Category: राजकारण

महाराष्ट्रातील राजकारण बातम्या (Maharashtra Politics News) आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व राजकीय घडामोडींसाठी news34.in हे आपले विश्वसनीय व्यासपीठ आहे. आम्ही तुम्हाला स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या प्रत्येक मोठ्या-छोट्या अपडेट्सचे कव्हरेज देतो. राजकीय विश्लेषण, पक्षांची धोरणे, नेत्यांची मते आणि महत्त्वाचे शासकीय निर्णय. कोणत्याही राजकीय बातम्या चुकणार नाहीत याची खात्री बाळगा. राजकारण या क्षेत्रातील विश्वसनीय आणि ताज्या बातम्या मिळवण्यासाठी नियमितपणे भेट द्या.

  • Shakti pradarshan : चंद्रपूर जिल्ह्यात 3 “वारांचे’ जोरदार शक्तिप्रदर्शन

    Shakti pradarshan : चंद्रपूर जिल्ह्यात 3 “वारांचे’ जोरदार शक्तिप्रदर्शन

    Shakti pradarshan विधानसभा निवडणुकीच्या नामांकन रॅलीत आज जिल्ह्यातील 3 वारांनी आपली ताकद दाखवीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
    Shakti pradarshan mungantiwar

    Shakti pradarshan बल्लारपूर विधानसभेतील मतदारानों, तुम्हीच आहात बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार, आता विकासाचा हा रथ अधिक वेगाने पुढे नेऊया’, अशी साद घालत प्रचंड गर्दीच्या साक्षीने ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरला. ना.सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी  महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरताना मुल शहरात बाजार चौक ते उपविभागीय कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढून विजयाची खात्री दिली.

    निवडणूक नामांकन : चंद्रपूर जिल्ह्यात 57 उमेदवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

    उमेदवारी अर्ज भरताना माजी केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते, ज्येष्ठ भाजप नेते चंदनसिंह चंदेल,सौ. सपनाताई मुनगंटीवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,माजी जि प. अध्यक्षा संध्याताई गुरनुले, अल्का आत्राम, विद्याताई देवाळकर, डॉ.  मंगेश गुलवाडे, रत्नमाला भोयर,चंदू मार्गोनवार, प्रभाकर भोयर, नंदू रणदिवे, विनोद देशमुख, राहुल संतोषवार, अजित मंगळगिरीवार, रामपाल सिंह, हनुमान काकडे, राजू बुद्धलवार, किशोर पंदीलवार, निमगडे गुरुजी, वंदना आगरकाटे,रोशनी खान, सुलभा पीपरे ,खेमा रायपुरे,पूजा डोहने,वर्षा लोनबले, किरण गापगते, मंगेश पोटवार, विशाल नागुलवार यासह आदि भाजपा व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. Shakti pradarshan

    यावेळी माध्यमांशी बोलताना ना.श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘मुल, पोंभुर्णा, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी आणखी एक पाऊल आज टाकत आहे. माता महाकालीचा आशीर्वाद घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सज्ज झालो आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वादाची ऊर्जा माझ्यासोबत आहे. सातव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभा राहताना जनकल्याणाचा वसा पुढे चालविण्याचे ध्येय आहे.’ विकासाचा झंझावात कायम ठेवून बल्लारपूर मतदार संघ राज्यात अव्वल ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

    पुढे बोलताना ना.मुनगंटीवार म्हणाले, ‘जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी मी काम केले आहे. आताही गोरगरीबांच्या कल्याणाचे ध्येय ठेवूनच मी निवडणूक लढविणार आहे. अशा स्थितीत कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता आपल्या मनाचे ऐका. आपल्याला पुढील पाच वर्षे दुःखात घालवायची आहेत की आनंदात, याचा विचार करा, असे आवाहन करीत ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या निवडणुकीत मी तुमचा उमेदवार म्हणून उभा नाही तर तुम्हीच सारे उमेदवार आहात, या शब्दांत जनतेच्या हृदयाला स्पर्श केला.  Shakti pradarshan

    विजय वडेट्टीवार शक्तिप्रदर्शन

    Shakti pradarshan wadettiwar

    या महाराष्ट्र राज्याशी आमच्या छत्तीसगड राज्याचे अतिशय जवळचे नाते आहे. संतांच्या या पावन भूमीला, छत्रपती शिवाजी महाराज,थोर क्रांतिकारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, यांचा वारसा लाभला. मात्र महाराष्ट्र द्रोही भाजपवाल्यांनी सत्ता कारणासाठी महाराष्ट्र संस्कृतीला बदनाम केले. तसेच महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवरायांच्या पुतळा निर्मिती कार्यातही कमिशन खोरी केली. Shakti pradarshan

    अशा महापापी सत्तापिपासुंना त्यांची जागा दाखविण्यासाठी आपण सजग राहावे. ही लढाई स्वाभिमानी महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे. असे प्रतिपादन छत्तीसगड राज्याची माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले. ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नामांकन दाखल प्रसंगी ब्रम्हपुरी येथे आयोजित सभेत बोलत होते. Shakti pradarshan

    आज महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी येथील निवडणूक निर्णय अधिकारी  कार्यालयात नामांकन दाखल केले. तत्पूर्वी पार पडलेल्या सभेस छत्तीसगड राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेंश बघेल, काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विजय वडेट्टीवार, गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव कीरसान, काँग्रेसचे ओझा, प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार,बल्लारपूर – मुल विधानसभा क्षेत्र उमेदवार संतोषसिंह रावत, ॲड, राम मेश्राम, संदिप गड्डमवार, प्राचार्य जगनाडे, खेमराज तिडके,दिनेश चिटनुरवार, प्रमोद चिमूरकर, रमाकांत लोधे, नितिन गोहने, आदिवासीं नेते अवचितराव सयाम, ॲड. गोविंद भेंडारकर, धीरज शेडमाके, यशवंत दिघोरे, तसेच महिला आघाडी, युवक काँग्रेस, एनएसयुआय, तथा काँग्रेस पक्षाच्या सर्व सेल व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष यांची पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. Shakti pradarshan

    यापुढे बोलताना छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, महाराष्ट्रातील काही भाजपवाल्यांनी सत्ता प्राप्तीसाठी आमदारांचा बाजार भरवून खोके देऊन त्यांची खरेदी केली. इथले उद्योग पळविल्या गेले. प्रचंड बेरोजगारी व महागाईचा जनतेला सामना करावा लागत आहे. हे महायुतीचे प्रचंड मोठे पाप असून महाराष्ट्रातील महायुती ही महाराष्ट्र द्रोही आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. तर संविधान वाचवण्यासाठी महाराष्ट्र सुपुत्र विजय वडेट्टीवार यांनी विरोधी बाकावर बसून किल्ला लढविला. या महाराष्ट्राने लोकसभेत मोदींना पराभवाची धूळ चारून ट्रेलर दाखविला आगामी विधानसभेत या महायुतीला संपूर्ण पिक्चर दाखवा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. Shakti pradarshan

    किशोर जोरगेवार यांचं जोरदार शक्तिप्रदर्शन

    Shakti pradarshan nivadnuk

    आज, सोमवारी, आमदार किशोर जोरगेवार यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह जंगी शक्तिप्रदर्शन करत भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी निघालेल्या रॅलीचे विविध ठिकाणी पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले.

                यावेळी भाजप नेते तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, भाजप चंद्रपूर विधानसभा प्रमुख प्रमोद कडू, शिवसेना जिल्हा प्रमुख बंडू हजारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड, अशोक जीवतोडे, चंद्रपूर जिल्हा महानगर प्रमुख भरत गुप्ता,  शिवसेना महिला जिल्हा प्रमुख प्रतिमा ठाकूर, आरपीआय (आठवले गट) चे गौतम तोडे, हरीश दुर्योधन, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रज्वलंत कडू, सूरज पेदुलवार, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सविता कांबळे, प्रकाश देवतडे, वंदना हातगावकर, अमोल शेंडे, सलीम शेख, राशिद हुसेन, सविता दंढारे, सायली येरणे, विमल काटकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. Shakti pradarshan

       चंद्रपूरचे अपक्ष आमदार यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता ते भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) आणि मित्रपक्ष महायुतीच्या वतीने चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित झाले असून आज सोमवारी त्यांनी भव्य मिरवणूक काढत आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे. यावेळी निघालेल्या मिरवणुकीचे सर्वधर्मीयांच्या वतीने ठिकठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. दुपारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयातून सदर मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी महायुतीतील हजारो कार्यकर्ते आणि जोरगेवार समर्थक सहभागी झाले होते.

    सदर भव्य मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गाने होत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचली. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, आपण दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मागील पाच वर्षांत आपण अनेक विकासकामे करू शकलो असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांनाही प्राधान्याने पूर्ण करायचे आहे. सुरू झालेला हा विकासपर्व अधिक गतीशील करायचा आहे, यासाठी आपली साथ आणि आशीर्वाद असाच राहावा, अशी विनंती केली. त्यानंतर त्यांनी आपला निवडणूक नामांकन अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केला.

  • Nomination Application in Chandrapur District : चंद्रपूर जिल्ह्यात 57 उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

    Nomination Application in Chandrapur District : चंद्रपूर जिल्ह्यात 57 उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

    Nomination Application in Chandrapur District महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक  निवडणुकीसाठी सोमवारी (दि.28) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण 57 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल  केले.

    Nomination Application in Chandrapur District 70- राजुरा विधानसभा मतदारसंघात प्रिया बंडू खाडे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), निनाद चंद्रप्रकाश बोरकर (अपक्ष), सुभाष रामचंद्र धोटे (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस), संजय यादवराव धोटे (भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष), चित्रलेखा कालिदास धंदरे (अपक्ष), सुदर्शन भगवान निमकर (भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष), देवराव विठोबा भोंगळे  (भारतीय जनता पार्टी), सचिन बापूराव भोयर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), गजानन गोदरू पाटील जुमनाके (गोंडवाना गणतंत्र पार्टी),  प्रवीण रामराव कुमरे (बहुजन मुक्ती पार्टी) आणि वामनराव सदाशिव चटप (स्वतंत्र भारत पक्ष) यांनी नामांकन अर्ज दाखल केले.

    71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात सुरेश मल्हारी पाईकराव (अपक्ष), राजेश भीमराव घुटके (अपक्ष), जोरगेवार किशोर गजानन (भारतीय जनता पार्टी), प्रियदर्शन अजय इंगळे (राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व अपक्ष), प्रवीण नानाजी पडवेकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मिलिंद प्रल्हाद दहिवले (केंद्रीय मानवाधिकार संगठन व अपक्ष), ज्ञानेश्वर एकनाथ नगराळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-अ), भानेश राजम मातंगी (अपक्ष) आणि भुवनेश्वर पद्माकर निमगडे (अपक्ष) यांचा समावेश आहे. Nomination Application in Chandrapur District

    राजकिय : अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने दिला स्वबळाचा नारा

    72- बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात किशोर बंडू उईके (अपक्ष), संजय नीलकंठ गावंडे  (अपक्ष), रामराव ओंकार चव्हाण (अपक्ष), निशा शीतलकुमार धोंगडे (अपक्ष), राजू देवीदास जांभुळे (अपक्ष), सतीश मुरलीधर मालेकर (वंचित बहुजन आघाडी), कुणाल पुरुषोत्तम गायकवाड (अपक्ष), सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार (भरतीय जनता पार्टी), अरुण देवीदास कांबळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिर्फॉमिस्ट) आणि अभिलाषा राकेश गावतुरे (अपक्ष) यांचा समावेश आहे.

    73 – ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघात विनोद अंबादास नवघडे (अपक्ष), कृष्णा सहारे (भारतीय जनता पार्टी), वसंत वर्जूर्कर (अपक्ष), अनंता भोयर (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक). Nomination Application in Chandrapur District

    74 – चिमूर विधानसभा मतदारसंघात अरविंद आत्माराम चांदेकर (वंचित बहुजन आघाडी), अनिल अंबादास घोंगळे (अपक्ष), सतीश वारजुकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), हेमंत गजानन दांडेकर (अपक्ष), धनंजय मुंगले (अपक्ष), कैलास श्रीहरी बोरकर (अपक्ष), प्रकाश नान्हे (अपक्ष), डॉ. हेमंत सुखदेव उरकुडे (अपक्ष).

    75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात प्रवीण सुरेश काकडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), विनोद कवडूजी खोब्रागडे (अपक्ष), अमोल दिलीप बावणे (अपक्ष), राजू मारोती गायकवाड. (अपक्ष), जयवंत नथ्थुजी  काकडे (अपक्ष), जयंत मोरेश्वर टेमुर्डे (अपक्ष), अहेतेशाम सदाकत अली (प्रहार जनशक्ती), श्रीकृष्ण धुमदेव दडमल (अपक्ष), रंजना मनोहर पारशिवे (अपक्ष), करण संजय देवतळे (भारतीय जनता पार्टी), मुकेश मनोज जिवतोडे (शिवसेना उबाठा आणि अपक्ष), चेतन गजानन खुटेमाटे (अपक्ष), महेश पंढरीनाथ ठेंगणे (अपक्ष), मुनेश्वर बापूराव बदखल (अपक्ष), रमेश महादेवराव राजुरकर (भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष) यांनी नामांकन दाखल केले. Nomination Application in Chandrapur District

    महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी  20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असून, 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर पर्यंत आहे.

  • Rebellion in the Congress Party : डॉ. अभिलाषा गावतुरे उमेदवारी अर्ज दाखल करणार

    Rebellion in the Congress Party : डॉ. अभिलाषा गावतुरे उमेदवारी अर्ज दाखल करणार

    Rebellion in the Congress Party कांग्रेस पक्षाची यादी जाहीर झाल्यावर अनेक इच्छुकांचे निवडणूक लढण्याचे स्वप्न भंगले, चंद्रपूर जिल्ह्यात कांग्रेस पक्षाने जाहीर केलेले अधिकृत उमेदवार हे हरण्यासाठी उभे केले असल्याची प्रतिक्रिया जनमानसात उमटू लागली आहे.

    राजकीय : आघाडीत बिघाडी, शिवसेना जिल्हाप्रमुखाची बंडखोरी


    Rebellion in the Congress Party चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून प्रवीण पडवेकर जे नगरसेवक निवडणूक हरले आहे, विधानसभा क्षेत्रात त्यांचा काडीमात्र संपर्क नाही, वरोरा विधानसभा क्षेत्रातून प्रवीण काकडे पक्षाशी संबंध नसलेले निव्वळ खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भाऊ अशी त्यांची ओळख तर बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात संतोष रावत यांना उमेदवारी दिल्या गेली आहे.

    देवराव भोंगळे यांच्या उमेदवारीला विरोध


    रावत यांचा जनसंपर्क मूल क्षेत्रापर्यंत मर्यादित आहे.
    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात कांग्रेस पक्षातर्फे डॉ. अभिलाषा गावतुरे व शिवसेना ठाकरे गटातर्फे शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी शेवटच्या घटकापर्यंत जनसंपर्क वाढविला. मात्र ऐनवेळी तिसऱ्याचे नाव जाहीर झाल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे चिन्ह दिसू लागले.

    राजकीय : कांग्रेसची यादी जाहीर आणि अनेकांचे स्वप्न भंगले


    शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे 29 ऑक्टोबर रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे तर कांग्रेसच्या अभिलाषा गावतुरे आज 28 ऑक्टोबर रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. Rebellion in the Congress Party


    डॉ. गावतुरे यांनी मागील अनेक वर्षांपासून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात काम सुरु केले होते, पक्षाने तयारीला लागा असा आदेश दिल्यावर त्यांनी कांग्रेस व भूमिपुत्र ब्रिगेडच्या माध्यमातून तळागाळात स्वतःची चांगली ओळख निर्माण केली. विधानसभा क्षेत्रात गावतुरे या अल्पावधीत लोकप्रिय झाल्या.


    विशेष म्हणजे जिल्ह्यातील 6 विधानसभा जागेवर कांग्रेसने दावा केला होता मात्र ज्या विधानसभा क्षेत्रात जो लोकप्रिय आहे त्याला उमेदवारी न देता भलत्याला उमेदवारी दिल्याने सध्या निष्ठावंत कांग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच रोष निर्माण झाला आहे.


    लोकसभा निवडणुकीनंतर कांग्रेसचे अच्छे दिन सुरु झाले होते मात्र विधानसभा निवडणुकीच्या काळात पुन्हा वाईट दिवसाचा शनी कांग्रेसच्या मागे लागला आहे.


    नेत्यांचे विरोधी पक्षासोबत असलेले हितसंबंध आणि साट्या लोट्याचे राजकारण हे कांग्रेसच्या पराभवाचे मुख्य कारण या विधानसभा निवडणुकीत असणार आहे.

  • Congress candidate list : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून प्रवीण पडवेकर यांना उमेदवारी

    Congress candidate list : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून प्रवीण पडवेकर यांना उमेदवारी

    Congress candidate list बलाढ्य उमेदवारासमोर कांग्रेस पक्षाने पुन्हा एकदा कमजोर उमेदवार देत विधानसभा निवडणुकीत आधीच आपला पराभव मानला अशी चिन्हे कांग्रेसची यादी जाहीर झाल्यावर पुढे आली आहे.

    Congress candidate list चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून कांग्रेसचे प्रवीण पडवेकर, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून संतोष रावत तर वरोरा विधानसभा क्षेत्रातून खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

    विधानसभा पानिपत : देवराव भोंगळे यांच्या उमेदवारीला विरोध

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात सातव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या महासंग्रामात उतरलेले भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर सिडीसीसी बँकेचे माजी अध्यक्ष तथा कांग्रेस नेते संतोषसिंह रावत यांना उमेदवारी देण्यात आली आहे, संतोषसिंह रावत यांचा जनसंपर्क केवळ मूल व काही प्रमाणात पोम्भूर्णा इथपर्यंत आहे, त्यामुळे मुनगंटीवार यांच्यापुढे त्यांचं आव्हान संपुष्टात येईल हे नक्की. कांग्रेसच्या अभिलाषा गावतुरे ह्या मुनगंटीवार यांना चांगल्या प्रकारे निवडणुकीत आव्हान निर्माण करू शकल्या असत्या. Congress candidate list

    चंद्रपूर मनपाची निवडणूक हरलेले माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर यांचा जनसंपर्क विधानसभा क्षेत्रात अत्यंत कमी आहे, ते आजपर्यंत पूर्ण विधानसभा क्षेत्र पिंजून काढू शकलेले नाही, त्यामुळे कांग्रेस चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत सहजतेने पराभूत होणार हे अटळ आहे.

    वरोरा विधानसभा क्षेत्रात खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यांचा कांग्रेस पक्षाशी काही एक संबंध नाही, ते साधे पदाधिकारी सुद्धा नाही त्यांची ओळख ही खासदार यांचे बंधू म्हणून आहे. वरोरा विधानसभा क्षेत्रात डॉ.चेतन खुटेमाटे किंवा अनिल धानोरकर यांना उमेदवारी दिली असती तर वरोरा कांग्रेसला पुन्हा काबीज करता आले असते. Congress candidate list

    मागील अनेक वर्षांपासून विधानसभा निवडणुकीत साट्या लोट्याचे राजकारण सुरू आहे, नेत्यांसोबतचे हितसंबंध जोपासत त्यांच्यापुढे कमी ताकदीचा उमेदवार देण्याची प्रथा कांग्रेस पक्षाने सुरू केली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर येथे दिवंगत खासदार धानोरकर यांनी सभा घेतली नव्हती तर भाजपच्या वरीष्ठ नेत्यांनी वरोरा विधानसभा क्षेत्रात सभा घेतली नव्हती.

    चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात बाहेरून आलेले सुधाकर अंभोरे, राजू झोडे यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अनेक प्रयत्न केले होते, मात्र ते कांग्रेसच्या राजकारणाला समजू शकले नाही आणि स्वतःची राजकीय आत्महत्या करून बसले. आता त्यांनी थाटामाटात सुरू केलेले कार्यालय बंद करण्याची नामुष्की झोडे आणि अंभोरे यांच्यावर ओढावली आहे.

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मुनगंटीवार यांना आव्हान देण्यासाठी डॉ.अभिलाषा गावतुरे व ठाकरे गट शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी जनसंपर्क सुरू करीत विधानसभा क्षेत्र पिंजून काढले मात्र लोकसभा निवडणुकीत कांग्रेसला मिळालेले यश आणि अति आत्मविश्वास मुळे त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील 6 जागेवर दावा केला. विशेष बाब म्हणजे घटक पक्षाला एकही जागा कांग्रेसने सोडली नाही.

    आता या विधानसभा निवडणुकीच्या पानिपत मध्ये महाविकास आघाडी मधील पक्ष एकमेकांना साहाय्य करतात की मुकदर्शकाची भूमिका बजावतात हे निवडणूक काळात बघायला मिळेल.

  • Now Kishor Jorgewar Candidature Application : किशोर जोरगेवार 28 ऑक्टोबरला दाखल करणार उमेदवारी अर्ज

    Now Kishor Jorgewar Candidature Application : किशोर जोरगेवार 28 ऑक्टोबरला दाखल करणार उमेदवारी अर्ज

    Kishor Jorgewar Candidature Application चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

    राजुरा विधानसभा : देवराव भोंगळे यांच्या उमेदवारीला माजी आमदारांचा विरोध

    Kishor Jorgewar Candidature Application सोमवारी ते भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ना. सुधीर मुनगंटीवार, आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची प्रमुखतेने उपस्थिती राहणार आहे.

    चंद्रपूर विधानसभा : किशोर जोरगेवार भाजपवासी

    आमदार किशोर जोरगेवार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांना भाजप तर्फे महायुतीची उमेदवारी देण्यात आली असून आता ते भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणुकीला समोर जाणार आहेत. “जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेच, आता भाजपची साथ मिळाल्याने चंद्रपूरातील विकासकामे आणखी गतीशील करण्यात मदत होईल,” असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी म्हटले आहे.

    देवराव भोंगळे नको

     सोमवारी 28 ऑक्टोबर दुपारी १२ वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या गांधी चौक येथील कार्यालयाजवळून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार नामांकन अर्ज दाखल करतील. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.

  • Rajura Assembly Constituency : देवराव भोंगळे यांच्या उमेदवारीला भाजपच्या माजी आमदारांचा विरोध

    Rajura Assembly Constituency : देवराव भोंगळे यांच्या उमेदवारीला भाजपच्या माजी आमदारांचा विरोध

    Rajura Assembly Constituency 26 ऑक्टोबर रोजी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, ब्रह्मपुरी व राजुरा विधानसभा क्षेत्राचा समावेश होता, ब्रह्मपुरी मधून कृष्णा सहारे, वरोरा करन देवतळे व राजुरा विधानसभा क्षेत्रातून देवराव भोंगळे यांना उमेदवारी जाहीर झाली होती.


    Rajura Assembly Constituency देवराव भोंगळे यांच्या उमेदवारीला माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर व खुशाल बोन्डे यांनी तीव्र नाराजी जाहीर करीत आम्हाला आयात उमेदवार नको अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषद द्वारा दिली.

    राजकीय : आमदार किशोर जोरगेवार झाले भाजपवासी


    देवराव भोंगळे हे मूळचे घुग्गुस येथील निवासी असून मागील वर्षभरापासून ते राजुरा विधानसभा क्षेत्रात घिरट्या घालत आहे, राजुरा क्षेत्रात ते जेष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा सन्मान करीत नाही, एकाही कार्यकर्त्यांना ते कार्यक्रमाचे निमंत्रण देत नाही, अश्या घमंडी लोकांना भाजपने उमेदवारी दिली असून त्याला आमचा विरोध आहे.
    देवराव भोंगळे यांची उमेदवारी जाहीर होताच राजुरा क्षेत्रात हजारो कार्यकर्ते बैचेन झाले, आम्ही पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणार अशी तीव्र प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली. Rajura Assembly Constituency

    दादाची दादागिरी नको


    पक्ष श्रेष्ठीने राजुरा येथील स्थानिक पदाधिकारी किंवा एका गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांना उमेदवारी द्यावी आम्ही त्यांचे काम करू व विधानसभा निवडणूक जिंकू मात्र भोंगळे यांच्यासोबत आम्ही काम करणार नसल्याचा इशारा माजी आमदार संजय धोटे यांनी पत्रकार परिषद मार्फत दिला.
    पक्ष श्रेष्ठीने यावर निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही वेगळा मार्ग स्वीकारू असा इशारा देण्यात आला.

    धोटे पुढे म्हणाले की भोंगळे यांनी लोकसभा निवडणुकीत अति आत्मविश्वास दाखविला त्यामुळे राजुऱ्यातून भाजपला सर्वात कमी मतदान मिळाले होते, असले आयात केलेले उमेदवार आम्हाला नको आहे. याठिकाणी दादा चा वादा चालणार नाही.
    आयोजित पत्रकार परिषदेत भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

  • Mla kishor jorgewar in bjp : आमदार किशोर जोरगेवार यांची घरवापसी

    Mla kishor jorgewar in bjp : आमदार किशोर जोरगेवार यांची घरवापसी

    mla kishor jorgewar in bjp विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना कोण टक्कर देणार असा प्रश्न सर्व राजकीय पक्षासमोर उभा झाला होता, आधी राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाला जोरगेवार यांनी उमेदवारी मागितली, त्यावेळी चंद्रपूर कांग्रेस व खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जोरगेवार यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शविला, त्यामुळे आमदार जोरगेवार यांना राष्ट्रवादी कांग्रेसने उमेदवारी नाकारली.
    अनेक राजकीय घडामोडी नंतर आमदार जोरगेवार आज भाजप पक्षात सामील झाले आणि भाजपच्या जागेचा तिढा सुटला.


    Mla kishor jorgewar in bjp चंद्रपुरातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार व माजी कांग्रेस महिला जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर यांनी आज भाजप पक्षात प्रवेश करीत पक्षाला मजबुती देण्याचे काम केले.
    यावेळी भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार व मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व माजी खासदार हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला.

    महत्त्वाचे : चंद्रपुर शहरात वेश्याव्यवसाय, 4 महिलांची सुटका


    विशेष म्हणजे जोरगेवार यांना भाजपचे तिकीट मिळावे यासाठी माजी खासदार हंसराज अहिर यांनी प्रयत्न केले.
    वर्ष 2019 च्या विधानसभा निवडणुकीत किशोर जोरगेवार यांनी सर्वच राजकीय पक्षांना पराभवाची धूळ चाटवित 72 हजारांचे मताधिक्य घेतले होते, आधी भाजप प्रवेशवरून अनेक वादंग पक्षात निर्माण झाले, मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक ब्रिजभूषण पाझारे यांना तिकीट मिळावी याकरिता मुनगंटीवार हे प्रयत्नशील होते मात्र ऐनवेळी जोरगेवार यांच्या एंट्रीने पक्षात बंडाचे वातावरण निर्माण झाले, खुद्द मुनगंटीवार हे दिल्ली ला गेले, आणि पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची भावना लक्षात घ्यावी व उमेदवारी देण्यात यावी अशी विनंती त्यांनी पक्ष श्रेष्ठीना केली होती. Mla kishor jorgewar in bjp

    बघा अनकट पक्ष प्रवेश सोहळा


    मात्र पक्ष श्रेष्ठीनी जोरगेवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, आणि त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम आज घेण्यात आला.
    चंद्रपूर जिल्ह्याला मुनगंटीवार विरुद्ध किशोर जोरगेवार हा वाद नवा नाही मात्र यंदा जोरगेवार यांनी या वादात आघाडी घेतल्याने भाजप चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारणार हे निश्चित झाले आहे.

    Namrata themaskar


    महिला कांग्रेसच्या माजी अध्यक्षा नम्रता ठेमस्कर यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या जातीय राजकारण विरोधात कांग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता, चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात नम्रता ठेमस्कर यांची ओळख फायरब्रॅंड नेता म्हणून आहे.
    आजच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात आमदार जोरगेवार व ठेमस्कर यांच्या शेकडो समर्थकांनी पक्षात प्रवेश करीत जिल्ह्यातील 6 विधानसभा जागेवर विजय निश्चित होणार अशी हमी दिली. Mla kishor jorgewar in bjp

    विशेष म्हणजे आजच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपचे ब्रिजभूषण पाझारे व त्यांचे समर्थक उपस्थित नव्हते, सध्या समाजमाध्यमांवर पाझारे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असे संदेश पसरलेले आहे.

    असंख्य कार्यकर्त्यांनी आम्ही जोरगेवार यांचं काम करणार नाही अशी भूमिका घेतली आहे, कार्यकर्त्यांच्या या बंडावर पालकमंत्री काय भूमिका घेणार ही येणारी वेळ सांगेलचं. Mla kishor jorgewar in bjp

    वर्ष 1995 पासून भाजप पक्ष चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत विजय मिळवीत आला मात्र त्यांच्या विजयी रथाला खिंडार लावण्याचे काम आमदार जोरगेवार यांनी केले, त्यावेळी आमदार जोरगेवार यांना जनतेनी भाजपविरोधी मतदान केले होते, 2009 मध्ये जोरगेवार यांना भाजपने तिकीट नाकारल्यावर त्यांनी पक्ष सोडला आणि विधानसभा क्षेत्रात कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली होती हे विशेष.

  • Powerful kishor jorgewar join bjp : आमदार जोरगेवार यांचा 10 वर्षाचा वनवास संपणार

    Powerful kishor jorgewar join bjp : आमदार जोरगेवार यांचा 10 वर्षाचा वनवास संपणार

    kishor jorgewar join bjp चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार यांचा 10 वर्षाचा वनवास संपला असून ते 27 ऑक्टोबर रोजी घरवापसी करणार असून त्यांचा भाजप पक्षात प्रवेश होत आहे.

    kishor jorgewar join bjp वर्ष 2014 मध्ये भाजप सोडून शिवसेना पक्षात प्रवेश केल्यावर किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढली होती, त्यावेळी त्यांना 52 हजार मत मिळाले मात्र त्यांचा पराभव झाला, वर्ष 2009 मध्ये पालकमंत्री मुनगंटीवार यांनी किशोर जोरगेवार तर हंसराज अहिर यांच्याकडून राजेश मुन यांचं नाव पक्षाकडे गेलं मात्र दोन्ही नेत्यांच्या वादात जागा सुटू नये यासाठी भाजपने नागपूर निवासी नाना श्यामकुळे यांना चंद्रपूर मध्ये पाठवीत विधानसभेची उमेदवारी दिली.

    राजकीय : ब्रह्मपुरी येथे विजय वडेट्टीवार यांनी भाजपला लावले खिंडार

    त्यावेळी निष्ठावंत भाजप पदाधिकाऱ्यांना डावलून बाहेरच्या पदाधिकाऱ्याला भाजपने उमेदवारी दिली होती, नाना श्यामकुळे विजयी झाले मात्र निष्ठवंतांना डावल्ल्याची खंत अनेकांच्या मनात होती, 2014 ला जोरगेवार यांनी भाजप सोडली, विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपसमोर आव्हान निर्माण केलं होतं, पराभव झाल्यावर जोरगेवार घरी बसले नाही तर त्यांनी 5 वर्षे सतत जनतेच्या संपर्कात राहिले. kishor jorgewar join bjp

    वर्ष 2019 ला जोरगेवार यांनी कांग्रेस पक्षाला विधानसभेची उमेदवारी मागितली मात्र त्यावेळी खासदार बाळू धानोरकर यांचा विरोध बघता जोरगेवार यांना उमेदवारी मिळाली नाही, परंतु 2019 ला जोरगेवार अपक्ष निवडणुकीत उभे राहिले, कांग्रेस पक्षाची जमानत जप्त झाली, भाजप चा तब्बल 72 हजार मतांनी पराभव झाला.

    त्यावेळी महाविकास आघाडी अस्तित्वात आली, जोरगेवार यांनी सरकारला समर्थन दिले, अडीच वर्षांनी महायुती सरकार राज्यात स्थापन झाले, अपक्ष आमदार असल्याने विधानसभा क्षेत्रातील कामे व्हावी यासाठी जोरगेवार यांनी महायुती सरकारला समर्थन दिले.

    या दरम्यान पालकमंत्री मुनगंटीवार विरुद्ध आमदार जोरगेवार यांचा अनेकदा वाद झाला, अनेक सार्वजनिक कार्यक्रमात दोघेही एकमेकांवर टीकास्त्र सोडत होते, लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार जोरगेवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा दिला, मात्र मुनगंटीवार यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. kishor jorgewar join bjp

    मुनगंटीवार यांच्याशी जवळीकता वाढल्याने वर्ष 2024 मध्ये आमदार जोरगेवार यांना भाजपची उमेदवारी मिळणार अशी शक्यता निर्माण झाली मात्र त्यांच्या उमेदवारीला पालकमंत्री मुनगंटीवार यांनी विरोध दर्शविला, अश्यात आमदार जोरगेवार यांच्यासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे भाजप पक्षाची संजीवनी घेऊन आले, आणि जोरगेवार यांचा भाजप पक्षात प्रवेश निश्चित केला.

    परंतु या राजकीय घडामोडी मध्ये पालकमंत्री मुनगंटीवार यांनी विरोध दर्शविला कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांनी लक्षात घ्याव्या यासाठी दिल्ली ला गेले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही अखेर निष्ठवंतांच्या उमेदवारीचा इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती झाली, मात्र यंदा जोरगेवार यांना अहिरांची संजीवनी कामी आली. kishor jorgewar join bjp

    भाजपच्या वरिष्ठांनी एक एक विधानसभा महत्वाची आहे हे नेत्यांना सांगितले आहे तर आपले उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून यावे यासाठी प्रयत्न करा असा आदेश दिला.

    आता 10 वर्षांनी आमदार जोरगेवार यांची भाजपात घर वापसी होणार असून चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार हे आमदार किशोर जोरगेवार असणार हे स्पष्ट झाले आहे, राजकारणात काहीही होऊ शकते हे याचं जिवंत उदाहरण आहे.

    वर्ष 2019 च्या निवडणुकीत आमदार जोरगेवार यांना मतदारांनी भाजप विरोधात मतदान केले पण यावेळी चित्र वेगळे आहे, जनतेच्या मनात जोरगेवार अपक्ष म्हणून निवडून येणार असा कल आहे, ज्या विरुद्ध आपण निवडणूक लढलो आता त्या पक्षाला मतदान जनता करेल काय? हा मोठा गोंधळ व प्रश्न निर्माण झाला आहे.

  • Joined the Congress Party : शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा कांग्रेस पक्षात प्रवेश

    Joined the Congress Party : शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा कांग्रेस पक्षात प्रवेश

    Joined the Congress Party जिल्हा बॅक उपाध्यक्ष यशवंत दिघोरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षप्रवेश, ब्रम्हपूरीत भाजपला खिंडार – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश

    Joined the Congress Party राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या सामाजिक बांधिलकी, सर्व समाजाला न्याय देण्याहेतू सुरु असलेले अथक प्रयत्न, सामान्यांप्रती असलेली आपुलकी, सामान्य कार्यकर्त्यांची जाण व क्षेत्रात सुरू असलेल्या विकास कामांचा झंजावत तसेच भोई समाजाला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत हजारोंच्या संख्येने मिळवून दिलेले घरकुले अशा विविध कार्यामुळे प्रेरित होऊन चंद्रपूर जिल्हा बँक उपाध्यक्ष यशवंत दिघोरे यांचे नेतृत्वात शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

    निवडणूक : शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून भरणार उमेदवारी अर्ज

    गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपूरी तालुक्यात हजारोंच्या संख्येने असलेल्या भोई समाज बांधवांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घरकुल मिळवून दिले. तसेच सर्व समाजाप्रती त्यांची आदर भावना, ब्रम्हपूरी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय, मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी विवीध विकासकामे, रोजगार, शिक्षण, आरोग्य अशा विविध कार्यातून त्यांनी मतदारसंघातील जनतेची मने जिंकली आहे. Joined the Congress Party

    विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सर्वसमावेशक सामाजिक, राजकीय व विकासात्मक दूरदृष्टीकोण तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अपेक्षांची जाण असणारा नेता म्हणून या सामाजिक भावनांनी प्रेरित होवून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

    आयोजित प्रवेशाप्रसंगी मार्गदर्शन पर बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, मी सामन्यातून आलो असल्याने मला सामान्य कार्यकर्त्यांची जाण आहे. मला प्रत्येक समाजाला समान न्याय देणे, त्यांचा हक्क मिळवून देण्याची शक्ती ही तुमच्या कडूनच मिळाली आहे. तुमच्या विश्वासाला मी तडा जावू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. Joined the Congress Party


    ब्रम्हपूरी तालुक्यातील निलज, चौगान, मेंडकी, तुलानमाल, चोरटी, हळदा, कोसंबी, तुलानमेंढा, तुलानमाल, भुज, वांद्रा, आवळगाव, पद्मापुर, मुडझा, चौगान, जुगनाळा, कळमगाव, गोगाव, सायगाव, मुडझा, बोदरा, सिंदेवाही तालुक्यातील आलेसुर, पेंढरी कोके, मिनघरी येथील कार्यकर्त्यांचा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दुपट्टा टाकून काँग्रेस पक्षात प्रवेश स्वीकारत स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकलव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष मिलींद भन्नारे यांनी केले.

    आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ नेते डॉ. देविदास जगनाडे, जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, एकलव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष मिलींद भन्नारे, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, राजीव गांधी पंचायतराज संघटनचे प्रदेश सरचिटणीस डॉ.थानेश्वर कायरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, माजी नगरसेवक संजय ठाकुर, अनुसूचित जाती सेलचे शहराध्यक्ष मुन्ना रामटेके, विमुक्त जाती व भटक्या जमाती सेलचे देवचंद ठाकरे, सांस्कृतिक सेलचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर गणवीर व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. Joined the Congress Party

    ब्रम्हपुरी शहरातील माजी नगरसेवकासह नागरिकांनी केला काॅंग्रेस पक्षप्रवेश
    ब्रम्हपूरी शहरातील माजी नगरसेवक चक्रेश करंबे यांसह अंकुश रामटेके, वैभव हुमने, मनीष गेडाम, संकेत हुमने, अभय दोनाडकर, संदीप कांबळे, साजन पिल्लेवान यांनी सुध्दा यावेळी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

  • Today Shiv Sena candidate Sandip Girhe : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मोठा ट्विस्ट

    Today Shiv Sena candidate Sandip Girhe : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मोठा ट्विस्ट

    Shiv Sena candidate Sandip Girhe जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

    Shiv Sena candidate Sandip Girhe चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा जागेवर कांग्रेसने दावा केला असून सर्व जग कांग्रेस लढणार अशी शड्डू ठोकला होता मात्र मित्रपक्षाने काही जागेवर दावा केला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील काही जागेवरील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब अजूनही झाले नाही.

    मात्र एकीकडे कांग्रेसची यादी जाहीर होण्यापूर्वी वरोरा विधानसभा क्षेत्रातून प्रवीण काकडे तर बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून संतोष रावत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रावर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला होता, विशेष म्हणजे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी वर्षभरापासून विधानसभा क्षेत्रात संघटन बांधणी सुरू केली होती.

    मध्यंतरी सर्व जागा कांग्रेस लढविणार अशी बातमी बाहेर आल्यावर संदीप गिर्हे यांनी पक्ष जो आदेश देतील त्यावर आम्ही काम करू अशी भूमिका घेतली होती, मात्र 25 ऑक्टोबर रोजी संदीप गिर्हे यांना मातोश्री मधून बोलावण्यात आल्याने त्यांनी तात्काळ मुंबई गाठली व त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करा असे म्हटले आहे. Shiv Sena candidate Sandip Girhe

    राजकीय : 28 ऑक्टोबर रोजी सुधीर मुनगंटीवार दाखल करणार उमेदवारी अर्ज

    29 ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भव्य शक्तिप्रदर्शन करीत संदीप गिर्हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, यामुळे आता बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात सलग 3 वेळा भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विजय मिळविला आहे, त्यांच्यासमोर युवा नेते संदीप गिर्हे यांचं कडवे आव्हान असू शकते हे 30 ऑक्टोबर नंतर स्पष्ट होणार.

    25 ऑक्टोबर रोजी किती अर्ज दाखल?

    महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक  निवडणुकीसाठी शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण पाच उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले.

    यात 70 – राजुरा विधानसभा मतदारसंघात सुभाष रामचंद्र धोटे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), 71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात नभा संदीप वाघमारे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया), 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात संतोषसिंह चंदनसिंह रावत (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), 73 – ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात सुधीर महादेव टोंगे (अपक्ष), 74 – चिमूर विधानसभा मतदारसंघात निरंक आणि 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात विनोद कवडूजी खोब्रागडे (अपक्ष) यांनी नामांकन अर्ज दाखल केले.

    तर आज 70-राजुरा विधानसभा मतदारसंघात 7 अर्ज, 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 11 अर्ज, 72-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 22 अर्ज, 73-ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 23 अर्ज, 74-चिमूर मतदारसंघात 10 अर्ज आणि 75-वरोरा विधानसभा मतदारसंघात 7 अर्ज असे एकुण सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 80 अर्जांची उचल करण्यात आली आहे.