Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Chandrapur Van Prabodhini : चंद्रपूर वन प्रबोधिनीला नागरी सेवा प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय थ्री स्टार मानांकन

    Chandrapur Van Prabodhini : चंद्रपूर वन प्रबोधिनीला नागरी सेवा प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय थ्री स्टार मानांकन

    chandrapur van prabodhini राष्ट्रीय नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांच्या (NSCSTI) मानकानुसार चंद्रपूर वन प्रबोधिनीला 19 डिसेंबर 2023 ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीकरीता उत्कृष्ट थ्री स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. चंद्रपूर वन प्रबोधिनीच्या नागरी सेवा प्रशिक्षणातील उत्कृष्टतेची दखल घेऊन क्षमता निर्माण आयोगाने ही मान्यता प्रदान केली आहे.  ज्यामुळे वन अधिकारी, पदाधिकारी यांच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता आणि परिणामकारकता वाढविण्याच्या प्रक्रियेत एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.

    अवश्य वाचा : लाडकी बहीण अडकली केवायसी च्या फेऱ्यात

    ही मान्यता 12 ऑगस्ट 2024 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे झालेल्या नागरी सेवा प्रशिक्षण संस्था अधिवेशनादरम्यान केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करून या संस्थेस गौरविण्यात आले आहे. भारतीय वन सेवा (IFS) अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या डेहराडूनमधील इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी (IGNFA) सोबतच  चंद्रपूर वन प्रबोधिनीला आता भारतातील 14 वन प्रशिक्षण संस्थांपैकी “उत्कृष्ट” श्रेणीमध्ये मान्यता मिळाली आहे. नागरिक सेवा प्रशिक्षण संस्थासाठी राष्ट्रीय मानकांचे एक महत्त्वाचे पाऊल आहे, जे भारतभर नागरिक सेवा प्रशिक्षणाची गुणवत्ता मानकीकरण आणि उन्नतीसाठी समर्पित आहे.

    Chandrapur Van Prabodhini हे मानक “मिशन कर्मयोगी” उपक्रमाचा एक भाग आहेत, ज्याचा उद्देश भविष्यातील नागरिक सेवेला योग्य मानसिकता, कौशल्य आणि ज्ञान विकसित करणे हे आहे. NSCSTI अंतर्गत मान्यता प्रक्रियेत अभ्यासक्रम डिझाइन, शिक्षक विकास,  डिजिटलायझेशन,  सहकार्य यासारख्या आठ मुख्य आधारांवर लक्ष केंद्रित केले जाते. कठोर मूल्यमापन प्रक्रियेमध्ये क्षमता निर्माण आयोग  आणि राष्ट्रीय मान्यता शिक्षण व प्रशिक्षण मंडळ कडून केलेले डेस्कटॉप मूल्यमापन आणि ऑन-साइट मूल्यांकन समाविष्ट आहे.

    या यशाबद्दल आभार व्यक्त करताना अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) तथा चंद्रपूर वन प्रबोधिनीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री सुधीर मुंगंटीवार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख केला. वन प्रबोधिनीला या महत्त्वपुर्ण कामगिरीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि पाठिंबा महत्त्वपूर्ण ठरला आहे, असे ते म्हणाले.  

    महत्त्वाचे : चंद्रपूर झाले खड्डेमय, पालकमंत्री मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

    वन प्रबोधिनी नवीनतम आव्हानांचा सामना करण्यासाठी सुसज्ज असलेल्या वन अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आणि विकास करण्याच्या आपल्या मिशनसाठी वचनबद्ध आहे. ही मान्यता अकादमीच्या प्रशिक्षण पद्धतींमध्ये सतत सुधारणा आणि नावीन्यपूर्ण करण्याच्या समर्पणाला अधोरेखित करते. हे सु-संरचित आणि उच्च-गुणवत्तेच्या प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे भारतातील प्रशासनाची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवण्याच्या व्यापक उद्दिष्टांशी देखील अधोरेखित करते. वन प्रबोधिनी यापुढे या मान्यतेचा उपयोग करून वनविभाग आणि देशाच्या नागरी सेवेत आणखी योगदान देत राहील, असा विश्वासही श्री रेड्डी यांनी व्यक्त केला.

  • Ladki Bahin bank Kyc : लाडकी बहीण अडकली केवायसी च्या फेऱ्यात

    Ladki Bahin bank Kyc : लाडकी बहीण अडकली केवायसी च्या फेऱ्यात

    ladki bahin bank kyc मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला, जुलै व ऑगस्ट महिन्याचे 3 हजार रुपये महिपाच्या खात्यात जमा करण्यात आले मात्र अजूनही लाखो बहिणीला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नाही.

    अवश्य वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अधिकृत वेबपोर्टल सुरू


    कारण महिलांचे बँक खाते आधार सोबत लिंक नाही, केवायसी झालेली नाही.
    त्यामुळे हजारो महिला रोज बँकेत जात केवायसी साठी रांगा लावत आहे.
    रक्षा बंधनाच्या पूर्वी खात्यात बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार असा शब्द सरकारने दिला मात्र ऐन रक्षाबंधनाला बहिणी बँकेच्या बाहेर उभ्या आहे.

    राजकारण : चंद्रपुरातील रस्ते खड्डेमुक्त करा – सुधीर मुनगंटीवार

    Ladki bahin bank kyc बँक खात्यात पैसे न आल्यामुळे लाडकी बहीण केवायसी च्या फेऱ्यात अडकली आहे. मोठ्या प्रमाणात माहिला बँकेत केवायसी करण्यासाठी येत असल्याने बँकेतील कर्मचारी सुद्धा हैराण झाले आहे.

    बँकेने मुख्यमंत्री शिंदे यांना केली सुरक्षेची मागणी

    माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. मात्र ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसै मिळाले नाहीत अशा महिला बँकेत गर्दी करत आहेत. सोबतच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी, आधार लिंक स्टेटस पाहण्यासाठीही महिलांची बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. आपले काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी अनेक महिला बँक कर्मचाऱ्यांशी भांडणही करत आहेत. याच कारणामुळे महिलांची बँकांत होणारी वाढती गर्दी लक्षात घेता बँक कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांना बँकेत सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे.

    असा करा अर्ज

    शासनाने अर्ज करण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीद्वारे लाभार्थी अर्ज करू शकतात, ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नसल्यास त्या महिला ऑफलाईन अर्ज करू शकतात, ऑफलाईन अर्ज अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांच्याकडे करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाने नारीशक्ती दूत हे अँप व ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र याठिकाणी जावून लाभार्थी महिला आपला अर्ज ऑनलाईन भरू शकतात.

    आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसल्याने साधारण 27 लाख पात्र महिलांना या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर घरबसल्या आधार क्रमांक बँक खात्याला कसे लिकं करायचे? हे जाणून घेऊ या…

    सर्वांत अगोदर माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना तुम्ही दिलेले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे की नाही? हे कसे तपासावे ते पाहुया.  हे तपासण्यासाठी तुम्हाला आधार कार्डच्या https://uidai.gov.in    या संकेतस्थळावर जावे लागेल.   

    त्यासाठी गुगल वरती सर्च करा My Adhar 
    आता तुमच्यासमोर माय आधारची वेबसाईट आली असेल त्यावर क्लिक करा. 
    आता तुम्हाला तुमचा आधार नंबरने लॉगिन करायचं आहे. त्यासाठी आधार कार्ड नंबर आणि खाली दिलेल्या कॅपचा भरावा लागेल. 

    त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येणार तो टाका. 
    ओटीपी टाकल्यानंतर आता तुम्ही आधार कार्डच्या संकेतस्थळावर लॉगिन झाले आहात. 
    आता तुमच्यासमोर डॅशबोर्ड आला असेल.
    आता तुम्हाला खाली Bank seeding status हा ऑप्शन आला असेल त्यावर क्लिक करा. 
    आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, तुमच्या बँकेचे नाव, आणि तुमचा खाते अॅक्टिव्ह आहे की नाही याची संपूर्ण माहिती आली असेल.  

  • Pothole free roads : रस्त्यात खड्डे, पालकमंत्री मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

    Pothole free roads : रस्त्यात खड्डे, पालकमंत्री मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

    Pothole free roads गेल्‍या काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्‍यामुळे संपूर्ण जिल्ह्यात रस्त्यांवर खड्डे पडले असून अपघातांची शक्‍यता वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत जिल्ह्यातील रस्ते तातडीने खड्डेमुक्त करण्याचे निर्देश दिले.

    समाजकारण : स्वखर्चातून गंगापूर गावात लावला आरो, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांचा पुढाकार

    या बैठकीला अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्‍हाधिकारी दगडू कुंभार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरूण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले व सुनील कुंभे, मनपा आयुक्‍त विपीन पालीवाल, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री. बोबडे, जिल्‍हा परिषदेचे कार्यकारी अभियंता श्री. पेंदे, मुख्‍य अभियंता विजय बोरीकर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    Pothole free roads या बैठकीत श्री. मुनगंटीवार यांनी रस्‍त्‍यांवरील खड्डयांचा आढावा घेतला. जिल्‍हा परिषदेनुसार जिल्‍हयात ओडीआर व व्‍हीआर चे 6 हजार किमीचे रस्‍ते आहेत, ज्‍यापैकी 450 किमी रस्‍त्‍यांचे नुकसान झाले आहे. याच्या तात्‍पुरत्‍या दुरूस्‍तीसाठी 5 कोटी रू. तर स्‍थायी दुरूस्‍तीसाठी 115 कोटी रूपयांची गरज आहे. याकरिता राज्‍याच्‍या ग्रामविकास विभागाला ताबडतोब निधीची मागणी करावी असे आदेश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. सिडीवर्कचे 39 रस्‍ते खराब झाले आहे, ज्‍याकरिता 1 कोटी 10 लक्ष रूपये लागतील असे अधिका-यांनी सांगीतले. हा निधी जिल्‍हा नियोजन समितीतून घ्‍यावा, असेही निर्देश श्री. मुनगंटीवार यांनी दिले.

    जिल्‍हयात राष्ट्रीय महामार्गाच्‍या गडचिरोली विभागाच्‍या अखत्‍यारित चंद्रपूर जिल्‍हयात 219 किमी तर नागपूर विभागात चंद्रपूर जिल्‍हयात 50 किमी रस्‍ता आहे. या रस्‍त्‍यांवर मोठमोठे खड्डे पडले असून त्‍याची दुरूस्‍ती कंत्राटदारांकडून पावसाने उसंत घेतल्‍यास 7दिवसात करून घेतल्‍या जाईल, असे त्‍या विभागातर्फे सांगण्‍यात आले. तसेच श्री. मुनगंटीवार यांनी मुल रोडवरील चिचपल्‍ली गावाजवळ ड्रेनेज सिस्‍टीमसाठी नाल्‍या करण्‍याच्‍या कामात विलंब झाल्‍याबद्दल अधिका-यांना खडसावले. त्‍यावर अधिका-यांनी त्‍या कामाचे अंदाजपत्रक बनवून वरिष्‍ठ अधिका-यांकडे पाठविले असल्‍याची माहिती दिली. लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे, असे निर्देश श्री. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी दिले.

     सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिका-यांनी दिलेल्‍या माहितीनुसार जिल्‍हयात 686 किमीचे राज्‍य रस्‍ते आहेत ज्‍यापैकी 70 किमी चे रस्‍ते खराब झाले आहेत, तर जिल्‍हयात एमडीआर चे 2116 किमीचे रस्‍ते असून त्‍यापैकी 555 किमी चे रस्‍ते खराब झाले आहेत ज्‍यापैकी 70 टक्‍के काम हे डब्‍ल्‍युबीएम पध्‍दतीने करणार आहे. आमच्‍या विभागाकडे 17.57 कोटी रूपये वार्षीक देखभालीसाठी मंजूर झाले आहेत त्‍यापैकी 74 ठिकाणी 2.28 कोटी रूपये तात्‍पुरता खर्च करण्‍यासाठी घेणार आहोत. हे काम पावसाने उसंत घेतल्‍यावर 15 दिवसात पूर्ण करण्‍यात येईल.

    चंद्रपूर महानगरपालिकेच्‍या अधिका-यांच्‍या माहितीनुसार शहरात 600 किमीचे रस्‍ते आहेत. त्‍यापैकी 400 किमीचे रस्‍ते हे सिमेंटचे आहेत. सध्‍या रस्‍त्‍याच्‍या तात्‍पुरत्‍या दुरूस्‍तीसाठी 40 लाख रूपयांची तर स्‍थायी दुरूस्‍तीसाठी 2 कोटी रूपयांचे तरतूद आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहे अशा रस्त्यांना त्वरित दुरुस्ती करण्याचे आदेश श्री. मुनगंटीवार यांनी बैठकीत दिले.

    यावेळी बोलताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, बागला चौक ते बाबुपेठ ब्रिज हा रस्‍ता अतिशय खराब झाला असून त्‍याच्‍यासह गावातील मुख्‍य रस्‍ते सिमेंटचे करावेत, ज्‍यामध्‍ये उत्‍तम लायटींग करावी. पालकमंत्री यांनी बेलसनी येथील रस्‍ता न झाल्‍याबद्दल तिव्र नाराजी व्‍यक्‍त केली. या बैठकीत अनेक पदाधिका-यांनी अनेक ठिकाणी रस्ते खराब आहे यासंदर्भात माहिती दिली. श्री. मुनगंटीवार यांनी ताबडतोब रस्ते दुरुस्त करण्याच्या अधिकारी यांना सूचना दिल्या.

     बैठकीला विविध विभागाचे अधिकारी यांच्यासह देवराव भोंगळे, राहूल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, अमर बोडलावार, बंडू गौरकार उपस्थित होते.

  • Sudhir Mungantiwar : लाडक्या बहिणी म्हणतात, धन्यवाद सुधीर भाऊ

    Sudhir Mungantiwar : लाडक्या बहिणी म्हणतात, धन्यवाद सुधीर भाऊ

    Sudhir mungantiwar महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यकरिता सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला, विशेष म्हणजे लाभार्थी महिलांना 14 ऑगस्ट पासून योजनेचा पहिला हफ्ता त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला.
    आज चंद्रपूर जिल्हा प्रशासनातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    अवश्य वाचा : शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी शब्द दिला आणि लगेच केला पूर्ण


    Sudhir mungantiwar प्रियदर्शिनी सभागृहात 17 ऑगस्टला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महिलांना योजनेच्या प्रतिकात्मक धनादेशाचे वाटप करण्यात आले.
    पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले की महायुती सरकारने महिलांना या योजनेद्वारे मोठा आधार दिला आहे, आधी महिलांना पैश्यांची गरज भासली की त्यांना पती ची वाट बघावी लागत होती पण आता तसे होणार नाही, आज महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आहे.
    आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या अंगणवाडी ताई व सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस सह जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यांचे लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल आभार मानले.

    योजना : लाडक्या बहीण योजनेचे वेबपोर्टल सुरू

    1 जुलै पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली होती, या योजनेला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला, 14 ऑगस्टला महिला लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरू झाले, चंद्रपूर जिल्ह्यात हजारो महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.

    लाभार्थी महिला म्हणतात की आधी सदर योजनेत नोंदणी करण्यासाठी त्रास झाला, अनेक समस्या उदभवल्या मात्र पालकमंत्री मुनगंटीवार यांनी बहिणींची अडचण लक्षात घेत विविध ठिकाणी आपल्या माध्यमातून मोफत अर्ज नोंदणी केंद्र सुरू केले, त्यातून आम्हाला दिलासा मिळाला व आमची नोंदणी लवकर झाली.

    पालकमंत्री मुनगंटीवार यांनी बहिणींना दिलेला शब्द पाळल्यामुळे आज आम्ही सर्व महिला त्यांचे आभार मानण्यासाठी या कार्यक्रमात सामील झालेलो आहे. अशी प्रतिक्रिया आज महिलांनी चंद्रपुरात आयोजित लाभ वितरण कार्यक्रमानंतर दिली.

  • Ladki Bahin yojana : लाडकी बहीण लाभार्थी महिलांनी मानले आमदार जोरगेवार यांचे आभार

    Ladki Bahin yojana : लाडकी बहीण लाभार्थी महिलांनी मानले आमदार जोरगेवार यांचे आभार

    ladki bahin yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अधिकाधिक बहिणींना लाभ मिळवून देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध ठिकाणी मदत केंद्रे सुरू केली होती. शासनाच्या वतीने काल, अनेक बहिणींच्या खात्यात 3 हजार रुपये जमा करण्यात आले. दरम्यान, आज शुक्रवारी शेकडो लाडक्या बहिणींनी आमदार किशोर जोरगेवार यांची कार्यालयात भेट घेऊन पुष्पगुच्छ देत त्यांचे आभार मानले.

    महत्त्वाचे : अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार जोरगेवार


      Ladki bahin yojana राज्य शासनाच्या वतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, या योजनेबाबत अनेक महिलांना योग्य माहिती नसल्याने अर्ज दाखल करण्यात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरातील विविध ठिकाणी मदत केंद्रे सुरू केली. यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात हे मदत केंद्र सुरू करण्यात आले होते. या मदत केंद्राच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना योग्य माहिती देऊन त्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने दाखल करण्यात आले.

    या सर्व मदत केंद्रांचा हजारो महिलांनी लाभ घेतला. या केंद्रांच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेल्या बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यात 3 हजार रुपये जमा झाले आहेत. ही योजना गरजू बहिणींसाठी आर्थिक आधार ठरली आहे. ladki bahin yojana

    याच पार्श्वभूमीवर, आज शुक्रवारी, शेकडो लाडक्या बहिणींनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात भेट दिली. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार व्यक्त केले.

    महत्त्वाचे : मामा तलाव फुटण्याच्या मार्गावर

    आमदार किशोर जोरगेवार यांनी लाडकी बहिण योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची सर्वत्र प्रशंसा होत आहे. या योजनेतून महिलांना आर्थिक मदत मिळाल्याने त्यांचे जीवन थोडेसे सुसह्य झाले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी केलेल्या या कार्यामुळे महिलांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. ladki bahin yojana


        यावेळी बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले की, महिलांची भूमिका आपल्या समाजात नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. आपल्या बहिणी, मुली, आणि मातांनी आपल्या संस्कृतीचा, कुटुंबाचा आणि समाजाचा पाया मजबूत केला आहे. त्यांच्यावर अनेकदा जबाबदाऱ्या आणि आव्हाने येतात, आणि त्या त्या परिस्थितीतून स्वतःला आणि कुटुंबाला सांभाळतात. त्यांच्या या प्रवासात, भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे.

    आपल्या सरकारने सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना‘ यासारख्या उपक्रमांमुळे अनेक महिलांना आर्थिक मदत मिळाली आहे, ज्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावणार आहे. आपण आपल्या लाडक्या बहिणींना केवळ आर्थिक मदत देत नाही, तर स्वयंरोजगार निर्मितीसाठी विविध प्रशिक्षण शिबिरं राबवत त्यांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, त्यांच्या स्वप्नांना पंख देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मी प्रत्येक लाडक्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.


        यावेळी काही महिलांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, “या योजनेबाबत माहिती मिळाली होती, परंतु कोणते कागदपत्र द्यायचे याची योग्य माहिती मिळत नव्हती. ‘लिंक नाही’ असे कारण सांगून अर्ज स्वीकारला जात नव्हता, त्यामुळे फॉर्म न भरण्याचेही आम्ही ठरवले होते. मात्र नंतर आमदार किशोर जोरगेवार यांच्या मदत केंद्राबाबत माहिती मिळाल्याने तेथे भेट दिली आणि नि:शुल्क आमचा अर्ज या केंद्राच्या माध्यमातून दाखल केला. ladki bahin yojana

    नसलेली कागदपत्रेही या मदत केंद्राच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे आम्हा लाडक्या बहिणींना या केंद्राच्या माध्यमातून मोठी मदत मिळाली आहे,” असे बहिणींनी म्हटले आहे.

  • crime : चंद्रपुरात गुन्हेगारीचं पारडं जड

    crime : चंद्रपुरात गुन्हेगारीचं पारडं जड

    crime टोळी युद्धात वर्चस्वाच्या लढाईत चंद्रपुरात कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे चंद्रपूर शहरातील गुन्हेगारी विश्व पोलिसांना आव्हान देत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

    मोक्का, आर्म एक्ट, खंडणी, खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल असलेल्या हाजी सरवर शेख ची बिनबा गेट परिसरातील हॉटेल शाही दरबार येथे पाच जणांनी गोळ्या व चाकू हल्ला करीत हत्या केली.
    हाजी ची हत्या केल्यावर आरोपीनी स्थानिक गुन्हे शाखेकडे आत्मसमर्पण केले, पोलिसांनी आरोपिकडून 4 देशी बनावटीची बंदूक व चाकू जप्त केला.

    कोलकाता डॉक्टर अत्याचार : चंद्रपुरात निघाला डॉक्टरांचा मोर्चा


    Crime हाजी ची हत्या जुन्या संघर्षातून केली असल्याची माहिती आरोपीनी पोलिसांना दिली, आरोपीमध्ये दिग्रस येथील समीर शेख सह असे एकूण 6 आरोपीला अटक करण्यात आली.

    मुख्य आरोपी समीर शेख हा एक दिवसांपूर्वी आपल्या सहकाऱ्यासोबत चंद्रपुरात आला होता, त्यांनी हाजी ची रेकी करीत त्याच्यावर गोळ्या झाडल्या.
    आरोपी हाजी वर हल्ला करताना अक्षरशः तुटून पडले होते, तो जिवंत राहू नये यासाठी चाकूने सपासप वार केले.

    खाकी चा वचक कमी झाला?


    Crime मागील 40 दिवसात सार्वजनिक ठिकाणी गोळीबार व बॉम्ब हल्ल्याच्या घटना घडल्या, पहिल्या घटनेनंतर पोलिसांनी कठोर पावले उचलायला हवी होती मात्र तसे काही झाले नाही.
    विशेष बाब म्हणजे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची चंद्रपूर जिल्ह्यात वर्णी लागताच 2 ते 3 महिने जिल्ह्यातील अवैध धंदे पूर्णतः बंद होते, मात्र त्यानंतर सर्व अवैध धंदे पुन्हा सुरू झाले, सुगंधित तंबाखू तस्करी, अवैध कोळसा, सट्टा, देशी बंदुक व काडतुसे चा व्यापार अश्या अनेक अवैध धंद्याना उत का बरं आला? हा मोठा प्रश्न आहे.

    योजना : लाडकी बहीण योजनेबाबत उडाली ही अफवा

    स्थानिक गुन्हे शाखा गुन्हेगारीवर वचक ठेवण्यास अपयशी?

    जिल्ह्यातील गुन्हे, अवैध धंदे यावर लक्ष व नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आहे, मात्र चंद्रपूर जिल्ह्यात घडणारे मोठे गुन्हे, बंदूक, काडतुसे यांची वाहतूक याबाबत यंत्रणा काय करीत आहे असे प्रश्न सध्या जनसामान्यांद्वारे विचारण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारीची दखल गृह विभागाने घेतली असून चंद्रपूर पोलीस दलात मोठे फेरबदल होणार असून काही वरिष्ठ अधिकारी यांची बदली होणार असे संकेत गृह विभागाने दिले आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात 40 दिवसात गोळीबार, 40 काडतुसे, पेट्रोल बॉम्ब, बनावट बॉम्ब, बंदुका जप्त अश्या घटना घडल्या, बंदूक सारखी वस्तू जेव्हा जिल्ह्यात दाखल झाली त्यावेळी पोलिसांच्या यंत्रणेला कसलाही थांगपत्ता का लागला नाही?

    आधीचं चंद्रपूर

    पूर्वी चंद्रपूर पोलीस दररोज रात्री पेट्रोलिंग करायची, रात्री कुणी फिरताना दिसलं की पोलीस त्याला त्याचे नाव, नंबर कुठून आला, कुठे जात आहे? याबाबत शहानिशा करायची, रात्रीचे 10.30 वाजले की पोलिसांचे वाहन दुकानदाराला दुकान लवकर बंद करा असे निर्देश द्यायचे.

    आता रात्री विविध चौकात वाढदिवसाचे केक कापल्या जातात, त्याठिकाणी हुडदंग घालण्यात येतो, अनेजजन रात्री बेरात्री शहरात बिनधास्त फिरत असतात, कुणीही त्यांना थांबवित नाही, तो कदाचित गुन्हेगार सुद्धा असू शकतो, शहरात असे काही ठिकाण आहे जे मध्यरात्री 2 वाजेपर्यंत सुरू असतात, त्याठिकाणी काही कुख्यात गुन्हेगार आपले ठाण मांडून बसून असतात.

  • majhi ladki bahin yojana 2024 : लाडकी बहीण योजना होणार बंद?

    majhi ladki bahin yojana 2024 : लाडकी बहीण योजना होणार बंद?

    majhi ladki bahin yojana 2024 महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, सदर योजनेत महिलांना आधी अर्ज करण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र सरकारने त्या अडचणी दूर केल्या.

    महत्वाचे : नवीन चंद्रपुरात 10 घरांची योजना

    majhi ladki bahin yojana 2024 14 ऑगस्ट पासून राज्यातील कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये जमा झाले, ज्यांनी जुलै महिन्यात अर्ज भरले त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे, ज्यांनी नंतर अर्ज केला त्यांना पुढील दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे.

    मात्र सध्या सदर योजना 31 ऑगस्ट नंतर बंद करण्यात येणार आहे अशी अफवा सध्या जोर पकडत आहे, याबाबत चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे.

    काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार बघा

    राज्यात महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी सुरू केलेली महायुती सरकारची लाडकी बहीण योजनेला कोट्यवधी महिलांनी पसंती दाखवीत अर्ज नोंदणी केली, 14 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये सरकार द्वारे पाठविण्याचे काम सुरू झाले आहे.
    चंद्रपूर जिल्ह्यातील 2 लक्ष 81 हजार अर्जाला मंजुरी दिली अशी माहिती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली, मात्र आता सदर योजना 31 ऑगस्ट नंतर बंद करण्यात येणार अशी अफवा सुरू आहे, पण ही योजना कधीच बंद होणार नाही, 31 ऑगस्ट नंतर सुद्धा महिल या योजनेसाठी अर्ज करू शकतात, अर्ज मंजूर झाल्यावर त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार अशी ग्वाही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिली.

  • independance day post : स्वातंत्र्य दिनाची प्रेरणा घेत देशसेवेच्या भावनेने प्रेरित व्हा – आ. किशोर जोरगेवार

    independance day post : स्वातंत्र्य दिनाची प्रेरणा घेत देशसेवेच्या भावनेने प्रेरित व्हा – आ. किशोर जोरगेवार

    independance day post  आपल्या स्वातंत्र्याच्या मागे असंख्य स्वातंत्र्य सैनिकांचे अथक परिश्रम, त्याग, बलिदान आणि देशभक्तीची भावना आहे. अनेक नायकांनी आपले जीवन देशासाठी समर्पित केले. त्यांच्या या बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा आनंद अनुभवत आहोत. आजच्या या  दिनाची प्रेरणा घेत देशसेवेच्या भावनेने प्रेरित व्हा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    सविस्तर : चंद्रपूरात 10 हजार घरांची योजना

    independance day post स्वातंत्र दिना निमित्त आदिवासी समाजाच्या वतीने बिरसा मुंडा चौक येथे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेयावेळी प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमांना अशोक तुमराम यांच्या सह समाज बांधवांची उपस्थिती होती.

    महत्त्वाचे : बाबूपेठ उड्डाणपूलाचे काम होणार पूर्ण, आमदार जोरगेवार यांचा पाठपुरावा


      स्वातंत्र्य दिन हा आपल्यासाठी केवळ एक दिवस साजरा करण्याचा क्षण नाही, तर तो आपल्या कर्तव्यांची आठवण करून देणारा आहे. आजही आपल्यासमोर असलेल्या शिक्षणाचा अभाव, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संरक्षण. या सर्व आव्हानांचा सामना करून आपल्या देशाला अधिक सशक्त, समृद्ध आणि स्वावलंबी बनविणे हे आपले कर्तव्य आहे. आपण आपल्या देशासाठी काय करीत आहोत, या विचाराने प्रत्येक भारतीयाने प्रेरित व्हावे. स्वातंत्र्याचा खरा अर्थ आपल्या विचारात, आचारात आणि कृतीत दिसला पाहिजे. आपण एकत्र येऊन समाजाच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे,देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम योगदान देण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण होताच उपस्थितांनी तिरंग्याला सलामी देत राष्ट्रगाण गाईले.

  • Big Road Accident : चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात, 4 युवक जागीच ठार

    Big Road Accident : चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात, 4 युवक जागीच ठार

    big road accident गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील गडचांदूर-भोयेगाव मार्गावरील निमणी-लखमापूर मार्गावरील दूध डेअरी जवळ आज 13 ऑगस्टच्या मध्यरात्री अंदाजे 1 ते 2 वाजताच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव अर्टिगा कार ने मागून जोरदार धडक दिल्याने जिवती तालुक्यातील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

    राजकीय : विधानसभेची उमेदवारी द्या, 75 हजार मतांची आघाडी घेत निवडून येणार


    Big road accident जिवती तालुक्यातील 5 तरुण MH-04 FR-4081 या अर्टिगा कारने चंद्रपूर वरून गडचांदूर कडे येत असताना गडचांदूर पासून अवघ्या 5 ते 7 किमी अंतरावर असलेल्या लखमापूर-बाखर्डी मार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक MH-18 N-6656 ला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत सुरज गव्हाले वय 22 रा. शेणगाव, सुनील किजगीर वय 27 रा. शेणगाव, आकाश पेंदोर 22 रा. पाटण, श्रेयश पाटील वय 22 रा. टाटाकोहोड ह्या चौघांचा जागीच मृत्यू झाला तर अजय गायकवाड रा. कोलामगुडा हा गंभीर जखमी झाला.


    अपघाताची माहिती मिळताच गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह पोस्टमार्टम करिता पाठविला व गंभीर जखमी युवकास उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मात्र जखमी युवक गंभीर जखमी असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविले असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. सदर घटनेमुळे जिवती तालुक्यात शोककळा पसरली आहे.

    अवश्य वाचा : कुख्यात गुन्हेगारांची चंद्रपुरात गोळ्या झाडून हत्या


    मागच्या आठवड्यात सुद्धा याच मार्गावर उभ्या ट्रकला धडक दिल्याने दोन जणांच्या मृत्यू झाला होता. परत रात्री अशीच पुनरावृत्ती झाल्याने मार्गावर पुन्हा भीषण अपघात घडल्याने लोक संतापले आहेत. खबरदारी म्हणून पोलिसांनी रात्रीच अपघातग्रस्त कारला रस्त्याच्या बाजूला करत उभ्या ट्रकला पोलीस स्टेशन मध्ये आणले व रास्ता खुला रहदारीस केला. समोरील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे.

    भोयेगाव-गडचांदूर मार्गावर अपघाताचे सत्र

    काही वर्षांपासून सुरू झालेल्या या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, सदर मार्गावर रोज 2 ते 3 अपघात होतात, या मार्गावर सर्व्हिस रोड नाही, रस्त्यावर वाहने उभे करू नका असे प्रशासनाचे निर्देश असताना सुद्धा चालक वर्ग प्रशासनाच्या आदेशाला जुमानत नाही.

  • Journalist Award : चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा

    Journalist Award : चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा

    Journalist Award चंद्रपूर – चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या जेष्ठ पत्रकारांना प्रतिष्ठित अशा कर्मवीर पुरस्काराने सन्मानित केल्या जाते. यावर्षी कर्मवीर पुरस्काराचे मानकरी वरिष्ठ पत्रकार संजय लोखंडे(नागपूर )व अशोक पोतदार, (भद्रावती)ठरले आहेत. पुरस्कार वितरण सोहळा 11 ऑगस्टला मा.सा.कन्नमवार सभागृह, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर येथे सकाळी 11.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वने,मत्स व्यवसाय व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रमुख मार्गदर्शक म्हणून हितवाद नागपूरचे वरिष्ठ उपसंपादक कार्तीक लोखंडे तर, प्रमुख पाहुणे म्हणून आ. किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांची उपस्थिती राहणार आहे.

    News18 lokmat
    उत्कृष्ट वार्तांकन वर्गातून मिळाला पुरस्कार

    योजना : लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर


    Journalist award यावेळी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.यात स्व.चांगुणाताई डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार स्मृती प्रित्यर्थ ना.मुनगंटीवार यांचे तर्फे ग्रामीण वार्ता पुरस्कार देण्यात येणार आहे. ग्रामीण वार्ता प्रथम पुरस्कार अनिल पाटील(वरोरा पुण्यनगरी), द्वितीय प्रशांत खुळे,(वरोरा तरुण भारत),तृतीय अमर बुद्धारपवार (नवरगाव, पुण्यनगरी), प्रोत्साहनपर पुरस्कार आमोद गौरकार,(शंकरपूर लोकमत),प्रशांत डांगे,(ब्रह्मपुरीमहासागर) यांना दिला जाणार आहे. तसेच चंद्रपूर शहरातील पत्रकारांसाठी स्व.छगनलाल खजांची स्मृती प्रित्यर्थ,अ‍ॅड.प्रशांत खजांची तर्फे शुभवार्ता पुरस्कार साईनाथ कुचनकर(लोकमत चंद्रपूर), स्व सुरजमलजी राधाकीसन चांडक स्मृती प्रित्यर्थ,गिरीश चांडक यांचे कडून मानवी स्वारस्य अभिरुची पुरस्कार निलेश व्याहाडकर(दै. भास्कर, चंद्रपूर) स्व.रामकुंवर सिंह यांच्या स्मृती प्रित्यर्थ,के के.सिंह यांचे कडून शोध पत्रकारिता डिजिटल (पोर्टल) विभाग विजय सिद्धावार(पब्लिक पंचनामा मूल), स्व श्रीमती सुशीला राजेंद्र दीक्षित यांचे स्मृती प्रित्यर्थ डॉ किर्तीवर्धन दीक्षित यांचे तर्फे उत्कृष्ट वृत्तांकन (टीव्ही) हैदर शेख (टीव्ही 18 लोकमत), इतिहास तज्ञ अशोक सिंह ठाकूर यांचे तर्फे वृत्त छायाचित्र पुरस्कार संजय बांगडे (लोकमत,सिंदेवाही )यांना घोषीत करण्यात आला आहे. तसेच पत्रकार संघातर्फे पत्रकार संघाच्या वाटचालीत योगदान देणार्‍या माजी पत्रकारांना गौरव पुरस्कार दिला जाणार आहे.यात पंकज शर्मा, स्व. गजानन ताजणे, अरविंद खोब्रागडे, प्रशांत देवतळे यांचा समावेश आहे.