Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • घुग्घुस येथे हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालकांचे आंदोलन

    घुग्घुस येथे हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालकांचे आंदोलन

    News34 chandrapur

    घुग्घुस – केंद्र सरकारने आणलेल्या सुधारित हिट अँड रन कायद्याविरोधात पुन्हा घुग्घुस येथे HRG कंपणीमधील ट्रक चालकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

    सदर ट्रक चालक वेकोली कोळसा खाणीत माती व कोळश्याची वाहतूक करणारे ट्रक चालवितात.

     

    2 दिवसापासून देशात पुन्हा आंदोलन होणार अशी कुजबुज सुरू झाली होती, नागरिकांनी पुन्हा पेट्रोल पंपावर गर्दी सुद्धा केली मात्र ती अफवा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते, सध्या समाज माध्यन्मावर अशा अफवा पसरत असून त्यावर विश्वास करू नये असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

     

    त्यानंतर सुद्धा आज घुग्घुस येथील ट्रक चालकांनी संप पुकारला यावेळी बैरम बाबा मंदिर परिसरात घुग्घुस पोलिसांनी अनुचित घटना घडणार नाही याकरिता बंदोबस्त लावण्यात आला आहे.

  • काँग्रेसचे निष्ठावंत गुरुजी काळाच्या पडद्याआड – आमदार प्रतिभा धानोरकर

    काँग्रेसचे निष्ठावंत गुरुजी काळाच्या पडद्याआड – आमदार प्रतिभा धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर शहर काँग्रेस माजी शहर अध्यक्ष, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे माजी चंद्रपूर जिल्हा कार्यवाह, माजी विभागीय कार्यवाह, माजी बोर्ड मेंबर तथा राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक श्री गजाननराव गावंडे गुरुजी यांचे आज, दिनांक ०९ जानेवारी २०२४ रोजी दुःखद निधन झाले. या घटनेने शिक्षण क्षेत्रासह काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

     

    गजाननराव गुरुजी हे शिक्षण क्षेत्रात एक आदर्श शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावली. ते विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अनेक वर्षे निष्ठापूर्वक काम करत होते. त्यांनी संघाच्या चंद्रपूर जिल्हा कार्यवाह, विभागीय कार्यवाह आणि बोर्ड मेंबर म्हणून काम पाहिले. त्यांना त्यांच्या कार्याबद्दल राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

     

    गजाननराव गावंडे गुरुजी हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम पाहिले. काँग्रेस पक्षाला संघटित आणि मजबूत करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.

     

    गजाननराव गावंडे गुरुजी यांचे निधन हे शिक्षण क्षेत्रासाठी आणि काँग्रेस पक्षासाठी एक मोठी हानी आहे. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर आणि त्यांच्या चाहत्यांवर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना. आमदार प्रतिभा धानोरकर

  • चंद्रपूर जिल्हा शहर कांग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष गावंडे गुरुजी यांचं निधन

    चंद्रपूर जिल्हा शहर कांग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष गावंडे गुरुजी यांचं निधन

    chandrapur news : चंद्रपूर (News३४) – चंद्रपूर जिल्हा शहर कांग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, विदर्भ किसान मजदूर कांग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे यांचं आज 9 जानेवारीला सकाळी निधन झाले. (हे हि वाचा : जिल्हाधिकारी गौडा यांनी केली स्ट्रॉंग रूमची पाहणी)

    चंद्रपुरात गावंडे गुरुजी म्हणून सर्वाना परिचित होते, नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी राजकारणात सक्रियपणे सहभाग नोंदविला होता, काही दिवसांपासून ते आजाराने त्रस्त होते, आजारावर उपचार झाला घरी आले मात्र आज सकाळी त्यांची प्रकृती खालावली, त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. chandrapur news

    गावंडे गुरुजी हे 77 वर्षाचे होते, त्यांच्या जाण्याने गावंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावंडे गुरुजी यांच्या जाण्याने कांग्रेस पक्षाला मोठी हानी पोहोचली आहे. विधानसभा निवडणूक असो कि महानगरपालिका निवडणूक प्रत्येक निवडणुकीत गावंडे गुरुजी यांच सक्रिय सहभाग असायचा.

  • वाघाला बघून बिबट्याला आला हार्ट अटॅक?

    वाघाला बघून बिबट्याला आला हार्ट अटॅक?

    News34 chandrapur

    तळोधी बाळापूर – वर्ष 2023 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 7 वाघाचा विविध कारणांनी मृत्यू झाला होता, आता नव्या वर्षात ब्रह्मपुरी वनविभाग अंतर्गत येणाऱ्या तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील बिबट्याचा मृतदेह आढळून आला. वन कर्मचारी कॅमेरा ट्रॅप चे फोटो चेक करण्यासाठी जंगलात गेले असता त्यांना दुर्गंधी येऊ लागली, परिसरात बघितले तर एका झाडावर 20 ते 30 फूट उंचीवर बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.

     

     

    घटनेची माहिती तळोधी बाळापुर वन परिक्षेत्र अधिकारी आरुप कन्नमवार यांना देण्यात आली घटनेची माहिती मिळताचं वन अधिकारी तात्काळ घटनास्थळी जाऊन दोराच्या साह्याने झाडावर चढून त्या बिबट्याला खाली उतरविले.

     

    सदर मृत बिबट ही साडेतीन ते चार वर्षे वयाचा मादा बिबट असल्याचे लक्षात आले. व घटनास्थळावरून हे बिबटमृत झाल्याची घटनाही पाच ते सहा दिवसापूर्वी घडल्याचे घटनास्थळावरील परिस्थितीनुसार लक्षात आले. सदर परिसराची चौकशी केली असता ज्या झाडावर हा बिबट मेलेला होता त्या झाडाखाली वाघाने ओरबडल्याचे, मार्किंग केल्याचे व झाडावर थोड्या उंचावर पर्यंत वाघाच्याही पंजाचे नखांचे निशाण आढळून आले. त्यावरून वाघाने पाठलाग केल्यामुळे बिबट झाडावर घाईघाईने चढला व चढल्यानंतर हृदय घाताने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला.

    मोक्का पंचनामा केल्यानंतर विच्छेदनासाठी ब्रह्मपुरी वन विभागाच्या ऑफिसला पाठविण्यात आले.

  • चंद्रपुरातील पाच दिवसीय भव्यदिव्य कृषी महोत्सवाचा समारोप, कोण आहे ट्रॅक्टर विजेता?

    चंद्रपुरातील पाच दिवसीय भव्यदिव्य कृषी महोत्सवाचा समारोप, कोण आहे ट्रॅक्टर विजेता?

    News34 chandrapur

    चंद्रपूर : शेतकरी समृध्द आणि आत्मनिर्भर झाला तरच देश प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होईल, ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात दि.3 ते 7 जानेवारी दरम्यान चांदा ॲग्रो – 2024 चे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले. पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यात प्रथमच या माध्यमातून कृषी विकासाचे नवे दालन शेतक-यांना उपलब्ध झाले. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाचे सुक्ष्म नियोजन, खिचडीचा विश्वविक्रम आणि शेतक-यांना 13 लाखांचे आकर्षक बक्षीस वाटपाचे पाच दिवसीय कृषी महोत्सवाचा रविवारी समारोप करण्यात आला.

     

     

    कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने चांदा क्लब ग्राऊंडवर जिल्हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. दि. 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून या कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. पाच दिवसीय या कृषी महोत्सवात दररोज किमान 12 ते 14 हजार याप्रमाणे अंदाजे 60 हजार नागरिकांनी उपस्थिती दर्शविली, तर 25 हजार जणांनी यात नोंदणी केली.

     

     

    पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून 13 लाखांचे आकर्षक बक्षीस वाटप : जिल्हा कृषी महोत्सवात नोंदणी केलेल्या शेतक-यांसाठी लकी ड्रॉ च्या माध्यमातून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून व्यक्तिश: 13 लाखांचे आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यात प्रथम क्रमांकाचे मिनी ट्रॅक्टर विजेता कोरपना तालुक्यातील वडगाव खिराडी येथील पंढरी गोंडे तर द्वितीय क्रमांकाची बुलेट विजेता उर्जानगर येथील विशाल बारेकर ठरले. याव्यतिरिक्त तिस-या क्रमांकाचे पॉवर टिलर शेणगाव (ता. जिवती) येथील तुकाराम कपडे यांना, चवथ्या क्रमांकाचे पॅडी वीडर नंदोरी (ता. भद्रावती) येथील प्रशांत अहीरकर यांना तर पाचव्या क्रमांकाचे पावर वीडर आमडी (ता. बल्लारपूर) येथील सुभाष तेलतुंबडे यांना मिळाले. याशिवाय पाच विजेत्यांना चाप कटर, पाच विजेत्यांना भाजीपाला किट, 10 विजेत्यांना पॉवर स्प्रेअर, पाच जणांना आटा चक्की अशी बक्षीसे देण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या शेतक-यांचासुध्दा सन्मान करण्यात आला. प्रथमच लकी ड्रॉ च्या माध्यमातून शेतक-यांना आकर्षक बक्षीसे मिळाल्याने शेतक-यांनी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले.

     

     

    7000 किलो पेक्षा अधिक खिचडीचा विश्वविक्रम: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी चंद्रपूर येथील कृषी महोत्सवात 7 हजार किलोपेक्षा जास्त तृणधान्यांची खिचडी बनवून विश्वविक्रम नोंदविला. ही खिचडी शाळांमध्ये तसेच शहरातील वस्त्यांमध्ये वाटण्याची व्यवस्था केली. तसेच कृषी प्रदर्शनाच्यास्थळी विविध स्टॉलवर असलेल्या प्रत्येक माणसाला आणि शहरातील 35 हजार लोकांपर्यंत ही खिचडी पोहोचेल, अशी व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली.

     

    बळीराजा समृद्धी मार्ग शेतपाणंद रस्ते अभियानाचा शुभारंभ: जिल्हा कृषी महोत्सवात ‘बळीराजा समृद्धी मार्ग शेतपाणंद रस्ते’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात 5001 कि.मी. चे शेतपाणंद रस्ते तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये मातीकाम पूर्ण झालेले 2055 कि.मी. चे रस्ते, मातीकाम सुरू असलेले 405 कि.मी. चे रस्ते आणि नव्याने प्रस्तावित 3182 कि.मी.चे मुरमीकरणाचे शेतपाणंद रस्ते आणि मुरमीकरण झालेले परंतु खडीकरण बाकी असलेले इतर रस्ते सुरू करण्यात येतील.

     

     

    मिशन जयकिसान अभियानाचा शुभारंभ : कृषी क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा एक मॉडेल बनावा, या भागातील शेतकरी संपन्न व्हावा, शेतीसह कृषीपूरक उद्योगाला जिल्ह्यात चालना मिळावी आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात कृषीवैशिट्य असलेली गावे विकसित व्हावी, या पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अभिनव संकल्पनेतून ‘ मिशन जय किसान’ अभियानाचा कृषी महोत्सवात शुभारंभ करण्यात आला.

     

    31 कोटी 90 लक्ष रुपयांच्या भाजीपाला संशोधन केंद्राला मान्यता : ऐकार्जुना (ता. वरोरा) येथे 25 हेक्टर जमिनीवर 31 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून भाजीपाला संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. याबाबत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी उद्घाटन कार्यक्रमात संशोधन केंद्राला मान्यता देण्यात आल्याचा आदेश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सुपूर्द केला.

     

    पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी : पाच दिवस चाललेल्या कृषी महोत्सवात कृषी विषयक विविध चर्चासत्रे, परिसंवाद यांच्यासोबतच विविधि सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत आणली. सोबतच या कृषी महोत्सवात जवळपास विविध विभागाने 350 स्टॉल लावले होते.

  • चंद्रपुरात ST बस वाहकाच्या प्रामाणिकपणाची चर्चा

    चंद्रपुरात ST बस वाहकाच्या प्रामाणिकपणाची चर्चा

    News34 chandrapur

    चंद्रपूर :- 7 जानेवारीला रात्री जाम वरून नागपूर साठी नागपूर निवासी चंदू ढोके हे राजुरा आगाराची राजुरा नागपूर बस क्र. ३६९५ मध्ये नागपूर जाण्यासाठी बसले, नागपूर आल्या नंतर ढोके यांनी मोबाईल बघितला असतो तो कुठेही आढळून आला नाही, ढोके यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल बस मध्ये पडला असल्याची त्यांना जाणीव झाली.

    बस मधून उतरल्या नंतर ढोके आपल्या घरी निघून गेले , मात्र मोबाईल जवळ न दिसल्याने चंदू ढोके यांनी पुन्हा बस स्थानक गाठले मात्र बस दिसली नाही , मात्र 8 जानेवारीला सकाळी 11 वाजता राजुरा डेपो येथे फोन लावून माहिती देण्यात आली.

     

    अश्यातच राजुरा – नागपूर बस क्रमांक ३६५९ चे वाहक निषाद शेख यांनी ढोके यांच्या मोबाईल चा शोध लावत तो चंद्रपूर येथिल चंदू ढोके यांच्या मित्राला सुपूर्द केला.
    मोबाईल मिळाल्या मुळे चंदू ढोके यांनी वाहक निषाद शेख, राजुरा आगार चे नरेंद्र लवणे यांचे आभार मानले आहे.

  • सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकाच्या समस्या सोडविण्यास प्रशासनाने दिरंगाई करु नये

    सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकाच्या समस्या सोडविण्यास प्रशासनाने दिरंगाई करु नये

    News34 chandrapur

    चिमूर :- गुणवंत चटपकार

    जिल्हा सेवानिवृत्त प्राथ शिक्षक संघाचे वतीने चिमूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रुपेश कांबळे यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली, व समस्याचे निवेदन देण्यात आले.

     

    गटविमा शिल्लक प्रस्ताव, उपदान, अंशराशिकरण, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे वैद्यकिय रजेची देयके,30 जून ला सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांनी 1 जुलै ची काल्पनिक वेतन वाढ लावुन रिवाईज पेंशन केस तयार करून लाभ देणे,80 वर्ष पूर्ण झालेला शिक्षकांना वेतन वाढ देण्याबाबत, कुटुंब निवृत्ती धारकाचे वेतन बाबत, माहे जानेवारी डिए 3% फरकाची रक्कम सेवानिवृत्त शिक्षकांना देणेबाबत,तसेच सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे सातवे वेतन आयोगाचे हप्ते, या बाबत चर्चा करण्यात आली पहिला हप्ता 4 शिक्षक, दुसरा हप्ता 56 शिक्षकांचा, 3 हप्ता 104 शिक्षकांचा एकूण रुपये 8898912/देने बाकी असल्याने याकरीता जि.प.कडे मागणी करण्यात आली असून पैसे प्राप्त होताच सदर हप्ते सेवाज्येष्ठतेनुसार देण्यात येईल असे मान्य केले, तसेच सर्वांचे वेतन वेळेवर करण्यात यावे याबाबत सुध्दा चर्चा करण्यात आली, सर्व विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात, सदर समस्या लवकरात लवकर निकाली काढण्याचे मान्य केले.

     

    यावेळी संघटनेचे श्याम लेडे, दिपक पंधरे, हेमराज कामडी, अनिल काळे, नगाजी साळवे, भानुदास राऊत,कोटीराम ठाकरे, अशोक तलवेकर,अरुण चौधरी, वसंता कामडी, विठल डांगे, ईश्वर मुळे, ईश्वर धरत, गजानन चावरे, मधुकर बागुलकर, निलकंठ काटेखाये, मनोहर कामडी, श्रीनिवास बनसोड, इत्यादी बांधव उपस्थित होते,

  • हिंदी ब्राह्मण समाज ने अधिवक्ता रवींद्र भागवत को ‘ब्राह्मण समाज भूषण’ पुरस्कार से किया सम्मानित

    हिंदी ब्राह्मण समाज ने अधिवक्ता रवींद्र भागवत को ‘ब्राह्मण समाज भूषण’ पुरस्कार से किया सम्मानित

    News34 chandrapur

    चंद्रपूर /- हिंदी ब्राह्मण समाज ने अधिवक्ता रवींद्र भागवत को ब्राह्मण समाज भूषण से पुरस्कृत किया. अपने क्षेत्र में उत्कृष्ट अधिवक्ता तथा समाज में सराहनीय कार्य करते हुए सामाजिक कार्य की सार्वजनिक छवि को महत्वपूर्ण रूप से उन्नत करने के लिए अधिवक्ता रवींद्र भागवत को हिन्दी ब्राह्मण समाज बहुद्देशिय संस्था चंद्रपुर द्वारा ‘ब्राह्मण समाज भूषण’ पुरस्कार प्रदान कर सन्मानित किया गया.

     

    अधिवक्ता रवींद्र भागवत ने अपने वक्तव्य में “संगठन को मजबूत करने के लिए हर संभव सहकार्य करने का मानस व्यक्त किया तथा संगठन को भविष्य के लिए शुभकामनाएँ दी”. संगठन द्वारा महानगर के विभीन्न क्षेत्र में चलाए जा रहे सुंदरकांड पाठ के सांस्कृतिक कार्यक्रम की प्रशंसा की। उन्होने संगठन द्वारा समस्त प्रतिभावान विद्यार्थीयों का गौरव कर प्रोत्साहन देने के कार्य की सराहना की।

     

    इस अवसर पर हिन्दी ब्राह्मण समाज संस्थापक अध्यक्ष विनोद तिवारी ने कहा कि, “ब्राह्मण ने समस्त मानव समाज को अपनी बौद्धिक प्रखरता से अलौकित कर दिशा देने का कार्य किया है।

     

    इस कार्यक्रम को सफल बनाने में पंडित मथुरा प्रसाद पांडेय, डॉक्टर शैलेंद्र शुक्ला, धीरेंद्र मिश्रा, सुभाष त्रिपाठी, कृपा शंकर उपाध्याय, सुरेंद्र तिवारी, आलोक त्रिपाठी, जयप्रकाश दुबे, रजनीश त्रिपाठी, विजयकुमार शुक्ला, दुर्गेश चौबे, रूपेश पाण्डेय, दीपक पाठक, आशिष झा, अनंत तिवारी , सुशील मिश्रा, मनीष पांडे, अमित मिश्रा, राकेश तिवारी, शशीभूषण पांडे, सुनीत मिश्रा, रोशन पाण्डेय, उमेश दुबे, सत्यप्रकाश दुबे , अशोक मिश्रा, अधिवक्ता चिन्मय भागवत का सहकार्य किया ।

  • चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यांवर केली कारवाई

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यांवर केली कारवाई

    News34 chandrapur

    चंद्रपूर – नव वर्षाच्या सुरुवातीला दुर्गापूर पोलिसांनी प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई केल्यावर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने राजुरा येथे एका मांजा विक्रेत्यांवर कारवाई करीत तब्बल 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

     

     

    जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना दिले होते.

     

    निर्देश मिळाल्यावर पोलीस निरीक्षक कोंडावार यांनी पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे यांना प्रतिबंधित मांजा विक्रेत्यांबाबत माहिती काढत कारवाई करावी असे आदेश दिले.

     

    अतुल कावळे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले, 7 जानेवारीला राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेले गांधी भवन येथे गायत्री किराणा स्टोर वर धाड मारली, यावेळी दुकानदार 53 राजेश येरावार ताब्यात घेत दुकानाची तपासणी करण्यात आली, यावेळी मोनो काईट कंपनीची नायलॉन मांजा चक्री 26 नग किंमत 20 हजार 800, टूनटून कंपनीचा नायलॉन मांजा चक्री 18 नग किंमत 12 हजार 600 रुपये, गो इंडिया गो कंपनीचा नायलॉन मांजा चक्री 24 नग किंमत 16 हजार 800 रुपये असा एकूण 50 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

     

    आरोपी येरावार यांच्यावर कलम 5, 15 पर्यावरण संरक्षण कायदा 1986, सह कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.

     

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे, अनुप डांगे, जमिर पठाण, मिलिंद चव्हाण व नितेश महात्मे यांनी केली.

  • कांग्रेसने केली लोकसभा समनव्यक पदांची यादी जाहीर

    कांग्रेसने केली लोकसभा समनव्यक पदांची यादी जाहीर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – लोकसभा निवडणूक अवघ्या 2 ते 3 महिन्यात लागू शकते, त्यामुळे राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

     

    राज्यातील एकमेव कांग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या अवकाळी निधनाने आता कोण? याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले मात्र शेवटच्या क्षणी आमदार प्रतिभा धानोरकर या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उभे राहू शकतात.

     

    कांग्रेस महासचिव केसी वेणूगोपाल यांनी राज्यातील लोकसभा समनव्यक यांची नियुक्ती जाहिर केली असून चंद्रपूर लोकसभा समनव्यक पदी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची वर्णी लागली आहे.

     

    कांग्रेस पक्षाने अनेक वर्षांनी चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला होता, मात्र आता कांग्रेस पुन्हा निवडून येणार का? चंद्रपूर जिल्ह्याला पहिली महिला खासदार म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर मिळणार काय? हे चित्र लोकसभा निवडणूक नंतर स्पष्ट होणार.

    सध्या चंद्रपूर जिल्ह्यात कांग्रेस पक्षात गटबाजीचा सूर आहे, त्या विविध सुराला सतीश चतुर्वेदी कसे जुळवून घेतात याकडे कांग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.