Ballarpur vidhansabha : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात कांग्रेसची हवा

Ballarpur vidhansabha
Ballarpur vidhansabha (गुरू गुरनुले) कांग्रेस उमेदवार संतोषशिंह रावत यांच्या शक्ती प्रदर्शन रॅलीने उमेदवारी अर्ज दाखल बल्लारपूर, मुल, पोंभूर्ण तालुक्यातील हजारो मतदारांची भव्य दिव्य रॅलीचा जल्लोष

Ballarpur vidhansabha मुल – ७२ बल्लारपूर विधानसभे करीता उमेदवारी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या शक्ती प्रदर्शन हजारोंच्या भव्य दिव्य रॅली पाहून जनतेमध्ये काँग्रेसच जड भरणार अशी चर्चा केली जात आहे. कालच्या पेक्षा आजची रॅली सर्वात मोठी होती.

निवडणूक : चंद्रपूर जिल्ह्यात 75 लाखांची रोकड जप्त

खुल्या जीपवर संतोष सिंह रावत, कांग्रेस नेते संदीप गड्डमवार, राकाचे विधानसभा प्रमुख सुमित समर्थ, प्रकाश कागदेलवार,बाबा अझीम, राकाच्या महिला पदाधिकारी इत्यादींची उपस्थिती होती. असंख्य महिला, युवक, नागरिकांची रॅलीने कांग्रेसमय वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. Ballarpur vidhansabha

रॅलीचे आकर्षण,आदिवासी नृत्य, बैल बंडी, शेतकरी, ढोलताशा महाविकास आघाडीचे झेंडे, संतोषशिंह रावत यांचे पोस्टर्स ,बॅनर पाहून दंग बनले निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी श्री. चरडे साहेब, सहाय्यक अधिकारी तहसीलदार मृदुला मोरे,पवार साहेब यांचेकडे संतोषसिंह रावत यांनी नामांकन अर्ज दाखल केला.

महत्त्वाचे : पोलिसांचे कारवाई सत्र

यावेळी तेलंगणाचे खासदार रेड्डी, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष जेसाभाई मोटवानी, कांग्रेस नेते घनश्याम मुलचंदानी, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, गुरुदास चौधरी, राजेंद्र कन्नमवार उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार यांनी आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला महाविकास आघाडीचे उमेदवार, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते संतोष रावत यांचे उमेदवारीचे समर्थनार्थ श्री.विजय चिमड्यालवार यांनी पक्षात प्रवेश घेतल्यांने संतोष रावत यांनी त्यांचे स्वागत केले. Ballarpur vidhansabha

विजय काँग्रेसमध्ये आल्याने संतोष रावत यांचा विजय सुनिश्चित होणार.व प्रवेशाचा फायदा होईल असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मागील काही वर्षापूर्वी कॉंग्रेसचेच चिमड्यालवार यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता.


उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी श्री. रावत यांनी त्यांचे कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेपूर्वी श्री. विजय चिमड्यालवार यांनी पक्ष प्रवेश केला. बल्हारपूर निर्वाचन क्षेत्राच्या विकासाकरीता आपली उमेदवारी असून, मागील अनेक वर्षापासून आरोग्य, बेरोजगार, वाघाचे हल्ले, भाववाढ, GST, घरकुल,शिक्षण समस्या, उद्योग नाही, शेतीला सिंचन नाही, शेती पंपाचे कनेक्शन नाही, पीक विम्याचे पैसे नाही, महिलांवरील अत्याचार, घरगुती वीजदर वाढ असे अनेक प्रश्न सुटले नाही, ते प्रश्न सोडविण्यांचा आपण प्रयत्न करीत असल्यांचे त्यांनी पत्रकारांचे प्रश्नाचे उत्तरात सांगीतले.

स्थानिक एमआयडीसीत उद्योग आहेत, मात्र मजूर परप्रांतीय आहेत, या उद्योगात स्थानिक कामगारांना काम मिळेल याकरीता आपण प्रयत्न करणार असल्यांचे सांगीतले. यावेळी लाडक्या बहीणसह अनेक प्रश्नावर त्यांनी उत्तरे दिलीत.


पत्रकार परिषदेला कॉंग्रेसचे नेते संदीप गड्डमवार, विजय चिमड्यालवार, गुरूदास गुरूनुले प्रकाश कागदेलवार,राकेश रत्नावार रुपल रावत, यांचेसह कॉंग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. आयोजनासाठी अनेक कांग्रेस पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *