Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी बनवली 7 हजार किलोपेक्षा अधिक खिचडी

    आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी बनवली 7 हजार किलोपेक्षा अधिक खिचडी

    News34 chandrapur

    चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध शेफ श्री. विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात आज सात हजार किलोपेक्षा जास्त तृणधान्यांची खिचडी बनवून विश्वविक्रम नोंदविला. महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंड येथे सुरू असलेल्या चांदा ॲग्रो 2024 या भव्य कृषी प्रदर्शनात हा विक्रम नोंदविण्यात आला आहे.

     

    विश्वगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार साजरे करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त ना. श्री. मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे विष्णू मनोहर यांनी चंद्रपूर येथे मिलेट खिचडी बनवून संपूर्ण जगाला मिलेटचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. 4 जानेवारीला रात्री एक महाकाय कढई नागपूरहून चंद्रपूर येथे आणण्यात आली, जी क्रेन द्वारे मैदानात उतरविण्यात आली. याबाबत चंद्रपुरकरांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळाली. पहाटे 6 वाजता विक्रमी खिचडी बनविण्यास सुरुवात झाली.

     

    6 हजार 750 किलो खिचडी बनविण्याचा संकल्प विष्णू मनोहर यांनी केला होता. विविध विभागातील कर्मचारी, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यावेळी स्वयंसेवक म्हणून उत्स्फूर्तपणे मदत करीत होते. ही खिचडी बनवण्याची पद्धत रेसिपी आणि मोठमोठ्या कढयांमधून टाकण्यात येणारे पदार्थ याबाबत सर्वच उपस्थितांमध्ये उत्साह दिसून आला.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 ‘मि‍लेट वर्ष’ म्‍हणून घोषित केल्‍यानंतर विष्‍णू मनोहर यांनी म‍िलेटच्‍या प्रचार व प्रसारासाठी वर्षभर वेगवेगळ्या शहरात 12 म‍िलेट्सचे पदार्थ तयार करण्‍याचा निर्धार केला होता. त्‍यानुसार आतापर्यंत नागपूर, औरंगाबाद व नाशिक येथे त्‍यांनी म‍िलेटचे विविध पदार्थ तयार केले आहेत.

     

    श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आयोजित चांदा ॲग्रो 2024 मध्ये शेफ विष्‍णू मनोहर यांनी शुक्रवारी बाजरी हे म‍िलेट धान्‍य व सर्व भाज्‍यांचा वापर करून पूर्णान्‍न असलेली खिचडी तयार केली. त्‍यासाठी ते १० फूट व्‍यासाची, ५ फूट कढई, सुमारे ५०० किलो लाकूड वापरण्यात आले.

     

    विष्‍णू मनोहर यांनी याआधी दिल्‍ली येथे 5 हजार किलोची ‘समरसता खिचडी’ तयार केली आहे. नागपुरातील महाल भागात खिचडीला राष्‍ट्रीय अन्‍न घोषित करावे या मागणीसाठी 5 हजार किलोची खिचडी तयार केली होती. वनवासी कल्‍याण आश्रमाच्‍या डिलिस्‍टींग कार्यक्रमासाठी त्‍यांनी 10 हजार किलो मसालेभात व नागपुरातील खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात विष्‍णू मनोहर यांनी श्री गजानन महाराजांना ६ हजार ५०० किलो खिचडीचा नैवेद्य अर्पण केला होता.

     

    चांदा ॲग्रो 2024 मध्ये करण्यात आलेला विक्रम महाराष्ट्रातील बळीराजाला समर्पित करण्याचा निर्धार यावेळी विष्णू मनोहर यांनी व्यक्त केला. पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ही संधी दिल्याबद्दल मनोहर यांनी त्यांचे आभारही मानले. राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव श्री अनुप कुमार यांच्या हस्ते विष्णू मनोहर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक जॉन्सन, जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माच्या प्रकल्प अधिकारी प्रीती हिरळकर, भाजपाचे महानगर अध्यक्ष श्री. राहुल पावडे, श्री. प्रकाश धारणे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्तश्री विपिन पालीवाल यांनी देखील ही खिचडी बनवताना विष्णू मनोहर यांच्या सोबत संवाद साधून उत्सुकतेने सर्व माहिती घेतली.

     

    खिचडीचे शिस्तबद्ध वाटप

    7 हजा किलोपेक्षा जास्त झालेली या खिचडीचे वाटप कसे करावे हा प्रश्न सर्वांनाच उत्सुकतेपटी पडलेला होता. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक जॉन्सन आणि चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. विपिन पालीवाल यांनी संपूर्ण यंत्रणा शिस्तबद्ध रीतीने कामाला लावली व खिचडी शाळांमध्ये तसेच शहरातील वस्त्यांमध्ये वाटण्याची व्यवस्था केली. कृषी प्रदर्शनाच्या स्थळी सुद्धा विविध स्टॉल लावून आलेल्या प्रत्येकाला खिचडी देण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी स्वयंसेवक म्हणून अथक परिश्रम घेतले. शहरातील 35 हजार लोकांपर्यंत ही खिचडी पोहोचेल अशी व्यवस्था यावेळी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली होती. पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे ना. सुधीर मुनगंटीवार हे नागपूरला असल्याने त्यांनी फोनवरून श्री. विष्णू मनोहर यांना शुभेच्छा दिल्या आणि चंद्रपुरात हा विश्वविक्रम केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

  • केंद्र सरकारने सर्वासाठी शेतीचे धोरण घोषित करावे

    केंद्र सरकारने सर्वासाठी शेतीचे धोरण घोषित करावे

    News34 chandrapur

    • यवतमाळ – सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित करा व शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्यांना नियमाकुल करा अशी मागणी घेऊन शामा दादा कोलाम ब्रिगेड च्या वतीने तहसीलदार राळेगाव यांच्यामार्फत मा. द्रोपदी मुर्म (राष्ट्रपती)राष्ट्रपती भवन – दिल्ली सरकारकडे निवेदन सादर करण्यात आले, भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी गरीब हटाव नारा देऊन भूमिहीनांना जमीन उपलब्ध करून देण्यासाठी सिलिंग चा कायदा अमलात आणला, नंतर पाडीत जमिनी पेरा व देशाचे उत्पन्न वाढवा अश्या विविध उपक्रमाची सुरवात केली तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी केलेल्या घोषणामुळे देशातील महसूल व वन विभागाच्या पडीक जमिनी नियमानुकूल करण्यासाठी तत्कालीन संयुक्त परोगामी आघाडी सरकारचे तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. सुशीलकुमार शिंदे यांच्या तत्कालीन मंत्रिमंडळाने पुढाकार घेऊन ” महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून दि. २८ नोव्हेंबर १९९१ रोजी” गायरान जमिनीवरील शेती प्रयोजनासाठी असलेली अतिक्रमणे नियमानुकुल करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केला त्याची अंबलबजावणी असमाधाकारक झाली, त्यामुळे बहुतांश लोकांना त्याचा फायदा झालेला नाही, मात्र केंद्रसरकारणे अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी वनहक्काची मान्यता अधिनियम २००६ जाहीर केला परंतु वनहक्काच्या कायद्यामध्ये विशिष्ट स्वरूपाच्या अटी व शर्ती असल्यामुळे वनहक्क कायद्याचा फायदा वनभूमीधारकांना झालेला नाही म्हणून प्रत्यक्ष वनभूमी वर कब्जा आहे परंतु ७/१२ अभिलेखात नाव नाही.

     

    त्यामुळे शासनाचा विविध योजना पासून भूमि पासुन वंचित राहावे लागत आहे. म्हणून यापूर्वी केंद्रसरकार कडून सर्वासाठी घरे २०२२ हे धोरण घोषित केल्यामुळे तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकाचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने पुढाकार घेऊन सर्वांसाठी घरे २०२२ या धोरणाची अंबलबजावणी करणे करिता ग्रामीण भागातील निवासी अतिक्रमण नियमानुकुल करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करून बेघर लोकांना गावठाण व ईक्लास जमिनीवर निवासा करिता केलेले अतिक्रमण नियमानुकुल होऊन प्रधानमंत्री आवास योजना घरकुलाच्या विविध योजनेतून हक्काच्या घराचा लाभ मिळाला त्याच धरतीवर केंद्रसरकारने सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित करून राज्यातील शेतीचे अतिक्रमण नियमानुकुल करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याचे आदेश देण्यात यावे अन्यथा दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी संसदभवन दिल्ली येथे येथे संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार “महालक्षवेधी मोर्चा” काढण्यात येईल असे निवेदनातून माहिती दिली आहे.

     

    अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ नियम २००८l सुधारित नियम २०१२ मधील तरतुदीनुसार वनजमिनीवर वहीती दि. १३ डिसेंबर २००५ पूर्वी पासून असल्याचा आणि ३१ डिसेंबर २००७ रोजी ताबा सिध्द करणारा पुरावा वन हक्क मिळणे करिता आवश्यक आहे. परंतु वनजमिनीवर सन २००५ पूर्वी पासूनचा कब्जा आहे. परंतु पुरावा नाही त्यामुळे बहुतांश वनजमीन धारकांचे दावे अपात्र होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे केंद्र सरकारकडून वनहक्काच्या कायद्यात सुधारणा करून सुधारित अधिनियम घोषित करावा. अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ चे कलम २ (ण) नुसार दिनांक १३ डिसेंबर २००५ पूर्वी किमान ३ पिढ्यापासून मुख्यतत्वे करून वनात राहनारा आणि उपजीविकेच्या खऱ्याखुऱ्या गरजांसाठी वनावर किंवा वनजमिनीवर अवलंबून असल्याबाबत पुरावा आवश्यक आहे परंतु पुराव्या अभावी वन जमिन धारकांचे दावे अपात्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून सुधारित अधिनियम घोषित करण्यात यावा.

     

    मा. सर्वोच्च न्यायालयाने सन २०११ साली गायरान जमिनी इतर कारणा करिता वापरावर निबंध टाकले आहेत त्याच धरतीवर महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला की, गावातल्या राखीव जमिनी फक्त केंद्र व राज्यशासनाच्या प्रकल्पासाठी उपलब्ध करून द्याव्यात इतर कोणत्याही व्यक्ती, संस्था यांच्या प्रकल्पाकरिता अश्या जमिनी वापरात आनु नये असे स्पष्ट आदेश असल्यामुळे बिगर सातबारा शेतकरी जमिनीच्या हक्कापासून वंचित राहावे लागत असल्यामुळे. केंद्रसरकारने सर्वांसाठी घरे २०२२ धोरण घोषित केले त्याच धरतीवर केंद्र सरकारने सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित करावे अन्यथा दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी संसदभवन दिल्ली येथे महालक्षवेधी मोर्चा काढण्यात येईल याची नोंद घ्यावी.

     

    या सर्व मागण्यांचे निवेदन राजेंद्र नाईकवाडे (संस्थापक अध्यक्ष) शामादादा कोलम ब्रिगेड तथा जिल्हाध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना डॉ. रेखा कैलास खंदारे(राष्ट्रीय कार्याध्यक्ष)मानवी हक्क सुरक्षा दल भारती पवार राळेगाव तालुकाध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना इंदिराबाई बोंदरे(महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष )शामादादा कोलम ब्रिगेड तथा महिला जिल्हाध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना, उरकुडा गेडाम (जेष्ठनेते) बिगर सातबारा शेतकरी संघटना नारायण पवार(कळंब तालुकाध्यक्ष) बिगर सातबारा शेतकरी संघटना अर्जुन काळे राळेगाव तालुका सचिव बिगर सातबारा शेतकरी संघटना मीना पवार महिला अध्यक्ष, बिगर सातबारा शेतकरी संघटना, भाई जगदीशकुमार इंगळे(केंद्रीय कार्यध्यक्ष) दलित पँथर (संस्थापका अध्यक्ष) बिगर सातबारा शेतकरी संघटना मानवी हक्क सुरक्षा दल आदी निवेदन देते वेळी उपस्थित होते.

     

  • ज्यांचे मोठे घर त्यानाचं मिळाले घरकुल

    ज्यांचे मोठे घर त्यानाचं मिळाले घरकुल

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले 

    मुल – केंद्र सरकार गरीब व गरजु लोकांना नमो घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करीत असताना माञ गावातील सरपंच यांनी चक्क नातेवाईक व धनधांडग्याना लाभ देण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप सिंतळा येथील जनतेनी केला आहे.

     

    पंचायत समिती मूल अंतर्गत येणाऱ्या सिंतळा येथील गरीब व गरजू लोकांना नमो घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी अनेक पात्र असलेल्यानी प्रयत्न केला मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सरपंच आपली मनमानी कारभार करून पात्र असलेल्या अनेकांना डावलून आपल्या नातेवाईक व आर्थिक दृष्टया सक्षम असेलल्या लोकांना घरकुल योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गावात होणारी ग्रामसभा नाममात्र घेवुन कुठल्याही आपल्या मर्जीतील लाभ दिला जात आहे.

     

    त्यामुळे अनेक जण घरकुल योजनेपासुन वंचित होताना दिसत आहेत.तरी देखील तहकुब झालेल्या ग्रामसभेत सरपंच, सचिव व सदस्यांनी नमो घरकुल योजनेच्या यादीत हेराफेरी करून स्वतःच्या मर्जीतील लोकांचे नाव समाविष्ट केल्याचा आरोप ग्रामस्थांनानी केला आहे. गावात अनेक जणांचे पडके घरे असताना वेळोवेळी डावलण्याचा प्रयत्न सुरु आहे.

     

    याबाबत चौकशी करून खऱ्या लाभार्थीना घरकुल योजनेचा लाभ मिळवुन देण्याचा प्रयत्न करावा अशी आर्त हाक पंचायत समिती मूल चे गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन देण्यात आली असून या प्रकरणाची त्वरित चौकशी करावी अशी मागणी कांग्रेस नेते सी.डी.सी.सी बँकेचे अध्यक्ष संतोष शिंह रावत यांचे मार्गदर्शनात तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष व बाजार समिती संचालक घनश्याम येनुरकर, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, माजी सरपंच जनार्दन भूरसे, व गावातील अन्याय ग्रस्त नागरिक उपस्थित होते.

  • क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आकर्षक सन्मान रॅलीने मुल नागरिकांचे लक्ष वेधले

    क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आकर्षक सन्मान रॅलीने मुल नागरिकांचे लक्ष वेधले

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – भारतिय स्त्री शिक्षणाची जननी पहिली शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी सकल माळी समाजातर्फे अनेक संघटनांच्या नेतृत्वात मोठ्या थाटामाटात जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

     

    दुपारी १ वाजता वॉर्ड न.२ मधून लेझिमच्या नृत्यतालावर निघालेली सन्मान रॅली मुल नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. रॅलीत महिला पुरुष युवक युवती अंदाजे २५०० च्या संख्येने सहभागी झाले होते. ३ वाजता तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर अनेक समाज बांधवांच्या उपस्थितीत तहसीलदार मुल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सायंकाळी ४ वाजता मोठा माळी मोहल्ला येथील भव्य पटांगणावर प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले.

     

    कार्यक्रमाचे उद्घाटक माजी जी.प. अध्यक्षा संध्याताई गुरनुले व अध्यक्षस्थानी प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.अभिलाषा गावतुरे, मार्गदर्शक माजी जी.प.सदस्य प्रा.रामभाऊ महाडोरे, विशेष अतिथी बाजार समिती संचालक व उद्योजक हसन वाढई, प्रमुख अतिथी समता परिषदेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, माजी प्राचार्य बंडूभाऊ गुरनुले, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, एड.राजश्री ठाकरे, माजी नगर सेविका शंताताई मांदाडे, नेफडो विभागीय अध्यक्ष रत्नाताई चौधरी, अभियंता रुपेश निकोडे, सामाजिक युवा कार्यकर्ते राकेश मोहुरले, आदी मान्यवर उपस्थित होते.

     

    आपल्या कुटुंबाची व समाजाची आर्थिक उन्नती करायची असेल तर आपल्यातले असलेले दुर्गुण व्यसन बंद करुन शेतीला जोड म्हणून छोटे मोठे व्यवसाय करावे असे मौलिक विचार कार्यक्रमाचे उद्घाटक संध्याताई गुरनुले यांनी केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी ओबीसी आरक्षण, जात निहाय जनगणना करावी, शासन शिक्षणाचे दार बंद करीत असून पुढे कोणी शिक्षणच घेऊ नये, असा चुकीचा विचार शासन करीत असल्याचे सांगितले.

     

    तर मार्गदर्शक प्रा. रामभाऊ महाडोरे यांनी समाज बांधवांनी एकच कार्यक्रम घेऊन समाज एकतेचा संदेश जनतेला दिल्याबद्दल संयोजकांचे कौतुक केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी प्रा.विजय लोनबले,गुरु गुरनुले, प्रसिद्ध सर्जन संजय घाटे, एड.राजश्री ठाकरे, रत्ना चौधरी, यांनीही सावित्रीच्या जीवनावर प्रकाश टाकला. यानिमित्त माजी नगराध्यक्ष उषाताई शेंडे, उत्कृष्ठ लेझिमचे संचलन कर्ते जितेंद्र लेनगुरे (शिक्षक) व सहकारी चित्तरंजन वाढई यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुखदेव मांदाडे यांनी केले. संचालन प्रकाश शेंडे यांनी केले.

     

    संयोजन बाळा निकोडे, सौरभ वाढई, रिंकेश मांदाडे, राजू शेंडे,बालाजी लेनगुरे,मुकेश लोनबले, चित्तरंजन वाढई, राकेश ठाकरे, विवेक मांदाडे, नामदेव वाढई,विकास निकोडे,अनिल चौधरी,विजय गुरनुले,विनोद मोहरले, अजय गुरनुले,यांनी केले.तर आर्थिक सहकार्यासाठी बंडू गुरनुले,चंदू चटारे,जितेंद्र लेंनगूरे,राकेश ठाकरे यांनी परिश्रम घेतले.समस्त समाज बांधवांना भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली.

  • केंद्र सरकारने नुकताच संसदेत “हिट अँड रन कायदा त्वरित रद्द करा

    केंद्र सरकारने नुकताच संसदेत “हिट अँड रन कायदा त्वरित रद्द करा

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले
    मुल – अपघात स्थळावरून गाडी चालक निघून गेल्यास त्याला सरसकट दहा वर्षे कारावास आणि सात लाख रुपयाचे दंडाची शिक्षा अशी तरतूद करण्यात करण्यात आली आहे. अपघात घडल्यास जखमीना
    मृत्यूच्या दारी सोडून जाणे हे अमानवीय कृत्य आहे.
    कोणताही वाहन चालक जाणून बुजून अपघात करीत नाही.

     

    कळत नकळत सुद्धा अपघात होतात ही वस्तूस्थिती आहे. म्हणून अपघात ग्रस्ताला घटनास्थळी जाऊ इच्छित नाही मात्र बरेच वेळा चालकाची चुक नसतांना देखील संतप्त नागरिक आणि जमवाकडून वाहन चालकाला मारझोड करुन त्याच्या गाडीची तोडफोड करुन एखाद्या वेळी जमावाकडुन प्राणघातक हल्ले केल्या जातात. परीणामी निष्पाप वाहन चालकाला जिवे मारण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यामुळे स्वतःच्या संरक्षना करीता काही वाहन चालक घटनास्थळावरून पळ काढतात. त्यांच्या या कृतीमुळे त्यांना अपघातास जबाबदार धरून त्यांना “हिट अँड रन” कायद्याखाली कठोर शिक्षेचा केन्द्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. असा कायदा करणे म्हणजे अमानवीय आहे, ज्यामुळे ह्या कायदाने वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाच्या मनात अत्यंत भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

     

    आणि हा कायदा वाहन चालकावर अन्याय करणारा असल्याने असा कायदा रद्द करावा अशी मागणी काळी पिवळी ट्रक्स संघटना व चालक मालक संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.

    (गाडी चालक मालक संघटनेला तालुका काँग्रेसचा पाठिंबा)

    मागील तीन दिवसापासून सुरु असलेल्या काळी पिवळी व चालक मालक संघटनेच्या समस्त चालक रस्त्यावर उतरले असून आंदोलन करून याबाबत केंद्र सरकारचा जाहीर निषेध केल्या जात आहे.

     

    ही मागणी रास्त असून चालकांवर अन्याय करणारी आहे. म्हणून मुल तालुका काँग्रेसने कांग्रेस नेते जिल्हा सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे नेतृत्वात पाठींबा दर्शविला आहे. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, माजी तालुका अध्यक्ष तथा संचालक घनश्याम येनुरकर, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, संचालक संदीप कारंमवार ,संदीप मोहबे उपस्थित होते.

  • संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी तुमची आमची – विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार

    संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी तुमची आमची – विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी तुम्हा आम्हाला गुलाम बनवून आपल्यावर राज्य केल होत. मात्र आता देशात आता एका विशिष्ट विचारधारेचे गुलाम बनविण्याचे काम सुरू असुन हे प्रचंड विघातक आहे. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्या सर्वांना संविधानाने बहाल केला आहे. एकंदरीत आपल्या सर्वांचे रक्षण करणाऱ्या संविधानाचा कवच तोडण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे. पण आपल्याला तो प्रयत्न हाणुन पाडायचा आहे. कारण संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आमची असल्याचे मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडले.

     

    चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित श्रीमंत देवाजीबापु खोब्रागडे यांच्या 125व्या जयंती निमित्त आयोजित प्रबोधन सभा कार्यक्रमात ते बोलत होते.
    यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रिपब्लिकन नेते अशोक निमगडे हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून नागपूर येथील आंबेडकरी विचारवंत रंजित मेश्राम व भिमराव वैद्य हे हे होते.
    प्रमुख अतिथी म्हणून प्रविण खोब्रागडे, अॅड. राम मेश्राम, रोहीदास राऊत, मारोतराव खोब्रागडे, नंदु खणके, दौपदा डोर्लीकर यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
    पुढे बोलतांना विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, देवाजीबापु खोब्रागडे हे चंद्रपूरातील एक धनाढ्य व्यक्तिमत्त्व होते. पण त्यासोबत त्यांच्या सामाजिक बांधिलकीची श्रीमंती मोठी होती. म्हणूनच त्यांना चंद्रपुरचे पहीले आमदार, बल्लारपूरचे पहीले नगराध्यक्ष होण्याचा बहुमान प्राप्त झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याच्या प्रारंभापासून त्यांच्या महापरिनिर्वाण पर्यंत ते निष्ठेने सोबत राहिले.
    त्यांनी आपला मुलगा राजाभाऊ खोब्रागडे यांना बॅरिस्टर बनवून बाबासाहेबांच्या चळवळीला पुढे नेण्यासाठी आदेशित केले. एकंदरीत खोब्रागडे पितापुत्रांनी बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपुरात 16 आॅक्टोंबर 1956 रोजी धम्मदीक्षा कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवाजीबापु खोब्रागडे हे होते. त्यावरून त्यांची महानता अधोरेखित होते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
  • सावित्रीबाईं यांचे कार्य प्रेरणादायी – संतोषसिंह रावत

    सावित्रीबाईं यांचे कार्य प्रेरणादायी – संतोषसिंह रावत

    News34 chandrapur

    मुल – भारतिय स्त्री शिक्षणाची जननी पहिली शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०-०० वाजता तालुका काॅंग्रेस मूल तर्फे काॅंग्रेसचे जेष्ठ नेते मान .संतोषसिंह रावत (अध्यक्ष,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह.बॅंक) व माजी जी.प.अध्यक्ष चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

     

    याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात उपस्थित पदाधिकारी यांनीही पुष्प वाहून अभिवादन केले. व सावित्री बाईंचे कार्य जनतेला प्रेरणा देणारे आहेत. असे विचार संतोषशिह रावत यांनी व्यक्त केले.

     

    याप्रसंगी सावित्री बाईंच्या विचारावर ज्येष्ठ कांग्रेस पदाधिकारी बंडू भाऊ गुरनुले, ओबीसी कांग्रेस सेलचे राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी, माजी नगर सेविका लिनाताई फुलझेले, महिला सचिव शाम्मलता बेलसरे, यांनीही आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला संचालन तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी केले तर आभार कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किशोर घडसे यांनी मानले.

     

    कार्यक्रमाला माजी तालुका अध्यक्ष व बाजार समिती संचालक घनश्याम येनुरकर, सभापती राकेश रत्नावर, संचालक संदीप वाढई, हसन वाढई, महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा रुपाली संतोषवार,शहर अध्यक्ष नलिनी आडपवार, कोषाध्यक्ष राधिका बुक्कावार, सहसचिव समता बनसोड, शहर उपाध्यक्ष संदीप मोहबे, ओबिसीचे राजेंद्र वाढई आदी कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

  • चंद्रपूर जिल्ह्यात मनसेची घौडदौड सुरू

    चंद्रपूर जिल्ह्यात मनसेची घौडदौड सुरू

    News34 chandrapur

    ब्रम्हपुरी – चंद्रपूर येथील सावली तालुक्यातील गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावरील कापसी या गावातील भाजप व काँग्रेस मधील शेकडो तरुण, महिला व पुरुषांनी राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या नेतृत्वात व गडचिरोली जिल्हाध्यक्ष राजेश साळवे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेमधे प्रवेश घेतला.

     

    यावेळी शाखाध्यक्ष पदी उमाजी बुरांडे यांची नियुक्ती करण्यात आली सदर शाखेत बापुरावजी गोलेवार, अंकित चलाख, मुकेश बांदेकर, स्वप्नील बांदेकर, सूरज गेडाम, अनिल मेश्राम, श्रावनजी लटारे यांची नियुक्ती करण्यात आली असून यांच्यासह शेकडो महिला, पुरुषांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

     

    सध्या सुरू असलेल्या राजकारणाला कंटाळून मनसे मधे प्रवेश केल्याच्या भावना यावेळी उपस्थितांनी दर्शविल्या.
    शाखा स्थापनेवेळी बोलत असताना पक्षवाढीसाठी काम करीत, स्थानिकांच्या प्रश्नांना न्यान मिळवून देत, बलाढ्य राजकारण्यांच्या राजकारण समोर असतानाही पक्ष प्रवेश केल्याचे कौतुक करीत, भविष्यात सर्वसामान्यांसाठी लढण्याचे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केले.
    यावेळी मनसे तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, करण नायर, मयूर मदणकर उपस्थित होते

  • आमरण उपोषण करणाऱ्या महिलांची देशमुख यांनी घेतली भेट

    आमरण उपोषण करणाऱ्या महिलांची देशमुख यांनी घेतली भेट

    News34 chandrapur

    चंद्रपूर – भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एम्टा कोळसा खाणीच्या प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी मागील वीस दिवसांपासून बरांज-मोकासा गावातील सावित्रीच्या प्रकल्पग्रस्त लेकींचे आंदोलन सुरू आहे. कर्नाटका पाॅवर कंपनीच्या कोळसा खाणीच्या मार्गावर मंडप टाकून महिलांनी 14 डिसेंबर 2023 पासून साखळी उपोषण सुरू केले.27 डिसेंबर पासून बरांज-मोकासा येथील पल्लवी कोरडे या महिलेने आमरण उपोषण सुरू केले. आज या उपोषणाचा आठवा दिवस आहे.

    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 3 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेदरम्यान जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांचेसह घनश्याम येरगुडे,राहुल दडमल, अमोल घोडमारे व प्रविण बारसागडे यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्या तसेच आंदोलनात सहभागी सावित्रीच्या लेकींशी चर्चा केली.यावेळी उपस्थित असलेल्या शेकडो महिला आंदोलनकर्त्यांना देशमुख यांनी संबोधित केले.

     

    कोणत्याही प्रकल्पासाठी शेतजमीन किंवा घर देणारा शेतकरी-घर मालक हा त्या प्रकल्पाचा भागधारक म्हणून त्याला योग्य सन्मान व योग्य मोबदला मिळणे गरजेचे आहे. मात्र प्रकल्पांसाठी जमिनी अधिग्रहित करणाऱ्या कंपन्या किंवा शासन प्रकल्पग्रस्तांना योग्य सन्मान व योग्य मोबदला देत नाही.अशा प्रकल्पग्रस्तांसाठी संघर्ष करण्याची जनविकास सेनेची भूमिका असून बरांज-मोकासा येथील आंदोलनकर्त्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देशमुख यांनी दिले.

     

    अत्यंत धोकादायक :
    कोळसा खाणीच्या काठावरच गाव आणि जिल्हा परिषद शाळा

    पप्पू देशमुख यांनी काही आंदोलनकर्त्यांसह बरांज-मोकासा गाव,कर्नाटक पावर कंपनीची कोळसा खाण तसेच जिल्हा परिषद शाळा या संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या. गावाच्या पश्चिमेला कर्नाटक एमटा च्या जुन्या कोळसा खाणीचा मोठा खड्डा आहे. याठिकाणी कोळशाचे उत्खनन पूर्ण झाले असून खड्ड्यात पाणी साचले आहे. खड्ड्याला लागून केवळ 20 मीटरच्या अंतरावर जिल्हा परिषद ची प्राथमिक शाळा आहे.

     

    खड्ड्याच्या बाजूला शाळेची संरक्षण भिंत असून या भिंतीला असलेले प्रवेशद्वार पूर्णवेळ खुले असते. याच पटांगणात ग्रामपंचायतचे कार्यालय आहे.शाळेच्या बाजूला लागून असलेला खड्डा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय धोकादायक असतानाही त्याची दखल आजपर्यंत घेण्यात आलेली नाही. बरांज-मोकासा गाव, जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत कार्यालय सर्वच अत्यंत धोकादायक स्थितीत असुन प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली.

  • चंद्रपुर कृषी महोत्सवात आमदार जोरगेवार प्रशासनावर संतापले

    चंद्रपुर कृषी महोत्सवात आमदार जोरगेवार प्रशासनावर संतापले

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 3 जानेवारीला चंद्रपुरातील चांदा क्लब ग्राउंड येथे कृषी विभाग, जिल्हा प्रशासन व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चांदा ऍग्रो 2024 कृषी महोत्सवाचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

    आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन उपस्थित होते.

     

    जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनपर भाषनानंतर आमदार जोरगेवार यांनी मार्गदर्शन केले मात्र प्रशासनावर यावेळी ते प्रचंड नाराज होत, मला दुसऱ्यांदा कार्यक्रमाला बोलवायचे नाही असे म्हणत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली, मला वेळेवर भाषणाला बोलविता हे चुकीचे आहे, बाबासाहेबांनी सर्वाना समान अधिकार दिला आहे मात्र आपल्या अश्या वागणुकीमुळे माझ्या मतदार संघातील नागरिकांचा हा अपमान आहे.

     

    राज्यात सर्वात जास्त बहुमताने निवडून आलेला मी आमदार आहो, मी 5 लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतो, जर माझ्या मतदारसंघात कार्यक्रम आयोजित करता तर मला वेळेवर भाषणाला का सांगता, असे असेल तर मला पुन्हा कार्यक्रमाला बोलावू नका.

     

    यापूर्वी आमदार जोरगेवार यांचा झाला अपमान..

    अनुसूचित जाती राखीव प्रवर्गातील विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व मागील 4 वर्षांपासून आमदार जोरगेवार करीत आहे, मात्र यापूर्वी जेव्हाही प्रशासनाने कार्यक्रम घेईल त्यावेळी सुद्धा जोरगेवार यांचा अपमान करीत शिष्टाचाराचे भंग शासकीय अधिकाऱ्यांनी केले आहे, मात्र वारंवार होणारा आमदार जोरगेवार यांचा हा अपमान राजकीय वृत्तीला तर प्रेरित नाही न असा प्रश्न नेहमी नागरिकांना पडत आहे.