Category: ग्रामीण वार्ता

ग्रामीण वार्ता (Gramin Varta) विभागात वाचा news34.in वर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बातम्या आणि घडामोडी. शेतकरी योजना, ग्रामपंचायत राजकारण, स्थानिक विकास प्रकल्प, कृषी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स येथे उपलब्ध आहेत. चंद्रपूर ग्रामीण भागातील समस्या, यशोगाथा आणि सकारात्मक बदलांना आम्ही प्राधान्य देतो. ग्रामीण भागातील विश्वासार्ह माहितीसाठी नियमित भेट द्या.

  • Chandrapur urea supply update । तर खत वितरकांवर थेट गुन्हे दाखल करा – आमदार सुधीर मुनगंटीवार

    Chandrapur urea supply update

    Chandrapur urea supply update : चंद्रपूर, दि. 21 : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून खत टंचाईची समस्या सुटणार असून, शेतकऱ्यांपर्यंत वेळेत खत पोहोचावे यासाठी काटेकोर नियोजनाचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. शेती हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतटंचाईची चिंता वाढली आहे. पण आ. श्री. मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात HURL कंपनीचे 1250 मेट्रिक टन आणि NBCL (नर्मदा) कंपनीचे 1600 मेट्रिक टन युरिया खत लवकरच उपलब्ध होणार आहे. बल्लारपूरसह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन किसान मोर्चाच्या विनंतीनंतर आ. श्री. मुनगंटीवार यांनी त्यांच्या कार्यालयात खत उपलब्धतेबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. Sudhir Mungantiwar fertilizer planning

    चंद्रपूर मनपा निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढणार

    बैठकीला कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी वीरेंद्र राजपूत, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. पवार, बल्लारपूरचे गुणनियंत्रक, तालुका कृषी अधिकारी श्री. गायकवाड, पोंभुर्णाचे गुणनियंत्रक तथा तालुका कृषी अधिकारी श्री. गवळी, चंद्रपूरच्या गुणनियंत्रक तथा तालुका कृषी अधिकारी श्रीमती गोडबोले, मूलच्या गुणनियंत्रक तथा तालुका कृषी अधिकारी श्री. गजभिये, भाजपा किसान मोर्चाचे  जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार, भाजपा किसान महानगर मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष रवी चहारे आदींची उपस्थिती होती.

    वितरकांवर थेट एफ.आय.आर दाखल करा

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘युरिया खताचे वाटप काटेकोर नियोजनानुसार प्रत्येक कृषी केंद्रावर तसेच सर्व शेतकऱ्यांपर्यंत खत वेळेत पोहोचेल या दृष्टीने नियोजन करा. याशिवाय प्रशासनाच्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या वितरकांवर थेट एफ.आय.आर दाखल करावे. दरम्यान, आजच्या तारखेस मूल तालुक्यात फक्त 2.5 टन खत उपलब्ध असून पोंभुर्णा येथे एकही युरियाची बॅग उपलब्ध नाही, ही गंभीर बाब आहे.’

    शेतकऱ्यांच्या पिकांच्या हंगामी गरजा लक्षात घेता खत उपलब्धतेसाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देखील त्यांनी बैठकीत दिले.

  • Solid waste scam PIL Nagpur bench । घनकचरा व्यवस्थापनात ८३ लाखांचा गैरव्यवहार?, उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

    Solid waste scam PIL Nagpur bench

    Solid waste scam PIL Nagpur bench : पोंभूर्णा: १९ सप्टेंबर २०२५ -नगर पंचायतीच्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी घनकचरा व्यवस्थापन घोटाळ्या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.त्यामुळे सबंधितांचे चांगलेच धाबे दणाणले असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.नगर पंचायतचे विरोधी गटनेता आशिष कावटवार,गणेश वासलवार व इत्तर नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात मुंबई नगरविकास मंत्रालयाचे सचिव,सहआयुक्त, जिल्हाधिकारी,मुख्याधिकारी, नगराध्यक्षा व इतर पदाधिकारी,अधिकाऱ्याच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे.

    दिल्लीत पत्रकार परिषदेत आणि गोंधळ उडाला चंद्रपूर जिल्ह्यात

    नगर पंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजने अंतर्गत सन. २०२५- २६ करीता ८३ लक्ष ५१ हजार ८५० रुपये कामाच्या अधिकारांचा गैरवापर, कायद्याचे उल्लंघन, सभेत ठराव न घेणे,छुप्या मार्गाने ठराव तयार करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे, निविदा प्रक्रियेत मनमर्जीच्या कंत्राटदाराला कंत्राट देण्यासाठी सोयीस्कर छुप्या मार्गाने प्रक्रिया करणे,असा एक ना अनेक अनागोंदी कारभार करून घोटाळा झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेता आशिष कावटवार, नगरसेवक, गणेश वासलवार,अतुल वाकडे, अभिषेक बद्दलवार,नंदकिशोर बुरांडे,रामेश्वरी वासलवार,रिना उराडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली.जनहित याचिका सार्वजनिक, नागरिकांच्या हिताची असल्यामुळे तात्काळ न्यायालयाने मान्य करून याचिका दाखल करून घेतली असून केस नंबर WPST/21034/2025 मिळाला असून WP/5431/2025 BOMBHC-मुंबई उच्च न्यायालयात नोंदणीकृत करण्यात आले आहे. Pombhurna Nagar Panchayat corruption

    पोंभर्णा शहरामध्ये नगर पंचायत अंतर्गत कचरा व्यवस्थापन करण्यासाठी खासगी ठेकेदाराला घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट देण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या. या आधी आणि नंतरही पूर्ण प्रक्रिया राबविताना नगर पंचायतचे नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी, प्रशासनाने नियमांना धाब्यावर बसवून नियम,कायदे यांना पायदळी तुडवत गैरव्यवहार केल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी दि.१५ सप्टेंबरला पोंभूर्णा विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन गैरव्यवहारावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. Waste management scam Maharashtra

    नगर पंचायत मधील १४ मे २०२५ रोजीच्या सर्वसाधारण सभेच्या विषयात व टिपणी मध्ये विषय घेण्यात आलेला नाही, व त्याबाबत कुठलीही चर्चा केली गेली नाही व पुढील सभा दिनांक १ जुलैच्या सभेत मागील विषय वाचन करून कायम करण्यात आलेला नाही.छूप्या मार्गाने विविध विकास कामाची निवड करताना नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या मनमर्जीने ठराव तयार करून घनकचरा व्यवस्थापन ई-निविदा गैरमार्गाने काढण्यात आली व दरपत्रक उघडून नगराध्यक्षानी स्थायी समिती मध्ये दर निश्चित केले असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. Solid waste scam PIL Nagpur bench

    आमचा कायद्यावर विश्वास : विरोधी पक्ष गटनेता

    • पोंभूर्णा शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी येथील नगर पंचायतीत सुरू असलेला अनागोंदी कारभार, आर्थिक भ्रष्टाचार याविषयी वेळोवेळी पत्रव्यवहार करून दाद मागून सुद्धा स्थानिकासह विविध वरीष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.दाद न मिळाल्याने न्याय मिळविण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आमचा कायद्यावर पूर्णपणे विश्वास असून आम्हाला न्याय मिळेल आणि जनतेसमोर सत्य येईल.
    • आशिष कावटवार
      विरोधी पक्षनेता,नगर पंचायत पोंभूर्णा.
  • child attacked by tiger । सिंदेवाही तालुका हादरला! ७ वर्षीय मुलगा वाघाच्या तावडीत?

    child attacked by tiger

    child attacked by tiger : चंद्रपूर | 18 सप्टेंबर 2025 – सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी या छोट्याशा गावात आज गुरुवारी रात्री साडेसातव्या सुमारास हृदयद्रावक घटना घडली. गावातीलच दुसरीत शिकणाऱ्या प्रशिल बबन मानकर (वय ७) या चिमुकल्याला अंगणातून पट्टेदार वाघाने उचलून नेले. या घटनेमुळे गावात शोककळा व भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    शेतात काम करताना महिलेवर वाघाचा हल्ला, महिला ठार

    सिंदेवाही तालुक्यातील नवरगावपासून नऊ किलोमीटर अंतरावरील गडबोरी हे गाव जंगल व टेकडीला लागून वसलेले आहे. या परिसरात वन्यप्राण्यांचा धोका अनेक वर्षांपासून कायम आहे. नागरिक वन्यप्राण्यांच्या दशहतीत रात्रीचे जिवन जगत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. आज गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास प्रशिल घराच्या अंगणात निघाला असताना त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने संधी साधत त्याला उचलून नेले, असे काहींचे म्हणणे आहे. तर दुसऱ्या माहितीनुसार, प्रशिल चे वडील बबन मानकर गावात जेवण करून आपल्या दोन्ही मुलांना हातात घेऊन घरी परतत असताना रस्त्यालगत दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घालून शुभमला उचलून नेले. या दोन भिन्न माहितीमुळे घटनेचा नेमका प्रकार स्पष्ट झालेला नाही. Chandrapur forest department news

    यापूर्वी सुद्धा घडल्या घटना

    गडबोरी गावाच्या इतिहासात अशा स्वरूपाच्या घटना नवीन नाहीत. पाच-सहा वर्षांपूर्वीही अशाच दोन ते तीन घटना येथे घडल्या होत्या. पुन्हा एकदा अशा प्रकारची घटना घडल्याने गावात भीती व संतापाचे वातावरण आहे. नागरिक आपल्या मुलांना घराबाहेर काढण्यास घाबरत आहेत. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने गडबोरीत दाखल झाले आहे. जंगल व टेकडी परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र वृत्तलेखनापर्यंत प्रशिलचा शोध लागलेला नव्हता.

    तो हिंस्त्र प्राणी कोणता हे अद्याप निश्चित नाही – मुख्य वनसंरक्षक रामानुजम

    मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम यांनी माहिती दिली की, प्रशिल नामक मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी परिसरातील भागात शोध मोहीम सुरू केली आहे. कोणत्या हिंस्र प्राण्याने मुलाला उचलून नेले आहे की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, मुलाचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू असल्याचे मुख्य वनसंरक्षक रामानुजम यांनी सांगितले. tiger encounters Chandrapur


    प्रशिल हा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दुसरीत शिकत होता. मानकर यांना दोन मुले आहेत, त्यापैकी एक मुलगा अशा प्रकारे वाघाच्या तावडीत गेल्याने मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांनी तातडीने वन्यप्राणी नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. १८ सप्टेंबर रोजी वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या २ घटना जिल्ह्यात उघडकीस आल्या आहे.

  • tiger attack Chandrapur 2025 । शेतात काम करताना महिलेवर वाघाचा हल्ला, महिलेचा मृत्यू, अब तक ३१ मृत्यू

    tiger attack Chandrapur 2025

    tiger attack Chandrapur 2025 : चिमूर:- शंकरपूर पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या लावारी येथील एका महिलेला वाघाने ठार केल्याची घटना गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली, विद्या कैलास मसराम वय 42 असं मृतक महिलेचे नाव आहे ही घटना चिमूर वनपरिक्षेत्र भिसी उपवन क्षेत्रातील गडपिपरी बिटात घडली. विशेष बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात आतपर्यंत तब्बल ३१ नागरिकांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी गेला आहे, ज्यामध्ये २९ वाघाच्या हल्ल्यात, १ अस्वल व १ हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. tiger attack Chandrapu

    ब्रह्मपुरीमध्ये वाघाचा हल्ला, गुराखी ठार

    लावारी मध्ये मसराम यांनी धानाची शेती ठेक्याने घेतली आहे, मागील २ दिवसापासून शेतात निंदनाचे काम सुरु होते, आज सकाळी सहा महिला शेतात निंदनासाठी गेल्या होत्या, ५ महिला वेगळ्या दिशेने तर विद्या मसराम हि दुसऱ्या बाजूस निंदण करीत होती. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने विद्या वर हल्ला करीत तिला फरफटत नेत ठार केले.

    महिलेचा पती विद्या ला बघण्यासाठी शेतात आला तेव्हा ती कुठे आढळून आली नाही, त्यावेळी मागील बांधीत विद्याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत होता, काही अंतरावर गावकर्यांना वाघ दिसला मात्र त्यांच्या आरडाओरडाने वाघ पळून गेला. जोपर्यंत महिलेच्या पतीला नोकरी, दहा लाख रुपये व वाघाचा बंदोबस्त करणार नाही तोपर्यंत कुणाचेही वाहन जाऊ देणार नाही अशी भूमिका गावकर्यांनी घेतली.

    दुचाकी वाहन फोडले

    वनविभाग व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मात्र गावकऱ्यांचा रोष वाढल्याने घटनास्थळी चांगलाच तणाव निर्माण झळा होता, यावेळी वनरक्षक बोरकर यांच्या दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. वनरक्षकाची तात्काळ बदली करावी अशी मागणी गावकरी करीत होते. यावेळी पोलीस व ववनविभागाने गावकर्यांना लेखी आश्वासन दिल्यावर तणाव शांत झाला. वन विभागातर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते तर पोलीस विभागातर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे भिसीचे ठाणेदार मंगेश भोंगडे, पोलीस उपनिरीक्षक रवी वाघ, थूटे चिमूर व भिसी येथील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

  • Chandrapur wildlife conflict । ब्रम्हपुरीत वाघाचा हल्ला : गुराख्याचा जागीच मृत्यू, गावात भीतीचे वातावरण

    Chandrapur wildlife conflict

    Chandrapur wildlife conflict : ब्रम्हपुरी १७ सप्टेंबर : उत्तर ब्रम्हपुरी वनपरीक्षेत्रातील उपक्षेत्र ब्रम्हपुरी, नियतक्षेत्र सायगाटा भागात मंगळवारी (दि. १६ सप्टेंबर) सायंकाळी सुमारे ४.३० वाजता वाघाच्या हल्ल्यात एक गुराखी ठार झाला.

    पोलीस निरीक्षकापायी कर्मचारी त्रस्त

    अब तक ३०

    मृत व्यक्तीचे नाव सुनील ऊर्फ प्रमोद बाळकृष्ण राऊत (वय ३२, रा. लाखापूर) असे आहे. ते नेहमीप्रमाणे लाखापूरच्या जंगलात गुरे चारण्यासाठी गेले होते. गुरे चारून परत येत असताना, झुडपामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात सुनील राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत एकूण ३० नागरिकांचा मृत्यू झाला असून यामध्ये २८ वाघाच्या, १ हत्ती तर १ अस्वलाच्या हल्ल्यात ठार झाले आहे.

    घटनेनंतर लाखापूर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे. वनविभाग व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

  • Construction worker death by electric shock | मूल तालुक्यात भीषण अपघात – दोन बांधकाम मजुरांचा करंट लागून मृत्यू ⚡

    Construction worker death by electric shock

    Construction worker death by electric shock : चंद्रपूर १७ सप्टेंबर २०२५ – मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथे बुधवारी (दि. १७) सकाळी घडलेल्या भीषण घटनेत दोन बांधकाम मजुरांचा करंट लागून मृत्यू झाला. या अपघातामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून, महावितरणच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडल्याची चर्चा सर्वत्र आहे.

    चंद्रपुरात क्लोरीन गॅस गळती, मोठी दुर्घटना टळली

    दिलीप पांडुरंग गिरडकर यांच्या घराचे बांधकाम सुरू असून, या कामासाठी नवेगाव भु. येथील बांधकाम मिस्त्री व मजूर कार्यरत होते. सकाळी सुमारे ९ वाजता सर्व मजूर नेहमीप्रमाणे कामाला लागले. दरम्यान, स्लॅबवरील रेलिंगचे काम सुरू असताना लोखंडी सळई वर चढवली जात होती. अचानक सळईचा एक टोक जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने भीषण अपघात घडला.

    या अपघातात मिस्त्री विनोद मुकुंदा बोरकुटे (४६) व हरिदास शशिकांत चुदरी (३४, दोन्ही रा. नवेगाव भु.) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मूल पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. अचानक झालेल्या या अपघाती मृत्यूमुळे दोन्ही कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. Mahavitaran power line accident news

    महावितरणचे दुर्लक्ष

    घरमालकाने बांधकाम सुरू करण्यापूर्वी महावितरणकडे निवेदन देत घराजवळील विद्युततारा बाजूला करण्याची मागणी केली होती. मात्र या निवेदनाकडे महावितरणने दुर्लक्ष केल्यामुळेच हा अपघात झाल्याची गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



  • Pombhurna Nagar Panchayat news । पोंभूर्णा नगर पंचायतवर वादाची छाया : ८३ लाखांचा टेंडर घोटाळा न्यायालयात जाणार!

    Pombhurna Nagar Panchayat news

    Pombhurna Nagar Panchayat news : पोंभूर्णा :-१६ सप्टेंबर – पोंभूर्णा नगर पंचायत अंतर्गत जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान सन २५-२६ योजने अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचे प्रस्तावित अंदाजपत्रकीय किंमत ८३ लक्ष ५१ हजार ८५० रुपयांच्या कामाबाबत सभेत विषय नसतानाही खोट्या व गैरमार्गाने ठराव सर्वानुमते मंजुर असल्याचा खोटा ठराव लिहून टेंडर घोटाळा मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी केल्याचा गंभीर आरोप विरोधी नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केलेल्या तक्रारीतून केली आहे. घनकचरा निविदा घोटाळ्याच्या गैरव्यवहाराबाबत न्यायलयात याचिका दाखल करणार असल्याचे विरोधी पक्षनेता आशिष कावटवार, नगरसेवक गणेश वासलवार,अतुल वाकडे,अभिषेक बद्दलवार, नंदकिशोर बुरांडे, रामेश्वरी वासलवार, रिनाताई उराडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

    अभियंता दिनी जिल्हा परिषदेमधील अभियंत्यांची ओली पार्टी

    पोंभूर्णा नगर पंचायत मधील १४ मे २०२५ रोजीच्या सर्वसाधारण सभेच्या विषय नोटीस व टिपणी मध्ये विषय अजेंड्यावर नसतानाही व सभेत या कुठल्याही विषयावर चर्चा झालीच नसल्याने विविध विकास कामांच्या विषयात छुप्या मार्गाने सर्वानुमते ठराव मंजुर करित असल्याचे दाखवत ठराव बुकात नोंद करून जिल्हाधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची मान्यता घेत घनकचारा व्यवस्थापनाचा टेंडर काढण्यात आला आहे. 83 lakh waste management tender scam

    pombhurna press

    व्हिडीओ वाईस रेकॉर्डिंग नगरसेवकांकडे

    नगर पंचायतच्या १४ मे २०२५ ला झालेल्या सर्वसाधारण सभेचा संपूर्ण इतिवृत्त पुढील सभा दिनांक १ जुलै २०२५ च्या सभेतील विषय एक मध्ये मागील सभेचा इतिवृत्त वाचन करून कायम करायला हरकत नसावी असा विषय असताना १ जुलै च्या सभेतील इतिवृत्त वाचण्यात जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत घनकचारा व्यवस्थापनेचा ८३ लक्ष ५१ हजार ८५० रुपयांच्या कामाबाबत वाचनच करण्यात आलेले नाही. त्यामुळे तो विषय कायम कसा करण्यात आला असा सवाल विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केला आहे.तसा पुरावा म्हणून १ जुलैच्या सभेची व्हिडीओ वाईस रेकॉर्डिंग नगरसेवकांकडे असल्याचे विरोधी नगरसेवकांकडून सांगण्यात आले आहे. municipal council corruption India

    महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये नगर पंचायतने निविदा प्रक्रिया पूर्ण करण्या अगोदर सभेची मंजूरी घ्यावी लागते. असे असतानाही पोंभूर्णा नगर पंचायतच्या १४ मे २०२५ च्या सभेत हा विषय अजेंड्यावर नसतांनाही पडद्यामागे ठराव प्रोसिडिंगवर विविध विकास कामाची निवड करणे ह्या विषयामध्ये लिहून सर्वानुमते मंजूर दाखवण्याचा बोगसपणा प्रशासनाने व सभाध्यक्षाने केला कसा ? आणि कशासाठी ? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीचे निवेदन दिले आहे. या घनकचरा संकलन टेंडर घोटाळ्या बाबत न्यायालयात याचिका टाकून गैरमार्गाने कृत्य करणाऱ्या मुख्याधिकारी, नगराध्यक्ष,व संबंधित पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्ष गटनेता आशिष कावटवार,नगरसेवक गणेश वासलवार,अतुल वाकडे,अभिषेक बद्दलवार,नंदकिशोर बुरांडे, रामेश्वरी वासलवार, रिनाताई उराडे यांनी आयोजित पत्रपरिषदेतून केला आहे.

  • Brahmpuri Armori accident news । ब्रह्मपुरी-आरमोरी मार्गावरील भीषण अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

    Brahmpuri Armori accident news

    Brahmpuri Armori accident news : चंद्रपूर (१४ सप्टेंबर २०२५) : ब्रह्मपुरी-आरमोरी मार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात मांगली येथील रहिवासी असलेल्या २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजय आनंदराव कार असे या मृत तरुणाचे नाव आहे. एका मिनी पिकअप वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला.

    चंद्रपूर मनपा शाळेचे स्थलांतर

    अजय कार हा प्रशांत पिलारे यांच्याकडे चारचाकी वाहनचालक म्हणून काम करत होता. नेहमीप्रमाणे तो सकाळी कामावर गेला होता आणि सायंकाळी काम आटोपून आपल्या गावी मांगली येथे परत जात होता. आरमोरी रोडवरील एका बारसमोर समोरून येणाऱ्या एमएच-३४ बीझेड-३१५३ क्रमांकाच्या मिनी पिकअप वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

    अजय चा मृत्यू

    हा अपघात इतका गंभीर होता की अजयला जबर दुखापत झाली. त्याला तात्काळ ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

    या घटनेनंतर, पिकअप चालकावर निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा आरोप करण्यात आला असून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी अजयच्या कुटुंबीयांनी आणि नागरिकांनी केली आहे. ब्रह्मपुरी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

  • Nilam Gorhe birthday celebration Chandrapur । डॉ. निलमताई गोऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूरात शैक्षणिक साहित्य व फळवाटप कार्यक्रम

    Nilam Gorhe birthday celebration Chandrapur

    Nilam Gorhe birthday celebration Chandrapur : चंद्रपूर – १४ सप्टेंबर २०२५ :- शिवसेना नेत्या तथा विधानपरिषदेच्या उप-सभापती मा. ना. डॉ. निलमताई गोऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सौ. मिनलताई आत्राम जिल्हाप्रमुख शिवसेना महिला आघाडी चंद्रपुर तसेच संतोष पारखी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात चंद्रपुरातील उर्जानगर कोंडी जि. प. उच्च प्राथ. शाळेच्या विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच देवाळा येथील डेबू सावली वृद्धाश्रमातील वृद्धांना फळवाटप करीत उत्साहात साजरा केला.

    मातृशक्तीचा अपमान सहन करणार नाही – छबू वैरागडे

    निलमताई गोऱ्हे यांना दीर्घ आयुष्य लाभो व त्यांचे आरोग्य चांगले राहण्याची प्रार्थना

    यावेळी जि. प. उच्च प्राथ. शाळेच्या विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच देवाळा येथील डेबू सावली वृद्धाश्रमातील वृद्धांना फळवाटप कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी व वृद्धांनी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषदेच्या उप-सभापती मा. ना. डॉ. निलमताई गोऱ्हे यांना दीर्घ आयुष्य लाभो व त्यांचे आरोग्य चांगले राहण्याची प्रार्थना करुन आशिर्वाद दिला.

    shiv sena mahila aghadi chandrapur

    सदर कार्यक्रमाला बल्लारपुर विधानसभा महिला संघटिका सौ. कृष्णाताई सुरमवार, शिवसेना उपतालुका प्रमुख विक्की महाजन, भद्रावती युवासेना उपशहर प्रमुख विवेक दुर्गे, शिवसैनिक योगेश मुऱ्हेकर, भद्रावती माजी नगरसेवक नाना दुर्गे आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.

  • school children trapped by flood | वरोरा तालुक्यात पुरात अडकले विद्यार्थी….

    school children trapped by flood

    school children trapped by flood : वरोरा १३ सप्टेंबर २०२५ – वरोरा तालुक्यातील भटाळा, खेमजई, वडगाव, नांद्रा, लोदीखेडा, येरखेडा आदी गावांतील शाळकरी विद्यार्थ्यांची बस काल रात्री परतीच्या मार्गावर असताना नाल्याला आलेल्या पूरामुळे अडकली. वाहनचालकांनी सुरक्षेच्या दृष्टीने धोका पत्करला नाही व नाल्यावरून बस नेण्याचा निर्णय न घेता पाणी ओसरल्यानंतरच प्रवास करण्याचे ठरवले.

    चंद्रपूर जिल्हा परिषदेत प्रथमच अनुसूचित जातीची महिला बनणार अध्यक्ष, आरक्षण जाहीर

    दरम्यान स्थानिक आसाळा येथील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत 60 ते 70 मुला-मुलींसाठी जेवणाची व्यवस्था केली. तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री गजानन मुंडकर, तहसीलदार वरोरा श्री योगेश कौटकर, मंडळ अधिकारी श्री. अजय निखाडे, तलाठी आसाळा श्री. रितेश आमटे, तलाठी टेमुर्डा श्री. सुनील राऊत, कोतवाल श्री. चांदेकर व शिपाई श्री. सचिन शेळकी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. रात्री उशिरा मुलींची राहण्याची व्यवस्था समाजभान आसाळा येथे तर मुलांची राहण्याची व्यवस्था टेमुर्डा येथील समाजभवनात करण्यात आली. school children stranded in flood rescue

    पाणी ओसरले आणि..

    सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस प्रशासनाने लेडी कॉन्स्टेबल्ससह शिपायांचे पथक घटनास्थळी पाठविले. अखेर रात्री साडेअकराच्या सुमारास नाल्याचे पाणी ओसरल्याने आगार व्यवस्थापकांच्या सल्ल्यानुसार बस परत सोडण्यात आली.

    विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी टप्प्याटप्प्याने सोडताना प्रत्येक गावात महसूल,ग्राम विकास,पोलीस प्रशासनाकडून जीपीएस फोटोग्राफ व व्हिडिओ घेण्यात आले, जेणेकरून विद्यार्थी योग्य ठिकाणी सुखरूप पोहोचले आहेत याची खात्री करता आली. या काटेकोर प्रक्रियेमुळे पालक व विद्यार्थ्यांच्या मनात समाधान व आनंद होता. या संपूर्ण प्रसंगात वाहनचालकांची दक्षता, स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य व प्रशासनाची तातडीची कार्यवाही यामुळे संभाव्य धोका टळला.

    येत्या काळात काळजी घेणार

    यावेळी स्थानिकांनी विशेषतः ग्रामीण भागातील नाल्यांमध्ये अडकणारा केरकचरा व झाडेझुडपे नियमितपणे स्वच्छ करण्याची मागणी केली. प्रशासनाच्या वतीने संबंधित विभागाकडून येत्या काळात या बाबीवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. village flood children safe return home

    दरम्यान वरोरा तालुक्यामध्ये सदर दिवशी काही मंडळात 120 मिमी तर काही मंडळात 60 मिमी इतका पर्जन्य नोंदविण्यात आला. या पावसाचा अंदाज एक दिवस आधीच घेतल्यामुळे दुसऱ्या दिवशी शाळकरी विद्यार्थ्यांचा प्रवास टाळण्याच्या दृष्टीने माननीय जिल्हाधिकारी महोदय श्री विनय गौडा साहेब , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलदीप सिंग साहेब, निवासी उपजिल्हाधिकारी श्री कुंभार साहेब व जिल्हा शिक्षण अधिकारी श्रीमती सोनावणे मॅडम यांनी संयुक्तरीत्या निर्णय घेऊन वरोरा तालुक्यासाठी विशेष बाब म्हणून शाळांना सुट्टी जाहीर केली. स्थानिक प्रशासनाने हा निर्णय सर्व शाळांमार्फत पालकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.

    या संपूर्ण कार्यवाहीत स्थानिक मा.खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर मॅडम व मा.आमदार श्री करण देवतळे साहेब यांच्या सूचना व मदतीने प्रशासनाने समन्वय साधून कार्य केले, त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षित सुटका शक्य झाली.