Category: ग्रामीण वार्ता

ग्रामीण वार्ता (Gramin Varta) विभागात वाचा news34.in वर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बातम्या आणि घडामोडी. शेतकरी योजना, ग्रामपंचायत राजकारण, स्थानिक विकास प्रकल्प, कृषी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स येथे उपलब्ध आहेत. चंद्रपूर ग्रामीण भागातील समस्या, यशोगाथा आणि सकारात्मक बदलांना आम्ही प्राधान्य देतो. ग्रामीण भागातील विश्वासार्ह माहितीसाठी नियमित भेट द्या.

  • Chandrapur Forest Department : वनविभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, भूमिपुत्र ब्रिगेडचे ठिय्या आंदोलन

    Chandrapur Forest Department : वनविभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, भूमिपुत्र ब्रिगेडचे ठिय्या आंदोलन

    वनमंत्र्याच्या जिल्ह्यातच जात आहेत दिवसाआड मनुष्यबळी

    Chandrapur Forest Department 19 सप्टेंबर 2024 रोजी चिंचोली मुल येथे वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. देवाजी बाबुराव राऊत वय वर्ष 62 या इसमाची बकरी चराई करताना वाघाच्या हल्ल्यात मृत्यू मुखी पडल्याची दुःखद घटना घडली आहे. या महिन्यातील टाडाळा जाणारा मरेगाव येथील वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याच्या बातम्या ताज्या असतानाच ही घटना घडली.

    मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा


    Chandrapur Forest Department गत कित्येक वर्षांमध्ये विशेष करून मागच्या सहा महिन्यांमध्ये वाघ व बिबट च्या हल्ल्यामध्ये गुराखी व शेतकरी यांच्या मृत्यूमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. घरचा कमवता व्यक्ती गमवल्या मुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.


    काँग्रेस नेत्या तथा भूमिपुत्र ब्रिगेडच्या मार्गदर्शिका डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांनी वाघाच्या बंदोबस्ता करिता अनेक वेळा निवेदन देऊन व मागण्या करून वनविभागाचे लक्ष या गंभीर बाबी कडे वेधले आहे परंतू मानवी जिवा पेक्षा डुक्कर, बिबट, वाघ महत्वाचा असलेल्या वनविभागाने या मागण्या कडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे परिसरातील जनता वाघाचा बळी ठरत असल्याचे दिसून येत आहे. (Chandrapur Forest Department)


    विशेष करून गाय, बकरी, म्हैस यांच्या चराई करिता चरण कुरणे उपलब्ध करून देण्यासाठी वन विभागाला अनेक वेळा निवेदन देण्यात आले आहे परंतु सद्यास्थीती पर्यंत वनविभागाने चराई कूरणा करिता ठोस उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे वाघाच्या हल्ल्यात सामान्य नागरिकाचे जीव जात असल्याचे दिसुन येत आहे. यामुळे वन्यप्राण्याच्या बंदोबस्ता मध्ये वनविभाग व प्रशासन सपेशल अपयशी ठरले आहे.


    जिल्ह्यामध्ये वनविभागाचे प्रमुख पद असलेले मुख्य वनसंरक्षण चंद्रपुर हे पद गेल्या कितेक महिन्या पासून रिक्त असून ताडोबाचे मुख्य वनसंरक्षक यांच्या कडे वनप्रशासनाने या पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. त्यामुळे त्याच्यावर कामाचा अतिरिक्त ताण आला आहे. त्यात ताडोबा महोत्सव, वनमहोत्सव, कास्ट रवानगी महोत्सव आदी कार्यक्रमा मध्ये ते व्यस्त झाले आहे. तर हे सर्व कार्यक्रम करून घेण्यात वनविभागाचे प्रधान सचिव पासून ते वनविभागाचे सर्व छोटे मोठे अधिकारी कामाला लागले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सामान्य नागरिक, शेतकरी व गुराखी यांच्या मुख्य प्रश्नाला बगल दिल्या जात आहे. (Chandrapur Forest Department)

    अवश्य वाचा : महिलांनी केला निर्धार, संदीप गिर्हे आमचा निर्धार

    त्यामुळे सामान्य माणूस वाघाचा बळी ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यात वनविभाग शामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजने अंतर्गत सौर झटका मशीन वाटप सारखे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर जाहिरात व प्रसिद्धी करून राजकीय पक्षाच्या प्रचार सारखे करून वाघाच्या हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्या इसमाच्या परिवाराच्या दुखाःवर मिठ चोळण्याचा प्रकार करत असल्याची चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणावर आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री हे वनमंत्री असून देखील याविषयी ब्र काढायला तयार नाही.
    सामान्य शेतकरी व गुराखी यांच्या जीविताची किंमत काही हजार आणि लाख ठरवली आहे आणि वनविभाग एक ठराविक रक्कम देऊन आपल्या मूळ जबाबदारी पार पाडण्यात अपयशी झाले आहेत.


    सरकार आणि वनविभागाच्या या असंवेदनशील वागणुकीचा भूमिपुत्र ब्रिगेडने जाहीर निषेध केला असून वन महोत्सव यांच्या प्रचार, प्रसिध्दी व जाहिरातीमध्ये अखंड बुडालेल्या वनविभाग व सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पाळीव जनावराच्या चराईच्या प्रश्नावर निष्काळजी करणाऱ्या या घटलेला जबाबदार असलेल्या वनविभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची व मुख्यवनसंरक्षक चंद्रपुर हे पद तात्काळ भरण्याची मागणी केली आहे. (Chandrapur Forest Department)


    चराई क्षेत्र निर्माण करणे, दोषी वनाधीकारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणे, वाघाचा बंदोबस्त करणे याकरिता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहीती यावेळी काँग्रेस नेत्या आणि भूमिपुत्र ब्रिग्रेडच्या मार्गदर्शिका डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांनी सांगितले
    आणि म्हणून वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मेंढपाळांचा आणि शेतकऱ्यांचा बळी वाघाने घेतल्या नसून वनविभागाने घेतलेला आहे आणि म्हणून वनविभागावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार आज पोलीस स्टेशन मुल येथे काँग्रेस नेत्या आणि भूमिपुत्र ब्रिगेड मार्गदर्शिका डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी केली आहे.


    यावेळी मुल तालुक्याचे काँग्रेस सेवा दलाचे माजी अध्यक्ष
    अध्यक्ष जेष्ठ नागरिक नामदेवरावजी गावतुरे, समता परिषदेच्या कार्याध्यक्ष शशिकलाताई गावतुरे, छायाताई सोनुले, सीमाताई लोणबुले, विक्रम गुरनुले, नितेश म्याकलवार, राकेश मोहूर्ले, संतोष चिताळे, कालिदास गायकवाड, दिवाकर चौधरी, दामोदर किनाके, सुखदेव मगरे, वामन सोनवणे, संतोष गायकवाड, समीर उमरकर, विश्वनाथ चचाटे, कोंडू घरत, भोजराज कोवे, रामदास सीडाम, संजय नागपुरे, दिलीप चौधरी, भाऊजी नेवारे, बंडू बावनवाडे, दीपक राऊत, सचिन मुंडवार, जोगेश्वर ठाकरे, मारुती मगरे, करण ठाकरे यांच्यासह शेकडो चिंचोलीवासी उपस्थित होते.

  • Tiger attack news : वाघाने केली गुराख्याची शिकार

    Tiger attack news : वाघाने केली गुराख्याची शिकार

    tiger attack news गुरू गुरनुले मूल : तालुक्यातील काटवन जंगलातील कक्ष क्र. ७५६ मध्ये शेळ्या चारण्या करीता गेलेल्या चिचोली येथील देवाजी वारलु राऊत (५०) ह्याचेवर हल्ला करून नरभक्षी वाघाने त्याचा बळी घेतल्याची घटना आज संध्याकाळी ४.३० वा. चे दरम्यान घडली. घटनेची माहीती होताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतक देवाजी राऊत यांचे पार्थीव लागलीच उपजिल्हा रूग्णालय मूल येथे शवविच्छेदना करीता पाठविण्यात आले.

    अवश्य वाचा : ब्रह्मपुरी विधानसभेत भाजपची दावेदारी

    Tiger attack news घटनास्थळी वनपरीक्षेञ अधिकारी राहुल कारेकर, क्षेञ अधिकारी गजानन वरगंटीवार, वनरक्षक परचाके, बुरांडे यांनी भेट देवुन पाहणी करत नरभक्षी पट्टेदार वाघ आहे किंवा बिबट याचा शोध घेण्यासाठी कँमेरे लावण्यात आल्याचे वनपरीक्षेञ अधिकारी कारेकर यांनी सांगीतले. मृतक देवाजी यांच्या कुटूंबाला २० हजार रूपयाची तातडीची मदत देण्यात आली. (Tiger attack news)

    मृतकाचे पश्चात पत्नी आणि मूल आहेत. मृतकाचे शव विच्छेदन करुन कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. काटवन परीसरात यापुर्वीही वाघाने हल्ला करून तीन ते चार जणांचा जीव घेतला आहे. त्यामूळे परीसरात दहशत पसरली असून नुकतेच चंद्रपूर येथील वनसंरक्षक वनवृत्त चंद्रपूर यांचेकडे वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावे अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा कांग्रेस नेते,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांचे नेतृत्वात निवेदन दिले.त्याच वेळेस वनसंरक्षक डॉ.रामगावकर व विभागीय वनआधिकारी खाडे यांनी यावर आम्ही नक्कीच उपाययोजना करु असे आश्वासन दिले होते. दहा दिवसात पुन्हा घटना घडली असल्याने अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांचे काय.असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. उपजिल्हा रुग्णालयात मृतकाच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी गर्दी केली होती.

  • Ganpati visarjan : प्रशासनाचे दुर्लक्ष, गणेश विसर्जन सोहळा शांततेत

    Ganpati visarjan : प्रशासनाचे दुर्लक्ष, गणेश विसर्जन सोहळा शांततेत

    Ganpati visarjan (गुरू गुरनुले) मूल – गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या म्हणत शहरातील गणपती विसर्जन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शांततेत पार पडले. परंतू प्रशासनाच्या दुर्लक्षामूळे गांधी चौकात निर्माण झालेल्या तीन मंडपामूळे वाहतुकी सोबतचं ध्वनी प्रदुषणाचा नाहक त्रास गणेश भक्तांना नागरीकांना सहन करावा लागला.

    महत्वाचे – ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून भाजपतर्फे पाल यांची दावेदारी


    Ganpati visarjan बुधवारी रात्री शहरातील ३२ सार्वजनिक गणेश मंडळाने गणेश विसर्जनाच्या शोभायात्रा काढून बस स्थानक लगतच्या तलावात श्री गणेशाला निरोप दिला व पुढल्या वर्षी लवकर या अशी आराधना केली. गणेश विसर्जनाचे निमित्याने स्थानिक पोलीस प्रशासनाने शांतता समितीच्या सभेत साार्वजनिक गणेश मंडळांना शांतता व सुव्यवस्था राखण्यासोबतचं शासनाने दिलेल्या ध्वनी आणि प्रकाश प्रदुषणाचे नियम पाळण्याचे निर्देश दिले. परंतु एकाही गणेश मंडळाने शांतता समितीच्या सभेत दिलेल्या निर्देशाचे पालन केल्याचे दिसून आले नाही. प्रमाणाच्या बाहेर डि.जे. वाजत होते तर लेझर लाईटच्या वापरावर बंदी असतांना लेझर लाईटच्या प्रखर प्रकाशात युवा पिढी नाचत होती.

    शोभायात्रे दरम्यान स्थानिक गांधी चौक आणि शोभायात्रेच्या मुख्य मार्गावर गणेश भक्तांची, नागरीकांची प्रचंड गर्दी असतानाही सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी कुठलाही अनुचित प्रकार न करता किंवा अपघाताची भिती न बाळगता पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांसमोर बिनधास्त फटाक्यांची आतिषबाजी करतांना दिसले. गणेश विसर्जनाचे दिवशी दरवर्षी स्थानिक गांधी चौकात प्रशासनाच्या वतीने नियंत्रण ठेवणे अधिका-यांना सोईचे व्हावे म्हणून मंडप उभारण्यांत येत होते. मंडप उभारण्याची परवानगी द्यावी यासाठी न.प.प्रशासनाला पत्रही दिले होते. मात्र प्रशासनाने मंडप न उभारण्याचा निर्णय घेतल्याने भाजप राजकिय पक्षाने परवानगी न घेताच मंडप उभारले. त्यामुळे आपणही का, मागे राहायचे म्हणून त्याचं मंडपाला लागूनच लगेच महाविकास आघाडी तर्फे कांग्रेस व शिवसेना (ऊबाठा) यांनी देखील मंडप उभारले. विधानसभेची निवडणुकीची चाहूल लागल्याची संधी साधून प्रचाराचाही श्री. गणेशा केल्याचे दिसून आले. (Ganapti visarjan)

    विसर्जनाकरीता येणा-या नागरीकांसमोर शक्ती प्रदर्शन करीण्याकरीता भाजपा, काॅंग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने गांधी चौकात वेगवेगळे तीन मंडप उभारले होते. भाजपाच्या मंडपात जिल्हयाचे पालकमंत्री तथा क्षेत्राचे आ. सुधीर मुनगंटीवार समर्थकांसह उपस्थित होते.व लक्की. ड्र्lचे बक्षीस वितरण केले. तर महाविकास आघाडी व संतोष सिंह रावत मित्र परिवार तर्फे उभारलेल्या मंडपात सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, घनश्याम मुलचंदानी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह मंचावर होते.सोबत शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गि-हे ( उबाठा )हे सुद्धा होते.व रावत मित्र परीवरांतर्फे आयोजित सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला.आणि घरगुती गणपती स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षेस दिले. तर लागूनच शिवसेना गटाच्या मंडपातून शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गि-हे आपआपल्या समर्थकांसह उपस्थित् राहून गणेश भक्तांना शुभेच्छा देत होते. (Ganpati visarjan)

    Ganpati visarjan उभारण्यांत आलेल्या राजकिय पक्षांच्या तीनही मंडपामध्यें कर्कश आणि मोठया आवाजात भोंगे व साऊंड वाजविल्या जात असल्याने गांधी चौकात ध्वनी प्रदुषणाची गंभीर समस्या निर्माण झाली होती. हया सर्व घटना कायदयाचे उल्लंघन करून घडत असतांना प्रशासनाला मात्र नाईलाजाने बघ्याची भुमीका घेतल्याने त्यांचे नशीब चांगले की, काहीही गालबोट लागले नाही हे विशेष, याविषयी नागरिकात आश्चर्य व्यक्त करण्यांत येत आहे. गणपतीचे दर्शन घेण्याकरिता तालुक्यातील व नगरातील हजारोच्या संख्येने गणेश भक्तांची रीघ होती.

  • Problem solving meetings : आश्रमशाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत समस्‍या निवारण सभा

    Problem solving meetings : आश्रमशाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत समस्‍या निवारण सभा

    Problem solving meetings चंद्रपूर : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा उपक्रम “समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा” अंतर्गत सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर व चिमूरअंतर्गत आश्रमशाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत समस्‍या निवारण सभा १८ सप्टेंबर रोजी प्रकल्‍प कार्यालय सभागृह, चंद्रपूर येथे पार पडली. या समस्या निवारण सभेत चंद्रपूर व चिमूर प्रकल्पातील शिक्षकांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले.

    Problem solving meetings सभेत माध्यमिक शिक्षकांना ४८००/- ग्रेड- पे लागू करणे, जीपीएफ व डीसीपीएस च्या पावत्या तात्काळ देणे, एकस्तर वेतनश्रेणी लागू करणे, सेवा पुस्तिका पडताळणी करणे, कर्मचाऱ्यांचे वेतन एक तारखेला अदा करणे, सेवानिवृत्ती प्रकरणे तात्काळ मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव निकाली काढणे, वैद्यकीय प्रतिकृती प्रस्ताव देयके निकाली काढणे, कार्यरत कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा वेतन, वैद्यकीय रजा, प्रसुती रजा व इतर रजा प्रलंबित कर्मचाऱ्यांची माहिती देणे, प्रकल्पातील मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ देणे, कर्मचाऱ्यांची मूळ सेवा पुस्तिका तयार करून त्यांना दुय्यम प्रत अद्यावत करून देणे, वेतन बिल वेळेवर न देणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई करणे, माहे जुलै ची वेतन वाढ लावूनच बिल स्वीकारने व इतर वैयक्तिक समस्यावर चर्चा करून सदर समस्या तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश चंद्रपूर व चिमूर प्रकल्प अधिकाऱ्यांना आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी दिले.

    अवश्य वाचा : ना आक्रमकता, ना तोडफोड, आप च्या आंदोलनाने वेधले लक्ष

    सर्व प्रलंबित समस्या लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन सभेत प्रकल्प अधिकारी चंद्रपूर व चिमुर यांनी दिले. सभेला चंद्रपूर व चिमूर प्रकल्प अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (Problem solving meetings)

    वंदे भारत एक्सप्रेस

    यावेळी महामंडळ सहकार्यवाह जगदीश जुनगरी, जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव धोबे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, कोषाध्यक्ष दिगांबर कुरेकार, महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, कनिष्ठ महाविद्यालयीन प्रतिनिधी प्रा. ज्ञानेश्वर सोनकुसरे, सावली तालुका अध्यक्ष विनोद मानापुरे, आदिवासी संस्कृती संघटनेचे भोजराज फुंडे, अनुदानित / शासकीय आदिवासी आश्रमशाळा संघटना चंद्रपूरचे अध्यक्ष प्रमोद साळवे, सचिव मनोज आत्राम, कार्याध्यक्ष चंद्रभान वरारकर, उपाध्यक्ष शंकर लोनगाडगे, प्रभाकर वडस्कर, सुरेश वरारकर, सदस्य युवराज मेश्राम, गोपाल बोबाटे, बजरंग जेणेकर, प्रा. रवी झाडे, दिलीप मोरे, आश्रमशाळा मुख्याध्यापक व समस्याग्रस्त शिक्षक  उपस्थित होते.

  • Shivsena Mashal : ग्रामीण भागातील युवकांच्या हाती शिवसेनेची मशाल

    Shivsena Mashal : ग्रामीण भागातील युवकांच्या हाती शिवसेनेची मशाल

    shivsena mashal विरई येथील ग्रामपंचायत सदस्य संजयजी मोहूर्ले यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार, मूल येथील राज ठाकरे व आदींची यावेळी उपस्थिती होती.

    Shivsena mashal बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांचा जनसंपर्क सातत्याने वाढत असून यासोबत त्यांच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होत असून जनसामान्य युवक त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात प्रवेश करीत आहे.

    अवश्य वाचा : मूल शहरात भीषण आग, 5 दुकाने खाक

    Shivsena mashal यावेळी बोलतांना शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांनी म्हणाले की, शिवसेना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करणारा पक्ष आहे. आपणही समाजकार्य करीत असता त्यामुळे आपणास या पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य करता येईल व सामान्य नागरिकांना मदत करता येईल. यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रोजगार मेळावा असेल, पिक विमा संदर्भात आंदोलन,प्रसंगी सामान्यांना मदत केली. तर शेतकरी व सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर वारंवार आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून दिला.

    शेतकरी वीजबिल मुक्त

    विरई येथील ग्रामपंचायत सदस्य संजयजी मोहूर्ले,यांच्या नेतृत्व आदित्य वाढई,भाविक निकोडे,रुपेश ववाके,अजय ढोले,मनोज रस्से,वनपाल ववाके,कैलास जराने,अमोल कटारे,आकाश जेंगळे,शुभम ववाके, परमानंद चौधरी, कमलाकर गेडाम,अजय भोयर, रोहित भोयर, तेजस दंडिकवार,ऋषभ वाढई मंगेश वाढई,आकाश सोनुले,निहाल जांभुळे,भोजराज जांभुळे,सचिन वाढई, सचिन जांभळे, क्रिश निकोडे,सौरभ मुवेडवार,साहिल शेंडे,प्रलय वाढई, रोहित नले,अनिकेत शेंडे,राकेश मोहुरले,रंजीत शेंडे,साजिद शेख,वेदांत लेंगुनरे,तेजस सोनुले, किरण भोयर,प्रफुल सोनुले,आकाश ढोले,रोहित चटारे व इतर युवकांनी माझ्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी गळ्यात शिवसेनेचा भगवा दुपट्टा घालून शिवसेना पक्षात त्यांचे हार्दिक स्वागत केले. यावेळी गावातील महिला पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • terrible fire : भीषण आगीत 5 दुकाने खाक

    terrible fire : भीषण आगीत 5 दुकाने खाक

    terrible fire (गुरू गुरनुले) मूल येथे शनिवारी मध्यरात्री 3.30 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत सुमारे 5 ते 6सुमारे दुकाने जळून खाक झाली. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आली. मात्र, प्लास्टिक कचरा आग धुमसत असल्याने सकाळी 7 वाजेपर्यंत आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्याचे काम सुरूच होते.

    अवश्य वाचा : गणपती बघायला गेला आणि 13 वर्षीय मुलगा बेपत्ता झाला


    Terrible fire सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मूल ताडाळा रस्त्यावर गणपती मंदीर परिसरात शनिवारी मध्यरात्री 3.30वाजण्याच्या सुमारास कापड दुकान सेल च्या दुकानाला आग लागली.

    कांद्या वरील 20 टक्के निर्यात शुल्क माफ

    4 वाजता अग्निशामक दलाला कळविण्यात आले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. संपूर्ण परिसर आगीने वेढला गेला होता. आगीची भीषणता पाहता अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी बोलावून घेतले. मात्र, तरीही आग आटोक्यात येत नसल्याने सावली येथील अग्रिशामक दलाच्या गाडीला बोलविण्यात आले. आग धुमसत असल्याने असल्याने सहा वाजेपर्यंत आगीवर पूर्ण नियंत्रण मिळविण्याचे काम सुरूच होते.

  • Dhadak Morcha : शेतकऱ्यांचा प्रश्नांवर जनविकास सेनेचा धडक मोर्चा

    Dhadak Morcha : शेतकऱ्यांचा प्रश्नांवर जनविकास सेनेचा धडक मोर्चा

    dhadak morcha मूल :निकृष्ठ आणि नियमाला डावलुन केलेल्या पाईपलाईनच्या कामामुळे उभ्या शेतातील पिकांना पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त शेतकर्‍यांनी आज जनविकास सेनेच्या नेतृत्वात तहसील व उपविभागीय कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.


    जनविकास सेनेचे संस्थापक पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात निघालेल्या मोर्चात शेकडोच्या संख्येत शेतकरी सहभागी झालेत. मोर्चा उपविभागीय कार्यालयावर नेल्यानंतर, अचानक मोर्चाने सिंचन विभागात धडक दिल्यांने, सिंचन विभागातील अधिकाऱ्यांची चांगलीच गोची झाली.


    Dhadak morcha शासनाने 2019 मध्ये भूमीगत बंद नाली प्रणाली अंतर्गत पाईप लाईन टाकण्यांचे तसेच व्हॉल्व लावण्याचे अंदाजे 23.47 कोटी रूपयो काम एन. एन. के. कन्स्ट्रक्शन पुणे यांचे मार्फतीने केले. या कामाच्या पूर्णत्वानंतर, चिचाळा, ताडाळा, दहेगांव, हळदी, मानकापूर, वेडी रिठ, गोठणगांव रिठ या 7 गावातील शेतकर्यांच्या शेतात सिंचनाची सोय होणार होती. मात्र या कामात गैरव्यवहार झाल्यांने काम नित्कृष्ट दर्जाचे झाले आणि ठिक-ठिकाणी पाईप फुटणे, चुकीच्या नियोजनामुळे पाणी शेतापर्यंत न पोहचणे यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. या समस्यांकडे शेतकर्यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचे लक्ष वेधले, मात्र त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यांचा आरोप देशमुख यांनी मोर्चात बोलतांना केले.

    शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज


    सदर योजनेतील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधीत अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर कारवाई करावी, योजनेतील फुटलेली पाईपलाईन तातडीने दुरूस्त करण्यात यावे, सदर योजनेचे नव्याने सर्व्हे करून शेतजमिनीचा नैसर्गिक उतार विचारात घेवुन अधिकाधिक जमिन सिंचनाखाली येईल त्यादृष्टीने व्हॉल्व लावण्यात या कामाची संपूर्ण चौकशी करावी, या चौकशीचा अहवाल सादर करावा व गैरव्यवहार करणार्यांवर कारवाई करावी अशी मागणी पप्पु देशमुख यांनी केली. Dhadak morcha

    अवश्य वाचा : चंद्रपुरात 7 ऑक्टोबर पासून महाकाली महोत्सवाला सुरुवात


    यावेळी जनविकास सेनेच्या उपाध्यक्षा छायाताई सिडाम, घनश्याम येरगुडे, इमदाद शेख, प्रफुल बैरम, अमोल घोडमारे, भुमिपुत्र पाणी वाटप सहकारी संस्थेचे अध्यक्ष चलदेव मांदाळे, सचिव विलास लेनगुरे, मुकेश गांडलेवार, धुडीराज बोप्पावार, संजय गेडाम, रमेश आंबोरकर, बंडु बुरांडे, महेश चिचघरे, हळदी येथील पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र कोठारे, ताडाळा येथील पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष शिलाबाई दहिवले, रमेश लेनगुरे यांच्यासह मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.


    यावेळी सावली येथील आसोलामेंढा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता ए. एस. पिदुरकर, उपविभागीय अभियंता राजु बोडेकर, मुल पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता अखिलेश सिंग यांनी सदर मागणी बाबत तात्काळ कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. यामुळे मोर्चा स्थगीत करण्यात आला.

    माननीय संपादक/ जिल्हा प्रतिनिधी /वार्ताहर,
    उपरोक्त वार्तापत्र प्रकाशित करण्याचे सहकार्य करावे,ही विनंती.
    धन्यवाद!
    आपला
    अमोल घोडमारे

  • Vijay Wadettiwar : वडेट्टीवार यांनी केले त्या शेतकरी कुटुंबाचे सांत्वन

    Vijay Wadettiwar : वडेट्टीवार यांनी केले त्या शेतकरी कुटुंबाचे सांत्वन

    vijay wadettiwar वन्यप्राण्यांपासुन शेत पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी शेताच्या बांधावर तार लावत असतांना अचानकपणे त्या तारांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण ह़ोऊन चार जणांना आपला जीव गमवावे लागल्याची घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपुर येथील शेत शिवारात घडली. याची माहिती मिळताच आज राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी गणेशपुर व चिचखेडा येथे सदर मृतकांच्या घरी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन करत आर्थिक मदत केली.

    Vijay wadettiwar कधी असमानी संकट तर कधी वन्य प्राण्यांचे हल्ले यातून जीविताचा धोका पत्करुन शेती व्यवसाय करणाऱ्यांना वन्य प्राण्यांकडुन शेतपिकांची नासधूस करून हैराण करून सोडल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी वर्ग प्रचंड चिंतेत आहेत. अश्यातच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातून शेत पिकांना वाचविण्यासाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपुर येथील प्रकाश राऊत, नानाजी राऊत शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर तार लावण्याचे  ठरविले. यासाठी त्यांनी गावातील युवराज डोंगरे व शेजारच्या चीचखेडा येथील पुंडलिक मानकर या रोजंदाराना कामावर बोलाविले.

    अवश्य वाचा : महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी आप ने ठेवला पोलीस विभागासमोर हा प्रस्ताव

    Vijay wadettiwar शेताच्या बांधावर तार लावण्याचे काम सुरू असताना नियतीने घात केला. व जवळच असलेल्या जीवंत विद्युत ताराच्या खांबाला तार गुंतून त्यातून विद्युत प्रवाह कुंपणाच्या तारात येऊन कुंपण करणाऱ्यांपैकी पाचही जणांना विद्युत प्रवाहने घात केला.व यात प्रकाश राऊत, नानाजी राऊत, युवराज डोंगरे व पुंडलिक मानकर या चौघांचा अनावधानाने मृत्यू झाला. तर सदर घटनेत एकाला गंभीर दुखापत झाली. आज राज्याचे  विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार तालुका दौरावर असताना त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेत तात्काळ गणेशपुर व चीचखेडा गाठून घटनेतील मृत्तकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व आर्थिक मदत देत इतरही शासन योजनेचा लाभ मिळवून देणार अशी ग्वाही दिली.

    यावेळी प्रामुख्याने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला लोनबले, चिचखेड सरपंच संजना घुटके, सिंदेवाही काॅंग्रेस तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे, तहसीलदार सतीश मासाळ, गटविकास अधिकारी रविंद्र घुबडे, पं.स.कृषी अधिकारी चौधरी, माजी न.प.उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, माजी जि.प.सदस्य भावना ईरपाते, उपसरपंच सुरेश ठीकरे, माजी कृउबा सभापती मनोहर गजबे यांसह ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

  • Mahavitaran : शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू कसा झाला? महावितरणने सांगितले कारण

    Mahavitaran : शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू कसा झाला? महावितरणने सांगितले कारण

    mahavitaran अनाधिकृत जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने चार शेतकऱ्यांचा मृत्यू व एक किरकोळ जखमी

    Mahavitaran महावितरण ब्रह्मपुरी उपविभाग अंतर्गत येणाऱ्या मेंडकी वीज वितरण केंद्रातील मौजा गणेशपुर येथे चार शेतकऱ्यांना प्राणांकित वीज अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी कर्मचारी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यावरील सविस्तर माहिती अशी दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी अंदाजे सकाळी ९:३० वाजता दरम्यान श्री नानाजी राऊत यांचे शेतामध्ये वन्यप्राणी पासून शेतीचे होणारे नुकसान किंवा वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी कुंपणाची तार लावण्याचे काम सुरु होते.

    सदर तार लावण्याकरिता शेतमालका सोबत इतर सहा जण होते सदर कुंपण तार अंदाजे एक किलोमीटरचा असून संपूर्ण शेताला कुंपण करत असताना शेताच्या एका कोपऱ्यामध्ये असलेल्या लघुदाब वहिनी वर अनाधिकृत 3ph केबल वायरचा वापर करण्यात आला सदर केबल वायरला हाताने ओढत असलेल्या जी आय ताराचे घर्षण झाल्याने केबल वरील इन्सुलेशन निघाले व जे पाच शेतकरी कुंपणासाठी वापरण्यात येणाऱ्या ताराला पकडून ओढत असताना त्यांना करंट लागुन त्यापैकी चार लोकांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला तसेच त्यापैकी एका शेतकऱ्याच्या हाताला भाजले व तो मागच्या बाजूला पडला त्यामुळे किरकोळ जखमी झाला.

    अवश्य वाचा : आई – बाबा सॉरी, आणि विद्यार्थिनीने केली आत्महत्या

    एलटी पोल वरून आलेली 3ph केबल वायर हे अनधिकृत वीज पुरवठा करण्यासाठी वापरण्यात येत होते. वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी त्याच्या कुंपणात वीज पुरवठा सोडण्याच्या प्रकारातून तर ही दुर्घटना घडली नसावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. महावितरण लाईनचा कुठल्याही प्रकारचा संपर्क आलेला नाही याबाबत महावितरण व पोलीस खात्यातर्फे चौकशीचे काम काज सुरू आहे. मरण पावलेल्या शेतकऱ्यांची नावे श्री नानाजी राऊत, प्रकाश राऊत (शेत मालक) युवराज डोंगरे, पुंडलिक मानकर आणि किरकोळ जखमी झालेले श्री सचिन नन्नावरे हे आहेत तसेच त्यांच्या सोबत शेतात श्री विनोद वसाके आणि श्री किशन ढोरे हे होते.

  • Shocking news : विजेचा धक्का आणि चौघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

    Shocking news : विजेचा धक्का आणि चौघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

    shocking news ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपुर येथे शेतात काम करीत असताना विजेचा धक्का लागून शेतकरी व शेतमजूर असा 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.


    Shocking news – ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपूर जवळील रूद्रापूर बीट कळमगाव शेतशिवारात काम करीत असलेल्या शेतमजूरांचा जीवंत विद्युत तारांशी संपर्क आल्यामुळे या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज दि.११ सप्टेंबर २०२४ला सकाळी १० वाजता दरम्यान घडली. यातील एक शेतमजूर गंभीर जखमी असून तो रूग्णालयात भरती आहे.

    अवश्य वाचा : खासदार मॅडम असं वागणं बरं न्हवं – भूषण फुसे


    प्राप्त माहितीनुसार, ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपूर येथील प्रकाश राऊत वय ४०, युवराज डोंगरे वय ५५, नानाजी राऊत वय ५०, सचिन नन्नावरे, किसन ढोरे, विनोद वसाके व पुंडलीक मानकर वय ६५ राह. चिचखेडा हे सर्वजण गावातील प्रकाश राऊत, नानाजी राऊत व भाष्कर राऊत यांच्या रूद्रापूर बिट कळमगाव येथील शेतशिवारात वन्य प्राण्यांपासून बचाव करण्याकरीता तार लावण्याच्या कामा करीता गेले होते. चौघांनी आधी शेतात खतपाणी टाकले व त्यानंतर जनावरांपासून शेत पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी शेतात फेंसिंग चे काम सुरू केले, तार लावत असताना अचानक त्या तारांमध्ये विजेचा प्रवाह सुरू झाल्याने चौघेही जागीच ठार झाले. विशेष बाब म्हणजे सदर फेंसिंग ही सौर ऊर्जेची नव्हती.

    प्रकाश राऊत वय ४०, युवराज डोंगरे वय ५५, नानाजी राऊत वय ५० व 65 वर्षीय पुंडलिक मानकर या चौघांचा जागीच मृत्यु झाला. तर या घटनेत सचिन नन्नावरे हा गंभीर जखमी असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्रम्हपुरी उपजिल्हा रूग्णालयात पाठविले असून पुढील तपास ब्रह्मपुरी पोलिस करीत आहेत.

    शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज