Category: राजकारण

महाराष्ट्रातील राजकारण बातम्या (Maharashtra Politics News) आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व राजकीय घडामोडींसाठी news34.in हे आपले विश्वसनीय व्यासपीठ आहे. आम्ही तुम्हाला स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या प्रत्येक मोठ्या-छोट्या अपडेट्सचे कव्हरेज देतो. राजकीय विश्लेषण, पक्षांची धोरणे, नेत्यांची मते आणि महत्त्वाचे शासकीय निर्णय. कोणत्याही राजकीय बातम्या चुकणार नाहीत याची खात्री बाळगा. राजकारण या क्षेत्रातील विश्वसनीय आणि ताज्या बातम्या मिळवण्यासाठी नियमितपणे भेट द्या.

  • Sambhaji Brigade : भूषण फुसे यांच्या नेतृत्वात असंख्य नागरिकांचा संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश

    Sambhaji Brigadeभूषण फुसे यांच्या नेतृत्वावर विश्वास वाढला, गडचांदूरात शेकडो युवक, पुरुष व महिलांचा संभाजी ब्रिगेड पक्षा मध्ये प्रवेश


    Sambhaji Brigade गडचांदूर – कोरपना तालुक्यात संभाजी ब्रिगेडमध्ये युवक, पुरुष व महिलांचे इनकमिंग सुरू झाले असून सामाजिक कार्यकर्ते भूषण मधुकरराव फुसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गडचांदूरात शेकडो युवक, पुरुष व महिलांचा संभाजी ब्रिगेड पक्षा मध्ये प्रवेश केला.

    गुन्हेगारी : चंद्रपुरातील खंजर भाई कडे मिळाली बंदूक

    शिवश्री भूषण मधुकरराव फुसे यांनी दुपट्टा टाकत सर्वांचे स्वागत केले. कोरपना तालुक्यातील चेन्नई खुर्द येथील मनसे उपाध्यक्ष दशरथ गेडाम, जांभुळदरा येथील कोरपना तालुका सोसायटी अध्यक्ष चंदुलाल शेडमाके यांनी सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्ष प्रवेश केला.

    गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्र पिंजून काढत जनसंपर्क वाढविला आहे. डिस्को डांस, लावणी, डिस्को दांडिया, ठुमका, झुमका, नट्या, पार्ट्या अश्या कार्यक्रमांना बगल देत भूषण फुसे यांनी सामाजिक चळवळीतून प्रा. लक्ष्मण यादव. प्रा. वसंत हंकारे, भक्तिमय माता जगराता, कोणतीही गाजावाजा न करता गरजवंतांना वेळोवेळी सहाय्य्य, गोर, गरीब कष्टाळू लोकांचे कामे न करणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना तंबी, वेळ प्रसंगी दे दणका अश्या कामांना बघत शोषित-वंचित लोकांचा मोठा वर्ग भूषण फुसे यांच्या कडे आकृष्टल्या जात आहे. त्याचीच हि परिणीती असून गडचांदूरात शेकडो युवक, पुरुष व महिलांचा संभाजी ब्रिगेड पक्षा मध्ये प्रवेश घेतला.

  • Bjp Kishor Jorgewar : किशोर जोरगेवार यांना विजयी करणार, भाजप कार्यकर्त्यांचा निर्धार

    Bjp Kishor Jorgewar भाजप पक्ष हा संघटनात्मक बांधणीसाठी ओळखला जातो. आज पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आपण मोठ्या संख्येने एकत्रित आले आहात. आपल्या चेहऱ्यावरील उत्साह बोलका आहे. सक्रिय कार्यकर्ताच पक्षाची आत्मा असून, याच एकतेने पक्षाचा विचार प्रत्येक घरात पोहोचवावा, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

     Bjp Kishor Jorgewar आज घुग्घुस येथे भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत कार्यकर्त्यांनी विजयाचा निर्धार केला. या प्रसंगी भाजपचे चंद्रपूर विधानसभा प्रमुख प्रमोद कडू, तालुका अध्यक्ष नामदेव डावले, भाजप नेते अनिल डोंगरे, महिला तालुका अध्यक्ष शोभा पिदुरकर, पारस पिंपळकर विजय बलकी, विनोद खेवले, सुशांत शर्मा, विजय आगरे, राकेश पिंपळकर, अनिता भोयर, यांची उपस्थिती होती.

        यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, भाजप हा पक्ष संघटन बांधणीसाठी ओळखला जातो. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ताकद आहे. पक्षाचे धोरण आणि विचार घुग्घुस शहरातील प्रत्येक घरात पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. हा पक्ष म्हणजे केवळ एका विचारधारेचा प्रवास नसून समाजासाठी, आपल्या लोकांसाठी एक तळमळीचा संघर्ष आहे.

    राजकीय : वडेट्टीवार यांनी लावले भाजपला खिंडार

    आपल्यातील प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या समाजाचा आधार आहे आणि पक्षाची रीढ आहे. आपला उत्साह, निष्ठा, आणि समाजसेवेसाठी असलेली कटिबद्धता हीच पक्षवाढीसाठी महत्त्वाची आहे. चंद्रपूरसह घुग्घुस शहराच्या विकासासाठी आजपासून आपण निवडणुकीच्या कामाला लागून भाजपच्या ऐतिहासिक विजयासाठी एकत्रित काम करण्याचे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Bjp Kishor Jorgewar

      मागील पाच वर्षांत आपण घुग्घुसच्या विकासासाठी पूर्णशक्तीनिशी प्रयत्न केले. याचे फलस्वरूप म्हणून घुग्घुस ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेमध्ये झाले आहे. येथील विकासाला गती मिळाली आहे. लवकरच येथील उड्डाणपूल आणि ग्रामीण रुग्णालयाचे काम पूर्ण होणार आहे. झालेली ही कामे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायची असल्याचे यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले.

      यावेळी भाजपच्या बंगाली कॅम्प मंडळ, बाबुपेठ मंडळ, सिव्हिल मंडळ, बाजार मंडळ, तुकुम मंडळ येथे बैठका पार पडल्या, आणि पूर्ण शक्तीने प्रचार कार्याला लागण्याचा संकल्प पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला. या बैठकीला भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Join the Congress Party : ब्रह्मपुरी तालुक्यात भाजपला खिंडार

    Join the Congress Party ब्रम्हपुरी तालुक्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विकासाचा झंजावात व काँग्रेस पक्षाच्या विचार सरणीला प्रेरित होऊन तालुक्यांतील बरड किन्ही येथील अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकत आज विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांचे उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला खिंडार पडली आहे.

    Join the Congress Party गेल्या १० वर्षापासून राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी क्षेत्र विकासासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून कोट्यावधींचा विकास निधी खेचून आणला. तद्वतच संपुर्ण क्षेत्रांतील सर्व समाजाला समान न्याय, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, अनेक सामजिक कार्य यासह अत्यावश्यक मूलभूत गरजा पुर्ण करुन नागरिकांच्या अडचणी दूर केल्या.

    अवश्य वाचा : महावितरणने दिला गंभीर कारवाईचा इशारा

    अशा विविध कार्यांना प्रेरित होऊन ब्रम्हपुरी तालुक्यांतील बरडकिन्ही येथील भाजपचे कट्टर समर्थक असलेल्या  अनेक कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आज पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये महेंद्र राऊत, देवनाथ पाकडे, अमोल तोंडरे, सुरज नाकतोडे, कार्तिक नाकतोडे, रुपेश मैंद, सुधीर दोनाडकर, ,आदित्य शेंडे,भूपेश शेंडे, सुरज खोब्रागडे यांचा समावेश आहे. Join the Congress Party

    आयोजित पक्ष प्रवेशाप्रसंगी ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रभाकर सेलोकर, ब्रह्मपुरी काँग्रेस विधानसभा युवक अध्यक्ष सोनू नाकतोडे, पोपटे सर व बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

    ऐन निवडणुकीच्या तोंडावर बरड किन्ही येथील भाजपा कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश यामुळे भाजपला खिंडार पडली असुन भाजीपाला लागलेल्या गळतीचा आगामी निवडणुकांमध्ये परिणाम जाणवणार हे निश्चित मानले जात आहे.

  • Chandrapur Bjp leader : आमदार जोरगेवार यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपात….

    Chandrapur Bjp leader : आमदार जोरगेवार यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपात….

    chandrapur bjp leader भारतीय जनता पार्टीमध्ये विद्यमान आमदार किशोर जोरगेवार व राज्याचे माजी राज्यमंत्री तथा माना समाजाचे दिग्गज नेते डाॅ. रमेशकुमार गजभे यांची घरवापसी झाल्याने पक्षाची राजकीय ताकद शतपटीने वाढली असून या प्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपाला पुनर्वैभव प्राप्त होईल असा विश्वास पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला.


    Chandrapur bjp leader जिल्ह्यात भाजपाचे प्रबळ संघटन अस्तित्वात असून जोरगेवार व गजभे या लोकप्रिय नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे चंद्रपूर, वरोरा, चिमुर सह संपुर्ण जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांमध्ये पक्षाला मोठ्या प्रमाणात जनाधार लाभणार असून भाजपा या प्रवेशाने पुन्हा संघटनात्मकदृष्ट्या मजबुत होईल असेही हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.  

    राजकीय : निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्याचा प्रयत्न – कांग्रेस उमेदवार संतोष रावत


    भाजपामध्ये प्रवेश करणारे किशोर जोरगेवार हे महायुतीचे चंदपूर विधानसभा क्षेत्रातील अधिकृत उमेदवार असल्यामुळे त्यांच्या प्रवेशाने अनुसुचित जाती वर्ग भाजपाप्रती अनुकुल राहील तसेच डाॅ. गजभे यांच्या राजकीय क्षेत्रातील गाढा अनुभव व अनुसुचित जमाती प्रवर्गात प्रभाव राखणाऱ्या या नेत्याचा निवडणुकीत मोठा लाभ होईल असे सांगत सर्व समाजामध्ये असलेला उभयतांचा प्रभाव दखलपात्र ठरेल असा आशावादही हंसराज अहीर यांनी व्यक्त केला असून या दोन्ही नेत्यांच्या भाजप प्रवेशाचे त्यांनी स्वागत केले आहे.

  • cdcc bank recruitment : निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्याचा प्रयत्न

    cdcc bank recruitment : निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्याचा प्रयत्न

    cdcc bank recruitment शासनाचे नियम आणि आरक्षण धोरणानुसारच बँकेची नोकर भरती, विरोधकांच्या खोट्या आरोपांना बळी पडू नये – संतोषसिंह रावत

    cdcc bank recruitment (गुरू गुरनुले) मुल : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या होऊ घातलेल्या नोकर भरतीची वास्तविकता न तपासता संतोषसिंह रावत यांच्या चुकीच्या निर्णयामुळे काँग्रेसची गोची, नोकर भरती मधून आरक्षण हटवले, अशा प्रकारचे निराधार वृत्त प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करून काही मंडळी विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत बँकेच्या प्रगती मध्ये बाधा पोहोचवण्याचे काम हेतुपुरस्सर करीत असल्याचे मत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले.

    निवडणूक : चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा क्षेत्रातील 30 उमेदवारांचे अर्ज बाद


    बँकेची निकड आणि मागणी लक्षात घेवुन बँकेतील रिक्त पद भरण्यासाठी प्रशासनाने शासन नियमाचे पालन करत शासन स्तरावर पाठपुरावा केला. दरम्यान काही सत्ताधारी मंडळींनी नोकर भरतीला प्रखर विरोध दर्शविल्याने सदरची भरती आज पर्यंत होऊ शकली नाही. शेवटी बँकेची वास्तविकता परिस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाने आवश्यक असलेली पदे भरण्यासाठी बँकेला परवानगी दिली.

    शासनाच्या त्या परवानगी पत्रानुसार नोकर भरतीची प्रक्रिया पारदर्शकपणाने सुरू आहे. असे असताना काही मंडळी नोकर भरती मधून आरक्षण हटविले, असे कारण समोर करून हेतुपुरस्सर बदनाम करण्याचे उद्देशाने निराधार वार्ता प्रसारित करीत आहेत. cdcc bank recruitment


    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १९ मार्च २०१९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत पारित झालेल्या ठरावानुसार महाराष्ट्र शासनाचे बँकेकडे असलेले शासकीय भाग भांडवल (Govt. Shears) रक्कम रुपये १२ लाख ७१ हजार भरणा केलेला आहे. शासकीय नियमानुसार ज्या सहकारी बँकेकडे शासनाचे भाग भांडवल शिल्लक नाही, त्या बँकांना आरक्षण नियम नियम २००१ लागू होत नाही. असे असताना नोकर भरतीला लागू असलेल्या आरक्षण बिंदू नामावली संदर्भात मार्गदर्शन करावे म्हणून दिनांक १८ सप्टेंबर २०१९ रोजी बँक प्रशासनाने सहकार आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार केला. cdcc bank recruitment

    निवडणूक : हे शक्ती प्रदर्शन बघून विरोधकांचे धाबे दणाणले

    तेव्हा शासनाचे सहकार आयुक्त यांनी शासनाचे विधी व न्याय विभाग आणि शासनाच्या निर्देशाप्रमाणे नोकर भरतीची कार्यवाही करावी, असे बँक प्रशासनाला निर्देश दिले. ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे शासनाचे भागभांडवल नाही, त्यांना आरक्षण अधिनियम २००१ चे नियम लागू होत नाही. असा स्पष्ट निर्वाळा असताना राज्य शासनाचे सहकार आयुक्त पुणे यांचे पत्र क्रमांक १७५९ दिनांक २८ सप्टेंबर २०२१ आणि शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या निर्देशानुसार नोकर भरती संदर्भात बँक प्रशासन सकारात्मक आणि पारदर्शीफणाने कार्यवाही करीत आहे. असे असताना काही मंडळी शासनाच्या सदर पत्राचे अवलोकन अवलोकन किंवा वास्तविकता न तपासता काँग्रेसने शब्द पाळला. आरक्षण हटविले, अश्या आशयाच्या खोट्या बातम्या प्रसार माध्यमाद्वारे प्रसारित करून बेरोजगार युवक आणि नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. cdcc bank recruitment

    विरोधकांची ही कृती धादांत चुकीची, नागरिकांमध्ये गैरसमज पसरविणारी आहे. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मी बल्लारपूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रामधुन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवित असल्याने मला बदनाम करण्यासाठी खोट्या आणि निराधार बातम्या प्रसारित करीत असल्याचे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले असून नागरिकांनी विरोधकांच्या खोट्या भुलथापांना बळी न पडता वास्तविस्ता लक्षात घेऊन सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे.

  • Popular Shivsena Sandip girhe : ठाकरेंच्या शिलेदाराने वाढविले कांग्रेसचे टेन्शन

    Popular Shivsena Sandip girhe : ठाकरेंच्या शिलेदाराने वाढविले कांग्रेसचे टेन्शन

    Shivsena Sandip girhe शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हेंच्या बंडाने बल्लारपूर मध्ये काँग्रेस पक्षाची वाढली चिंता

    Shivsena Sandip girhe चंद्रपूर :- जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी अपक्ष उमेदवारीचे नामांकन अर्ज दाखल करून बंडाची मशाल पेटवली आहे.त्यामुळे काँग्रेस पक्षाची चिंता वाढली आहे.

    निवडणूक : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात अस्तित्वाची लढाई

    बल्लारपूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केला होता. मात्र काँग्रेस बल्लारपूर विधानसभेची सिट सोडण्यास तयार नव्हती. त्यामुळे बरेच दिवस तिकिटाचा तिढा कायम होता. शिवसेनेकडून बल्लारपूर मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याचा आग्रह होता.आणि संदिप गिऱ्हे यांना उमेदवारी द्यावी यासाठी शेवटपर्यंत नेत्यांच्या वाटाघाटी सुरू होत्या. परंतु शिवसेनेला यात यश आले नाही.मात्र शिवसैनिक व जनतेच्या आग्रहाखातर संदिप गिऱ्हे यांनी २९ तारखेला आपला उपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केली आहे.

    विशेष म्हणजे अर्ज दाखल करताना बल्लारपूर मतदारसंघाचे शिवसेनेचे नगरसेवक,सरपंच,नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत होते. हे बघता बल्लारपूरमध्ये शिवसनेने काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांच्या विरोधात अधिकृत बंड पुकारल्याचे दिसून येत आहे.

    विरोधकांना हादरविणारे शक्ति प्रदर्शन

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये ज्या वाटाघाटी सुरू होत्या, त्यावरून संदिप गिऱ्हे ओबीसी युवा चेहेरा असल्याने मतदारसंघात मिळणारी पसंती यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात होती. स्वतः गिऱ्हे हे सुद्धा आशेवर होते. शिवसेनेमध्ये शेवटपर्यंत काहीही होऊ शकते असे त्यांचे म्हणणे होते. Shivsena Sandip girhe

    संदिप गिऱ्हे हे शिवसेना जिल्हाप्रमुख होते व बल्लारपूर विधानसभेत त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र रावत यांनी नामांकन अर्ज दाखल करताना शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दूर ठेवले,निरोप दिला नसल्याने शिवसैनिकांमध्ये आक्रोश निर्माण झाले होत.अश्या घडणाऱ्या गोष्टींचा निषेध करीत जय भवानी,जय शिवाजी, म्हणत संदिप गिऱ्हे यांनी अपक्ष उमेदवारीचे नामांकन अर्ज दाखल करीत बंडखोरी केली आहे.

  • Ballarpur vidhansabha : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात कांग्रेसची हवा

    Ballarpur vidhansabha : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात कांग्रेसची हवा

    Ballarpur vidhansabha (गुरू गुरनुले) कांग्रेस उमेदवार संतोषशिंह रावत यांच्या शक्ती प्रदर्शन रॅलीने उमेदवारी अर्ज दाखल बल्लारपूर, मुल, पोंभूर्ण तालुक्यातील हजारो मतदारांची भव्य दिव्य रॅलीचा जल्लोष

    Ballarpur vidhansabha मुल – ७२ बल्लारपूर विधानसभे करीता उमेदवारी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या शक्ती प्रदर्शन हजारोंच्या भव्य दिव्य रॅली पाहून जनतेमध्ये काँग्रेसच जड भरणार अशी चर्चा केली जात आहे. कालच्या पेक्षा आजची रॅली सर्वात मोठी होती.

    निवडणूक : चंद्रपूर जिल्ह्यात 75 लाखांची रोकड जप्त

    खुल्या जीपवर संतोष सिंह रावत, कांग्रेस नेते संदीप गड्डमवार, राकाचे विधानसभा प्रमुख सुमित समर्थ, प्रकाश कागदेलवार,बाबा अझीम, राकाच्या महिला पदाधिकारी इत्यादींची उपस्थिती होती. असंख्य महिला, युवक, नागरिकांची रॅलीने कांग्रेसमय वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. Ballarpur vidhansabha

    रॅलीचे आकर्षण,आदिवासी नृत्य, बैल बंडी, शेतकरी, ढोलताशा महाविकास आघाडीचे झेंडे, संतोषशिंह रावत यांचे पोस्टर्स ,बॅनर पाहून दंग बनले निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी श्री. चरडे साहेब, सहाय्यक अधिकारी तहसीलदार मृदुला मोरे,पवार साहेब यांचेकडे संतोषसिंह रावत यांनी नामांकन अर्ज दाखल केला.

    महत्त्वाचे : पोलिसांचे कारवाई सत्र

    यावेळी तेलंगणाचे खासदार रेड्डी, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष जेसाभाई मोटवानी, कांग्रेस नेते घनश्याम मुलचंदानी, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, गुरुदास चौधरी, राजेंद्र कन्नमवार उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार यांनी आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला महाविकास आघाडीचे उमेदवार, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते संतोष रावत यांचे उमेदवारीचे समर्थनार्थ श्री.विजय चिमड्यालवार यांनी पक्षात प्रवेश घेतल्यांने संतोष रावत यांनी त्यांचे स्वागत केले. Ballarpur vidhansabha

    विजय काँग्रेसमध्ये आल्याने संतोष रावत यांचा विजय सुनिश्चित होणार.व प्रवेशाचा फायदा होईल असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मागील काही वर्षापूर्वी कॉंग्रेसचेच चिमड्यालवार यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता.


    उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी श्री. रावत यांनी त्यांचे कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेपूर्वी श्री. विजय चिमड्यालवार यांनी पक्ष प्रवेश केला. बल्हारपूर निर्वाचन क्षेत्राच्या विकासाकरीता आपली उमेदवारी असून, मागील अनेक वर्षापासून आरोग्य, बेरोजगार, वाघाचे हल्ले, भाववाढ, GST, घरकुल,शिक्षण समस्या, उद्योग नाही, शेतीला सिंचन नाही, शेती पंपाचे कनेक्शन नाही, पीक विम्याचे पैसे नाही, महिलांवरील अत्याचार, घरगुती वीजदर वाढ असे अनेक प्रश्न सुटले नाही, ते प्रश्न सोडविण्यांचा आपण प्रयत्न करीत असल्यांचे त्यांनी पत्रकारांचे प्रश्नाचे उत्तरात सांगीतले.

    स्थानिक एमआयडीसीत उद्योग आहेत, मात्र मजूर परप्रांतीय आहेत, या उद्योगात स्थानिक कामगारांना काम मिळेल याकरीता आपण प्रयत्न करणार असल्यांचे सांगीतले. यावेळी लाडक्या बहीणसह अनेक प्रश्नावर त्यांनी उत्तरे दिलीत.


    पत्रकार परिषदेला कॉंग्रेसचे नेते संदीप गड्डमवार, विजय चिमड्यालवार, गुरूदास गुरूनुले प्रकाश कागदेलवार,राकेश रत्नावार रुपल रावत, यांचेसह कॉंग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. आयोजनासाठी अनेक कांग्रेस पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.

  • Powerful Independent candidate : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात अस्तित्वाच्या लढाईला सुरुवात

    Powerful Independent candidate : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात अस्तित्वाच्या लढाईला सुरुवात

    Independent candidate गेल्या दहा दिवसापासून महाराष्ट्रभर गाजत असलेल्या आणि भरपूर रस्सीखेच सुरू असलेल्या 72 बल्लारपूर मतदारसंघांमधील उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले.

    Independent candidate गेल्या दहा दिवसापासून 72 बल्लारपूर मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे तिकीट कुणाला मिळेल यावरून भरपूर रस्सीखेच आणि चर्चेला उधाण आलेलं होतं, मुंबईपासून दिल्लीपर्यंत या मतदारसंघाच्या उमेदवारीवरून भरपूर चर्चा सुरू होती.

    उमेदवारी अर्ज : विरोधकांना हादरविणारं शक्तिप्रदर्शन

    मतदारसंघांमधील शिक्षित सक्षम महिला ओबीसी उमेदवार म्हणून डॉक्टर अभिलाषा ताई गवतुरे यांचे नाव आघाडीवर होतं आणि त्यांनी गेल्या दहा-पंधरा वर्षा पासून सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलं होतं आणि गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी मूल बल्लारपूर मतदारसंघांमध्ये प्रतिभाताई धानोरकर या काँग्रेस उमेदवारासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. Independent candidate

    अशा परिस्थितीमध्ये जर डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विद्यमान पालकमंत्री आणि राज्यातील मातब्बर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांना ही निवडणूक जड जाईल अशी चर्चा जिल्हाभरामध्येच नाहीतर राज्यभरामध्ये सुरू होती आणि त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी प्रचंड प्रयत्न सुद्धा केल्या गेले.

    गुन्हेगारी : चंद्रपूर शहर पोलिसांचे धडक कारवाई सत्र

    राहुल गांधी यांचं संख्येच्या प्रमाणामध्ये मागासवर्गीयांना प्रतिनिधीत्व देण्याचं धोरण मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसमध्ये लागू करण्याचा प्रयत्न सुरू केला होत आणि म्हणून ही उमेदवारी डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनाच मिळणार अशा कयास मतदारसंघातील मतदारांचा होता पण काँग्रेसमधील गटातटाचा राजकारणामध्ये एका सक्षम उमेदवाराचा बळी गेला आणि ती उमेदवारी डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांना न मिळता संतोष सिंग रावत यांना काँग्रेसने जाहीर केली यानंतर डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे कोणते पाऊल उचलतात याकडे सर्व मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागलं होतं.

    राजकीय : 105 उमेदवारांचे अर्ज, 75 लाखांची रोकड जप्त


    अभिलाषा गावतुरे यांना उमेदवारी मिळावी अशी इच्छा मतदारसंघातील जनतेची असल्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला होता मात्र आज या चर्चेला पूर्णविराम मिळाला आणि डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मुल येथील तहसील कार्यालयामध्ये अपक्ष म्हणून सादर केला.

    शक्ती प्रदर्शन

    गेल्या तीन दशकापासून मतदारसंघातील जनतेच्या समस्यांना कोणी सोडून राहिलेलं नाही आणि म्हणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आमची उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मतदार आम्हाला भरघोस प्रतिसाद देतील अशी अपेक्षाही डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी व्यक्त केली.

  • 75 lakh cash seized : 105 उमेदवारी अर्ज आणि 75 लाखांची रोकड जप्त

    75 lakh cash seized : 105 उमेदवारी अर्ज आणि 75 लाखांची रोकड जप्त

    75 lakh cash seized महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक  निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी (दि.29) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण 105 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले.

    75 lakh cash seized 70- राजुरा विधानसभा मतदारसंघात निनाद चंद्रप्रकाश बोरकर (अपक्ष), रेशमा गणपत चव्हाण (जनवादी पार्टी), भूषण मधुकरराव फुसे (अपक्ष), प्रवीण रामदास सातपाडे (अपक्ष), देवराव विठोबा भोंगळे ( भारतीय जनता पार्टी), मंगेश हिरामण गेडाम (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), प्रवीण रामराव कुमरे (बहुजन मुक्ती पार्टी), गजानन गोदरु जुमनाके (गोडवाना गणतंत्र पार्टी), अरुण रामचंद्र धोटे (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस), वामनराव सदाशिव चटप (स्वतंत्र भारत पक्ष), भूषण मधुकर फुसे  (संभाजी ब्रिगेड), किरण गंगाधर गेडाम (अपक्ष), चित्रलेखा कालिदास धंदरे (अपक्ष), अभय मारोती डोंगरे (बहुजन समाज पक्ष), सचिन बापूराव भोयर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) आणि वामन उद्धवजी आत्राम (अपक्ष) यांनी नामांकन अर्ज दाखल केले.

    नामांकन अर्ज : विरोधकांना हादरविणारं शक्ती प्रदर्शन

    71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात विनोद कवडुजी खोब्रागडे (अपक्ष), प्रकाश शंकर रामटेके  (बहुजन मुक्ती पार्टी), प्रविण नानाजी पडवेकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मनोज गोपीचंद लाडे (बहुजन समाज पक्ष), प्रकाश उध्दवराव ताकसांडे (अपक्ष), किशोर गजानन जोरगेवार (भारतीय जनता पार्टी), ब्रिजभुषण महादेव पाझारे (अपक्ष), कोमल किशोर जोरगेवार (अपक्ष), मोरेश्वर कोदुजी बडोले  (अपक्ष), राजु चिन्नया झोडे (अपक्ष), ॲङ विशाल शामराव रंगारी (बहुजन रिपब्लीक सोशालिस्ट पार्टी), अरुण देविदास कांबळे (रिपब्लीक पार्टी ऑफ इंडिया (रिफारनिष्ठ), बबन रामदास कासवटे (अपक्ष), स्नेहल देवानंद रामटेके (वंचित बहुजन आघाडी), आशिष अशोक माशीरकर (अपक्ष), आनंद सुरेश इंगळे (अपक्ष), संजय निळकंठ गावंडे (अपक्ष), ज्ञानदेव भजन हुमणे  (अपक्ष), देवानंद नामदेवराव लांडगे (अपक्ष व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), रतन प्रल्हाद गायकवाड (अपक्ष), प्रवर्तन देवराव आवळे (अपक्ष), भिमनवार संजय परशुराम (राष्ट्रीय समाज पक्ष), ॲड राहुल अरुण घोटेकर (अपक्ष), भावेश राजेश मातंगी (अपक्ष), महेश मारोतराव मेंढे (अपक्ष), प्रतिक विठल डोर्लीकर (ऑल इंडियन रिपब्लीक पार्टी), अशोक लक्ष्मणराव मस्के (अपक्ष)  यांचा समावेश आहे. 75 lakh cash seized

    72- बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात प्रकाश मुरलीधर पाटील (अपक्ष), रब्बानी याबुक सय्यद (अपक्ष), रावत संतोषसिंह चंदनसिंह (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), उमेश राजेश्वर शेंडे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक), मनोज धर्मा आत्राम (गोंडवाना गणतंत्र पार्टी), संजय मारोतराव घाटे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष), सत्यपाल राधोजी कातकार (अपक्ष), गावतुरे छाया बंडू (अपक्ष), गावतुरे अनिता सुधाकर (अपक्ष), नरेंद्र शंकर सोनारकर (बहुजन समाज पार्टी), सचिन राजबहुरण रावत (अपक्ष), अभिलाषा राकेश गावतुरे (अपक्ष), राकेश नामदेवराव गावतुरे (अपक्ष), भारत सोमाजी थूलकर (ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टी), संजय शंकर कन्नावार (राष्ट्रीय समाज पक्ष), सय्यद अफजल अली सय्यद आबिद अली (अपक्ष), संदीप अनिल गि-हे (अपक्ष), विरेंद्र भीमराव कांबळे (अपक्ष). 75 lakh cash seized

    शक्ती प्रदर्शन

    (73 – ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघात चक्रधर पूनिराम मेश्राम (जन जनवादी पक्ष), चक्रधर दोनुजी जांभुळे (कृतीशील गणराज्य पार्टी), गुरुदेव डोपाजी भोपाये (अपक्ष), सुधाकर श्रीराम (अपक्ष), प्रशांत डांगे (रिपब्लिकन पक्ष खोरीपा), केवलरम पारधी (बहुजन समाज पार्टी), गोपाळ मेंढे (बीआरएसपी), रमेश मडावी (बहुजन समाज पार्टी), नारायण जांभुळे (स्वाभिमानी पक्ष), राहुल मेश्राम (वंचित बहुजन आघाडी), रमेश समर्थ (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – ए), प्रेमलाल मेश्राम (वंचित बहुजन आघाडी) आणि पराग साहरे (अपक्ष) यांनी नामांकन दाखल केले. 75 lakh cash seized

    74 – चिमूर विधानसभा मतदारसंघात योगेश नामदेवराव गोंनाडे  (अपक्ष), निकेश प्रल्हाद रामटेके (अपक्ष), अमित हरिदास भीमटे (अपक्ष), नारायणराव दिनबाजी जांभुळे (अपक्ष), हेमंत सुखदेव उरकुडे (अपक्ष), राजेंद्र हरिचंद्र रामटेके (बहुजन समाज पार्टी), दांडेकर भाऊराव लक्ष्मण (अपक्ष), मडावी मनोज उद्धवराव, रमेश बाबुराव पचारे (अपक्ष), जितेंद्र मुरलीधर  ठोंबरे (अपक्ष), केशव सिताराम रामटेके (अपक्ष). 75 lakh cash seized

    धडक कारवाई : चंद्रपूर शहर पोलिसांची धडक कारवाई मोहीम

    75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात प्रवीण धोंडोजी सुर (मनसे), जयवंत नथुजी काकडे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), प्रवीण मनोहर खैरे (अपक्ष), नरेंद्र नानाजी जीवतोडे (अपक्ष), सुभाष जगन्नाथ ठेंगणे (अपक्ष), दिनेश दादाजी चोखारे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष), करण संजय देवतळे (भाजपा), अतुल ईश्वर वानकर (अपक्ष), अनिल नारायण धानोरकर (वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष),  चेतन गजानन खुटेमाटे (अपक्ष), सागर अनिल वरघणे (बहुजन समाज पक्ष), महेश पंढरिनाथ ठेंगणे (अपक्ष), रमेश कवडूजी मेश्राम (गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि अपक्ष), नामदेव किसनाजी ढुमणे (अपक्ष), मुकेश मनोजराव जीवतोडे (अपक्ष), अंबर दौलतराव खानेकर ( राष्ट्रीय समाज पक्ष),  सेवकदास कवडूजी बरके ( पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक), प्रवीण सुरेश काकडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), सुमितकुमार नामदेव चंद्रागडे (अपक्ष), तारा महादेवराव काळे (अपक्ष) यांनी आज नामांकन अर्ज दाखल केले. 75 lakh cash seized

    विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर पर्यंत आहे. 75 lakh cash seized

    महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 च्या अनुषंगाने पेट्रोलींग दरम्यान 75,00,000/- रु.(पंचहत्यात्तर लक्ष रु.) ची रोकड जप्त (चंद्रपूर पोलीसांची कामगिरी)


    महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 च्या अनुषंगाने संशयीतरित्या रोख रक्कमेची वाहतुक करणाÚयांना पकडुन कार्यवाही करण्यासाठी जिल्हयात ठिकठिकाणी एस.एस.टी. पॉईन्ट नाकाबंदी तसेच एफ.एस.टी. पेट्रोलींग साठी वेगवेगळे पथक नेमण्यात आले असुन त्यामार्फतीने अवैध रोख रक्कम वाहतुकीवर लक्ष ठेवुन असतांना आज दिनांक 29/10/2024 रोजी मिळालेल्या गुप्त बातमीवरुन वरोरा पोलीस स्टेशन हद्दीत एका संशयीत चारचाकी वाहनांची पोलीस पथक आणि एफ.एस.टी.पथकाने संयुक्तरित्या तपासणी केली.

    सदर वाहनात मोठया प्रमाणात रोख रक्कम असल्याचे दिसुन आल्याने सदर वाहनास पोलीस स्टेशन वरोरा येथे आणुन वाहनातील रोख रक्कमेबाबत एफ.एस.टी. पथक व वरोरा पोलीसांनी वाहन धारकाकडे विचारपुस केली असता, वाहन धारकाने रोख रक्कम एकुण 75,00,000/- रु. (अक्षरी रु.पंचहत्यात्तर लक्ष) वाहतुकी बाबतचे कारण समाधानकारक उत्तर न दिल्याने सदर वाहनातील रोख रक्कमेचा पंचनामा करुन सदरची रोख रक्कम जप्त करुन पुढील चौकशी करीता आयकर विभागाचे स्वाधीन करण्यात आले आहे. 75 lakh cash seized


    सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात सहा.पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा नयोमी साटम यांचे नेतृत्वात वरोरा पोलीस आणि एफ.एस.टी.पथक वरोरा यांनी केली आहे.

  • shetkari sangathan : चंद्रपूर जिल्ह्यात विरोधकांना हादरविणारं शक्ती प्रदर्शन

    shetkari sangathan : चंद्रपूर जिल्ह्यात विरोधकांना हादरविणारं शक्ती प्रदर्शन

    shetkari sangathan महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दरम्यान राजकीय पक्ष व अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपली ताकद दाखवली.

    shetkari sangathan चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रात विरोधकांना हादरविणारं शक्ती प्रदर्शन आज बघायला मिळालं, शेतकरी संघटना व परिवर्तन महाशक्ती चे उमेदवार माजी आमदार वामनराव चटप यांनी जंगी प्रदर्शन केले.

    जाहीरनामा : राज्याच्या प्रगतीचे गेमचेंजर भाजपचा जाहीरनामा

    हजारोंच्या संख्येत विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या हक्काच्या माणसाला समर्थन देण्यासाठी राजुरा शहरात दाखल होत नामांकन रॅलीत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला.

    शक्ती प्रदर्शन

    अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने युवा, वयोवृद्ध महिला पुरुष या शक्ती प्रदर्शनात सहभागी झाले होते, वामनराव चटप हे सामाजिक कार्यात अग्रेसर, राजकीय अनुभव व थेट जनतेच्या मनातील माणूस म्हणून त्याची ओळख आहे.

    राजुरा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात कांग्रेसचे आमदार सुभाष धोटे, भाजपचे देवराव भोंगळे उभे आहे, यंदा शेतकरी संघटनेची थेट लढत कांग्रेस पक्षासोबत असणार आहे व यावेळी राजुरा विधानसभेत परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे.