Category: ग्रामीण वार्ता

ग्रामीण वार्ता (Gramin Varta) विभागात वाचा news34.in वर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बातम्या आणि घडामोडी. शेतकरी योजना, ग्रामपंचायत राजकारण, स्थानिक विकास प्रकल्प, कृषी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स येथे उपलब्ध आहेत. चंद्रपूर ग्रामीण भागातील समस्या, यशोगाथा आणि सकारात्मक बदलांना आम्ही प्राधान्य देतो. ग्रामीण भागातील विश्वासार्ह माहितीसाठी नियमित भेट द्या.

  • या घटनेने चंद्रपूर जिल्हा हादरला

    News34 crime

    चंद्रपूर/ वरोरा – राज्यात मागील काही वर्षात हजारो मुली बेपत्ता असल्याची बाब काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती, बेपत्ता मुलीचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे, अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली बेपत्ता व्यक्तीचा शोध घेत असताना देह व्यापार व सामूहिक बलात्कार प्रकरण उघडकीस आले या प्रकरणात पोलिसांनी तब्बल 11 आरोपीना अटक केली यामधील 1 आरोपी आधीच बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात आहे.

    शुक्रवारी सायंकाळी वरोरा पोलिसांना एक अल्पवयीन मुलगी संशयास्पद वर्तन करताना आढळली, पोलिसांनी तिची विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले असता मी कस्टमर कडे जात आहे अशी माहिती त्या मुलीने पोलिसांना दिली.
    वरोरा शहरात देहव्यापार सुरू असल्याची माहिती पटल्यावर पोलिसांनी या प्रकरणात 2 एजंट ला ताब्यात घेतले यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.

    पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि तिच्यासोबत देहव्यापार करणाऱ्या २२ वर्षीय महिलेला तसेच एका पुरुष एजंटला ताब्यात घेतले. या दोघांनी काही ग्राहकांची नावे दिली. पोलिसांनी 9 जणांना अटक केली असून त्यापैकी एक बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात आहे.

    याबाबत अधिक माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांनी सांगितले की, सर्व आरोपी आणि ग्राहकांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. त्यांच्यावर बलात्कार, बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि Pita या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे, असेही नोपानी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, पोलिसांनी अल्पवयीन मुलीला बालसुधारगृहात पाठवले असून आरोपी महिला, एजंट आणि ग्राहकांची चौकशी करण्यासाठी आठ पोलिस अधिकाऱ्यांची विशेष तपास समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे.

     

    पोलिसांनी ज्या आरोपीना ताब्यात घेतले आहे हे सर्व त्या एजंट च्या ओळखीचे ग्राहक होते, मुलगी अल्पवयीन असल्याने 9 आरोपीवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील आरोपी हे वरोरा तालुक्यातील असल्याची माहिती आहे.

    सध्या आरोपींची चौकशी सुरू आहे, विशेष म्हणजे यामध्ये पुन्हा 5 ते 10 आरोपींची संख्या वाढणार अशी माहिती नोपाणी यांनी दिली आहे.