Category: ग्रामीण वार्ता

ग्रामीण वार्ता (Gramin Varta) विभागात वाचा news34.in वर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बातम्या आणि घडामोडी. शेतकरी योजना, ग्रामपंचायत राजकारण, स्थानिक विकास प्रकल्प, कृषी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स येथे उपलब्ध आहेत. चंद्रपूर ग्रामीण भागातील समस्या, यशोगाथा आणि सकारात्मक बदलांना आम्ही प्राधान्य देतो. ग्रामीण भागातील विश्वासार्ह माहितीसाठी नियमित भेट द्या.

  • Terror of tigers : वाघाचा बंदोबस्त करा – संतोष रावत

    Terror of tigers : वाघाचा बंदोबस्त करा – संतोष रावत

    Terror of tigers वनविभागाने तातडीने वाघांचा बंदोबस्त करावा, गुरांना चराईसाठी संरक्षण द्या अन्यथा वनविभागासमोर तीव्र आंदोलन करू असा इशारा कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी दिला

    Terror of tigers – (गुरू गुरनुले) आज मरेगांव येथे वाघाच्या हल्यात एक गुराखी आज ठार झाला. या पार्श्वभूमीवर रावत यांनी हा इशारा दिला.

    चिचाळा, ताडाळा, जानाळा, मरेगांव अशा एकापाठोपाठ एक गावात गुराख्यांवर वाघानी हल्ले करून ठार केले. यामुळे या भागातील नागरीकांत प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. लोक जीवाच्या भितीने आपले दैनदिन कामेही करणे बंद केले आहे. शेतकरी शेतात जाण्यांस तर, गुराखी गुरे चारण्यास घेवून जाण्यास घाबरत आहे. यामुळे ग्रामिण भागातील अर्थव्यवस्थाच धोक्यात आली आहे.

    अवश्य वाचा : भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करा

    वनविभागाने वाघाचे बंदोबस्त न केल्यांने, अनेक शेतकरी, आपल्या शेतीत पीके न घेता, शेत पडीत ठेवत आहे. यामुळे या शेतकर्यांची मोठी नुकसान होत आहे.

    महावीतरणची अभय योजना

    वनविभागाने या शेतकर्यांना भरपायी द्यावी, गुरांना चराईसाठी निश्चित जागा उपलब्ध करून द्यावी, चारा उपलब्ध करून द्यावा, वाघांचा बंदोबस्त करावा, शासनाने वाघ मारण्यांची तातडीने परवाणगी द्यावी अशी मागणी संतोष रावत यांनी केली आहे.

    वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करून ग्रामिणांना दिलासा न दिल्यास कॉंग्रेसच्या वतीने उपनसंरक्षक कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात येईल असा इशारा श्री. रावत यांनी दिला आहे.

  • Tiger attack : मूल तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरूच

    Tiger attack : मूल तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरूच

    Tiger attack (गुरू गुरनुले) चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरूच आहे, आज पुन्हा एका गुराख्यावर हल्ला करीत वाघाने ठार केले, मागील 2 वर्षातील ही 23 वि घटना आहे.


    Tiger attack बैल चराईसाठी घेवुन गेलेल्या गुराख्यावर दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला केल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना सावली वनविभागाच्या राजोली क्षेत्रातील मरेगांव मुल येथील सर्व्हे नं. १११ च्या बाजुला असलेल्या गुरुदास कवडु वाकडे यांच्या शेतात मंगळवारी दुपारी १ वाजता दरम्यान घडली. वासुदेव झिवरु पेंदोर वय (६०) वर्षे रा. मरेगांव असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या गुराख्याचे नांव आहे.


    मूल तालुक्यातील मौजा मरेगांव एम.आय.डी.सी. येथील वासुदेव झिवरु पेंदोर वय ६० वर्षे हे गुरे घेवुन चराईसाठी सावली वनविभागाच्या राजोली क्षेत्रातील मरेगांव येथील सर्व्हे नं. १११ च्या बाजुला असलेल्या शेतकरी गुरुदास कवडु वाकडे यांच्या शेतात नेले होते. चराई करीत असताना दरम्यान बाजुला असलेल्या झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करुन ठार केले. सोबत असलेल्या इतर गुराख्यांनी सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना व वनविभागाला दिली.

    अवश्य वाचा : तान्हा पोळ्याला महागाईचे ग्रहण


    सावली येथील वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होवुन पंचनामा केला सावली आणि मूल पोलीस स्टेशनचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. (Tiger attack) व मृतदेह शवविच्येदन करण्यासाठी मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

    महावितरणची अभय योजना


    सावली वनविभागाच्या वतीने वाघाच्या हल्यात ठार झालेल्या वासुदेव पेंदोर यांच्या कुटुंबियांना तात्काळ २५ हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली. मुल तालुक्यात वाघाच्या हल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शेतकरी,गुराखी व गावकरी भयभीत झाले असून अजूनही वनविभाग व शासन यावर काहीही उपाय योजना केल्याचे दिसत नाही.अशी ओरड शेतकरी बांधवांनी केली आहे. अशीच अवस्था शासनाची राहिली तर मात्र मुल व सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना स्वतःची शेती करणे सोडावे लागेल अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.

    वनविभागाच्या वतीने तातडीची मदत

    वासुदेव झींगरु पेंदोर वय ६० वर्षं राहनार मरेगाव , तालुका मूल याला गुरे चारत असतांना गुरुदास वाकडे यांचे शेताच्या बाजुला असलेल्या नाल्याजवळ वाघाने हल्ला करून ठार केले.माहीती मिळताच घटणास्थळी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री विनोद धुर्वे, क्षेत्र सहाय्यक वाकडोत, वनरक्षक धनविजय, वनरक्षक गुरनुले, वनरक्षक आखाडे, वनरक्षक बोनलवार, वनरक्षक नागोसे हे त्वरित हजर होऊन घटणास्थळाचा पंचनामा केला व मृतकाला शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय मूल येथे पाठविण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी सावली श्री विनोद धुर्वे यांचे हस्ते मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत म्हणून २५ हजार रुपये रोख देण्यात आले यावेळी संदिप भाऊ कारमवार, उमेशसिंह झिरे, मरेगाव चे पोलीस पाटील व गावकरी उपस्थित होते.

  • Bail Pola 2024 : ग्रामीण भागातील बैल पोळा

    Bail Pola 2024 : ग्रामीण भागातील बैल पोळा

    Bail Pola 2024 गुरू गुरनुले, बैल पोळ्याचे आयोजन निमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे केला शेतकऱ्यांचा सत्कार
    बाजार समिती आवारात भरला पोळा


    Bail pola 2024 – आजचा दिवस भारतीय सण समारंभांमध्ये आपल्या संस्कृतीचं देखील दर्शन होतं. बैलपोळा हा सण देखील त्याचंच उदाहरण आहे. कृषीप्रधान भारत देशामध्ये अन्नदात्यासोबत बैल देखील शेतात राबत असतो. बैलपोळ्याच्या निमित्ताने त्याला आराम देत त्याच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. मग या बैलपोळ्याच्या देण्यासोबतच बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व बैलपोळ्याच्या निमित्ताने त्याचा साजश्रृंगार केला जातो. पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. तर शेतीच्या कामातून देखील सुट्टी दिली जाते.

    अवश्य वाचा : चंद्रपूर शहरात शिरले पुराचे पाणी

    Bail pola 2024 महाराष्ट्रात सारेच शेतकरी या निमित्ताने घरातील पशूधनाला जपतात. मग हा दिवस आनंदाने साजरा केला जातो. बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी खांदमळणीचा कार्यक्रम असतो. पळसाच्या द्रोणात कढी घेऊन ती बैलाच्या खांदयावर मळली जाते त्याला खांदमळणी असेही म्हणतात. या निमित्ताने शिंगे साळून त्याला हुंगुळ लावण्याची रीत आहे. आंबाडीचे सुत काढून त्याची वेसन बैलाच्या नाकात घालण्याची पद्धत आहे. नविन घुंगर माळा, नविन झुल वेगवेगळया प्रकारचे हिंगुळ बैलाच्या शिंगांना लावून पोळयाच्या दिवशी बैलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असतो. त्या निमित्ताने बाजार समिती चे आवारात बैल पोळा भरविण्यात येऊन बैल जोडी घेऊन येणाऱ्या सर्व सहभागी शेतकऱ्यांना दुप्पटा व प्रोत्साहन म्हणून बक्षीस व उत्कृष्ट बैल जोडी सजावट केलेल्या नकटू घोगरे,रमेश गणवेंनवार,अनिल बॅटे, गणपत कोरडे,वसंत बोबाटे, भीमराव बोरकर,विनोद चौखुंडे, दशरथ जवादे, सयाजी बटे, माधव राऊत, डोमाजी चौखुंडे, या शेतकऱ्यांचा शाल देऊन सन्मान केला.

    मशाल रॅली

    यावेळी समितीचे सभापती राकेश रत्नावार उपसभापती राजेंद्र कन्नमवार संचालक घनश्याम येनुरकर, अमोल बच्चुवार, रमेश बरडे, तुलाराम घोंगरे, मूल तालुका काँग्रेस कमिटीच अध्यक्ष गुरु गुरनुले,मुल शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष सुनील शेरकी सर, समितीचे सचिव अजय गंटावार, सुनील मंगर,राजू गेडाम,बबलू सय्यद, आयटलवार, इतर कर्मचारी उपस्थित होते. समितीचे सभापती राकेश रत्नावार व राजेंद्र कन्नमवार उपसभापती, उपस्थित संचालक यांनी समस्त शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या.

  • Human Wildlife Conflict : मूल तालुक्यात पुन्हा वाघाचा हल्ला

    Human Wildlife Conflict : मूल तालुक्यात पुन्हा वाघाचा हल्ला

    Human Wildlife Conflict (गुरू गुरनुले) चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वन्यजीव यांची दहशत अद्यापही कायम आहे.

    जाणाळा येथील गुराखी वाघाच्या हल्यात ठार मूल- मुल तालुक्यातील जाणाळा येथील वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार जखमी झाल्याची घटना आज दिनांक 1 रोजी दुपारी घडली. गुलाब वेळमे वय वर्ष 50 राहणार जाणाळा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराखीचे नाव आहे.
    जाणाळा येथून जवळच असलेल्या डोनी फाट्याजवळ सराईत गाई, गुन्हे चरायला नेला होता. दबा धरून बसलेल्या वाघाने गुराखीवर हल्ला करून ठार केले. ही घटना गावात माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली आहे. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात महिला सुरक्षेची पेटली मशाल


    Human Wildlife Conflict मूल तालुक्यात वाघाचे हल्ले मानवावर वाढल्याचे दिसून येत आहे त्यामुळे ग्रामीण भागात चिंतेची बाब झाली आहे. वन्य प्राण्यांचे असे हल्ले आम्ही किती सहन करायचे असे गावकऱ्यात बोलल्या जात आहे. माणूस महत्त्वाचा की वाघ अशी ही चर्चा होत आहे. गावकऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. मागील पंधर वाड्यातील वाघाच्या हल्यात गुराखी ठार झाल्याची तिसरी घटना आहे.

    चंद्रपुरात निघाली भव्य मशाल रॅली
  • Muddy Water : पोंभूर्णा शहरातील नागरिक पित आहेत तीन दिवसांपासून गाळयुक्त अशुद्ध पाणी

    Muddy Water : पोंभूर्णा शहरातील नागरिक पित आहेत तीन दिवसांपासून गाळयुक्त अशुद्ध पाणी

    muddy water दोन महिन्यांपासून फिल्टर मशीनच नादुरुस्त ;आलम संपलेला. -विरोधी पक्षनेते आशिष कावटवार यांची मुख्याधिकारीकडे तक्रार

    पोंभूर्णा :- पोंभूर्णा शहरात मागील तीन दिवसांपासून अशुद्ध व गाळयुक्त पाणी पुरवठा होत असून येथील जनतेला अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. मात्र एवढी भयंकर समस्या असतांना सुद्धा नगरपंचायत प्रशासन धृतराष्ट्राच्या भुमीकेत आंधळे बनून लोकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे दिसून येत आहे.करोडो रूपये खर्चून बांधलेल्या फिल्टर प्लॅटमध्ये मागील दोन महिन्यांपासून पाणीच फिल्टर होत नाही.फिल्टर मशीन बंद आहे,आलम आठवड्याभरापासून संपलेला आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर-बल्लारपूर बायपास मार्गावर मोठी दुर्घटना टळली


    Muddy water फोरटूलेटर मशीन बंद आहे,वाॅश वाॅटर टॅंकची मोटार बंद आहे, स्टार्टर मशीन बंद आहे,जाडी बेड बंद आहे. असे असताना सुद्धा शुद्धीकरणाच्या नावावर नगर पंचायत शहरवासियाची फसवणूक करून त्यांच्या आरोग्याशीच नाही तर जीवनाशी सुद्धा खेळ खेळत आहे. शहरवासियांच्या समस्येबद्दल काही लेना देना नसलेल्या नगर पंचायतच्या भोंगळ कारभारामुळे येथील जनता त्रस्त झाली आहे.

    Muddy water रस्त्या रस्त्यावर स्वागत गेट बांधून विकासाचे मॉडेल म्हणून नाव मिरवणाऱ्या पोंभूर्ण्यात पाणी टंचाईची झळ तर सोसावी लागत होतीच मात्र आता तर येथील नागरिकांना गाळयुक्त अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे.मागील तीन दिवसापासून शहरात गाळयुक्त व अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याची बोंब नागरिक करीत होते.याबाबत विरोधी पक्षनेते आशिष कावटवार यांनी तातडीने रात्री आठ वाजताच्या दरम्यान फिल्टर प्लॅंट गाठून तेथील पाहणी केली असता.करोडो रुपये खर्च करून बसवण्यात आलेल्या फिल्टर प्लॅटमध्ये फोरटूलेटर मशीन बंद,वाॅश वाॅटर टॅंकची मोटार बंद,स्टार्टर मशीन बंद,जाडी बेड चोकअप,तर आलम तर पुर्णपणे संपलेला असल्याचे निदर्शनास आले.बीना आलमनेच शहरातील पाणी पुरवठा होत असल्याने गढूळ पाणी पुरवठा केल्या जात असल्याची माहिती समोर आली. एवढेच नव्हे तर दोन महिन्यांपासून फिल्टर मशीन बंद असल्याने अशुद्ध पाणी पुरवठा सुद्धा होत आहे.असे असताना सुद्धा शुद्धीकरणाच्या नावावर नगर पंचायत शहरवासियाची फसवणूक करून त्यांच्या आरोग्याशी व जीवनाशी सुद्धा खेळ खेळत आहे.शहरवासियांच्या समस्येबद्दल काही लेना देना नसलेल्या नगर पंचायतच्या भोंगळ कारभारामुळे येथील जनता त्रस्त झाली आहे.फिल्टर प्लॅंटमध्ये एवढं बोगस काम सुरू असताना नगरपंचायतचे पदाधिकारी व अधिकारी धृतराष्ट्राच्या भुमीकेत आंधळे बनून उभे असल्याचे पाहायला मिळत आहे.अशुद्ध व गढुळ पाणी पिल्याने शहरवासियांना डायरियाची लागण होण्याची शक्यता असताना सुद्धा नगरपंचायतने नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने काहीच उपाययोजना केली नाही.किंवा मागील अनेक महिन्यांपासून पाणी फिल्टर करणारे संयंत्र बंद असून त्याची रिपेअरींग करण्यात आली नाही.ठेकेदाराचे फिल्टर प्लॅंटकडे लक्ष नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.मात्र कवडीचे काम नसतांना लाखोंचे बिल घेणाऱ्या ठेकेदाराला नगरपंचायत पाठीशी घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.नगरपंचायतच्या अश्या धोरणामुळे नागरिकांमध्येही आता रोष व्यक्त होताना दिसत आहे.
    Muddy water गढुळ व दुषीत पाणी पुरवठा याबाबत आशिष कावटवार यांनी मुख्याधिकारी यांना फोनवर समस्या सांगितली असता मुख्याधिकारी निखिल लांडगे यांनी फिल्टर प्लॅटमध्ये तात्काळ येऊन पाहणी केली असता गढुळ पाणी, फिल्टर मशीन बंद असे अनेक प्रकार पाहताच मुख्याधिकारी यांनी आशिष कावटवार यांना आश्वस्त करीत शहरातील नागरिकांना शुध्द पाणी पुरवठा केल्या जाणार असल्याचे सांगितले.यावेळी नगरसेवक अतुल वाकडे, बालाजी मेश्राम, अभिषेक बद्दलवार यांची उपस्थिती होती.

    एसीच्या कार्यालयात बसून नागरिकांना पिण्यासाठी गढुळ पाणी पुरवठा करून नागरिकांच्या जीवाशी खेळणारे पदाधिकारी व अधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत.
    ठेकेदाराला लाखो रुपये भुगतान करून लोकांना अशुद्ध व गढुळ पाणी प्यावे लागत आहे.याला जबाबदार असणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.व येत्या दोन दिवसांत शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा अन्यथा जनतेला घेऊन नगरपंचायत समोर आंदोलन करण्यात येईल.
    -आशिष कावटवार,विरोधी पक्षनेते नगरपंचायत पोंभूर्णा

  • Ramai Gharkul Yojana : चंद्रपूर जिल्ह्यात 864 घरकुल मंजूर

    Ramai Gharkul Yojana : चंद्रपूर जिल्ह्यात 864 घरकुल मंजूर

    ramai gharkul yojana सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेतंर्गत जिल्ह्यात 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्राप्त यादीनूसार 503 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना आता हक्काचे घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

    अवश्य वाचा – त्या मृतदेहाला ओळखीची वाट

    पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने रमाई आवास योजनेंतर्गत तालुकानिहाय एकूण 503 घरकुलांना मंजुरी मिळाली असून नवीन 361 रद्द ऐवजी पात्र लाभार्थीना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. असे एकूण 864 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे.

    Ramai gharkul yojana रमाई घरकुल आवास योजना ही एक अत्यंत महत्त्वाची आणि महत्त्वाकांक्षी राज्य पुरस्कृत योजना असून ज्यांना निवासाची व्यवस्था नाही, अशा सर्व आर्थिक दुर्बल असणाऱ्या व सर्वसामान्य नागरिकांना स्वतःच्या जागेवरती पक्क्या स्वरूपाची घरबांधणीची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याने ही योजना वरदान ठरत आहे. रमाई आवास (ग्रामीण) योजनेसाठी सन 2019-20 ते 2023-24 या आार्थिक वर्षाकरीता जिल्ह्यासाठी 21 हजार 902 चे उद्दिष्ट होते. त्यापैकी एकूण 20 हजार 378 घरकुलास मार्च 2024 पर्यंत मंजूरी देण्यात आली होती. त्यामधून एकूण 1524 शिल्लक उद्दिष्टांपैकी प्राप्त यादीनूसार 503 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. 

    Ramai gharkul yojana त्याचप्रमाणे, सन 2018-19 ते 2023-24 मधील मंजूर लाभार्थीमधून सर्वेक्षणादरम्यान आजपर्यंत एकूण 521 लाभार्थी अपात्र आढळून आले असून सदर लाभार्थी रद्द करण्यात आले. त्याऐवजी नवीन 361 रद्द ऐवजी पात्र लाभार्थीना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

    बैठकीत निर्णय : सदर बैठकीत सन 2018-19 ते 2023-24 मधील एकूण 503 लाभार्थ्यांना मंजूरी प्रदान करण्यात आली असून सन 2018-19 ते 2023-24 मधील एकूण 361 रद्द ऐवजी पात्र लाभार्थ्यांना मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. तसेच संबंधित गटविकास अधिकारी यांना स्थळ पंचनामे होताच याद्या मंजुरीसाठी सादर करुन उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत तसेच सन 2018-19 ते 2023-24 या आर्थिक वर्षातील रद्द झालेल्या लाभार्थ्यांऐवजी पात्र लाभार्थी यादी मंजुरीसाठी सादर करण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सूचना दिलेल्या आहेत.

    361 रद्द ऐवजी पात्र लाभार्थी (तालुकानिहाय घरकुल) : चंद्रपूर – 4, गोंडपिपरी – 147, पोंभुर्णा – 37,  वरोरा – 51,  नागभीड – 16,  चिमूर – 88,  जिवती – 4,  ब्रह्मपुरी – 14

  • Dengue fever : घुग्गुस शहरात डेंग्यूचा वाढता धोका

    Dengue fever : घुग्गुस शहरात डेंग्यूचा वाढता धोका

    Dengue fever चंद्रपूर शहर व तालुक्यात सध्या डेंग्यूची साथ सुरू आहे, त्यामुळे अनेकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला असून आता याची धग घुग्गुस शहरात पोहचली आहे.

    घुग्घूस : शहरातील साई बाबा नगर वॉर्ड क्रं 06 येथील 25 वर्षीय फॅशन डिजायनर तरुणी तन्वी कुम्मरवार हिचा डेंगू मलेरिया झाल्यानंतर केवळ 48 तासात नागपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    Dengue fever घुग्घूस शहरात सध्या सर्वत्र घाणीचा साम्राज्य पसरले असून डास / मच्छर यांची प्रचंड संख्या वाढली असून शहरात मलेरिया व डेंगू मलेरियाची साथ पसरली आहे त्यामुळे शहरातील दवाखाने हे आजारी नागरिकांनी तुडुंब भरले आहेत.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात 10 हजार 766 वयोश्री योजनेचे अर्ज दाखल


    डेंग्यूमुळे परत कुणाची मृत्यू होऊ नये अन्य नागरिकांचे जीव जाऊ नये म्हणून तातळीने संपूर्ण शहरात फॉगीग मशीन द्वारे जंतनाशक औषधीचे फवारणी करावी या मागणी साठी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नप मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांची भेट घेऊन समस्या सोडविण्यासाठी विनंती केली असता त्यांनी तातळीने संपूर्ण शहरात जंतूनाशकाची फवारणी करण्याचे आश्वासन दिले व परत कुणाचे जीव जाऊ नये यासाठी शर्थीचे प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.

    याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अजय उपाध्ये, सोशल मीडिया अध्यक्ष रोशन दंतलवार, मोसीम शेख, विशाल मादर, नुरूल सिद्दीकी,एन. एस. यु. आय अध्यक्ष आकाश चिलका, बालकिशन कुळसंगे, सुनील पाटील,अनुग्रह मायकल,कुमार रुद्रारप,अंकुश सपाटे, भीमराव कांबळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

  • jivati taluka : राज्यात जिवती तालुका दुसऱ्या क्रमांकावर

    jivati taluka : राज्यात जिवती तालुका दुसऱ्या क्रमांकावर

    jivati taluka विकासाच्या बाबतीत अतिमागास असलेल्या तालुक्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या नीति आयोगाने संपूर्ण भारतात 500 आकांक्षित तालुके घोषित केले आहे. यात महाराष्ट्रातील 27 तालुक्यांचा समावेश आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती या एकमेव तालुक्याचा समावेश असून नुकत्याच जाहीर झालेल्या 4 थ्या डेल्टा रँकिंगमध्ये जीवती तालुक्याने विकासाच्या बाबतीत राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तर पहिल्या क्रमांकावर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्याचा समावेश आहे.

    अवश्य वाचा : तीन महिन्यापूर्वी लग्न आणि विवाहित जोडप्याचा धक्कादायक अंत

    Jivati taluka केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत आंतरमंत्रालयीन समितीने 27 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशातून 500 तालुक्यांची निवड केली आहे. त्यापैकी या योजनेत महाराष्ट्रातील 27 तालुक्यांचा समावेश आहे. 4 थ्या डेल्टा रँकिंगमध्ये जिवती तालुक्याने विकासाच्या बाबतीत राज्यातील 27 तालुक्यांमूधन द्वितीय क्रमांक, पश्चिम विभागातील 70 तालुक्यांमधून 21 वा क्रमांक तर संपूर्ण भारतातील 500 तालुक्यांमधून जीवती तालुक्याने 111 वा क्रमांक पटकाविला आहे.

    आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी व संलग्न सेवा, मुलभूत पायाभूत सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आर्थिक समावेश आणि सामाजिक विकास या थीमवर तालुक्यांचा विकास करण्यात येत आहे. या अंतर्गत तीन महिन्यांच्या कालावधीत केंद्र सरकारच्या 40 निर्देशांकांपैकी जीवती तालुक्यात 6 निर्देशांक 100 टक्के साध्य करणे, हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. 4 जुलै 2024 रोजी जीवतीमध्ये आकांक्षित तालुका अभियान अंतर्गत संपूर्णत: अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता.

    महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात फोटो/व्हिडीओ काढणे पडणार महागात, नवे नियम लागू

    असे आहेत जीवती तालुक्यासाठी विशेष निर्देशांक : आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व संलग्न सेवा, सामाजिक विकास आणि मुलभूत पायाभूत सुविधा या प्रमुख पाच थीमवर सदर अभियान 4 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 या  कालावधीत राबविण्यात येणार आहे. यात 1) गरोदर मातांची पहिल्या तिमाहीमध्ये 100 टक्के नोंदणी करणे, 2) तालुक्यामध्ये 30 वर्षांपेक्षा जास्त वय असणा-या नागरिकांची 100 टक्के उच्च रक्तदाब तपासणी करणे, 3) या वयोगटातील नागरिकांची मधुमेह तपासणी करणे, 4) तालुक्यातील 100 टक्के गरोदर मातांना नियमितपणे पोषण आहार देणे, 5) भुधारकांना मृदा आरोग्य कार्डचे वितरण करणे आणि 6) तालुक्यातील 100 टक्के बचत गटांना खेळते भांडवल उपलब्ध करून देणे.

  • Intercaste marriage : गोंडपीपरी तालुक्यात विवाहित जोडप्याचा धक्कादायक अंत

    Intercaste marriage : गोंडपीपरी तालुक्यात विवाहित जोडप्याचा धक्कादायक अंत

    Intercaste marriage चंद्रपूर/गोंडपीपरी – चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यात असणाऱ्या पानोरा गावात आज रात्री च्या सुमारास धक्कादायक घटना घडली.

    रात्री 9.30 वाजताची वेळ अचानक एक महिला विहिरी च्या दिशेने धावत आली, काही क्षणात तिने विहिरीत उडी घेतली, तिला वाचविण्यासाठी पतीने सुद्धा विहिरीत उडी घेतली आणि दोघांचा दुर्दैवी अंत झाला.

    अवश्य वाचा : शासकीय रुग्णालय चंद्रपुरात फोटो/व्हिडीओ काढण्यास मनाई

    Intercaste marriage गोंडपीपरी तालुक्यातील पानोरा गावातील प्रकाश शरबत ठेंगणे व उषा प्रकाश ठेंगणे अशी मृतकाची नावे आहे, तीन महिन्यांपूर्वी दोघांनी आंतरजातीय विवाह केला होता, मात्र आज दोघात असं काय घडलं की पत्नीने विहिरीत उडी घेतली, याबाबत तर सध्या प्रश्नचिन्ह आहे? ही घटना का घडली? याबाबत पोलीस तपास करतीलचं.

    महत्त्वाचे : 3 वर्षांपूर्वी रानटी डुक्कराच्या हल्ल्यात काही नागरिक जखमी झाले होते, वनविभागाची मदत तब्बल 3 वर्षांनी मिळाली

    पानोरा गावात विवाहित जोडप्याचा असा धक्कादायक अंत कुणालाही अपेक्षित नव्हता, हसत खेळत व चांगल्या दोघे राहत होते, घटनेची माहिती मिळताच गोंडपीपरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाली, घटनेचा पंचनामा करण्यात आला असून दोघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. यावेळी पानोरा गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

    सध्या तरी मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे, पोलीस तपासनंतर दोघात काय घडलं? व यामागील कारण काय हे पोलीस सांगू शकणार. ठेंगणे दाम्पत्य यांचं लग्न झाल्यापासून काही वाद होता का? त्यांना कुटुंबीय काही मानसिक त्रास देत होते का? याबाबत आता पोलीस तपास करणार आहे.

  • Forest Department : वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गोलावार यांच्या कुटुंबाला वनविभागाच्या वतीने आर्थिक मदत

    Forest Department : वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गोलावार यांच्या कुटुंबाला वनविभागाच्या वतीने आर्थिक मदत

    forest department गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील वनपारिक्षेत्र चिचपल्ली (प्रादेशिक) उपक्षेत्र मूल नियतक्षेत्र मूल मधे मुनीम रतिराम गोलावार वय (41) वर्ष रा. चिचाला ता. मूल जिल्हा चंद्रपुर हे दिनांक 18/8/24 रोजी कक्ष क्रमांक 752 मधे बकरी चरावयास गेला सायंकाली घरी परत न आल्याने सदरची माहिती वनविभागास दिली.

    आंदोलन : चंद्रपुरात महाविकास आघाडीचे निषेध आंदोलन

    Forest department दिनांक 19/8/24 रोजी श्री प्रशांत खाड़े विभागीय वनअधिकारी चंद्रपुर वनविभाग व प्रियंका वेलमे वनपरिक्षेत्र अधिकारी(प्रादेशिक) चीच्पल्ली यांचे आदेशानव्ये एम. जे.मस्के क्षेत्र साहयक मूल, वनरक्षक सुधीर ठाकुर, राकेश गुरनुले संजीवनी पर्यावरण संस्थाचे उमेशसिंह झिरे व सदस्य rru टीम चंद्रपुर यांनी सकाळी 6.00 वाजता शोध घेतला असता सदर इसमाचा मृत शव आढ़ळून आला मोकयावर पोलिस कर्मचारी पंचनामा करुन शवविच्छेदन करीता उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले व आज दिनांक 24/8/25 रोजी ना. सुधीर मूंनगटीवार मंत्री, वने महारास्ट् राज्य यांचे हस्ते मृतकाची पत्नी श्रीमती चंदा मुनीम गोलावार याना 10 लक्ष रू.रकमेचे धनादेश देण्यात आले.

    अवैध बांधकाम : चंद्रपूर शहरात अवैध बांधकाम

    यावेळी उपस्थित मा. श्री झुरमुरे साहेब अप्पर प्रधान मुख्य वन सरक्षक नागपुर, श्री प्रशांत खाड़े विभागीय वनाधिकारी चंद्रपुर वनविभाग, प्रियंका वेलमे वनपारिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) चिचपल्ली, माजी न.प. उपाध्यक्ष नंदूभाऊ रणदिवे, श्री एम. जे. मस्के क्षेत्र साहयक मूल वनरक्षक, सुधीर ठाकुर, राकेश गुरनुले उपस्थित होते.

    मूल तालुक्यात या वर्षी मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनेत वाढ झाली असून आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे.