Category: ग्रामीण वार्ता

ग्रामीण वार्ता (Gramin Varta) विभागात वाचा news34.in वर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बातम्या आणि घडामोडी. शेतकरी योजना, ग्रामपंचायत राजकारण, स्थानिक विकास प्रकल्प, कृषी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स येथे उपलब्ध आहेत. चंद्रपूर ग्रामीण भागातील समस्या, यशोगाथा आणि सकारात्मक बदलांना आम्ही प्राधान्य देतो. ग्रामीण भागातील विश्वासार्ह माहितीसाठी नियमित भेट द्या.

  • Ballarpur Maharashtra : महिलांसाठी विविध योजना महायुती सरकारच्या काळात – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    Ballarpur Maharashtra : महिलांसाठी विविध योजना महायुती सरकारच्या काळात – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    Ballarpur Maharashtra आज कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवीत आहेत. महाराष्ट्र सरकारने मुलींना मोफत शिक्षण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सन्मान योजना या माध्यमातून महिलांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. आज महिलांना व त्यांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी आपली आर्थिक प्रगती साधावी.

    Ballarpur Maharashtra या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून महिलांचा सन्मान व त्यांच्या सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

    महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना

    नांदगाव पोडे (ता. बल्लारपूर) येथे आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सरपंच (नांदगाव पोडे) सुनिता वैद्य, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर देऊळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. गोरगरिबांना मदत करणे व बहिणींना सहकार्य करणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असे सांगून ना. मुनगंटीवार म्हणाले, ‘महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्यात चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे, याचा मला अभिमान आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतंर्गत जिल्ह्यातील 2 लक्ष 75 हजाराच्या वर महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. मात्र, अजूनही 20 हजार महिलांचे आधार लिंक (केवायसी) नसल्यामुळे लाभ मिळू शकला नाही. कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही. प्रत्येक पात्र महिलेला योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. Ballarpur Maharashtra

    युवकांपासून तर ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक वयोगटासाठी शासन विविध योजना राबवित आहे. मात्र, माहितीअभावी या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. तीर्थक्षेत्र दर्शनाचे जेष्ठांचे स्वप्न साकार करण्यासाठी जळगाव व कोल्हापूर येथून तीर्थदर्शनासाठी ट्रेन रवाना करण्यात आल्या. येत्या काही दिवसात चंद्रपुरातून सुद्धा ट्रेन रवाना करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक ज्येष्ठांनी तीर्थदर्शन योजनेचे फॉर्म भरून घेण्याचे आवाहन पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांनी केले. नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी प्रत्येक गावांमध्ये महाआरोग्य शिबिरे घेण्यात येत आहे. प्रत्येक गावांमध्ये विकास कामे केली असून विकासकामांतून जिल्हा पुढे नेला असल्याचेही ते म्हणाले.

    महिलांच्या सुरक्षेसाठी निर्णय
    कोरपना येथे अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची दखल घेऊन जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एका महिला पोलीसची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मुलींची छेडछाड व इतर तक्रारींबाबत पोलीस विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जेणेकरुन, बदलापूर व कोरपनासारख्या घटना थांबविता येतील, असे ना. मुनगंटीवार म्हणाले. Ballarpur Maharashtra

    मुलींचे शिक्षण, एसटीचा प्रवास !
    आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 100 टक्के शुल्क सवलत देण्यात येत असून शिक्षणाचा सर्व खर्च शासन करणार आहे. महिलांना एसटीतून प्रवासात 50 टक्के सवलत तर 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासात 100 टक्के सवलत देण्यात येत आहे. स्व. सुषमा स्वराज यांच्या नावाने बल्लारपुरात कौशल्य विकास केंद्र कार्यान्वित होत असून मुलींना व बचत गटातील महिलांना हे केंद्र फायदेशीर ठरणारे आहे. मुलींच्या शिक्षणाला गरिबी आडवी येते. त्यांना योग्य शिक्षणासह कौशल्य प्रशिक्षण मिळावे तसेच शिक्षणाच्या बाबतीत महिला मागे राहू नये हि अडचण दूर करण्यासाठी सर्व जातीच्या मुलींना आकाशाला गवसणी घालण्याची संधी एस.एन.डि.टी विद्यापीठाच्या माध्यमातून चालून आली आहे. तसेच बचत गटांमार्फत उत्पादित वस्तू विक्रीसाठी चंद्रपूर येथे बाजारहाटची निर्मिती तसेच फूड कोर्ट उभारण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. (Sudhir mungantiwar)

    शासनाचे महत्वाचे पाऊल
  • tadoba tiger : मूल तालुक्यात वाघांची दहशत कायम

    tadoba tiger : मूल तालुक्यात वाघांची दहशत कायम

    tadoba tiger बोरचांदली शिवारात वाघाची दहशत आजही कायम, वाघाचा बंदोबस्त केला नाही तर पुन्हा आंदोलन – संतोषसिंह रावत

    tadoba tiger (गुरू गुरनुले) मुल – तालुक्यातील बोरचांदली येथील शेतकरी शैलेश प्रभाकर कटकमवार वय वर्ष (४२) हा ३० सप्टेम्बर २०२४ रोजी म्हैसी उमा नदी काठावर सावली वनपरिक्षेत्रात चारत असताना जवळच त्याला वाघ दिसला. त्या वाघाला घाबरून शैलेशने म्हैसीची शेपटी पकडून पाण्यात उडी मारली. व त्याचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना दुसऱ्याच दिवशी परत मृतक शैलेश कटकमवार यांचे गुरे त्याच क्षेत्रात चरत असताना गोऱ्यावर वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना घडली.

    अवश्य वाचा : ख्रिस्ती बांधवांचा कफन पेटी मोर्चा

    दोनच दिवसात मालकही गेला आणि त्याचा गोराही गेला.अजूनही त्याच परिसरात वाघ असल्याचे गावकऱ्यांनी पाहिले आहे.त्याच बोरचांदली परिसरात राजू पाटील येनुगवार यांचे शेती फार्म आहे. त्याच परिसरात तोच वाघ दहशत पसरवीत आहे. त्यामुळे शेतकरी बांधव व गावकरी वाघाच्या दहशतीने भीत आहेत. वाघाच्या भीतीमुळे काही शेतकरी बांधव शेतात पीक उभे असताना सुद्धा शेतीकडे जाणे बंद केले आहे. (Tiger)

    हाच तो भीती दाखवणारा वाघ उमा नदीच्या फुलाच्या उजव्या बाजूला अंतरगाव पारडंवाही क्षेत्र आहे. त्याही परिक्षेत्रात हाच वाघ सारखा फिरत असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितल्याने वाघाची दहशत कायम आहे. करीता वाघ (tiger) हा कोणत्याही परिक्षेत्रात फीरो, पण त्याचा बंदोबस्त करणे व शेतकऱ्यांना व नागरिकांना आणि शेतकऱ्यांच्या गुरेढोरांना संरक्षण देणे ही सर्वस्वी जबाबदारी मात्र वनविभागाची असल्याने अशी दहशत माजविणाऱ्या वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा.अन्यथा शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुन्हा मला रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल. असा इशारा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी दिला आहे.

  • Christian society : ख्रिस्ती समाजबांधवांचा कफन पेटी मोर्चा

    Christian society : ख्रिस्ती समाजबांधवांचा कफन पेटी मोर्चा

    Christian society (गुरू गुरनुले)मुल – गेल्या ४० वर्षापासून ख्रिस्ती समाजाच्या दफनविधीसाठी जागा दिली नाही.करीता मागणीचे निवेदन आम्ही सेट स्टिफन चर्च मुल तर्फे अनेक पत्र दिले परंतु पत्राला केराची टोपली दाखवली, असता ख्रिस्ती समाज त्यांना त्यांची जागा दाखवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही.असा इशारा सुद्धा मोर्चाच्या निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिला.

    महत्वाचे : 200 युनिटचे काय झालं? स्वतः आमदार जोरगेवार यांनी सांगितलं सत्य

    Christian society दफनविधीसाठी जागा मिळण्यासाठी वेळोवेळी सूचना तसेच पत्र व्यवहार करून सुद्धा प्रशासना‌द्वारे न्याय मिळाला नसल्याने आज दिनांक ७/१०/२९२४ रोजी चर्च ते गांधी चौक मार्ग तहसील कार्यालयाच्या ख्रिस्ती बांधवांचा आकर्षक कफन पेटी मोर्चा काढण्यात आला असून संपूर्ण मोर्चा द्वारे खिस्ती समाज मूल तालुका तर्फे कफन पेटी मोर्चा काढून प्रशासनास जागे करण्यासाठी स्मरण करून देत जागेची मागणी केली आहे, आणि सूचना करण्यात आली की येणाऱ्या दिवसात समाजात कोणचेही मृत्यू झाल्यास त्याला दफन कुठे करायचे आहे याचे उत्तर द्यावे, अन्यथा तहसील कार्यालयावर मृतदेह आणण्यात येईल. व त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील.असा गंभीर इशारा दिला आहे.

    सेंट स्टीफन चर्च मूल, व समस्त ख्रिस्ती समाज बांधवांचा कफन पेटी मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये करण्यात आले. याप्रसंगी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी कांग्रेस नेते, सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष,माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत, यांनी प्रशासनाने आपल्याला रस्त्यावर यायला भाग पाडले.असे मत व्यक्त केले. व आपला जाहीर पाठिंबा दिला. Christian society

    उलगुलान संघटनेचे राजू झोडे यांनी जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांवर टीका करीत जो जमीन सरकारी है, ओ जमीन हमारी है.असे समजून अतिक्रमण करण्याचा सल्ला दिला. तर मोर्चाचे नेतृत्व करणारे डॉ.मार्टिन अझीम यांनी गेल्या ४० वर्षांपासूनचा आमचा संघर्ष आहे. तरी देखील शासन व प्रशासन जागे झाले नाही. पण ते आम्हीं आता सहन करणार नाही असे मार्गदर्शन केले. Christian society

    याप्रसंगी माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदाणी, सभापती राकेश रत्नावार, तालुकाध्यक्ष गुरु गुरनुले, एथोनी परीछा, डॉ.मार्टिन अझीम, आश्र्विंन पालीकर, हरिदास मेश्राम, यांनीही सत्ताधाऱ्यांवर सडाडून टीका केली. मंचावर डेव्हिड वाळके, अशोक टी टीगुसले, वसंत खोब्रागडे, दिलीप वराते,राजेश मोजेश, संतोष इटकलवार यांचेसह शेकडो ख्रिस्ती बांधव व महिला उपस्थित होते.

  • Railway Engine : चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वे इंजिनचा अपघात

    Railway Engine : चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वे इंजिनचा अपघात

    railway engine गुरू गुरनुले रेल्वेच्या दोन इंजिंनमधे धडक चार कर्मचारी जिल्हा रुग्णालयात भरती

    Railway engine मुल – रेल्वे रुळाची देखभाल करणाऱ्या दोन एम.पी. टी.रेल्वे इंजिन एकमेकांना आदळल्याने रेल्वेचे काम करणारे कर्मचारी जखमी झाल्याची घटना मुल रेल्वे स्टेशन जवळच मुल चिंचोली मार्गावर ५ /१०/२०२४ रोजी शनिवारी सकाळी ५.३० वाजता घडली.

    अवश्य वाचा : गडचांदुरात स्कुल बस पलटली

    चंद्रपूर जिल्ह्यातील मुल रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळाचे काम करण्यासाठी एक एमपीटी इंजिन आधीच उभी होती. याच दरम्यान मुल रेल्वे स्टेशंनकडे येणाऱ्या दुसऱ्या एमपीटी इंजिनला जबर धडक दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील द.पू. रेल्वे मार्गावरील मुल रेल्वे स्टेशनवर रेल्वे रुळाचे काम रेल्वे कर्मचारी करीत असताना उभ्या असलेल्या दुसऱ्या इंजिनला धडक दिली.

    यामधील काम करणारे चार कर्मचारी दिवाकर जे.ई.ट्रक मशीन वय (३५) ,संजित कुमार टेक्निशियन वय (३५), पुरुषोत्तम प्रसाद टेक्निशियन वय (३५), ओमप्रकाश साहू टेक्निशियन वय (५०), हे कर्मचारी जखमी झाले. इंजिनची धडक दिल्याने जोरदार आवाज आला. व जवळच असलेले नागरिक भयभीत झाले.

    या जबर धडकेने एका इंजिनच्या समोरचा भाग पूर्ण क्षतिग्रस्त झाला. असता कर्मचारी जखमी झाल्याने तात्काळ जखमींना मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. पुढील तपास रेल्वे विभाग करीत असल्याचे समजले.

  • school bus accident : ब्रेक निकामी, शालेय बस पलटली

    school bus accident : ब्रेक निकामी, शालेय बस पलटली

    school bus accident ब्रेक निकामी झाल्याने आज सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास शालेय बसचा अपघात झाला, या अपघातात तब्बल 40 विद्यार्थी होते, 7 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.


    School bus accident सदर घटना कोरपना तालुक्यातील राजुरा-गडचांदूर मार्गावरील हरदोना या गावाजवळ घडली, सदर बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि स्कुल बस रस्त्याखाली उतरत पलटली.

    अवश्य वाचा : त्या शिक्षिकेला बडतर्फ करा


    घटना घडली त्यावेळी बसमध्ये 40 विद्यार्थी होते, या अपघातात 7 विद्यार्थी जखमी झाले अशी माहिती मिळाली असून जखमी विद्यार्थी यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
    यावेळी जखमी विद्यार्थी यांची विचारपूस करण्यासाठी आमदार सुभाष धोटे ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले.

  • School teacher student : त्या शिक्षिकेला बडतर्फ करा

    School teacher student : त्या शिक्षिकेला बडतर्फ करा

    School teacher student सावली तालुका कुणबी समाज बहुउदेशीय संस्था, व्याहाड खुर्द च्या वतीने CEO यांना निवेदन

    School teacher student सावली – सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विषय शिक्षिका म्हणून कार्यरत उज्वला पाटील या शिक्षिकेने सातव्या वर्गातील 17 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याने उपचारकरिता दवाखान्यात भरती करण्याची पाळी आली होती. त्यांची पोलीस तक्रार करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सावली तालुका कुणबी समाज बहुउदेशीय संस्था व्याहाड खुर्द च्या वतीने विवेक जॉन्सन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर मार्फत शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांना त्या नराधम शिक्षिकेला बडतर्फ करण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले.

     सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे. दिनांक 29 सप्टेंबर रोज शनिवार ला सकाळी शाळा सुरु झाल्यानंतर शिक्षिका उज्वला पाटील हिने सातव्या वर्गातील 17 विद्यार्थी विद्यार्थिनींना वर्गात  बोलावून बेदम मारहाण केली. यात धनश्री हरिदास दहेलकर, लावण्या कुमदेव चुधरी ह्या मुली गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालय सावली येथे भरती करण्यात आले तेव्हा त्यांना प्राथमिक उपचार करून गडचिरोली येथील सामान्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले. Chandrapur zilla parishad

    याबाबतची तक्रार सावली पोलीस स्टेशनला केली. सदर शिक्षिकेवर पोलीस विभाग यांनी कारवाई केली असून त्यांना निलंबित केला आहे. परंतु पाटील मॅडम कडून ह्या गंभीर चुका वारंवार होतांना दिसून येत आहेत. तसेच शाळेत इतर समाजाचे विध्यार्थी असतांना सुद्धा फक्त कुनबी समाजातील शाळेतील हुशार विधार्थिनी यांना गंभीर असे गालावर, छातीत आणि पोटावर खुद्याने मारहाण करून यांना जखमी केले आहेत. School teacher student

    महत्त्वाचे : कोरपना अत्याचार प्रकरणी खासदार धानोरकर गप्प का? चित्रा वाघ यांचा प्रश्न


    यावरून असे निदर्शनास येते की, शाळेत सर्व जाती धर्माचे विध्यार्थी असून सुद्धा फक्त कुणबी समाजातील शाळेतील हुशार विध्यार्थी यांना जाणीव पूर्वक मारहाण केली आहे. त्यामुळे सदर शिक्षकेला बडतर्फ करण्यात यावे यासाठी आज सावली तालुका कुणबी समाज बहुउदेशीय संस्था व्याहाड खुर्द यांचे तर्फे निवेदन देण्यात आले. Chandrapur zilla parishad


    निवेदन देतांना कुणबी समाज संघटना सवालीचे अध्यक्ष अर्जुन भोयर, कोश्याध्यक्ष दिपक जवादे, सदस्य दौलतराव भोपये, सदस्य किशोर वाकूडकर, आजीवान सभासद अविनाश पाल, नरेश बाबनवाडे, सुरज किनेकार व इतर कुणबी समाज बांधव उपस्थित होते.

    धानोरकर ताई आतातरी व्यक्त व्हा …..चित्रा वाघ
  • santosh rawat : आपल्या हक्कासाठी संघर्ष करा – संतोष रावत

    santosh rawat : आपल्या हक्कासाठी संघर्ष करा – संतोष रावत

    santosh rawat आपल्या हक्कासाठी संघर्ष करुन लढा दिल्याशिवाय न्याय मिळणार नाही.अन्यथा पुढच्या पिढीला गुलाम बनवतील संतोषसिंह रावत, आंदोलनाला हजारच्या वर शेतकऱ्यांची उपस्थिती


    Santosh rawat (गुरू गुरनुले) मूल – मागील २०२३-२४ वर्षातील शेतक-यांच्या खरीप व रब्बी पिकांची फार मोठे नुकसान झाले आहे. व १४ हजार शेतक-यांनी पी.एम. पिक विमा योजनेचा विमा काढलेला होता.परंतु नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाले. त्याचवेळेस काँग्रेसने सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात पीक विमा मिळावा म्हणून शासनाकडे मागणी केली असता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी व शासनाने ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत विम्याचे पैसे मिळतील असे जाहीर आश्वासन दिले होते. ते आश्वासन साक्षात खोटे ठरले. शेवटी ४ ऑक्टोबर २०२४ चा शासनाचा निषेध व धरणे आंदोलन करण्यात आले.

    अवश्य वाचा : चंद्रपूर आयटीआय च्या नावात झाला हा बदल

    यात हजारच्या वर संख्येने शेतकरी उपस्थित झाले.त्यांचे समक्ष आपल्या हक्कासाठी संघर्ष करुन लढा दिल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही.अन्यथा पुढच्या पिढीला सत्ताधारी गुलाम बनवतील असा खणखणीत इशारा संतोष सिंह रावत यांनी शेतकऱ्यांना देत घरकुल, स्टॅम्प पेपर महागाई, गॅस सिलेंडर,आईच्या दुधावर GST, विद्युत बिल वाढ, सिमेंट वाढ कशी केली? याबाबतही मार्गदर्शन करताना दिला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांनीही लोकसभेला सुधीर मुनगंटीवार यांना जेवढ्या मतांनी पाडले त्याही पेक्षा जास्त मतांनी विधानसभेला पाडावे.असे मत व्यक्त केले. santosh rawat

    महत्त्वाचे : कोरपना अत्याचार भाजपने केला निषेध

    कृषी बाजार समिती सभापती राकेश रत्नावार सरकारच्या धोरणांचा तीव्र शब्दात निषेध केला.मंचावर जिल्हा काँग्रेसचे महासचिव घनश्याम येनुरकर,राजू पाटील मारकवार, अखिल गांगरेड्डीवार, प्राचार्य बंडू गुरनुले, सरपंच प्रीती भांडेकर, एड.हिमानी वाकुडकर, लीना फुलझेले,फर्जणा शेख,मुरली पाटील बेंबाळ,व अनेक शेतकरी यांनी शासनावर,व पालक मंत्र्यांवर टीका करीत तीव्र भावना व्यक्त केल्या.

    पीक विम्या संदर्भात न्यायालयीन दाद मागणीसाठी पुढील कार्यवाही बाबत ज्येष्ठ विधीज्ञ एड अजित लाभे साहेब यांनीही मनोगत व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी मुल यांचे मार्फतिने देण्यात आले. प्रास्ताविक कांग्रेस तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी शेतकऱ्यांवर आलेली आपत्तीचे उदाहरण देत समजाऊन सांगितले. santosh rawat

    मंचावर बल्लारपूर तालुका अध्यक्ष, व भास्कर माकोडे, पोंभुरना अध्यक्ष वासुदेव पाल,ओमेश्र्वर पदमगिर्वार,अशोक गेडाम, बुरांडे, कृषी बाजार समिती संचालक संदीप कारमवार, किशोर घडसे,सुमित आरेकर, सूनील गुज्जनवार,लहू कडस्कर, योगेश शेरकी, चंदा कामडी, सभापती पुरुषोत्तम भुरसे, सीमा भासरकर, प्रशांत उराडे,युवक अध्यक्ष पवन निल्मवार,ओबीसी सेल गुरुदास चौधरी,रूमदेव गोहने, शांताराम कांमडे, व्यंकटेश पुलकवार, सुरेश फुलझेले, अतुल गोवर्धन,संदीप मोहबे, महिला अध्यक्ष रुपाली संतोषवार,नलिनी आडपवार, शामला बेलसरे,समता बांसोड,अनेक ग्रा.पां.सरपंच, उपसरपंच, सोसायटी अध्यक्ष,सदस्य, कांग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, असंख्य महिला,युवक मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार शहर अध्यक्ष सुनील शेरकी यांनी मानले.

  • Mns kamgar sena : मनसे पक्षप्रवेश व शाखा उदघाटन

    Mns kamgar sena : मनसे पक्षप्रवेश व शाखा उदघाटन

    mns kamgar sena अमन अंधेवार कामगार सेना जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा गावातील युवकांचा मनसे पक्ष प्रवेश व शाखा उदघाटन

    mns kamgar sena मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा विचाराशी प्रेरित होऊन तरुणांचा आजच्या महाराष्ट्रातील गलिच्छ राजकारणाला कंटाळून व फोडाफोडीच राजकारण बघून अनेक युवकांनी मनसे कामगार सेना पक्षात प्रवेश केला.

    अवश्य वाचा – रेल्वे अधिकार जन आंदोलनाची घोषणा

    सदर पक्ष प्रवेश मंदीप रोडे मनसे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांना रोजगार व कामगारांचा हक्कासाठी लढणारे अमनभाऊ अंधेवार कामगार सेना जिल्हाध्यक्ष यांचा नेतृत्वाखाली भव्य तरुणांचा पक्ष प्रवेश व शाखा उदघाटन सोहळा पार पडला.

    यावेळी प्रमुख्याने उपस्थित. ऍड अजितभैया पांडे, साईकिरण दोतपल्ली, निराज दुबे, कुलदीप पवार, शोहेल खान, अजवींद्र दुबे, नितीन कुमार तसेच पक्ष प्रवेश कार्यक्रमात उपस्थित होते.

    यावेळी नंदकिशोर हनवटे, शाखाअध्यक्ष, महेश केदार, प्रभागअध्यक्ष, स्वप्नील सोनावणे, शाखा उपाध्यक्ष, निलेश ढोक, प्रभाग उपाध्यक्ष यांची कार्यकारणी गठीत करण्यात आली.
    यावेळी मनसे कार्यकर्ते निखिल हनवटे,नेताजी हनवटे, प्रणय हनवटे, ऋषी गिरुले, मंगेश रंदये, गणेश रंदये, हेमराज श्रीरामे, सुधीर दोहतरे, क्रीशना गटलेवार, भूपेश निमजे, मारोती चौधरी, सुनंदा हनवटे, कोकिला रंदये, लक्ष्मी सावसाकळे, इंदिरा सावसाकळे, सुशीला हनवटे, सईबाई रंदये, मायाबाई हनवटे व नागरिकांची उपस्थिती होती.

  • Shocking incident : वाघापासून वाचण्यासाठी त्याने पकडली म्हशींची शेपूट आणि घडलं धक्कादायक

    Shocking incident : वाघापासून वाचण्यासाठी त्याने पकडली म्हशींची शेपूट आणि घडलं धक्कादायक

    Shocking incident म्हैशी राखणाऱ्या शेतकऱ्याचा वाघाच्या भीतीने अखेर मृत्यू. बोरचांदली गावकऱ्यांनीच अखेर दुसऱ्या दिवशी शोधून काढला मृतदेह

    Shocking incident (गुरू गुरनुले) मुल – मुल तालुक्यातील मौजा बोरचांदली येथील शेतकरी तथा स्वतःचा दुधाचा व्यवसाय करणारा शेतकरी शैलेश प्रभाकर कटकमवार वय (४२) हा आपल्या म्हैसी घेऊन उमा नदीच्या काठावर चरायला घेऊन गेला असता अचानक त्याला वाघ दिसला व वाघाला घाबरुन जाऊन नदीत पाणी पीत असणाऱ्या म्हैसची शेपटी पकडुन पाण्यात गेला, परंतु तो परतच् बाहेर आला नाही. आणी त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी ९-०० वाजता गावकऱ्यांच्या प्रयत्नाने मिळाला.

    अवश्य वाचा : कांग्रेस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आजपासून

    तालुक्यातील बोरचांदली येथील शेतकरी शैलेश प्रभाकर कटकमवार वय वर्ष (४२) दिनांक ३० सप्टेम्बर २०२४ रोजी त्याच्या दैंनदिनी नुसार आपल्या म्हैसी घेऊन उमा नदीच्या मोठ्या पुलाच्या काही अंतरावर म्हैसी चारत असताना जवळच त्याला वाघ दिसला.त्यामुळे वाघाला घाबरून शैलेशने म्हैसीची शेपटी पकडून पाण्यात उडी मारली. त्यामुळे वाघाच्या हल्यातून कसातरी वाचला.परंतु मृत्यूची आलेली वेळ ही अटळ असते, ही म्हण अखेर दुसऱ्या दिवशी खरी ठरली. Shocking incident

    वाघाच्या भीतीने पाण्यात शेपटी धरुन बुडालेला शैलेश गावकऱ्यांना शोधूनही दिसला नाही. करीता मुल पोलिसांना याबाबतची तक्रार दिली. असता महसूल व पोलिस प्रशासन जागे झाले व डोंगा बोलाऊन दिवसभर व रात्रीही शोध घेतला परंतु प्रशासकीय यंत्रणेकडून अत्यावश्यक साधने वेळेवर उपलब्ध न झाल्याने त्या दिवशी शैलेशचा शोध घेता आला नाही. म्हणून प्रशासनाबाबत गावकरी नाराजी व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी १/१०/२०२४ रोजी सकाळी बोरचांदली गावकऱ्यांनी कांग्रेस नेते सी.डी सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांना फोन करुन शैलेश मिळाला नाही अशी माहिती दिली असता गावकऱ्यांची तळमळ व हाक ऐकून तात्काळ महसूल व पोलिस प्रशासनास आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने जागे केले.

    तहसीलदार मोरे मॅडम, पोलिस निरीक्षक सुमित परतेकी यांना आपण गंभीर दखल घ्यावी व शैलेशचा शोध लावा. अन्यथा गावकरी भडकतील. तात्काळ कांग्रेस कार्यकर्त्यांना घटनास्थळी पाठविले. यामधे राजू पाटील मारकवार, घनश्याम येणुरकर, गुरु गुरनुले, धनराज रामटेके,राजेंद्र वाढई हे घटनास्थळी जाऊन तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना ग्रामस्थांसमोर फोन करून तात्काळ घटनास्थळी यायला सांगितले. Shocking incident

    तेव्हा शोध कार्य सुरूच होते. आणि गावकऱ्यांच्या पुढाकाराने ढिवर बांधवांच्या मदतीने जाळं टाकून पुन्हा शोध कार्य सुरु केले असता शैलेशचा मृत्यदेह हाती लागला. मृत्यूदेह बाहेर काढत असताना शेकडो गावकरी उपस्थित होते. नदीपात्रातच घटना स्थळाचा पंचनामा केला.

    त्यावेळी माजी सरपंच संजय कुंठावार, राजू पाटील मारकवार, महेश कटकमवार, अमित येंनगंटीवार,प्रभाकर कटकमव्वार, पोलिस पाटील मडावी, श्रीकांत पोरेड्डीवार, अनिल कुंठावार, राकेश येनुगवार, नितेश येणुग्वार, शैलेशचे कुटुंबीय व शेकडो गावकरी उपस्थित होते. मृत्युदेह शविच्छेदनसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून विच्छेदन झाल्यानंतर दुपारी १ वाजता मृतदेह गावकऱ्यांच्या स्वाधीन केले. पुढील तपास मुल पोलिस करीत आहे.

  • Tehsildar suspended : कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर यांचं निलंबन

    Tehsildar suspended : कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर यांचं निलंबन

    Tehsildar suspended अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित, कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले

    Tehsildar suspended कोरपना : कढोली खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह दोन सदस्य अपात्र झाल्यानंतर त्यांच्या अपिलाची 15 दिवसांची मुदत असताना त्यापूर्वी सरपंच निवड सभा घेऊन नवीन सरपंच निवड करण्यात आली होती. त्यामुळे उपसरपंच डॉ. विनायक डोहे यांनी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना पत्र देऊन कोरपना तहसीलदार यांनी घेतलेली सरपंच निवड सभा रद्द करावी तसेच तहसीलदार यांना त्वरित निलंबित करावे अशी मागणी केली होती. या तक्रारीची राज्य शासनाने दखल घेत कोरपना तहसीलदार व्हटकर यांना 27 सप्टेंबर रोजी निलंबित केले आहे.

    अवश्य वाचा : खासदार प्रतिभा धानोरकर यांची संसदीय समितीवर नियुक्ती


    डॉ. विनायक विठ्ठलराव डोहे, उपसरपंच कढोली खुर्द यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, ग्रामपंचायत कढोली खुर्द ता. कोरपना जि. चंद्रपूरच्या सरपंच सौ. निर्मला कवडू मरस्कोल्हे आणि सदस्य सौ. सीताबाई पंधरे यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशानुसार 12 ऑगस्ट 2024 रोजी अपात्र ठरविण्यात आले होते. (Tehsildar suspended)

    या आदेशाविरुद्ध विभागीय आयुक्त, नागपूर यांच्याकडे दाद मागण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार 26 ऑगस्ट रोजी नागपूर येथे सुनावणीचे पत्र तहसीलदार यांच्यासह संबंधित सर्वाना देण्यात आले होते. तरीही तहसीलदार यांनी 19 ऑगस्टला दिलेल्या आदेशानुसार सरपंच निवडीकरिता 26 ऑगस्ट 2024 रोजी सभा घेतली व काँग्रेस समर्थित उमाजी आत्राम यांची सरपंचपदी निवड केली. (Chandrapur news)

    अपिलाची मुदत 15 दिवस म्हणजे 27 ऑगस्ट पर्यंत असताना ती संपायच्या आत ही सभा घेण्यात आली आहे. तहसीलदार कोरपना यांनी पैसे खाऊन, एकतर्फी आदेश काढून घाईने सभा घेतल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच सदर सरपंच निवड रद्द करावी. अशी तक्रार करण्यात आली होती.


    या तक्रारीची दखल घेत तहसीलदार कोरपना यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान कढोली खुर्द येथे माजी सरपंच व उपसरपंच यांनी भाजपा प्रवेश केल्याने आता प्रथमच सत्ता भाजपाकडे येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    961 लाभार्थ्यांना मिळणार हक्काचं घर