Category: ग्रामीण वार्ता

ग्रामीण वार्ता (Gramin Varta) विभागात वाचा news34.in वर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बातम्या आणि घडामोडी. शेतकरी योजना, ग्रामपंचायत राजकारण, स्थानिक विकास प्रकल्प, कृषी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स येथे उपलब्ध आहेत. चंद्रपूर ग्रामीण भागातील समस्या, यशोगाथा आणि सकारात्मक बदलांना आम्ही प्राधान्य देतो. ग्रामीण भागातील विश्वासार्ह माहितीसाठी नियमित भेट द्या.

  • Sudhir Mungantiwar Health Initiatives । “सेवाभावी उपक्रमांचा अनोखा वसा – चंद्रपुरात रुग्णवाहिकेचे लोकार्पण!”

    Sudhir Mungantiwar Health Initiatives

    Sudhir Mungantiwar Health Initiatives : आरोग्यसेवा हीच ईश्वर सेवा आहे. वेळेवर रुग्णवाहिका मिळाल्याने अनेकांचे जीव वाचवता येतात. याच उदात्त सेवा भावनेने श्री. विराल चीतालिया यांच्याद्वारे रुग्णवाहिका देण्यात आली. दुर्घटना, आजार व आरोग्याच्या बाबतीत अन्य आपात्कालीन स्थितीत रुग्णवाहिका प्रभावी ठरेल, असा विश्वास आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी आ. श्री. मुनगंटीवार सदैव तत्पर असतात. यापूर्वी अनेक वैद्यकीय सेवा उपक्रम राबवून त्यांनी याची प्रचिती दिली आहे, हे विशेष.

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून स्व. विनोदजी चीतालिया मुंबई यांच्या स्मृती प्रित्यर्थ भद्राबेन चीतालिया, विराल चितालिया, मिलान चितालिया यांच्या सौजन्यातून मुल जलतरण संघटनेला रुग्णवाहिका प्राप्त झाली. या रुग्णवाहिकेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सोमवारी (ता.१०) मुल येथील रामलीला भवन येथे लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी श्री. विरल चीतालीया, अमोल जाधव, नंदकिशोर रणदिवे, संध्याताई गुरनुले, किशोर कापगाते, संजय चिंतावार, प्रवीण मोहुर्ले, अजय गोगुलवार, प्रज्वलंत कडू उपस्थित होते. (Healthcare Services for Poor)

    श्रीमतीचा सौभाग्य सोहळा, आमदार जोरगेवार यांची उपस्थिती

    चितालिया यांनी मोठ्या मनाने सेवाभावाने २१ लाख ८७ हजार ३६३ रुपयांची रुग्णवाहिका प्रदान केली, असे सांगत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. विराल चितालिया यांचे आभार व्यक्त केले. तसेच त्यांनी जलतरण संघटना उत्तमरित्या रुग्णवाहिकेचे देखरेख करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुलवासीयांनी या रुग्णवाहिकीचे समर्पक उपयोग करीत गोरगरीबांचा जीव वाचविण्यासाठी काम करावे, या कामात सर्व समुदाय एकदिलाने सहकार्य करतील, असाही विश्वास आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    Mungantiwar

    आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी
    आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य सेवेमध्ये अनेक महत्वाची कार्य केली आहेत. त्यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरमध्ये कॅन्सर हॉस्पिटल (Cancer Hospital Chandrapur) तयार झाले, नवीन मेडिकल कॉलेज निर्माण झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १३ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती श्री. मुनगंटीवार यांनी केली. त्यांनी आतापर्यंत नऊ रुग्णवाहिका जनतेच्या सेवेकरिता उपलब्ध करुन दिल्या, मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिर घेतली.

    आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी
    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण केली जात आहेत. विशेष बाब म्हणून त्यांनी सात उपकेंद्र जिल्ह्यात मंजुर केली. यामध्ये मुल तालुक्यातील चितेगाव, पिंपरी दीक्षित, फिस्कुटी, सुशी, तर पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकूम, फुटाणा व जामतुकूम या गावांमध्ये उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहेत. आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आतापर्यंत नेत्र चिकित्सा शिबिराच्या माध्यमातून ५० हजार रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. ५ हजारांपेक्षा जास्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ३५ हजारांहून अधिक चष्मे प्रदान करण्यात आले आहेत.

  • Mission Aadhar Initiative | “मिशन आधार उपक्रमातून निराधार महिलेच्या घराला आर्थिक मदतीचा आधार!”

    Mission Aadhar Initiative

    Mission Aadhar Initiative : सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘मिशन आधार’ उपक्रमाच्या माध्यमातून निराधार महिलेला 60 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. या रकमेतून निराधार महिलेचे घर सुरक्षित झाले आहे.

    एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी  ‘मिशन आधार’ नावाचा व्हॉटसअप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये  प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या सर्व अधिकारी/कर्मचारी, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, इतर कर्मचारी तसेच गृहपाल व अनुदानित आश्रमशाळेचे कर्मचारी तसेच संस्थाचालकांचा समावेश आहे.

    चंद्रपुरात पुन्हा सुरु झाला कोंबडा बाजार

    सदर ग्रुप हा गरजु, वंचित, निराधार व अपंगाना मदत करण्यासाठी मानवीय दृष्टीकोनातून तयार करण्यात आला आहे. एक महिन्यापूर्वी चंद्रपुर येथील रहिवासी महिला शिला बालाजी कुमरे, या विधवा व अपंग असून त्यांची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे. त्यांच्या घराचे छत पडण्यावर आलेले आहे, अशी माहिती जितेश कुळमेथे यांनी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांना दिली. (Support for Widows and Disabled)

                श्री. राचेलवार यांनी सदर मॅसेज व घराचा फोटो अधिकारी/कर्मचारी गृपवर पाठविला व सर्वांना या गरजु कुटुंबाला मदत करण्याचे आवाहन केले. प्रकल्प कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी, शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक तसेच अनुदानित आश्रम शाळेचे संस्था प्रमुख मंगेश चटप, मनोहर चटप, प्रशांत चटप तसेच श्री.बजाज, तसेच प्रकल्प कार्यालयातील काही पुरवठादार या सर्वांनी मिळुन 60 हजार रुपयाची मदत गोळा केली.

    ही रक्कम प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, डी. के. टिंगुसले. एस. डी. जगताप, लेखाधिकारी तसेच एस. एस. पाटील, यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत निराधार महिलेला देण्यात आली.  या आर्थिक मदतीतून शिला बालाजी कुमरे या महिलेच्या घराची दुरुस्ती करावयाची जबाबदारी जितेश कुळमेथे यांना देण्यात आली व त्यानुसार सदर महिलेच्या घराची छताची व पक्की दुरुस्ती करण्यात आली. (Tribal Development Project India)

    याबाबत प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, मिशन आधारच्या रुपाने सर्व माझ्या सहकारी अधिकारी/कर्मचारी यांच्या माध्यमातून यापूर्वीही मोठया प्रमाणात गरजु, निराधार, विधवा, अपंग व्यक्तींना वैयक्तीक मदत केली आहे. अशाच प्रकारचे सामाजिक कार्य या ग्रुपच्या मदतीने निरंतर करण्यात येणार आहे. त्यासाठी माझे सहकारी तसेच कार्यालयाशी संबंधित प्रत्येक घटकांनी समोर येऊन मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा श्री. राचेलवार यांनी व्यक्त केली.

  • Eknath shinde birthday celebrations in bhadrawati | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भद्रावतीत विविध सामाजिक उपक्रम

    Eknath shinde birthday celebrations in bhadrawati

    Eknath shinde birthday celebrations in bhadrawati : भद्रावती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते मा. ना. श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भद्रावती शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी, चंद्रपूरच्या सौ. मिनलताई आत्राम यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.

    चिमूर ला जात आहात? तर आधी ही बातमी वाचा

    या विशेष प्रसंगी, भद्रावती शहरातील संपूर्ण ऑटोचालक बांधवांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, गजानन महाराज मतिमंद विद्यालय येथे विद्यार्थ्यांना भोजनदान व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. सौ. मिनलताई आत्राम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहन दिले.

    या कार्यक्रमाला शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये बाळूभाऊ उपलंचीवार, प्रकाश मेंढे, नानाभाऊ दुर्गे (माजी नगरसेवक), योगेश म्यॅनेवार (तालुका प्रमुख, कामगार संघटना), मोहन कोरवन, विवेक दुर्गे, अभय दुर्गे, सचिन जयस्वाल, राधाबाई कोल्हे, मंदाताई धांडे, प्रेमिला कृष्णपलीवार, विधाताई कुचणकर, सुरेखा देठे व इतर शिवसैनिकांचा समावेश होता.

    social work events by shiv sena

    या निमित्ताने शिवसेना पक्ष बळकट होवो, पक्षप्रमुख मा. ना. श्री एकनाथ शिंदे साहेब यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

  • Chimur Ghoda Yatra | चंद्रपूर जिल्ह्यातील या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल

    Chimur Ghoda Yatra

    Chimur Ghoda Yatra : 10 फेब्रुवारीला चिमूर शहरातील ऐतिहासिक श्रीहरी बालाजी महाराज घोडारथ यात्रा असल्याने चिमूर शहरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.


    करीता चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने सुरळीत रहदारीसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल केल्याची अधिसूचना प्रसिद्ध केली असून सदर बदल हा 10 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजतापासून ते 11 फेब्रुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत राहणार आहे. (Changes in the transport system)

    आनंदवनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली मोठी घोषणा

    हजारे पेट्रोलपंप चिमूर ते सरकारी दवाखाना चिमूर पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार, आवश्यकतेनुसार सदर कालावधीत अधिसूचनेत काही प्रमाणात बदल करण्यात येईल.

    वाहतूकदारांनी या मार्गाचा वापर करावा

    वाहतूक सुरळीत रहावी यासाठी वाहनधारकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
    भिसी ते चिमूर-वरोरा-चंद्रपूर जाण्यासाठी कन्हाळगाव-महालगाव-तिरपुरा-गदगाव या मार्गाचा अवलंब करावा, जांभुळघाट ते चिमूर किंवा वरोरा-चंद्रपूर जाण्यासाठी भिसी-कन्हाळगाव-महालगाव-तिरपुरा-गदगाव या मार्गाचा वापर करावा, नेरी वरून चिमूर किंवा वरोरा-चंद्रपूर-भिसी ला जाण्यासाठी जांभुळघाट-भिसी-कन्हाळगाव-महालगाव-तिरपुरा-गदगाव या मार्गाचा वापर करावा व वरोरा कडून भिसी-जांभूळघाटला जाण्यासाठी गदगाव-तिरपुरा-महालगाव-कन्हाळगाव या मार्गाचा वापर करावा.
    वरील निर्देशाचे सर्व वाहतुकदारांनी पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.

  • Chandankheda mobile hospital । चंदनखेडा येथील निःशुल्क फिरते रूग्णालय गोरगरीबांसाठी वरदान – हंसराज अहिर

    Chandankheda mobile hospital

    Chandankheda mobile hospital : ग्रामिण भागातील गोरगरीब, कष्टकरी व तळागाळात असलेल्या नागरिकांना निः शुल्क प्रभावी स्वास्थ्यविषयक अत्याधुनिक सोयी-सुविधा व तातडीची स्वास्थ्य सेवा प्राप्त व्हावी हे माननिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांचे ध्येय आहे. हे ध्येय दृष्टीपथात ठेवून त्यांनी देशातील सार्वजनिक कंपन्या, उद्योगांना सामाजिक दायित्वाच्या भावनेतून स्वास्थ्य सेवा उपलब्ध करण्यास बाध्य केले. निःशुल्क फिरते रूग्णालयांच्या सेवेमध्ये प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टीचे मोठे योगदान आहे.

    चंदनखेडा व परिसरात गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाद्वारा निःशुल्क फिरते रूग्णालय हे याच धोरणाचे प्रतिक असून हे फिरते रूग्णालय भद्रावती तालुक्यातील गोरगरीब जनतेला वरदान ठरेल असे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. (GAIL free ambulance service)

    चंद्रपुरातील गंजवार्डात आग, आमदार जोरगेवार यांनी केली पाहणी


    दि.०६ फेब्रुवारी रोजी भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया (GAIL) द्वारा सामाजिक दायित्व निधी अंतर्गत नि:शुल्क फिरते रूग्णालयाच्या (अॅम्बुलन्स) लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
    या कार्यक्रमास वरोराचे आमदार करण देवतळे, गेलचे कार्यकारी निदेशक अनुपकुमार गुप्ता, संचालक रविकांत कोल्हे, महाजन, डॉ. भगवान गायकवाड, अशोक हजारे, प्रशांत डाखरे, जिपचे माजी सदस्य मारोती गायकवाड, माजी जि.प. सदस्य विजय वानखेडे, माजी नगराध्यक्ष संजय वासेकर, माजी पं.स.सभापती सौ. विद्याताई कांबळे, पं.स.च्या माजी सभापती इंदुताई नन्नावरे, उपसरपंच ग्रा.पं. चंदनखेडा सौ. भारतीताई उरकुडे, महेश टोंगे, विठ्ठल हनवते, डॉ. सागर वझे, सुरेश महाजन, बंडु नन्नावरे, संजय देवतळे, डेविड बागेसर, विठ्ठल कापकर, आदी मान्यवर उपस्थित होते. (Government free health services)


    यावेळी आपल्या मार्गदर्शनात हंसराज अहीर यांनी हे फिरते रूग्णालय चंदनखेडा व भद्रावती तालुक्यातील अनेक गावातील विविध आजाराने तसेच दुर्धर व्याधीने ग्रस्त असलेल्या रूग्णांना उपकारक ठरेल असे सांगितले. या फिरत्या रूग्णालयाचा लाभ ग्रामिण भागातील सर्व स्तरातील रूग्णांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ते म्हणाले, तीन वर्षांपूर्वी राजुरा विधानसभा क्षेत्रात अशीच फिरते दोन अॅम्बुलन्स रूग्णालय सुरू झाले असून, या रूग्णालयाचा लाभ आजपर्यंत हजारो नागरिकांनी घेतला असून घरपोच रूग्णसेवा मिळत असल्याने या रूग्णालयास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. चंदनखेडा येथे लोकार्पण झालेल्या या रूग्णालयामुळे रूग्णांना मोठी सोय होणार असून रूग्णांच्या तकारीचे निरसन होईल त्यामुळे हे रूग्णालय नागरिकांच्या जिवीतासाठी मोलाचे ठरले असेही हंसराज अहीर यांनी यावेळी सांगितले. (Hansraj Ahir latest news)


    याप्रसंगी आमदार करण देवतळे व गेलचे कार्यकारी निदेशक अनुपकुमार गुप्ता यांनीही उपस्थितांना समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गजू रणदिवे, संतोष हनवते, बालाजी मगमवार, चंपत भरडे व इतरांनी विशेष परिश्रम घेतले.

  • Dr. Shrikant Shinde birthday celebration । खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

    Dr. Shrikant Shinde birthday celebration

    Dr. Shrikant Shinde birthday celebration : भद्रावती – युवासेनेचे झुंजार नेते व कुशल नेतृत्व, कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

    रस्ते खोदकामामुळे नागरिकांचे चेहरे झाले लाल

    फळ वाटप कार्यक्रम शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मीनल आत्राम यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. सौ, ग्रामीण रुग्णालयातील प्रत्येक रुग्णांची आधी विचारपूस करीत त्यांना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या व्यक्तिमत्वाची माहिती दिली.

    Bhadrawati hospital

    यावेळी, सौ मिनलताई आत्राम शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी चंद्रपूर, नानाभाऊ दुर्गे मा, नगरसेवक भद्रावती, योगेश म्यॅनेवार, विवेक दुर्गे,अभय दुर्गे, सचिन जयस्वाल,वैभव बावने व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

  • Chandrapur Sand Mafia | तलाठी हल्ला प्रकरण, 2 आरोपींना अटक

    Chandrapur Sand Mafia

    Chandrapur Sand Mafia : 30 जानेवारीला भद्रावती तालुक्यातील कारेगाव येथे तलाठी अनंत गीते वाळू तस्करी रोखण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर वाळू तस्करांनी ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न व धक्काबुक्की करण्यात आला.

    वाघाची शिकार, शिलॉंग मधून आरोपीला अटक


    याबाबत तलाठी अनंत गीते यांनी शेगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध कलम 132, 296, 303(3), 3(2) व 48 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
    शेगाव पोलिसांनी या प्रकरणात वाहन चालक 34 वर्षीय अनिल उर्फ शंभू नथ्थू भरडे रा.चंदनखेडा, 23 वर्षीय महेश गणेश गुंटिकवार यांना अटक केली. इतर आरोपींचा पोलिसांद्वारे शोध सुरू आहे. (Revenue Officer Attack)

    2 वर्षांपासून जिल्ह्यातील वाळू घाटाची लिलाव प्रक्रिया झाली नसल्याने वाळू तस्करी जोमात सुरू आहे, प्रशासनाला न जुमानता व आर्थिक संबंध जोपासत वाळू तस्करी सुरू आहे.


    विशेष म्हणजे या वाळू तस्करी मध्ये जिल्ह्यातील नामवंत राजकीय पदाधिकारी यांचा सहभाग आहे.
    महसूल विभाग तर निद्रा अवस्थेत असल्याने वाळू तस्करी बेलगाम झाली आहे.

  • attack on government employee । वाळू तस्करांचा तलाठीवर हल्ला, आरोपी फरार

    attack on government employee

    attack on government employee : मागील २ वर्षांपासून वाळू घाटाचे लिलाव झालेले नाही, मात्र यावर वाळू तस्कर घाटाच्या लिलावाची वाट न बघता नदीला पोखरण्यासाठी सज्ज झाले आहे, मागील २ वर्षांपासून राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज वाळू तस्करीच्या व्यवसायात उतरलेले आहे. दिवसा राजकारण व रात्री वाळू चोरी अशी दिनचर्या काही नेत्यांची झाली आहे. विशेष म्हणजे प्रशासनातील काही सोबत आर्थिक हितकारण करीत हि महसूल चोरी मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

    अभिनेत्री रिंकू राजगुरू १ फेब्रुवारीला चंद्रपुरात

    ३० जानेवारीला भद्रावती येथील कारेगाव येथे वाळू तस्करी (Sand mafia) थांबविण्यासाठी गेलेल्या तलाठीला जीवघेणा अनुभव आला. (Talathi attack) कारेगाव मध्ये ट्रॅक्टर चालक शंभू भरडे हे गावात वाळू खाली करीत होते तलाठी अनंत गीते यांनी ते दृश्य बघताच रेती बाबत परवाना आहे का विचारले मात्र चालकाकडे परवाना नव्हता. तलाठी गीते यांनी मंडळ अधिकारी व पोलिसांना याबाबत संपर्क केला. मात्र त्यावेळी तिथे उपस्थित तस्कर समर्थकांनी तलाठीच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न करीत धक्काबुक्की केली. 

    पोलीस तक्रार झाली मात्र आरोपी फरार

    पोलिसांनी या प्रकरणी ट्रॅक्टर चालक शंभू भरडे, राजेश्वर गायकवाड, गंटिकवार व त्यांचे बंधू यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १३२, २९६, ३०३ (२), ३ (५), ४८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महसूल खात्यातील महत्वाचा घटक म्हणून तलाठी आपले काम बजावीत आहे मात्र त्याच्यावर वाळू तस्करांचा हल्ला हि गंभीर बाब असताना सुद्धा जिल्हा महसूल प्रशासन निद्रावस्थेत असल्याचे दाखवीत आहे. (Accused absconding)

    जिल्ह्यात मूल, पोंभुर्णा व सावली हे ठिकाण वाळूचे मोठे हब आहे मागील २ वर्षांपासून या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत आहे मात्र प्रशासन या महसूल चोरीवर मुकदर्शकाची भूमिका घेऊन गप्प बसले आहे. या २ वर्षात हायवा ट्र्क वर अत्यन्त दुर्लभ कारवाया करण्यात आल्या आहे हे विशेष. या घटनेवरून पोलीस व जिल्हा प्रशासनाला जाग येणार काय? हि तर येणारी वेळच सांगणार.

  • Aurobindo Realty road closure | अरबिंदो कंपनीची मुजोरी, गावातील रस्ताचं खोदून केला बंद

    Aurobindo Realty road closure

    Aurobindo Realty road closure : अरबिंदो रिअॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रशासनाने जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणायां मौजा किलोनी, बेलोरा, जेना, इजिमा 16 येथील रस्ते रात्रीच्या वेळी चोरट्या पद्धतीने खोदुन बंद केले त्यामुळे सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

    तसेच रस्ता बंद झालयाने परिसरातील शेतकयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भात, भद्रावती पंस माजी अध्यक्ष प्रविण ठेंगणे तसेच बेलोरा ग्रामवासियांनी पत्रकार परिषदेत रस्ता दुरुस्त करून पूर्ववत न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परीषदेच्या माध्यमातुन जिला प्रशासन आणि कंपनी प्रशासनाला दिला आहे. (road closure impact on farmers)

    चंद्रपूर जिल्ह्यात वाळू तस्करांची मुजोरी, तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न


    ठेंगणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 29 जानेवारीच्या रात्री 1.30 वाजता अरबिंदो कंपनीने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावाचे आणि टाकळी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेचे उल्लंघन करून हा रस्ता बेकायदेशीरपणे खोदून बंद केला आहे. त्यामुळे किलोनी, बेलोरा, टाकळी, जेना, पानवडाळा, कांसा येथील ग्रामस्थ आणि प्रकल्पग्रस्त शेतक_यांमध्ये अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Kiloni Belora road dispute)

    याशिवाय, कंपनी प्रशासनाने केलेल्या बेकायदेशीर उत्खननामुळे आणि संबंधित रस्त्यावरील जड वाहतुकीमुळे ग्रामस्थांचे जीव धोक्यात आले आहेत. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा आणि ग्रामपंचायत टाकळी मासिक सभेचा ठराव अंमलात आणला जात नाही, प्रकल्पात प्रस्तावित असलेली संपूर्ण शेती जमीन संपादित केली जात नाही, बेलोरा गावाचे पुनर्वसन केले जाणार नाही आणि प्रकल्पामुळे बाधित झालेल्या लोकांना कायमस्वरूपी नोकरी दिली जाणार नाही तोपर्यंत कंपनी प्रशासनाला रस्ता वळवण्याची परवानगी देऊ नये आणि रस्ता वळवण्याची प्रक्रिया त्वरित रद्द करण्याची मागणी बेलोरा ग्रामवासियांनी केली आहे.


    दरम्यान, कंपनी प्रशासनाने बुधवार 29 जानेवारी रोजी मध्यरात्री 1.30 वाजता मौजा किलोनी, बेलोरा, जेना इंजिमा 16 येथील रस्ता बेकायदेशीरपणे खोदला आहे, ज्यामुळे सार्वजनिक रस्ताचे नुकसान होऊन तो रस्ता बंद करण्यात आला आहे. यामुळे संबंधित गावातील लोकांना ये-जा करण्यात अनावश्यक अडचणी येत आहेत. प्रकल्पग्रस्त ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि ग्रामस्थांच्या स्वाक्षरी ने प्रकल्पग्रस्त समितीने सदर रस्ता दुरुस्त करून पुन्हा सुरू करावा आणि योग्य चौकशी करावी अशी मागणी करून कंपनी प्रशासनाविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वरोरा उपविभागीय अधिकारी यांचेकडे केली आहे. (village road dispute Chandrapur)


    स्थानिक जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि बांधकाम विभागाने या गंभीर प्रकरणाची दखल न घेतल्यास आणि सुरू असलेले काम न थांबविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त समितीने दिला आहे. आंदोलन दरम्यान कंपनीचे काही नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद बांधकाम विभाग प्रशासन आणि कंपनी प्रशासनाची असेल असा ही इशारा दिला आहे.


    पत्रकार परिषदेला भद्रावती पंचायत समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण ठेंगणे, प्रकल्पग्रस्त समिती सदस्य, जेना संगीता सुरेश देहारकर (सरपंच ग्रामपंचायत टाकळी), प्रदीप शंकर महाकुलकर (सरपंच गाव पानवडाळा), प्रभा मोतीराम बोढाले (सरपंच ग्रामपंचायत जेना), हेमंत धानोरकर, हरिचंद्र आसुटकर, बंटी पांडिले, प्रशांत मत्ते, मनोज मत्ते, विलास परचाके, ईश्वर उताने, नीलेश उत्ताणे आणि अनेक प्रकल्पग्रस्त, शेतकरी, ग्रामस्थ आणि प्रकल्पग्रस्त समिती सदस्य उपस्थित होते.

  • Revenue officer assault case | चंद्रपूर जिल्ह्यात तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न

    Revenue officer assault case

    Revenue officer assault case : सर्वसामान्य नागरिकांची कामे जलद गतीने व्हावी, यासाठी राज्य शासनाने सर्व विभागांना 100 दिवसांच्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच  अधिका-यांनासुध्दा फिल्ड व्हीजीट करून नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याबाबत निर्देश दिले आहेत. 

    चंद्रपूर मनपाच्या भ्रष्ट कारभाराची आप ने केली ईडी कडे तक्रार

    याबाबत अधिकारी वर्ग प्रत्येक गावाना भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे. तर एकीकडे भद्रावती तालुक्यातील शेगाव येथे तलाठी अनंत गीते वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत शेगाव पोलीस स्टेशनमध्ये तलाठी गीते यांनी तक्रार दिली आहे. (Shegaon Talathi attack)

    महसूल उत्पन्न वाढीत क्रमांक एक वर असलेल्या जिल्ह्यात सध्या वाळू तस्करांचा मोठ्या प्रमाणात हैदोस सुरू आहे, प्रशासनातील अधिकाऱ्यांसमवेत आर्थिक हित जोपासत हा व्यवसाय सध्या चांगला सुरू आहे.

    चंद्रपूर मनपाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध खड्ड्यात बसून सत्याग्रह आंदोलन

    30 जानेवारीला सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास कारेगाव येथे तलाठी अनंत गीते व सहायक कोतवाल संजय लभाने व नितीन बुरचुंडे रेतीने भरलेला ट्रॅक्टर अडवीत परवाण्याबाबत विचारपूस केली, परवाना नसल्याने सदर ट्रॅक्टर हा भद्रावती तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले असता 2 अज्ञात व्यक्तींनी ट्रॅक्टर चालकाला तलाठ्यांच्या अंगावर वाहन चालविण्यास सांगितले. (Talathi Anant Gite news)

    चालकाने वाहन तलाठ्यांच्या अंगावर चढविण्याचा प्रयत्न केला, तलाठी गीते वाहनसमोरून न हटल्याने त्या 2 व्यक्तींनी तलाठी गीते सोबत धक्काबुक्की करीत त्यांना बाजूला सारले.  त्यांनतर ट्रॅक्टर चालकाने वाहनसहित तिथून पळ काढला.

    या सर्व प्रकाराची माहिती गीते यांनी तहसीलदार राजेश भांडारकर यांना दिली, ट्रॅक्टर चालक व त्या दोन इस्माविरुद्ध गीते यांनी शेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.

    या घटनेचा पटवारी संघाचे विभागीय अध्यक्ष राजूरकर यांनी निषेध करीत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.