर हा रोल बॅक झाला असल्याची माहिती दिली आणि खान प्रबंधक यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद नाही दिला.

     

    विशेष म्हणजे नुकताच वेकोली मधे सुरक्षा सप्ताह सम्पन्न झाला , या दरम्यान ही घटना घडणे म्हणजेच सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.

  • उपविभागीय अधिकारी मेश्राम यांची वाळू माफियावर कारवाई

    उपविभागीय अधिकारी मेश्राम यांची वाळू माफियावर कारवाई

    Marathi News

    गुरू गुरनुले
    मुल – वाळूची अवैध वाहतूक करणारा हायवा पकडला मूल तालुक्यातून हायवामधून वाळू वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंदी आहे.

     

    हे आदेश न जुमानता मूल नदीतून वाळू माफियांकडून अवैधरित्या वाळू मूल तालुक्यातून गेलेल्या उमा नदी पत्रातून हे वाळूमाफिया रात्रीच्या वेळेला पोकलँड साहाय्याने वाटेल तेवढी अवैध रेती मंगळवारी रात्री अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक मुल येथील कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी पकडली रेती भरलेली गाडी 16 जानेवारी पहाटे अंदाजे 4.30 वाजताच्या सुमारास मिळालेल्या
    गोपनिय माहीतीच्या आधारे उपविभागीय अधिका-यानी महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांचा सापळा लावून एक टक हायवा रेती भरलेले वाहन जप्त केले व वाहतूक करणाऱ्या हायवा मालकावर 3 लाख 25 हजार रुपये तात्काळ दंड ठोठावण्यात आलेले आहे.

     

    गाडी क्रमांक एम एच 33 -4485 असून मुल येथे प्रशासकीय भवन समोर जमा करण्यात आला आहे. याप्रसंगी सोबत महसूल विभागातील पथक नायब तहसिलदार राम नैताम अ. का. श्री तुनकलवार, विशाल जिडगिलवार व प्रवीण गेडाम शिपाई उपस्थीत
    होते. यांच्या नंतरही असीच कार्यवाही सुरू राहणार नदीपात्रात जाऊन बेकायदा वाळू उत्खनन करणाऱ्या
    वाहनांवर कारवाई केल्यामुळे अवैध्य रेती उपसा करणाऱ्याचे माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

  • रस्ता ओलांडताना 2 चितळांना अज्ञात वाहनाने दिली धडक

    रस्ता ओलांडताना 2 चितळांना अज्ञात वाहनाने दिली धडक

    Marathi News

    (प्रशांत गेडाम)
    नागभीड : ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या नागभीड वन परिक्षेत्रातील चिधीमाल जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन चितळ ठार झाले. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. दोन्ही मृत चितळ नर आहेत. एक दोन तर दुसरा चार वर्ष वयाचा आहे.

     

    अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर हे दोन्ही चितळ जवळच शेतात पडले. सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच सहाय्यक वनसंरक्षक सुनील हजारे सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

     

    मोका पंचनामा करून दोन्ही चितळांचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन नागभीडच्या पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. ममता वानखेडे यांनी केले.

     

    यावेळी क्षेत्र सहायक नेरलावार, वनरक्षक कुळमेथे, वनरक्षक कुथे, स्वाब नेचर केअर संस्थेचे यश कायरकर, जिवेश सयाम, महेश बोरकर, गणेश गुरनुले, विकास लोणबले, अमन करकाडे तथा वन मजूर आदि उपस्थित होते.

     

    सदरील अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल करून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी तथा सहाय्यक व संरक्षक एस. बी. हजारे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.

  • राष्ट्रवादी कांग्रेसचा नारी निर्धार मेळावा, चंद्रपुरातून असंख्य महिला कार्यकर्त्या रवाना

    राष्ट्रवादी कांग्रेसचा नारी निर्धार मेळावा, चंद्रपुरातून असंख्य महिला कार्यकर्त्या रवाना

    Marathi news

    चंद्रपूर : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रिय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत क्षणमुखानंद सभागृह येथे प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी महिला निर्धार मेळावा आयोजित केला आहे.

     

    सदर मेळाव्यात मा. अजितदादा पवार साहेब, प्रफुल पटेल साहेब, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली ताई चाकणकर यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण मंत्री व जेष्ठ नेते उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.

     

    या मेळाव्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातून शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी जिल्हाध्यक्षा रंजनाताई पारशिवे, कार्याध्यक्षा अर्चना ताई बुटले तथा शहर जिल्हाध्यक्षा चारुशीला ताई बारसागडे यांच्या नेतृत्वात मोठ्या उत्साहात मुंबई करिता रवाना झाल्या आहे.

     

    राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या उपस्थितीत मुंबई जाणाऱ्या वाहनांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा दाखवून बसेस मुंबई करिता रवाना करण्यात आल्या. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा रंजनाताई पारशिवे, कार्याध्यक्षा अर्चनाताई बुटले, शहर कार्याध्यक्षा चारुशीला ताई बारसागडे, वरोरा तालुका अध्यक्ष रवि भोयर, शहर अध्यक्ष चंद्रकांत कुंभारे यांचासह राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

  • पाहुणा म्हणून घरी आला आणि चोरी करून गेला

    पाहुणा म्हणून घरी आला आणि चोरी करून गेला

    Marathi News

    गुरू गुरनुले

    मुल – शिक्षकांच्या घरी युवक पाहुणा म्हणून आला आणि चोरी करून निघून गेला, ही घटना आहे मूल शहरातील वार्ड क्रमांक 14 मधील, राजू जगन चिकाटे हे शिक्षक म्हणून कार्यरत आहे.

     

    13 जानेवारीला चिकाटे हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते, त्याचं दिवशी त्यांचा चामोर्शी तालुक्यातील वायगाव येथे राहणारा स्नेहल देवगडे हा नातेवाईक घरी आला मात्र घरी कुणी नसल्याने स्नेहल ने घराच्या मागील बाजूने आत प्रवेश केला. व चिकाटे यांच्या घरी चोरी केली.

     

    ज्यावेळी शिक्षक चिकाटे घरी आले त्यावेळी घरातील सामान अस्तव्यस्त आढळले, आपल्या घरी चोरी झाल्याचे समजताच त्यांनी मूल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली, मूल पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला असता 16 जानेवारीला पाहुणा म्हणून चिकाटे यांच्या घरी आलेला स्नेहल चं चोर निघाला, पोलिसांनी स्नेहल देवगडे ला अटक केली. व चोरी केलेला माल स्नेहल कडून जप्त करण्यात आला.

    पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

  • सुरजागड इस्पात करणार 10 हजार कोटींची गुंतवणूक

    सुरजागड इस्पात करणार 10 हजार कोटींची गुंतवणूक

    Marathi news

    मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने पाठपुराव्याला यश आले असून, सुरजागड इस्पात प्रा. लि. ने गडचिरोलीत ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ते 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. विदर्भ विशेषत: गडचिरोलीसाठी ही मोठी उपलब्धी आहे.

     

     

    सुरजागड इस्पात प्रा. लि.चे अध्यक्ष सुनील जोशी यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आणि यावेळी याबाबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. या प्रकल्पाच्या माध्यमातून 8000 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. या प्रकल्पात जागतिक दर्जाचे उत्पादनविषयक तंत्रज्ञान राहणार असून, पर्यावरण रक्षण हा त्याचा मुख्य गाभा असेल. त्यामुळे हा संपूर्णत: पर्यावरणपूरक स्टील प्रकल्प राहणार आहे, अशीही माहिती यावेळी सुनील जोशी यांनी दिली.

     

    गडचिरोलीच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असून, या भागात रोजगार निर्मितीसाठी सुद्धा सातत्याने प्रयत्न होत आहेत. गडचिरोली हे देशाचे पोलाद हब होण्याची क्षमता आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, अशी हमी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सुनील जोशी हे दावोस परिषदेत सुद्धा सहभागी होणार असून, तेथे ते राज्य सरकारसोबत सामंजस्य करार सुद्धा करणार आहेत.

     

    गडचिरोलीत विविध पायाभूत सुविधा प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यावी, यासाठी नेहमीच देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार राहिला आहे. कोनसरी येथे एका प्रकल्पाचे उदघाटन आणि दुसर्‍या टप्प्याचे भूमिपूजन सुद्धा लवकरच होणार आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना या कोनसरी प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. आता या नव्या गुंतवणुकीतून गडचिरोली आणि पर्यायाने विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

  • विवाहितेची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या

    विवाहितेची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या

    Marathi News

    गुरू गुरनुले

    मूल : शहरातील वार्ड क्रमांक ४ येथील रहीवाशी नंदु कामडे यांची स्नुषा कुणाली नरेश कामडे (२६) हीने आज दुपारी ४ वा.चे सुमारास चंद्रपूर मार्गावरील रेल्वे फाटक समोर धावत्या रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शहरात घडली.

     

    रेल्वे स्टेशन पासुन रेल्वे फाटक हाकेच्या अंतरावर असल्याने ज्या रेल्वे खाली कुनालीने आत्महत्या केली त्या गाडीची गती घटनेच्या वेळेस हळु असल्याने कुणाली गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपजिल्हा रूग्णालय येथुन चंद्रपूर येथे नेत असताना त्यांचे निधन झाले.

     

    मृतक कुनाली हीचे पती नरेश धान खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचे तर सासरे स्थानिक सिध्दी विनायक मंदिरा समोर चहा चे दुकान चालवुन कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवायचे. कुनाली हीला ४ वर्षाचा मुलगा व 10 महिन्याची मुलगी आहे. आत्महत्या चे कारण अद्याप अस्पष्ट असुन पुढील तपास पोलिस करीत आहेत

  • क्रीडा संकुलाचे वीजबिल थकले, भूमिपुत्र ब्रिगेडने वीज देयकाच्या रकमेसाठी केले भिकमांगो आंदोलन

    क्रीडा संकुलाचे वीजबिल थकले, भूमिपुत्र ब्रिगेडने वीज देयकाच्या रकमेसाठी केले भिकमांगो आंदोलन

    Marathi News

    चंद्रपूर – डिसेंम्बर महिन्यात चंद्रपुरातील बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलात राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या भव्य आयोजनात कोट्यवधी रुपयांची उधळण करण्यात आली होती, मात्र ज्याठिकाणी ही भव्य स्पर्धा आयोजित केली क्रीडा संकुलाचे वीज बिल क्रीडा विभागाकडून भरण्यात आले नसल्याने 15 जानेवारीला महावितरण ने क्रीडा संकुलाची बत्ती गुल केली.

     

    क्रीडा संकुलाचे वीज देयक भरण्यासाठी चंद्रपुरातील जिल्हा क्रीडा संकुलात भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेने भीक मांगो आंदोलन केले, यावेळी डॉ. राकेश गावतुरे सहित अनेकांनी भीक मांगो आंदोलनात सहभाग घेतला.

     

    शासनाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला होता, मात्र नोव्हेंम्बर व डिसेंबर महिन्यातील तब्बल 2 लाख रुपयांच्या वरती वीजबिल भरण्यात आले नव्हते, पालकमंत्री मुनगंटीवार यांनी या स्पर्धेचा जोमात प्रचार केला, जिल्ह्यात सर्वत्र बॅनर व पोस्टरबाजी करण्यात आली.

     

    इतका पैसे प्रचारावर खर्च केल्यावर शासनाकडे वीज बिल भरण्यास पैसे नव्हते ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल, पालकमंत्री मुनगंटीवार यांनी स्वतःच्या नावावर केलेल्या प्रचाराची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा होती, मात्र 15 जानेवारीला महावितरणने आपल्या कामात प्रामाणिकपणा दाखवीत क्रीडा संकुलची बत्ती गुल केल्याने संपन्न आयोजनाला गालबोट लागले.

    सरकारकडे वीजबिल भरण्यास पैसे नसल्याने भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेने यावर पर्याय शोधत क्रीडा संकुलात भिकमांगो आंदोलन केले.

    आंदोलन डॉक्टर राकेश गावतुरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले आणि या आंदोलनात सोनल भगत, सोमेश्वर पेंदाम, अरविंद भटकर, श्रीयुत भांडवले, विजय मुसळे, मकरंद खोब्रागडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • चंद्रपुरातील घरफोडीच्या आरोपीने केला महत्वाचा खुलासा आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त

    चंद्रपुरातील घरफोडीच्या आरोपीने केला महत्वाचा खुलासा आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त

    Marathi News

    चंद्रपूर –  9 जानेवारीला चंद्रपूर शहरातील श्रीनगर लालपेठ भागात जयश्री गादम यांच्या घरी अज्ञाताने प्रवेश करीत घरफोडी ची घटना घडली, 8 तारखेला रात्री गादम यांनी आपल्या घराला कुलूप लावत आईच्या घरी गेल्या होत्या, मात्र सकाळी घरी गेल्यावर बघितले असता घरातील दार उघड्या अवस्थेत होते. कपाटातील रोख रक्कम व दागिने असा एकूण 53 हजार रुपयांचा माल चोरी झाला.

     

    याबाबत पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाली त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत पंचनामा करीत परिसरात पाहणी केली, गुन्हा दाखल करीत पोलिसांनी तपास सुरू केला.

     

    13 जानेवारीला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने रेकॉर्डवरील आरोपी आशिष रेड्डीमल्ला याला ताब्यात घेतले, सदर आरोपीवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते, शहर पोलीस ठाण्यात सुद्धा आरोपीवर गुन्हा दाखल असल्याने आरोपीला चंद्रपूर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

     

    लालपेठ भागातील घरफोडी प्रकरणात आशिष चा सहभाग होता, आरोपीने विविध गुन्ह्यात चोरी केलेले दागिने नागपुरातील सराफा दुकानदाराला विकले असल्याची कबुली दिली असता पोलिसांनी तात्काळ नागपूर गाठत 1 लाख 47 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

     

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी , अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु , उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंनदनवार यांचा मार्गदर्षनाखाली पोलीस निरीक्षक सतिशसिह राजपुत यांचे नेतृत्वात गुन्हेशोध पथकातील सहाय्य पुलिस निरीक्षक मंगेश भोंगाडे , पुलिस उपनिरीक्षक शरीफ शेख सहाय्यक फौजदार विलास निकोडे , महेंद्र बेसरकर , जयंता चुनारकर , सचिन बोरकर , संतोष पंडीत , निलेश मुळे , चेतन गज्जलवार , इमरान शेख रूपेश रणदिवे , दिलीप कुसराम , संतोष कावडे , भावना यांनी केली आहे.

  • मानवतेच्या नात्यातून ” तिळगुळाचा’ गोडवा जीवनात कायम असू द्या – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    मानवतेच्या नात्यातून ” तिळगुळाचा’ गोडवा जीवनात कायम असू द्या – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी – मानवी जन्म घेणाऱ्या प्रत्येकाने समाजात राहून माणुसकीचे नाते जपले पाहिजे. धर्म, जात, वर्ण, चालीरीती, रूढी, परंपरा या अंगलट न आणता व अंधश्रद्धेला बळी न पडता विज्ञान युगात जगताना माणुसकी या सर्वात मोठ्या धर्माची शिकवण अंगीकारणे काळाची गरज आहे. मकर संक्रांतीच्या शुभ पर्वावर जे तिळगुळ दिल्या जाते त्याचा गोडवा कायमस्वरूपी आपल्या आयुष्यात जपून ठेवावा असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी तालुक्यातील चौगान येथे आयोजित मकर संक्रांत महोत्सवात उद्घाटक म्हणून बोलत होते.

     

    आयोजित मकर संक्रांत महोत्सवानिमित्त कार्यक्रमात
    कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते, ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार
    सहउद्घाटक म्हणून माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे हे तर अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांची उपस्थिती होती. सहअध्यक्ष म्हणून नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार हे उपस्थित होते.

     

    प्रमुख अतिथी म्हणून बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिताताई पारधी, राजीव गांधी पंचायतराज संघटनचे प्रदेश महासचिव थानेश्वर कायरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, बाजार समितीच्या उपसभापती तथा न.प. सभापती सुनिताताई तिडके, महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्षा मंगलाताई लोनबले, तालुका काॅंग्रेस उपाध्यक्ष नामदेव लांजेवार, मुंबई येथील कंत्राटदार विजय भागडकर, माजी पोलीस पाटील किशोर तिडके, बाजार समितीचे संचालक दिवाकर मातेरे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सहसचिव प्रा. डी. के. मेश्राम, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमित कन्नाके, माजी सरपंच ईश्वर ठाकरे, उपसरपंच सुरेश ठिकरे, माजी अध्यक्ष से.सो. अनिल पिलारे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

     

    पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, क्षेत्र विकासासोबतच जनतेचे आरोग्य, शासनाचे जनकल्याणकारी योजना, व त्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता रोजगार शिक्षण व मूलभूत सुविधा करण्याची सर्वस्वी जबाबदारी लोकप्रतिनिधी नात्याने माझी असून ती मी सदैव विश्वासहतेने पार पाडणर अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
    प्रास्ताविक खेमराज तिडके यांनी तर सूत्रसंचालन संतोष पिलारे यांनी केले.

    गावकऱ्यांनी अनुभवला महीला कबड्डीचा थरार

    संक्रांत महोत्सव निमित्ताने आयोजित महिला कबड्डी स्पर्धेत गावातील महिलांनी सहभाग घेतला. या महिलांनी कबड्डी सामन्यांमध्ये दाखवलेले डावपेच बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महिलांसाठी संगीत खुर्ची व हळदी कुंकू, वाणाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.
    त्यानंतर रात्री एकल व सामुहीक नृत्य स्पर्धा घेण्यात आली. त्यात गावातील महिलांसह मुला-मूलींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धांचे परिक्षण राहुल मैंद व पराग सहारे यांनी केले.
    विविध स्पर्धांसाठी रोख बक्षीसे सुध्दा ठेवण्यात आली आहे.
    विद्यार्थ्यांसाठी मोटीव्हेशनल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात नांदेड येथील बालाजी गाडे, माजी प्राचार्य भाऊराव राऊत यांनी मार्गदर्शन केले.

     

    वृध्दांना ब्लॅंकेटचे वितरण

    तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके व कंत्राटदार विजय भागडकर यांच्या कडून गावातील वृध्दांना ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले.