Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Railway facilities : चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे सुविधा सुधारण्यावर भर देणार – प्रतिभा धानोरकर

    Railway facilities : चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे सुविधा सुधारण्यावर भर देणार – प्रतिभा धानोरकर

    Railway facilities जिल्ह्यातील नागरीकांसाठी रेल्वे सुविधा अत्यावश्यक असून वेळेची बचत करण्यासाठी रेल्वे सुविधेत वाढ होणे अत्यावश्यक असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दक्षिण-पुर्व-मध्य रेल्वे द्वारा आयोजित बैठकीत केले. सदर बैठक नागपूर येथील हॉटेल तुली इम्पेरिअल येथे संपन्न झाली.

    railway facilities दक्षिण-पुर्व-मध्य रेल्वे अंतर्गत नागपूर येथील हॉटेल तुली इम्पेरिअल येथे बैठकीचे आयोजन दि. 09 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दक्षिण-पुर्व-मध्य रेल्वेच्या समस्यांबद्दल अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. चांदाफोर्ट रेल्वे स्टेशन वर इलेक्ट्रिक लाईट, सीसीटिव्ही कॅमेरा यासारख्या अत्यावश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या.

    अवश्य वाचा : एक घटना आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ओयो हॉटेल आले चर्चेत

    Railway facilities बिलासपूर-चेन्नई सेंट्रल (12851/12852) या गाडीचा चांदाफोर्ट येथे थांबा देण्याची मागणी यावेळी खासदार धानोरकर यांनी केली. जबलपूर-चांदाफोर्ट हि गाडी मागील वर्षी सुरु झाली असून सदर गाडीचा थांबा नागभीड पर्यंत आहे. सदर गाडी बल्लारपूर पर्यंत आल्यास चंद्रपूर शहरासह आजु-बाजूच्या गावातील नागरिकांना याचा लाभ मिळेल. त्याच सोबत सदर गाडीला मुल येथे देखील थांबा देण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.

    बल्लारपूर, नागभीड, गोंदिया या मार्गावरील अनेक गाड्या अनियमित वेळेवर चालत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. सदर गाड्या नियमित वेळेत चालाव्यात या करीता रेल्वे प्रशासनाला सुचना केल्या. चांदाफोर्ट-नागभीड-गोंदिया मेमु पॅसेंजर 10 ऑगस्ट 2023 पासून बंद असल्याने रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी सदर गाडी तात्काळ प्रवाशांच्या सेवेत दाखल करावी.

    बल्लारपूर-नागभीड-गोंदिया यामध्ये दुसऱ्या लाईन चे विद्युतीकरणासोबत काम तात्काळ सुरु करण्यात यावे अशी देखील मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली. रेल्वे मुळे वन्य प्राण्यांचे मृत्यमुखी होण्याचे प्रमाण वाढले असून यावर रेल्वे प्रशासनाने आवश्यक सुधारणा कराव्या. सोबतच अनेक ठिकाणी पावसळ्यात अंडरपास मध्ये पाणी जमा होऊन शेतकऱ्यांना ये-जा करण्याकरिता त्रास होतो, यावर उपाययोजना कराव्यात असे देखील खासदार धानोरकर यांनी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. वरील सर्व मागण्यांसंदर्भात लवकरच तोडगा निघणार असल्याचे दक्षिण-पुर्व-मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीला दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

  • Non-academic work : शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्‍त करा : आमदार सुधाकर अडबाले

    Non-academic work : शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्‍त करा : आमदार सुधाकर अडबाले

    Non-academic work शिक्षकांना शासनातर्फे दिल्या जाणारे अशैक्षणिक कामातून मुक्त करावे या आशयाचे निवेदन आमदार सुधाकर अडबाले यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहे.

    Non-academic work : राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जात असल्‍याने राज्‍यातील शिक्षकांत तीव्र असंतोष आहे. त्यामुळे शिक्षकांची अशैक्षणिक कामांतून तात्काळ मुक्तता करावी व २३ ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी विभागीय आयुक्तांची भेट घेऊन केली.

    जलविद्युत प्रकल्पाचा विक्रमी करार

    अवश्य वाचा : ते राजकीय अतिक्रमण तात्काळ काढा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल – खासदार धानोरकर यांचा इशारा

    राज्‍यातील शिक्षकांना प्रत्यक्ष शिक्षणाव्यतिरिक्त (जनगणना व निवडणूक वगळता) कोणतेच अशैक्षणिक कामे शिक्षकांना देण्यात येऊ नये अशी RTE – २००९ मध्ये तरतूद आहे. परंतु, सतत चालणाऱ्या मतदार नोंदणी व इतर सर्वेक्षण प्रक्रियेत शिक्षकांना गुंतवून अशैक्षणिक कामे दिली जात आहे. आधीच राज्‍यात शिक्षकांची हजारो पदे रिक्‍त असल्‍याने मराठी शाळांचा दर्जा खालावत चालला आहे. शाळांचा दर्जा उंचाविण्यासाठी शिक्षकांना अधिक वेळ द्यावा लागणार आहे. असे असताना त्‍यांना अशैक्षणिक कामे दिली जात आहे.

    Non-academic work शिक्षकांची नियुक्ती जर शिकविण्यासाठी झाली आहे तर शिक्षकांना शिकविण्याचेच काम करू द्यावे. अवांतर कामांचा बोझा शिक्षकांवर लादू नये. त्‍यामुळे गुणवत्तेत परिणाम होतो आहे. याबाबत प्रत्येक अधिवेशनात आमदार सुधाकर अडबाले प्रश्न उपस्थित करून शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्‍त करण्याची मागणी लावून धरीत असतात. यानंतर शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या वर्गीकरण करून शासनास अहवाल सादर केला. त्यानुसार २३ ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णयानुसार शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या वर्गीकरणाबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयानुसार जनगणना, आपत्ती निवारणाची कामे व निवडणुकांची कामे ही कामे वगळता BLO व इतर सर्व अशैक्षणिक कामांतुत तात्‍काळ सर्व शिक्षकांची मुक्‍तता करावी व सदर शासन निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत विभागातील सर्व अधिकारी यांना निर्देश द्यावे, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांना निवेदनाद्वारे केली.

    यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नागपूर महानगर कार्यवाह अविनाश बढे यांची उपस्थिती होती.

  • Ganesh festival in dubai : दुबई येथे सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात

    Ganesh festival in dubai : दुबई येथे सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात

    Ganesh festival in Dubai चंद्रपूर – सर्वानी संघटित व्हावे यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरवात केली. तेव्हा पासून महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्तानाच नव्हे तर हिंदुस्ताना बाहेर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे यामध्ये दुबई देखील मागे नाही.


    Ganesh festival in Dubai यंदा इन्सपायर इवेंट्स आणि दुबईतील विविध सामाजिक संघटना, कंपन्या, आमरोली योग पीठ, सांस्कृतिक मंडळ व मित्र परिवार यांनी दुबई येथे प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय एकत्रितपणे घेतला आहे. वेस्टझोन प्लाझा हाँटेल, अपार्टमेंट कुवैत स्ट्रीट ,मनखुल दुबई शनिवारी सात सप्टेंबर रोजी सकाळी श्रीमंत ढोलताशे पथकांच्या वारणा मध्ये गणरायाचे आगमन आणि प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर दिवसभर भजन व सामुहिक गणेश जाप ,दुपारी आरती, सांस्कृतिक कार्यक्रम, संध्याकाळी आरती, गणेश भजन व जागरण हे कार्यक्रम संपन्न झाले.

    योजना दूत बनून महिण्याला कमवा 10 हजार रुपये

    रविवारी आठ सप्टेंबरला गणेश पूजन, आरती, सामुहिक गणेश जाप,संस्कृती मराठी मंडळाचे सामुहिक अर्थवशीर्ष पठन, संध्याकाळी आरती आणि ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक गणेश विसर्जन व सांगता आरती करण्यात आली अशी आमरोली योगपीठाच्या संचालिका डॉ. शिल्पा अमृतलाल चन्ने यांनी दिली.

  • Oyo Hotel : चंद्रपूर जिल्ह्यातील ओयो का आले चर्चेत?

    Oyo Hotel : चंद्रपूर जिल्ह्यातील ओयो का आले चर्चेत?

    oyo hotel चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेले oyo हॉटेल पुन्हा चर्चेत आले असून त्याचे कारणही तसेच आहे, मात्र यावर चौकशी होणार का? हा सध्यातरी संशोधनाचा विषय आहे.

    Oyo hotel वर्ष 2012 मध्ये Oyo चे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी कमी किमतीत व कमी वेळेत लोकांना हॉटेल बुक करण्यात यावे यासाठी oravel stays च्या नावाने स्टार्ट अप सुरू केला होता, 2013 मध्ये अग्रवाल यांनी स्टार्टअप चे नाव oyo ठेवले आणि या ओयो ने जगात एकच धुमाकूळ घातला. Oyo चा अर्थ म्हणजेच on your own असा आहे.

    सुरुवातीला बजेट हॉटेलचा यामध्ये समावेश होता, हळूहळू ओयो ने जगात पाय पसरवीत तब्बल 80 देशात व्यवसाय सुरू केला असून त्यांनी 10 लाख खोल्या भाडेतत्वावर घेतल्या आहे. आज प्रत्येक पर्यटन स्थळ देशात ओयो चे काम धडाक्यात सुरू आहे, मात्र याबाबत चंद्रपूर जिल्ह्यात चौकशी करण्याची मागणी का झाली आहे, यावर आपण माहिती जाणून घेऊ या.

    महत्त्वाचे : मुख्यमंत्री योजनादुत मध्ये काम करायचे आहे? तर असा करा अर्ज

    Oyo hotels in chandrapur बल्लारपूर शहरात अल्पवयीन मुलीसोबत मुलाने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, त्याबाबत पोलिसात तक्रार झाली, मुलाला अटक झाली मात्र मुलीने दुसऱ्या दिवशी आत्महत्या करीत आपले आयुष्य संपविले, आता आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की यामध्ये ओयो चा काय दोष? दोष आहे, कारण या हॉटेल मध्ये अल्पवयीन मुलींना प्रवेश नाही, कोणत्याही मुलांसोबत या हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलींना प्रवेश नाकारण्यात येतो मग बल्लारपूर मधील त्या ओयो मध्ये परवानगी त्यांना कशी देण्यात आली?

    ओयो रूम बुक करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर होतो, आपल्याला आधारकार्ड व इतर प्रक्रिया पूर्ण केल्यावर रूम बुक होते, मात्र काही ओयो हॉटेल धारक हे नियम पायदळी तुडवीत पैसे कमविण्याच्या नादात अल्पवयीन मुलींना प्रवेश देण्याचे काम करतात, चंद्रपुर शहरात तर झाडी-झुडपात ओयो हॉटेल सुरू आहे, शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय च्या मागे जंगल भागात ओयो सुरू आहे? ती परवानगी त्यांना कशी मिळाली? त्यावर कारवाई का नाही? कारण त्याठिकाणी असे अनेक प्रकार झाल्याची चर्चा सुरू आहे? ओयो च्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांनी सुद्धा अनेक अल्पवयीन मुलींना बघितलं असल्याची माहिती दिली आहे.

    Oyo hotel बल्लारपूर येथील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक, यासह मनसे ने सुद्धा ओयो हॉटेलची चौकशी करण्याची मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे, चंद्रपूर जिल्ह्यात झपाट्याने ओयो ची वाढ होत आहे, ओयो नी जर नियमानुसार कार्य केले तर कुणीही त्याच्यावर नाव बोटं ठेवणार नाही मात्र अल्पवयीन मुलींना प्रवेश दिल्यास ओयो धारक मोठ्या अडचणीमध्ये येऊ शकतो हे निश्चित.

    ओयो हॉटेल: ओयो चंद्रपूर जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करत आहे का? ऑनलाइन प्रणाली वापरून ओयो रूम्स ऑनलाइन बुक करता येतात, जिथे आधार कार्ड आणि इतर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर रूम बुक केली जाते. मात्र, काही ओयो हॉटेल मालक योग्य पडताळणी न करता बेकायदेशीरपणे अल्पवयीन मुलींना प्रवेश देऊन या यंत्रणेचा गैरफायदा घेत असून अशा घटना चंद्रपूर शहरात विशेषत: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया मागील जंगल परिसराजवळ घडत असल्याचा संशय आहेत. त्यांनी यासाठी परवानगी कशी मिळवली आणि कारवाई का झाली नाही? ओयो जवळील रहिवाशांच्या देखील अशा घटना लक्षात आल्या आहेत ज्यात अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.

  • chandrapur crime news : चंद्रपूर जिल्ह्यातील ही महिला दहशतीमध्ये, पोलिसांची भूमिका काय?

    chandrapur crime news : चंद्रपूर जिल्ह्यातील ही महिला दहशतीमध्ये, पोलिसांची भूमिका काय?

    chandrapur crime news चंद्रपूर जिल्हा वर्ष 2024 पासून गुन्हेगारी क्षेत्रात मोठा झाला, यावर्षी खुनाच्या घटना, गोळीबार अश्या विविध घटनेमुळे जिल्हा प्रकाश झोतात आला आता पुन्हा ते सत्र तसेच सुरूच आहे.

    chandrapur crime news चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील नागरी गावात मोठा गुन्हा घडण्याच्या तयारीस असलेली बाब उघडकीस आली आहे, 1 सप्टेंबर ला नागरी गावातील 30 वर्षीय महिला नेहमीप्रमाणे घरी घरकाम करीत होती, सकाळी 11.30 वाजता एक इसम ज्याच्या हातात सत्तुर व चाकू होता त्याने घरचा दरवाजा उघडा असा आरडाओरडा केला, त्यानंतर तो घाणेरड्या शब्दात शिवीगाळ करू लागला, महिला घाबरली, तो इसम म्हणाला की दार उघड आज तुझ्या पतीचा मर्डर करतो, जर तू आडवी आली तर तुला#$%#^ अश्लील शब्दात शिवीगाळ केली.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील oyo ची चौकशी करा, मनसेचे निवेदन

    आरडाओरडा ऐकू आल्यावर शेजाऱ्यांनी त्याठिकाणी गर्दी केली, काहींनी त्या इसमाला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र तो ऐकण्याचा मनस्थिती मध्ये नव्हता, त्याने महिलेच्या घरातील दरवाजा लाता व दगडाने दार तोडत आत प्रवेश केला, त्याने महिलेच्या गळ्याला सत्तुर लावला, महिलेने आरडाओरडा करीत तिथून पळ काढला, या सर्व प्रकरणाची वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

    डॉक्टरसाठी जनता रस्त्यावर

    Chandrapur crime news 36 वर्षीय शंकर रमेश हिवरकर असे त्या आरोपीचे नाव आहे, याबाबत 6 सप्टेंबर रोजी श्रमिक पत्रकार संघात पीडित महिलेने पत्रकार परिषद घेत माहिती दिली. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झाल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक केली मात्र 2 दिवसांनी आरोपी हिवरकर पोलीस कोठडी मधून बाहेर आल्यावर पुन्हा त्याने पीडित महिलेचे घर गाठत त्यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली, 4 सप्टेंबर ला पीडित महिलेने वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली मात्र यंदा पोलिसांनी कारवाई केली नाही असा आरोप पीडित महिलेने पत्रकार परिषदेत आरोप केला.

    Chandrapur crime news सदर प्रकरणाबाबत नागरी येथील महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम मोहीम समिती अध्यक्ष विनोद वाटमोडे यांना याबाबत तक्रार केली, सदर आरोपी हिवरकर हा गावात अवैध दारूविक्री चे काम करतो. विशेष बाब म्हणजे 4 सप्टेंबर ला आरोपी शंकर हिवरकर हा पोलीस कोठडीतून बाहेर आल्यावर पीडित महिलेला पुन्हा शिवीगाळ करीत मी आता बाहेर आलो, पोलीस माझे काही बिघडवू शकत नाही, त्यांना मी पैसे दिले आहे, तुझा व तुझ्या पतीचा मर्डर केल्यावर मी जेल मध्ये जाणार अशी धमकी त्याने दिली.

    महिला सुरक्षेबाबत जिल्ह्यातील सामाजिक संघटना पुढाकार घेत आहे, पोलीस अधीक्षक असे गुन्हे न घडावे यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे, मात्र काही अधिकाऱ्यांमुळे असे गुन्हे घडणार अशी शक्यता निर्माण झाली आहे, नागरी येथील पीडित महिला आज दहशती मध्ये आहे, पती कामानिमित्त बाहेर जातात त्यावेळी महिला आपल्या 2 लहान मुलीसोबत घरी एकटी असते.

    पोलीस आता पुन्हा काही मोठी घटना व्हायची वाट बघत आहे का? असा प्रश्न यावेळी निर्माण झाला आहे. आता पोलीस याबाबत काय कठोर पाऊल उचलतात हे येणारी वेळ सांगणार.

  • Oyo rooms : चंद्रपूर जिल्ह्यातील oyo बाबत मनसे आक्रमक

    Oyo rooms : चंद्रपूर जिल्ह्यातील oyo बाबत मनसे आक्रमक

    oyo rooms चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ओयो व खाजगी हॉटेलमध्ये अल्पवयीन मुला-मुलींना प्रवेश बंद करा

    Oyo rooms महिलांवर आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराने राज्यच नव्हे तर संपूर्ण देश हादरून गेला असुन महिला सुरक्षतेचा खुप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे बदलापूरच्या थरारक प्रसंगानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुर, नागभीड येथील महिलांवर झालेल्या घ्रृण कृत्यानी संपूर्ण जिल्ह्यातील महिला भयभीत झाले असून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या आया बहिनींना सुरक्षीत जीवण कधी येणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत अल्पवयीन मुलीला चॉकलेट खाऊ अशा प्रकारचे आमीश दाखवून राक्षसी वृत्तीचे मानवजातीचे जणावर त्यांच्यावर बळजबरी करतात या प्रकारावर आळा घालण्यासाठी महिला व अल्पवयीन मुलीच्या सुरक्षतेसाठी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

    अवश्य वाचा : शहराच्या मध्यभागी जेव्हा बिबट येतो

    नुकत्याच झालेल्या घटना या ओयो हॉटेल मध्ये घडल्या असुन यावर वेळीच ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे, आपण आपल्या स्तरावर जिल्ह्यातील सर्व ओयो हॉटेल्सची चौकशी करून अल्पवयीन मूलामुलींना प्रवेश बंदि करावी अन्यथा मनसेकडून तीव्र आंदोलन करण्यात येणार असुन याला सर्वस्वी संबंधीत प्रशासन जबाबदार असेल.

    चंद्रपुरात बिबट्या

    या निवेदनावर अतिरिक्त पोलीस अधिक्षक जनबंधू मॅडम यांनी सकारात्मक उत्तर देत सांगितले की आम्ही लवकरात लवकर ही मोहीम सुरू करू अणि कठोर कारवाई करू अशे आश्वासनं दिले, या आशयाचे निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष राहूल बालमवार यांच्या मार्गदर्शनात मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगूलवार आणि मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे ,माजी जिल्हा अध्यक्ष सुनिता ताई गायकवाड ,माजी नगरसेविका सिमाताई रामेडवार, जिल्हा सचिव अर्चना आमटे, बल्लापुर तालुका अध्यक्ष कल्पना ताई पोतर्लावार, अजय अल्लेवार, मंगेश धोटे, विशाल मत्ते, निक्की यादव, अवधुत मेश्राम, उज्वल तेलतुमडे, शुभम वांढरे यांनी पोलीस अधिक्षकांना दिले असुन निवेदन देणार्या शिष्टमंडळात मनसेचे पदाधिकारी तथा मनसैनिक उपस्थीत होते.

  • Mundan Andolan : चंद्रपुरातील युवकांनी महायुती सरकार विरोधात केले मुंडन

    Mundan Andolan : चंद्रपुरातील युवकांनी महायुती सरकार विरोधात केले मुंडन

    mundan andolan सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर 8 महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, यामुळे राज्यातील शिवप्रेमींनी आपला संताप व्यक्त केला.

    अवश्य वाचा : चंद्रपूर शहरात आला बिबट्या

    Mundan andolan महायुती सरकारने कमिशन खोरीच्या नादात भ्रष्टाचार करीत पुतळा उभारला, असा आरोप राज्यातून विविध स्तरातून सरकारवर झाला, राज्यात सरकार विरुद्ध अनेक राजकीय, सामाजिक व शिव प्रेमींनी आंदोलन पुकारले, 4 सप्टेंबर रोजी चंद्रपुरातील शिव प्रेमी जनतेने भव्य निषेध मोर्चा काढला.

    मुंडन आंदोलन

    उर्जानगर-दुर्गापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने महायुती सरकार विरोधात युवकांनी मुंडन आंदोलन करीत निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे, त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे, या घटनेत जे कुणी दोषी आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी याकरिता आम्ही युवकांनी आज मुंडन आंदोलन केले अशी प्रतिक्रिया दिली.

    यावेळी सदिंप बिसेन , सागर धनकसार, नामन पवार, धिरज दुर्योधन, नागेश कडुकर,अंकित वाघमारे मनोज मगांम, राजा शेख,स्वपनिल खांडेकर अमोल दुर्योधन,पीयुष चादेंकर, मनोज इटकर,व असख्य शिवभक्त उपस्थित होते.

  • Section 36 : 19 सप्टेंबर पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

    Section 36 : 19 सप्टेंबर पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

    Section 36 जिल्ह्यात 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवास सुरुवात होत असून 16 सप्टेंबर रोजी ईद-ए- मिलाद निमित्त मुस्लिम समाजतर्फे मिरवणूक कार्यक्रम, 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून 19 सप्टेंबर पर्यंत सार्वजनिक गणेश मुर्तीचे विर्सजन करण्यात येणार आहे.

    Section 36 या दहा दिवसांत विविध धार्मिक सण /उत्सव कार्यक्रम होत असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने तसेच सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला  बाधा पोहचु नये, यासाठी  4 ते 19 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत कलम 36 चे पोटकलम अ ते फ लागू आहे.

    अवश्य वाचा : ताडोबा रिसॉर्ट च्या नावाने 41 लाखांची फसवणूक

    Section 36 या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविणे बाबत, सभेचे आयोजन व मिरवणुक काढण्याबबात, मिरवणूकीचे मार्ग निश्चित करण्याबाबत, लाऊडस्पिकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे. यात अ) मिरवणुक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांचे वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार,  आ) मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पुजा स्थानाचे जवळ लोकांचे वागणुकीचे निर्बंध घालण्याचे अधिकार, इ) मिरवणुकीस बाधा होणार नाही, याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पुजा स्थानाच्या जवळ  लोकांचे वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, ई) सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे  इत्यादिचे निर्बंध घालण्याचे अधिकार, उ)   रस्ते व इतर सर्व  सार्वजनिक ठिकाणी    सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, ऊ) सार्वजनिक  ठिकाणी/ रस्त्यावर लाउडस्पिकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार ऋ) कलम 33,  35,  37, ते 40, 42, 43, व 45 मुंबई  पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सुचना देण्याचे अधिकार.

    मशाल रॅली

    सदर आदेश लागू असताना सभा, मिरवणुकीत वाद्य वाजविणे, लाऊडस्पिकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घेण्यात यावी. सर्व बाबतीत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशात नमूद आहे.  

  • chitra nagari : नागपुरात 100 हेक्टरवर होणार भव्य चित्रनगरी

    chitra nagari : नागपुरात 100 हेक्टरवर होणार भव्य चित्रनगरी

    chitra nagari चित्रपट निर्मितीचा पाया मराठी चित्रपटांनी रचलेला असून आशयसंपन्न मराठी चित्रपटांची पंरपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे.

    Chitra nagari ही परंपरा अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने तसेच मराठी चित्रपटांना व्यापक व्यावसायिक संधी  मिळण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक विभागाच्या वतीने मराठी चित्रपट धोरण तयार करण्यात यावे, त्यासाठीची  समिती गठीत करुन या कामास गती  देण्याच्या सूचना देत नागपूर येथे १०० हेक्टर भव्य चित्रानगरी निर्माण करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिल्या.

    सावधान : ताडोबा रिसॉर्ट च्या नावाने अनेकांची फसवणूक

    मराठी चित्रपट अनुदानासंदर्भात  मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी संबंधितांना विविध महत्वाचे निर्णय घेतले. यावेळी  विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, चित्रनगरी मुबंईच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील,  यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता संघटनेचे , पदाधिकारी, इतर संबंधित उपस्थित होते.


            नागपूर साठी गुड न्यूज!

     Chitra nagari विविध पायाभूत सुविधा आणि अनेक महत्त्वपूर्ण बाबींसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या वैभवात आता भर पडणार आहे; अनेक प्रतीथयश साहित्यकार, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते देणाऱ्या विदर्भाच्या भूमीत चित्रनगरी व्हावी असा मनोदय नाव मुनगंटीवार यांनी आज व्यक्त केला.  मराठी चित्रपटांच्या अधिक दर्जेदार निर्मितीसाठी पूरक वातावरण आणि  संधीची उपलब्धता वाढवण्याचा सांस्कृतिक विभागाचा प्रयत्न असून त्यादृष्टीने मुबंई आणि कोल्हापूर प्रमाणे नागपूर येथे फिल्मसिटी निर्माण करण्यासाठीची आवश्यक कार्यवाही सुरु करण्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी या बैठकीत सूचित केले.

    वीज ग्राहकांसाठी अभय योजना

    तसेच अनुदानाास पात्र ठरलेल्या चित्रपटात महिला दिग्दर्शिका असलेल्या चित्रपटाला अतिरिक्त पाच लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय ही यावेळी घेण्यात आला. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झालेल्या मराठी चित्रपटांना विना परिक्षण  दुप्पट अनुदान देण्यात येईल. तसेच अनुदानासाठी चित्रपटांचे श्रेणीकरण अ, ब, “क” या तीन गटात करण्यात यावे, त्यासाठी श्रेणीकरण समिती गठीत करण्याच्या सूचनाही मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.
      कोवीड काळातील चित्रपटांच्या बाबतीत स्वतंत्रपणे विचार करुन निर्णय घेतला जाईल,असे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी यावेळी सांगितले.

  • Red Alert : 1 सप्टेंबरला चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट

    Red Alert : 1 सप्टेंबरला चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट

    Red alert भारतीय हवामान विभाग हवामानाशी संबंधित इशाऱ्यांसाठी चार वेगवेगळ्या रंगाच्या कोडचा वापर करतात. यामध्ये ऑरेंज, ग्रीन, येल्लो आणि रेड अशा रंगाचा वापर होतो.

    Red alert अनेक दिवसांच्या विश्रांती नंतर चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने जोरदार मुसंडी मारली आहे, दुपारपासून विजेचा कडकडाट सुरू झाला होता, सायंकाळी शहरात मुसळधार पाऊस सुरू झाला.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार यादी प्रसिद्ध, नागरिकांनी आपले नाव यादीत तपासावे..अन्यथा निवडणुकीच्या दिवशी….

    Red alert चंद्रपूर जिल्ह्याला 31 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट तर 1 सप्टेंबर 2024 रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तरी सगळ्या नागरिकांनी सतर्क राहावे. नदी जवळील पाणी वाढत असेल व नालावरून पाणी वेगाने वाहत असेल तर नाला, नदी अथवा पुलावरून पाणी जात असेल तर त्या प्रकारच्या पूलावरून कोणीही रस्ता ओलांडू नये. अथवा वाहन घेऊन जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. तसेच सर्व अधिकाऱ्यांना अलर्ट वर राहून हेड क्वार्टर न सोडण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

    रेड अलर्ट

    जेव्हा एखाद्या भागात अतिमुसळधार, अतिवृष्टी किंवा ढगफुटीचा अंदाज असतो, अशा वेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट म्हणजे मोठ्या संकटाची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घरी राहण्याच्या सूचना दिल्या जातात. पूर, भूस्खलन यासह तत्सम नैसर्गिक आपत्ती ओढवल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्ट जारी केला जाताे. या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावे आणि धोकादायक भागात जाऊ नये, असा असतो.

    थोडक्यात रेड अलर्टमध्ये जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असते. रेड अलर्ट दिल्यानंतर आपात्कालीन विभाग, प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, NDRF, SDRF मदत आणि पुनर्वसन विभाग, विद्युत विभाग, फायर ब्रिगेड, समुद्रकिनारी असमारे तटरक्षक दल आदी प्रमुख विभाग सतर्क राहत असतात. या अलर्टमध्ये यंत्रणा तातडीने काम करण्याची गरज असते. कोणतीही जीवीत व वित्त हानी होऊ नये याची सर्वतोपरी काळजी या यंत्रणा घेत असतात.