Category: ग्रामीण वार्ता

ग्रामीण वार्ता (Gramin Varta) विभागात वाचा news34.in वर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बातम्या आणि घडामोडी. शेतकरी योजना, ग्रामपंचायत राजकारण, स्थानिक विकास प्रकल्प, कृषी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स येथे उपलब्ध आहेत. चंद्रपूर ग्रामीण भागातील समस्या, यशोगाथा आणि सकारात्मक बदलांना आम्ही प्राधान्य देतो. ग्रामीण भागातील विश्वासार्ह माहितीसाठी नियमित भेट द्या.

  • help by sudhir mungantiwar after road accident । भद्रावतीत अपघातग्रस्तांना तातडीने मदत – आ. सुधीर मुनगंटीवारांची मानवी संवेदनशीलता चर्चेत

    help by sudhir mungantiwar after road accident

    help by sudhir mungantiwar after road accident : भद्रावती १२ सप्टेंबर २०२५ : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा संवेदनशीलतेची प्रचिती दिली. एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना अपघात झालेला दिसला. त्यांनी आपला ताफा थांबवून जखमींना तातडीने रुग्णालयात भरती करण्याची व्यवस्था केली. त्यानंतरच ते पुढच्या प्रवासाला निघाले. ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ असे मानणारे आ. श्री. मुनगंटीवार यांची तत्परता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.

    चंद्रपुरात आले पेंट चोर

    आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जीवनातील प्रत्येक क्षण जनतेसाठी अर्पण केला आहे, याची प्रचिती भद्रावती येथे घडलेल्या अपघातातून पुन्हा एकदा आली. नागपूर येथे आयोजित कार्यक्रमासाठी जात असताना भद्रावती येथे एका अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही व्यक्ती बल्लारपूर येथील प्रदीप डोके आणि घनश्याम मेश्राम (रा.विसापूर) जखमी झाले. त्याच वेळी नेमके त्या मार्गावरून आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा ताफा जात होता.

    मुनगंटीवार यांचा ताफा थांबला

    अपघातग्रस्तांची अवस्था पाहताच, ‘माणसाचे प्राण वाचवणे हेच सर्वोच्च कर्तव्य’ या भावनेतून क्षणाचाही विलंब न करता आ. मुनगंटीवार यांनी आपला ताफा तात्काळ थांबवला. स्वतः पुढाकार घेऊन जखमींना प्राथमिक उपचार मिळवून देत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. त्यांच्या तात्काळ पुढाकारामुळे अपघातग्रस्तांना जीवदान मिळाले.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरिशजी शर्मा आणि महामंत्री डॉ मंगेशजी गुलवाडे यांनीही तत्परतेने जखमींना रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी नेण्याची मदत केली. politician save accident victim

    sudhir mungantiwar help accident victim

    आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून ते नेहमीच सामाजिक कार्यात आघाडीवर असतात. आरोग्य शिबिरे, मोफत शस्त्रक्रिया शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम, गरजूंसाठी मदत, ग्रामविकासासाठी सततचे प्रयत्न अशा अनेक उपक्रमांमधून त्यांनी जनतेच्या सेवेला नवी दिशा दिली आहे. त्यामुळेच “जनसेवा हीच ईश्वरसेवा” ही त्यांची जीवनव्रती भूमिका जनतेच्या मनाला स्पर्श करत राहते.जनतेच्या सुखदुःखात नेहमी धावून जाणारे, संकटात मदतीचा हात देणारे संवेदनशील नेते म्हणजे आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत, हे पुन्हा एकदा यानिमित्ताने सिद्ध झाले.

  • Maha Vikas Aghadi protests Jan Suraksha Bill । जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची महाविकास आघाडीची मागणी, घुग्गुसमध्ये निषेध आंदोलन

    Maha Vikas Aghadi protests Jan Suraksha Bill

    Maha Vikas Aghadi protests Jan Suraksha Bill : घुग्घूस १० सप्टेंबर २०२५ : शहरातील गांधी चौकात महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल नरुले, शहर अध्यक्ष राजुरेड्डी, शिवसेना(उबाठा ) शहर प्रमुख बंटी घोरपडे, ज्येष्ठ नेते गणेश शेंडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहर अध्यक्ष शरद कुमार ज्येष्ठ नेते सत्यनारायण डकरे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत सरकार विरोधातील बॅनर फलक घेऊन महायुती सरकार भाजपा सरकार मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध आंदोलन करण्यात आले.

    चंद्रपुरात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

    महाराष्ट्रातील महायुती शासनाने विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 हे विधानसभा व विधानपरिषदेत पारित केले असून राज्यपालांच्या स्वाक्षरी नंतर हा कायदा महाराष्ट्रात लागू केल्या जाणार आहे.
    महायुती शासन या कायद्याची स्पष्टपणे खुलासा करीत नाही हा कायदा शहरी नक्सलवादाला आळा घालण्यासाठी केल्या जात असल्याचे सांगितले जात आहे हा कायदा लागू झाल्यास सरकार विरोधी मत मांडणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनावर अनिर्बंध कारवाईचे अधिकार सरकारला मिळतील. Maharashtra black law Jan Suraksha Bill reaction

    उपोषण, बेकायदेशीर ठरविण्यात येतील

    बेकायदेशीर संघटना व त्यांचे कृत्य याबद्दल शासनाने स्पष्टता केली नसून मोघम व्याख्या केलेली आहे.
    केवळ एक अधिसूचना काढून कोणत्याही संघटनेला बेकायदेशीर ठरविण्याचा अधिकार सरकारला मिळेल
    संघटना बेकायदेशीर केल्यास त्यांची सर्व स्थावर जंगम मालमत्ता जप्ती करण्यात येईल त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना इतकेच नव्हे तर त्यांच्या सभेला जाणाऱ्या व्यक्तींना सात वर्षा पर्यंत तुरुंगात डांबण्याचा अधिकार मिळेल
    जमावबंदी मोडल्यास शांततेत चाललेलं मोर्चा, उपोषण, बेकायदेशीर ठरविण्यात येतील कामगार संघटना सरकारी कर्मचारी यांचा संप बेकायदेशीर ठरविल्यास ते सुद्धा कारवाईस पात्र ठरतील.

    महाविकास आघाडीचे निषेध आंदोलन

    सामाजिक चळवळी, जनआंदोलन आणि विरोधीपक्षांना दडपण्यासाठी या कायदाचा वापर केला जाणार सामाजिक कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा हत्यार म्हणून कायद्याचा वापर होईल राज्यातील संसाधने जमीन,जंगल, बंदर, रस्ते, आदी उद्योगपतीना देतांना होणारा जनविरोध दाबण्यात कायदाचा वापर होईल म्हणून अश्या या काळ्या कायद्याचा आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले, घुग्घूस महाविकास आघाडीच्या वतीने गांधी चौक येथे दुपारी 12 वाजता हातात फलक व बॅनर घेऊन शासना विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले. Maha Vikas Aghadi demands repeal public security law

    याप्रसंगी शिवसेनेचे चेतन बोबडे, अमित बोरकर, लक्ष्मण बोबडे, हेमराज बावणे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते काँग्रेस नेते सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, ज्येष्ठ नेते मुन्ना लोहानी, जिल्हा महासचिव अलीम शेख, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, ज्येष्ठ नेते जगन्नाथ आस्वाले, किशोर आवळे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, शेख शमिउद्दीन,एस्सी सेल तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा, Maha Vikas Aghadi protests Jan Suraksha Bill

    तालुका उपाध्यक्ष सिनू गुडला,शेखर तंगडपल्ली एस्सी सेल जिल्हा उपाध्यक्ष कल्याण सोदारी,महिला जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के, संध्या मंडल, पूनम कांबळे, प्रीती तामगाडगे, भाविका आटे, जोया शेख,एन. एस. यु. आय अध्यक्ष आकाश चिलका, सुनील पाटील, अरविंद चहांदे,कुमार रुद्रारप, कपील गोगला, देव भंडारी, दिपक पेंदोर, शहंशाह शेख, संजय कोवे, दिपक कांबळे, अनवर सिद्दीकी, जय मेश्राम,अंकुश सपाटे, व मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

  • Male Leopard found dead । चंद्रपूरात नर बिबट्याचा रहस्यमय मृत्यू

    Male Leopard found dead

    Male Leopard found dead : चंद्रपूर : 9 सप्टेंबर 2025 – सावली वनपरिक्षेत्रांतर्गत मूल तालुक्यातील टेकाडी येथे सुनील गेडाम यांच्या पोल्ट्री फार्मलगच्या शेतात एक नर बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागामध्ये खळबळ उडाली आहे. स्थानिक वनरक्षकाच्या माहितीवरून त्याला जेरबंद करण्याची सर्व तयारी करण्यात आली असताना शोध मोहिमेदरम्यान तो मृतावस्थेत आढळून आला.

    घराबाहेर भांडे घासत असताना महिलेवर वाघाचा हल्ला

    सावली वनपरिक्षेत्रांतर्गत मूल तालुक्यातील टेकाडी येथे सुनील गेडाम यांच्या पोल्ट्री फार्मलगच्या शेतातील झुडपात एक बिबट दडून असल्याची माहिती स्थानिक वनरक्षकाला मिळाली त्यांनी लगेच वरिष्ठांना माहिती दिली. त्यावरून विभागीय वनाधिकारी तलमले, सहाय्यक उपवनसंरक्षक तरसे आणि सावली वनपरिक्षेत्राधिकारी धुर्वे यांचे नेतृत्वात बिबट्याला रेस्क्यू करून जेरबंद करण्याचे नियोजन करण्यात आले. Mul taluka leopard death

    बिबट्याची शोधाशोध आणि…

    याकरीता चंद्रपूर टी.टी.सी.चे डॉक्टर, अतिशीघ्र कृती दलाचे कर्मचारी, वनकर्मचारी आणि संजीवन पर्यावरण संस्था मूल चे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला बेशुद्ध करून सुरक्षितपणे पकडण्याचे नियोजन पूर्ण झाले. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शोध मोहीम राबविण्यास सुरूवात झाली. वनविभागाच्या पथकाकडून बिबट्याची शोधाशोध सुरू असताना बिबट मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे वनाधिकाऱ्यांना धक्काच बसला. लगेच वरिष्ठांना माहिती देण्यात आली. त्यानंतर मृत बिबट्याला ताब्यात घेऊन सावली वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले. त्या ठिकाणी डॉ. कुंदन पोडचलवार यांनी सहाय्यक उपवनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या समक्ष बिबट्याचे शवविच्छेदन केले आणि त्या ठिकाणीच दहन करण्यात आले.

    शवविच्छेदन वेळी डॉ. कुंदन पोडचलवार, क्षेत्र सहाय्यक एन.एस. सिडाम, वनरक्षक एस.डब्लू. बोनलवार, लंकेश आखाडे, अतिशीघ्र कृती दलाचे शूटर अविनाश फुलझेले, कीशोर डांगे, मनोज चावरे, अंकीत पडगेलवार, संजीवन पर्यावरण संस्था मूल चे उमेशसिंह झिरे, तरुण उपाध्ये, तन्मयसिंह झिरे, हौशिक मंगर, अक्षय दुम्मावार, टेकाडी पी.आर.टी. टीम व सहाय्यक वनमजूर उपस्थित होते. Chandrapur wildlife incident

    याच परिसरात चार दिवसांपूर्वी ३०० कोंबड्यांना ठार करणारी मादी बिबट जेरबंद करण्यात आली होती. सध्या मृत अवस्थेत सापडलेला बिबट नर जातीचा आहे. नर आणि मादी बिबट दोघेही या परिसरात एकत्र वावरत असावेत असा वनविभागाचा कयास आहे. टेकाडी परिसर सादागडच्या घनदाट जंगलाच्या जवळ असल्याने येथे वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्यामुळे याच परिसरात नर मादी बिबट राहत असावेत असे अशी प्रतिक्रिया वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. वन विभाग परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून, परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचे आणि वन्यप्राण्यांची कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वन विभागाला कळविण्याचे आवाहन केले आहे.

  • man-eater tigress captured । पाथरीत धुमाकूळ घालणारी नरभक्षी वाघीण अखेर जेरबंद!

    man-eater tigress captured

    man-eater tigress captured : सावली ७ सप्टेंबर २०२५- वनपरिक्षेत्रातील पाथरी उपक्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या आणि माणसांवर हल्ले करणाऱ्या एका नरभक्षी वाघिणीला अखेर वन विभागाने जेरबंद केले आहे. त्यामुळे पाथरी आणि आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

    गणेश विसर्जन करताना युवक बुडाला

    गेल्या काही दिवसांपासून या वाघिणीने परिसरात दहशत माजवली होती. पाथरी ते विरखल रस्त्यावरील आसोला मेंढा कालव्याच्या जवळ शेतात काम करणाऱ्या ६५ वर्षीय पांडुरंग चचाने या शेतकऱ्याचा तिने बळी घेतला होता. या घटनेमुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता आणि संभाव्य मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी या वाघिणीला पकडण्याकरिता वन विभागावर दबाव वाढत होता. man-eating tigress tranquilised

    वनविभागावर दबाव

    या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाने तातडीने पाऊले उचलली. गेल्या दोन दिवसांपासून या वाघिणीवर पाळत ठेवली जात होती. अखेर, शार्पशूटर आणि बचाव पथकाला (रेस्क्यू टीम) पाचारण करण्यात आले. रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास या पथकाने वाघिणीला यशस्वीरित्या बेशुद्ध करून (ट्रँक्विलाइज करून) पकडले.

    या कामगिरीबद्दल सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे आणि त्यांच्या संपूर्ण बचाव पथकाचे अभिनंदन केले जात आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे परिसरातील शेतकरी आणि स्थानिकांच्या जीविताला असलेला धोका टळला आहे.

  • Sharad Ganveer joins MNS Chandrapur । भव्य पक्षप्रवेश!, काँग्रेसला धक्का, मनसेला बळ

    Sharad Ganveer joins MNS Chandrapur

    Sharad Ganveer joins MNS Chandrapur : चंद्रपूर/मूल:- चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठया प्रमाणात अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश होत आहे, त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात मनसेला चांगली संधी आहे, अशातच कांग्रेस भाजपचे वर्चस्व असणाऱ्या मूल तालुक्यातील टेकाडी या मोठ्या गावात मनसेने एंट्री केली असून तेथील कांग्रेस कमेटीचे मूल तालुका उपाध्यक्ष व लढाऊ नेतृत्व असणारे शरद गणवीर यांनी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह दिनांक 1 सप्टेंबर ला मनसे पक्षात प्रवेश केला. MNS entry in Tekadi village

    गावठाण जमिनीची बेकायदेशीर रजिस्ट्री, सरपंच व सचिवावर कारवाई करा

    शरद गणवीर यांच्या मनसेत पक्ष प्रवेशाने मूल तालुक्यात मनसेची ताकत वाढली असून टेकाडी गावासह जवळपास 25 गावात मनसेच्या शाखा तयार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे, दरम्यान शरद गणवीर यांची मनसे जनहीत कक्ष विभागाच्या बल्लारपूर विधनासभा अध्यक्ष पदी नियुक्ती सुद्धा करण्यात आली, यावेळी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, उपजिल्हा अध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे, बल्लारपूर तालुका सचिव राजू लांडगे, महाराष्ट्र सैनिक प्रतीक इत्यादीची उपस्थिती होती. political shift from Congress to MNS

    political shift from congress to mns

    टेकाडी गावात समस्यांचा डोंगर

    मूल तालुक्यातील टेकाडी या गावात समस्याचा डोंगर असून पिण्याचे शुद्ध पाणी मिळतं नाही, रस्ते नाल्या चा प्रश्न गंभीर बनला आहे, घरकुल धारकांना पैसे मिळाले नाही पण याकडे आमदार, खासदार लक्ष देत नसल्याने आता जनतेसाठी लढणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या आक्रमक पक्षात जाऊन गावाच्या समस्या सोडविण्यासाठी कांग्रेस चे तालुका अध्यक्ष शरद गणवीर यांनी आपल्या समर्थकासह मनसे पक्षात प्रवेश केला, दरम्यान शरद गणवीर यांची बल्लारपूर विधानासभा क्षेत्राचे मनसे जनहित कक्ष विभागाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली.

    त्यामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मनसेची ताकत वाढताना दिसतं आहे. यावेळी टेकाडी गावाचे प्रमुख कार्यकर्ते कुंदन मोहुर्ले, आशिष शेंडे, आवेश रामटेके, विनोद गोहणे, किसन गुरनुले, अशफाक शेख, सचिन मेश्राम, अतुल बोलीवार, होमेंद्र बोलिवार, रुपेश कोल्हे, सुमित कांबडी, नर्गिस सय्यद, उत्कर्षां पोटवार, समीक्षा जक्कुलवार, भाग्यश्री जक्कुलवार, गायत्री जक्कुलवार, नंदिनी मोहुर्ले, रुपाली जक्कुलवार, श्रावणी जक्कुलवार इत्यादीची उपस्थिती होती.

  • Gavthan jamin registry । सचिव व सरपंचांवर कारवाईची मागणी – गावठाण जमीन गैरव्यवहार

    Gavthan jamin registry

    Gavthan jamin registry : चंद्रपूर – साखरवाही ग्रामपंचायत अंतर्गत मालमत्ता क्रमांक ५०६ ही गावठाण जागा आहे. परंतु ही जागा ग्रामपंचायत सरपंच आणि सचिवांनी संगनमताने सदस्यांना विश्वासात न घेता आणि बेकायदेशीरपणे व्यवहार करून संबंधित व्यक्तिच्या नावावर रजिस्ट्री केली आहे. त्यामुळे साखरवाही ग्रामपंचायत सदस्य विनोद खापने यांनी पत्रकार परिषदेत ही रजिस्ट्री रद्द करण्याची आणि यासाठी जबाबदार असलेल्या ग्रामपंचायत सचिव आणि सरपंचावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, २९८ ग्राम ब्राऊनशुगर जप्त

    पत्रकार परिषदेत सांगितले की, साखरवाही ग्रामपंचायतमध्ये झालेल्या ग्रामसभेत गावातील गावठाणच्या मोकळ्या जागेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. खटोड यांची ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात शेती आहे. त्यांच्या शेतीचा भाग गावठाण क्षेत्रात समाविष्ट आहे. गावातील गावठाण जागा शेतीसाठी किंवा इतर कोणत्याही व्यावहारिक कारणासाठी वापरता येत नाही. किंवा ती कोणालाही विकता किंवा बक्षिस म्हणून देता येत नाही. ती जमीन गावातील गरीब नागरिकांसाठी किंवा घरकुल योजनेसाठी वापरता येते. illegal common land registration Panchayat case

    प्रस्ताव चर्चेसाठी आला नाही

    ग्रामपंचायतीला याचा अधिकार आहे या सर्व गोष्टी सचिवांनी ग्रामसभेत सांगितल्या असे असूनही, मालमत्ता क्रमांक ५०६ धारक खटोड यांनी फेरफार करून चंद्रपूर येथील रहिवासी चांडक यांच्या नावावर गावठाण ची जागा रजिस्ट्री करून ती विकली. सभेतील काही सदस्यांना अंधारात ठेवून ते मंजूर ही करण्यात आले. ही बाब उघडकीस आल्यानंतर सर्व सदस्यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीत याबद्दल आक्षेप घेत अर्ज सादर केला. सभेत हा प्रस्ताव चर्चेसाठी आला नाही, उपसरपंच आणि तीन सदस्यांनी प्रस्तावावर स्वाक्षरी न करता ही प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

    प्रस्ताव बनावटी

    ग्रामपंचायतमधील एकूण ९ सदस्यांपैकी फक्त ५ जणांनी स्वाक्षरी केली आहे, त्यामुळे खापणे यांनी पत्रकार परिषदेत हा प्रस्ताव बनावटी असल्याचा आरोप केला. सदस्यांना त्याबद्दल कोणतीही माहिती न देता प्रस्तावावर सदस्यांचे नाव आणि स्वाक्षरी दाखविणे हा कायदेशीर गुन्हा आहे. खापने यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला आहे की हे प्रकरण सरपंच आणि तत्कालीन सचिव यांच्या संगनमताने झाले आहे आणि बैठकीत पारदर्शकता न दाखवता बनावट कागदपत्रे तयार करून गावातील मालमत्तेचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. Panchayat illegal registry of village land case

    या संदर्भात, ग्रामपंचायत सदस्य विनोद खापने यांनी ग्रामपंचायत बैठक क्रमांक ६ मध्ये घेतलेल्या ठराव क्रमांक ७, ७/१ आणि ८ ची सखोल चौकशी करावी, मालमत्ता क्रमांक ५०६ ची बेकायदेशीर नोंदणी त्वरित रद्द करावी आणि यासाठी जबाबदार सचिव आणि सरपंचांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पत्रपरीषदेत केली आहे.


  • Sudhir Mungantiwar healthcare response । 🚑 मुल उपजिल्हा रुग्णालयात गैरसोयीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांची जलद कारवाई

    Sudhir Mungantiwar healthcare response

    Sudhir Mungantiwar healthcare response : चंद्रपूर ६ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यतत्परतेचे आणखी एक उदाहरण नागरिकांनी बघितले. सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सगळे व्यस्त आहेत. स्वतः आमदार श्री. मुनगंटीवार देखील विविध मंडळांना भेटी देऊन श्रीगणेशाचे दर्शन घेत आहेत. पण या आनंदात आणि उत्सवाच्या वातावरणातही त्यांनी रुग्णांच्या गैरसोयीची तातडीने दखल घेतली. मुल उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयीच्या तक्रारी प्राप्त होताच वैद्यकीय अधिकाऱ्यांना सगळी कामे सोडून पहिले प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर शल्य चिकित्सकांनी रुग्णालयात पोहोचून पाहणी केली व वैद्यकीय अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले.

    चंद्रपूर भाजप बल्लारपूर मंडळाची कार्यकारणी घोषित

    आमदार श्री. मुनगंटीवार यांनी जनसेवा हिच ईश्वरसेवा मानली आहे. त्यामुळे कुठल्याही कामांच्या, कार्यक्रमांच्या आधी जनहिताच्या कामांना ते प्राधान्य देत असतात. अशाच पद्धतीने त्यांच्याकडे मुल उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या या तक्रारींची दखल घेत त्यांनी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शल्य चिकित्सकांना पत्र लिहून कार्यवाहीचे निर्देश दिले. Mul Sub District Hospital complaint

    रुग्णांची गैरसोय, कारवाई करा

    मुल उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनी विविध तक्रारी आ. श्री. मुनगंटीवार यांच्याकडे दिल्या होत्या. जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्र लिहून आ. श्री. मुनगंटीवार यांनी लक्ष घालण्यास सांगितले. ‘मुल उपजिल्हा रुग्णालयामध्ये विविध आजारांवरील उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी माझ्या जनसंपर्क कार्यालयात प्राप्त झालेल्या आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची/कर्मचार्‍यांची अनुपस्थिती, रुग्णांशी असभ्य वर्तन, योग्य प्रकारे विचारपूस न करणे, औषधोपचाराचा तुटवडा तसेच नियमित आणि कंत्राटी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने रुग्णांना होणारी गैरसोय या सर्व बाबींवर योग्य कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. Rural hospital complaints

    यासंदर्भात स्वतः उपजिल्हा रूग्णालय मुल येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व वरील तक्रारींची पुनरावृत्ती होणार नाही याची गांभीर्याने दखल घ्यावी, असेही आ. श्री. मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले. त्यानंतर शल्य चिकित्सकांनी पाहणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णांची गैरसोय टाळण्याचे निर्देश दिले. यावेळी मुल येथील भाजपचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.भाजप शहराध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे, माजी सभापती मिलींद खोब्रागडे, प्रशांत बोबोटे, सुनील कुकुटकर, संतोष गाजुलवार, राकेश ठाकरे, सूर्यकांत सहारे आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

  • Ballarpur BJP mandal committee appointments । बल्लारपूर भाजपा मंडलात नवे चेहरे – संघटनेला नवी ऊर्जा

    Ballarpur BJP mandal committee appointments

    Ballarpur BJP mandal committee appointments : बल्लारपूर – महाराष्ट्राचे लोकनेते मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील नवनियुक्त भाजपा मंडल अध्यक्षांनी आपापल्या मंडलातील तालुका महामंत्री व आघाडीच्या अध्यक्षांची घोषणा केली आहे.  

    गणेश मंडळासाठी महावितरण ने दिल्या महत्वाच्या सूचना

    बल्लारपूर शहर मंडल बल्लारपुर मंडलाचे अध्यक्ष ॲड. रणजंय सिंह यांनी संघटन महामंत्री म्हणून श्री मनीष पांडे व महामंत्रीपदी सतीश कनकम, देवेंद्र वाटकर, घनश्याम बुरडकर यांची तर युवा मोर्चा अध्यक्षपदी श्री. मिथलेश खेंगर व महीला आघाडी अध्यक्षा सौ वैशाली जोशी यांची घोषणा केली. Ballarpur rural mandal

    बल्लारपूर ग्रामीण

    बल्लारपूर ग्रामीणचे चंद्रकांत देऊळकर यांनी महामंत्रीपदी श्री सुनील फरकडे, श्रावण सातपुते, गणेश टोंगे, रुमदेव देरकर तसेच युवा मोर्चा अध्यक्षपदी श्री. संदीप पोडे, महीला आघाडी अध्यक्षपदी सौ. वैशाली बुद्धलवार यांची घोषणा केली आहे.

    पोंभूर्णा मंडल

    पोंभूर्णा मंडलांचे अध्यक्ष श्री हरिश ढवस यांनी महामंत्रीपदी श्री. विनोद देशमुख, सौ.ज्योती बुरांडे, गुरुदास पिपरे तसेच युवा मोर्चा अध्यक्षपदी श्री अजय मस्के, महीला आघाडी अध्यक्षपदी सौ. वैशाली बोलमवार यांची घोषणा केली आहे.

    मूल ग्रामीण मंडल

    मुल ग्रामीण चे अध्यक्ष श्री. चंदुभाऊ मारगोनवार यानी महामंत्री पदी श्री.संजय येनुरकर,श्री.बंडु  नर्मलवार डॉ.श्री.गुरुदास भेंडारे तसेच युवा मोर्चा अध्यक्ष पदी श्रीधर पाकमोडे , महिला आघाड़ी अध्यक्ष पदी सौ.अर्चना बल्लावार यांची घोषणा केली आहे.

    चंद्रपुर तालुका

    चंद्रपुर तालुका अध्यक्ष श्री.श्रीनिवास जनगम यांनी महामंत्री पदी श्री.शांताराम चौखे,श्री.संजय यादव,श्री.अमोल जगताप,तसेच युवा मोर्चा अध्यक्ष पदी श्री.नागेश कडूकर महिला आघाड़ी अध्यक्ष पदी श्रीमती,अनिता भोयर यांची घोषणा केली आहे. Chandrapur taluka mandal secretary appointments BJP

    मूल शहर

     मूल शहर अध्यक्ष श्री.प्रवीण मोहुर्ले यांनी महामंत्री पदी श्री.प्रशांत बोबाटे,श्री.दादाजी येरणे,श्री.जितेंद्र टिंगसुले तसेच युवा मोर्चा अध्यक्ष पड़ी श्री पंकज लाडवे महिला आघाडी अध्यक्ष पदी श्रीमती,मनिषा गांडलेवार यांची घोषणा केली आहे.

    या घोषणेनंतर भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.हरीश शर्मा यांनी महाराष्ट्राचे लोकनेते मा.आ.सुधीरभाऊंच्या निर्देशनात येत्या दोन दिवसात संपूर्ण मंडल कार्यकारिणी व उर्वरित आघाडी व प्रकोष्ठ चे अध्यक्ष /महामंत्रींची घोषणा करावी असे निर्देश दिले आहे.

    नवनियुक्त महामंत्री व आघाडी  अध्यक्षांचे अभिनंदन व आगामी संगठनात्मक कार्यांसाठी शुभेच्छा महाराष्ट्राचे लोकनेते व माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यानी दिल्या.वरिल नवनियुक्तीचे स्वागत व अभिनंदन केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा.हंसराजभैया अहीर,जिल्हाध्यक्ष श्री.हरीश शर्मा, जेष्ठनेते श्री.चंदनसिंह चंदेल,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा सौ.संध्याताई गुरुनुले,प्रदेश सचिव  सौ.विद्याताई देवाडकर,प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ.रेणुकाताई दुधे,महिला आघाडी  प्रदेश महामंत्री कु.अल्काताई आत्राम, जिल्हा महामंत्री डॉ.मंगेश गुलवाड़े, श्री.विवेक बोढे,श्री.रामपाल सिंह,माजी नगराध्यक्षा सौ.रत्नमालाताई भोयर,पोंभुर्णा नगर पंचायत अध्यक्षा सौ.सुलभाताई पिपरे,उपाध्यक्ष श्री.अजीत मंगळगिरीवार,श्री. प्रभाकरराव भोयर,श्री.किशोर पंदिलवार,श्री.काशीनाथ सिंह,श्री.हनुमान काकडे,श्री.नंदु रणदिवे,श्री.राहुल संतोषवार,श्री.राजु बुद्धलवार आदी पदाधिकार्‍यांनी केले आहे.

  • tiger kills farmer near canal । वाघाचा धुमाकूळ! नहरालगत काम करणाऱ्या शेतकऱ्याचा बळी

    tiger kills farmer near canal

    tiger kills farmer near canal : सावली ४ सप्टेंबर २०२५ : वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पाथरी उपवन क्षेत्रातील असोला मेंढा नहराला लागून असलेल्या शेतात निंदण करीत असलेल्या शेतकऱ्याला वाघाने उचलून नेऊन ठार केल्याची घटना गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. सदर घटनेमुळे प्रचंड खळबळ माजलेली आहे.

    मध्यवर्ती बँक अध्यक्ष रविंद्र शिंदेंवर मारहाणीचा अदखलपात्र गुन्हा दाखल

    पाथरी येथील पांडुरंग भिकाजी चचाने हे शेतकरी आपल्या विरखल रोड लगत असलेल्या असोला मेंढा नहराला लागून असलेल्या शेतात सकाळी निंदनचे काम करीत असतानाच तिथे वाघाने सदर शेतकऱ्याला उचलून नेऊन ठार केल्याची खळबळ जनक घटना घडलेली आहे. सदर घटनेची माहिती वन परिक्षेत्र विभागाला व पोलीस विभागाला देण्यात आलेली आहे.

    याच परिसरात वाघीनेने पिलांना दिला जन्म

    सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे व त्यांची चमूने घटनास्थळ गाठून पंचनामा केला,
    याच परिसरात वाघीनेने पिलांना जन्म दिल्याची माहिती मिळत असून विरखल परिसरात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ऐन शेतीच्या हंगामात वाघाचा धुमाकूळ सुरू झाल्याने शेतकरी भयभीत झाल्याने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

  • Ravindra Shinde assault complaint after election । भद्रावतीत BJP विजयानंतर Ravindra Shinde वर मारहाणीची तक्रार

    Ravindra Shinde assault complaint after election

    Ravindra Shinde assault complaint after election : भद्रावती ४ सप्टेंबर २०२५ – शिवसेना उबाठा मधून भाजपवासी झालेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष यांनी भद्रावती मधून कांग्रेस व उबाठा ला हद्दपार करीत आहे, अश्यातच भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपची सत्ता शिंदे यांच्या नेतृत्वात ३ सप्टेंबर रोजी आली. कांग्रेसमधून भाजपात आलेले राजेंद्र डोंगे बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान झाले. मात्र हि निवड प्रक्रिया संपताच उबाठा समर्थक ज्ञानेश्वर डुकरे यांनी रविंद्र शिंदे विरुद्ध मारहाणीचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

    भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा झेंडा

    ३ सप्टेंबर रोजी बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली यावेळी भाजपकडून राजेंद्र डोंगे तर त्यांच्याविरुद्ध ज्ञानेश्वर डुकरे यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला, डुकरे यांचा तब्बल १३ मतांनी पराभव झाला. निवड प्रक्रिया झाल्यावर भास्कर ताजने सोबत ज्ञानेश्वर डुकरे चर्चा करीत असताना सीडीसीसी बँक अध्यक्ष रविंद्र शिंदे त्याठिकाणी आले आणि डुकरे यांना शिवीगाळ करीत तू आमच्या विरोधात अर्ज का दाखल केला असे म्हणत गालावर झापड मारली अशी तक्रार भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये डुकरे यांनी शिंदे विरोधात दाखल केली. APMC election Bhadrawati BJP

    आरोप फेटाळले

    यावर रविंद्र शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि माझ्यावर केलेला मारहाणीचा आरोप खोटा आहे, असा प्रकार त्याठिकाणी घडलेला नाही. लोकशाही मध्ये कुणीही अर्ज दाखल करू शकतो त्यावर आक्षेप घेण्यासारखं काय?

    शिवसेना मधून शिवसेना वेगळी झाल्यावर रविंद्र शिंदे यांनी शिवसेना उबाठा ला वरोरा विधानसभा क्षेत्रात नवसंजीवनी देण्याचे काम केले, विशेष बाब म्हणजे आपल्या नेतृत्वात त्यांनी बाजार समिती निवडणूकित विरोधकांची धोबीपछाड करीत एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र कालांतराने राजकीय समीकरणे बदलली आणि शिंदे भाजपात गेले व थेट मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. अश्यात त्यांच्यावर मारहाणीसारखे आरोप हे राजकीय आकसापोटी होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.