Category: राजकारण

महाराष्ट्रातील राजकारण बातम्या (Maharashtra Politics News) आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व राजकीय घडामोडींसाठी news34.in हे आपले विश्वसनीय व्यासपीठ आहे. आम्ही तुम्हाला स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या प्रत्येक मोठ्या-छोट्या अपडेट्सचे कव्हरेज देतो. राजकीय विश्लेषण, पक्षांची धोरणे, नेत्यांची मते आणि महत्त्वाचे शासकीय निर्णय. कोणत्याही राजकीय बातम्या चुकणार नाहीत याची खात्री बाळगा. राजकारण या क्षेत्रातील विश्वसनीय आणि ताज्या बातम्या मिळवण्यासाठी नियमितपणे भेट द्या.

  • Final Sudhir mungantiwar Nomination : ठरलं तर, या दिवशी मुनगंटीवार दाखल करणार उमेदवारी अर्ज

    Final Sudhir mungantiwar Nomination : ठरलं तर, या दिवशी मुनगंटीवार दाखल करणार उमेदवारी अर्ज

    Sudhir mungantiwar Nomination सुधीर मुनगंटीवार २८ ऑक्टोबरला दाखल करणार उमेदवारी अर्ज, हजारोंची राहणार उपस्थिती ; कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह, मुल येथील उपविभागीय कार्यालय येथे दाखल करणार अर्ज

    Sudhir mungantiwar Nomination मुल – मुल, पोंभुर्णा व बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात विकासाचा झंझावात निर्माण करणारे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार येत्या सोमवारी, दि. २८ ऑक्टोबरला हजारोंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सलग सातव्या विजयासाठी सज्ज झालेले ना. श्री. मुनगंटीवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच चाहते, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे.

    राजकीय : चंद्रपूर विधानसभेतुन महायुतीचे मेरिट उमेदवार किशोर जोरगेवार?

    बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार २८ ऑक्टोबरला (सोमवारी) सकाळी ११.०० वाजता मुल येथील उपविभागीय कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुती घटक पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारसंघातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केले आहे. Sudhir mungantiwar Nomination

    यावेळी अर्ज भरण्यापूर्वी ना. श्री. मुनगंटीवार मतदारसंघातील नागरिकांचा आशीर्वाद घेऊन बाजार चौक मुल येथुन उपविभागीय कार्यालयाकडे अर्ज सादर करण्यासाठी निघणार आहे.विविध विकासकामांच्या माध्यमातून मुल, पोंभुर्णा व बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा ना. श्री. मुनगंटीवार यांनी बदलला आहे. बल्लारपूर मतदारसंघाचे नेतृत्व करताना संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेईल एवढी विकासकामे केली.

    बल्लारपूर, मुल व पोंभूर्णा येथे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सर्वांगिण विकासाचे धोरण राबविण्यावर ना. श्री. मुनगंटीवार यांचा भर राहिलेला आहे. अगदी विरोधकही त्यांचा विकासाचा झंझावात मान्य करतात. शेतकरी बांधव असोत, महिला असोत किंवा तरुणवर्ग असो प्रत्येकाच्या कल्याणासाठी व सक्षमीकरणासाठी ना. श्री. मुनगंटीवार सदैव अग्रेसर असतात. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सलग सहा विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी झाले आहे . आता २०२४च्या निवडणुकीतही ते विजयासाठी सज्ज झाले आहेत.

  • Exclusive Kishor Jorgewar Bjp Candidate : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात महायुतीचे मेरिट उमेदवार किशोर जोरगेवार?

    Exclusive Kishor Jorgewar Bjp Candidate : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात महायुतीचे मेरिट उमेदवार किशोर जोरगेवार?

    Kishor Jorgewar Bjp Candidate विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये आता हळूहळू चुरस निर्माण होत आहे, महाविकास आघाडी व महायुती ने काही उमेदवारांची यादी जाहीर केली तर काही जागांवर एकमत नसल्याने जागा वाटपाचे घोड अजूनही अडलं आहे.

    Kishor Jorgewar Bjp Candidate चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी आधी राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली मात्र कांग्रेसने जोरगेवार यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला त्यामुळे त्यांचा प्रवेशाचा मार्ग खडतर झाला.

    24 ऑक्टोबर रोजी रात्री दिल्ली मध्ये खलबत झालं आणि जोरगेवार हे भाजपचे उमेदवार असणार अशी माहिती बाहेर आली, त्यामुळे भाजप निष्ठावंत खवळून गेले, आता भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे, यासाठी भाजपचे पदाधिकारी नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपली भूमिका मांडणार आहे.

    जोरगेवार यांना उमेदवारी मिळू नये यासाठी भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार तातडीने दिल्ली ला रवाना झाले, आपल्या कार्यकर्त्यांची भूमिका काय? हे समजवून सांगण्यासाठी मुनगंटीवार दिल्ली येथे जात असल्याची प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली आहे. Kishor Jorgewar Bjp Candidate

    महत्त्वाचे : चंद्रपूर पोलीस म्हणतात या पोलिसांपासून सावध रहा

    विशेष बाब म्हणजे यंदा महायुती मेरिट नुसार तिकीट वाटप करणार आहे, महायुती च्या सर्व्हेमध्ये किशोर जोरगेवार हे आघाडीवर असल्याने भाजप पक्षाने त्यांना उमेदवारी देण्याचे कदाचित ठरविले असणार अशी शक्यता आहे.

    वर्ष 2019 मध्ये आमदार जोरगेवार यांच्या उमेदवारीला कांग्रेस पक्षातून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी विरोध दर्शविला होता, आता वर्ष 2024 मध्ये पुन्हा कांग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जोरगेवार यांच्या महाविकास आघाडी मधून उमेदवारीला विरोध केला.

    विशेष म्हणजे धानोरकर यांच्या विरोधामुळे किशोर जोरगेवार यांनी 72 हजार मतांची आघाडी घेत राष्ट्रीय पक्षांना धोबीपछाड दिली होती, मात्र त्यावेळी महाविकास आघाडी ने एका जागेचे नुकसान केले होते, आता सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. Kishor Jorgewar Bjp Candidate

    सत्तेसाठी सर्व पक्षांना एक-एक जागा महत्वाची आहे मात्र महाविकास आघाडी व महायुती आमदार जोरगेवार यांच्या उमेदवारीला विरोध करीत स्वतःच नुकसान करीत आहे.

    चंद्रपूर विधानसभा ही जागा कांग्रेस पक्ष 1995 पासून सतत हरत आहे, वर्ष 2014 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर तर वर्ष 2019 मध्ये कांग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर होता त्यानंतर सुद्धा कांग्रेस पक्षाचा चंद्रपूर विधानसभेवरील दावा हास्यास्पद आहे असे जाणकारांचे मत आहे. लोकसभा निवडणुक व विधानसभा निवडणूक यामध्ये मोठा फरक असतो.

    एकेकाळी आमदार मुनगंटीवार यांचे भाजप पक्षातील खंदे समर्थक म्हणून किशोर जोरगेवार यांची ओळख होती, मात्र राजकारणात वैर व मैत्री हे जास्त काळ टिकत नसते.

    सध्या महाविकास आघाडी व महायुती मधील नेते आपापल्या सोयीनुसार उमेदवारी ठरवीत सेटिंग चे राजकारण करीत आहे. जोरगेवार यांनी अपक्ष निवडणूक लढल्यास तेचं जिंकणार असा कौल चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील मतदारांचा आहे.

  • Exclusive Nomination application filed : 7 उमेदवारी अर्ज दाखल, वरोरा विधानसभा क्षेत्रात लाडक्या भावाचा अर्ज

    Exclusive Nomination application filed : 7 उमेदवारी अर्ज दाखल, वरोरा विधानसभा क्षेत्रात लाडक्या भावाचा अर्ज

    Nomination application filed महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नामांकन दाखल करावयाच्या तिस-या दिवशी आज (दि. 24) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण सात उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले.

    महत्त्वाचे : बल्लारपूर शहरात आरोग्य विमा घोटाळा

    Nomination application filed यात 70 – राजुरा विधानसभा मतदारसंघात सुभाष रामचंद्र धोटे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) आणि वामनराव सदाशिव चटप (स्वतंत्र भारत पक्ष), 71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात सुरेश मल्लारी पाईकराव (अपक्ष), 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात निरंक, 73 – ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात विजय नामदेवराव वडेट्टीवार (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), 74 – चिमूर विधानसभा मतदारसंघात किर्तीकुमार भांगडीया (भारतीय जनता पार्टी) आणि सतिश वारजुकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात प्रवीण सुरेश काकडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांनी गुरुवारी नामांकन अर्ज दाखल केले.

    तर आज 70-राजुरा विधानसभा मतदारसंघात 19 अर्ज, 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 14 अर्ज, 72-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 14 अर्ज, 73-ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 34 अर्ज, 74-चिमूर मतदारसंघात 20 अर्ज आणि 75-वरोरा विधानसभा मतदारसंघात 20 अर्ज असे एकुण सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 121 अर्जांची उचल करण्यात आली आहे.

    वरोरा विधानसभा क्षेत्रात निष्ठावंत कांग्रेस कार्यकर्त्यांना डावलून खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

  • Today Election nomination form : सर्वाधिक उमेदवारी अर्जाची उचल या विधानसभा क्षेत्रातून

    Today Election nomination form : सर्वाधिक उमेदवारी अर्जाची उचल या विधानसभा क्षेत्रातून

    Election nomination form महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक  निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नामांकन दाखल करावयाच्या दुस-या दिवशी आज (दि. 23) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकही नामांकन दाखल करण्यात आलेले नाही. तर बुधवारी इच्छुकांकडून 174 अर्जांची उचल करण्यात आली.

    महत्त्वाचे – चंद्रपूर जिल्ह्यात 4 दिवस दारूबंदी

    Election nomination form विधानसभा निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नामांकन दाखल करावयाच्या दुस-या दिवशी जिल्ह्यातील 70-राजुरा विधानसभा मतदारसंघात 23 अर्ज, 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 16 अर्ज, 72-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 48 अर्ज, 73-ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 24 अर्ज, 74-चिमूर मतदारसंघात 27 अर्ज आणि 75-वरोरा विधानसभा मतदारसंघात 36 अर्ज असे एकुण सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 174 अर्जांची उचल करण्यात आली आहे.

    महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण  288  जागांसाठी  20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे.  उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असून, 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.

  • Today nomination of candidates : पहिल्या दिवशी चंद्रपुरात कुणी केला उमेदवारी अर्ज दाखल?

    Today nomination of candidates : पहिल्या दिवशी चंद्रपुरात कुणी केला उमेदवारी अर्ज दाखल?

    nomination of candidates महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नामांकन दाखल करावयाच्या पहिल्या दिवशी आज (दि. 22) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकही नामांकन दाखल करण्यात आलेले नाही. तर इच्छुकांकडून 216 अर्जांची उचल करण्यात आली.
    वाहन चालक देणार टक्कर

    nomination of candidates विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नामांकन दाखल करावयाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील 70-राजुरा विधानसभा मतदारसंघात 44 अर्ज, 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 31 अर्ज, 72-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 56 अर्ज, 73-ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 34 अर्ज, 74-चिमूर मतदारसंघात 24 अर्ज आणि 75-वरोरा विधानसभा मतदारसंघात 27 अर्ज असे एकुण सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 216 अर्जांची उचल करण्यात आली आहे.

    राजकारण : वाहन चालक देणार विजय वडेट्टीवार यांना निवडणुकीत टक्कर

    महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी  20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे.  22 ऑक्टोंबर रोजी निवडणूक अधिसूचना जारी झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोंबर असून, 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर पर्यंत आहे. nomination of candidates


    सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून भाजपचे सुधीर मुनगंटीवार, चिमूर मधून भाजपचे बंटी भांगडीया, राजुरा मतदार संघात स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, मनसेचे सचिन भोयर व चंद्रपुर विधानसभा क्षेत्रातून मनसेचे मनदिप रोडे यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

  • Parivartan mahashakti alliance : राजुरा विधानसभा क्षेत्रात परिवर्तनाचे वारे

    Parivartan mahashakti alliance : राजुरा विधानसभा क्षेत्रात परिवर्तनाचे वारे

    Parivartan mahashakti alliance चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील निवडणूक यंदा चुरशीची होणार आहे. राज्यात सध्या महायुती, महाविकास आघाडी व आता तयार झालेली परिवर्तन महाशक्ती आघाडी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.

    Parivartan mahashakti alliance जिल्ह्यातील राजुरा विधानसभा निवडणूक यंदा आव्हानात्मक असणार आहे, कारण माजी आमदार वामनराव चटप हे परिवर्तन करायला तयार असून 21 ऑक्टोबर रोजी तिसऱ्या आघाडीने वामनराव चटप यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

    राजकीय : सुधीर मुनगंटीवार सातव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

    वामनराव चटप हे परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे, शेवटच्या घटकातील नागरिकांना चटप यांचं नाव तोंडपाठ आहे, साधी सरळ विचारसरनी असलेले वामनराव चटप यांनी शेवट वर्ष 2019 मध्ये निवडणूक लढवली होती, त्या निवडणुकीत 3 मतांपेक्षा कमी मतांनी त्यांचा पराभव झाला, मात्र न खचता त्यांनी विधानसभा क्षेत्रात आपलं काम निरंतर सुरू ठेवले.

    गुन्हेगारी : स्थानिक गुन्हे शाखेने पकडली अवैध दारू

    उत्कृष्ट संसदपटू, वक्ता म्हणून चटप यांची ओळख आहे, विशेषकरून सामान्य जनतेत मिसळणारे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणून चटप यांचं नाव सर्वात आधी घेतल्या जाते, वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात वामनराव चटप यांनी झोकून दिले, वेगळा विदर्भ झाल्याशिवाय शांत बसणार नाही अशी आक्रमक भूमिका चटप यांची आहे.

    या विधानसभा निवडणुकीत कांग्रेसचे विद्यमान आमदार धोटे यांच्या विजयात वामनराव चटप हे अडसर ठरू शकतात, परिवर्तन महाशक्ती आघाडी द्वारे यंदा राजुरा विधानसभा निवडणुकीत परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे.

  • BJP candidate : भाजपचे 2 उमेदवार जाहीर 4 वेटिंगवर

    BJP candidate : भाजपचे 2 उमेदवार जाहीर 4 वेटिंगवर

    BJP candidate 20 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, या यादीत चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर व बल्लारपूर या 2 विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे.
    उर्वरित 4 विधानसभा क्षेत्रातील उमेदवारीवर अजूनही सस्पेन्स कायम आहे.


    BJP candidate राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे, मात्र काही जागेवर तेच उमेदवार तर काही जागांवर मेरिट नुसार उमेदवारी देण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 6 विधानसभा पैकी 3 कांग्रेस 2 भाजप व 1 जागा अपक्षाकडे आहे. BJP candidate

    महत्त्वाचे : निराधारांचा आधार अम्मा चं निधन


    वर्ष 2019 च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर मधून अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी विजय मिळविला होता.
    किशोर जोरगेवार यांना 1 लाख 17 हजार 570 मते मिळाली होती तर भाजपचे नाना शामकुळे यांना 44 हजार 909 मते मिळाली.


    राजुरा विधानसभा क्षेत्रात कांग्रेसचे सुभाष धोटे यांना 60 हजार 228 तर शेतकरी संघटनेचे वामनराव चटप यांना 57 हजार 727 मते मिळाली.
    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना 86 हजार 2 मते तर कांग्रेसचे डॉ विश्वास झाडे यांना 52 हजार 762 मते मिळाली होती. BJP candidate


    ब्रह्मपुरी मतदार संघातून कांग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना 96 हजार 726 मते तर शिवसेना पक्षाचे संदीप गड्डमवार 78 हजार 177 मते मिळाली, वरोरा विधानसभा मतदार संघातून कांग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना 63 हजार 862 तर भाजपचे संजय देवतळे यांना 53 हजार 665 मते मिळाली. चिमूर मतदार संघातून भाजपचे बंटी भांगडिया यांना 87 हजार 146 मते तर कांग्रेसचे सतीश वारजूरकर यांना 77 हजार 394 मते मिळाली होती.


    चिमूर मतदार संघातील भाजप आमदार बंटी भांगडिया हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू व खंदे समर्थक आहे, त्यामुळे यंदा त्यांना विजयाची हॅट्रिक साधण्याची संधी भाजपने दिलेली आहे. BJP candidate


    सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात केलेला विकास व राज्यात आपल्या मंत्रालयात केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवीत संधी दिली आहे.
    चंद्रपूर विधानसभा मतदार संघात भाजपने उमेदवार जाहीर केला नसून विद्यमान आमदार काय भूमिका घेतात ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार अशी वाट भाजप पक्ष पाहत आहे, वेळेवर भाजप आयात उमेदवाराला संधी देऊ शकतो.


    वरोरा मतदार संघात भाजप पक्षाकडून इच्छुकांची गर्दी आहे बंडखोरी होऊ नये यासाठी भाजपने अद्यापही उमेदवारी जाहीर केली नाही.
    राजुरा मतदार संघ हा कांग्रेसचे बालेकिल्ला आहे सध्या भाजप कडून देवराव भोंगळे, माजी आमदार संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांची नावे चर्चेत आहे. याठिकाणी सुद्धा भाजपला बंडखोरीची शक्यता वाटत असल्याने उमेदवार जाहीर केला नाही.


    ब्रह्मपुरी मतदार संघात कांग्रेसचे विजय वडेट्टीवार हे बलाढ्य उमेदवार आहे त्यांच्यासमोर अजूनही भाजप पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही, ब्रह्मपुरी विधानसभेत वडेट्टीवार यांच्या तोडीतला उमेदवार अद्याप भाजपला मिळालेला नाही.

    एकूण मतदार किती?
    राजुरा मतदार संघात 3 लाख 24 हजार 209, चंद्रपूर 3 लाख 72 हजार 455, बल्लारपूर 3 लाख 11 हजार 094, ब्रह्मपुरी 2 लाख 75 हजार 221, चिमूर 2 लाख 79 हजार 581 तर वरोरा मतदार संघात 2 लाख 80 हजार 980 मतदारांचा समावेश आहे.

  • Assembly candidate list bjp : चंद्रपूर जिल्ह्यातून भाजपचे 2 दिग्गज पुन्हा निवडणुकीच्या मैदानात

    Assembly candidate list bjp : चंद्रपूर जिल्ह्यातून भाजपचे 2 दिग्गज पुन्हा निवडणुकीच्या मैदानात

    Assembly candidate list bjp भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

    Assembly candidate list bjp विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 29 ऑक्टोबर असून उमेदवारी मागे घेण्याची तारीख ही 30 ऑक्टोबर आहे, विशेष म्हणजे 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

    भाजपची यादी

    लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात मिळालेले मोठे यश बघता विधानसभा निवडणुकीत सुद्धा mva आघाडीवर राहणार अशी शक्यता वर्तविली जात आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपूरचे विद्यमान आमदार जोरगेवार यांना मातृशोक

    राष्ट्रवादी कांग्रेस व शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ही पहिली निवडणूक असणार, यामध्ये राष्ट्रवादी-शिवसेना दोन्ही पक्ष एकमेकांना भिडणार आहे.

    भाजप केंद्रीय समितीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत 99 उमेदवारांचा समावेश आहे, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना नागपूर-दक्षिण-पश्चिम, चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मधून तर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून सुधीर मुनगंटीवार, चिमूर विधानसभा क्षेत्रातून बंटी भांगडीया यांच्या नावाचा समावेश आहे.

    भाजप, राष्ट्रवादी कांग्रेस व वंचित आघाडीने उमेदवारांची नावे जाहीर केली आहे मात्र अद्यापही महाविकास आघाडी, शिवसेना शिंदे यांनी उमेदवार घोषित केले नाही.

  • List of Assembly Candidates : वंचित बहुजन आघाडीने जाहीर केली उमेदवारांची यादी, चिमूर, बल्लारपूर तर चंद्रपुरातून कोण?

    List of Assembly Candidates : वंचित बहुजन आघाडीने जाहीर केली उमेदवारांची यादी, चिमूर, बल्लारपूर तर चंद्रपुरातून कोण?

    List of Assembly Candidates राज्यात विधानसभा निवडणुकीचा शंखनाद झाला असून राजकीय पक्ष जिंकणाऱ्या उमेदवाराचा शोध घेऊ लागले आहे, मात्र अद्यापही अनेक राजकीय पक्षांना योग्य उमेदवार सापडत नाही आहे.


    List of Assembly Candidates मात्र अश्यात सर्व पक्ष जागावाटप मध्य गुंतलेले असताना वंचित बहुजन आघाडीने उमेदवाराची यादी जाहीर केली आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यात हे निर्बंध लागू


    16 ऑक्टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून त्यामध्ये एकूण 15 उमेदवारांचा समावेश आहे.

    राजकीय : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील राजकीय बालिशपणा


    या यादीत चंद्रपू जिल्ह्यातील बल्लारपूर व चिमुर विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांचा समावेश आहे.
    बल्लारपूर विधानसभा मतदार संघातून सतीश मुरलीधर मालेकर व चिमूर मतदार संघातून अरविंद आत्माराम सांदेकर यांचा समावेश असून या दोन उमेदवारांपैकी चिमुर विधानसभा क्षेत्रातून वंचित बहुजन आघाडीतर्फे वर्ष 2019 च्या विधान निवडणुकीत अरविंद सांदेकर निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी सांदेकर यांना 24 हजार 474 मते मिळाली, पराभव झाला असला तरी सांदेकर तिसऱ्या क्रमांकावर होते हे विशेष.

    वंचित बहुजन आघाडीने अद्यापही चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी जाहीर केली नाही. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली होती, आता विधानसभा निवडणुकीत काय परिस्थिती असणार हे येणार काळ सांगेलचं.

  • Today Political childishness : आचारसंहिता लागण्यापूर्वी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील ‘राजकीय बालिशपणा”

    Today Political childishness : आचारसंहिता लागण्यापूर्वी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील ‘राजकीय बालिशपणा”

    Political childishness 15 ऑक्टोबर पासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, मात्र आचारसंहिता लागू होण्यापूर्वी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात राजकीय बालिशपणाचे उदाहरण बघायला मिळाले.

    Political childishness विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपुरात अनेक विकासकामे करण्यासाठी निधी खेचून आणला, वाचनालय असो की बाबूपेठ उड्डाणपूल, तसेच दिक्षाभूमि व वढा तीर्थक्षेत्र यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करीत भूमिपूजन व काम पूर्णत्वास नेले.

    महत्त्वाचे : मजूर काम करण्यासाठी गेला आणि रोटाव्हॅटर मशीनमध्ये अडकला

    मात्र आचारसंहिता लागण्यापूर्वी विधानसभा क्षेत्रात भाजप विरुद्ध जोरगेवार असा सामना पुन्हा रंगला आहे, त्याच उदाहरण म्हणजे बाबूपेठ उड्डाणपूल नागरिकांसाठी वाहतुकीसाठी सुरू करणे, एकदिवस आधी म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी आमदार जोरगेवार हे बाबूपेठ उड्डाणपुलाची पाहणी करण्याकरिता गेले आणि दुसऱ्या दिवशी हा उड्डाणपूल नागरिकांसाठी सुरू करू अशी घोषणा करीत ते निघून गेले होते. Political childishness

    मात्र 9 ऑक्टोबर रोजी भाजपचे ब्रिजभूषण पाझारे यांनी आपल्या कार्यकर्त्यासह बाबूपेठ उड्डाणपूलावर बँड बाजा लावत सदर उड्डाणपूल नागरिकांसाठी सुरू केला, मात्र दुसऱ्या दिवशी आमदार जोरगेवार हजारो नागरिकांसह उड्डाणपूलावर पोहचत म्हणण्याप्रमाणे उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू केला, 15 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उड्डाणपूलाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच अधिकृतपणे नाव दिलं.

    गुन्हेगारी : चंद्रपूर शहरात जुन्या वादातून युवकाची हत्या, 2 तासात आरोपीना अटक

    15 ऑक्टोबर रोजी आचारसंहिता लागणार होती, तत्पूर्वी विधानसभा क्षेत्रातील भूमिपूजन काम संपन्न होत होते, त्यामध्ये 25 कोटी निधी हा वढा तीर्थक्षेत्र साठी आमदार जोरगेवार यांनी मंजूर केला होता, 15 ऑक्टोबर रोजी त्याबाबत भूमिपूजन कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला, मात्र त्याठिकाणी सकाळी भाजपचे ब्रिजभूषण पाझारे आपल्या समर्थकासह तिथं पोहचत भूमिपूजन उरकून टाकले, त्यांनतर नियोजित वेळेत आमदार जोरगेवार यांनी अधिकृतपणे भूमिपूजन कार्यक्रम पार पाडला. Political childishness

    दोन्ही ठिकाणी भाजप नेते पाझारे यांनी हा प्रकार करीत स्वतःवर अनेकांची नाराजगी ओढवून घेतली, चंद्रपूर जिल्हा व संपूर्ण राज्यात सुधीर मुनगंटीवार यांची मातब्बर राजकारणी म्हणून ओळख आहे, अनेकदा ते मुख्यमंत्री पदाचे दावेदारी म्हणून त्यांचं नाव चर्चेत आलं होतं, लोकसभा निवडणुकीत त्यांचा 2 लाख 60 हजार मतांनी पराभव झाला. सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यकर्ते असे तत्पर असते तर मुनगंटीवार यांना पराभवाचे तोंड बघावे लागले नसते, जर मुनगंटीवार लोकसभेत खासदार म्हणून विराजमान झाले असते तर जिल्ह्यात विकासाची लाट नक्कीचं आली असती. Political childishness

    मुनगंटीवार यांचं राजकीय क्षेत्रात मोठं नाव असताना त्यांचे कार्यकर्ते म्हणून पाझारे यांनी केलेला प्रकार राजकीय पोरकटपणाचे एक लक्षण आहे अशी चर्चा सध्या विधानसभा क्षेत्रात रंगली आहे, आज किशोर जोरगेवार हे सामान्य नागरिकांचे आधार बनले आहे, त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे पूर्णत्वास आली.

    आज भाजप तर्फे ब्रिजभूषण पाझारे हे विधानसभा निवडणुकीत जोरगेवार यांच्यापुढे आव्हान निर्माण करतील अशी चिन्हे आहे, पण पाझारे हे अजूनही नागरिकांच्या मनात घर करू शकले नाही आहे.

    ऑक्टोबर महिन्यांतच विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे, तत्पूर्वी चंद्रपुरात अनेक राजकीय भूकंप आपल्याला बघायला मिळणार आहे, मात्र सध्यातरी आचारसंहिता लागण्यापूर्वीचा राजकीय बालिशपणा नागरिकांनी आधीच बघितला आहे.

    क्रमश…..