Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी कांग्रेस पक्षातर्फे 8 इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल

    चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी कांग्रेस पक्षातर्फे 8 इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर लोकसभा 2019 च्या निवडणुकीत कांग्रेसचे बाळू धानोरकर यांनी विजय प्राप्त केला होता, मात्र वर्ष 2023 ला खासदार धानोरकर यांच्या निधनाने हा मतदार संघ रिकामा झाला, आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कांग्रेस पक्षाने चाचपणी सुरू केली आहे.

     

    कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदार संघासाठी इच्छुकांचे अर्ज मागविले होते, कांग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्याकडे एकूण 8 अर्ज प्राप्त झाले असून आज सर्व अर्ज नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द करणार आहे.

     

    इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये आमदार प्रतिभा धानोरकर, कांग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, प्रकाश देवतळे, शिवा राव, शंतनू धोटे, दिनेश चोखारे, डॉ.हेमंत खापणे दिलीप माकोडे यांचा समावेश आहे.

     

    सध्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघात कांग्रेस पक्षाकडून आमदार प्रतिभा धानोरकर हे प्रबळ दावेदार मानल्या जात आहे.

  • चंद्रपूर महानगरपालिकेचा 542 कोटींचा मलनिस्सारण प्रकल्प

    चंद्रपूर महानगरपालिकेचा 542 कोटींचा मलनिस्सारण प्रकल्प

    News34 chandrapur

    चंद्रपूर – केंद्रशासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेच्या रु. 542.05 कोटीच्या मलनि:स्सारण प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नगर विकास विभागाने निर्गमित केला आहे.

     

    केंद्र शासन पुरस्कृत 2.0 अभियानाची शासन निर्णयान्वये सन 2021-22 पासून राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर अभियानांतर्गत पाणीपुरवठा सरोवरांचे पुनर्जीवन व हरित क्षेत्र विकास आदी पायाभूत सुविधांची निर्मिती राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करण्यात येणार आहे. आणि यापूर्वीच्या अमृत अभियानांतर्गत समाविष्ट असलेल्या राज्यातील 44 शहरांमध्ये मलनि:स्सारण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत राज्याच्या 18236.39 कोटी प्रकल्प किमतीच्या राज्य जलकृती आराखड्यास केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे.

     

    चंद्रपूर महानगरपालिकेच्या मलनि:स्सारण प्रकल्पांतर्गत कार्य सर्वेक्षण, मलनि:स्सारण प्रणाली, गृह सेवा कनेक्शन, रस्ता पुनर्रसंचयित करणे, रेल्वे क्रॉसिंग पुढे ढकलणे, राष्ट्रीय महामार्ग 9 आणि नाला क्रॉसिंग एकूण 7, पंपिंग मशिनरी, सीवरेज पंपिंग स्टेशन, सीवर स्वच्छता तपासणी आणि नूतनीकरण आदी कामे असणार आहे. सदर प्रकल्पाची अंमलबजावणी विहितकालावधीत पूर्ण करण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कार्यान्वयीन यंत्रणा, प्रकल्पव्यवस्थापन सल्लागार व प्रकल्प व्यवस्थापन विकास व व्यवस्थापन सल्लागार यांची संयुक्तरीत्या राहील.

     

    अमृत 2.0 अभियानांतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार सदर प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागाराची नेमणूक करावी. केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानाच्या केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना चंद्रपूर महानगरपालिकेच्या मलनि:स्सारण प्रकल्पास लागू राहतील.

     

    शहरात 233 किलोमिटरची पाईप लाईन

    पहिल्या टप्प्यात चंद्रपूर शहरात 233 किलोमिटर पाईप लाईन मलनिःसारण करण्यासाठी होणार असून यातून शहरातील 54 हजार घरांना जोडणी होणार आहे.

  • आमदार अपात्रता निकाल – चंद्रपुरात शिवसेनेचे निषेध आंदोलन

    आमदार अपात्रता निकाल – चंद्रपुरात शिवसेनेचे निषेध आंदोलन

    Mla Disqualification result  चंद्रपूर –  निकालाच्या सत्ता संघर्षानंतर विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकरांनी निकाल शिवसेना शिंदे गटाच्या बाजूला दिल्यामुळे शिवसेना ठाकरे गट मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

    महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे आहेत अशाच प्रकारच आंदोलन चंद्रपुरात आज शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे. Mla Disqualification result

    भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत महिलांचा संताप 

    यावेळी केंद्र सरकार, शिवसेना शिंदे गट व विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे व त्याचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

    शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालावर थेट आक्षेप घेतला आहे.

    गिऱ्हे यांनी म्हटले आहे की, जर अध्यक्षांना शिवसेनेची २०१८ ची घटना (ज्यामध्ये पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड झाली) अमान्य असेल आणि ती घटनाबाह्य ठरवली असेल, तर त्याच घटनेवर आधारित पक्षप्रमुखांनी दिलेला ‘ए-बी’ फॉर्म घेऊन एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार २०१९ मध्ये निवडून आले, हे कसे काय घटनाबाह्य ठरवले जात नाही? अध्यक्षांनी एकाच घटनेचे दोन वेगवेगळे निकष लावले आहेत. एकीकडे २०१८ ची घटना नाकारायची आणि दुसरीकडे त्याच घटनेच्या आधारावर निवडून आलेल्या आमदारांची वैधता मान्य करायची, हा न्याय विसंगत आहे. नार्वेकर यांच्या निकालावर आम्ही हा कायदेशीर प्रश्न उपस्थित करतो.

  • चिमूर येथील शहीद बाबूराव शेडमाके चौकात वाहन चालकांचे स्टेअरिंग छोडो आंदोलन

    चिमूर येथील शहीद बाबूराव शेडमाके चौकात वाहन चालकांचे स्टेअरिंग छोडो आंदोलन

    News34 chandrapur

    चिमूर – गुणवंत चटपकार

    जड वाहनचालकांसाठी तसेच मोठ्या वाहन चालकासाठी अंन्यायकारक ठरणारा सुधारित हिट अँड रन कायद्या तत्काळ मागे घेण्यात यावा. या मागणीसाठी चिमूर क्रांती जिल्हा वाहन चालक संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय समोर चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. पण अचानक आंदोलन मागे घेण्यात आले होते.

     

    आज दिनांक १० जानेवांरी रोजी शहीद बाबूराव शेडमांके चौकात स्टरिंग छोडो आंदोलन करण्यात आले.
    नुकताच संसदेत जुन्या हिट अँड रन कायद्यात बदल करून सुधारित कायदा पारित करण्यात आला. या कायद्यात कठोर तरतुदी करण्यात आल्या असून वाहन चालकांसाठी अन्यायकारक आहे. यात करावसाचा कालावधी आणि दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. या कायद्यामुळे वाहनचालकांचे कुटुंब उद्ववस्त होणार आहे.

     

    अनेकदा अपघात हे आकस्मिक होतात. मात्र या अपघातात वाहन चालकांनाच जबाबदार धरले जातात. अनेकदा अपघाता नंतर वाहन चालकांना गंभीर मारहाण केली जाते. त्यामुळे अपघातानंतर वाहनचालक जख्मीला मदत करण्यापेक्षा पळ काढून पोलिस ठाण्यात आश्रय घेतात. परंतु नवीन कायदा हा वाहनचालकांसाठी अन्यायकारक ठरणार आहे.

     

    त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी दोन जानेवारीला चिमूर क्रांती जिल्हा वाहन चालक संघटनेच्या वतीने चिमूर शहरातून मोर्चा काढून तहसील कार्यालय समोर चक्का जाम आंदोलन सुरू केले होते. आज दिनांक १० जानेवारी २०२३ रोजी सकाळी अकरा वाजता पासून शहीद बाबूराव शेडमांके चौकात स्टरिग छोडो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची माहिती पोलिस निरीक्षक मनोज गभने यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलनकारी सोबत चर्चा करून मध्यस्ती केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

  • माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांचे कार्यकाळात अनेक विकासात्मक कामे – संतोष रावत

    माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांचे कार्यकाळात अनेक विकासात्मक कामे – संतोष रावत

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – महाराष्ट्राचे लोकनेते माजी मुख्यमंत्री स्व.मा.सा. उर्फ दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंती दिनानिमित्त दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०-०० वाजता तालुका काॅंग्रेस कमिटी मूल तर्फे काॅंग्रेस नेते मान .संतोषसिंह रावत (अध्यक्ष,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह.बॅंक) व माजी जी.प.अध्यक्ष चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी दादासाहेब कन्नमवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. तसेच उपस्थित पदाधिकारी यांनीही पुष्प वाहून अभिवादन केले.

     

    मुख्यमंत्री स्व.दादासाहेब कन्नमवार यांनी आपल्या कार्यकाळात विदर्भ व महाराष्ट्रात अनेक विकास कामे करुन शहरी माणसांसोबत ग्रामीण माणसे जोडण्याचे कार्य कन्नमवारजीनी केले. असे विचार काँग्रेस नेते व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी आपल्या मनोगता मधून व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी ज्येष्ठ कांग्रेस पदाधिकारी बंडू भाऊ गुरनुले यांनी त्यांच्या अल्प काळात स्व.कन्नमवार यांनीच चंद्रपूर व भंडारा येथे डिफेन्स उद्योग निर्माण करुन अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. म्हणून ते लोकनेते झाले असे मत व्यक्त केले. तर स्व.मा.सा.कन्नमवार यांनी अतिशय गरिबीतून व प्रतिकूल परिस्थितीतून वर्तमापत्र वाटून आपल्या जीवन कार्याला सुरुवात करुन मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले असे मनोगत कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राजेंद्र कन्नमवार यांनी व्यक्त केले.

     

    याप्रसंगी कृषी बाजार समिती सभापती रकेश रत्नावार यांनीही त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व कांग्रेस पक्ष वाढीसाठी उपस्थित सर्वांनी मेहनत घ्यावी असे सूचित केले. कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी केले तर आभार महिला काँग्रेसच्या सचिव शाम्लता बेलसरे यांनी मानले.

     

    कार्यक्रमाला माजी तालुका अध्यक्ष व बाजार समिती संचालक घनश्याम येनुरकर, माजी उपसभापती व संचालक संदीप कारमवार, संचालक किशोर घडसे, महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा रुपाली संतोषवार, शहर अध्यक्ष नलिनी आडपवार, कोषाध्यक्ष राधिका बुक्कावार, कोसंबी ग्राम पंचायत सरपंच रवींद्र कामडी, सोसायटी संचालक विवेक मुत्यलवार, शहर उपाध्यक्ष संदीप मोहबे, सेवादलाचे संदीप कटकुरवार, युवक काँग्रेसचे विष्णू सादमवार, गंगाधर घुगरे, मनोज आदी कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

  • चंद्रपुरात वाहन चालकांचे स्टेअरिंग छोडो आंदोलन

    चंद्रपुरात वाहन चालकांचे स्टेअरिंग छोडो आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सुधारित हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक झाले असून हा कायदा तात्काळ मागे घ्यावा यासाठी आता वाहन चालकांनी स्टेअरिंग छोडो आंदोलनाला सुरुवात केली आहे.

    10 जानेवारीला शहरातील वरोरा नाका चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वाहन चालकांनी निषेध रॅली काढत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला, या रॅलीत जिल्हाभरातून वाहन चालक सामील झाले होते.

     

    हिट अँड रन हा कायदा सर्वांसाठी लागू आहे, ज्यांच्याकडे लायसन्स आहे त्यांच्या हातून अपघात घडला तर 7 लाख दंड तर 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे, जर हा कायदा परत घेतला नाही तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा वाहन चालकांनी दिला आहे.

     

    या आंदोलनात जय संघर्ष चालक मालक संघटना, लाल बावटा वाहन चालक मालक व इतर संघटना सामील झाल्या होत्या.

  • चंद्रपुर वेकोलि कार्यालय में बनी रील, कर्मचारियों का गैरजिम्मेदाराना बर्ताव?

    चंद्रपुर वेकोलि कार्यालय में बनी रील, कर्मचारियों का गैरजिम्मेदाराना बर्ताव?

    News34 chandrapur

    चंद्रपुर – आजकल युवाओं में रिल्स का काफी चलन बढ़ गया है। छोटे वीडियो बनाकर खुदको मशहूर करने का कार्य आज की युवा पीढ़ी जोरोसे कर रही है।

    मात्र यह चलन रस्तो से शुरू हुआ और आज सरकारी दफ़्तर तक आ पहुँचा है, भारत सरकार के अधिनस्त आनेवाले कोल इंडिया की अधिनस्त मिनिरत्न कंपनी वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड के चंद्रपुर कार्यालय में ऐसा ही नजारा देखने को मिला।

     

    चंद्रपुर वेकोलि कार्यालय के एक महिला कर्मचारी का दूसरे कार्यालय में तबादला हुआ, तो बस फिर क्या सह कर्मियों ने आव देखा न ताव उन्होंने अपना काम छोड़कर कार्यालय में ही रिल्स बना दी।  यह रिल्स सोशल मीडिया पर जोरोसे व्हायरल हो रही है।

     

    यह उन महिला कर्मियों के लिए आम बात है क्योंकि ऐसा पहली बार नही हुआ है, अपने कामकाज छोड़कर पहले भी कई मर्तबा यह नजारा अन्य लोगो ने बारबार देखा है।

     

    खास बात यह है कि कार्यालय की वरिष्ठ अधिकारी जो सख्त मिजाज के लिए जाने जाती है उन्होंने कार्यालय में कर्मचारियों द्वारा किये बर्ताव पर अब तक कोई कारवाई नही की है।

     

    पहले ही चंद्रपुर वेकोलि कार्यालय या खदान में बहोत सारे ऐसे कर्मी है जो सिर्फ हाजरी लगाकर लाखोकि तनखाह उठाने का काम करते है, क्या ऐसे गैर जिम्मेदाराना रवैये पर वेकोलि कोई कारवाई करेगा या फिर हमेशा की तरह मौन बनाकर चुप रहेगा।

  • चंद्रपूर शहरात 4 अस्वलीने दिले दर्शन

    चंद्रपूर शहरात 4 अस्वलीने दिले दर्शन

    4 bear in chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील लालपेठ परिसरात मागील काही दिवसांपासून अस्वलीचे नागरिकांना दर्शन होत आहे, लालपेठ कॉलरी क्रमांक 2 येथील समृद्धी नगर भागात 9 जानेवारीला मध्यरात्रीच्या सुमारास तब्बल 4 अस्वल त्याठिकाणी दाखल झाले.

    समृद्धीनगर भागात बोरीचे झाड मोठ्या प्रमाणात असल्याने अस्वल त्याठिकाणी 8 दिवसापासून येत आहे, नागरिकांनी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी नायगामकर यांना सम्पर्क साधला मात्र त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. (हे हि वाचा : राजुऱ्यात विवाहित महिलेच्या पतीची हत्या, पत्नीसह प्रियकराला अटक)

    डिसेंम्बर महिन्यात अस्वल थेट शहरात दाखल झाली होती, आता पुन्हा अस्वल शहरात येत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वनविभागाने शहरात येत असलेल्या वन्यप्राण्यावर आवर घालावा अशी मागणी नागरिकांतर्फे केल्या जात आहे.

  • विद्यार्थी हाच देशाचे उज्ज्वल भविष्य आहे : ॲड. मेघा भाले

    विद्यार्थी हाच देशाचे उज्ज्वल भविष्य आहे : ॲड. मेघा भाले

    News34 chandrapur

    चंद्रपूर  : विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व संस्कार देवून उत्तम नागरीक घडविणे हे शिक्षकाचे कर्तव्यच आहे. विद्यार्थी हाच देशाचे उज्ज्वल भविष्य आहे असे प्रतिपादन बल्लारपूर काँग्रेस महिला विभागाच्या शहराध्यक्ष ॲड. मेघा भाले यांनी विसापूरात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थांना नोटबुक वाटप दरम्यान केले आहे.

     

    काँग्रेस नेत्या वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तसेच चंद्रपूरचे माजी सभापती काँग्रेस नेते दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनात विसापूर येथील जिल्हा परिषद प्राध्यमिक शाळेतील विद्यार्थांना नोटबुक वाटप करण्यात आले.

     

    यावेळी बल्लारपूर काँग्रेस महिला विभागाच्या तालुका अध्यक्ष अफसान सय्यद, बल्लारपूर काँग्रेस महिला विभागाच्या शहराध्यक्ष ॲड. मेघा भाले मॅडम, बल्लारपूर काँग्रेस महिला विभागाच्या शहर उपाध्यक्ष ममता चंदेल, सामाजिक कार्यकर्त्या संगीता विलास बावणे, सुष्मा तिरुपती गिरडकर, शाळेच्या मुख्याध्यापिका कलावती वानखेडे, इतर शिक्षिका लीलावती नंदुरकर, नीता वासाडे, मीनाक्षी कुंभारे, विना वैरागडे, स्वाती मेश्राम तसेच शिक्षक, विद्यार्थी, शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

     

    पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, विद्यार्थी हाच देशाचा उज्ज्वल भविष्य आहे, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व संस्कार देवून उत्तम नागरीक घडविणे हे शिक्षकाचे कर्तव्यच आहे. तसेच आपल्या शाळेतील खेळांडूनी जगात नांव लौकीक करावे असे आवाहन ॲड. मेघा भाले यांनी केले आहे. काँग्रेस नेत्या वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थांना नोटबुकलस चॉकलेट वाटप करण्यात आले.

  • खेळाडूंसाठी आनंदाची वार्ता – ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली क्रीडा संकुलासाठी 25 कोटींचा विकास निधी मंजूर

    खेळाडूंसाठी आनंदाची वार्ता – ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली क्रीडा संकुलासाठी 25 कोटींचा विकास निधी मंजूर

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी – ग्रामीण खेळाडूंना वाव मिळावा याकरिता प्रत्येक तालुका स्तरावर शासनाच्या वतीने क्रीडा संकुले उभारण्यात आली. अशातच ब्रह्मपुरी मतदार संघातील सिंदेवाही, सावली व ब्रह्मपुरी येथील क्रीडा संकुलन मध्ये प्रलंबित असलेल्या विकास कामांना अखेर पूर्णविराम मिळाला असून राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नातून मतदारसंघातील तीनही तालुक्याला एकूण 25 कोटी रुपयांचा विकास निधी प्राप्त झाला असून लवकरच ही विकासकामे सुरू करण्यात येणार आहे.

     

    ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात सिंदेवाही सावली व ब्रह्मपुरी अश्या तीन तालुक्यांचा समावेश आहे. मात्र क्रीडा साहित्य व इतर सोयी सुविधा अभावी आणि खेळाडूंना आपल्या खिलाडी वृत्तीचे प्रदर्शन करणे अवघड जाते. अश्या अनेक प्रतिभावंत खेळाडू व त्यांची प्रतिभा सर्वांपुढे यावी तसेच त्यांनी क्रीडा क्षेत्रात नावलौकिक करावे या उदांत हेतूने राज्याची विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ब्रह्मपुरी मतदार संघातील तीनही तालुक्यातील क्रीडा संकुलनामध्ये प्रलंबित असलेली विकास कामे याची मागणी रेटून धरत खेळाडूंकरिता पूर्णपणे शक्ती पणाला लावून शासनाकडून 25 कोटीचा निधी मंजूर करून आणला.

     

    यात सिंदेवाही येथील क्रीडा संकुला पाच कोटींचा विकास निधी प्राप्त झाला असून सिंथेटिक हॉकी टर्फ प्रेक्षक गॅलरी, बास्केटबॉल कोर्ट दुरुस्ती व चेनलिंग फेंसिंग क्रीडांगण समपातळीकरण 200 मीटर धावपथ दुरुस्ती, धावनपथाच्या एका बाजूला प्रेक्षक गॅलरी विथ रुपी पाणी व्यवस्था क्रीडा साहित्य आदी कामांचा समावेश आहे.तर ब्रह्मपुरी येथील क्रीडा संकुल मध्ये एकूण सात कोटींचा विकास निधी मंजूर झाला असून यात 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक इंनडोर हॉलची दुरुस्ती, वुडन फ्लोरिंग बास्केटबॉल कोर्ट सिंथेटिकरण चेंज प्रेक्षक गॅलरी विथ रुपींग खेळांची मैदानी क्रीडा साहित्य विद्युतीकरण व अन्य विकास कामांचा समावेश आहे. तर सावली येथील क्रीडा संकुल मध्ये होऊ घातलेल्या विकास कामांकरिता एकूण 12 कोटींचा विकास निधी मंजूर झाला असून यात बॅडमिंटन हॉल, ऑफिस, जिम हॉल, 400 मीटर धावनपत फुटबॉल मैदान संरक्षण भिंत कबड्डी ,खो-खो ,व्हॉलीबॉल मैदाने, क्रीडा साहित्य फर्निचर, पाणी सुविधा, अशा विविध विकास कामांचा समावेश आहे.

     

    ब्रह्मपुरी मतदार संघातील या तीनही तालुक्यांमध्ये विकास कामांकरिता एकूण 25 कोटी असा मोठा विकास निधी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून मिळाला असून ग्रामीण खेळाडूंना मैदानी स्पर्धा व स्पर्धा पूर्वतयारी याकरिता अधिकाधिक भाव मिळणार आहे. तसेच लवकरच तीनही क्रीडा संकुलनामध्ये विकास कामांना सुरुवात होणार असून खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.