Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • 14 जानेवारीला चंद्रपुरात महायुतीचा जिल्हास्तरीय मेळावा

    14 जानेवारीला चंद्रपुरात महायुतीचा जिल्हास्तरीय मेळावा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – देशात 400 प्लस तर राज्यात 45 लोकसभा जागेवर विजय मिळविण्यासाठी भाजप व घटक पक्ष सज्ज झाले असून यासाठी महायुतीने निवडणुकीची पूर्व तयारी सुरू केली आहे.

     

    आज 12 जानेवारीला स्थानिक ND हॉटेलमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महायुती समनव्यक देवराव भोंगळे यांनी 14 जानेवारीला आयोजित महायुती मेळाव्याची माहिती दिली.

     

    महायुतीचा महामेळावा 14 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी आयोजित करण्यात आला आहे.

     

    रघुनंदन हॉल येथे आयोजित महायुती मेळाव्यात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे मार्गदर्शन करणार असून यावेळी 15 घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे.

     

    अशी माहिती महायुती समनव्यक भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी दिली.
    यावेळी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, राष्ट्रवादी कांग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते उपस्थित होते.

  • ग्राम पंचायतींना घाटातुन रेतीविक्री करण्याचा अधिकार द्या – माजी नगरसेवक टहलीयानी यांची मागणी

    ग्राम पंचायतींना घाटातुन रेतीविक्री करण्याचा अधिकार द्या – माजी नगरसेवक टहलीयानी यांची मागणी

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – महाराष्ट्रात वारंवार रेती तस्करी (चोरी) मोठया प्रमणात होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते व वारंवार मिडीया मध्ये (वृत्तपत्रात) बातम्या प्रकाशीत होत असतात. हि बाब १०० टक्के खरी असून या बाबत शासनाचे दिरंगाईचे धोरण असल्यामूळे रेतीचे घाट वेळेवर लिलाव होत नाही. सध्याच्या वाढत्या बेरोजगारीमुळे कित्येक सुशीक्षीत युवकांनी आपला व्यवसाय करण्याचे हेतूने बँकेचे कर्ज घेवून ट्रॅक्टर ट्रक टिप्पर इत्यादी वाहन कर्जा वर घेतले आहेत.

     

    अश्या परीस्थतीत त्यांना वाहतूक करण्याकरीता रेती उपलब्ध न झाल्यास त्यांचे बँकेचे कर्जाचे हप्ते सुध्दा थकीत होत आहेत. दुसरी कडे लपून छपून रात्रौच्या वेळेस रेतीची चोरी होत असते त्या मध्येच अपघाताचे प्रमाण सुध्दा वाढलेले आहेत.व सबंधीत महसूल अधिका-यांशी मारझोड, झगडे तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. व महाराष्ट्र शासनाने सुध्दा चोरीच्या गाडीवर दंडात्मक रक्कम अतिशय जास्त प्रमाणात ठरवलेली आहे.

     

    ही दंडात्मक रक्कम भरायची असल्याने रक्कम जुळवा जुळवी च्या नादात काल एका ट्रॅक्टर मालक युवकाचा अपघात होऊन मृत्यू झाला ही घटना ताजी आहे. ट्रक्टरवर १० हजार, ६ चाकी ट्रकवर २५ हजार, टिपर (डम्पर) यावर ५० हजार अश्या रकमेचे दंड ठेवल्यास सोयीचे होईल अन्यथा सर्वात उत्तम उपाय घाट ज्या ग्रामपंचायतीच्या हदीत येत असेल त्यां ग्रामपंचायतीचे ट्रक्टर ५००/- रूपये ६चाकी ट्रक २००० रूपये टीपर (डॅम्पर) ५००० हजार रूपये अश्या पध्दतीने केल्यास रेतीची तस्करी (चोरी) होणार नाही व त्या त्या ग्रामपंचायतीला उत्पन्नाचा साधन निर्माण होईल.

     

    कारण ग्रामपंचायतींना उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. आज बहूतांश ग्रामपंचायतीची अवस्था सुध्दा उत्पनाच्या बाबतीत हलाखीची आहे. पिण्याचे पाण्याचे व पथदिव्याचे बिल भरू शकत नाही अश्या परीस्थतीत ग्रामीण भागात पथदिवे बंद पिण्याचे पाणी १५,१५ दिवस पर्यंत बंद असतात म्हणून आपणास नम्र विनंती केली आहे. या अत्यंत महत्वाचे बाबीकडे त्वरीत लक्ष घालून सामान्य नागरीकांना तसेच बेरोजगार युवकांना गाडयांना काम मिळेल व महसूल विभागाच्या भ्रष्टाचारावर आळा बसेल, असे सामान्य जनतेचे मत आहे.

     

    हि विनंती देखील लेखी निवेदनाद्वारे कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती व माजी नगर सेवक मोती टहलियानी यांनी महसूल मंत्री नाम.राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे केली असून निवेदनाच्या प्रती जिल्ह्याचे पालकमंत्री व वनमंत्री सांस्कृतिक कार्यमंत्री नाम.सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पाठविले आहे.

  • ब्रह्मपुरीत भीषण अपघात, विद्यार्थिनींचा मृत्यू

    ब्रह्मपुरीत भीषण अपघात, विद्यार्थिनींचा मृत्यू

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी – येथील डॉ,बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अकराव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या अंगावरून ट्रक गेल्याने ट्रक खाली दबून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक १२जानेवारी२०२४ रोजी दुपारी ११:४५ वाजेच्या दरम्यान नेवजा बाई हितकारणी कन्या विद्यालय गेट समोर ते बाजार समितीच्या गाळे बांधकाम केलेल्या कॉर्नरवर जवळ घडली.

    समीक्षा संतोष चहांदे वय (१७)वर्ष असे मृतक विद्यार्थिनीचे नाव असून ती मालडोंगरी येथील रहिवासी होती.

    समीक्षा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षण घेत होती. नेहमीप्रमाणे ती आज शाळेत जात होती.

     

    ट्रक येत असल्याचे पाहून ती बाजूला होण्याचा प्रयत्न केला असता अरुंद रस्ता व रस्त्यावर खड्डे असल्यामुळे रस्त्यावरून बाजूला होण्याच्या नादात तिची सायकल स्लिप होऊन ती ट्रकच्या मागच्या चाकाखाली आली. त्यातच हा अपघात घडला असल्याचे अंदाज वर्तविला जात आहे.प्रतीक्षाच्या अंगावरून ट्रक गेल्याने ती चिरडली गेली. व घटनास्थळी तिचा मृत्यू झाला. अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. व काही क्षणातच पोलिसांना प्राचारण करण्यात आले. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर ट्रक व ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले.

     

    मृतदेह सेवाविच्छेदनासाठी ब्रह्मपुरी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.

  • चंद्रपुरात ब्राऊन शुगर ची विक्री, पोलिसांनी केली 2 आरोपीना अटक

    चंद्रपुरात ब्राऊन शुगर ची विक्री, पोलिसांनी केली 2 आरोपीना अटक

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपुरात छुप्या पध्दतीने ब्राऊन शुगर या अंमली पदार्थाची विक्री सुरू आहे, अश्यातच शहर पोलिसांनी दोघांना अटक करीत ब्राऊन शुगर जप्त केले.

     

    9 जानेवारीला शहर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की सोहेल शेख नामक युवक हा लपून ब्राऊन शुगर ची विक्री करतो, माहितीच्या आधारे पोलीस स्टाफ ने रेड करीत 23 वर्षीय सोहेल शेख सलीम शेख ला अटक केली.

     

    सोहेल ची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळून 7.12 ग्राम वजनाचे ब्राऊन शुगर सहित एकूण 57 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, सोहेल ची अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की सदर ब्राऊन शुगर हे भंगाराम वार्ड येथे राहणारा 38 वर्षीय आवेश शब्बीर कुरेशी याचे असून मी फक्त विक्री करतो.

     

    शहर पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक करून ताब्यात घेतले असू दोघांवर NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत, सपोनि मंगेश भोंगाळे, रमिझ मुलानी, पोउपनी शरीफ शेख, विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, इम्रान खान, भावना रामटेके व संतोष पंडित, जयंता चुनारकर, सचिन बोरकर, निलेश मुडे, चेतन गजलवार, संतोष कावळे, दिलीप कुसराम, रुपेश रणदिवे, इर्शाद शेख, रुपेश पराते यांनी केली.

  • चिमूर बस आगारातून सुरक्षितता अभियानाला सुरुवात

    चिमूर बस आगारातून सुरक्षितता अभियानाला सुरुवात

    News34 chandrapur

    चिमूर – गुणवंत चटपकार

    अपघाताची विविध कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने चिमूर बस आगारातून सुरक्षितता अभियानाला सुरुवात केली असून ११ जानेवारी ते २५ जानेवारी पर्यंत हे अभियान राबविण्यात येत आहे.

     

    सध्या महाराष्ट्रात एसटी मध्ये सुमारे पंचवीस हजारच्या आसपास चालक कार्यरत आहेत. अपघाताची विविध कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने चिमूर बस आगारातून सुरक्षितता अभियानाला सुरुवात झाली.

     

    अभियान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक संभाजी शिंदे, प्रमुख अतिथी म्हणून पोलिस उपनिरीक्षक भीष्मराज सोरते, वाहतूक निरीक्षक सूरज मुन, अभियंता पराग अंबादे, पत्रकार जितेंद्र सहारे. राजकूमार चुनारकर, श्रीहरी सातपुते, वाहतूक नियंत्रक सुरेश नन्नावरे आदी मंचावर उपस्थित होते.

     

    यावेळी मान्यवरानी चालकांना सुरक्षित प्रवासाचे महत्व पठऊन देण्याबरोबरच उत्तम शरीर. प्रकुरति आणि मनस्वास्थ या चातूर्सुतरीचे पालन करण्याचे आव्हान चालकांना करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक होमराज सिडाम यांनी केले तर आभार नेहा मेश्राम यांनी केले.

  • महाराष्ट्र वनविभागाचा डंका साता समुद्रापार

    महाराष्ट्र वनविभागाचा डंका साता समुद्रापार

    News34 chandrapur

    चंद्रपूर  : पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने गत काळात वनमंत्री म्हणून 50 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम महाराष्ट्रात राबविण्यात आला. ही केवळ एक योजना नव्हती तर झाडे कापणा-या हातांपेक्षा झाडे लावणारे हात निर्माण व्हावे, हा उदात्त हेतु त्यामागे होता. वृक्षलागवडीच्या या उपक्रमातून राज्यात 2550 चौ.कि.मी.चे हरितआच्छादन वाढले. महाराष्ट्राचा वन विभाग नेहमीच अभिनव उपक्रम राबविण्यात आघाडीवर राहिला आहे.

     

    आताही भारत – जर्मनी द्विपक्षीय सहकार्य करार भारतातील चार राज्यात राबविण्यात येत असला तरी महाराष्ट्र यात अव्वल राहील व आपल्या वनविभागाचा डंका जर्मनीमध्येसुध्दा वाजेल, अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

     

    वन अकादमी येथे भारत – जर्मनी द्विपक्षीय सहकार्य प्रकल्पांतर्गत वन, वनेत्तर क्षेत्र पुर्नसंचयन, जतन आणि संरक्षणार्थ कार्यक्रमाचा शुभारंभ करतांना वनमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, कॅम्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शोभिता विश्वास, या प्रकल्पाचे जर्मनीतील संचालक डॉ. अलेजांद्रो वॉन बेर्ट्राब, वन अकादमीचे संचालक एम.एस.रेड्डी, डॉ. कुंदन आदी उपस्थित होते.

     

    महाराष्ट्र – जर्मनी यांच्यात द्विपक्षीय सहकार्य करार झाल्याचे घोषित करून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्रात पर्यावरण विषयक संशोधन व प्रशिक्षणाच्या संधी वाढविण्यासाठी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन संस्था यांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या या कराराची अंमलबजावणी उत्तम व्हायला पाहिजे. चंद्रपूर येथील वन अकादमी ही देशातील उत्कृष्ट प्रशिक्षण संस्था आहे. याच संस्थेत आज महत्वाचा करार होत असून अतिशय शास्त्रशुध्द नियोजन आणि प्रशिक्षण या वनअकादमीत व्हावे.

     

    जगातील 193 देशांपैकी 14 देशामध्ये वाघ आहे त्यातील 65 टक्के वाघ भारतात आहे, आणि महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असल्यामुळे येथून पराक्रमी मानसिकता घेऊन जावी. उत्तमातील उत्तम काम करून या कराराला पूर्णपणे यशस्वी करू तसेच महाराष्ट्राच्या वनविभागाचा झेंडा जर्मनीमध्ये रोवू, अशी ग्वाही वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

     

    पुढे ते म्हणाले, निव्वळ धनाने काम होत नाही तर त्यासाठी हिरवे मनसुध्दा लागते. या कराराच्या माध्यमातून उत्कृष्ट अंमलबजावणी करण्याचा संकल्प करा.

     

    पर्यावरणाचा –हास हे आज जगातील सर्वात मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. संपूर्ण ब्रम्हांडात केवळ पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे. मात्र आज मनुष्याकडूनच पर्यावरणाची हानी होत आहे. पर्यावरणीय बदल, ग्लोबल वॉर्मिंग हे महाकाय राक्षस आपल्यासमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे वनांच्या संरक्षणाची सर्वाधिक जबाबदारी वन अधिका-यांवर आहे. आई आणि वनराईच्या सेवेचे मुल्यांकन सर्वाधिक असून मातेचे तसेच मातीचेही कर्ज आपल्यावर आहे. त्यामुळे आहे त्या जमिनीचे संगोपन, संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल, असे आवाहन त्यांनी केले.

     

    यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महाराष्ट्र – जर्मनी द्विपक्षीय सहकार्य कराराचे डीजीटल पध्दतीने उद्घाटन, सौर उर्जा कुंपन योजनेचे उद्घाटन तसेच माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.प्रास्ताविकात वनबलप्रमुख म्हणाले, जागतिक पातळीवर वनांचे महत्व वाढले आहे.

     

    वातावरणात 64 टक्के कार्बन डॉयऑक्साईड असून त्यामुळे तापमानात वाढ होत आहे. या कराराच्या माध्यमातून वन, वनेत्तर क्षेत्र पुर्नसंचयन, जतन आणि संरक्षण करून हवेतील कॉर्बन डॉयऑक्साईडचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच जमिनीचा पोत सुधारणे, शेती, वनजमीन आणि पाणी साठा असलेल्या जमिनीचा विकास करणे आणि स्थानिक लोकांना उपजिविकेचे साधन म्हणून प्रशिक्षित करणे, हा या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

     

    यांना मिळाला सौर उर्जा कुंपनाचा लाभ : उध्दवराम पाटणकर, रविंद्र गावडे, मारोती तायडे, सुरेश कुईटे, सचिन जमदाळे, दिवांजी गिरडकर, आशा गिरडकर, दिलीप भोयर, गणपती उपरे, विनय डोंगरे यांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सौर उर्जा कुंपण वाटपाचे प्रमाणपत्र देण्यात आले.

     

    10 जिल्ह्यातील ग्रामस्थांना लाभ : वने, वनक्षेत्र पुनर्संचयित व जतन आणि संरक्षित करण्यासाठी रिकॅप फॉन एन.डी.सी. प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, रत्नागिरी आणि नंदुरबार या 10 जिल्ह्यांतील 94278 हेक्टर वन व वनेत्तर क्षेत्राचे पुनर्संचयित प्रस्तावित आहे. त्यामुळे 11 लक्ष 57 हजार 189 ग्रामस्थांना लाभ होणार आहे.

  • दुचाकी वाहनाची झाडाला धडक, 1 ठार 1 गंभीर जखमी

    दुचाकी वाहनाची झाडाला धडक, 1 ठार 1 गंभीर जखमी

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – मुल तालुक्यातील मौजा चीचाळा हेटी येथील रहिवाशी असलेले राजू भेंडारे वय(३५) व दशरथ जेंगठे वय(२४) हे दोघे आपल्या दुचाकीने नातेवाईकांकडून पैसे आणण्यासाठी चंद्रपूर कडे जात असताना नागाळा नजिक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जबर धडक दिल्याने राजू भेंडारे हा जागीच गतप्राण झाला तर सोबत असणारा मित्र दशरथ जेंगठे हा गंभीर जखमी झाल्याने तात्काळ उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले.

     

    मृतक राजू भेंडारे यांना पत्नी व दोन मुले असून राजू आर्थिक अडचणीत असल्याने पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी जात होता.

     

    मृतक राजुचा व्यवसाय ट्रॅक्टरने रेती दुलाई करणे करीत होता काही दिवसापूर्वी राजूची ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडल्याने त्याला दंडाची रक्कम भरायची होती म्हणून तो पैशासाठी धावपळ करीत होता. पुढील तपास मुल पोलिस करीत आहे.

  • चंद्रपूर जिल्हा न्यायालयातील मेंटेनन्सच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप

    चंद्रपूर जिल्हा न्यायालयातील मेंटेनन्सच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप

    News34 chandrapur

    चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा न्यायालयात झालेल्या मेंटेनन्सच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. यासंदर्भात आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी मुख्य न्यायाधीशांना तक्रार दिली आहे.

     

    तक्रारीत राईकवार यांनी म्हटले आहे की, दोन अडीच वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्हा न्यायालयात मेंटेनन्सचे काम करण्यात आले. हे काम करोडो रुपयांचे आहे. या कामात बिल्डिंग मेंटेनन्स, टाइल्स लावणे, कलर करणे यासोबत अनेक कामे करण्यात आली होती. मात्र, या दोन वर्षातच या कामात भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास येत आहे.

     

    तक्रारीत राईकवार यांनी म्हटले आहे की, संपूर्ण लावण्यात आलेले टाइल्स अनेक ठिकाणावरून निघून खाली पडले आहेत. अनेक ठिकाणच्या टाइल्स निघण्याच्या तयारीत आहेत. टाइल्सच्या आत मध्ये मटेरियल लोकल क्वालिटीचे वापरल्यामुळे ही टाइल्स भिंतीला चिपकवण्यात आलेली नाहीत. तसेच, भिंतीचा कलर कामात सुद्धा लोकल कॉलिटी चे पेंट मारले असल्यामुळे ते पेंट सुद्धा भिंतीवरून उघडत चाललेले आहे.

     

    राईकवार यांनी या कामाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थी जेवनाविना

    गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थी जेवनाविना

    News34 chandrapur

    चंद्रपूर/गडचिरोली – गोंडवाना विद्यापीठातील वसतिगृहात राहणारे विद्यार्थी गेले तीन-चार दिवसापासून जेवण न मिळाल्यामुळे उपाशी आहेत. जेवणासाठी आंदोलन करीत आहेत, कुलगुरू स्वतः त्यांना जाऊन विद्यार्थ्यांना भेटल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले की आपणापैकी कोण उपाशी आहेत त्यावेळी विद्यार्थ्यांनी जेवण न केल्याचे सांगितल्यावर देखील कुलगुरू डॉ प्रशांत बोकरे विचारणा करून उपाययोजना न करता निघून गेले यावरून कुलगुरू व विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या प्रती किती गंभीर आहे हे दिसून येते. आज परत विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागलं.

     

    त्यानंतर कुलगुरूंनी त्यांच्या जेवणाची तात्पुरती व्यवस्था करण्याबद्दल त्यांना आश्वासित केले आहेत. कुलगुरूंनी दिलेले आश्वासन ते पाळतील ही अपेक्षा आहे. परंतु हा प्रश्न तात्पुरत्या सोयीने सुटणार नाही. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना जेवण, प्रवेश व हॉस्टेल तिन्ही मोफत राहील अशा पद्धतीची माहिती सांगण्यात आली आणि आता मात्र त्यांच्याकडून पैसे मागत असल्याबाबतची तक्रार विद्यार्थ्यांनी केलेली आहे. माननीय राष्ट्रपती महोदया विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये आलेल्या असताना कुलगुरू यांनी राष्ट्रपतींच्या समक्ष जाहीरपणे बोलताना गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला एकही रुपया लागणार नाही असे उदगार काढलेले आहे. परंतु कुलगुरू बोललेले शब्द पाळत नाहीत असा वारंवार अनुभव येत आहे.

     

    अनेक विद्यार्थी कुलगुरूंच्या उदासीन धोरणामुळे शिक्षण सोडून जेवण मिळणार नाही म्हणून गावाला परत जात आहे. ही बाब विद्यापीठाच्या प्रतिष्ठेसाठी चांगली नाही.
    गोंडवाना विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे की कशासाठी हेच कळत नाही?. एकीकडे “विद्यापीठ आपल्या गावी” योजना सुरू केल्याची शाबासकी मिळविली जाते मात्र दुसरीकडे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न चार दिवसापासून सुटू शकत नाही.

     

    त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था लवकरात लवकर करावी, अन्यथा आम्हाला विद्यापीठात येऊन विद्यापीठाला विद्यार्थ्यांसह घेराव घालावा लागेल असा इशारा सिनेट सदस्य , प्रा. निलेश बेलखेडे,प्रा डॉ दिलीप चौधरी, डॉ. प्रवीण जोगी, डॉ. सतीश कन्नाके, डॉ. मिलिंद भगत, अजय लोंढे, दीपक धोपटे, यांनी दिला आहे.

  • ग्रामीण पगारदार व सहकारी पतसंस्था संचालकांचे कर्जवसुली विषयावर प्रशिक्षण संपन्न

    ग्रामीण पगारदार व सहकारी पतसंस्था संचालकांचे कर्जवसुली विषयावर प्रशिक्षण संपन्न

    News34 chandrapur

    चिमूर – गुणवंत चटपकार

    महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणेचे सहकारी शैक्षणिक उपक्रम अंतर्गत चंद्रपूर जिल्हा सहकारी बोर्ड लि. चंद्रपूरचे वतीने व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर चे विद्यमाने चिमुर त. चिमुर जि. चंद्रपूर येथे चिमुर तालुक्यातील नागरी/ग्रामीण व पगारदार सहकारी पतपुरवठा सह. संस्थांचे संचालक व सेवकांचे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे सभागृहात संपन्न झाले.

     

    या दोन दिवसीय प्रशिक्षणात सहकरी कायदा, संचालक मंडळ अधिकार, कामे व जबाबदारी, सहकरी संस्थेचे कायदेशीर व्यवस्थापण, पतसंस्था नियामक मंडळ तरतुदी, ताळेबंद विषलेशन, एन.पी.ए.व थकित कर्जवसुली प्रक्रिया, ईत्यादी विषयावर भारत. सी. फलके, जिल्हा सहकार विकास अधिकारी, जिल्हा सह. प्रशिक्षण बोर्ड मर्यादित. चंद्रपूर, राजेश लांडगे, उपलेखापरीक्षक-सह.संस्था तसेच व्हाईस ऑफ मिडिया चंद्रपूर चे जिल्हा सरचिटणीस व सी. टि. व्ही. प्रतिनिधी श्रीहरी सातपुते, एन. मेहरकुरे, श्री. पैठे सह.विभाग यांचे मार्गदर्शन झाले. कार्यक्रमास पतसंस्थेचे संचालक व अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. अनेक प्रशिक्षणार्थी प्रतिनिधींनी मनोगतात सदरील प्रशिक्षणात अत्यंत उपयुक्त माहिती मिळाल्याचे अभिप्राय दिले. प्रशिक्षण पुरती नंतर प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देण्यात आले.