Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • सहलीला घेऊन जातांना विद्यार्थ्यांनी भरलेला ट्रॅक्टर पलटी

    सहलीला घेऊन जातांना विद्यार्थ्यांनी भरलेला ट्रॅक्टर पलटी

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – मुल तालुक्यातील मौजा मोरवाही येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्या व विद्यार्थिनींची सहल सुवतीला नागपूर येथे नेण्याचे ठरविले होते. परंतु शिक्षकांचा आर्थिक बजेट कमी पडल्यामुळे शाळेचे विद्यार्थी नाराज होऊ नये म्हणुन मुख्याध्यापक श्री नैताम गुरुजी यांनी आपण विद्यार्थ्यांना जवळच असलेल्या कन्हाळ गाव मारुती देवस्थान येथे घेऊन जाण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या खुशिसाठी ट्रॅक्टर मद्ये एकूण १५ मुले-मुली घेऊन गेले.

     

    ट्रॅक्टरच्या मागे काही शिक्षक आपल्या स्वतःच्या गाडीने गेले. मधेच कन्हाळ गाव रस्त्यावर मुले – मुली घेऊन जाणारी ट्रॅक्टर पलटी झाल्याने अनेक मुले किरकोळ तर दोन मुली गंभीर जखमी झाल्याचे कळले.

     

    घटना घडल्या लगेच सर्व विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालय मुल येथे उपचारासाठी तात्काळ नेण्यात आले. याबाबत मोरवाही येथील शाळेचे मुख्याध्यापक श्री.नैताम यांना विचारले असता शाळेची सहलिबाबत केंद्र प्रमुख यांचेशी चर्चा करून सहमती घेतली असल्याचे सांगितले परंतु मुलांना ट्रॅक्टरनी नेणार आहोत व त्याची परवानगी घेतली नाही असे मत त्यांनी सांगितले.

     

    जखमी विद्यार्थ्यांवर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. लाडे यांनी उपचार केल्याचे सांगितले. व एकूण विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी गंभीर असल्याने त्याच्या पालकांनी जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेल्याचे सांगितले. परंतु अशी सहल नेतांना मुख्याध्यापकांनी पूर्व परवानगी घेण्याची गरज होती. अशा वेळेला शिक्षकांनी जबाबदारी झटकू नये असे पालकांचे मत होते.

  • Sindewahi Development : विकास संकल्पनेतून सिंदेवाही शहराचा चेहरा मोहरा बदलविणार – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    Sindewahi Development : विकास संकल्पनेतून सिंदेवाही शहराचा चेहरा मोहरा बदलविणार – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    News34 chandrapur

    सिंदेवाही – जनतेने मला सेवा करण्याकरिता लोकप्रतिनिधित्वाची संधी दिली. नागरिकांच्या या आशावादी विश्वासाला मी कदापिही तडा न जाऊ देता सदैव जनतेच्या सेवेकरिता अधिक तत्परतेने कार्य करेन. नागरिकांच्या मूलभूत सुविधांसह इतर सोयी सुविधांसाठी शासन स्तरावरून आवश्यक तेवढा निधी खेचून आणून माझ्या विकास संकल्पनेतून सिंदेवाही शहराचा चेहरा मोहरा बदलविणार असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सिंदेवाही लोनवाही नगरपंचायत द्वारे आयोजित शहरातील 35 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. Opposition leader vijay wadettiwar
    आयोजित कार्यक्रमास गडचिरोली काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष हसन गिलानी, सिंदेवाही तालुका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रघुनाथजी शेंडे, चंद्रशेखर चन्ने, बाबुरावजी गेडाम, हरिभाऊ बारेकर, डॉ.केशव शेंडे, सुदाम खोब्रागडे, तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे ,शहराध्यक्ष सुनील उटलवार, वीरेंद्र जयस्वाल,नगराध्यक्ष स्वप्निल कावळे उपनगराध्यक्ष मयूर सुचक, राहुल पोरेडीवार, श्रावण नागदेवते, महिला तालुका काँग्रेस अध्यक्ष सीमा सहारे, शहराध्यक्ष प्रीती सागरे, तथा सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी, नगरपंचायत पदाधिकारी नगरसेवक तथा काँग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. Congress party
    यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले की, जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी  उपयुक्त असा संदेश दिला. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्कृष्ट मौलिक असे संविधान रुपी भेट दिली. देशात धर्मांधता पसरवून मनुवादी विचारसरणीने देश गुलामगिरी च्या वाटेवर आणून ठेवला असून देशाचे संविधान व लोकशाही टिकवण्यासाठी आता सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी नगर बौद्ध समाजातर्फे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा सत्कार करण्यात आला.
    आज पार पडलेल्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यात सिंदेवाही तहसील कार्यालय इमारतिचे लोकार्पण (१५ कोटी), तालुका क्रीडा संकुल येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन(८कोटी ), ई लायब्ररीचे भूमिपूजन (४.५ कोटी ), शहरातील प्रभागनिहाय रस्ते बांधकामा करिता (३ कोटी), शहरातील दीक्षाभूमी समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सौंदर्यीकरनाचे भूमिपूजन (१ कोटी), सिंदेवाही – किन्ही मुख्य मार्गावरील उंच फुल बांधकामाची भूमिपूजन (३.५ कोटी) आदी विकास कामांचा समावेश आहे.
    तर शहरातील मुख्य सिमेंट मार्गावरील अंडरग्राउंड विद्युत पुरवठा करणे करिता ५ कोटी , शहराला असोलमेंढा येथून पाणीपुरवठा करण्याकरिता 70 कोटी , सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय दर्जा देऊन ५० खाटांचे अद्यावत रुग्णालय बांधकाम करणे करिता ५० कोटी, तसेच सिंदेवाही – पाथरी सदर मार्गावरी ल रेल्वे क्रॉसिंग वर उडान पूल बांधकामा करिता ९० कोटी, शिवाजी चौक सौंदर्य करण्यासाठी २ कोटी, एवढा प्रचंड विकास निधी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या आता प्रयत्नातून मंजूर झाला असून लवकरच ही विकास कामे सुरू होईल अशी माहिती आपल्या प्रास्ताविकातून नगराध्यक्ष स्वप्निल कावळे यांनी दिली.
    याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ बाबुरावजी गेडाम व तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमाकांत लोधे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनुस शेख, प्रास्ताविक नगराध्यक्ष स्वप्निल कावळे यांनी केले. आयोजित कार्यक्रमास शहरातील बहुसंख्य नागरिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
  • Chandrapur Grand March : आरक्षण बचाव महामोर्चा’ला विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचा पाठिंबा

    Chandrapur Grand March : आरक्षण बचाव महामोर्चा’ला विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचा पाठिंबा

    News34 chandrapur

    चंद्रपूर –  सर्व मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती-जमातीमधिल नागरिकांच्या आरक्षणाला धोका निर्माण करणाऱ्या दोन अधिसूचना महाराष्ट्र सरकारने मागे घ्याव्या तसेच जातनिहाय जनगणना करण्यात यावी या मागण्यांसाठी 7 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित महामोर्चाला विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला. रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता चंद्रपूरच्या मुल रोडवरील संतांची सभागृहामध्ये नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी महामोर्चाला पाठिंबा जाहीर केला. Cast census

     

     

    नियोजन बैठकीच्या सुरुवातीला महामोर्चाचे संयोजक सचिन राजूरकर यांनी शासनाच्या अन्यायकारक अधिसूचनांचे जाहीर वाचन केले. त्यानंतर विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त करून महामोर्चाला पाठींबा जाहीर केला. Grand march chandrapur

     

    यावेळी प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(अजित पवार गट), शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट), अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष,गोंडवाना गणतंत्र पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनविकास सेना,उलगुलान संघटना,तसेच आदिवासी विकास परिषद,बिरसा संघटना, टायगर सेना,बिएस फोर अभियान, गोंधळी समाज संघटना, भोई समाज संघटना, बहुजन समता पर्व,धनोजे कुणबी समाज संघटना, अखिल भारतीय माळी महासंघ,नाभिक समाज संघटना,तैलिक समाज संघटना,सुतार समाज संघटना,सोनार समाज संघटना, विदर्भ बुरड संघटना, मुस्लिम परिषद, ख्रिस्ती समाज संघटना इत्यादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महामोर्चाला पाठिंबा जाहीर केला. Save reservation

     

    महाराष्ट्र शासनाने 27 डिसेंबर 2023 व 26 जानेवारी 2024 रोजी आरक्षणाच्या संदर्भात दोन अधिसुचना काढल्या. या अधिसुचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यास जातीचे खोटे दाखले व जातवैधतेचे खोटे प्रमाणपत्र मिळणे शक्य होईल. त्यामुळे भविष्यात अनुसूचित जाती,अनुसुचित जमाती तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील मुळ व खऱ्या नागरिकांच्या आरक्षणाला धोका निर्माण होईल असा आरोप महामोर्चाच्या आयोजकांनी केला आहे.

  • Surjagad Truck Accident : चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

    Surjagad Truck Accident : चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर – कोठारी- गोंडपिपरी मार्गावरील आक्सापुर येथील हनुमान मंदिर जवळ हायवा ट्रकने दोन दुचाकींना सामोरा-समोर धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. Big accident in chandrapur

     

     

    रविवारी दुपारच्या सुमारास दोन दुचाकी क्रमांक Mh34AG 3224 व MH33 K6739 धारक मुलचेरा गडचिरोली येथून चंद्रपूर कडे येत होते, त्याचं वेळी चंद्रपूर वरून हायवा ट्रक क्रमांक Mh40 CM 3233 हा चंद्रपूर वरून सुरजागड येथे अतिवेगाने जात होता, हनुमान मंदिर आकसापूर येथे हायवा ट्रक ने दोन्ही दुचाकी धारकांना जबर धडक देत तब्बल 100 मीटर फरफटत नेले. Surjagad company

     

    हा अपघात इतका भयावह होता की एका दुचाकी धारकांचे धड अलग झाले, यामध्ये अमृत सुनील सरकार वय (32) वर्ष रा. कालीनगर मुलचेरा, शैलेंद्र कालिदास रॉय (63) विजयनगर मुलचेरा, मनोज निर्मल सरदार (43) कालीनगर मुलचेरा मृतकाचे नाव असून ट्रकचालकाने अपघात केल्यावर घटनास्थळावरून पसार झाला.

     

     

    विशेष म्हणजे सुरजागड कंपनी सुरू झाल्यापासून आजपर्यंत गोंडपीपरी तालुक्यात असंख्य अपघात झाले आहे, यामध्ये अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला, सुरजागड येथून वाहतूक करणाऱ्या जड वाहनाच्या वेगावर कुणाचेही नियंत्रण नाही, त्यामुळे गोंडपीपरी येथील नागरिकांचा नाहक बळी जात आहे.

     

     

    सदर अपघाताचा तपास कोठारी पोलीस निरीक्षक राजकीरण मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी श्रीनिवास जाधव, राजूरकर, टेम्भुर्णे व उपरे करीत आहे.

  • Maratha and Open Category Survey : चंद्रपुरात मराठा समाज व खुल्या प्रवर्गांच्या सर्व्हेक्षण मोहिमेत 488 कुटुंबीयांचा माहिती देण्यास नकार

    Maratha and Open Category Survey : चंद्रपुरात मराठा समाज व खुल्या प्रवर्गांच्या सर्व्हेक्षण मोहिमेत 488 कुटुंबीयांचा माहिती देण्यास नकार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी हाती घेतलेले सर्वेक्षण हे १०० टक्के पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणादरम्यान ४ हजार ९०९ घरे बंद आढळली असून ४८८ कुटुंबियांनी सर्वेक्षणास नकार दिला. त्यामुळे शहरात ९३.२७ टक्के कुटुंबांची माहिती गोळा होऊ शकली. chandrapur municipal corporation

     

     

    राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर शहरातील २३ फेब्रुवारी २०२४ पासून मराठा व  खुल्या प्रवर्गातील समाजाचे  सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. हे सर्वेक्षण नुकतेच दिनांक २ फेब्रुवारीला पूर्ण झाले. चंद्रपूर शहरातील ८० हजार ९५१ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी सुमारे ८७४ कर्मचारी कार्यरत होते. सर्वेक्षणाचे उद्दिष्ट गाठून ३ फेब्रुवारी २०२४ रोजी चंद्रपूर मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचे  सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले, अशी माहिती महानगरपालिका उपायुक्त अशोक गराटे यांनी दिली. State Commission for Backward Classes

     

    राज्य मागासवर्ग आयोगाने पाठविलेल्या मास्टर ट्रेनरने महानगरपालिकेतील नोडल अधिकारी, सहाय्यक नोडल अधिकारी आणि मास्टर ट्रेनर यांना प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर महानगरपालिकेचे नोडल अधिकारी, सहाय्यक नोडल अधिकारी आणि मास्टर ट्रेनर यांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणाबाबतचे प्रशिक्षण दिले होते. Maratha and Open Category Survey

     

    तसेच सर्वेक्षणासाठी खास अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले होते. सर्वेक्षणादरम्यान एकूण १६० ते १८२ प्रश्न विचारण्यात आले असून मराठा  व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेण्यात आली. सदर माहिती मुलभूत, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, आरोग्य विषयक होती. कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याचे समजल्यानंतर प्रगणकाने त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली नाही. ही कार्यवाही आयुक्त विपीन पालीवाल व अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात करण्यात आली.

     

    दरम्यान, ३१ जानेवारी पर्यंत ५६ हजार २४६ कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले होते. जी घरे बंद होती त्यांना कर्मचाऱ्यांनी पुन्हा भेट दिली होती. मात्र त्यातील काही घरे बंदच असलेली आढळली. त्याचप्रमाणे सर्वेक्षणास नकार देणाऱ्या कुटुंबांची कर्मचाऱ्यांनी पुन्हा भेट घेऊन त्यांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला.सर्वेक्षण दरम्यान काही नागरिकांमध्ये या सर्वेक्षणाबाबत भीती व शंका – कुशंका असल्याचे जाणवले.

  • Grand March Chandrapur : आरक्षण वाचवायचं तर चंद्रपुरातील महामोर्चा मध्ये सहभागी व्हा

    Grand March Chandrapur : आरक्षण वाचवायचं तर चंद्रपुरातील महामोर्चा मध्ये सहभागी व्हा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने 27 डिसेंबर 2023 व 26 जानेवारी 2024 रोजी घेतलेल्या निर्णयांमुळे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याच्या अटी शिथिल झाल्याने ओबीसी, एससी, एसटी, एनटी,व्हिजेएनटी प्रवर्गात बोगस लोकांची घुसखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Save reservation

     

    सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी, एससी एसटी, एनटी,व्हिजेएनटी प्रवर्गाचे आरक्षण धोक्यात आले असुन या निर्णयांच्या विरोधात दि.7 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर पर्यंत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चात जिल्ह्यातील ओबीसी, एससी एसटी, एनटी,व्हिजेएनटी प्रवर्गातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मोर्चाचे संयोजक सचिन राजुरकर यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे केले. Grand march chandrapur

     

    राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब, दिनांक 26 जानेवारी 2024 नुसार मसूदा काढला आहे. हा मसुदा आरक्षण मिळणाऱ्या सर्वच प्रवर्गातील नागरिकांसाठी भविष्यात धोकादायक ठरू शकतो. Sage soyare

     

    त्यामुळे ओबीसी, एससी एसटी, एनटी,व्हिजेएनटी प्रवर्गातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिंदे समिती ही घटनात्मक नसताना शिंदे समितीच्या शिफारसीवरून कुणबी प्रमाणपत्र देणे सुध्दा घटनाबाह्य आहे. शासनाच्या या अन्यायकारक भूमिकेचा विरोध नोंदविण्याकरिता तसेच 27 डिसेंबर 2023 राजपत्र रद्द करणे व ओबीसी, एससी एसटी, एनटी,व्हिजेएनटी सोबत सर्व समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी या मागण्यांसाठी 7 फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा धडकणार आहे. Cast validity

     

    महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम 2000 मध्ये बदल करणासाठी सरकारने राजपत्र काढले असून त्या मुळे प्रमाणपत्र मिळण्यास बोगसगिरी होण्याचे प्रमाण जास्त होऊ शकते , म्हणून राजपत्र रद्द करण्याच्या आणि ओबीसी (विजा, भज, विमाप्र ) “अनुसूचित जाती / जमाती व इतर समाजाची जात निहाय जनगणनेच्या मागण्यांसाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • Shetkari Sanghatana : राजुरा उपविभागीय कार्यालयावर धडकला शेतकरी संघटनेचा भव्य मोर्चा

    Shetkari Sanghatana : राजुरा उपविभागीय कार्यालयावर धडकला शेतकरी संघटनेचा भव्य मोर्चा

    News34 chandrapur

    राजुरा – शेेतक-यांच्या अनेेक ज्वलंत मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मोर्चाद्वारे येऊन आज ३ फेब्रुवारीला राजुरा उपविभागीय अधिकारी कार्यालयाला धडक दिली. कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांच्या आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरूध्द जोरदार घोषणा देत आपला आवाज बुलंद केला. उपविभागीय कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. आज निघालेला शेतकरी संघटनेचा मोर्चा लक्षवेधी ठरला. Shetakari Association

     

    यावेेळी केलेल्या भाषणात माजी आमदार ॲड.वामनराव चटप म्हणाले की, सरकार शेतमाल निर्यातीवर विविध बंधने लादून शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य देत नाही. सतत आश्वासने दिली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काही पडत नाही. सरकार शेतकऱ्यांची अनेक मार्गाने लूट करीत असून त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही अत्यंत वेदना देणारी बाब असून जगाच्या पोशिंद्याची ही स्थिती सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिपाक आहे. म्हणून शेतकऱ्यांचे आर्थिक स्वातंत्र्य हेच स्वप्न असून त्यासाठी आक्रमकपणे प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ॲड.वामनराव चटप यांनी केले. या सभेत ॲड.दिनेश शर्मा, सतिश दाणी यांचेसह अनेक पदाधिका-यांची भाषणे झाली.

     

    या मोर्चाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप, स्वभापचे माजी प्रांताध्यक्ष ॲड.दिनेश शर्मा, सतिश दाणी, अरूण पाटील नवले, निळकंठ कोरांगे, सुनिल बावणे, शेषराव बोंडे, कपील इद्दे, प्रभाकर ढवस, विनोद बारसिंगे, हरिदास बोरकुटे, कवडू पोटे, रमेश नळे, मधुकर चिंचोलकर, दिलीप देठे,सुरेश आस्वले, डॉ.गंगाधर बोढे, नरेंद्र काकडे, मारोती लांडे, नरेश गुरनुले,नरेंद्र मोहारे, मनोज मुन, सतय्या रामगिरवार, प्रफुल कावळे, उत्पल गोरे, सुरज गव्हाणे, सुरज जीवतोडे, प्रभाकर लडके,विलास कोदिरपाल,पांडूरंग पोटे, यांचेसह अनेक पदाधिका-यांनी केले.

     

    हा मोर्चा भवानी मंदीर प्रांगणातून निघून शहरातून तहसिल कार्यालयावर गेला. तेथे शिष्टमंडळाने मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पाठविण्यासाठी एसडीओ रविंद्र माने यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

     

    मागण्या

    सर्व शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी व शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे म्हणून सक्तीची कर्जवसुली बंद करून संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी, शेतीसाठी पूर्णवेळ व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा व दिवसाचे लोडशेडींग बंद करावे, वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेतातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय करावेत किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी, इतर वन्य प्राण्यांप्रमाणे सर्पदंशाने मृत्यु धारकांचे वारसदारांना आर्थिक मदत देण्यात यावी, पीक विम्यात होणारी शेतक-यांची फसवणूक बंद करून विम्याचा योग्य लाभ देणारी योजना अंमलात आणावी.

     

     

    पिक विमा मिळाला नसलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड मध्ये धानाला हभीभावा पेक्षा ४०% जास्त भाव देवून तर मध्यप्रदेशाात गव्हाला हमी भावापेक्षा ३०% जास्त भाव देवून खरेदी करण्याची “मोदी गॅरंटी” ची घोषणा केली, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात कापूस व सोयाबीन ला हमीभावापेक्षा ३०% जास्त दर देवून खरेदी करावी तसेेच ज्यांनी विक्री केली आहे, त्यांना वाढीव रक्कम द्यावी, स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती तातडीने करावी, वन हक्क कायद्यात वन जमिनीवर अतिक्रमण असणाऱ्या शेतकऱ्यांना पट्टा देतांना असलेली तीन पिढ्यांची व २५ वर्षाची एक पिढी या अटी वनहक्क कायद्यातून वगळण्यात याव्या, जीवती येथे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी तथा व्यवहार न्यायाधीश (कनिष्ठस्तर) न्यायालयाची तात्काळ निर्मिती करण्यात यावी.

     

     

    बल्लारपूर-सुरजागड व गडचांदूर-आदिलाबाद या रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करून द्यावा,बल्लारपूर-आष्टी-आलापल्ली -सुरजागड या राज्य मार्गाचे भाग आष्टी ते आलापल्ली- सुरजागड मार्गाचे सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करण्यात यावे, जबरानजोत शेतकऱ्यांना तात्काळ पट्टे वितरित करण्यात यावे, सास्ती गावातील शिल्लक राहिलेली १६% जमीन व विरूर (गाडेगांव) गावातील शिल्लक राहिलेली जमीन वेकोलीने तात्काळ भुसंपादीत करावी, गडचिरोली जिल्ह्यात मद्य / दारू निर्मितीचा कारखाना सुरू करण्यात येवु नये, अन्न धान्यावरील जी.एस.टी. रद्द करण्यात यावी, स्थानिक बेरोजगारांना कंपनीत तथा खाणीत सामावून घेण्यात यावे अशा एकुण १७ मागण्या शेतकरी संघटनेने मोर्चाद्वारे केल्या आहेत.
    या मोर्चात राजुरा तालुक्यातील शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी, शेतकरी युवा आघाडी व स्वतंत्र भारत पक्ष यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चात महिलांची संख्या लक्षणिय होती. या मोर्चाने शेतकरी संघटनेने पुन्हा रणशिंग फुंकले आहे.

  • Sub Divisional Police Officer Transfer : साहील झरकर मूलचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी

    Sub Divisional Police Officer Transfer : साहील झरकर मूलचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मूल : येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर साहील उमाकांत झरकर यांची नियुक्ती करण्यांत आली आहे. पदोन्नतीने नियुक्त झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जून इंगळे येत्या काही महिण्यांत सेवानिवृत्त होणार असून त्यांची राज्य आर्थिक गुन्हे शाखेत स्थानांतरण करण्यांत आले आहे. Police officer transfer

     

    नक्षलप्रभावीत गडचिरोली जिल्हयातील कुरखेडा पोलीस उपविभागात साहिल झरकर दोन वर्षापासुन सेवारत आहेत.

     

     

    राज्य पोलीस सेवेत असलेेले उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचीत असून नक्षलप्रभावीत कुरखेडा उपविभागात त्यांची सेवा उल्लेखनिय राहीली आहे. त्यामूळे सध्यास्थितीत मूल उपविभागातंर्गत सुरू असलेल्या विविध गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी साहीत झरकर यांना कठीण जाईल. असे सध्यातरी वाटत नाही. लवकरच साहील झरकर येथील पदभार सांभाळणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. Maharashtra police

  • Shiva Wazarkar Chandrapur : चंद्रपूर चे मिर्झापूर होणार का? आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचा संतप्त सवाल

    Shiva Wazarkar Chandrapur : चंद्रपूर चे मिर्झापूर होणार का? आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचा संतप्त सवाल

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहराची कायदा व सुव्यस्था तसेच शांतता व सलोख्यासाठी ओळख आहे. परंतू सद्या चंद्रपूर शहराला कोणाची नजर लागली हे कळत नाही. शहरात अवैध धंद्यासोबत खुनी सत्र सुरु असून याला वेळीच आवर न घातल्यास चंद्रपूर चे मिर्झापूर होण्यास वेळ लागणार नाही अशी संतप्त भावना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्व. शिवा वझरकर यांच्या कुटुंबीयांच्या घरी सांत्वनपर भेटी दरम्यान व्यक्त केली. Mla pratibha dhanorkar

     

     

    चंद्रपूर शहरात बेरोजगारी वाढत चालली असून काही युवक अवैध धंद्याच्या मार्गातून झटपट पैसा कमविण्याच्या हेतू ने तरुण युवकांना हाताशी धरुन गुंडागर्दी तसेच अवैध मार्गाकडे वळवित असल्याचे चिन्ह सध्या चंद्रपूर शहरात दिसून येत आहे. आपले अस्तित्व सिद्ध करण्याच्या नादात निरपराध शिवा वझरकर या तरुण युवकाला घोळक्याने संघटीत गुन्हेगारीचा वापर करुन हत्या केली.

     

     

    या हत्येचा निषेध व्यक्त करुन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शिवा वझरकर यांच्या कुटूंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी आरोपींवर मोक्का कायदा अंतर्गत कार्यवाही करण्यासाठी आपण येणाऱ्या काळात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. त्यासोबतच पोलिस अधिक्षकांची भेट घेऊन अशा घटना होणार नाही यासाठी पोलिस प्रशासनाने पाऊले उचलावी अशा सुचना करणार असल्याचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले.

     

    या भेटी वेळी कॉग्रेस चे शहर अध्यक्ष रामू तिवारी, कॉग्रेस नेते विनोद दत्तात्रेय, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, कॉग्रेस नेते उमाकांत धांडे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, संदीप सिडाम, प्रविण काकडे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Chandrapur Play Janta Raja : महानाट्य जाणता राजा बघण्यासाठी आता पास ची गरज नाही

    Chandrapur Play Janta Raja : महानाट्य जाणता राजा बघण्यासाठी आता पास ची गरज नाही

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य जाणता राजा ‘ चंद्रपूरकरांच्या भेटीला 2 फेब्रुवारी पासून आले आहे. राज्याचा सांस्कृतिक विभागजिल्हा प्रशासन व चंद्रपूर महानगरपालिका मार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून 23व 4 फेब्रुवारी 2024 रोजी चांदा क्लब ग्राउंडचंद्रपूर येथे प्रयोग होणार आहेत. Janta raja

     

    2 फेब्रुवारीला जाणता राजा महानाट्य उदघाटन कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखविला, नागरिकांचा नाटकाला मिळालेला प्रतिसाद बघता पालकमंत्री मुनगंटीवार यांनी 5 फेब्रुवारीला सदर प्रयोग हा विना पास ने सर्व सामान्य नागरिकांना आयोजित करण्यात आल्याची घोषणा उदघाटन कार्यक्रमात केली. No pass required

     

    राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार पद्मविभूषण इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे  लिखित व दिग्दर्शित केलेला हा प्रयोग चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने फिरत्या रंगमंचावर रंगला.

     

     

    दररोज सायंकाळी 6 वाजता या प्रयोगाला सुरुवात होईल. उंट ,घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमाचे जिवंत चित्रण 200 च्या वर कलाकार करणार आहेत.