Category: ग्रामीण वार्ता

ग्रामीण वार्ता (Gramin Varta) विभागात वाचा news34.in वर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बातम्या आणि घडामोडी. शेतकरी योजना, ग्रामपंचायत राजकारण, स्थानिक विकास प्रकल्प, कृषी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स येथे उपलब्ध आहेत. चंद्रपूर ग्रामीण भागातील समस्या, यशोगाथा आणि सकारात्मक बदलांना आम्ही प्राधान्य देतो. ग्रामीण भागातील विश्वासार्ह माहितीसाठी नियमित भेट द्या.

  • chandrapur district tiger attack | वाघाने गुराख्याला केले फस्त, महिन्यातील तिसरा बळी

    chandrapur district tiger attack

    chandrapur district tiger attack : गायी, म्हशी आणि शेळ्या चराईसाठी जंगलात घेऊन गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना सोमवारी दुपारी घडली. त्याच्या पार्थिवाचे अवशेष बफर झोनच्या कक्ष क्रमांक 756 मधिल नियत क्षेत्र काटवन मध्ये मंगळवारी सकाळी सापडले. मॄत गुराख्याचे नाव बंडू चिंधुजी कोल्हे असे आहे. 55 वर्षीय गुराखी मूल जवळील रामपुर या गावातील रहिवासी होता.

    या घटनेने गावात खळबळ उडाली. मानव वन्यजीव संघर्षात आणखी एक गुराखी बळी पडल्याने जनावरांच्या चराईचा प्रश्न ऐरणीवर सापडला आहे. नव्या वर्षातील पहिल्या महिन्यात मानव-वन्यजीव संघर्षाचा हा तिसरा बळी आहे.

    चंद्रपुरात सट्टा मटक्याची अलिखित परवानगी


    नेहमी प्रमाणे बंडू कोल्हे हे रामपूर आणि मूल येथील जनावरे व शेळ्या घेऊन जंगलात चराईसाठी सोमवारी सकाळी गेले होते. त्याच्यातील काही शेळ्या भटकल्याने ते शोधात होते. दरम्यान त्यांनी आपल्या पत्नीशी संवाद साधून शेळ्या घरी आल्या काय याबाबत विचारपूस केली होती.

    रामपूर ते करून काटवन हा बफर झोनचा परिसर घनदाट जंगलाचा आहे. या परिसरात वाघाचे मोठे वास्तव्य आहे. शेळ्या च्या शोधात गुराखी जंगलात असताना त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. संध्याकाळी गायी, म्हशी आणि शेळ्या न चुकता घरी परतल्या. मात्र, बंडू कोल्हे घरी परत आलेला नव्हता. त्यामुळे पत्नीने गावात ही माहिती दिली.

    वनविभागाला सूचना देण्यात आली. मूल येथील बफर झोनचे अधिकारी, कर्मचारी व गावकरी यांनी जंगलात शोध मोहीम राबवली. संध्याकाळ पर्यंत त्याचा थांगपत्ता लागला नाही. घनदाट जंगल आणि अंधार पडल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. मंगळवारी सकाळी शोध मोहीम राबवली असता कक्ष क्रमांक 756 मध्ये त्याचे अवशेष सापडले. वाघाने ठार मारून बंडू चे शरीर पूर्ण फस्त केले होते. फक्त शरीराचे हाडे तेवढी शिल्लक होती.

    घटना स्थळी त्याची काठी आढळून आली. सापडलेली हाडे मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आली. ती हाडे डीएनए साठी पाठविण्यात येणार असल्याचे बोलले जाते. रामपूर आणि घटना स्थळी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गांनी भेट देऊन पाहणी केली. मॄतकाच्या कुंटुबियांना वनविभागाच्या वतीने तात्काळ वीस हजार रुपयांची मदत करण्यात आली.


    मानव वन्यजीव संघर्षाचा रामपूर गावाला मोठा हादरा बसला आहे. याआधी सुद्धा रामपूर, चिचोली या गावातील गुराखी वाघाच्या हल्ल्यात बळी पडलेली आहेत. मूल तालुक्यातील वाढत्या वाघांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी, शेतमजूर आणि गुराखी बांधवामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

    वाघाच्या हल्ल्यात तिसरा बळी

    14 जानेवारीला बल्लारपूर येथे बांबू कामगाराला वाघाने ठार केले होते, त्यानंतर चिमूर येथे 25 जानेवारीला गुराख्यावर हल्ला करीत वाघाने ठार केले, आणि 27 जानेवारीला मूल येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाला. जानेवारी महिन्यात वाघाने तिघांचा बळी घेतल्याने जिल्ह्यात दहशतीचे वातावरण आहे.

  • Movement of project victims | हंसराज अहिर यांच्या मध्यस्तीने प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मागे

    Movement of project victims

    Movement of project victims : वेकोलि वणी नॉर्थ क्षेत्रातील कोलेरा व पिंपरी या गावाची पुनर्वसन प्रकीया मागील ३० वर्षांपासून सुरू न झाल्याने प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी दि. २५ जानेवारी २०२५ रोजीपासून खाणीमध्ये कामबंद आंदोलन सुरू केले होते.

    या आंदोलनाची गंभीर दखल घेवून पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर (hansraj ahir) यांनी वेकोलिचे सीएमडी यांचेसोबत पुनर्वसन विषयक प्रलंबित प्रश्नांबाबत दुरध्वनीवरून विस्तृत चर्चा केली व आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलकांच्या मागणीस पाठिंबा देत मुख्य महाप्रबंधक वणी नॉर्थ क्षेत्र यांचे उपस्थितीत पुनर्वसन व अन्य न्याय मागण्यांच्या पुर्ततेकरिता पुढाकार घेवून महिनाभरात विषय मार्गी लावण्याचे आश्वासन क्षेत्रीय महाप्रबंधक वणी नॉर्थ यांचेकडून देण्यात आले.

    उच्च विस्फोटक निर्मनी येथे पदभरती, आजच करा अर्ज

    मुख्य महाप्रबंधक यांनी प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनानुसार महिनाभरामध्ये दोन्ही गावांच्या पुनर्वसनाबाबत प्रकल्पग्रस्त यादीचा विषय मार्गी लावून सन २०१९ पर्यंतची प्रकल्पग्रस्तांची नवीन यादी व २०११ ची जुनी यादी नुसार दोन्ही प्रस्ताव मुख्यालयाला सादर करून नवीन यादी धारकांकडून आवश्यक कागदोपत्री पुरावे मागवून कुंटूबाच्या अंतर्गत झालेले मालकीहक्क फेरफार ग्राह्य धरून पुनर्वसन लाभधारक यादीला अंतिम मान्यता द्यावी असे अहीर यांनी सांगितले. अहीर यांच्या मध्यस्थीने सुचविण्यात आलेल्या तोडग्याच्या आधारे प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांनी आपले खाणबंद आंदोलन मागे घेतले.

    चंद्रपुरात नाना – नानी पार्कचे उदघाटन

    आंदोलनामध्ये चर्चेदरम्यान यवतमाळ भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विजय पिदुरकर, बंडु चांदेकर, साधना उईके सरपंच कोलेरा पिंपरी, उपसरपंच केशव पिदुरकर, पवन एकरे, अतुल बोंडे, प्रियंका सातपुते, दिपक मत्ते, महेश देठे, बंडु खंडाळकर, बालु खामनकर, अनिल बोढाले, शंकर खामनकर व दोन्ही गावातील आंदोलनकर्ते प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

  • Cotton ginning | कोरपना येथील कापूस जिनिंगला आग

    Cotton ginning

    cotton ginning : कोरपना तालुक्यातील सोनुर्ली गावाजवळ असलेल्या एमएस कापूस जिनिंगला आज 26 जानेवारीला आग लागली. या आगीत कापसाच्या 150 ते 200 कापूस गाठी जळून खाक झाल्याची माहिती आहे, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या आगीमुळे लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

    चंद्रपुरात पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न

    या जिनिंग मध्ये सीसीआय व प्रायव्हेट कापूस खरेदी सुरू होती कापूस खरेदी केल्यानंतर कापसाच्या गाठी तयार करून पाठविलेल्या जातात सकाळी काम सुरू असताना अचानक कापसाच्या गाठित आग लागली त्यानंतर कामगारांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.

    त्याच वेळी गडचांदूर नगरपरिषद, अल्ट्राटेक सिमेंट, दालमिया सिमेंटच्या 3 अग्निशामक वाहनाच्या मदतीने आग विझविण्यात आली असून यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.

  • Republic day 2025 | SNDT महिला विद्यापीठात ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा

    Republic day 2025

    Republic day 2025 : एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबईचे, महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी बल्लारपुर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

    या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. कविता खोलगडे, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक, एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई या उपस्थित होत्या.

    वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोशन यादव यांना राष्ट्रपती पदक जाहीर

    ध्वजारोहनानंतर झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचे  स्वागत कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेश इंगोले यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी मंचावर सहाय्यक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, बल्लारपूर आवाराचे समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त आणि प्रा. खुशबू जोसेफ उपस्थित होते. (Sndt woman university)

    डॉ. कविता खोलगडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रजासत्ताक दिनी प्रत्येकांनी आपले कर्तव्य ओळखून त्यानुसार कार्य करायला पाहिजे, सोबतच विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले आणि शारीरिक शिक्षणाचे महत्त्व विषद केले.

    सोबतच आधुनिक युगात फिटनेस ही जीवनाची गरज बनली आहे आणि प्रत्येकाने आपली क्षमता ओळखून स्वतःचा विकास साधायला हवा असे प्रतिपादन केले.

    डॉ. राजेश इंगोले यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना भविष्याच्या संधींविषयी माहिती देत संविधानाच्या मूल्यांवर उभे राहून आपण राष्ट्र उभारणीसाठी योगदान दिले पाहिजे व प्रत्येक विद्यार्थ्याने राष्ट्राच्या प्रगतीचा भाग बनावे या करिता प्रयत्न केले पाहिजे असे मत व्यक्त केले.

    प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात विद्यापीठाच्या एन.एस.एस व सांस्कृतिक विभागातर्फे वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागासाठी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

    नुकतेच पार पडलेल्या वातावरण बदल आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनात स्वयंसेवक म्हणून काम केलेल्या सर्व विद्यार्थिनींचे यावेळी कौतुक करण्यात आले.

    एन.एस.एस. विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. खुशबू जोसेफ, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रुतिका राऊत यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी अथक प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. अपेक्षा पिंपळे यांनी केले आणि आभार प्रा. खुशबू जोसेफ यांनी मानले. या प्रसंगी एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ बल्लारपुर आवाराचे शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Tiger Attack News । मानव वन्यजीव संघर्षाचा चंद्रपूर जिल्ह्यात दुसरा बळी

    Tiger Attack News updates

    Tiger Attack News : पळसगाव  (पि )चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या विहीरगाव नियत क्षेत्र २ मधील कक्ष क्र, ८५८ मधील जंगलात विहीरगाव येथील गुराख्याला वाघाने ठार मारल्याची घटना आज दिनांक २५ जानेवारीला दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. जानेवारी महिन्यातील मानव वन्यजीव संघर्षातील हा दुसरा बळी आहे.

    विहीरगाव येथील पाच ते सहा लोकांची गावातील जनावरे चारण्याची एका हप्त्याची पाळी होती.आज त्यांच्या पाळीचा दुसरा दिवस जनावरे नेण्याचा होता. भाऊराव नागोसे,अनिल जांभळे,जानिक धाडसे, यांच्या सोबत गुरे घेऊन सकाळी दहा वाजता सहकारी गुराखी सोबत गेले असता दबा धरून असलेल्या वाघाने जंगलातच गुरख्याला ठार मारले.

    अट्टल गुन्हेगार दुर्गापूर पोलिसांच्या ताब्यात

    सदर गुराखी दयाराम लक्ष्मण गोंडाणे (७०) रा. विहीरगाव (ता.चिमूर ) असे मृत गुराख्याचे नाव आहे. सोबत असलेल्या सहकारी गुराखी सोबत काही अंतरावर जनावरे चारीत असताना अचानक वाघाने हल्ला करून गुराखी दयाराम गोंडाने याला तोंडात उचलून दाट जंगलात घेऊन गेला सोबत असलेल्या सहकारी यांनी आरडा ओरड केली मात्र वाघाने त्याला सोडले नाहीं.

    सहकारी गुराखी यांनी गावात मोबाईल द्वारे सदर घटनेची माहिती दिली नंतर गावातील नागरिक आणि वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत हल्ल्यात मृतक गुराख्याचा शोध कार्य राबविले असता पुढे काही अंतरावर शोध घेतला असता गोंडाणे यांचा मृतदेहच मिळाला त्यांच्या मानेवर वाघाच्या हल्ल्याचे घाव आढळून आले.

    सदर परिसरात मागील काही महिन्यांपासून वाघाचा मुक्त वावर सुरू आहे. अनेक जनावरांचा फडशा त्याने पाडला. काही लोकांना या वाघाचे दर्शनही झाल्याचे सांगितल्या जाते. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.त्याचे प्रेत उचलून शवविच्छेदन साठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले.

    या वेळी, वनपरीक्षेत्र अधिकारी योगिता आत्रम,अमोल कवासे वनपाल,वनपाल विनोद किलनाके,निखूरे,वनरक्षक नागलोत, मेश्राम,खारडे,जिवतोडे, जरारे, गेडाम,दुधे, ठाकरे, पोलीस निरीक्षक सतोष बाकल सह पोलीस कर्मचारी वनविभागाचे कर्मचारी हजर होते.मृत्यकाच्या कुटुंबास वनविभागाच्या पन्नास हजाराची आर्थिक मदत करण्यात आली.त्याच्या मागे पत्नी,दोन मुले, एक मुलगी व मोठा आप्त परिवार आहे.

  • Tiger Dead | चंद्रपूर जिल्ह्यात एका महिन्यात ३ वाघांचा मृत्यू

    Tiger Dead

    Tiger Dead : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात बल्लारपूर – गोंदिया रेल्वे मार्गावर १९ जानेवारीला रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून आतापर्यंत जानेवारी महिन्यात १९ दिवसात ३ वाघाचा मृत्यू झाला आहे.

    दक्षिण पुर्व मध्य रेल्वे , बिलासपुर झोन अंतर्गत गोंदिया- नागभीड- चांदाफोर्ट – बल्लारशाह हा रेल्वे मार्ग जास्तीत जास्त जंगलव्यात भागातून आहे. त्यातही नागभीड- चांदाफोर्ट रेल्वे मार्ग घनदाट जंगलातून असुन ताडोबा – अंधेरी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प व घोडाझरी अभयारण्य लागूनच आहे. या रेल्वे मार्गांवर अनेक ठिकाणी वाघ , हरिण , रानगवे , अस्वल यासारखे वन्यप्राणी अपघातात मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असे असून सुद्धा आजपर्यंत वनविभागाने यावर ठोस उपाययोजना केली नाही.

    चंद्रपूरच्या खासदाराचे दमदार काम

    सिंदेवाही – आलेवाही रेल्वे स्थानकाच्या दरम्यान आज सकाळी बल्लारपूरकडून गोंदियाकडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनने या वाघाला धडक दिली. मृत वाघ अंदाजे एक वर्षाचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घनदाट जंगलातून जाणा-या या रेल्वेमार्गावर वन्यजीव मृत्यूच्या घटना वारंवार होत असून त्या टाळण्यासाठी रेल्वे आणि वनविभाग यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त होत आहे. railway line

    आतापर्यंत ३ वाघांचा मृत्यू

    २ जानेवारीला सिंदेवाही वनपरिक्षेत्रात मौजा लाडबोरी येथील शेतशिवारात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह मिळाला होता, वाघ वयोवृद्ध असल्याने त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने नोंदविला होता. ९ जानेवारीला मूल तालुक्यातील भांदुरणा या गावी ५ महिन्याच्या वाघाच्या बछड्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. तर १९ जानेवारीला सिंदेवाही – आलेवाही रेल्वे स्थानक दरम्यान रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली.

  • Paddy planting laborer | धान रोवणी मजुरांसाठी विजय वडेट्टीवार बनले देवदूत

    Paddy planting laborer

    Paddy planting laborer : कर्नाटक राज्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी व सिंदेवाही तालुक्यातील २१ मजूर हे धानपीक रोवणीच्या कामासाठी सुमारे १ महीन्यापुर्वी गेले होते. त्याठिकाणी महीनाभर काम केल्यानंतर मजूरीचे पैसे त्यांना तिथं घेऊन जाणाऱ्या कर्नाटकातील कंत्राटदाराने मजूरांना दिलेच नाही. व तो पसार झाला. त्यामुळे मजूरांकडे गावाकडे परत यायला देखील पैसे नव्हते. ते सगळे संकटात सापडले होते.

    चंद्रपूर जिल्ह्याचे नवे पालकमंत्री अशोक उईके

    अशा स्थितीत संकटात सापडलेल्या मजूरांनी कृउबा संचालक प्रभाकर सेलोकर, माजी नगरसेवक डाॅ.नितीन उराडे, शहर काँग्रेस सचिव पुष्पाकर बांगरे यांच्याशी संपर्क साधून आपली व्यथा सांगितली.

    सदरची बाब ह्या तिन्ही काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांना कळवली असता लगेचच त्यांनी आपल्या यंत्रणेमार्फत सदर मजूरांपर्यत आर्थिक मदत पोहचवली. व महाराष्ट्रातील आपल्या स्वगृही पोहचण्यासाठी लागणारा खर्च व संपूर्ण सहकार्य देखील आपण करणार असल्याचे सांगितले. (Paddy planting laborer)

    खासदार धानोरकर यांचं दमदार काम

    कर्नाटक राज्यात गेलेल्या मजूरांमध्ये प्रकाश भोयर, तुळशीदास भोयर, माधूरी भोयर, सुनिता कन्नाके रा. आक्सापुर, दिनेश मेश्राम, स्वप्नील मेश्राम, पायल मेश्राम, आशा मेश्राम रा.गडबोरी, देविदास भानारकर, वैशाली सामुसाकडे, गिता भानारकर, रंजू भानारकर रा.मोटेगाव, अशोक जुमनाके, प्रशांत जुमनाके, वंदना जुमनाके, सायली जुमनाके रा.खातगाव, संदीप ठाकरे, वनिता ठाकरे, शिल्पा ठाकरे रा.गिरगाव, चंद्रभागा सामुसाकडे रा.नवरगाव, निशा मेश्राम रा.पाडरवाणी यांचा समावेश आहे.

    हे सर्व मजूर आता परतणार असुन आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने हे सर्व शक्य झालं आहे. त्यामुळे सर्व मजूरांनी आमदार विजय वडेट्टीवार यांचे आभार देखील व्यक्त केले आहेत.

  • Nylon manja accidents| मांजा ने चिरला एकाचा गळा

    Nylon manja Accidents

    Nylon manja accidents : चिमूर तालुक्यातील नेरी येथील रोशन लांजेकर युवा व्यवसायिक हे काही कामानिमित्त कन्या शाळे जवळून दुचाकीने जात असताना अचानक पंतगचा मांजा गळ्यासमोर आल्याने गळा चिरला गेला.

    भविष्य वाचवायचे असेल तर पर्यावरण वाचवा – राज्यपाल राधाकृष्णन

    दरम्यान त्यांनी तात्काळ मांजा हातात पकडल्यामुळे पुढील अनर्थ टळला असून गळा आणि हात चिरून दुखापत झाली आहे. नेरी येथील डॉ वाघे यांच्याकडे प्राथमिक उपचार करून पुढील उपचार चिमूर येथील रुग्णालयात सुरू आहे.

    सदर प्रकरणी अज्ञात पतंग उडवणाऱ्या वर कारवाई करावी तसेच सदर विक्रेत्यांवर कारवाई करावी Just मागणी नागरिकांनी केली आहे.


    काही दिवसांपूर्वी चंद्रपूर शहरात सुद्धा 8 वर्षीय बालकाचा मांजाने गळा चिरला होता, त्यानंतर पोलीस प्रशासनाने कारवाईची पाऊले उचलत 34 नायलॉन विक्रेत्यांना 3 दिवसांकरिता हद्दपार केले, मात्र ही हद्दपारीची कारवाई काहीच तालुक्यातील विक्रेत्यांवर केली होती, त्यामुळे इतर तालुक्यात नायलॉन विक्री सुरू असल्याचे चित्र आजच्या घटनेवरून पुढे आले आहे.

  • Tiger attack wounds । जखमी T – १ ० ० अखेर वाघ जेरबंद

    Tiger attack wounds

    Tiger attack wounds : ४ जानेवारीला ब्रह्मपुरी वनविभागातील नागभीड वनपरिक्षेत्रातील मींडाळा मध्ये २ नर वाघांमध्ये झुंज झाली, या झुंजीत T- १ ० ० वाघाच्या समोरील पायाला गंभीर जखम झाली तर दुसऱ्या वाघाला मानेवर, पाठीवर व पायावर जखमा झाल्या. वाघ झुंजीत जखमी झाल्याने दोन्ही वाघाला उपचाराची आवश्यकता असल्याने दोघांनाही जेरबंद करण्याची कारवाई वनविभागातर्फे सुरु होती.

    चंद्रपुरातील मंदिर असुरक्षित, तिरुपती बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडा

    वनविभागाच्या मोहिमेदरम्यान १ ० जानेवारीला T – १ ० ० नर वाघाने कोसंबी गवळी नियतक्षेत्रातील मौजा पारडी येथील रहिवासी गुरुदेव पुरुषोत्तम सारवे यांच्यावर हल्ला करून जखमी केले. त्यांनतर वाघाचे वास्तव्य शेतशिवारात कायम होते सोबतच वाघ जखमी असल्याने तो शिकार करू शकत नव्हता. सदर बाब वनविभागाच्या लक्षात आली. १ २ जानेवारीला कोसंबी गवळी नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक १ १ ० मध्ये वनविभागाने बचाव मोहीम राबवित सकाळी सदर जखमी वाघाला डार्ट केले. बेशुद्ध झाल्यावर जखमी वाघाला पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केले. (Tiger injured)

    जेरबंद करण्यात आलेल्या T-१ ० ० वाघाचे वय अंदाजे १ ० वर्षे असून त्याला पुढील वैद्यकीय उपचारासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे.

    वाघाच्या हि बचाव मोहीम वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण कन्नमवार, वैद्यकीय अधिकारी डॉ रविकांत खोब्रागडे, शुटर अजय मराठे, राकेश अहुजा यांनी यशस्वीपणे राबवली.

  • road accident today | कामाला जायला निघाला आणि वाटेतचं….

    road accident today

    road accident today : ब्रम्हपुरी-नागभीड मार्गावरील उराडे राईस मिलजवळ 8 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता ट्रक आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत व्यक्तीचे नाव गणेश तुपट आहे.

    मृत व्यक्तीची माहिती:
    गणेश मंसाराम तुपट (वय 23) हा ब्रम्हपुरी तालुक्यातील उदापुर येथील रहिवासी होता. तो आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता व रामदेवबाबा साल्वंट उदापुर येथे काम करत होता.

    चंद्रपुरातील मुख्य मार्ग राहणार बंद, कारण काय?

    दुर्घटनेचा तपशील:
    8 जानेवारीच्या सकाळी गणेश आपली मोटरसायकल (क्रमांक एमएच 34 बीसी 8429) घेऊन कामासाठी रामदेवबाबा साल्वंटकडे जात असताना नागभीडहून ब्रम्हपुरीकडे येणाऱ्या ट्रक (क्रमांक एमएच 31 एफसी 3729) सोबत समोरासमोर धडक झाली. (Accident news today)

    दुपारी 12 वाजता गणेशच्या चुलत भावाने श्रीहरी मुरलीधर तुपट यांना या अपघाताबद्दल माहिती दिली. श्रीहरी घटनास्थळी पोहोचले व गणेशला ब्रम्हपुरीच्या सरकारी रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

    दुर्गापूर पोलिसांनी पकडला एमडी ड्रग्स

    पोलिस कार्यवाही:
    या घटनेनंतर श्रीहरी यांनी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या आधारे पोलीसांनी ट्रक चालकाविरुद्ध मोटर वाहन कायदा 1988 च्या कलम 184, 281, 106 (1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास पीएसआय बालाजी चौहान करत आहेत.