Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • मूल-पोंभुर्णा तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करू – आमदार प्रतिभा धानोरकर

    मूल-पोंभुर्णा तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करू – आमदार प्रतिभा धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मूल-पोंभुर्णा तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांचा निराकरण करण्याचा विश्वास व्यक्त केला.

     

    दि. 12 जानेवारी रोजी, नांदगाव (घोसरी)येथे विनोद अहिरकर यांचा महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, “मूल-पोंभुर्णा तालुक्यातील जे प्रलंबित प्रश्न असतील, ते मी सर्वप्रथम शासनाच्या निदर्शनास आणून देईन. त्यानंतर, त्या प्रश्नांचा निराकरण करण्यासाठी मी माझी सर्वतोपरी मदत करेन. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करत असताना, त्यांना कुठेही गरज लागली, तर त्यांची एक मोठी बहीण म्हणून मी कायम त्यांच्यासोबत आहे.”

     

     

    या सत्कार समारंभाला महाराष्ट्र प्रदेश महासचिव विनोद भाऊ दत्तात्रय, बल्लारपूर नगर परिषद माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा शेख, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा सभापती बाजार समिती पोंभुर्णा रविभाऊ मरपल्लीवर, वैशालीताई पुल्लावार, तसेच मुल व पोंभुर्णा तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.

     

     

    यावेळी आमदार धानोरकर यांनी, “राज्यातील सध्याच्या परिस्थितीबद्दलही आपण सर्वांनी चिंता व्यक्त केली पाहिजे. दोन वर्षांच्या कोविड काळात अनेक लोकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळत नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. भाजपाची सत्ता आली तेव्हापासून देश मागे जात आहे.”

     

    “संपूर्ण लोकसभा मतदारसंघ हा पोरका झालेला नाही. साहेब जरी गेले असले तरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी दिलेला प्रत्येक शब्द, त्यांनी बोललेल्या प्रत्येक गोष्टी या सात महिन्याचा कार्यकाळात मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. या भागात सुद्धा कामाच्या संदर्भात कुठला विषय असेल तर आपण नक्की माझ्यापर्यंत या. चंद्रपूरला सुद्धा आमचे जनसंपर्क कार्यालय आहे. तिथपर्यंत माझ्या माध्यमातून जेवढ्या कामाचा पाठपुरावा करता येईल, तेवढे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन,” असेही आमदार धानोरकर यांनी आश्वासन दिले.

  • मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळेच नदी पुनरुज्जीवन कामाला गती – जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह

    मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळेच नदी पुनरुज्जीवन कामाला गती – जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह

    News34 chandrapur

    चंद्रपूर  : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्राचे वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र राज्यातील 75 नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प केला. याअंतर्गत त्यांनी ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राबवून गावागावात नद्यांचे संरक्षण, संवर्धन करण्याची मोहीम हाती घेतली. विशेष म्हणजे याबाबत ना. मुनगंटीवार यांनी आमच्यासोबत चर्चा केल्यानंतर केवळ 20 दिवसात जलसाक्षरता अभियान राबविले व नद्यांच्या संवर्धनासाठी चार महिन्यात चार शासन निर्णय काढून या कामाला गती दिली, असे गौरवोद्गार प्रसिध्द जलतज्ज्ञ तथा रमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह यांनी काढले.

     

    वन अकादमी येथे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच प्रसिध्द जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत ‘चला जाणूया नदी’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील उमा व इरई नदी संवर्धनाबाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी डॉ. राजेंद्र सिंह बोलत होते. बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, वन अकादमीचे संचालक एम.एस. रेड्डी, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपजिल्हाधिकारी अजय चरडे, प्रा. सुरेश चोपणे, प्रा. योगेश दुधपचारे, डॉ. प्रवीण महाजन, नरेंद्र चूग, रमाकांत कुलकर्णी, राहुल गुळघाणे, अजय काकडे आदी उपस्थित होते.

     

    राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी श्री.ना.सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्येक जिल्ह्यातून समोर आलेले जलदूत, जलनायक, जलसेवक, जलप्रेमी आदींची फळी तयार केली, असे सांगून डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले, देशाला स्वातंत्र मिळाले तेव्हा आपल्या देशातील नद्या अमृतवाहिनी होत्या. त्या शुध्द, अविरल आणि निर्मळ वाहत होत्या. म्हणजेच आपल्या नद्यांमधून अमृत वाहत होते. मात्र आता आपल्या नद्यांची अतिशय दैननीय अवस्था झाली आहे. त्यामुळेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या नद्या पूर्ववत अमृतवाहिनी होण्यासाठी श्री. मुनगंटीवार यांनी नद्यांच्या संवर्धनासाठी मोहीम हाती घेतली आहे.

     

    पुढे डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले, पुरातन काळात नद्यांच्या आजुबाजुला आपली संस्कृती विकसीत झाली आहे. तसेच आपल्या देशातील 99 टक्के नद्यांचा उगम हा वन जमिनीतून होतो. आज श्री. मुनगंटीवार यांच्याकडे सांस्कृतिक कार्य आणि वनविभाग हे दोन्ही महत्वाचे विभाग आहेत. त्यामुळे वन विभागाने पुढाकार घेऊन नद्यांची सद्यपरिस्थती जाणून घेण्यासाठी अभ्यास दौरा करून नदीला शुध्द, अविरल आणि निर्मळ करावे. त्यामुळे पूर नियंत्रण आणि दुष्काळमुक्त करण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

     

    ईश्वरीय काम होत असल्याचा आनंद – ना.सुधीर मुनगंटीवार

    प्रख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह आणि त्यांच्या टीमकडून नदी संवर्धनाचे मोठे कार्य होत आहे. हे एक ईश्वरीय कार्य असून या पवित्र कार्यात आपणही सहभागी आहोत, याचा मनापासून आनंद आहे, असे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

     

     

    पुढे ते म्हणाले, ‘मिशन अमृत’ प्रत्येक जिल्ह्यातील एक नदी मॉडेल म्हणून विकसीत करण्यात येईल. यात नदीची संपूर्ण माहिती, उगम आणि संगम स्थळावरील माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध होईल, असे नियोजन करावे. तसेच नागपूरच्या नीरी या संस्थेमार्फत अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसीत करावे. नदी संवर्धनासाठी शासन आपल्या पाठीशी आहे.

     

    नदी संवर्धनासाठी वेगवेगळ्या पध्दतीने कार्य करणारे प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर, आमीर खान, जगतगुरू जग्गी वासुदेवन व इतर मान्यवरांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी एक पोर्टल तयार करून नद्यांबाबतची संपूर्ण माहिती यात असावी. नद्यांचे संवर्धन, संरक्षण व नियोजनाबाबत लवकरच मुख्य सचिवांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेण्यात येईल. पर्यावरण, नदी संवर्धन यासाठी राज्य आणि केंद्राच्या कायद्यांचा अभ्यास करून यासाठी समितीचे गठण करण्यात येईल, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

     

    यावेळी जिल्ह्यातील उमा आणि इरई नदीचा विकासाचा आराखडा सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन विक्रांत जोशी यांनी केले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

  • चंद्रपूर शहरातील प्रलंबित बायपाससाठी १५ जानेवारीला एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन

    चंद्रपूर शहरातील प्रलंबित बायपाससाठी १५ जानेवारीला एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे.

     

    या प्रकल्पाची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी भूमिपुत्र संघटनेने केली आहे.या मागणीला पाठिंबा देण्यासाठी भूमिपुत्र संघटनेने १ डिसेंबर २०२३ रोजी जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन केले होते. परंतु प्रशासनाने कोणतीही दखाल न घेतल्याने १५ जानेवारीला एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश दादापाटील चोखारे करणार आहेत.

     

    काँग्रेस नेते व भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश दादापाटील चोखारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते. त्यात त्यांनी म्हटले आहे की, चंद्रपूर शहराच्या मध्यभागातून राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. यामुळे शहराच्या मध्यभागी वाहतूक कोंडी होत असते. या कोंडीमुळे वाहनचालकांना अनेक तास थांबावे लागतात. यामुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे.

     

    चंद्रपूर शहराच्या बाहेरून बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, अद्यापही या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. बायपास रस्ता झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही. तसेच, शहराची वाहतूक व्यवस्था सुव्यवस्थित होईल.

     

    या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री शिंदे यांनी चंद्रपूर शहराच्या बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्यासंदर्भात आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

     

    चंद्रपूर शहरातील वाहतूक कोंडी ही एक गंभीर समस्या आहे. या प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी झाल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होईल.

  • भद्रावती तालुक्यातील बरांज मोकासा येथील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करा

    भद्रावती तालुक्यातील बरांज मोकासा येथील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करा

    News34 chandrapur

    भद्रावती:- बरांज मोकासा येथील गावाचे पुनर्वसन प्रकल्पग्रस्त शेतकरी व गावातील नागरिकांसह कामगाराच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा बरांज येथील महिलांनी १४ डिसेंबर पासून घेतला असुन आंदोलनाची प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारची दखल घेतल्या गेली नाही असा आंदोलनकारी महिलांनी आरोप करीत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

     

    याबाबतची तक्रार महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभाध्यक्ष विलास नेरकर यांना दिली असता नेरकर यांनी भद्रवती चे तहसीलदार यांचेशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासकिय हालचालींना वेग आला. तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांचेशी चर्चा करण्यासाठी प्रकल्पग्रस्त महिलांना चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे बोलावले. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोणत्याही स्वरूपाचा ठोस निर्णय न देता उपाययोजने बाबत देखील चर्चा न झाल्याने प्रकल्पग्रस्त महिलांनी आमरण उपोषण सुरू ठेवलेले आहेत.

     

    महिलांच्या आंदोलनाचा आजचा २८ वा दिवस सुरू असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांना माहिती देण्यात आली तेव्हा लगेच आंदोलन करण्याऱ्या महिलांच्या मंडपाला भेट देउन मागण्यांबद्दल जाणून घेतले. यावेळी वरोरा भद्रावती विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, तालुकाध्यक्ष राजू बोरकर, शहराध्यक्ष गीतेश सातपुते, तिमोटी बंडावार, रोशन फुलझेले, गणेश बावणे यांचेसह इतर कार्यकर्त उपस्थित होते.

     

    आंदोलन कर्त्यां महिलांनी बरांज गावात जाऊन बघा असे सांगितल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी गावाची पाहणी केली असता पहिली ते सातवी पर्यंतच्या जिल्हापरिषद शाळेत जाऊन बघितले असता अक्षरशः शाळेला लागूनच १५ फुटावर कोलमईन्सचा खोल दरी दिसून आली. उत्खनन केलेल्या खदानीला कंपनीतर्फे कोणत्याही पद्धतिने संरक्षित केलेले नसल्याने जीवित हानी देखील होऊ शकते. पुनर्वसन्नाच्या च्या संबंधाने सुरुवातीला करण्यात आलेल्या करारातील प्रमुख मुद्यांना कंपनीतर्फे केराची टोपली दाखविण्यात आली. अनेकांना जमीनींचा, घराचा मोबदला अजूनही मिळाला नसल्याने काही कुटुंब तेथेच राहत आहे.

     

    कंपनीतर्फे होणार्या ब्लास्टिंग मुळे बऱ्याच घरांना भेगा पडलेल्या आहे. रोजगारा संबंधाने केलेले करार सुद्धा कंपनीने पाळले नसल्याने गावात बेरोजगारांची संख्या देखील मोठी असल्याचे आंदोलनकारी महिलांनी निदर्शनास आणून दिले. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांना पाठिंबा जाहीर करीत आपल्यावर झालेला अन्याय तथा आंदोलनाच्या संबंधातील रास्त मागण्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडून यांच्या माध्यमातुन सोडविण्याचा पुरेपुर प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाध्यक्ष नितिन भटारकर यांनी आंदोलक महिला तथा गाववासियांना दिले.

  • रिल्स पर होगी कार्रवाई? उपक्षेत्र प्रबंधक ने कहा कारवाई तो होगी

    रिल्स पर होगी कार्रवाई? उपक्षेत्र प्रबंधक ने कहा कारवाई तो होगी

    News34 chandrapur

    चंद्रपुर – हाल ही में वेकोलि कर्मचारी के तबादले के दिन कार्यालयीन कर्मियों ने कामकाज के समय रील बनाई, जो कि सरकारी नियमो को ताक पर रखते हुए बनाई गई।

     

    एक कार्यालय से दूसरे वेकोलि विभाग के कार्यालय में महिला कर्मी का तबादला हुआ था, इस तबादले को थोड़ा मजाकिया बनाने की चाहत और सोशल मीडिया पर व्हायरल होने की चाह रखनेवाले महिला कर्मियों ने वेकोलि कार्यालय में रील बनाई, उसके बाद यह रील सोशल मिडियापर व्हायरल हुई थी।

     

    यह मामला News34 ने उजागर किया था, खबर प्रकाशित होते ही यह रील कार्यालयीन कामकाज के दौरान बनाई ऐसी चर्चा हुई लेकिन रील बनाने की अनुमति वेकोलि ने दी थी? रील बनाने की जगह की अनुमति वेकोलि ने दी थी? यह सभी सवाल अब उठने लगे है।

     

    जिन महिला कर्मियों ने रील बनाई उन पर अब कार्रवाई होगी या नही? इसके बारे उपक्षेत्र प्रबंधक से बात करने पर उन्होंने कहा कि फिलहाल जांच चल रही है, उसके बाद कारवाई की जाएगी।

     

    व्हायरल होने की चाह रखनेवाले महिला कर्मी वेकोलि प्रबंधन द्वारा कार्रवाई होने के बाद बाबुल की दुआएं लेकर ही जाएगी।

  • अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई

    अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई

    News34 chandrapur

    चिमूर : – गुणवंत चटपकार

    11 जानेवारी रोजी सायंकाळी ०७:३० ते ०८:३० चे सुमारास उपविभागीय अधिकारी घाडगे व तहसीलदार राजमाने यांचे मार्गदर्शनात तलाठी कालिदास तोडासे, चंद्रकांत ठाकरे, प्रसाद गोडघासे, प्रविण ठोंबरे व कोतवाल अकिब शेख यांनी अवैधरित्या रेतीने भरलेली मुकेश दडवे शंकरपूर तसेच पवन गायकवाड किटाळी मक्ता यांचे दोन ट्रॅक्टर वाहने मौजा मेटेपार – कवडशी डाक येथे पकडून तहसील कार्यालय चिमूर येथे जमा करण्यात आले.

     

    तसेच दिनांक.१२/०१/२०२४ ला मध्य रात्री १२ ते १२:३० वाजताच्या सुमारास नेरी उसेगाव च्या मधोमध असलेल्या पांदण रस्त्याच्या काही अंतरावरील उमा नदी पात्रात सत्ताधारी पक्षाच्या प्रतिष्ठित महिलेचे दोन रेतीने भरलेले ट्रॅक्टर तलाठ्यांच्या पथकाने पकडले असता आर्थिक चिरीमिरी करून दोन्ही ट्रॅक्टर हेतुपुरस्सर सोडून दिल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर चिमूर तालुक्यात सुरू आहे.

     

    यामुळे रेतीमाफियांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे.मोठ्यांचे ठेवायचे झाकून आणि छोट्यांचे बघावे वाकून या म्हणीप्रणे हि गत या महसूल अधिकाऱ्यांची झालेली दिसून येत असल्याने रेती माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा शिवसेना ठाकरे गटाने केला निषेध

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा शिवसेना ठाकरे गटाने केला निषेध

    News34 chandrapur

    चिमूर :- गुणवंत चटपकार

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पक्षपाती धोरण अवलंबून चुकीचा निर्णय दिल्यामुळे शिवसेना चिमूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय वर मोर्चा काढून राहुल नार्वेकर याचा निषेध करण्यात आला.

     

    महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिनांक १० जानेवारी रोजी लोकशाहीचा अंत करू पाहणारा निकाल दिल्याने शिवसैनिकानमध्ये आक्रोश निर्माण झाला आणि आक्रोषाचे रूपांतर मोर्चात झाले. आज दिनांक १२ जाणेवारी रोजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे यांच्या नेतृत्वात. महिला आघाडी जिल्हा प्रमुख नर्मदा बोरीकर, युवती सेना जिल्हा अधिकारी प्रतिभा मांडवकर, विधानसभा समन्वयक भाऊराव ठोंबरे, संघटक भाऊराव डांगे यांचे प्रमुख उपस्थितीत श्रीहरी बालाजी देवस्थान येथून राहुल नार्वेकर यांनी पक्षपाती निर्णय जाहीर केल्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला.

     

    अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय समोर राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला बेश्रमच्या फुलाचा हार टाकून. प्रतिमा जाळत निषेध व्यक्त केला. यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख नर्मदा बोरीकर. उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे यांनी मोर्चाला संबोधित केले. तर आभार प्रदर्शन तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांनी व्यक्त केले.

     

    यावेळी तानाजी सहारे, शहर प्रमुख नितीन लोणारे, सुनील हिंगनकर, वरोरा महिला आघाडी तालुका प्रमुख सरला मालोकर, वरोरा विधानसभा युवा अधिकारी अभिजित कुडे, किशोर उकुंडे, राजेंद्र जाधव, विनायक मुंगले, चिमूर तालुका अधिकारी शार्दुल पचारे. सहित शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

  • जीवघेण्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करा – ताज कुरेशी

    जीवघेण्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करा – ताज कुरेशी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जानेवारी महिना, संक्रांतीचा सण आणि पतंगबाजीचा जोर. यासोबतच आजच्या युगात नायलॉन मांजा वापरला जात आहे. याच्या निषेधार्थ चंद्रपूर काँग्रेस कमिटी, पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष ताज कुरेशी यांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिले.

    सण साजरे करणे ही आपली संस्कृती आहे, या परंपरेनुसार आपण संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवून त्याचा आनंद लुटतो. मात्र आज नायलॉन मांजाचा बेकायदेशीर वापर इतका वाढला आहे की, त्यामुळे पादचाऱ्यांना अनेक दुखपतींना सामोरे जावे लागत आहे, शिवाय पक्ष्यांनाही अनेकदा जीव गमवावा लागतो.

     

    या संदर्भात चंद्रपूर शहरात जनजागृतीसह चंद्रपूर काँग्रेस कमिटीचे पर्यावरण जिल्हाध्यक्ष ताज कुरेशी यांनी चंद्रपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.पाटील यांना निवेदन दिले. प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी यावेळी कुरेशी यांनी केली.

     

    यावेळी आयुक्तांनीही पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देण्यासाठी एजाज खान, परवेज शेख, अखिलेश जनबंधू, शारिक भाई आदी उपस्थित होते.

  • चंद्रपूर युवासेनेत असंख्य युवकांनी केला पक्षप्रवेश

    चंद्रपूर युवासेनेत असंख्य युवकांनी केला पक्षप्रवेश

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या शिवसेना प्रणित युवासेना मध्ये युवकांची ओढ निर्माण झाल्याने विविध पक्षातील युवक आज युवासेनेत प्रवेश करीत आहे.

     

    12 जानेवारीला बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पायली गावातील असंख्य युवकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या उपस्थितीत युवासेनेत प्रवेश केला.

    चंद्रपूर शहरात युवासेनेने हजारो युवकांना पक्षात सामील केल्यावर आता ग्रामीण भागातील संघटनात्मक बांधणी जिल्हाप्रमुख सहारे यांच्या मार्गदर्शनात जोमात सुरू आहे.

     

    आज झालेल्या पक्षप्रवेशात बल्लारपूर युवासेना उपतालुका प्रमुख पदावर विवान रामटेके यांची नियुक्ती करण्यात आली.

     

    यावेळी रामटेके यांच्यासहित अंकित कातकर, करन साव, रितीक रायपुरे, मयूर मडावी, विजय मेसरे, अश्विन रामटेके, पवन कातकर, विशाल कातकर, मंगेश रायपुरे, विनीत कातकर, अर्जुन रामटेके, अंशु रायपुरे, अनुष रामटेके, अभय गायकवाड, राहुल विश्वकर्मा, बादल मडावी, पन्नू पेंदोर, आझाद आसुटकर, शुध्दोधन आसुटकर, आदित्य रत्नपारखी, सुजल साव, सागर रायपुरे, शुभम गेडाम, अमन गेडाम, अनुराज मडावी, राहुल राहुलगडे, मुवेश साव, पियुष उराडे, राहुल चौबे, करन रामटेके, मनीष भगवा, आशिष गेडाम यांनी प्रवेश घेतला.

     

    पक्ष प्रवेश कार्यक्रम वेळी माजी शिवसेना महानगर प्रमुख प्रमोद पाटील, शिवसेना तालुका प्रमुख विकास विरुटकर, वसीम शेख, सिक्कीभाई खान, युवासेना शहर प्रमुख शाहबाज खान, ज्ञानेश्वर लोनगाडगे, उपतालुका प्रमुख सुश्मित गौरकार, उपसरपंच सिनाला सूरज शेंडे व प्रज्वल आवळे यांची उपस्थिती होती.

  • घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र, शेतकरी, बेरोजगारांच्या विविध मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

    घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र, शेतकरी, बेरोजगारांच्या विविध मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : घुग्घूस शहर, ता. चंद्रपूर येथील भूमिपुत्र युवा संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले आहे. या निवेदनात संघटनेने घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र, शेतकरी, बेरोजगारांच्या विविध मागण्यांबाबत सादर केल्या आहेत.

     

    या मागण्यांमध्ये घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील स्थानिक सुशिक्षित व बेरोजगार युवक व युवतींना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरीत सामावून घेणे, लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देणे, लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या प्रदूषणामुळे लोकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो, म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चौकशी करून कंपन्यांवर कारवाई करणे.

     

    लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून अनेक वर्षापासून घुग्घूस ते पांढरकवडा पांदन रस्ता आणि घुग्घूस ते सेनगाव पांदन रस्तावर केलेला अतिक्रमण हटवणे, लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीने शहर व ग्रामीण भागात सन २०१३ पासून ते आजपर्यंत CSR फंडातून केलेल्या खर्चाची कार्याची चौकशी करणे, जिल्ह्याधिकारी यांनी सदर लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या भोंगळ कारभाराची सखोल चौकशी करून कारवाई करणे, विस्तारीकरणात ज्या शेतकऱ्याच्या जमिनी कंपनी अधिग्रहित करते त्या जमिनींचा मोबदला हा शेतकऱ्यांना थेट मिळावा, कंपनीचे अधिकारी यांनी विस्तारीकरणाच्या जनसुनानीच्या नोटिफिकेशनमध्ये जाहीरपणे सांगितले की कंपनीच्या परिसरात किमान दोन लाख वृक्षारोपण करण्यात आले असे खोटे व चुकीची माहिती सादर केलेल्या कंपनीवर कडक कारवाई करणे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीत कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा आणि त्यांना योग्य पगार किमान ₹२०,००० ते ₹२५,००० रुपये देण्यात यावे, कंपनीची स्थापना ज्यावेळी झाली त्यावेळी अनेक लोकवस्तीचे पुनर्वासन करताना सर्वे क्रमांक १६७ आराजी ६३.६७३७ चौ.मी. एकूण ६२ प्लॉट रहिवासा करिता पुरावतीत आहे.

     

    जमिनीचे पट्टे देऊ असे खोटे आश्वासन कंपनी मार्फत देऊन त्या लोकवस्तीना स्थलांतरित करण्यात आले, लाइट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे जड वाहतूक शहराच्या मध्यभागातून होत असल्याने दुर्घटनाला आमंत्रण नाकारता येत नाही. म्हणून कंपनीचे जड वाहतूक शहराच्या मध्यभागातून बंद करण्यात यावे यांचा समावेश आहे.

     

    या सर्व मागण्यांवर योग्य निर्णय घेण्यात यावा आणि न्याय द्यावा यासाठी भूमिपुत्रांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. भूमिपुत्रांच्या वरील मागण्यांवर योग्य ती सकारात्मक चर्चा न झाल्यास दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी कंपनीवर धडक मोर्चा काढण्यात येईल, अशी चेतावणी संघटनेने दिली आहे.