Category: राजकारण

महाराष्ट्रातील राजकारण बातम्या (Maharashtra Politics News) आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व राजकीय घडामोडींसाठी news34.in हे आपले विश्वसनीय व्यासपीठ आहे. आम्ही तुम्हाला स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या प्रत्येक मोठ्या-छोट्या अपडेट्सचे कव्हरेज देतो. राजकीय विश्लेषण, पक्षांची धोरणे, नेत्यांची मते आणि महत्त्वाचे शासकीय निर्णय. कोणत्याही राजकीय बातम्या चुकणार नाहीत याची खात्री बाळगा. राजकारण या क्षेत्रातील विश्वसनीय आणि ताज्या बातम्या मिळवण्यासाठी नियमितपणे भेट द्या.

  • E Bus Seva : इलेक्ट्रिक बस डेपोचे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन

    E Bus Seva : इलेक्ट्रिक बस डेपोचे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन

    E Bus Seva जिल्ह्यातील जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे वन्यजीव व पर्यावरण संवर्धनाची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांसारख्या पर्यायी इंधनांवर धावणाऱ्या वाहनांचा वापर करून आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो. त्यासाठीच चंद्रपूर शहर महानगरपालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

    E bus seva शासनाने चंद्रपूरला 50 ई-बस देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. पर्यावरणपुरक ई-बस दळणवळणासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी उत्तम साधन बनेल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    महत्त्वाचे : शहरातील हे ठिकाण पार्किंग स्थळ म्हणून घोषित

    चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने केंद्र पुरस्कृत पी.एम. ई -बस सेवा योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक बस डेपोचे भुमिपूजन मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल,  अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपयुक्त मंगेश खवले, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन महामंडळाचे सदस्य प्रकाश धारणे, सुभाष कोसनगोट्टूवार, रामपाल सिंग, नामदेव डाहुले, रवींद्र बेलावे आदींची प्रमुख उपस्थिती होती. E bus seva

    चंद्रपूरमध्ये एखाद्या प्रकल्पाचे भुमिपूजन किंवा उद्घाटन होते, तेव्हा मनस्वी आनंद होतो. चंद्रपूरचे नाव देशात अग्रेसर असले पाहिजे, यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. या गावात एखादी योजना मंजूर झाली की, त्याचा लाभ या गावातील, शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांना होतो, असे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा उल्लेखही केला. ‘चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वन अकादमीला थ्री स्टार नामांकन मिळाले आहे. सोबतच बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्था, कॅन्सर केअर हॉस्पिटल, सैनिक स्कूल, एसएनडीटी विद्यापीठ आदी बाबी येथे उत्तमरित्या साकारण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा ताडोबा व्याघ्र प्रकल्प आपल्या जिल्ह्यात आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणाची आपली जबाबदारी वाढली आहे. Pm e bus seva

    गुन्हेगारी : चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलाची हत्या, भाजप कार्यकर्त्याला अटक

    केंद्र सरकारने चंद्रपूर शहरात शहरात 50 ई-बसला परवानगी दिली आहे. बस डेपो, ई- चार्जिंग व्यवस्था येथे निर्माण करण्यात येत आहे. बस डेपोच्या परिसरात बचत गट आणि शेतक-यांच्या उत्पादित मालासाठी सुसज्ज बाजारहाट, प्रशिक्षण व्यवस्था, संकुल व्यवस्था, फूड कोर्ट आदी बांधण्यात येणार आहे. भविष्यात हा परिसर शहराचा मुख्य केंद्रबिंदू ठरणार असून बसस्टेशन आणि बाजार यादरम्यान रस्ता करण्याचे नियोजन आहे. जेणेकरून बचत गट आणि शेतकऱ्यांनी आणलेला माल बस स्थानकातून बाजारामध्ये येईल व पुढे ग्राहकसुद्धा येथून माल खरेदी करून शहरबस सेवेचा वापर करून आपापल्या गावी जातील, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले. Pm e bus seva

    यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, ई -बस सेवा हा चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. शाळा, दवाखाना व इतर ठिकाणी जाण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांना याची सुविधा होईल. पर्यावरणाच्या दृष्टीने एक चांगला उपक्रम असून पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प कार्यान्वित होत आहे.

    महायुती सरकारचे मंत्रिमंडळ निर्णय

     प्रास्ताविकात महापालिका आयुक्त विपिन पालीवाल,  म्हणाले इलेक्ट्रिक बस सेवा ही शहरासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. सदर बस सेवा सुरू करण्याची नागरिकांची अनेक दिवसांची मागणी होती. पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळे नागरिकांची ही अडचण दूर झाली आहे. 10 कोटींच्या निधीतून हा प्रकल्प साकारण्यात येणार असून ई -बस सेवेसाठी चंद्रपूरच्या 25 किलोमीटर परिसराचा विचार या करण्यात आला आहे. सदर इलेक्ट्रिक बस 18 मार्गावर चालणार आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी केले तर आभार महानगरपालिका उपायुक्त मंगेश खवले यांनी मानले.

  • Congress candidate : बल्लारपूर विधानसभेसाठी कांग्रेस पक्षाने डॉ. गावतुरे यांना उमेदवारी द्यावी, या पक्षाचा जाहीर पाठिंबा

    Congress candidate : बल्लारपूर विधानसभेसाठी कांग्रेस पक्षाने डॉ. गावतुरे यांना उमेदवारी द्यावी, या पक्षाचा जाहीर पाठिंबा

    Congress candidate बल्लारपूर विधानसभेसाठी काँग्रेसची उमेदवारी डॉक्टर अभिलाषताई गावतुरे यांना मिळावी – प्रवीण (बाळूभाऊ) खोब्रागडे, डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांना बल्लारपूर, पोंभुर्णा, मूल विधानसभा मतदार संघासाठी अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रवीण (बाळूभाऊ) खोब्रागडे यांनी आज जाहीर पाठिंबा घोषित केला

    Congress candidate दुर्गापूर येथे डॉ. अभिलाषाताई गावतुरे मित्र परिवार द्वारा आयोजित महाराष्ट्रातील प्रसिद्ध नामवंत लोकशाहीर संभाजी भगत यांच्या ‘विद्रोही आंबेडकरी शाहिरी जलशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते,
    धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन दुर्गापूर मध्ये करण्यात आले होते.

    घर तिथं युवासैनिक अभियान चंद्रपुरात राबविणार – जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे


    या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण (बाळूभाऊ) खोब्रागडे म्हणाले की मागील पंधरा वर्षांपासून सातत्याने फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये अभिलाषा ताई गवतरे यांचे मोठे योगदान आहे आणि बहुजनांचे प्रतिनिधी विधिमंडळामध्ये जाऊन पुरोगामी चळवळीला बळकटी मिळाली पाहिजे. Ballarpur

    पक्षाची बांधिलकी सोडून ज्याप्रमाणे संविधान वाचवण्यासाठी लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला आंबेडकरी जनतेने साथ सहयोग दिला होता आता सुद्धा ही परिस्थिती तशीच आहे व आंबेडकरी जनतेच्या मनातील इच्छा बल्लारपूर विधानसभेसाठी डॉ. अभिलाषाताई
    यांना प्रतिनिधित्व देण्याची आहे , म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने आंबेडकरी जनतेचा मान राखून डॉक्टर अभिलाषाताई गावतुरे यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली पक्षश्रेष्ठींकडे असा पाठपुरावा सुद्धा केल्याचे त्यांनी सांगितले. विद्रोही शाहीर संभाजी भगत यांच्या विद्रोही आंबेडकरी गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर अभिलाषाताई गावतुरे यांच्यासह मंचावर बाळू चांदेकर, दीपक कुंदोजवार, नमो शेंडे, संजू भगत , गिरीधर लांबट , देविदास रामटेके, मुन्ना आवळे, सुरेश कावळे, अनिल फाले ,डॉ.राजश्री आवळे, दीपक आवळे ,मुसा शेख , फिरोज पठाण, आनंद दोरखे, विशाल दुर्योधन, दिगंबर दुर्योधन , अँड.मोटघरे सर ,कमलाबाई मुन ,रत्नपारखी मॅडम, कौशिक खोब्रागडे, शुभम रायपूरे, आशिष शेंडे , खुशाल कावळे यांची उपस्थिती होती.

    बाबूपेठ उड्डाणपूल


    डॉ. अभिलाषा ताई गावतुरे मित्रपरिवार चे अध्यक्ष कौशिक खोब्रागडे यांनी याप्रसंगी सर्व मान्यवरांचे व दुर्गापूर येथील जनतेचे आभार मानले.

  • Maharashtra Telugu Sahitya Academy : महाराष्ट्र तेलुगु साहित्य अकादमीची स्थापना केल्याबद्दल तेलगू फेडरेशन ने मानले मुनगंटीवारांचे आभार

    Maharashtra Telugu Sahitya Academy : महाराष्ट्र तेलुगु साहित्य अकादमीची स्थापना केल्याबद्दल तेलगू फेडरेशन ने मानले मुनगंटीवारांचे आभार

    Maharashtra Telugu Sahitya Academy राज्य सरकारने ‘महाराष्ट्र तेलुगु साहित्य अकादमी ‘ स्थापना केली असून त्याबद्दल फेडरेशन ऑफ तेलगू असोसिएशन ने नुकतेच मंत्रालयात भेट घेत सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

    Maharashtra Telugu Sahitya Academy तेलगू फेडरेशनचे अध्यक्ष श्री.जगनबाबू गंजी यांनी सांगितले की ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या या तेलगू साहित्य अकादमीमुळे राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या तेलगू भाषिकांना एक हक्काचे साहित्यिक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. राज्यात या आधी पासूनच हिंदी, सिंधी आणि गुजराती  या तीन भाषिक साहित्य अकादमी कार्यरत आहेत. त्यात आता तेलगू आणि बंगाली साहित्य अकादमीची भर पडली आहे.

    महत्त्वाचे : निसर्ग पर्यटन केंद्राला रतन टाटा यांचं नाव

    तेलगू अकादमीच्या स्थापनेत पुढाकार घेतल्याबद्दल ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार फेडेरेशन ऑफ तेलुगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (एफ-टॉम) ने नुकताच मंत्रालयात केला. यावेळी अध्यक्ष जगनबाबू गंजी यांच्यासोबत प्रधान सरचिटणीस अशोक कांटे, संगेवानी रवी  आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

    यावेळी बोलताना ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी तेलगू आणि मराठी या भाषा भगिनी आहेत, महाराष्ट्राच्या जडणघडणीत तेलगू भाषकांचाही मोठा वाटा आहे, असे सांगितले. तेलुगू मराठी भाषेचे सांस्कृतिक संबंध ऐतिहासिक आहेत, असे सांगून ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू तंजावरचे राजे सरफोजीराजे भोसले यांनी तेलगूतूनही अनेक नाटके, कथा, कादंबऱ्या, कविता लिहिल्या आहेत, याकडे लक्ष वेधले. ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश या शेजारच्या राज्यात असलेल्या साहित्य परिषदेसारख्या संस्थांसोबत, तेलुगु आणि मराठी भाषिकांच्या विचारांची देवाण घेवाण करण्यात ही नवीन तेलगु अकादमी सहाय्यभूत ठरेल. Maharashtra Telugu Sahitya Academy

    एफ-टॉम चे अध्यक्ष श्री जगनबाबू गंजी यावेळी म्हणाले की तेलगू भाषक समाजाचे मुंबईच्या उभारणीत, उद्योगधंद्यात,  सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, कला, नाट्य, चित्रपट क्षेत्रात मोठे योगदान आहे. मुंबईतल्या अनेक ऐतिहासिक इमारती तेलुगु भाषिकांनी उभारल्या आहेत. या संदर्भात मनोहर कदम यांच्या पुस्तकात नोंदी नमूद आहेत. सामाजिक चळवळीत, स्वातंत्र्य लढ्यात, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक तेलुगु भाषिक शहीद झाले आहेत, असे ते म्हणाले. बालगंधर्वांची अनेक नाटके तेलुगु भाषेत भाषांतरीत करून सादरही झाली आहेत, अशी ही माहिती त्यांनी दिली. तेलगु अकादमीच्या स्थापनेत सहकार्य केल्याबद्दल त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबतच मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांचेही आभार मानले आहेत.

    नवीन तेलगू साहित्य अकादमी वर लवकरच अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे.


  • Babupeth uddanpul : बाबूपेठ वासीयांसाठी ऐतिहासिक दिवस

    Babupeth uddanpul : बाबूपेठ वासीयांसाठी ऐतिहासिक दिवस

    Babupeth uddanpul बाबूपेठ उड्डाणपुलाचे काम पुर्ण झाले आहे. मात्र लोकार्पण अभावी पुल नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांची भावना लक्षात घेउन आपण हा पुला उद्या 10 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता वाहतुकीसाठी खुला करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट केले आहे.


     Babupeth uddanpul आज संबंधित सर्व अधिका-यांसह त्यांनी बाबुपेठ उड्डाण पुलाची पाहणी केली. यावेळी पुलाचे काम जवळपास पुर्ण झाले आहे. त्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यास अडथळा नसल्याचे अधिका-यांनी म्हटले आहे. त्यानंतर हा पुल उद्याच वाहतुकीला सुरु करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचे व्हाट्सएप चॅटबॉट


          50 ते 60 हजार लोकवस्ती असलेल्या बाबुपेठ उड्डाण पुलाच्या कामात अनेक अडथळे आलेत. मात्र आता हा पुल बनून तयार झाला आहे. यासाठी शेवटच्या टप्यात लागणार असलेल्या 5 कोटी 90 लक्ष रुपयांचा निधी आमदार किशोर जोरगेवार यांनी मंजूर करुन आणला होता. त्यानंतर या निधीतून पुलाचे उर्वरित काम पुर्ण करण्यात आले आहे. आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकारी आणि बाबूपेठच्या नागरिकांसह पुलाची पाहणी केली. सदर पुल हा बाबूपेठकरांसाठी अत्यंत महत्वाचा आहे.

    12 कोटीच्या बस स्थानकाला गळती

            पूढे दसरा आणि दिक्षाभुमीचा कार्यक्रम आहे. यासाठी मोठ्या संख्येने येथून नागरिक रहदारी करणार आहे. त्यामुळे हा पुल आपण नागरिकांना वाहतुकीसाठी उद्याच १० ऑक्टोबरला सुरु करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. वास्तुचे लोकार्पण होणे हा शासकीय पध्दतीचा भाग आहे. मात्र यासाठी येथील हजारो नागरिकांना वेटीस धरणे योग्य नाही.

    बाबूपेठ उड्डाणपुल

    पुलाचे काम पुर्ण झाले आहे. हा सुरु करावा अशा मागण्या या भागातील नागरिकांच्या होत्या शेवटी हा पुल या लोकांच्या सोयीसाठीच आहे. त्यामुळे नागरिकांची भावना लक्षात घेता आपण हा उद्या ऑक्टोबरला सुरु करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. 

  • Mns engine : चंद्रपूर जिल्ह्यात मनसेचं इंजिन सुसाट

    Mns engine : चंद्रपूर जिल्ह्यात मनसेचं इंजिन सुसाट

    Mns engine महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार जिल्हाध्यक्ष अमनभाऊ अंधेवार यांचा नेतृत्वावर विश्वास ठेऊन असंख्य नागरिकांचा मनसे पक्षात प्रवेश

    Mns engine बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील चिंचोली गावामधील महिला व युवकांनी महाराष्ट्र कामगार सेना मध्ये प्रवेश घेतला व त्यांच्या अनेक समस्येवर चर्चा करीत अमन अंदेवार यांनी निराकरण करण्याचे आश्वासन दिले.

    चंद्रपुरातील 12 कोटीच्या बस स्थानकाला गळती

    नागरिकांनी घरकुल समस्या व स्थानिकांना रोजगार व् अनेक विषयावर चर्चा करून गावातील समस्या कामगार जिल्हाध्यक्ष अमनभाऊ अंधेवार यांच्या समक्ष ठेवल्या.

    आपण पक्षात प्रवेश केला आहे, आपलं काम लवकर कसे पूर्ण करता येणार ही प्रथम प्राथमिकता असणार आहे, मनसे पक्ष हा काम करणारा पक्ष आहे अशी प्रतिक्रिया अमन अंदेवार यांनी यावेळी दिली.

    यावेळी उपस्थित नागरिकांनी कामगार जिल्हाध्यक्ष अमनभाऊ अंधेवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मनसे पक्षात प्रवेश केला. यावेळी तालुका अध्यक्ष कामगार सेना पारितोष मंडल व कार्यकर्ते सोयल भाऊ. सिद्धार्थ तोवूरकर.भारतभाऊ. बंडू पेटकर. शैलेश बोरकर. सोनी लसने. किरण नेरे सोनी नेरे वनिता शारदा नेरे तगदीर तोहोत गणेश नेरे इतर नागरिक उपस्थित होते.

  • join congress party : विजय वडेट्टीवार यांचा वाढता प्रभाव

    join congress party : विजय वडेट्टीवार यांचा वाढता प्रभाव

    join congress party वंचीत बहुजन आघाडीचे सावली शहर अध्यक्ष रोशन बोरकर, नितीन दुधे व भाजपचे कार्यकर्ते संतोष कोटरंगे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कार्यावर विश्वास ठेऊन नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला.त्यामुळे सावली शहरात इतर पक्षातून काँग्रेस मध्ये इन्कमिंग सुरु असल्याचे चित्र आहे.

    राजकारण : उर्जानगर येथील युवकांच्या हाती शिवसेनेची मशाल

    Join congress party विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा राज्यात वाढता प्रभाव व शहरातील विकास कामांचा झंझावात बघता इतर पक्षातील कार्यकर्त्यांची इन्कमिंग सुरु झाली असून वंचित बहुजन आघाडीचे सावली शहर अध्यक्ष रोशन बोरकर, शहर उपाध्यक्ष नितीन दुधे यांनी प्रवेश केला. तर शहरातील भाजपचे कार्यकर्ते संतोष कोटरंगे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

    हा पक्षप्रवेश सिंदेवाही तालुक्यातील  येथील कार्यक्रमात विजय वडेट्टीवार, यांचे उपस्थितीत पार पडला.यावेळी पक्ष प्रवेश करणाऱ्या मध्ये सोनी नितीन दुधे, मीनाक्षी मिलिंद वाळके, लोमेश दासरवार, रोहित आलेवार, प्रज्वल पवार, विशाल लाटेलवार, सौरभ गोरडवार, निलेश येनुगवार, रवी वाढई, सुमित लेनगुरे, हर्षद मोहुर्ले, गणेश वाढई, महेश मांदाडे, मिलिंद शेंडे, सुरज लेनगुरे यांचा समावेश आहे.

    आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमास सावली काँग्रेस तालुका अध्यक्ष नितिन गोहने, सावली उपनगराध्यक्ष संदिप पुण्यपकार, माजी नगराध्यक्ष विलास यासलवार, पाणी पुरवठा सभापती सभापती प्रितम गेडाम, नगरसेवक गुणवंत सुरमवार, प्रकाश जक्कुलवार, प्रशांत राईचवार, चंद्रकांत संतोषवार, नगरसेवक मुन्ना रस्ते, आकाश खोब्रागडे, निखिल दुधे, गब्बर दुधे, मयूर दुधे, धम्मदिप बोरकर, अनिकेत वाळके, मिथून गणविर प्रामुख्याने उपस्थित होते.

  • Exclusive mashal : युवकांच्या हाती परिवर्तनाची मशाल

    Exclusive mashal : युवकांच्या हाती परिवर्तनाची मशाल

    mashal ऊर्जानगर मधील युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात केला जाहीर प्रवेश


    Mashal शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे युवकाचे प्रेरणास्थान आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे यांचा नेतृत्वामध्ये 40 पेक्षा जास्त युवकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी हाताला शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेना पक्षात हार्दिक स्वागत करण्यात आले.

    विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यात काही दिवस शिल्लक आहे, त्यापूर्वी सर्व राजकीय पक्ष आपापल्या परीने पक्ष संघटना व प्रवेश कार्यक्रमावर भर देताना दिसत आहे.

    शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात व राहुल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवकांनी शिवसेनेत प्रवेश घेत आता बदल घडवूया म्हणत प्रवेश केला. Mashal

    ख्रिस्ती बांधवांचा कफनपेटी मोर्चा

    यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये उपजिल्हाप्रमुख शालिक फाले गुरुजी, तालुका प्रमुख विकास भाऊ विरूटकर, उपसरचिटणीस राहुल बेले, ऊर्जा नगर ग्रामपंचायत सदस्य लोकेश कोटरंगे,देवताळू साहेब साहेब, सुमित अग्रवाल, बाळू भगत, श्री अरुण पोहरे, बाळू चौकंडे, नाना पावणे, उज्वल सोनवणे, शिवदास घुले, सतीश कंदीवार,जगदीश ढाले, बलराम सिंगर, संजीव मुंडे, अनिल मुंडे यांच्या प्रमुख उपस्थित पक्षप्रवेश करण्यात आला.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करीत अत्याचार


    यावेळी पक्ष प्रवेश करताना नितीन आनंदराव वांझाळ,
    गुरुपालसिंग जसपाल, सुहास गढरी, अपूर्व खुलसिंगे, अमन नवाथे, धीरज मडावी, आर्यन पटोळे, तोसिफ पठाण, शुभम शुक्ला, सुदर्शन मडावी, आदित्य मार्कंडे, हेमंत अत्राम, योगेश कोळी, अभिजित वानखेडे, अथर्व मेहरे, जिशान शेख, पंकज भोयर, निखिल काळे, योगेश झाडे, मंगेश येसेकर, अक्षय थेरे, बाली मुसळे, कुंदन सेलोरे, मनोज पावळे, दिग्गाबर कदम, भागवत दहिफळे, सुदर्शन जाधव
    कुश चौहान, प्रतिक धाबेकर ,निहाल देरकर, समीत आत्राम, तुशार नवले, पंकज वैद्य, प्रथमेश साळवे, साहील पवनकर, स्वपनील जाभुळकर, आषीश पींगे, श्री मयूर झाडे, श्री राजेश आत्राम, इत्यादीचा समावेश होता.

  • Exclusive Mla kishor jorgewar : आमदार जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशावर स्थानिक नेत्यांचा अडथळा

    Exclusive Mla kishor jorgewar : आमदार जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशावर स्थानिक नेत्यांचा अडथळा

    mla kishor jorgewar जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाच्या सुखर वाटेत स्थानिक नेत्याच्या ब्रेकर

    Mla kishor jorgewar राजकारणाच्या रंगमंचावर सध्या चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात एक नवा धागा विणला जात आहे. अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा हवेत भरकटत असताना, या प्रवेशावर स्थानिक नेत्याने अडथळा घातल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नेत्यांच्या अट्टहासामुळे भाजपला चंद्रपूरमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसविरोधात कमकुवत उमेदवार मिळेल का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

    अवश्य वाचा : शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांना हद्दपारीची नोटीस, राजकारणात ट्विस्ट येणार

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच चंद्रपूरचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या संपर्कात असल्याचे सांगून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेला हवा दिली. मात्र, या चर्चेत त्यांनी विशेषतः सुधीर मुनगंटीवार यांच्याशी याबाबत सल्लामसलत करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले होते. Mla kishor jorgewar

    लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा

    सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील कटुता सर्वांनाच ज्ञात आहे. लोकसभा निवडणुकीत मात्र जोरगेवार यांनी शेवटच्या क्षणी मुनगंटीवार यांच्यासाठी प्रचाराच्या रणांगणात उडी घेतली होती. यंग चांदा ब्रिगेडच्या पाच हजार कार्यकर्त्यांसमोर उभे राहून त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा दिला होता. त्या वेळी मुनगंटीवार यांनी जोरगेवार यांच्या समर्थनाची व्याजासह परतफेड करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे जोरगेवार भाजपच्या तिकिटावर लढतील असे संकेत मिळाले होते.

    जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाची प्रतीक्षा लांबत असून, त्यामागे स्थानिक नेत्यांचा हात असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. जोरगेवार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात, तसेच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याशीही त्यांचे स्नेहपूर्ण संबंध आहेत. भाजपकडे जोरगेवार यांच्याइतका प्रभावी उमेदवार नसतानाही त्यांचा प्रवेश लांबणीवर ठेवणे हे अनेकांना आश्चर्यकारक वाटत आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांमुळे जोरगेवार यांचा भाजप प्रवेश रखडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

    वर्ष 2019 च्या विधानसभा निवडणुकीत किशोर जोरगेवार यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रणांगणात उडी घेत इतिहास रचला, भाजपच्या विजयाला जोरगेवार यांनी मोठे खिंडार पाडले, त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देत विधानसभा क्षेत्रातील महत्वाची कामे केली.

    अडीच वर्षांनी राज्यात महायुतीचे सरकार आले, यावेळी जोरगेवार यांनी महायुतीला पाठिंबा दिला, आणि विधानसभा क्षेत्रातील अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा त्यांनी सपाटा लावला, विशेष म्हणजे शहरातील सर्वात जुना आणि महत्वाचा बाबूपेठ उड्डाणपुलाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला.

    महत्त्वाचे : चंद्रपुरात रेल्वे इंजिनचा अपघात

    राजकारणात त्यांची चांगली प्रतिमा व वाढत असलेलं राजकीय वजन अनेकांना पचनी न पडल्याने त्यांच्या पक्ष प्रवेशावर ब्रेकर लावण्याचे काम स्थानीक नेते करीत असल्याची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे, नेहमीप्रमाणे चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष जोरगेवार यांच्या पुढे डमी व कमकुवत उमेदवार उभा करतील अशी चिन्हे आहे. येत्या काही दिवसात भाजप प्रवेशावर विरोध करणाऱ्या स्थानिक नेत्याचा खरा चेहरा समोर येणारचं.

    हद्दपारीची नोटीस, चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट
  • today chandrapur news : चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात हद्दपारीची पुनरावृत्ती

    today chandrapur news : चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात हद्दपारीची पुनरावृत्ती

    today chandrapur news राजकीय दबावातून पोलीस विभागाने हद्दपारीची नोटीस बजावल्याचा गंभीर आरोप 5 ऑक्टोबर रोजी स्थानीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी केला आहे.


    Today chandrapur news काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार असून त्यापूर्वीचं राजकीय द्वंद्वयुद्ध सुरू झाले असल्याचे चित्र चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात बघायला मिळत आहे.
    शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविण्याची तयारी मागील 2 वर्षांपूर्वी पासून सुरू केली आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात वर्ष 2009 पासून सुधीर मुनगंटीवार आमदार आहे हे विशेष.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वे इंजिन आपसात धडकले


    पत्रकार परिषदेत संदीप गिर्हे म्हणाले की माझ्यावर विविध कलमांतर्गत व प्रतिबंधात्मक कारवाई असे एकूण 12 गुन्हे दाखल होते, आतापर्यंत 8 गुन्ह्यात माझी निर्दोष मुक्तता झाली असून उर्वरित 4 गुन्हे हे राजकीय आंदोलनाचे आहे, असे असतानाही एका राजकीय नेत्यांच्या दबावाखाली मला हद्दपार करण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे.

    निशाणा कुणाला?


    निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला हद्दपार कारवाई करण्यासंदर्भात चाललेली धडपड म्हणजेच राजकीय विरोधक संपविण्याचा हा प्रकार आहे. Today chandrapur news


    संदीप गिर्हे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला, जे लोक हद्दपार होते ते आज पालकमंत्री यांच्या सोबत बसतात, नुकतीच शहरात घडलेल्या कुख्यात गुंड हाजी सरवर यांच्या हत्येत भाजपचा पदाधिकारी सामील होता, अश्या लोकांना भाजप पक्षात प्रवेश चालतो मात्र कुणी विरोधक असता कामा नये अशी स्वयंघोषित विकासपुरुष यांची भूमिका दिसून येत आहे.


    लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव त्यांच्या पचनी पडलेला नाही त्यामुळे आता विधानसभेत सुद्धा पराभव होणार अशी स्थिती निर्माण झाली, त्यामुळे माझ्यासारख्या शिवसैनिकाला निवडणुकीच्या महासंग्रामातून कस डावलता येणार याची तयारी विकासपुरुष यांनी प्रशासनामार्फत सुरू केली आहे.


    शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांना बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात जनसामान्य नागरिकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे, त्यामुळे राजकीय करिअर संपुष्टात आणण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचा आरोप गिर्हे यांनी केला, आपण बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात हजारो कोटी रुपये खर्च करून विकास केला असा गवगवा करणाऱ्या विकास पुरुषांनी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांला घाबरण्याचे कारण काय? असा प्रश्न यावेळी गिर्हे यांनी उपस्थित केला आहे. Shivsena ubt

    महत्त्वाचे : ब्रेक निकामी, बस पलटली

    निवडणुकीपूर्वी हद्दपारीच्या राजकारणाने सध्या राजकीय वातावरण गढूळ होत आहे, काही वर्षांपूर्वी निवडणुकीच्या काळात दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्यावर सुद्धा अशीच कारवाई झाली होती, मात्र त्या कारवाई नंतर धानोरकर यांनी राजकारणात दमदार पुनरागमन करीत भाजपचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर यांचा पराभव केला होता.

    इतक्या वर्षांनी पुन्हा त्या परिस्थितीची पुनरावृत्ती होताना दिसत आहे, यामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात विविध चर्चाना पेव फुटला असून संदीप गिर्हे निवडणूकित धानोरकर सारखेच जायंट किलर म्हणून उदयास येणार आहे. Shivsena ubt

    9 ऑक्टोबर सकाळी संदीप गिर्हे यांना पोलीस प्रशासन समोर जाऊन हद्दपारीच्या नोटीसीला उत्तर द्यायचे आहे.

  • Chitra Wagh : कोरपना अत्याचार प्रकरणात खासदार धानोरकर गप्प का? – चित्रा वाघ यांचा प्रश्न

    Chitra Wagh : कोरपना अत्याचार प्रकरणात खासदार धानोरकर गप्प का? – चित्रा वाघ यांचा प्रश्न

    chitra wagh कोरपना शहरातील नामांकित शाळेत 12 वर्षीय मुलीवर शिक्षकाने गुंगीचे औषध देत अत्याचार केल्याची धक्कादायक बाब 1 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली.
    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने या गंभीर प्रकरणात तत्परता दाखवीत आरोपी अमोल लोडे ला अकोला येथून अटक केली. मात्र या सर्व प्रकरणावर खासदार धानोरकर अजूनही गप्प का? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेतून उपस्थित केला.


    Chitra wagh आरोपीला फाशी ची शिक्षा द्यावी यासाठी स्थानिक नागरिकांनी आक्रोश मोर्चा काढला. त्यानंतर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला.
    सदर नामांकित शाळेच्या संचालक मंडळात अमोल लोडे यांच्या कुटुंबाचा सुद्धा समावेश असून नुकतीच आरोपी लोडे यांची कोरपना युवक कांग्रेसच्या शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली होती. chitra wagh

    अवश्य वाचा : चंद्रपुर शासकीय आयटीआय चे नाव बदलले


    4 ऑक्टोबर रोजी भाजप महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ कोरपण्यात दाखल होत पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेत त्यांना धीर दिला.
    आरोपीला कठोर शासन होण्यासाठी सरकार आपल्या सोबत आहे असा विश्वास त्यांना दिला. chitra wagh

    चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद


    चंद्रपूर शहरात चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर निशाणा साधला, त्या म्हणाल्या की आज या गंभीर प्रकरणावर सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, सुषमा अंधारे चकार शब्द बोलल्या नाही, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सुद्धा या प्रकरणावर गप्प आहे, रोज 7 ते 8 ट्विट करणारे वडेट्टीवार यांचं याबाबत ट्विट का नाही, असा सवाल वाघ यांनी यावेळी उपस्थित केला.


    राहुल गांधी यांच्या मोहब्बत की दुकान मध्ये हे काय चाळे सुरू आहे, चंद्रपूर जिल्ह्याच्या खासदार प्रतिभा धानोरकर या एक महिला असून त्यासुद्धा या प्रकरणी का बोलत नाही? आरोपी हा कुणी पण असो, कोणत्याही पक्षाचा तो आरोपी आहे, त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे, या प्रकरणी अजून पीडित आहेत का? आरोपीला वाचविण्याचा कुणी प्रयत्न केला? याचा तपास पोलीस करीत असून लवकरच यामागील सत्य समोर येणार अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.