Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • विजयदुतांनी सर्व सामान्य,गोर-गरिब जनतेचे सेवक बनून कार्य करावे- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    विजयदुतांनी सर्व सामान्य,गोर-गरिब जनतेचे सेवक बनून कार्य करावे- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    News34 chandrapur

    सावली – राज्याचे विरोधी पक्षनेते, तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून सर्व सामान्य,गोर-गरिब जनतेचे शासकीय किंवा अशासकीय कामे सोयीचे व्हावे याकरिता ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात जनसेवा केंद्राची स्थापना होणार आहे. यासाठी विजयदूत स्वयंसेवक यांची नेमणूक करून यांच्या माध्यमातून ही जनसेवेची कामे पार पडणार आहेत. विजय दुतांनी सर्व सामान्य गोरगरीब जनतेचे सेवक बनून कार्य करावे असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले ते सावली येथील काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित विजयदूत स्वयंसेवक यांची कार्यशाळा व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते.

     

    सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तर प्रमुख उपस्थिती म्हणून गडचिरोली येथील माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. राम मेश्राम,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा.संदीप पाटील गड्डमवार,माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर मा.दिनेश पाटील चिटणूरवार,सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,महिला तालुकाध्यक्षा सौ.उषाताई भोयर,माजी पंचायत समिती सभापती सावली मा.विजय कोरेवार,माजी सभापती पंचायत समिती सावली मा.राकेश पाटील गड्डमवार,सावली शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार,नगर पंचायत सावलीच्या नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे,उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार,सरपंच संघटनेचे अध्यक्ष मा.पुरषोत्तम चूदरी,सावली तालुका युवक काँग्रेसअध्यक्ष मा.किशोर कारडे,युवक शहर अध्यक्ष मा.अमर कोणपत्तिवार,सावली शहर महिला अध्यक्षा सौ.भारती चौधरी तसेच गाव काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष,पदाधिकारी,महिला आघाडी, युवा आघाडी नवनियुक्त विजयदूत,कार्यकर्तागणं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     

    गावपातळीवरील सर्वसामान्य माणसांना शासकीय कामासाठी वारंवार शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात, नागरिकांना शासकीय योजनांविषयी माहिती नसल्याने ते शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहतात, ही बाब जाणून ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसांची कामे जलदगतीने पुर्ण झाली पाहिजे. सोबतच त्यांना शासकीय योजनांचा लाभ सहजतेने मिळाला पाहिजे या उदात्त हेतूने राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतुन सावली तालुक्यातील विधानसभेच्या ३ बूथामागे एक विजयदूत ठेवण्यात आला असून विजयभाऊ जनसेवा केंद्र उभारून त्याठिकाणी विजयदुतांची नियुक्ती केली आहे. हे विजयदूत नागरिकांना शासकीय व इतर कामांसाठी मदत करणार आहेत. विजयभाऊ जनसेवा केंद्रापर्यंत जे वृद्ध, अपंग व आजारी व्यक्ती पोहचू शकत नाही अशा व्यक्तींच्या घरी स्वतः जाऊन विजयदुत सेवा देणार आहेत.

     

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.विजय कोरेवार यांनी, प्रास्ताविक सावली तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नितीन गोहने, तर आभार प्रदर्शन जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम यांनी केले.

  • तलाठी भरतीची SIT मार्फत चौकशी करा – आम आदमी पार्टी

    तलाठी भरतीची SIT मार्फत चौकशी करा – आम आदमी पार्टी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – संपूर्ण महाराष्ट्रभर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. अनेक विद्यार्थी आपल्या भविष्याला घेऊन चिंतेत आहेत. याबाबत आम आदमी पक्षाकडे महाराष्ट्रभरातून विद्यार्थ्यांच्या तक्रारी येत आहेत. तलाठी भरतीच्या निकालाने हा गैरप्रकार समोर आलेला आहे. सोबतच अनेक परीक्षा केंद्रांवर घोळ होतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून विद्यार्थी तथा पालकांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकरणांमध्ये शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

     

    या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक निवेदन पाठवले आहे. या निवेदनात आम आदमी पक्षाने खालील मागण्या केल्या आहेत:

     

    * तलाठी भरतीची नुकतीच प्रसिद्ध केलेली गुणवत्ता यादी संशयास्पद असल्याने ती तात्काळ रद्द करावी.
    * तलाठी भरतीत ज्या उमेदवारांच्या गुण 200 पैकी 150 पेक्षा जास्त आहेत त्यांच्या ज्ञानाची पुनर्तपासणी करून नव्याने गुणवत्ता यादी प्रकाशित करावी.
    * तलाठी भरती गैरप्रकाराची SIT मार्फत सखोल चौकशी व्हावी.
    * स्पर्धा परीक्षांचे शुल्क कमी करण्यात यावे.
    * उत्तरतालिकेतील उत्तरांवर आक्षेप घेण्यासाठी असलेले शुल्क कमी करावे.
    * पोलीस विभागात नवीन पदभरती लवकर जाहीर करावी.

     

    या मागण्यांवर लवकर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आम आदमी पक्षाने केली आहे.

     

    या निवेदनावर आम आदमी पक्ष युवा आघाडी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्या स्वाक्षरी आहेत. यावेळी महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख राजेश चेडगुलवार, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, महानगर महासचिव ॲड. तबससूम शेख, महानगर सह संघटन मंत्री सिकंदर सागोरे, अनुप तेलतुंबडे, महानगर ओबीसी आघाडी अध्यक्ष प्रशांत धानोरकर इत्यादी उपस्थित होते.

  • चंद्रपूरमधून महायुतीच्या महाप्रवाहाचा एल्गार होऊ द्या – नामदार सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूरमधून महायुतीच्या महाप्रवाहाचा एल्गार होऊ द्या – नामदार सुधीर मुनगंटीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर- महायुतीच्या संमेलनात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय हे चारही पक्ष एकत्र आले आहेत. आपण सारे केवळ भाषण देण्यासाठी नव्हे तर महायुतीच्या महाप्रवाहाचा एल्गार करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आपल्या एकजुटीचा आदर्श महाराष्ट्रात निर्माण करण्याचा निर्धार करण्यासाठी एकत्र आलोय. आमदार, खासदार, मंत्री कुणीही झाले तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र अध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्टीने पुढे गेला पाहिजे, हा उद्देश ठेवून पुढे मार्गक्रमण करावे, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज (रविवार) येथे केले.

    चंद्रपूर जिल्ह्यातील महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा रविवारी आयोजित करण्यात आला. यावेळी ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, लोकसभा निवडणुक प्रमुख प्रमोद कडू, महायुती समन्वय प्रमुख देवराव भोंगळे, शिवसेना जिल्हाध्यक्ष बंडू हजारे, शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजीव कक्कड, आरपीआय (आठवले गट) जिल्हाध्यक्ष गौतम तोडे, आरपीआय (आठवले गट) ग्रामीण अध्यक्ष जयप्रकाश कांबळे, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे हरी दुर्योधन, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव आबिद अली, भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल, ब्रह्मपुरी विधानसभा प्रमुख अतुल देशकर, वरोरा विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर, लोकसभा विस्तारक रवी बेलूरकर, भाजप नेते अशोक जिवतोडे, माजी महानगर जिल्हाध्यक्ष मंगेश गुलवाडे, भाजप नेते रामपाल सिंग, माजी महापौर राखीताई कंचर्लावार, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

     

    ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘महाराष्ट्रात शिंदेंचा एस, फडणविसांचा एफ, पवारांचा पी… म्हणजे सुपर फास्ट प्रोग्रेस काम करत आहे. आपण महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून एकत्र आलोय. महायुतीमधील प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आज एका वैचारिक भावनेतून एक स्वर, एक लक्ष्य अशी भूमिका मांडली.

     

    आपण विविध पक्षांचे असलो तरीही हीच भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे.’ समन्वय समितीचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या समन्वय समितीचा मी देखील सदस्य आहे. समितीच्या बैठकीत मी जिल्हास्तरीय एकत्रीकरणासाठी आग्रही होतो. आज महाराष्ट्रात एकाच दिवशी महायुती एकत्र येत आहे, याचा आनंद होत आहे. एक सूर, एक लक्ष्य आणि एक दिशा हा भाव ठेवावा लागेल. त्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समिती नेमण्याची गरज आहे. यासोबतच युवकांची आणि महिलांचीही समन्वय समिती स्वतंत्र असायला हवी. विधानसभानिहाय एकरुपता यावी म्हणून ६ विधानसभांच्या तारखा निश्चित करून नियोजन आवश्यक आहे.’ चंद्रपूरमध्ये महायुतीच्या वतीने महिलांना एकत्र करून मकरसंक्रांतीचा उत्सव साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

     

    राहुल गांधी आले तरीही…
    काँग्रेसचे लोक किंवा इतर विरोधी राजकीय पक्षांचे जेवढे लोक शिल्लक आहेत, त्यांच्याविरोधात एकजुटीने लढण्याची गरज आहे. ही एकजूटता दाखवली तर राहुल गांधी चंद्रपूरमध्ये मुक्काम करून बसले तरीही काँग्रेसला जागा जिंकता येणार नाही, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. राहुल गांधी जेथे जातात तेथे काँग्रेसचा उमेदवार पराभूत होतो, ही बाब लक्षात ठेवण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

     

    हमारा बुथ सबसे मजबुत

    महायुतीमध्ये प्रत्येक पक्ष वेगळ्या विचारांचा आहे, पण दिशा एकच आहे. त्यामुळे एखाद्या प्रसंगाला एकमेकांचा राग आला तरीही तो महायुतीवर किंवा आपल्या पक्षावर काढायचा नाही, असा निर्धार करा. आपल्याला एकत्र येऊन समन्वय ठेवायचा आहे. ‘हमारा बुथ सबसे मजबुत’ हा भाव ठेवून काम करा. त्यासाठी जिल्ह्यामध्ये पक्षप्रवेश वाढविण्याची गरज आहे. आपला पक्ष आणि महायुती मर्यादित ठेवू नका. प्रत्येकाने विकासाची गाडी धावत राहील यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

     

    विरोधकांकडे विकासाचा जाहीरनामाच नाही

    महायुतीला महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकायच्या आहेत. विरोधी पक्षाकडे कुठलाही विचार नाही आणि विकासाचा जाहीरनामा नाही. सोशल मीडियावरील त्यांच्या विषारी प्रचाराला सत्यावर आधारित उत्तर देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

     

    योजना लोकांपर्यंत पोहोचवा

    केंद्र व राज्य सरकारच्या विकासाच्या अनेक योजना आहेत. राज्यातील असो वा जिल्ह्यातील योजना असो, त्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

     

    महायुतीच्या एकजुटीचा आदर्श
    चंद्रपूर जिल्हा महायुतीच्या बाबतीत समन्वयामध्ये आदर्श ठरेल आणि इतर जिल्ह्यांना आपल्याकडून आदर्श घ्यावा लागेल, असे काम आपल्याला करायचे आहे, असा निर्धार करण्याचे आवाहन करतानाच चंद्रपूर जिल्ह्यात जिवतीपासून ब्रह्मपुरीपर्यंत महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

  • हिंग्लाज भवानी मंदीरात हंसराज अहीर यांनी राबविली स्वच्छता मोहीम

    हिंग्लाज भवानी मंदीरात हंसराज अहीर यांनी राबविली स्वच्छता मोहीम

    News34 chandrapur

    चंद्रपूर: दि. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्रांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून या महासोहळ्याच्या पार्श्वभुमीवर देशभरातील सर्व मंदीरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन प्रधानमंत्री माननिय नरेंद्र मोदी जी यांनी केले असल्याने दि. 14 जानेवारी रोजी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर शहरातील बाबुपेठ येथील माता हिंग्लाज भवानी मंदीरात मातेचे दर्शन व पुजा अर्चना करुन मंदीर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.

     

    या स्वच्छता मोहीमेमध्ये या परिसरातील माजी नगरसेवक प्रदीप किरमे, माजी नगरसेविका कल्पनाताई बगुलकर, पंडीत मथुराप्रसाद पांडे, दशरथ सोनकुसरे, बाथोताई, रेखाताई चन्ने, संजय मिसलवार, आकाश पिसे, सुदामा यादव, पडवेकर ताई, मंदीराचे पुजारी संतोष जाधव, शालुताई कन्नोजवार, रेखाताई पाटील, पार्वताबाई आंबिलकर, वंदना कंदीकुरवार, वासंती मेडसिंगे, मिना पारपल्लीवार, इंगोले ताई, सावरकर ताई, नंदुरकर ताई व परिसरातील शेकडो नागरिक या स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले होते.

     

    यावेळी हंसराज अहीर यांनी उपस्थितांना तसेच शहारातील विविध मंदीर परिसरात नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने स्वच्छता मोहीम राबवावी असे आवाहन केले.

  • दारु पिऊन फोनवर शिवीगाळ करण पडल महागात

    दारु पिऊन फोनवर शिवीगाळ करण पडल महागात

    News34 chandrapur

    चिमूर : गुणवंत चटपकार

    केंद्र सरकारच्या ड्राइव्हर विरोधी काळ्या कायद्यात सध्या स॓पुर्ण भारतभर विविध पद्धतीने वाहन चालका॓चे आंदोलन चालू आहे . त्याचे पडसाद चंद्रपुर जिल्ह्यात दिसुन येत आहे. मात्र जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनोद चांदेकर हे सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन करत आहेत. मात्र ते निवेदनाच्या नावाने बियरबार मध्ये दारु पिताना दिसत आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात चर्चेला ऊधान आले आहे.

     

    विनोद चांदेकर हे जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर आहेत. आपली जबाबदारी पार पाडायची म्हणुन शुक्रवार दि, 12 जानेवारीला सिन्देवाही येथे वाहन चालकाच चक्का जाम आंदोलन होत. त्या निमित्याने वरीष्ठ पदाधिकारी म्हणून विनोद चांदेकर या॓ना बोलविण्यात आले.

     

    मात्र विनोद चांदेकर हे सिन्देवाही येथे आले असता निवेदन आंदोलन एकीकडे मात्र चांदेकर यानी सिन्देवाही येथील काही चालक घेऊन बियर बार मध्ये सोबत घेऊन दारु ढोकसत मोठमोठ्या गोष्ठी केल्या. काहिना दारु आगात आल्यावर आरोपी विनोद चांदेकर चंद्रपुर व पंकज जगन बडोत्री यांनी चक्क एक चालक प्रवीण वाघे नेरी या॓ना अश्लील भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ती अश्लील भाषेची शिवीगाळ अॅडीओ क्लिप शोशल मिडीयावर वायरल होताना दिसुन येत आहे.

     

    फिर्यादी प्रवीण वाघे यांनी चिमुर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी विरुद्ध 504,506,507, अंतर्गत गुन्हा दाखल करन्यात आला आहे. पुढील तपास चिमुर पोलीस करत आहेत.

     

     

    एवढच का होईना जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था चे विनोद चा॓देकर हे कोनत्याही गावात जाऊन तुम्हाला मदत करनार नाही अशी चालका॓ना दमदाटी करुन व त्या॓च्याकडुन पैसे ऊखडुन बारमध्ये बसुन दारु ढोकसतात व दारु ढोकसल्यावर अनेक चालका॓ना फोनवरुन आई बहीनीच्या शिव्या दिलेल्या रेकार्डीग वायरल झाल्या आहेत त्यामुळे दारु ढोकसल्यावर विनोद चांदेकर याचे संस्कार कशे असतील व तो वाहन चालकाच नेत्रुत्व करु शकते का असा प्रश्न निर्माण झाला असुन वाहन चालका॓च्या आंदोलनाला दारु मुळे गालबोट लागला असुन या दारु ढोकसनार्या व्यक्ति पासुन सावध रहावे असे आव्हान प्रवीण वाघे या॓नी केले आहे.

  • सांस्कृतिक व सामाजिक वारसा जपून देश घडवा – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    सांस्कृतिक व सामाजिक वारसा जपून देश घडवा – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    News34 chandrapur

    भद्रावती – देशात जातीय तेढ निर्माण करून माणसाला माणसाशी तोडण्याचे काम सुरू आहे. अशातच एक ग्रामीण कलावंत आपल्या महाराष्ट्राची परंपरेचा सांस्कृतिक व सामाजिक वारसा जोपासत टाकळी ता. भद्रावती सारख्या छोट्याश्या गावात पुरोगामी विचारांचे प्रेरणादायी कलावंत निर्मना हेतू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रिय कल्चरल सेंटर उभारत आहे ही वाख्यानेजोगी बाब असून यातून निश्चितच देशातील युवांना देश सेवेची प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते भद्रावती तालुक्यातील टाकळी येथे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर कल्चरल सेंटर उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते.

     

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळा प्रसंगी प्रामुख्याने मंचावर उद्घाटक म्हणून वरोरा विधानसभा क्षेत्र आमदार प्रतिभा धानोरकर, सांस्कृतिक मंत्रालय चेयरमन डॉ विनोद इंदुलकर, डॉ निळकंठ कुरसंगे, बापुदास गजभारे, कुशल मेश्राम, डॉ इसादास भडके, इंजि. भास्कर चव्हाण, सेवादल जिल्हाध्यक्ष सुर्यकांत खणके, भीम आर्मी महासचिव शंकर मुन, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र रायपूरे, चंद्रपूरच्या माजी महापौर संगीता अमृतकर, गोपाल अमृतकर, टाकळी येथील सरपंच संगीता देहारकर, माजी सरपंच नत्थु पाटील आसेकर, पोलिस पाटील शितल दूरन्गकर उपस्थित होते.

     

    यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशाला सध्याच्या परिस्थितीत सत्ताधाऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधले असून मोजक्या व्यापाऱ्यांच्या नफेखोरीसाठी गोरगरिब जनतेची दिशाभूल करत लूट केली जात आहे. आज देश गुलामगिरीच्या वाटेवर जात आहे.

     

    अश्यातच महाराष्ट्राच्या पुरोगमी विचारांचा प्रसार व प्रचार फार महत्त्वाचा असून गांधी विचारधारा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हेच देशाला तारू शकतात. ही सर्व कल्पना लक्षात घेऊन गोंडपिपरी तालुक्यातील एका बोरगाव सारख्या छोट्याश्या गावातून आपल्या कला कौशल्याने नाट्य क्षेत्रात ठसा उमटविनाऱ्या अनिरुद्ध वणकर यांनी जे काम हाती घेतले ते कौतुकास्पद आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत राहो अशा शुभेच्छा देत त्यांना वेळोवेळी लागणारी मदत आपण करणार असून हे केंद्र भविष्यात नावलौकिकास येईल असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. यावेळी विर योद्धा बिरसा मुंडा या प्रेरणादायी नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. सोबतच काही प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्र देण्यात गौरविण्यात आले.

     

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश मेश्राम प्रास्ताविक अनिरुद्ध वणकर तर आभार प्रवीण भसारकर यांनी मानले.

  • खट्टर कुटुंबाची जामीन नामंजूर

    खट्टर कुटुंबाची जामीन नामंजूर

    chandrapur news चंद्रपूर – चंद्रपूर येथील रहिवासी रवींद्र जयस्वाल यांची वाईन शॉप विक्रीच्या बहाण्याने सुमारे दहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जालना येथील खट्टर कुटुंबातील आरोपींना उच्च न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला आहे. गेली दोन वर्षे रवींद्र जयस्वाल यांच्याकडून मोठी रक्कम घेऊनही त्यांना वाईन शॉपचे लायसन्स किंवा परवाना न दिल्यामुळे हे प्रकरण कोर्टाच्या पायरीवर पोहोचले आहे.

    💰 वाईन शॉप विक्रीच्या बहाण्याने फसवणूक

    मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील खट्टर कुटुंबातील सदस्यांनी गेल्या दोन वर्षांपासून रवींद्र जयस्वाल यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांना चंद्रपूर परिसरात वाईन शॉपचा परवाना मिळवून देण्याचे किंवा असलेल्या वाईन शॉपची विक्री करण्याचे आमिष दाखवण्यात आले. या व्यवहाराच्या नावाखाली खट्टर कुटुंबाने जयस्वाल यांच्याकडून अंदाजे दहा कोटी रुपये एवढी मोठी रक्कम वेळोवेळी घेतली. chandrapur news

    राजकीय – भाजप उमेदवाराला महिलांनी दिले धोबीपछाड 

    अनेक महिने उलटूनही वाईन शॉपचा व्यवहार पूर्ण झाला नाही आणि घेतलेली रक्कमही परत मिळाली नाही, तसेच खट्टर कुटुंबाकडून त्रास देणे सुरूच राहिले. या त्रासाला कंटाळून रवींद्र जयस्वाल यांनी अखेरीस रामनगर पोलीस स्टेशनमध्ये खट्टर कुटुंबाविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीनुसार गुन्हा नोंदवला आहे.

    हायकोर्टात जामीन नामंजूर

    गुन्हा दाखल झाल्यानंतर खट्टर कुटुंबातील आरोपींनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. ज्यांच्यावर फसवणुकीचा आरोप आहे, त्यामध्ये जगदीश खट्टर, अमित खट्टर आणि देवेंद्र खट्टर यांचा समावेश आहे. कोर्टात या प्रकरणाची गंभीरता, घेतलेली मोठी रक्कम आणि आरोपींची भूमिका लक्षात घेऊन न्यायमूर्तींनी त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला.

    न्यायालयाने जामीन नामंजूर केल्यामुळे आता आरोपींना कायदेशीररित्या पुढील कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. या निर्णयामुळे रवींद्र जयस्वाल यांना काहीसा दिलासा मिळाला असून, फसवणुकीच्या या प्रकरणात आता पोलिसांचा तपास आणि कोर्टाची पुढील सुनावणी निर्णायक ठरणार आहे.

  • राहुल गांधी यांनी जात जनगणना करण्याबाबत वचनबद्धता व्यक्त केली

    राहुल गांधी यांनी जात जनगणना करण्याबाबत वचनबद्धता व्यक्त केली

    News34 chandrapur

    नवी दिल्ली/चंद्रपूर – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेत नागरी समाज संघटना आणि जनआंदोलनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधल्यानंतर शनिवारी देशभरातील ओबीसी प्रवर्गातील सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली.

     

    बैठकीत, सर्व प्रतिनिधींनी विशेषतः राहुल गांधी यांच्याशी ओबीसींची जातनिहाय प्रगणना, सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या आरक्षणावरील 50 टक्क्यांची मर्यादा काढून टाकण्यासाठी घटनादुरुस्ती लागू करणे यासारख्या विविध प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा केली. दीड तासाहून अधिक काळ चाललेल्या चर्चेत राहुल गांधी यांनी हे प्रश्न सोडवण्याची कटिबद्धता व्यक्त केली. देशातील ओबीसी समाजातील 70 कोटी लोक कर म्हणून जीएसटी भरतात, मात्र त्या तुलनेत त्यांना त्यांचा वाटाही मिळत नसल्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळेच हा समाज त्याच जागी अडकून राहिला आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे सर्व परिस्थितीत ओबीसींची जात जनगणना करण्याचा मुद्दा गांभीर्याने घेत त्यांनी याबाबत आपली कटिबद्धता दर्शवली.

     

    बैठकीत विविध राज्यातील ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडली, जी राहुल यांनी लक्षपूर्वक ऐकली. बैठकीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मार्गदर्शक राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष न्यायमूर्ती व्ही.ईश्‍वारय्या, सामाजिक क्रांती आघाडीचे अध्यक्ष न्यायमूर्ती वीरेंद्रसिंग यादव, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, हंसराज जंगीड , अमेरिका मधून आलेले हरी ईपन्नापली, संविधान बचाव संघर्ष समितीचे निमंत्रक प्राध्यापक अनिल यादव, बीसी वेलफेअर अशोसीएशन तेलंगाणाचे अध्यक्ष श्रीनिवास जाजूला, प्रा सुरज मंडल, प्रा सुधानशू ,विभा पटेल, डॉ विजय भास्कर यांच्यासह एकूण देशातील 37 संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

  • उच्चशिक्षित तरुण निघाला घरफोडीचा आरोपी, चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    उच्चशिक्षित तरुण निघाला घरफोडीचा आरोपी, चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरात होणाऱ्या घरफोड्या पोलिसांना आव्हान देणाऱ्या होत्या, त्या घरफोडी गुन्ह्याना आळा बसावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांनी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेकडे प्रकरण वर्ग केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पोलीस अधीक्षकांच्या निर्देशांची गंभीर दखल घेतली. त्यानंतर 2 गुन्ह्याचा उलगडा करण्यास यश मिळविले.

     

    पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी विशेष पथक तयार केले, याबाबत सापळा सुद्धा रचला अखेर 12 जानेवारीला गोपनीय माहिती मिळाली की रेकॉर्डवरील व घरफोडी प्रकरणातील गुन्हेगार हे संशयास्पद रित्या फिरत आहे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 वर्षीय आशिष रेड्डीमल्ला राहणार रयतवारी कॉलरी, डिस्पेन्सरी चौक याला ताब्यात घेत विचारपूस केली.

     

     

    श्रीनगर कॉलोनी, लालपेठ व बाबूपेठ परिसरात त्याने 2 घरफोडी केली असल्याची बाब कबूल केली, त्या दोन्ही घरफोडी मध्ये आशिष ने सोन्याचे दागिने असा एकूण 77 हजार 455 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता, आशिष जवळून तो मुद्देमाल जप्त करण्यात आला.

     

     

    विशेष बाब म्हणजे आरोपी आशिष हा उच्चशिक्षित आहे, आरोपीवर याआधी चंद्रपूर शहर व रामनगर पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल आहे.

     

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, तसेच सायबर पथक यांनी केली.

  • विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांकडुन अपघातस्थळाची पाहणी

    विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांकडुन अपघातस्थळाची पाहणी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – ट्रकने दिलेल्या धडकेत महाविद्यालयात जाणारी विद्यार्थीनी कू.समीक्षा संतोष चहांदे वय 17 वर्ष ही ट्रकच्या मागच्या चाकाखाली दबुन तिचा जागेतच मृत्यू झाल्याची घटना ब्रम्हपूरी शहरातील नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर दि. 12 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सदर घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली.

     

    यावेळी त्यांनी नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील मार्गावर असलेले वीज वितरण कंपनीचे विद्युत पोल त्वरित हटविण्याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच सदर मार्गावर अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता आवश्यक ठिकाणी गतिरोधक तयार करण्याच्या सुचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. सोबतच महाविद्यालयीन सुट्टीच्या वेळेस वाहतूक पोलीस तैनात करण्याचे निर्देश पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

    त्यानंतर शहरातील शिवाजी महाराज चौकात जावून रहदारीस होणारा अडथळा व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

     

    याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अजय चहांदे, न.प. मुख्याधिकारी अर्शिया जुही, पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार, महावितरणचे अभियंता सिध्दांत रामटेके, अभियंता दिनेश हनवते, न.प. विद्युत अभियंता मंगेश बोंद्रे, अभियंता हटवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समिती सभापती प्रभाकर सेलोकर, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, नगरसेवक हितेंद्र राऊत, माजी न.प. उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, माजी सभापती नेताजी मेश्राम, माजी सरपंच राजेश पारधी, मुन्ना रामटेके, सुरज मेश्राम यांची यावेळी उपस्थिती होती.