Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Special mumbai pune train : तर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा जाहीर सत्कार करणार – पप्पू देशमुख

    Special mumbai pune train : तर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा जाहीर सत्कार करणार – पप्पू देशमुख

    mumbai pune train देशाच्या 28 पैकी 16 राज्यातून या भागात कामानिमित्त आलेले किंवा स्थायिक झालेले नागरिक त्यांच्या राज्याच्या राजधानीमध्ये थेट जाऊ शकतात.त्यासाठी नियमीत रेल्वे गाड्या आहेत. परंतु आमच्याच राज्याच्या राजधानीत मुंबईला जायला बल्लारपूर-चंद्रपूर वरून नियमित गाडी नाही. महाराष्ट्राच्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून सुध्दा मुंबई व पुणेला जाण्यासाठी रेल्वेच्या अनेक नियमित गाड्या आहेत.

    mumbai pune train चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील प्रवाशांसाठी मुंबई किंवा पुणे ला जायला मात्र थेट व नियमित गाडी नाही. आम्ही रेल्वेला कोळसा,सिमेंट व लोहखनिजाच्या वाहतूकीतून दरवर्षी हजारो कोटींचे उत्पन्न देतो. त्यामुळे आमच्या गरजेप्रमाणे मुंबई- पुण्यासाठी नियमित व थेट गाडी मिळणे ही जिल्ह्यातील नागरिकांची मागणी नसून त्यांचा अधिकार आहे. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी मुंबई व पुणे साठी थेट रेल्वेगाड्या सुरू केल्यास त्यांचा जाहीर सत्कार करणार अशी प्रतिक्रिया आज जनविकास सेनेच्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी दिली.

    अवश्य वाचा : तर वंदे भारत एक्सप्रेस होणार बंद

    मुंबई किंवा पुण्याला राहणाऱ्या चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील हजारो युवकांना स्वगावी येण्यासाठी,त्यांच्या वयस्कर आई-वडिलांना तात्काळ गरज पडल्यास मुलांकडे जाण्यासाठी, आपल्या अधिकारासाठी मंत्रालयात चकरा मारणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी, एवढेच नव्हे तर कर्करोग किंवा हृदयविकारासारख्या दुर्धर आजारावर उपचार घेण्यासाठी मुंबईला जाणाऱ्या रुग्णांसाठी नियमीत व थेट गाडी नाही.कशीबशी सुरू असलेली लिंक एक्सप्रेस बंद करण्यात आली.ती सुद्धा पूर्ववत सुरू करण्यात लोकप्रतिनिधींना अजून पर्यंत यश आले नाही. (mumbai pune train)

    चंद्रपुरात हाफ मॅरेथॉन

    अनेक वर्षांपासून आमदारकी, खासदारकी किंवा मंत्रिपद भोगणाऱ्या लोकप्रतिनिधींचे हे यश आहे की अपयश आहे ? गरज व मागणी नसलेली नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्याचा ढोल बडवण्यापेक्षा पालकमंत्र्यांनी थेट मुंबई- पुण्याकरिता नियमित गाडी सुरू करून दाखवावी.हे जनविकास सेनेचे पालकमंत्र्यांना आव्हान आहे. पालकमंत्र्यांनी नियमित गाडी सुरू केल्यास त्यांचा जाहीर सत्कार करू. Indian railway

    मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने मालवाहतुकीतून 5000 कोटी रूपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले

    चंद्रपूर जिल्ह्यातून होणाऱ्या कोळसा, सिमेंट व लोहखनिजाच्या वाहतुकीचा उत्पन्नात मोठा वाटा

    प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत रेल्वेला मालवाहतुकीतून अधिक उत्पन्न मिळते. यामध्ये 60 % च्या वर कोळसा तसेच सिमेंट व लोहखनिजाच्या वाहतूकीचा समावेश असतो. चंद्रपूर जिल्ह्यातून कोळसा, सिमेंट व लोहखनिज या तीनही खनिजांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यानेच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला या वर्षी वेळेपूर्वीच मालवाहतुकीतून 5000 कोटी रूपयांचे उद्दिष्ट गाठणे शक्य झाले. (Mumbai pune train)

    आमचा जिल्हा रेल्वेला हजारो कोटी रूपयांचे उत्पन्न मिळवून देतो. त्यामुळे आमच्या गरजेप्रमाणे बल्लारपूर वरून थेट मुंबई-पुणेला जाण्या करिता नियमित गाडी सुरू करणे रेल्वेचे कर्तव्य आहे.ही आमची मागणी नसून हा आमचा अधिकार आहे. हा अधिकार मिळवण्यासाठी 30 सप्टेंबर पासून जनविकास सेनेतर्फे जन आंदोलन सुरू करण्यात येत आहे. 30 सप्टेंबर रोजी बल्लारपूर रेल्वे स्थानका समोर धिक्कार आंदोलन करून जनआंदोलनाची सुरुवात होईल.

    जड वाहतूक बंद

  • Vande Bharat train ticket price : तर नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस बंद पडणार

    Vande Bharat train ticket price : तर नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस बंद पडणार

    Vande Bharat train ticket price चंद्रपूर : जनतेची मागणी नसताना सुरू करण्यात आलेली नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस नियमित तोट्यामुळे रेल्वे मंत्रालयाला बंद करावी लागणार असा दावा जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे केला.

    Vande Bharat train ticket price निवडणुकीच्या तोंडावर जनतेची दिशाभूल करण्यासाठी नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. रेल्वे सेवेच्या बाबत चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाचा जनविकास सेनेतर्फे 25 सप्टेंबर रोजी एका पत्रकार परिषदेत पर्दाफाश करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे एकूण 800 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या 42 वंदे भारत एक्सप्रेस योग्य मार्गाअभावी रेल्वे विभागाकडे पडून असल्याची माहिती एका वर्तमानपत्रामध्ये नुकतीच प्रकाशित झाली. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर या भागातील जनतेची कोणतीही मागणी नसताना नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस लादण्यात आली का ?असा प्रश्नही जनविकास सेने तर्फे उपस्थित करण्यात आला आहे.

    तर या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार – विजय वडेट्टीवार


    ट्रेनला प्रवासी मिळे ना
    आक्युपन्सी रेट केवळ 15-20%

    80-85 % खुर्च्या रिकाम्या

    16 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. या ट्रेनचा आक्युपन्सी रेट(occupancy rate) आतापर्यंत वीस टक्के पेक्षा जास्त गेलेला नाही.या गाडीत चेअर कारचे 18 तर एक्झिक्युटिव्ह क्लासचे 2 असे एकूण 20 डबे आहेत. 20 डब्ब्यातील एकूण 1440 आसनांपैकी 80 ते 85 टक्के आसने रिक्त राहतात. मागील दहा दिवसात या गाडीचा आक्युपन्सी रेट 15 ते 20 टक्क्यांच्या वर गेलेला नाही. ट्रेनमध्ये सेवा देण्यासाठी नियुक्त 80 च्या जवळपास कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च निघणेही शक्य नाही. त्यामुळे लवकरच डब्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. प्रवाशी संख्या वाढण्याची शक्यता नसल्याने ट्रेन बंद करावी लागणार असा जनविकास सेनेचा दावा आहे. (Vande Bharat train ticket price)


    तिकिट दर कमी करणे हाच एकमेव उपाय

    नागपूर किंवा बल्लारपूर वरून दररोज 10 ते 15 गाड्या सिकंदराबाद( हैदराबाद) साठी धावतात. शताब्दी,राजधानी व दुरांतो एक्सप्रेस सारख्या गाड्यांचा यामध्ये समावेश आहे. 4 ते 6 गाड्यांचा चंद्रपूरला सुद्धा दररोज थांबा असतो.
    वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर स्लीपर पेक्षा चार पटीने व 3 टायर एसी पेक्षा दीडपट जास्त आहेत. लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा हा अखेरचा टप्पा असल्याने रिझर्वेशन सहज मिळते. प्रवास करण्यासाठी एक दोन तास जास्त लागत असले तरी पैशाची मोठी बचत होते.

    चंद्रपुरात 100 कोटीचे भगदाड

    नागपूर वरून वंदे भारतच्या एक्झिक्युटीव्ह क्लासचे तिकीट दर विमानापेक्षा अर्धे आहे. विमानाने प्रवासाला दीड तास तर वंदे भारत ने 7 तासाच्या वर लागतात.वेटिंग तिकीट रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतल्याने स्लीपर क्लासची गर्दी कमी झाली. प्रवास करण्यासाठी एक दोन तास अधिक लागले तरी 300 रुपये स्लीपरचा तिकीट दर हा सामान्य प्रवाशांसाठी खूप परवडणारा आहे. त्यामुळे वंदे भारत च्या चेअर कार व एक्झिक्युट क्लासच्या तिकीट दरामध्ये मोठी कपात केल्याशिवाय वंदेभारत एक्सप्रेसला प्रवासी मिळणे शक्य नाही असे मत देशमुख यांनी व्यक्त केले. (Vande Bharat train ticket price)

  • Janata Darbar : लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरीकांची समस्या सोडविण्याचा मी प्रयत्न करणार.- खा. प्रतिभा धानोरकर

    Janata Darbar : लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरीकांची समस्या सोडविण्याचा मी प्रयत्न करणार.- खा. प्रतिभा धानोरकर

    janata darbar माझ्या लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरीकांच्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी झरी-जामणी येथे आयोजित जनता दरबारात केले.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात 100 कोटीचं भगदाड

    Janata darbar खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर समोर ठेवून संपुर्ण लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा जिंकन्याचा संकल्प कॉग्रेसच्या आढावा बैठकीत केला होता. त्या अनुषंगाने बैठका, जनता दरबार यासह कामाची भुमीपुजने, लोकार्पणे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सुरु केली आहेत.

    दि. 24 सप्टेंबर रोजी खासदार प्रतिभा धानोरकर यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, माझ्या लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरीकांची समस्या सोडविणे हे माझे कर्तव्य असून ती समस्या सोडविण्याचा मी संकल्प केला आहे. लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यात मी जनता दरबार घेणार असून नागरीकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार आहे. Janata darbar

    याप्रसंगी मंचावर माजी आमदार वामनराव कासावार, काँग्रेस तालुकाध्यक्ष आशिष खुलसंगे, संजय खाडे, प्रकाश कासावार, तेजराज बोढे, श्री. आवारी व श्री येलेट्टीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर जनता दरबार अनेक नागरीकांच्या समस्यांचे समाधान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. नागरीकांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आभार देखील मानले.

  • Political criticism : उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या गृहजिल्ह्यात कायद्याचे धिंडवडे – विजय वडेट्टीवार यांची टीका

    Political criticism : उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या गृहजिल्ह्यात कायद्याचे धिंडवडे – विजय वडेट्टीवार यांची टीका

    Political criticism उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात गुन्हेगारीने थैमान माजविले आहे, त्यांच्या क्षेत्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात प्रचंड वाढ झाली असून महायुतीने राज्याला गुन्हेगारीच्या खड्ड्यात टाकलेलं आहे असे चित्र आपल्यापुढे तयार झाले आहे, अशी टीका विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली, चंद्रपुरात कांग्रेसच्या आढावा बैठकीपूर्वी वडेट्टीवार प्रसार माध्यमांसोबत बोलत होते.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात 100 कोटीचं भगदाड

    Political criticism वडेट्टीवार पुढे म्हणाले की नागपूर जिल्हा गुन्हेगारीचे हब बनू पाहत आहे, मात्र गृहमंत्री फडणवीस यावर दुर्लक्ष करीत आहे, गृहमंत्री फडणवीस राज्यभर दौरे करीत असताना नागपूर जिल्ह्यात 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट पर्यँत 6 हजार 883 गुन्ह्यांची नोंद झाली, त्यामध्ये खून 165, बलात्कार 268, महिलांवर अत्याचाराचे प्रकरण 300 च्या पुढे आहे, कायदा व सुव्यवस्था यावर गृहमंत्री दुर्लक्ष करीत आहे, ही सर्व आकडेवारी माहितीच्या अधिकारात प्राप्त झाली आहे.

    जोरदार टीका

    गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात कायद्याचे धिंडवडे उडत आहे, तर राज्यात काय अवस्था आहे, राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती काय? राज्यात दररोज 5 महिला शोषणाच्या बळी पडत आहे, 15 लोकांची रोज हत्या होत आहे, हे महाराष्ट्र राज्याचं विदारक चित्र आहे. महायुती सरकारने कायदा व सुव्यवस्थेला पूर्णतः उध्वस्त केले असून राज्याला खड्ड्यात टाकलं आहे.

  • chandrapur live news : वनमंत्री राजीनामा द्या, शिवसेनेचे घेराव आंदोलन

    chandrapur live news : वनमंत्री राजीनामा द्या, शिवसेनेचे घेराव आंदोलन

    chandrapur live news नरभक्षी वाघांच्या हल्ल्यात जाणारे मानव बळी वाचवण्याकरिता मुख्य वनसंरक्षण कार्यालयाला घेराव, वाघांचे लाड पुरवणाऱ्या वनमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून द्यावा राजीनामा; आंदोलनकर्त्यांची मागणी

    chandrapur live news चंद्रपूर :- मुल तालुक्यात दिवसेंदिवस नरभक्षी वाघांच्या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला आहे. वनविभागाची थातुरमातुर भुमीका व वाघांचे लाड पुरवणारे कायदे यामुळे नरभक्षी वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात मुल वनपरिक्षेत्रात वाढत आहे. होणारे वाघाचे हल्ले रोखण्यासाठी व मनुष्य जीवाचे रक्षण करण्यासाठी वनविभागाकडे वेळो-वेळी पाठपुरावा करण्यात येत होते. मात्र लोकांच्या जीवाची पर्वा न कलणाऱ्या वनविभाग कानाडोळा करून गप्प बसले होते.

    चंद्रपूर जिल्ह्यातील 167 आदिवासी गावाचा कायापालट

    यामुळे दिड महिन्यात ५ लोकांचे वाघाच्या हल्ल्यात जीव गेले.त्यांचे परिवार उघड्यावर पडले.वारंवार होणारी घटना रोखण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी दि.२३ सप्टेंबरला चंद्रपूर येथे मुख्य वनसंरक्षण कर्यालयाला घेराव आंदोलन करून वाघांचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा जनतेला घेऊन आम्हीच वाघाचा बंदोबस्त करू असा इशारा देण्यात आला.तसेच वाघाच्या हल्ल्यात ज्या लोकांचे बळी गेले त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजीनामा द्यावा तसेच जनतेच्या भौतिक संरक्षणाची जबाबदारी स्वतः राज्य सरकारने व वनसंरक्षण अधिकाऱ्याने घ्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

    मूल तालुक्याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफर झोन, प्रादेशिक, सामाजिक आणि वनविकास महामंडळाचे जंगल लाभले आहे. या चारही भागात वाघांचा मोठा संचार आहे. (chandrapur live news)

    आता मिळणार 10 हजार पेन्शन


    जंगलालगत बराचसा शेतशिवार असल्याने तसेच जंगलाशेजारी जनावरांचे चराई क्षेत्र असल्याने दबा धरून बसलेल्या वाघाकडून नियमित हल्ले होत आहे. त्यात निष्पाप शेतकरी, शेतमजूर आणि गुराख्यांचे बळी जात आहे.यावर शासनस्तरावरून आणि वनविभागातर्फे कोणतेही ठोस उपाययोजना केल्या गेले नाही.मूल तालुका वाघाच्या दहशतीत सापडला असल्याने मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

    रोज ऐक दुर्दैवी घटना घटना घडत आहे.याकडे वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.यामुळे संतप्त मुल वासियांनी मुख्य वनसंरक्षकाच्याच कार्यालयाला घेराव घालून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.


    मुल तालुक्यातील वाघाचा तातडीने बंदोबस्त करा,नरभक्षी वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबास विना विलंब तात्काळ आर्थिक मदत करा,जंगली प्राण्यांमुळे पिकांची झालेली नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करा,या सगळ्या प्रकरणात चुप्पी साधलेले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जबाबदारी स्वीकारून वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, मुल येथे वनपरीक्षेत्र कार्यालयात निर्माण करण्यात यावे,मृत झालेल्या व्यक्तीच्या घरी तात्काळ आर्थिक मदत व वनविभागात शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात यावी अश्या विविध मागण्यांच्या संदर्भात मुख्य वनसंरक्षक कार्यालयास घेराव घालण्यात आला.

    याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर संदिप गिऱ्हे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव,विधानसभा प्रमुख प्रमोद पाटील,मुल तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार, राज ठाकरे, विनय धोबे,महिला जिल्हा संघटिका कल्पना गारघाटे,ज्योती गहलोत, मीनाक्षीताई गलगट,प्रशांत मेश्राम युसूफ शेख,सागर राऊत,विनोद बुराडे व आदी उपस्थित होते.

  • janjatiy unnat gram abhiyan : चंद्रपूर जिल्ह्यातील 167 आदिवासी गावांचा होणार कायापालट

    janjatiy unnat gram abhiyan : चंद्रपूर जिल्ह्यातील 167 आदिवासी गावांचा होणार कायापालट

    janjatiy unnat gram abhiyan दुर्गम, अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे देशातील 63 हजार तर महाराष्ट्रातील 4 हजार 976 आदिवासी गावांचा कायापालट होणार आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील 167 गावांचा समावेश आहे.

    मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची अशीही गुरू दक्षिणा

    janjatiy unnat gram abhiyan या माध्यमातून राज्यामधील 32 जिल्ह्यातील 12 लाख 87 हजार 702 आदिवासी बांधवाचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण केले जाणार आहे. या अभियानासाठी आवश्यक निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून उपलब्ध होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन 2024-25 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाची घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत या अभियानाला मंजुरी देण्यात आली.

    या अभियानाचा शुभारंभ ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. ‘पीएम-जनमन’ अभियानात 17 मंत्रालयांद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध 25 उपक्रमांचा समावेश असणार आहे. त्याद्वारे सामाजिक पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, अजीविका यामधील तफावत भरून काढण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच आदिवासी क्षेत्र आणि समुदायांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासावर भर दिला जाणार आहे. (janjatiy unnat gram abhiyan)

    आता मिळणार 10 हजार पेन्शन, बघा हा व्हिडीओ

    प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानात सहभागी प्रत्येक मंत्रालयावर  पुढील 5 वर्षात निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनुसूचित जमातींचा विकास कृती आराखडा तयार करून उपलब्ध निधीद्वारे त्यांच्याशी संबंधित योजना कालबद्ध पद्धतीने कार्यान्वित करण्याची जबाबदारी असणार आहे. दरम्यान, या अभियानांतर्गत समाविष्ट असलेली आदिवासी गावे पीएम गतिशक्ती पोर्टलवर संबंधित विभागाद्वारे त्याच्या योजनेतून मॅप केल्या जातील. पोर्टलचे भौतिक आणि आर्थिक प्रगतीचे परीक्षण केले जाईल. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. (janjatiy unnat gram abhiyan)

    या सुविधा मिळणार : पक्की घरे, ग्रामीण भागात रस्ते, प्रत्येक घरात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, सर्व घरांमध्ये वीज जोडणी, मोबाईल मेडिकल युनिटची स्थापना, आयुष्मान कार्ड, एलपीजी कनेक्शन, आदिवासी बहुउद्देशीय विपणन केंद्र, आश्रमशाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, सिकलसेल, ॲनिमियाशी लढण्यासाठी केंद्राची निर्मिती, होम स्टे इत्यादी.

    जिल्हानिहाय गावांची संख्या :

    अहमदनगर- 118, अकोला- 43, अमरावती- 321, छत्रपती संभाजीनगर- 11, बीड- २, भंडारा- 14, बुलढाणा- 43, चंद्रपूर- 167, धुळे- 213, गडचिरोली- 411, गोंदिया- 104, हिंगोली- 81, जळगाव- 112, जालना- 25, कोल्हापूर- 1, लातूर- 2, नागपूर- 58, नांदेड- 169, नंदुरबार- 717, नाशिक- 767, उस्मानाबाद- 4, पालघर- 654, परभणी- 5, पुणे- 99, रायगड- 113, रत्नागिरी- 1, सातारा- 4, सोलापूर- 61, ठाणे- 146, वर्धा- 72, वाशीम- 71, यवतमाळ- 366.

  • Wild animals : तर चंद्रपूर जिल्ह्यात जन आंदोलन होणार – डॉ. अभिलाषा गावतुरे यांचा इशारा

    Wild animals : तर चंद्रपूर जिल्ह्यात जन आंदोलन होणार – डॉ. अभिलाषा गावतुरे यांचा इशारा

    Wild animals काँग्रेस नेत्या व भूमिपुत्र ब्रिगेड च्या मार्गदर्शिका डॉ. अभिलाषाताई गावतूरे यांच्या नेतृत्वात एक प्रतिनिधिक शिष्टमंडळ वन विभागाचे प्रधान सचिव श्री. बी वेणुगोपाल रेड्डी यांची वन अकॅडमी चंद्रपूर येथे भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये डॉ. अभिलाषा गावतूरे समवेत भादूर्णी, बेंबाल ,चिंचोली, केळझर, चिचाळा, मरेगाव, जानाला, बेंबाळ, बोरचंदली गावातील बहुसंख्य नागरिकांचा समावेश होता.


    जिल्ह्यातील विशेषतः बल्लारपूर विधानसभेतील जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. खालील विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. Wild animals

    बिबट्याने केली 7 वर्षीय मुलाची शिकार

    1. वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकरी देणे.
    2. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर मोबदला म्हणून मिळणाऱ्या पंचवीस लाख रक्कम त्वरित देण्यात यावी व रकमेत वाढ करण्यात यावी.
    3. गाय, बैल, शेळी, मेंढी, म्हैस, बकरी च्या चराईसाठी गावनिहाय चराई कुरण करून मोफत चराई करण्याची परवानगी द्यावी.
    4. वाघ, बिबट, अस्वल अशा हिंस्र प्राणी यांची निश्चित आकडेवारी शोधून चंद्रपूर जिल्ह्यातील वन क्षेत्र तुलनेत संख्या जास्त झाल्यास अन्यत्र हलवण्याची कारवाई करावी.
    5. सर्व हिंस्र पशूंना कॉलर आयडी लावून त्यांच्या हालचालीवर देखरेख ठेवून ते गावाजवळ आल्यास त्यासंबंधी सूचना गावकऱ्यांना करणे व याबाबत यंत्रणा विकसित करणे. (Wild animals)
    6. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तात्काळ दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका वन विभागात द्वारे उपलब्ध करून देणे व नामांकित खाजगी रुग्णालय यांचे नामांकन करून रुग्णालय उपलब्ध करून देणे जेणेकरून जखमी व्यक्तीस दर्जेदार उपचार मिळेल.
    7. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी चे संपूर्ण व्यवस्थापन स्थानिक गावकऱ्यांच्या हाती देणे व कम्युनिटी सफारी सुरू करणे त्याचे उत्पन्न स्थानिक गावकऱ्यांना मिळेल.
    8. सराई कुरण बाबत वारंवार पाठपुराटा करून देखील चराई कुरण निर्माण न करणाऱ्या वन अधिकाऱ्याचा आढावा घेऊन निलंबनाची कारवाई करावी.
    9. सोलर झटका मशीन वा निकृष्ट दर्जाचे वाटप होत असल्याने सदर भ्रष्टाचाराची उच्च चौकशी करून व संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी. Wild animals
    10. बॉटनिकल गार्डन वन उद्यान व अकॅडमी यामध्ये निर्माण केलेले हॉटेल पब्लिक रेस्टॉरंट व व अन्य कामांमध्ये मोठ्या प्रमाणात कमिशन आणि लाचखोरी होत असल्याने याची उच्चस्तरीय समिती गठीत करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी.
    11. ⁠वन विभागाच्या सर्व प्रकल्पांचे सोशल ऑडिट करून रिपोर्ट सार्वजनिक करावी. सोशल ऑडिट कमेटी मध्ये सर्व स्टेकहोल्डर्स चा समावेश असावा.
    12. ⁠वन हक्क कायदा 2006 मध्ये संशोधन करून वन जमिनी वरती शेती व घरगुती वापरासाठी 2024 पर्यंत झालेले अतिक्रमण कायदा करून वन हक्काने पट्टे वाटप करण्यात यावे.
    13. ⁠वन हक्क कायदा 2006 मध्ये गैर आदिवासी समाजाच्या तीन पिढ्यांची अट रद्द करण्यात यावी.
      या मागण्यांना घेऊन प्रधान सचिव वन विभाग व वनबल प्रमुख व वन विभागातील विशिष्ट अधिकारी यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा केली. सर्व मागण्या योग्य असल्याचे प्रधान सचिव यांनी मान्य केले व सदर समस्या त्वरित निकाली काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

    विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात

      चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच वन विभाग अधिकाऱ्याची नियोजन शून्य व कमिशन कारभार याविषयी वन सचिवाशी झालेल्या चर्चेमुळे वन अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शेतकरी, गुराखी व सामान्य नागरिक यांच्या प्रश्नाला काँग्रेस नेत्या डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांनी वाचा फोडली. या महत्वपूर्ण मागण्याबाबत राजकीय दबाव व राजकीय हस्तक्षेप झाला नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ, बिबट, अस्वल या हिंस्र प्राण्याचे बंदोबस्त तसेच बैल, गाय मेंढी, शेळी, बकरी म्हैस यांच्या चराईचा प्रश्न व वन विभागातील कमिशन खोरी, भ्रष्टाचार या समस्या 100% सुटतील असा आशावाद डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांनी व्यक्त केला व यास समस्या करिता राजकीय पक्ष राजकारण यांच्या सीमा ओलांडून जमिनीचे जन आंदोलन करण्याचा आव्हान याप्रसंगी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला केले.
      या समस्यांवर होणाऱ्या प्रत्येक जन आंदोलनात सर्वात पुढे राहण्याचा निश्चय याप्रसंगी केला.

    1. pik vima yojana : पीक विम्याची रक्कम तातडीने जमा करा – पालकमंत्री मुनगंटीवार

      pik vima yojana : पीक विम्याची रक्कम तातडीने जमा करा – पालकमंत्री मुनगंटीवार

      Pik vima yojana जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी हा कदापी दुःखात असू नये, अतिवृष्टीमुळे त्याच्यावर आलेल्या संकटात आपण सर्वोपरि सहकार्य केले पाहिजे, शासनाकडून त्यांच्यासाठी कुठलीही कमतरता राहणार नाही यासाठी प्रशासकीय स्तरावरून संवेदनशीलपणे प्रयत्न व्हावे, कुठलीही कुचराई खपवून घेणार नाही; हा विषय गांभीर्याने हाताळला जावा अश्या कडक शब्दात पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज अधिकाऱ्यांना सुनावले.

      महत्त्वाचे : चंद्रपूर परिमंडळात 1 हजार 152 घरांवर सोलर पॅनल, प्रधानमंत्री सुर्यघर योजनेला वाढता प्रतिसाद

       Pik vima yojana चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात पिक विमा योजनेतील प्रलंबित रकमेसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ना. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

      Pik vima yojana जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक जॉन्सन, कृषी अधीक्षक श्री. शंकर तोटावार, शेतकरी नेते श्री बंडू गौरकर, यांच्यासह विमा कंपनीचे अधिकारी व शेतकरी यावेळी उपस्थित होते.


       पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या  जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे मागील महिन्यात मोठा दिलासा मिळाला.  राज्याचे कृषिमंत्री ना. श्री. धनंजय मुंडे यांच्या सतत संपर्कात राहून, मुंबई येथे मंत्रालयात बैठक घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उर्वरित पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता.  चंद्रपूर जिल्ह्याचे काम ओरिएंटल पिक विमा कंपनीकडे असून सदर कंपनीने २०२.६७ कोटी रुपये पिक विमा योजनेची रक्कम मान्य केली आणि ना. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यानंतर १४३.८१ कोटी रुपये वितरित करण्यात आले. परंतु अद्यापही ५८.९४ कोटी रक्कम थकीत असून यासंदर्भात गुरुवारी झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. (Pik vima yojana)

      प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला सम्पर्क अधिकारी

       विमा कंपनीने राज्य सरकारकडे मागणी करून देखील अद्याप ही रक्कम प्राप्त न झाल्याने पालकमंत्री मुनगंटीवार यांनी कृषी विभागातील कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.

       चंद्रपूर जिल्ह्यात १ लक्ष ५१,३५२ शेतकऱ्यांनी पीक विमा  दावा दाखल केला होता, यापैकी १ लक्ष १८,५८८ शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम प्राप्त झाली, ३२ हजार ७६४ शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम अप्राप्त आहे.  चंद्रपूर जिल्ह्यातील रक्कम अप्राप्त असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी ना. मुनगंटीवार यांनी दिले.

         विहित मुदतीत अपात्र न केलेले अर्जही पात्र करण्याबाबतचे आदेश ना. मुनगंटीवार यांच्या विनंतीवरून कृषी मंत्र्यांनी मागील बैठकीत दिले होते, हे विशेष.

      कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी फोनवरून चर्चा !

        पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अतिशय संवेदनशील पणे दखल घेणाऱ्यांना सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांना दूरध्वनी करून वस्तुस्थिती अवगत करून दिली.  पिक विमा योजने संदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिलेल्या आश्वासनाची आपण पूर्ती करू आणि शेतकऱ्यांना दिलासा देऊ यासाठी आपल्या स्तरावरून आदेश द्या अशी विनंतीदेखील ना  मुनगंटीवार यांनी यावेळी केली.
       ना सुधीर मुनगंटीवार यांची प्रशासनावरील पकड व संवेदनशील कार्यपद्धती ही सर्व परिचितच आहे; परंतु संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी सुधीरभाऊ तातडीने धावून येतात अशी प्रतिक्रिया देत, उपस्थित असलेल्या शेतकरी बांधवांनी त्यांचे आभार मानले.

    2. HDIL SCAM : एचडीआयएल घोटाळा प्रकरणाला लागले वेगळे वळण : राकेश वाधवान यांचा प्रशासकावर गंभीर आरोप

      HDIL SCAM : एचडीआयएल घोटाळा प्रकरणाला लागले वेगळे वळण : राकेश वाधवान यांचा प्रशासकावर गंभीर आरोप

      HDIL SCAM मुंबई – एचडीआयएल (HDIL) च्या पालघर येथील पॅराडाईज सिटी प्रकल्पातील फ्लॅट मालकांचे कथित खोटे दावे स्वीकारून, कंपनी प्रशासक (रिझोल्यूशन प्रोफेशनल) अभय मानुधाने यांनी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्याचा ठराव मंजूर केला. एचडीआईएल कंपनी चे प्रमोटर राकेश वाधवान यांनी या ठरावाला विरोध केला असून, ठरावाविरोधात भारतीय दिवाळखोरी मंडळाकडे (Insolvency and Bankruptcy Board of India – IBBI) तक्रार दाखल केली आहे.

      अवश्य वाचा : गरीब रुग्णाच्या मदतीसाठी धावली आप पार्टी, डॉक्टर विरोधात अर्धनग्न आंदोलन

      Hdil scam वाधवान यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, पालघर येथील पॅराडाईज सिटी प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाला प्रशासनाकडून ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (OC) मिळाले होते. सेक्टर १ मधील अनेक इमारतींनी स्वत:च्या सोसायट्या स्थापन केल्या असून, अनेक ग्राहकांनी या प्रकल्पातील घरांचा ताबा घेतला आहे. असे असतानाही, ताब्यात घेतलेल्या आणि आपल्या घरात राहत असलेल्या अनेक घर खरेदीदारांची नावे कर्जदारांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

      तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, प्रशासकाने येथे राहणाऱ्या लोकांच्या खोट्या दाव्यांची योग्य चौकशी न करता ठराव आराखडा मंजूर करून कंपनीचे दायित्व वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक सदनिकाधारक, ज्यांनी वेळेवर ताबा घेतला नाही आणि ज्यांच्याकडून कंपनीने व्याज वसूल करावे, अशा सदनिकाधारकांचाही ठराव प्रशासकाने कर्जबुडव्या यादीत समाविष्ट केला आहे. त्यामुळे कंपनीवर अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचा वाधवान यांचा आरोप आहे. (Hdil scam)

      चाणक्य कौशल्य विकास प्रशिक्षण

      राकेश वाधवान यांनी आपला दावा मजबूत करण्यासाठी काही कागदपत्रे सादर केली आहेत. त्यात असे सांगितले आहे की, अनेक खोटे दावे चौकशी न करता मान्य करण्यात आले, ज्यामुळे कंपनीच्या कर्जदारांची संख्या वाढली आहे. वाधवान यांच्या म्हणण्यानुसार, फक्त पालघरच्या पॅराडाईज सिटी प्रकल्पातच नव्हे, तर नाहूर आणि कुर्ला येथील प्रकल्पांमध्येही अशा बनावट दाव्यांना मान्यता देण्यात आली आहे, ज्यामुळे कंपनीच्या आर्थिक अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

      मात्र, तत्पूर्वी रिझोल्यूशन प्रोफेशनल (RP) यांनी या आरोपांवर तक्रारदाराला स्पष्टीकरण दिले होते. त्यांनी म्हटले की, केवळ नेमप्लेटवर नाव आहे याचा असा अर्थ होत नाही की ग्राहकांना घरे मिळाली आहेत. याशिवाय, रिझोल्यूशन प्लॅन स्वीकारल्यानंतरही छाननी समिती दाव्यांची पुनर्तपासणी करते, आणि कोणत्याही ग्राहकाला पुन्हा घर दिले जाणार नाही, याची खात्री करुन घेते. या प्रक्रियेत कोणतीही अनियमितता होणार नाही, असे आश्वासनही आरपीकडून देण्यात आले आहे.

      मात्र, तक्रारदाराने भारतीय दिवाळखोरी मंडळाकडे (IBBI) मागणी केली आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करून खोटे दावे कर्जदारांच्या यादीतून वगळावेत. तक्रारदाराच्या या मागणीवर विचार करून बोर्ड लवकरच या प्रकरणावर सुनावणी घेऊ शकेल, अशी अपेक्षा आहे.

    3. Today Environmental protection : पर्यावरणाचे रक्षण ही सामाजिक जबाबदारी – पालकमंत्री मुनगंटीवार

      Today Environmental protection : पर्यावरणाचे रक्षण ही सामाजिक जबाबदारी – पालकमंत्री मुनगंटीवार

      Environmental protection चंद्रपूर: वसुंधरेच्या संरक्षणासाठी निसर्गाचे शोषण थांबावे, पर्यावरणाचे रक्षण व्हावे ही सामाजिक जबाबदारी असून वनविभागाने महाराष्ट्र बांबू बोर्डाच्या माध्यमातून जैविक विघटन होऊ शकेल अशा बांबू ट्री गार्डचे तसेच बांबू चारकोल साबणाचे उत्पादन जागतिक बांबू दिनाच्या औचित्य साधून सुरू केले याचा मनापासून आनंद होत असल्याचे गौरवोद्गार राज्याचे वन सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज काढले. महाराष्ट्र वन विभाग व बांबू बोर्डाच्या वतीने जागतिक बांबू दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे ना. मुनगंटीवार बोलत होते.

      Environmental protection यावेळी वनबल प्रमुख श्रीमती शोमिता विश्वास, प्रधान मुख्य वनसंरक्षक (नियोजन व विकास) श्री. कल्याणकुमार यांच्यासह वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महिला बुरड गटाने उत्पादित केलेल्या बांबू ट्री गार्ड तसेच बांबू चारकोल सोप (साबण) चे लोकार्पण करण्यात आले.

      चंद्रपूर शहरातील गणेश विसर्जन सोहळा

      यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, २०१३ मध्ये पॅरिस येथे संपन्न झालेल्या एका जागतिक परिषदेत पृथ्वीच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी मनुष्याकडून निसर्गावर मात करत नवे शोध लावण्यासाठी वसुंधरेचा शाप ओढवल्याबाबत गांभीर्याने चर्चा झाली. त्यानंतर देखील पर्यावरणावरील होत असलेल्या आक्रमणाची चिंता वाढत गेली. पर्यावरणाचे रक्षण करत असताना ट्रिगार्ड मात्र आपण दुर्दैवाने प्लास्टिकचेच वापरत होतो; पण महाराष्ट्राच्या बांबू बोर्डाने जागतिक बांबू दिनानिमित्त जैविक विघटन होऊ शकेल अशा बांबूच्या ट्री गार्डचे उत्पादन करून, पर्यावरण रक्षणात मोठे पाऊल उचलले आहेच; परंतु रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करून दिल्या याचा मला मनापासून आनंद होत आहे, असे ते म्हणाले. (Environmental protection)

      ग्रामीण महिला व बचत गटांचा होणार विकास

      बांबू चारकोल साबण ही अतिशय उत्तम कल्पना असून याचे योग्य पद्धतीने डिजिटल मार्केटिंग करणे अपेक्षित असल्याचे सांगून स्पर्धेच्या या युगात उत्तम पॅकेजिंग व उत्तम वितरण याकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना ना. मुनगंटीवार यांनी केल्या. आदिवासी तसेच मानव विकास कक्षेत असलेल्या तालुक्यांमध्ये रोजगारासाठी शासनाकडे भरपूर निधी उपलब्ध असतो; त्या माध्यमातून महिला बचत गटांना ट्री गार्ड बनवण्याचे किंवा बांबू चारकोल साबण बनवण्याचे प्रशिक्षण योग्य पद्धतीने दिल्यास निश्चितपणे या भागातील ग्रामीण महिलांचा व बचत गटांचा विकास होईल अशी अपेक्षा ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. (Environmental protection)

      अवश्य वाचा : चंद्रपुरात आम आदमी पक्षाच्या गांधीगिरी आंदोलनाची चर्चा

      राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाच्या कडेला वापरता येतील बांबू ट्री गार्ड

      जागतिक बांबू दिनानिमित्त बांबू ट्रीगार्डची निर्मिती करून वनविभागाने मोठे पाऊल उचलले आहे. परंतु एवढ्यावरच न थांबता आपण सातत्याने पाठपुरावा करून राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला लागणाऱ्या वृक्ष लागवडी संदर्भात माहिती घेऊन त्यासाठी बांबू ट्री गार्ड वापरता येतील अशा पद्धतीने प्रस्ताव तयार करावा, राज्याच्या बांधकाम विभागाला देखील असा प्रस्ताव आपण देऊ शकतो, अशा सूचना करत यासंदर्भात शिक्षण प्रशिक्षणाकडेही लक्ष देण्याचे सुचविले.