Category: राजकारण

महाराष्ट्रातील राजकारण बातम्या (Maharashtra Politics News) आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व राजकीय घडामोडींसाठी news34.in हे आपले विश्वसनीय व्यासपीठ आहे. आम्ही तुम्हाला स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या प्रत्येक मोठ्या-छोट्या अपडेट्सचे कव्हरेज देतो. राजकीय विश्लेषण, पक्षांची धोरणे, नेत्यांची मते आणि महत्त्वाचे शासकीय निर्णय. कोणत्याही राजकीय बातम्या चुकणार नाहीत याची खात्री बाळगा. राजकारण या क्षेत्रातील विश्वसनीय आणि ताज्या बातम्या मिळवण्यासाठी नियमितपणे भेट द्या.

  • Fake narrative : फेक नॅरेटीव्ह पसरवून भाजपचा रडीचा डाव

    Fake narrative ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात झालेली विकास कामे ही राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांची फार मोठी जमेची बाजू आहे.

    Fake narrative क्षेत्रातील तीनही तालुक्यात त्यांना मिळत असलेला जनआधार बघून विरोधीकांचे धाबे दनानले असल्याने पायाखालची जमीन सरकल्याचे निदर्शनास येताच विरोधकांनी आता अर्धवट व्हिडिओ क्लिपच्या साहाय्याने समाज माध्यमातून फेक नॅरेटीव्ह पसरवून रडीचा डाव सुरू केल्याचे माजी नगराध्यक्ष स्वप्निल कावळे यांनी म्हटले आहे.

    चंद्रपुरात वाळू तस्करावर महसूल प्रशासनाची कारवाई

    ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राच्या इतिहासात राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ना भूतो न भविष्यती असा अभूतपूर्व विकास केला. यासोबतच त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रुग्ण सेवा,  50 हजाराहून अधिक नागरीकांना मोफत चष्मे वाटप, शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या शिक्षण मार्गावरील अडचणी दूर करणे, हलाखीची आर्थिक परिस्थिती असलेले रुग्ण, सामान्य नागरिक, यांना वेळोवेळी मदत करणे, कॅन्सर सारख्या महाभयंकर जीवघेण्या रोगाचे निदान करण्यासाठी विजयकिरण या फाउंडेशनच्या मार्फतीने अद्यावत यंत्र सहित तयार केलेली व्हॅन कार्यान्वित करून वेळीच रोगाचा अंदाज बांधणे व कर्करोगग्रस्तांना विनामूल्य तातडीने शस्त्रक्रियेसाठी नेऊन हजारो लोकांचे प्राण वाचविले. Fake narrative

    चंद्रपुरात प्रतिबंधित तंबाखू वर कारवाई

    अशा सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या जनसेवका विरोधात निवडणुकीतील राजकीय विरोधकांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा वाढता जनाधार व त्यांना मिळणारे जनतेचे ,समर्थन, प्रेम आणि बळ यावर निरूत्तर होऊन बघायच्या भूमिके शिवाय  कुठलाही अन्य पर्याय उरत नसल्याने निवडणुकीत आपली पत राखण्यासाठी आता विरोधीकांनी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या कार्यकर्ता बैठकीतील संवादाची व्हिडिओ क्लिप अर्धवट टाकून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू आहे.

    बल्लारपूर मतदारसंघात चहाच्या केटलीने वातावरण तापलं

    राज्याच्या संविधानिक महत्त्वपूर्ण अशा जबाबदारी असलेल्या पदावर विराजमान होऊनही आपले पाय जमिनीवर ठेवून सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे जनसामान्याच्या समस्यांना पोटतिडकीने सोडवून अहोरात्र मेहनत घेणाऱ्या व क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधणाऱ्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचेवर टीकेची गरड ओकणे म्हणजे आभाळावर थुंकण्यासारखे होय. असे सिंदेवाहीचे माजी नगराध्यक्ष स्वप्निल कावळे यांनी म्हटले आहे.

  • Trending Now Kettle symbol : या मतदारसंघात केटलीने वाढवले टेंशन

    Kettle symbol जनतेला आता खऱ्या अर्थाने प्रामाणिक आणि आपल्या नेतृत्वाची ओळख पटू लागली आहे हे आपली लोकशाही बळकट होत असल्याचं आणि जनतेमध्ये जागृती होत असल्याचं लक्षण आहे.


    Kettle symbol मुल येथील बल्लारपूर 72 विधानसभेच्या अपक्ष बहुजनांच्या आणि जनसामान्यांच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर अभिलाषा ताई यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली.

    सुगंधित तंबाखु तस्करी प्रकरणी महिलेला अटक


    गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा सातत्याने प्रामाणिकपणे जे काम अभिलाषा ताई गावतुरे करीत आहेत त्याची पोचपावती म्हणूनच जणू जनता त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी करून देत आहे. Kettle symbol


    गेल्या 30 वर्षापासून मतदारसंघांमधील जनता हजारो समस्यांनी ग्रस्त आहे आणि येथील असलेले आमदार आणि विद्यमान पालकमंत्री सपशेल अपयशी ठरलेले आहेत जे प्रश्न जनप्रतिनिधींनी सोडवायचे असतात त्या प्रश्नासाठी अभिलाषा ताई गावतुरे स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

    चंद्रपूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीने फोडला भाजपचा फुगा


    भूमिपुत्र ब्रिगेडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन असेल करियर गायडन्स असेल गावोगावी वाचनालयाचा आणि अभ्यासिकेचा उपक्रम असेल विद्यार्थ्यांच्या बसेसच्या प्रॉब्लेम असेल अभिलाषा ताई यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत राहिले आहेत जे निवडून आलेले जनप्रतीनिधीही करत नाही ते प्रश्न ते स्वतः उचलतात नवेगाव मोरे येथे दोनशे विद्यार्थ्यांसाठी फक्त दोन शिक्षक होते अभिलाषा ताईंनी आंदोलन करून तेथील शाळेला तीन शिक्षक मिळवून दिले. Kettle symbol

    मामल्याच्या विद्यार्थ्यांना चंद्रपूरच्या शाळेत जायसाठी बस नव्हती विद्यार्थ्यांना घेऊन परिवहन विभागासमोर त्यांनी आंदोलन करून तिथे बस उपलब्ध करून दिली. शेतकऱ्यांच्या पिक विमा च्या प्रश्नावर आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या प्रश्नांना घेऊन एक मोठे आंदोलन उभारले वाघांच्या हल्ल्यामध्ये ठार होतले असलेल्या शेतकऱ्यांच्या आणि गुराख्यांच्या प्रश्न मोठ्या प्रमाणावर उचलून धरला मेंढपाळांच्या चराईच्या प्रश्नावर अगदी वनविभागाच्या प्रधान सचिवांपर्यंत धाव घेऊन तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. Kettle symbol


    आपल्या डॉक्टरांच्या मोठ्या चमुच्या माध्यमातून अतिदुर्गम जंगलातील गावोगावी जाऊन वैद्यकीय सेवा प्रदान केल्या
    पाणीपुरवठा विभागाच्या मजुरांच्या शोषणाचा प्रश्न त्यांनी जिल्हा परिषद च्या प्रशासनासमोर लावून धरला आणि त्यांना न्याय मिळवून दिला.


    शाळेच्या खाजगीकरणाचा प्रश्न असो किंवा नोकऱ्यांच्या कंत्राटीकरणाचा प्रश्न सर्व समाजाचे नेतृत्व करत अभिलाषा ताईंनी अनेक आंदोलने उभी केली 26 नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ओबीसी जनगणनेसाठी निघालेल्या विशाल ओबीसी मोर्चाचे नेतृत्व सुद्धा अभिलाषा ताई आणि डॉक्टर राकेश गावतुरे यांनी केले.


    विधानसभेतील आदिवासी समाजातील लोकांवर प्रशासनाद्वारे आणि वनविभागाद्वारे जेव्हा अन्याय अत्याचार करण्यात आले आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले तेव्हा सर्वप्रथम अभिलाषाताई गावतुरे यां त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या या सर्व कार्यक्रम आणि आंदोलनाच्या माध्यमातून विधानसभेतीलच नव्हे तर सर्व जिल्ह्यातील ओबीसी आंबेडकरी आदिवासी अल्पसंख्यांक आणि सर्व समाजामध्ये अभिलाषा ताईंचा चाहता वर्ग प्रचंड प्रमाणात निर्माण झालेला आहे.


    आणि म्हणून गावोगावी गल्लोगल्ली त्यांच्या प्रचार सभेला मतदार प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत आज मुल येथे झालेल्या हजारो लोकांच्या रॅलीने सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या मनात धडकी भरत आहे.

  • VBA Ballarpur : चंद्रपूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीने फोडला भाजपचा फूग्गा

    VBA Ballarpur बल्लारपूर – गेल्या अनेक वर्षापासून बल्लारपूर तालुक्यासह जिल्ह्यात वंचित पक्षाने जनसेवेचे निरंतर कार्य करीत पक्ष बळकट करून टाकत वाढविली असल्याने भाजप,काँग्रेस पक्षाच्या भीती निर्माण झाली असून त्यामुळेच समाजात निलंबित केलेल्या कार्यकर्त्यांना पुढे करून संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजप करीत आहे.

    VBA Ballarpur बल्लारपूर तालुक्यातील रमेश लिंगलपल्लीवर या कार्यकर्त्याने लोकसभेत काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचा प्रचार करीत असल्याचे आढळून आले.त्यानंतर त्यास पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका ठेऊन त्यास पक्षातून निलंबित करण्यात आले असून त्याचा वंचित शी कसलाही संबंध नाही.असे वंचितचे जिल्हाध्यक्ष सोमाजी गोंडाने यांनी स्पष्ट केले आहे.

    16 बुद्ध विहारात अभ्यासिका, आमदार जोरगेवार यांचा पुढाकार

    रमेश लिंगलपल्लीवर याने विधानसभा निवडणुकीत भाजपात प्रवेश केल्याचे समजते.ती वंचित सोडून भाजपात 200 कार्यकर्त्यांसह प्रवेश केल्याचे सांगत सुटला आहे. वास्तविक त्यास पक्षातून कधीचेच काढून फेकण्यात आले असल्याने त्याचा तिळमात्र संबंध वंचितशी नाही. त्याचे जाण्यामुळे पक्षाला कुठलाच परिणाम होत नसून सतत पक्ष फेरबदल करीत असल्याने त्याची किंमत कुठेही होत नसल्याने केवळ संभ्रम निर्माण करीत असल्याने त्यांचेवर वंचित भाव देत भाजपात आपली पत निरामन करण्यासाठी बेताल व्यक्तव्य करीत आहे. VBA Ballarpur

    या निवडणुकीत वंचितचे सतीश मालेकर यांना उमेदवारी जाहीर केली असून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील वंचितचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात मुसंडी मारत इतर पक्षाला घाम फोडला आहे.अशात काही उमेदवारांनी वंचितला बदनाम करण्यासाठी नतभ्रष्ट लोकांना पुढे करून मतदारात वास्तविक प्रचार करण्यासाठी पुढे करून डाव साधण्याचा प्रयत्न करीत आहे.अशांना वंचितचा कार्यकर्ता व मतदार भीक घालणार नाही. VBA Ballarpur

    सुगंधित तंबाखूची रक्षा करणाऱ्या महिलेला अटक

    स्वाभिमानी कार्यकर्ता कधीच आंबेडकरी विचाराशी तडजोड व प्रतारणा करणार नाही. भाजप व काँग्रेस पक्षाच्या वंचित बहुजन आघाडीची भीती वाटत असून त्याच पक्षात फुटीचे खिंडार पडत आहे. तळागाळातील जनतेच्या समस्या व ओबीसी,एससी, आदिवासींचे आरक्षण संपविण्याचा घाट भाजप,काँग्रेस रचत असून आता हा समाज या पक्षातील उमेदवाराना नाकारण्याचा पवित्रा घेतला आहे.

    न्याय,हक्क व आरक्षणाच्या लढाईत बहुजन उतरला असून येथील जातिवंत पक्षाच्या उमेदवाराच्या पायाखालची माती घसरली आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात वंचित अबाधित असून बेताल कार्यकर्त्यांच्या जाण्याने वंचितला काहीही परिणाम होणार नाही हे निर्विवाद सत्य आहे.

  • Latest Chandrapur abhyasika : तर राज्यात चंद्रपूर पहिले मतदारसंघ असणार – आमदार किशोर जोरगेवार

    Chandrapur abhyasika तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेली करुणा, अहिंसा, आणि समतेची शिकवण आपल्या जीवनात आणि समाजात प्रकाश पेरणारी आहे. मतदारसंघातील बुद्ध विहारांमधून आता शिक्षणाचा संदेश जावा या हेतूने आपण १६ बुद्ध विहारांमध्ये अभ्यासिकांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

    Chandrapur abhyasika एकाच मतदारसंघातील १६ बुद्ध विहारांमध्ये अभ्यासिका असणारे चंद्रपूर कदाचित राज्यातील पहिले मतदारसंघ ठरेल, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    चंद्रपुरात 2 गुन्हेगारांची खुनी फाईट

     महाकाली कॉलरी येथील आनंद बौद्ध महिला सेवा समिती, भिवापूर येथील करुणा बुद्ध विहार आणि तक्षशिला बुद्ध विहारांच्या वतीने स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आनंद बौद्ध महिला सेवा समितीच्या वतीने आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजप महिला महानगर अध्यक्षा सविता कांबळे, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार,  कल्याणी किशोर जोरगेवार, सायली येरणे, भाग्यश्री हांडे, नंदा पंधरे, अमोल शेंडे, ताहिर हुसेन, विमल कातकर, नीलिमा वनकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

     यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, मागील पाच वर्षांत मी सतत आपल्या संपर्कात होतो. ही गर्दी याचेच फलित आहे. सर्व समाजाचा सर्वसमावेशक विकास हेच आपले ध्येय राहिले आहे. आपण बाबुपेठ येथे भव्य विपश्यना केंद्र तयार करत असून हे केंद्र विदर्भातील उत्तम केंद्रांपैकी एक असणार आहे. Chandrapur abhyasika

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात परिवर्तनाची लाट

    मतदारसंघातील १६ बुद्ध विहारांमध्ये अभ्यासिका तयार करण्याच्या दिशेने आपले प्रयत्न होते. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने यात यश आले आहे. १६ बुद्ध विहारांमध्ये अभ्यासिकांसाठी आपण साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असल्याचेही यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

     आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी बुद्ध विहारांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. येथे केवळ आध्यात्मिक बळच मिळत नाही, तर सामाजिक आणि मानसिक बळही मिळते. आपल्या समाजातील नवीन पिढीने या शिकवणीचा आदर करून एक उत्तम समाज घडवावा.

    तथागत गौतम बुद्धांनी दिलेल्या विचारांचा प्रसार करून समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या आपल्या प्रयत्नात आमचे नेहमी योगदान राहील, असे ते यावेळी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Wave of change : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात यंदा परिवर्तनाची लाट

    Wave of change जनतेला आता खऱ्या अर्थाने प्रामाणिक आणि आपल्या नेतृत्वाची ओळख पटू लागली आहे, हे आपली लोकशाही बळकट होत असल्याचं आणि जनतेमध्ये जागृती होत असल्याचं लक्षण आहे.


    Wave of change नलेश्वर येथील बल्लारपूर 72 विधानसभेच्या अपक्ष बहुजनांच्या आणि जनसामान्यांच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर अभिलाषा ताई यांच्या सभेला सुजाण नागरिकांनी प्रचंड गर्दी केली.


    गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा सातत्याने प्रामाणिकपणे जे काम अभिलाषा ताई गावतुरे करीत आहेत त्याची पोचपावती जणू जनता त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी करून देत आहे.


    गेल्या 30 वर्षापासून मतदारसंघांमधील जनता हजारो समस्यांनी ग्रस्त आहे आणि येथील असलेले आमदार आणि विद्यमान पालकमंत्री सपशेल अपयशी ठरलेले आहेत जे प्रश्न जनप्रतिनिधींनी सोडवायचे असतात त्या प्रश्नासाठी अभिलाषा ताई गावतुरे सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. Wave of change


    भूमिपुत्र ब्रिगेडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन असेल करियर गायडन्स असेल गावोगावी वाचनालयाचा आणि अभ्यासिकेचा उपक्रम असेल विद्यार्थ्यांच्या बसेसच्या प्रॉब्लेम असेल अभिलाषा ताई यांच्या पाठीशी कंपनी उभ्या होत राहिले आहेत जे निवडून आलेले जनप्रतीनिधीही करत नाही. Wave of change

    नवेगाव मोरे येथे दोनशे विद्यार्थ्यांसाठी फक्त दोन शिक्षक होते अभिलाषा ताईंनी आंदोलन करून तेथील शाळेला तीन शिक्षक मिळवून दिले मामल्याच्या विद्यार्थ्यांना चंद्रपूरच्या शाळेत जाण्यासाठी बस नव्हती. विद्यार्थ्यांना घेऊन परिवहन विभागासमोर त्यांनी आंदोलन करून तिथे बस उपलब्ध करून दिली. Wave of change

    शेतकऱ्यांच्या पिक विमा च्या प्रश्नावर व शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या प्रश्नांना घेऊन एक मोठे आंदोलन उभारले वाघांच्या हल्ल्यामध्ये ठार होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आणि गुराख्यांच्या प्रश्न मोठ्या प्रमाणावर उचलून धरला. मेंढपाळांच्या चराईच्या प्रश्नावर अगदी वनविभागाच्या प्रधान सचिवांपर्यंत धाव घेऊन तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आपल्या डॉक्टरांच्या मोठ्या चमुच्या माध्यमातून अतिदुर्गम जंगलातील गावोगावी जाऊन वैद्यकीय सेवा प्रदान केल्या.


    पाणीपुरवठा विभागाच्या मजुरांच्या शोषणाचा प्रश्न त्यांनी जिल्हा परिषद च्या प्रशासनासमोर लावून धरला आणि त्यांना न्याय मिळवून दिला.


    शाळेच्या खाजगीकरणाचा प्रश्न असो किंवा नोकऱ्यांच्या कंत्राटीकरणाचा सर्व आंदोलनामध्ये सर्व समाजाचे नेतृत्व करत अभिलाषा ताईंनी अनेक आंदोलने उभी केली 26 नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ओबीसी जनगणनेसाठी निघालेल्या विशाल ओबीसी मोर्चाचे नेतृत्व सुद्धा अभिलाषा ताई आणि डॉक्टर राकेश गावतुरे यांनी केले.


    विधानसभेतील आदिवासी समाजातील लोकांवर प्रशासनाद्वारे आणि वनविभागाद्वारे जेव्हा अन्याय अत्याचार करण्यात आले आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले तेव्हा सर्वप्रथम अभिलाषाताई गावतुरे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्या.

    या सर्व कार्यक्रम आणि आंदोलनाच्या माध्यमातून विधानसभेतीलच नव्हे तर सर्व जिल्ह्यातील ओबीसी आंबेडकरी आदिवासी अल्पसंख्यांक आणि सर्व समाजामध्ये अभिलाषा ताईंचा चाहता वर्ग प्रचंड प्रमाणात निर्माण झालेला आहे, आणि म्हणून गावोगावी गल्लोगल्ली त्यांच्या प्रचार सभेला मतदार प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत, आणि सर्व पक्षीय उमेदवारांच्या मनात धडकी भरत आहे.

  • BJP rebels : ब्रिजभूषण पाझारे यांची भाजपातून हकालपट्टी

    BJP rebels महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी पक्षासोबत बंडखोरी करणाऱ्या 40 जणांना नेत्यांना अखेर बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पक्षाने सांगूनही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने पक्षाकडून ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे.

    बंगाली समाजाचा निर्धार पुन्हा किशोर जोरगेवार

    Bjp rebels या हकालपट्टीमध्ये चंद्रपुरातील ब्रिजभूषण पाझारे, ब्रह्मपुरी वसंत वारजूरकर, वरोरा राजू गायकवाड, अहतेशाम अली यांच्यासह एकूण 40 जणांवर पक्षाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनीही बंडखोरी करणाऱ्यांवर पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित करणार असल्याचे सांगितले होते.

    चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून भाजपचे जिल्हा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे हे निवडणूक लढविण्यास इच्छुक होते, मात्र ऐनवेळी चंद्रपुरातील अपक्ष आमदार जोरगेवार यांना उमेदवारी देण्यात आल्याने पाझारे यांचा पक्षातून अपेक्षाभंग झाला. Bjp rebels

    चंद्रपुरातील रेल्वे स्टेशन जवळ बंदूक सह युवकाला अटक

    उमेदवारी न मिळाल्याने पाझारे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्धार केला, भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपविला होता, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर त्यांना भाजप पक्षाने अर्ज मागे घेण्यास सांगितले मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला.

    5 नोव्हेंबर रोजी पक्ष सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी भाजप पक्षातील 40 जणांची पक्षातून हकालपट्टी केली असल्याचे पत्र जारी केले. मात्र पाझारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी अनेक भाजप पदाधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित होते, त्यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Notably Now Bengali Samaj : बंगाली समाजाचा निर्धार.. पुन्हा किशोर जोरगेवार

    Bengali Samaj चंद्रपूरात बंगाली समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. या शहराच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. हा प्रामाणिक आणि कष्टकरी समाज आहे. आपली संस्कृती, परंपरा आणि आपसातील प्रेम वृद्धिंगत करणारा हा स्नेहमिलनाचा कार्यक्रम असून बंगाली समाजाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

     Bengali samaj बंगाली कॅम्प येथे बंगाली समाज बांधवांच्या वतीने स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वंदना हातगावकर,  सविता दंढारे, भारती दुधानी, माजी नगरसेविका शिला चव्हाण, चंपा बिश्वास, कौसर खान, कल्पना शिंदे आदींची प्रमुख्यतेने उपस्थिती होती.

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार अभिलाषा गावतुरे यांच्या प्रचाराचा झंझावात

      यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, मागील पाच वर्षांत आपण सर्व समाजाला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. बंगाली समाजाशी माझे नेहमी स्नेहपूर्ण संबंध राहिले आहेत. या समाजातील मोठा वर्ग आमच्यासोबत सक्रियतेने काम करत आहे. आमच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात या समाजातील कार्यकर्त्यांचा सहभाग राहिला आहे. या समाजातील समस्यांचीही आम्हाला जाणीव असून त्या सोडविण्यासाठी नेहमी आमचे प्रयत्न राहिले असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. Bengali samaj

      बंगाली संस्कृती म्हणजे एक समृद्ध वारसा आहे. आपल्या भाषेत, कलेत, साहित्यात, आणि संगीतामध्ये एक अनोखा आत्मभाव आहे. या स्नेहमिलनाच्या निमित्ताने आपल्या परंपरांना अभिवादन करत, आपल्या मुलांना आणि युवा पिढीला या वारशाचा अर्थ पटवून देणे आवश्यक आहे. आजचा कार्यक्रम म्हणजे आपल्यातील बंध वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न आहे. आपल्यातील युवा पिढीला सांस्कृतिक वारशाचे मोल समजावून देणे आणि या परंपरेचे महत्त्व पटवून देणे हे आपले कर्तव्य आहे.

    चंद्रपुरातील मायकल भाई जेव्हा रेल्वे स्टेशनवर बंदूक घेऊन आला

    समाजाला येणाऱ्या प्रत्येक अडचणीच्या वेळी मी आपल्या सोबत आहे आणि हक्काचा भाऊ म्हणून आपण यापूर्वीही मला हाक दिली आहे. पुढेही हे स्थान कायम ठेवावे मि आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही, असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला बंगाली समाजातील पुरुष व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

  • Popular Now Abhilasha Gaoture : अपक्ष उमेदवार अभिलाषा गावतुरे यांच्या प्रचाराचा झंझावात

    Abhilasha Gaoture बल्लारपूर येथील मंगलमूर्ती लॉन मध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत प्रचार शुभारंभाची सभा उत्साहात संपन्न झाली.

    Abhilasha gaoture प्रचंड जनसमदायाच्या उपस्थितीमध्ये बल्लारपूर मूल बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रिय उमेदवार डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांच्या प्रचारासाठी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

    गेल्या पंधरा वर्षापासून करीत असलेली निस्वार्थ समाजसेवा शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि वैद्यकीय क्षेत्रात दिलेली निस्वार्थ सेवा यामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात अभिलाषा ताई गवतुरे यांना प्रचंड जन समर्थन मिळत आहे. Abhilash gaoture

    चिचपल्ली येथे माकडाचा धुमाकूळ, 10 नागरिकांना घेतला चावा

    समाजातील विविध क्षेत्रातील विविध सामाजिक संघटना विविध राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे जोरदार समर्थन डॉक्टर अभिलाषा ताई गावकर यांना मिळत आहे. विविध राजकीय पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षभेद बाजूला सरवण डॉक्टर अभिलाषा ताई गौतरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत बल्लारपूर येथे झालेल्या सभेमध्ये राष्ट्रीय कुणबी महासंघाचे जिल्हा सचिव श्री अतुल ठाकरे यांनी डॉक्टर विलासताई गौतरे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. Abhilasha Gaoture

    चंद्रपूर शहरात युवकाकडे मिळाली बंदूक

    रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे नीरज वाळके यांनी कुठल्याही पक्ष धोरणाची तमा न बाळगता फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील प्रमाणात कार्य डॉक्टर म्हणून पाठिंबा जाहीर केला आणि प्रचार करण्यासाठी सज्ज झाले. जुना चे सरपंच विवेक शेंडे, कारव्याचे माजी पंचायत समिती सदस्य विनोद सीडाम, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे गणपत नैताम, नथू पाटील वांढरे, अमन पसंत कमिटीचे ताहीर भाई हुसेन, अतिक भाई शेख, बशीर खान, शेख जाकीर, गणेश बुटले, गोवारी समाज संघटनेचे सतीश नेवारे, चिचपल्ली चे संतोष भाऊ तोडासे, सुनील बावणे, मानोराचे मोहन पवार, कोर्टी मक्त्याचे साईनाथ तायडे, कोटीचे रवींद्र भाऊ टोंगे, बामणीच्या तंजीला सय्यद मॅडम, करुणाताई शेगोकार, नाहीद हुसेन, तुळशीराम कंबलवार,
    विसापूरचे अशोक भाऊ चिताडे आणि राजूभाऊ लांडगे इत्यादी सर्व मान्यवर मंचावर उपस्थित होते.

    कोणत्याही पक्षाने अभिलाषा ताईंना तिकीट दिली नसेल तरी आम्ही जनतेने अभि लक्ष त्यांना तिकीट दिली आहे अशी घोषणा सर्व उपस्थित मान्यवरांनी केली आणि अभिलाषाताई गावतुरे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी तन-मन-धनाने सहकार्य करण्याची ग्वाही सुद्धा दिली. Abhilasha Gaoture


    ज्यावेळी डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांनी उमेदवार म्हणून बोलताना मुल बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या 30 वर्षांमध्ये विद्यमान पालकमंत्र्यांनी कुठलेही जनहिताचे काम केले नाही आणि विकासाच्या नावाखाली स्वतःच्या कंत्राटदारांना पोसण्यासाठी फक्त दगड धोंड्याच्या बिल्डिंग बनवण्याचं काम केलं. ना पालकमंत्र्यांचा इथल्या शाळांकडे लक्ष आहे ना येथील दवाखान्यांमध्ये सोयी सुविधा उपलब्ध आहेत ना कोणता नवीन उद्योग सुरू केला ना कुठल्या नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या उलट सुरू असलेल्या बामणी प्रोटीन सारख्या उद्योगाला सुद्धा बंद होण्यापासून ते रोखू शकले नाही असा आरोप त्यांनी केला. Abhilasha Gaoture

    शाळांमध्ये शिक्षक नाही म्हणून आम्ही आंदोलन करतो जिल्हा परिषद च्या शाळा सरकार बंद करत असताना आम्ही त्याविरुद्ध आवाज उचलतो विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बस नाही म्हणून आम्ही आंदोलन करतो.

    आमच्या शेतकऱ्यांच्या आणि गुराख्यांचे जीव वाघांच्या हल्ल्यामध्ये जातात म्हणून आम्ही आवाज उचलतो पण पालकमंत्र्यांना आमच्या सर्वसामान्य माणसांच्या जीवाची अजिबात फिकीर नाही, आंबडीची सिंचन योजना गेल्या 30 वर्षात पूर्ण करू शकले नाही, शेतकऱ्यांच्या मामा तलावाच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याने तलाव फुटले शेकडो लोक बेघर झाले आणि लाखोंच्या संपत्तीचे नुकसान झालं यासाठी आम्हाला लढावे लागते पण ज्यांना जनप्रतिनिधी म्हणून निवडून दिले असे जिल्ह्याचे पालकमंत्री याबाबत अक्षम्य उदासीनता बाळगतात आणि म्हणून या सर्वसामान्य जनतेच्या समस्या जर सोडवायचे असतील तर आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून द्या असे आवाहन अभिलाषा ताई गावतुरे यांनी केले. Abhilasha Gaoture

    कार्यक्रमाचे संचालन रवी देवगडे विजय मुसळे यांनी केले तर प्रस्तावना भूमिपुत्र ब्रिगेडचे ताहीर भाई हुसेन यांनी केली.

  • Independent candidate Abhilasha Gaoture : विविध सामाजिक संघटनांचा अपक्ष उमेदवार अभिलाषा गावतुरे यांना पाठिंबा

    Independent candidate Abhilasha Gaoture बल्लारपूर विधानसभा क्षेत्र सध्या राज्यात चर्चेचा विषय बनलेला आहे. येथील सुपरिचित सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांना काँग्रेसचे उमेदवारी निश्चित समजली जात असताना ऐनवेळी त्यांची उमेदवारी कापून मतदारसंघात काहीसे परिचित नसलेले संतोष रावत ह्यांना देण्यात आली. केवळ धनशक्ती च्या जोरावर रावत ह्यांना उमेदवारी देण्यात आली.


    Independent candidate Abhilasha Gaoture डॉ. अभिलाषा यांना उमेदवारी मिळावी अशी जनमाणसाची भावना असताना सुद्धा त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली याचा रोष बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेकडून व्यक्त केला जात आहे.

    चंद्रपुरातील मायकल जवळ मिळाली बंदूक

    त्यामुळे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील लोकांनीच पुढाकार घेऊन डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी येथील मोठ्या हॉटेल मध्ये एक चिंतन बैठक बोलवण्यात आली. या बैठकीला ओबीसी, दलित,आदिवासी मतांवर प्रभाव पाडणाऱ्या सर्व सामाजिक संघटनांचे सुमारे चारशे हून अधिक प्रतिनिधी त्यांच्या समर्थनात या बैठकीला हजर होते. Independent candidate Abhilasha Gaoture

    सध्या डॉ. अभिलाषा गावतुरे या अपक्ष आमदार म्हणून बल्लारपुर विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक लढवीत आहेत. एखाद्या अपक्ष उमेदवारीला सर्व स्थरातील समाजिक कार्यकर्त्यांनि एकजुटीने हजर असणे ही एक ऐतिहासिक घटना समजल्या जात आहे आणि त्यामुळे डॉ. अभिलाषा गावतुरे ह्यांचा विजय निश्चित समजल्या जात आहे.

    चिचपल्ली येथे माकडाचा धुमाकूळ

    विशेष म्हणजे काँग्रेसनी ज्यांना चंद्रपूर विधानसभेची उमेदवारी नाकारली असे अपक्ष उमेदवार राजूभाऊ झोडे हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. मागील निवडणुकीत बल्लारपूर विधानसभेत त्यांनी चाळीस हजार मते घेतली होती. त्यामुळे त्यांची उपस्थिती व पाठिंबा हे डॉ.अभिलाषा साठी वरदान ठरणार यात काही शंका नाही. Independent candidate Abhilasha Gaoture


    मुल- बल्लारपूर क्षेत्राचे विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करण्याची क्षमता केवळ डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्यात असूनही त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. आणी त्यामुळे संतोष रावत हे मंत्री सुधीर मुनगंटीवार ह्यांचे डमी उमेदवार असल्याचा स्पष्ट आरोप या बैठकीत ठेवण्यात आला. म्हणून डॉ. अभिलाषा गावतुरे या अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी सर्व सामाजिक संघटनांनी ठामपणे उभे राहून सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांचा प्रसार प्रसार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.


    या बैठकीला ज्येष्ठ पत्रकार व दलित मित्र डी. के. आरिकर, सत्यशोधक समाजाचे हिराचंद बोरकुटे, भीम आर्मी चे सुरेंद्रभाऊ रायपुरे, सोशल इज्युकेशन चे भास्कर मून, एडवोकेट प्रशांत सोनुले, प्रा.माधव गुरनुले, हेल्पिंग हँडस फाऊंडेशन चे अजय दुर्गे तसेच सुभाष रत्नपारखी,विशाल जुमनाके, बाबुराव ठाकरे ,बेलदार समाजाचे डॉक्टर राजू ताटेवार, जीवन उमरे,गिरीधर लांबट, अंकुश वाघमारे , गुलजार रायपूरे, ऋषी कोटनाके, कार्तिक बोरकर,हरिदास उराडे,शंकर बागेसर मुकुंदा आंबेकर, देविदास रामटेके, सुधाकर रामटेके, लोकेश्वर कोटरंगे, दशरथ पेंदोर, मुन्ना आवळे, डॉ. महेश भांडेकर, यशोधरा ताई पोतनवार व वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, वकील तथा प्राध्यापक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

  • VBA workers join BJP : वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते भाजपच्या गळाला

    VBA workers join BJP गेल्या दहा दिवसांमध्ये तीनवेळा काँग्रेसला खिंडार पडल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीमध्येही फुट पडली आहे. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कामावर विश्वास ठेवून वंचितमधील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विधानसभा क्षेत्रात बंडखोरी, 25 उमेदवारांची माघार

    VBA workers join BJP तर इतर पक्षांनी देखील भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. वंचितचा हा निर्णय महाविकास आघाडीसाठी देखील मोठा धक्का मानला जात आहे.

    विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये शिस्तीचा अभाव बघायला मिळत आहे. त्या तुलनेत भाजपमध्ये शिस्तबद्ध काम आहे. याचाच परिणाम म्हणून इतर पक्षांचे पदाधिकारी भाजपकडे आकर्षित होत आहेत.

    चंद्रपुरात मायकल भाई जवळ मिळाली बंदूक

    बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील काही पक्षांनी ना. मुनगंटीवार यांचा विकासाचा दृष्टीकोन लक्षात घेऊन भाजपची कास धरली आहे.

    वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष रमेश लिगमपल्लीवार यांच्यासह 200 पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. यामध्ये महिला आणि युवकांची संख्या लक्षणीय आहे.

    पक्षप्रवेशाच्या वेळी भाजपा तालुका अध्यक्ष बल्लारपूर किशोर पंदीलवार, भाजपा शाखा अध्यक्ष विसापूर गणेश टोंगे,विजय घिरडकर, राजू डाहुले,विठ्ठल तुराणकर यांची उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीत जात हा फॅक्टर चालला होता. पण आता चालणार नाही, हे वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी सिद्ध करून दिले आहे.

    वंचित बहुजन आघाडीसह इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना साथ दिली आहे. त्यामुळे विरोधकांचे मनसुबे उधळले गेले आहेत, असे स्पष्ट दिसत आहे.