Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • chandrapur voter list 2024 : मतदार याद्या प्रसिद्ध, नागरिकांनो आपले नाव तपासा – जिल्हाधिकारी विनय गौडा

    chandrapur voter list 2024 : मतदार याद्या प्रसिद्ध, नागरिकांनो आपले नाव तपासा – जिल्हाधिकारी विनय गौडा

    chandrapur voter list 2024 आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली.

    अवश्य वाचा : आज चंद्रपुरात निघणार मशाल रॅली

    Chandrapur voter list 2024 यात प्रामुख्याने नवमतदारांची नोंदणी, मयत किंवा स्थलांतरीत मतदारांचे नाव वगळणे, मतदार यादीत त्रृटी असल्यास त्यात दुरुस्ती करणे आदींचा समावेश होता. याची फलश्रृती म्हणून जिल्ह्यात तब्बल 38637 मतदारांची वाढ झाली आहे. तसेच जिल्ह्यात आता 1000 पुरुष मतदारांमागे 965 स्त्री मतदार असून लिंग गुणोत्तर 9 ने वाढल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सांगितले.

                जिल्ह्यातील मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिध्दीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी उपस्थित होते.

      chandrapur voter list 2024 पुढे जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, 1 जुलै 2024 च्या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादी 30 ऑगस्ट 2024 रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्र, तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच https://chanda.nic.in या संकेतस्थळावर नागरिकांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, ते लगेच तपासावे, जेणेकरून कोणीही मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही. तसेच निवडणुकीची घोषणा होईपर्यंत नाव नोंदणी किंवा नाव वगळणे ही प्रक्रिया सुरू राहते. त्यामुळे नागरिकांनी वेळात वेळ काढून संबंधित ठिकाणी जावून आपले नाव तपासावे, असे आवाहन त्यांनी केले.

      Chandrapur vote list 2024 जिल्ह्यात 38637 मतदारांची वाढ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात एकूण 17 लक्ष 92 हजार 147 मतदार होते. यात आता 51125 मतदारांची नव्याने नोंदणी झाली असून 12488 नावे मयत किंवा स्थलांतरीत झाल्यामुळे वगळण्यात आली आहे. त्यामुळे आजघडीला जिल्ह्यात 38637 मतदारांची वाढ झाली असून जिल्ह्यात आता एकूण 18 लक्ष 30 हजार 784 मतदार आहेत. यात 9 लक्ष 31 हजार 821 पुरुष मतदार, 8 लक्ष 98 हजार 918 स्त्री मतदार तर 45 इतर मतदारांचा समावेश आहे.

    18 ते 19 वयोगटातील 33825 युवा मतदार : जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील युवा मतदारांची संख्या 10488 ने वाढली असून जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघ मिळून 33825 युवा मतदार आहेत. यात 18801 पुरुष, 15022 स्त्री आणि 2 इतर मतदार यांचा समावेश आहे.

    मतदान केंद्रांची संख्या, 85 वर्षांवरील मतदार तसेच दिव्यांग मतदार : जिल्ह्यात एकूण 2076 मतदार केंद्र असून राजूरा विधानसभा मतदार संघात – 344, चंद्रपूर – 390, बल्लारपूर – 366, ब्रम्हपूरी – 319, चिमूर – 314 आणि वरोरा विधानसभा मतदार संघात 343 मतदान केंद्र आहेत. तसेच जिल्ह्यात 85 वय आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या 13987 आहे. तर दिव्यांग मतदार एकूण 8496 आहेत.

    मतदार यादीत नाव असल्याची खात्री करा : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा व देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये आपला सहभाग नोंदविता यावा, यासाठी सर्व मतदारांनी त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री करावी. यासाठी मतदार यादी सर्व मतदान केंद्र, तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच https://chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यादीमध्ये नाव समाविष्ट नसल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागास प्रत्यक्ष भेट देऊन किंवा व्होटर्स हेल्पलाईन ॲप अथवा www.voters.eci.gov.in या वेब पोर्टलद्वारे अर्ज नमुना क्रमांक 6 भरून आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

  • unidentified dead body : तो मृतदेह बघतोय ओळखीची वाट

    unidentified dead body : तो मृतदेह बघतोय ओळखीची वाट

    unidentified dead body
    राज्यात दररोज अनेक अनोळखी मृतदेह आढळत असतात काहींचे नैसर्गिक मृत्यू तर काहींची हत्या करण्यात येते,

    मात्र त्यांची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांसमोर असल्याने तेही कसोशीने प्रयत्न करतात, काही प्रकरणात पोलिसांना यश मिळत तर काही प्रकरणात मृतदेहाला ओळख पटत नाही, असाच एक प्रकार राज्यातील ठाणे जिल्ह्यात घडला आहे.
    unidentified dead body ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ पूर्व येथील शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काकोळे गावाच्या डोंगरावर 19 जून रोजी 30 वर्षीय महिलेचा मृतदेह पोलिसांना मिळाला.
    त्या महिलेची अज्ञात इसमाने ओढणीने गळा आवळून तिला ठार केले व पुरावा नष्ट करण्यासाठी काकोळे गावाच्या डोंगराजवळ त्या महिलेचा मृतदेह झुडपात फेकला.
    मयत महिलेचा मृतदेह पोलिसांना कुजलेल्या स्थितीत आढळून आल्याने तिची ओळख सध्यातरी पटलेली नाही, अंबरनाथ पूर्व हद्दीत अनेकांना त्या वर्णनाच्या महिलेबाबत विचारणा पोलिसांनी केली मात्र अद्यापही त्या मृतक महिलेची ओळख पटलेली नाही.

    अवश्य वाचा : बांधकाम का पाडले म्हणून आमदार अधिकाऱ्यांवर संतापले

    महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे..

    वय अंदाजे 30 वर्ष, अंगात नेसुस मेहंदी रंगाचा सलवार, काळ्या रंगाची स्लिप, गळ्याभोवती हिरव्या रंगाची ओढणी, उजव्या हाताच्या बोटात लाल मणी असलेली धातूची अंगठी.

    unidentified dead body सदर वर्णनाच्या महिलेबाबत कुणाला काही माहिती असेल किंवा कुणाच्या ओळखीची असेल तर त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी 9657811111, 7868872786, शिवाजी नगर पोलीस ठाणे अंबरनाथ पूर्व – 0251-2607020, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत – 9923036232, पोलीस निरीक्षक गुन्हे तुकाराम पादिर – 7744815038 वर सम्पर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

  • Mla Kishor Jorgewar : बस्स झालं… चंद्रपूर मनपाच्या अधिकाऱ्यांवर संतापले आमदार

    Mla Kishor Jorgewar : बस्स झालं… चंद्रपूर मनपाच्या अधिकाऱ्यांवर संतापले आमदार

    mla kishor jorgewar चंद्रपूर शहर वाढत असताना नागरी वस्त्यांसमोर वन विभाग, पुरातन विभाग यांच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच आता ब्लू लाईनवरील बांधकामावर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांनी  जायचे कुठे असा प्रश्न उपस्थित  करत. “एकाही घराला हात लावू नका, ब्लू लाईनवरील घरांवरील कारवाई तात्काळ थांबवा,” असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांना दिले आहेत.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी निलंबित, आमदार अडबाले यांचा पाठपुरावा


    Mla kishor jorgewar आज आमदार किशोर जोरगेवार यांनी महानगरपालिकेत बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीला मनपा आयुक्त विपिन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त रविंद्र भिलावे, शहर नगररचनाकार दहिकर, सहायक नगररचनाकार भोयर, शिरभाते यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
    शहरातील ब्लू लाईनवरील घरांना काढून टाकण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या संदर्भात नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त करत, आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली होती आणि सदर कारवाई थांबविण्याची मागणी केली होती.


    Mla kishor jorgewar ब्लू लाईनवरील बांधकामे वर्षानुवर्षे अस्तित्वात असून, या भागातील अनेक नागरिकांचा व्यवसाय आणि नागरी वस्ती यावर अवलंबून आहे. ही घरे आणि आस्थापने तोडल्यास अनेक लोकांचे रोजगार आणि जीवनमान धोक्यात येईल. त्यामुळे या निर्णयावर मनपा ने  पुनर्विचार करवा अशी मागणी नागरिकांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे केली. त्यानंतर, आज मंगळवारी, आमदार जोरगेवार यांनी मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेत सदर कारवाई थांबविण्याचे निर्देश दिले.


     मागील अनेक वर्षांपासून नागरिक येथे राहत आहेत आणि अनेकांचा व्यवसायही येथे आहे. आधीच अनेक प्रतिबंधाच्या अडचणी नागरिकांपुढे आहेत. अशात मनपाने ब्लू लाईनवरील घरांवर सुरू केलेली कारवाई योग्य नाही. यापुढे एकाही बांधकामावर कारवाई करण्यात येऊ नये, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले. या बैठकीला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती

  • Congress party : महायुती सरकार विरुद्ध चंद्रपुरात कांग्रेसची जोरदार निदर्शने

    Congress party : महायुती सरकार विरुद्ध चंद्रपुरात कांग्रेसची जोरदार निदर्शने

    congress party छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथील पुतळा अवघ्या आठ महिन्यात  कोसळला आहे. या विरोधात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांच्या नेतृत्वात सर्व फ्रंटल ऑरर्गनायझेशनच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक, चंद्रपूर येथे आंदोलन करण्यात आले.

    Congress party अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. 400 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही बुरुज ढासळला नाही. पण, ८ महिन्यांपूर्वी बांधलेला पुतळा कोसळला.

    अवश्य वाचा : आमदार सुधाकर अडबाले यांचा दणका, शिक्षणाधिकारी निलंबित

    याचा अर्थ महायुतीचे हे सरकार 4 डिसेंबर २०२४पूर्वी सत्तेतून नक्कीच कोसळेल आणि या राज्यातील जनता महायुतीचा भ्रष्टाचारी कोथळा बाहेर बाहेर काढेल, राज्यातील तिघाडी सरकार हे भ्रष्टाचारी आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात मलाई खाण्यात आली. या सरकारच्या भ्रष्टाचाराची दहीहंडी फुटल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांनी दिली.

    सरकारच्या भ्रष्टाचाराची दहीहंडी फुटल्याशिवाय राहणार नाही : रितेश (रामू) तिवारी

    Congress party या आंदोलनात इंटकचे राष्ट्रीय सचिव के.के. सिंग, अल्पसंख्याक आघाडीचे सोहेल शेख, माजी महापौर संगिता अमृतकर, माजी महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, अनिरुद्ध वनकर, रमजान अली, सुधाकर अंभोरे, प्रवीण पडवेकर, दुर्गेश कदम, पिंटू शिरवार, गोपाल अमृतकर, मतीन कुरेशी, नरेंद्र बोबडे, राहुल चौधरी, भालचंद्र दानव, नौशाद शेख, राजू वासेकर, सुनंदा ढोबे, मुन्नी बाजी, रेखा वैरागडे, पितांबर कश्यप, राजीव खजांची, यश दत्तात्रय, गुंजन येरणे, गुरफान अली, पितांबर कश्यप, इरमान शेख, ताजुद्दीन शेख, ताज कुरेशी, रमजान अली, वीर, सागर खोब्रागडे, साबीर सिद्धकी, अशोक गडमवार, गौस खान,आमिर शेख, रमीझ शेख, सौरभ ठोंबरे आणि समस्त कार्य करणी उपस्थीत होते.

  • Education Officer suspended : शिक्षक आमदाराच्या दणक्याने वादग्रस्त शिक्षणाधिकारी निलंबित

    Education Officer suspended : शिक्षक आमदाराच्या दणक्याने वादग्रस्त शिक्षणाधिकारी निलंबित

    Education Officer suspended चंद्रपूरच्या तत्‍कालिन शिक्षणाधिकारी (माध्य.) श्रीमती कल्पना चव्हाण निलंबित, आमदार सुधाकर अडबाले यांच्या तारांकित प्रश्नानंतर कारवाई

    Education Officer suspended चंद्रपूर : चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती कल्पना चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या अनियमिततेची झालेल्या चौकशीवर त्यांना तात्काळ निलंबित करावे व त्यांच्या संपत्तीची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी पावसाळी अधिवेशन २०२४ मध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली होती. आठवडाभरात त्यांचा खुलासा प्राप्त होताच निलंबित करू, असे स्पष्ट उत्तर सभागृहात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले होते. त्यानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सहसचिव यांनी चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती कल्पना चव्हाण यांना शासन सेवेतून निलंबित करण्याची कारवाई केली. या कारवाईमुळे शालेय शिक्षण विभागातील अधिकारी वर्गांत खळबळ उडाली आहे.

    अवश्य वाचा : केंद्र सरकारची नवी पेन्शन योजना काय आहे?

    Education Officer suspended चंद्रपूरच्या माध्यमिक शिक्षण विभागात श्रीमती कल्पना चव्हाण तीन वर्षांपूर्वी रुजू झाल्या. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील अनेक शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची प्रकरणे प्रलंबित ठेवली जात होती. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्‍या वतीने आमदार अडबाले यांच्या नेतृत्‍वात त्‍यांच्या विरुध्द अनेकदा आंदोलने करण्यात आली होती. त्यावर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार आयुक्त (शिक्षण) पूणे यांच्याकडे केली होती. त्यांच्या तक्रारीवर शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या तपासणी पथकाने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाची चौकशी केली. त्‍यात त्‍या दोषी आढळून आल्‍या. त्यानंतर श्रीमती चव्हाण यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 च्या नियम 10 अन्वये आयुक्त (शिक्षण) पुणे यांनी दोषी ठरविले. मात्र, पुढे त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. यावर पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना तात्काळ निलंबित करावे व त्यांच्या संपत्तीची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी आमदार अडबाले यांनी ५ जुलै २०२४ रोजी सभागृहात केली होती.

    तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण यांना स्पष्टीकरण देण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटिशीला उत्तर मिळाल्यानंतर आठवडाभरात निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे उत्तर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात दिले होते. त्‍यानंतरही सदर प्रकरणाबाबत आमदार अडबाले सतत पाठपुरावा करीत होते.

    Education Officer suspended शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सहसचिव यांनी चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती कल्पना चव्हाण यांना शासन सेवेतून निलंबित करण्याची कारवाई केली. या शासन आदेशाच्या दिनांकापासून शासन सेवेतून निलंबित करीत आहे आणि पुढील आदेश होईपर्यंत त्‍या निलंबित राहतील, असे आदेशात म्‍हटले आहे. या कारवाईमुळे शालेय शिक्षण व अन्‍य विभागातील अधिकारी वर्गांत खळबळ उडाली आहे. यासोबतच आमदार सुधाकर अडबाले यांच्या तक्रारीवरून विदर्भातील बेशिस्‍त शिक्षणाधिकारी / अधिकारी यांचीही चौकशी सुरू असून लवकरच त्‍यांच्यावर देखील अशाच प्रकारची कारवाई होईल. आमदार अडबाले यांनी एकाच वर्षांत केलेल्‍या या कारवाईमुळे शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून त्‍यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. विदर्भातील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात हलगर्जीपणा व अनियमितता करणाऱ्या शिक्षणाधिकारी/अधिकारी यांची यापुढेही गय केली जाणार नसल्याचे नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी यावेळी सांगितले.

  • Shocking Incident : खर्ऱ्याच्या उधारीसाठी पान ठेला चालकाने अल्पवयीन मुलीचे केले लैंगिक शोषण

    Shocking Incident : खर्ऱ्याच्या उधारीसाठी पान ठेला चालकाने अल्पवयीन मुलीचे केले लैंगिक शोषण

    Shocking Incident चंद्रपूर : राज्यात सुरू असलेल्या महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना चंद्रपुरात पुन्हा धक्कादायक घटनेमुळे जिल्हा हादरून गेला, 52 वर्षीय पान ठेला चालकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली.

    पोलिसांनी आरोपी पान ठेला चालकाला अटक केली आहे, एकाच आठवड्यात या दोन घटनांनी विकृत मानसिकतेचे उदाहरण पुढे आले आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातून वयोश्री योजनेसाठी 10 हजार 766 अर्ज दाखल

    Shocking incident पानठेल्यावर खर्ऱ्याची उधारी चुकविण्यासाठी चक्क १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार दुर्गापूर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी आरोपीवर बबन रोहणकर (५२) याच्यावर कलम ३७६, पोक्सो, ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

    Shocking incident बबन रोहणकर याचा पानठेला आहे. त्याच्या पानठेल्यावर एक १६ वर्षीय मुलगी खर्रा खरेदी करण्यासाठी येत होती. तिची खर्ऱ्याची उधारी तीन हजारांवर पोहोचली होती. बबनने त्या मुलीला खर्ऱ्याची उधारी मागितली. उधारी दिली नाही तर तुझ्या वडिलांना सांगेल अशी धमकीही दिली. मात्र त्या मुलीकडे खर्ऱ्याची उधारी चुकविण्यासाठी तीन हजार रुपये नव्हते. ही संधी साधून बबनने तिला शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करून मागील तीन ते चार महिन्यांपासून तिचे लैंगिक शोषण केले. ती गर्भवती झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. याबाबत दुर्गापूर पोलिस ठाण्यात शनिवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करून ठाणेदार लता वाडीवे यांनी आरोपी बबन रोहनकरला अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव करत आहेत.

    असा उघडकीस आला प्रकार
    पीडित मुलीच्या हालचालीवरून तिच्या आईला संशय आला. तिची तपासणी करण्यासाठी तिला वरोरा येथील रुग्णालयात नेले. यावेळी ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. ही बाब वरोरा पोलिसांना रुग्णालयातर्फे कळविण्यात आली. मात्र घटना ही दुर्गापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने त्यांनी दुर्गापूर पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. दुर्गापूर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक लता वाडीवे यांनी लगेच आरोपीला अटक केली.

    विकृत मानसिकता

    चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड शहरात 6 जणांनी मिळून मनोरुग्ण महिलेवर अत्याचार करीत त्या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला, व्हिडीओ व्हायरल होताच नागरिकांनी संताप व्यक्त केला, पोलिसांनी सदर घटनेत तत्परता दाखवीत आरोपीना अटक केली, या घटनेला 2 दिवस उलटत नाही तर पुन्हा दुर्गापूर येथे घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. दोन्ही घटनेमध्ये आरोपी यांची विकृत मानसिकता असल्याचे निदर्शनास येते. चंद्रपूर जिल्ह्यातील महिला व मुली सुरक्षित रहावे यासाठी सामाजिक संघटना जागृती मशाल मंचतर्फे मध्यरात्री रॅली चे आयोजन केले आहे.

  • Gmc chandrapur : चंद्रपूर मेडिकल कॉलेज मध्ये फोटोग्राफी/व्हिडीओ काढण्यास मनाई

    Gmc chandrapur : चंद्रपूर मेडिकल कॉलेज मध्ये फोटोग्राफी/व्हिडीओ काढण्यास मनाई

    gmc chandrapur शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर (जिल्हा सामान्य रुग्णालय) येथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व रुग्णालयात विनाकारण होणारी गर्दी टाळण्याकरिता 1 ऑगस्ट 2024 पासून महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे 26 ऑगस्ट 2024 पासून रुग्णांना भेटण्याकरिता नातेवाईकांसाठी पास बंधनकारक करण्यात येणार आहे.

    Gmc chandrapur रुग्णालयात रुग्ण भरती झाल्यानंतर फॉर्म भरतेवेळी रुग्णासोबत थांबणाऱ्या नातेवाईकाकडे एक हिरव्या रंगाचा व एक लाल रंगाचा पास देण्यात येईल. हिरव्या रंगाचा पास हा रुग्णाजवळ नेहमी थांबणाऱ्या नातेवाईकांकरिता असेल, तर लाल रंगाचा पास हा रुग्णालय प्रशासनामार्फत भेटीसाठी नेमून दिलेल्या दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत इतर नातेवाईकांना भेटण्याकरिता राहील. लाल रंगाच्या पास वर एकावेळी एका नातेवाईकाला रुग्णास भेटण्याची परवानगी देण्यात येईल. तसेच आधी गेलेला नातेवाईक परत आल्यानंतर त्याच पासचा वापर करून दुसऱ्या नातेवाईकास आत प्रवेश देण्यात येईल. सदर पासची वैधता 7 दिवसांकरिता राहील.

    अवश्य वाचा : 3 वर्षांपासून रखडलेलं काम, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी एका झटक्यात केलं

    Gmc chandrapur रुग्ण जर 7 दिवसांपेक्षा जास्त कालावधीकरिता भरती राहिल्यास सदर पासवर आंतररुग्ण नोंदणी विभागातून नवीन तारखेचा शिक्का मारून घेणे आवश्यक आहे. तसेच पास हरवल्यास 50 रुपये प्रतीपास दंड आकारण्यात येईल. दवाखान्यातून सुट्टी मिळाल्यानंतर रुग्णाकडील दोन्ही पास वॉर्डातील इन्चार्ज सिस्टरकडे जमा करण्यात यावे. त्याशिवाय रुग्णास सुट्टी देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.

    तर होणार 500 रुपये दंड : रुग्णालयाचा आतील व बाहेरील परिसर स्वच्छ राहावा, याकरिता धूम्रपान करणे, पान, गुटखा, खर्रा व इतर तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणे टाळावे. परिसरात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करताना किंवा थुंकताना आढळल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल.

    बाहेरील वाहनांना प्रवेश निर्बंध : रुग्णालय परिसरामध्ये विनाकारण बाहेरील वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. फक्त रुग्णांची ने – आण करण्याकरिता मर्यादित वेळेसाठीच बाहेरील वाहनांना प्रवेश दिला जाईल. रुग्णालयातील कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांना वाहन पासेस उपलब्ध करुन दिल्या जाईल सदर पासच्या आधारे त्यांना रुग्णालयात वाहनासह प्रवेश देण्यात येईल.

    अवश्य वाचा : महाविकास आघाडीच्या आंदोलनात पालकमंत्री मुनगंटीवार व आमदार जोरगेवार यांचा निषेध

    विनापरवानगी फोटो /व्हिडिओग्राफी काढण्यास मनाई : रुग्णालयाच्या आत तसेच परिसरात विनापरवानगी फोटो तसेच व्हिडिओग्राफी काढण्यास मनाई असून असे आढळल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल. फोटो किंवा व्हिडिओग्राफी करायची असल्यास वैद्यकीय अधीक्षक यांची पूर्वपरवानगी घेऊनच काढण्यात यावी, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

    नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन : जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने तैनात झालेले सुरक्षा रक्षक, रुग्णालय प्रशासन, तसेच येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निवृत्ती जीवने यांनी केले आहे.

  • Pratibha Dhanorkar : तक्रार प्राप्त होताच खासदार धानोरकर यांनी 3 वर्षे जुनी समस्याचं सोडवली

    Pratibha Dhanorkar : तक्रार प्राप्त होताच खासदार धानोरकर यांनी 3 वर्षे जुनी समस्याचं सोडवली

    Pratibha Dhanorkar खासदार प्रतिभा धानोरकर या आपल्या लोकसभा क्षेत्रातील नागरीकांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आज त्यांच्या प्रयत्नांतून सलग 3 वर्षा आधीच्या रानडुकराच्या हल्ल्यातील जखमींना आपल्या प्रयत्नातून मदत मिळवून दिली.

    अवश्य वाचा : वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुनीम च्या कुटुंबाला मिळाली वनविभागाच्या वतीने आर्थिक मदत

    Pratibha dhanorkar चंद्रपूर जिल्हा हा वन व्याप्त जिल्हा असल्याने वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडत असतात. या हल्ल्यात जखमी नागरीकांना वन विभागाकडून आर्थिक मदत दिली जात असते. परंतु हि मदत अनेकदा वेळेवर मिळत नसल्याची तक्रार खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या कडे प्राप्त झाली होती.

    Pratibha dhanorkar सन 2021-22 मध्ये वरोरा तालुक्यातील विविध घटनेत पाच नागरीक रानटी डुकरांच्या हल्ल्यात जखमी झाले होते. परंतु तीन वर्ष लोटूनही त्यांना वन विभागाकडून मदत मिळाली नव्हती. या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विशेष प्रयत्न करुन जखमींना तात्काळ मदत मिळण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले. त्याची फलश्रृती म्हणून आज दि. 24 ऑगस्ट रोजी वन विभागाच्या उपस्थितीत रानटी डुकाराच्या हल्ल्यात जखमी झालेल्ल्या त्या पाच नागरीकांना प्रत्येकी 1 लक्ष 25 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप खासदार धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या या कामाने जखमी कुटूंबातील सदस्यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आभार मानले.

    आंदोलन : महिला अत्याचाराविरोधात चंद्रपुरात महाविकास आघाडीचे तोंडाला काळ्या फिता लावीत निषेध आंदोलन

    यावेळी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक राजु चिकटे, वरोरा काँग्रेस कमेटीचे ग्रामीण तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर त्या सोबतच वन विभागाचे अधिकारी व नागरीकांची उपस्थिती होती.

    विशेष बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार वनमंत्री सुद्धा आहे, त्यांना याबाबत वनविभागाच्या वतीने माहिती देण्यात आली नव्हती काय? त्यांच्याकडे त्या नागरिकांनी आर्थिक मदतीसाठी कधी भेट घेतली की नाही? हे अनेक प्रश्न यावरून उपस्थित झाले असले तर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तक्रार प्राप्त होताच संबंधितांना मदत का दिली नाही याबाबत वनविभागाला जाब विचारला आणि काही दिवसात 3 वर्षांपासून मदतीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना मदत मिळाली.

  • Mahavikas Aghadi : पालकमंत्री व स्थानिक आमदार यांचा महाविकास आघाडीच्या आंदोलनात निषेध

    Mahavikas Aghadi : पालकमंत्री व स्थानिक आमदार यांचा महाविकास आघाडीच्या आंदोलनात निषेध

    mahavikas aghadi कलकत्ता, बदलापूर व नागभीड येथे झालेल्या अत्याचार प्रकरणविरोधात आज चंद्रपूर महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळी फित लावत गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.

    महाविकास आघाडीच्या वतीने आज 24 ऑगस्टला बंद पुकारण्यात आला होता मात्र मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद हा नियमबाह्य असल्याचे सांगितले.

    संतापजनक : मनोरुग्ण महिलेवर चंद्रपूर जिल्ह्यात सामूहिक अत्याचार


    देशात व राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत सतत वाढ होत आहे, यावर राज्यातील मुख्यमंत्री व गृहमंत्री पूर्णतः अपयशी ठरले आहे, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने आज करण्यात आली.


    Mahavikas Aghadi आयोजित निषेध आंदोलनात खासदार प्रतिभा धानोरकर, कांग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, कांग्रेस महानगर अध्यक्ष रामू तिवारी, राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्ष शरद पवार गट दीपक जयस्वाल, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, महिला कांग्रेस अध्यक्ष नम्रता ठेमस्कर, शहर अध्यक्ष चंदा वैरागडे, शिवसेनेचे प्रमोद पाटील, कुसुमताई उदार, सुनीता लोढिया, संगीता अमृतकर उपस्थित होते.

    कायदा व सुव्यवस्था : चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू


    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रतिक्रिया दिली की देशात व राज्यात महिला अत्याचार सतत वाढत आहे याबाबत मविआ ने बंद पुकारला होता मात्र न्यायालयाने बंद नियमबाह्य असल्याचे म्हटले होते, शरद पवार यांनी संविधानाचा आदर करीत तोंडाला काळ्या फिति लावत निषेध आंदोलन करण्याचे सांगितले, त्यामुळे आम्ही संविधानाचा आदर करीत आंदोलन करीत आहो. राज्यात घडलेल्या या घटना संतापजनक आहे, मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा.

    राज्य सरकारचा निषेध


    आमदार सुभाष धोटे म्हणाले की 23 ऑगस्टला हिंदू समाजाच्या मोर्च्यात पालकमंत्री व स्थानिक आमदार उपस्थित होते त्यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणी एक शब्द सुद्धा उच्चारला नाही, यावर आम्ही त्यांचा निषेध करतो.
    आयोजित निषेध आंदोलनात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

  • Chandrapur Police : 27 ऑगस्ट पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

    Chandrapur Police : 27 ऑगस्ट पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

    chandrapur police 26 ते २७ ऑगस्ट  दरम्यान  श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला (दहीहांडी) हा सण मोठया उत्साहाने साजरा करण्यात येणार असल्याने जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने 17 ऑगस्ट पासून 27 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम कलम 36 चे पोटकलम अ ते फ लागू करण्यात आले आहे. या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविणे बाबत, सभेचे आयोजन व मिरवणुक काढण्याबबात, मिरवणूकीचे मार्ग निश्चित करण्याबाबत, लाऊडस्पिकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात सकल हिंदू समाजाचा आक्रोश मोर्चा

    Chandrapur police अ) मिरवणुक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांचे वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार,  आ) मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पुजा स्थानाचे जवळ लोकांचे वागणुकीचे निर्बंध घालण्याचे अधिकार, इ) मिरवणुकीस बाधा होणार नाही, याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पुजा स्थानाच्या जवळ  लोकांचे वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, ई) सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे  इत्यादिचे निर्बंध घालण्याचे अधिकार, उ)   रस्ते व इतर सर्व  सार्वजनिक ठिकाणी    सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, ऊ) सार्वजनिक  ठिकाणी/ रस्त्यावर लाउडस्पिकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार ऋ) कलम 33,  35,  37, ते 40, 42, 43, व 45 मुंबई  पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सुचना देण्याचे अधिकार.

    राजकीय आखाडा : राज ठाकरे यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांची तुफान हाणामारी

    सदर आदेश लागू असताना सभा, मिरवणुकीत वाद्य वाजविणे, लाऊडस्पिकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घेण्यात यावी. सर्व बाबतीत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशात नमूद आहे.