Category: राजकारण

महाराष्ट्रातील राजकारण बातम्या (Maharashtra Politics News) आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व राजकीय घडामोडींसाठी news34.in हे आपले विश्वसनीय व्यासपीठ आहे. आम्ही तुम्हाला स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या प्रत्येक मोठ्या-छोट्या अपडेट्सचे कव्हरेज देतो. राजकीय विश्लेषण, पक्षांची धोरणे, नेत्यांची मते आणि महत्त्वाचे शासकीय निर्णय. कोणत्याही राजकीय बातम्या चुकणार नाहीत याची खात्री बाळगा. राजकारण या क्षेत्रातील विश्वसनीय आणि ताज्या बातम्या मिळवण्यासाठी नियमितपणे भेट द्या.

  • Mns Party : ग्रामीण भागातील युवकांचा मनसेत प्रवेश

    Mns Party : ग्रामीण भागातील युवकांचा मनसेत प्रवेश

    mns party चंद्रपूर मनसे पक्षातील कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांनी कामगार सेनेची सूत्रे हाती घेतल्यावर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम हाती घेत अनेक युवक त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश करीत आहे.

    Mns party मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा नंतर मूल शहरातील युवक मनसे पक्षाकडे कल देत आहे. मूल गावातील ग्रामीण भागातील ताडाळा येतील तरुणांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना पक्ष जिल्हाध्यक्ष अमनभाऊ अंधेवार यांचे नेतृवाखाली संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या गलिच्छ राजकारणाला नागरिक आता कंटाळले आहे, जनता आता सर्व पक्षाना बाजूला सारत मनसे पक्ष एक चांगला पर्याय असू शकतो अशी भावना जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.

    अवश्य वाचा : 623 अधिकाऱ्यांना नियुक्ती द्या – किशोर जोरगेवार

    त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांचा कौल मनसे कडे दिसून येत आहे. त्यामुळे ताडाळा येथील युवकांनी कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.

    शेतकरी वीजबिल मुक्त होणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

    यावेळी प्रफुल मूळकुटे, सौरभ गिरडकर,अरविंद सोनटक्के, साहिल पंधरे, विशाल नकुलवार, संजूसिंग पटवार, साहिल नेने, यश संगमवार, सोहेब पठाण, महेश लेणगुरे, ऋषीकेश मस्के,हर्षल गोघरे या सर्वांचे स्वागत करत जिल्हाध्यक्ष पक्षात स्वागत केले, यावेळी नरेश वासनिक, राजू शेट्टी, सीनु चुका, सोहेल शेख, रोहित चौहान, शंकर शाहू उपस्थित होते.

  • Maharashtra Public Service Commission : 623 अधिकाऱ्यांना नियुक्ती द्या – आमदार किशोर जोरगेवार

    Maharashtra Public Service Commission : 623 अधिकाऱ्यांना नियुक्ती द्या – आमदार किशोर जोरगेवार

    Maharashtra Public Service Commission महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने राज्यसेवा २०२२ अंतर्गत ६२३ पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असला, तरी नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे ६२३ अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. या अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्ती देण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली आहे.

     Maharashtra Public Service Commission MPSC च्या वतीने मार्च २०२४ मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ च्या उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र, काही उमेदवारांनी याविरोधात न्यायालयात प्रकरणे दाखल केल्यामुळे त्यावर स्थगिती येऊन नियुक्त्या रखडल्या होत्या. आता सर्व प्रकरणे निकाली निघाली असून न्यायालयाने फेरनिवड यादी जाहीर करण्यावर कोणतीही बंधने घातलेली नाहीत. तरीही, MPSC ने अद्याप अंतिम यादी जाहीर न केल्यामुळे उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, आणि इतर महत्त्वाच्या ६२३ पदांवरील नियुक्त्या रखडल्या आहेत.

    अवश्य वाचा : मुख्यमंत्री योजना दूत मध्ये अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

      MPSC ने २०२२ मध्ये २३ संवर्गातील ६२३ पदांच्या राज्यसेवा परीक्षेसाठी जाहिरात दिली होती. त्यानुसार, पूर्व परीक्षा ऑगस्ट २०२२ मध्ये, मुख्य परीक्षा जानेवारी २०२३ मध्ये, आणि डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत मुलाखती पार पडल्या. १८ जानेवारी २०२४ रोजी गुणवत्ता यादी जाहीर झाली, तर २० मार्च २०२४ रोजी पदनिहाय अंतरिम यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक उमेदवारांची उपजिल्हाधिकारी,  तहसीलदार,  शिक्षणाधिकारी अशा महत्त्वाच्या पदांवर निवड झाली आहे. (Maharashtra Public Service Commission)

    शेतकऱ्यांना दिलासा

     अंतिम निवड यादीनंतर काही खेळाडू आणि बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे काही प्रकरणे दाखल झाली होती. तसेच, औरंगाबाद खंडपीठात पशुसंवर्धन अधिकारी पदासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायाधिकरणाने सर्व प्रकरणे निकाली काढल्याने आता अंतिम निकाल जाहीर करण्यास कोणतीही अडचण नाही.

    असे असले तरी राज्यसेवा २०२२ च्या पूर्वपरीक्षेपासून जवळपास दोन वर्षांचा कालावधी लोटला असूनही, अद्याप अंतिम निकाल आणि नियुक्ती प्रक्रिया अनिश्चिततेत आहे. स्पर्धा परीक्षांसाठी अनेक उमेदवारांनी आपले पाच ते सात वर्षांचे कष्ट वाहिले आहेत, परंतु निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या विलंबामुळे उमेदवारांना आर्थिक आणि सामाजिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. बेरोजगारी आणि पदस्थापनेच्या अभावी उद्याचे अधिकारी नैराश्याच्या गर्तेत अडकले आहेत. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्ती देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी या संदर्भात सकारात्मक चर्चा केली असून, यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

  • important decision : केंद्र सरकारचा शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वपूर्ण निर्णय

    important decision : केंद्र सरकारचा शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वपूर्ण निर्णय

    important decision पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बळीराजासाठी आज असंख्य महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यात खास करून कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले आहेत.

    महत्वाचा निर्णय, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मानले पंतप्रधान मोदी यांचे आभार

    Important decision केंद्र सरकारचे हे निर्णय शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक ठरतील, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार खाद्यतेलाच्या आयातीवर आता वीस टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे. पूर्वी खाद्यतेलच्या आयातीवर शुल्क नसल्याने आपल्या देशातील आणि राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत होता. आता मात्र सोयाबीन उत्पादकांना चांगली किंमत मिळेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

    अवश्य वाचा : 7 ऑक्टोबर पासून चंद्रपुरात महाकाली महोत्सव

    ते म्हणाले केंद्र सरकारने रिफाइंड सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलावरील कस्टम शुल्क 12.50% वरून 32.50% केल्याने याचा थेट फायदा आपल्या शेतकऱ्यांना होणार आहे. सोयाबीन खरेदीचा निर्णय केंद्र सरकारने याआधीच घेतला आहे, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. (Important decision)

    यंदाच्या वर्षी जानेवारी ते मार्चमध्ये कांदा निर्यातीवर 40% शुल्क आकारण्यात आल्याने त्याचा फटका उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. लोकसभा निवडणूकीत त्याचा अप्रत्यक्ष फटका भारतीय जनता पक्षालादेखील बसला होता. ही चूक सुधारून केंद्र सरकारने आज कांद्यावरील निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरून २० टक्के इतके कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

    शिवाय कांद्याची निर्यात करताना किमान निर्यात (एम ई पी) किंमत हे पूर्णपणे संपवली आहे. यामुळे कांदा उत्पादकांना आता चांगला भाव मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

    बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी असलेली किमान निर्यात किंमतदेखील पूर्णपणे मागे घेण्यात आल्यामुळे बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव मिळण्याच्या दृष्टीने हे क्रांतिकारक निर्णय असल्याचे फडणवीस म्हणाले.

  • politics ubt : शिवसेना ठाकरे गटावर भाजप सह शिंदेसेनेचे गंभीर आरोप

    politics ubt : शिवसेना ठाकरे गटावर भाजप सह शिंदेसेनेचे गंभीर आरोप

    Politics ubt मुंबई -शिवसेना उद्धव ठाकरे गटात थकरे यांचे स्वीय सहायक पैसे घेऊन पद वाटप करतात असा आरोप शिंदेंसेनेसह भाजपने केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

    Politics ubt विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे काळे कारनामे बाहेर येत आहेत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंचे पीए रवी म्हात्रे यांच्यावर गंभीर आरोप केले. म्हात्रे हे पैसे घेऊन पदे विकत असल्याचा आरोप संजय शिरसाट, निरुपम आणि शेलार यांनी केल्याने ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. (Politics ubt)

    महत्त्वाचे : महाविकास आघाडी आरक्षण विरोधी

    गेल्या पंधरा-वीस वर्षात ज्या – ज्या नेत्यांनी शिवसेना सोडली त्या सर्वांनीच शिवसेनेत खास करून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नजीकच्या लोकांकडून निवडणुकीत पैसे घेऊन तिकीट विकले जात असल्याचे आरोप केलेले आहेत. यात नारायण राणेंपासून तर राज ठाकरे या अनेक नेत्यांचा समावेश आहे. पैसे घेऊन विधानसभेचे किंवा महापालिकेचे तिकीट दिले जाते, असे आरोप करूनच राज ठाकरे देखील बाहेर पडले होते. या सर्व नेत्यांच्या रडारवर खासकरून उद्धव ठाकरे होते. Politics ubt

    एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडलेले आणि विरोधकांना अंगावर घेत शिवसेनेचा किल्ला लढवत असलेले संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी अत्यंत गंभीर आरोप केला. त्यांनी थेटच रवी म्हात्रे आणि विनायक राऊत या दोघांचा नामोल्लेख केला. विनायक राऊत हे उद्धव सेनेचे सचिव आहेत तर रवी म्हात्रे हे उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आहेत.

    संजय शिरसाट यांनी आरोप केला की विनायक राऊत यांच्या मदतीने रवी म्हात्रे हे पैसे घेऊन पक्षातील लोकांना पदे विकत आहेत. ‘पैसे आणा आणि पदे घ्या’ ही कार्यपद्धती सध्या उद्धवसेनेत सुरू असल्याचा आरोप देखील संजय शिरसाट यांनी केला आहे.

    शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनीही शिरसाट यांच्या आरोपांची पुष्टी केली. निरुपम यांनी आरोप केला की, उबाठा पैसे घेऊन काँग्रेस आणि शरद पवारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

    भाजपचे आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनीही शिवसेनेच्या दाव्याला समर्थन दिले. पैसे दो पैसे लो याच कामासाठी विनायक राऊत आणि रवी म्हात्रे पूर्वीपासून (कु) प्रसिद्ध असल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला.

    शिरसाट यांच्या या आरोपाला अद्याप तरी उद्धव सेनेकडून कोणीही प्रत्युत्तर दिलेले नाही. याचाच अर्थ उद्धवसेनेत सारे काही आलबेल नाही, हे दिसून येत आहे.

    लोकसभा निवडणुकीत देखील विनायक राऊत यांनी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचे आरोप झाले होते. त्या आरोपांवर देखील उद्धव ठाकरेंकडून कुठलीही चौकशी करण्यात आली नाही.

    उद्धव सेनेच्या महिला पदाधिकारी देखील पैसे घेतात, असा थेटच आरोप संजय शिरसाट यांनी केला. त्यांनी नामोल्लेख केला नसला तरी त्यांचा इशारा उद्धवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्याकडे असल्याचे म्हटले जाते. अंधारे या पैसे घेऊन पदे देतात, असा आरोप बीडचे उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला होता. त्यावेळीही या आरोपांची चौकशी उद्धव सेनेकडून करण्यात आली नाही, याउलट जाधव यांना पक्षातून निलंबित करण्यात येऊन अंधारे यांचा बचाव करण्यात आला होता.

  • Today National Flag : चंद्रपुरात राष्ट्रध्वजाचा अपमान

    Today National Flag : चंद्रपुरात राष्ट्रध्वजाचा अपमान

    National flag राष्ट्रध्वज तिरंग्याचा अपमान करना-या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – आम आदमी पार्टी ची मागणी

    National flag : ऑगस्ट महिन्यात देशाचे पंतप्रधान यांच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले होते. हे अभियान राबवण्याची जबाबदारी प्रशासनातील अधिकाऱ्यांची तथा कर्मचाऱ्यांची होती. हे अभियान राबवून झाल्यानंतर या अधिकाऱ्यांना आपल्या जबाबदारीचा जनु विसरच पडला की काय असे चित्र चंद्रपूर प्रशासकीय भवन मधील अन्न पुरवठा विभागात पहायला मिळाले.

    अवश्य वाचा : संविधान वाचविण्यासाठी भाजपने केलं आंदोलन

    आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे हे एका कामानिमित्त कार्यालयात गेले असतांना कार्यालयातील टेबलवर देशाचे राष्ट्रध्वज फाडून त्याचा पोछा बनवून फरशी पुसायसाठी ठेवले असे दिसले. या संदर्भात तिथे उपस्थित जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी यांच्याशी संवाद साधल्या नंतर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.प्रत्यक्षात ही बाब त्यांच्या वारंवार निदर्शनास येऊन सुद्धा दुर्लक्ष करण्यात येत होते. यावरून या घटनेचे प्रत्यक्षदर्शी जबाबदार जिल्हा पुरवठा अधिकारी व‌ कर्मचारी आहे.

    आम्ही विष पितो, आणि जगतो – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


    हे ग्रुहीत धरून या संदर्भात आज रामनगर पोलीस स्टेशन येथे संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. तसेच देशद्रोहाचा गुन्हा करणाऱ्या विरुद्ध एफ आय आर नोंदवून तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टी तर्फे करण्यात आली.


    यावेळी आपचे वरिष्ठ नेते सुनील मुसळे, जिल्हध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महिला महानगर अध्यक्ष तब्बसूम शेख, जिल्हा संघटन मंत्री योगेश मुऱ्हेकर, भिवराज सोनी, अनुप तेलतुबडे, मनीष राऊत, अमित बोरकर, प्रशांत सिदूरकर, राज नगराळे, आदित्य नंदनवार, विकास खाडे,इत्यादी उपस्थित होते.

  • Save the Constitution : मायावी कांग्रेसपासून सावध रहा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    Save the Constitution : मायावी कांग्रेसपासून सावध रहा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    Save the Constitution काँग्रेस सत्तेपासून दूर राहिली तरच देशात सुख, शांती, समृद्धी नांदू शकते. कारण काँग्रेस सत्तेसाठी जगते तर भाजप राष्ट्रहितासाठी काम करते. त्यामुळे राष्ट्रहित साधायचे असेल, तर काँग्रेसला दूर ठेवावे, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

    Save the Constitution राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या संदर्भात भाष्य केले. त्या विरोधात चंद्रपूर येथे भाजप जिल्हा व महानगरतर्फे ‘संविधान बचाओ, काँग्रेस हटाओ’ आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,महानगरचे अध्यक्ष राहुल पावडे,भाजपा पदाधिकारी,महिला मोर्चा पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    महत्त्वाचे : कंत्राटी कामगारांना मिळणार अल्प दरात घर – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

     ना.मुनगंटीवार म्हणाले, ‘काँग्रेस आणि राहुल गांधी हेच देशाचे आणि संविधानाचे खरे शत्रू आहेत. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने कधीही सन्मान दिला नाही. काँग्रेसनेच डॉ. आंबेडकर यांना निवडणुकीत पराभूत केले. राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत भाष्य केले आहे. त्यावरून त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असल्याचे सिद्ध होते. देशाला, संविधानाला आणि आरक्षणाला वाचवायचे असेल तर खऱ्या अर्थाने काँग्रेसला हटविले पाहिजे,’ असेही ते म्हणाले.

     या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा दिल्या. काँग्रेसला ओबीसी समाजातील व्यक्ती पंतप्रधान झाल्याचे बघवत नाही. त्यांचा खरा चेहरा अमेरिकेत गेल्यानंतर समोर आला. देशाच्या विरोधात राहुल गांधी परदेशात बोलतात ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचेही ना. श्री. मुनगंटीवार यांनी नमूद केले. (Save the Constitution)

    महाराष्ट्र राज्यात सौर ऊर्जा मोहीम यशस्वी


    काँग्रेसने फक्त त्यांच्या लोकांचा सन्मान केला. त्यांना तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यायचा नव्हता. आणि आता तर भारतरत्न बाबासाहेबांनी दिलेली आरक्षण व्यवस्थाही त्यांना नको आहे. असे असतानाही लोकसभा निवडणुकीत ते जनतेसोबत खोटं बोलले. आता तर त्यांना काय हवे आहे, हे राहुल यांनी आपल्याच तोंडून सांगितले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.  

    ‘मायावी काँग्रेसपासून सावध रहा’
    काँग्रेसचे लोक अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी, बहुजनांना मानत नाही. त्यामुळे या मायावी काँग्रेसपासून सावध राहण्याची गरज आहे. हे देशातील खरे रावण आहेत. याच काँग्रेसने बाबासाहेबांना ईशान्य मुंबईतून पराभूत केला.जगातील सर्वांत शिक्षित असलेल्या बाबासाहेबांना काँग्रेसने छळले. कारण आपल्यापेक्षा दलित समाज मोठा होईल, याची भीती काँग्रेसला होती, अशी टीका ना. श्री. मुनगंटीवार यांनी केली.

  • Maharashtra Politics : हम तो जहर भी पिते है और जिते भी है – देवेंद्र फडणवीस

    Maharashtra Politics : हम तो जहर भी पिते है और जिते भी है – देवेंद्र फडणवीस

    maharashtra politics “हम तो भगवान शिव को मनाने वाले है। जहर भी पिते है और फिर भी जिते है। असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले होते.

    Maharashtra politics या पाठीमागे त्यांचा उद्देश फार महत्वाचा होता त्यांना राज्यतिल जनतेला कमी शब्दांत बरच काही सांगायचं होत. 2014 साली राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवताना राज्य हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले त्यात सर्वाधिक डोकेदुखी ठरणार विषय म्हणजे मराठा आरक्षण.

    असं का म्हणाले देवेंद्र भाऊ

    या आरक्षणावरून त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीत जरांगे सारखा मराठा उपोषण कर्ता अभ्यासाविना जे तोंडात येईल ते बोलून राज्याच्या उच्च पदस्थ असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाण साधला , देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाज हिताचे अनेक निर्णय घेतले.

    अवश्य वाचा : त्या चौघांचा मृत्यूचे कारण काय? महावितरण ने दिले स्पष्टीकरण

    “सारथी” संस्थेची स्थापना केली,सारथी च्या माध्यमातून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा, व्यवसायिक कर्ज अश्या अनेक योजना अंतर्गत मराठा समाजाचा सर्वांगीण विकास साधला , मराठा समाजाला आरक्षण देऊन ते टिकवणं असेल अण्णा साहेब पाटील महामंडळ द्वारे कर्ज योजना असेल असे अनेक फायदे पोहचवले. असे असताना देखील शेवटी याच समाजाचा उपोषण कर्ता मनोज जरांगे कश्या भाषेत बोलत होते हे महाराष्ट्रातिल जनतेला ज्ञात आहे ते वेगळं सांगायची गरज नाही.

    2022 मध्ये पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री पदावर रुजू होऊन राज्य हिताचे कार्य केले, अनेकदा विरोधकांनी देखील अश्या प्रकारे चकरव्ह्यू रचण्याचा प्रयत्न केला पण देवेंद्र फडणवीस यांनी ही सर्व वादळ पेलवलित. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना देखील स्वच्छ निर्मळ पणे त्यांनी माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन असे आश्वासन राज्यातील जनतेला दिलं व त्याला ते जागले देखील.

  • Bjp Maharashtra latest : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजपाची व्यवस्थापन समिती जाहीर

    Bjp Maharashtra latest : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजपाची व्यवस्थापन समिती जाहीर

    Bjp maharashtra आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री व या समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी मंगळवारी दिली.

    Bjp maharashtra भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते मधुकर मुसळे, प्रदेश कार्यालय सहसचिव भरत राऊत उपस्थित होते. या समितीमध्ये तीन सहसंयोजक, विविध स्तरांवरच्या समित्यांचे प्रमुख तसेच विशेष आमंत्रित आणि पदसिद्ध सदस्यांचा समावेश आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करण्याच्या निर्धाराने पक्ष कार्यकर्ते सज्ज झाले असल्याचेही श्री. दानवे यांनी नमूद केले. 

    अवश्य वाचा : योजनादुत बना आणि महिन्याला कमवा 10 हजार रुपये, आजच करा अर्ज

    यावेळी श्री. दानवे म्हणाले की, बूथ पर्यंतची यंत्रणा सक्षम करण्यासाठी पक्षातर्फे ही व्यवस्थापन समिती तयार करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीचे नियोजन, संचलन करण्यासाठी प्रदेश, जिल्हा, तालुका स्तरावर अधिवेशने झाली आहेत. (Bjp maharashtra) विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती अंतर्गत विविध स्तरांवर समित्या गठित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे, अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, आ. श्रीकांत भारतीय यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

    सोयाबीन उत्पादकांना दिलासा

    विविध समित्यांचे प्रमुख खालीलप्रमाणे –  जाहीरनामा समिती – वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार विशेष संपर्क – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सामाजिक संपर्क – राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, महिला संपर्क – राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर,  कृषी क्षेत्र संपर्क – खा. अशोक चव्हाण, लाभार्थी संपर्क – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, युवा संपर्क – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, प्रचार यंत्रणा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सहकार क्षेत्र संपर्क – विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर, मीडिया- आ.अतुल भातखळकर, ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संपर्क – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, अनुसूचित जाती संपर्क – माजी आमदार भाई गिरकर, अनुसूचित जमाती संपर्क – आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, सोशल मीडिया – आ. निरंजन डावखरे, निवडणूक आयोग संपर्क- माजी खा. किरीट सोमय्या. महायुती निवडणूक अभियान समन्वयक म्हणून ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन काम पाहणार आहेत. 

    https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1833435638072545674?t=AN6CIHT_4zlusWPw9KWGkw&s=19

    विशेष आमंत्रित म्हणून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, माजी मंत्री गणेश नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे ही श्री. दानवे यांनी नमूद केले. पदसिद्ध सदस्य म्हणून प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, विक्रांत पाटील, माधवी नाईक, विजय चौधरी आणि संजय केनेकर काम पाहणार आहेत.

  • Electrical contract workers : वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्या अखेर मान्य

    Electrical contract workers : वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्या अखेर मान्य

    Electrical contract workers विविध मागण्या घेऊन वीज निर्मिती केंद्रातील कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन सुरू केले होते.

    electrical contract workers चंद्रपूरातही यंग चांदा ब्रिगेडच्या वीज कामगार संघटनेचे अध्यक्ष हरमन जोसेफ यांनी उपोषण आंदोलन सुरू केले होते. आमदार किशोर जोरगेवार हे आंदोलकांच्या सतत संपर्कात होते. दरम्यान, आज मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली, त्यात कामगारांच्या रास्त मागण्या मान्य करण्यात आल्या.


     Electrical contract workers  या बैठकीला चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार किशोर जोरगेवार,  उपोषणकर्ते हरमन जोसेफ यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

    अवश्य वाचा : राज्याचे जलविद्युत क्षेत्रात पाऊल, विक्रमी करार


       महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांना सध्या मिळत असलेल्या एकूण पगारात (बेसिक व पूरक भत्ता) १ एप्रिल २०२३ पासून ३०% वेतनवाढ (gallery) देण्यात यावी, मा. मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारसींनुसार तातडीने अंमलबजावणी करून महानिर्मितीमधील सर्व कंत्राटी कामगारांना वयाच्या ६० वर्षापर्यंत कंत्राटदारविरहित शाश्वत रोजगार एन एम आर च्या माध्यमातून देऊन नोकरीमध्ये सुरक्षा द्यावी.

    तसेच, महानिर्मिती कंपनी कोणत्याही कंत्राटी कामगाराला काढणार नाही असे परिपत्रक महानिर्मिती व्यवस्थापनाने त्वरित निर्गमित करावे,  महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांनी ईएसआयची वेतन मर्यादा ओलांडली आहे, त्यामुळे त्यांना ईएसआयचा वैद्यकीय लाभ मिळत नाही. तरी, अतिरिक्त लाभ म्हणून मेडिक्लेम योजना सुरू करण्यात यावी,  या मागण्यांसह इतर मागण्या घेऊन वीज निर्मिती कामगारांनी राज्यभरात आंदोलन सुरू केले होते.

         चंद्रपूरातही यंग चांदा ब्रिगेडचे वीज कामगार नेते हरमन जोसेफ यांनी उपोषण आंदोलन सुरू केले. आमदार किशोर जोरगेवार यांनी दोन वेळा या उपोषण आंदोलनाला भेट देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सदर आंदोलनाची माहिती दिली होती. सदर आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता निर्माण झाली होती, त्यामुळे ते टाळण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार सतत या आंदोलनाकडे लक्ष ठेवून होते. दरम्यान, आज जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सदर कामगारांची उपमुख्यमंत्र्यांसह मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घडवून आणली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगारांसह चर्चा करत त्यांच्या जवळपास सर्व रास्त मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे कामगारांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. सदर निर्णयाबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

  • hydropower energy : राज्याचे जलविद्युत क्षेत्रात पाऊल

    hydropower energy : राज्याचे जलविद्युत क्षेत्रात पाऊल

    hydropower energy उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने जलविद्युत क्षेत्रात विक्रमी करार करण्यात आले असून यामध्ये हजारो रोजगार निर्मिती होणार आहे.

    Hydropower energy जलविद्युत निर्मितीसाठी ‘पंम्प्ड स्टोरेज’ धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एनटीपीसी, वेलस्पन न्यू एनर्जी, एनएचपीसी, रीन्यू हायड्रो पावर, टीएचडीसी इंडिया, टोरंट पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारने नुकतेच सामंजस्य करार केले. यामुळे ६२ हजार ५५० इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यातील ओयो हॉटेल का आले पुन्हा चर्चेत?

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून ३५ हजार २४० मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख ८८ हजार ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक, तर राज्यात २०३० पर्यंत ५० टक्के वीजनिर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्त्रोतांमधून होणार आहे. या करारांमुळे शाश्वत वीजनिर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे.

    जलविद्युत क्षेत्रात राज्याचे पाऊल

    राज्याची एकूण वीजनिर्मितीची स्थापित क्षमता ४६ हजार मेगावॉट असून, ४० हजार ८७० मेगावॅटचे पंम्ड स्टोरेज क्षेत्रात वीजनिर्मिती करार झाल्याने हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे हे मोठे पाऊल आहे. राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे.