Category: ग्रामीण वार्ता

ग्रामीण वार्ता (Gramin Varta) विभागात वाचा news34.in वर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बातम्या आणि घडामोडी. शेतकरी योजना, ग्रामपंचायत राजकारण, स्थानिक विकास प्रकल्प, कृषी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स येथे उपलब्ध आहेत. चंद्रपूर ग्रामीण भागातील समस्या, यशोगाथा आणि सकारात्मक बदलांना आम्ही प्राधान्य देतो. ग्रामीण भागातील विश्वासार्ह माहितीसाठी नियमित भेट द्या.

  • Sushma Swaraj Skill Development Center Ballarpur । सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूरमध्ये अत्याधुनिक कौशल्य विकास केंद्र उभारणीच्या कामाला वेग

    Sushma Swaraj Skill Development Center Ballarpur

    Sushma Swaraj Skill Development Center Ballarpur :  बल्लारपूर येथे साकारत असलेल्या स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्राच्या उभारणीच्या कामाची पाहणी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली. हे केंद्र 20 मे पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या केंद्रात वातानुकूलित बैठक हॉल्स, अत्याधुनिक वर्कशॉप, ई-लायब्ररी तसेच 100 महिलांसाठी शिलाई प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. या सुविधांसाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

    पाहणी दरम्यान भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, मुकेश टांगले कार्यकारी अभियंता, भाजपाचे पदाधिकारी लखनसिंग चंदेल, , प्रज्ज्वलंत कडू, सुरज पेद्दूलवार, संजोग मेढे उपअभियंता, वैभव जोशी शाखा अभियंता, किशोर चीदरवार आदी उपस्थित होते.

    थकबाकीदारांवर चंद्रपूर मनपाची धडक कारवाई

    यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वातानुकूलित हॉलमध्ये इनबिल्ट माईक आणि पोडियम असावेत, अशा सूचना दिल्या. संपूर्ण केंद्रात सीसीटीव्ही सुरक्षा प्रणाली आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरओ यंत्र बसवावे. महिलांसाठी ई-लायब्ररी आणि वर्कशॉप सुविधा अधिक सक्षम करावी. अतिथी निवासाची व्यवस्था जागा उपलब्धतेनुसार करावी. केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे. असे निर्देश दिले. Ballarpur vocational training center update

    स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यासाठी स्व. सुषमा स्वराज यांच्या कुटुंबातील ॲड. बासुरी स्वराज यांना तसेच त्याच्या परिवारातील अन्य सदस्यांना विशेष निमंत्रण देण्याचे नियोजन करावे. बांधकामासाठी अतिरिक्त निधीची मागणी असल्यास नगर विकास विभागाकडून मागणी करण्यात येईल.  हे प्रशिक्षण केंद्र महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाचा भक्कम पाया ठरेल, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

  • Ballarpur new court building project । बल्लारपूरमध्ये नव्या न्यायालयाची उभारणी – राज्यातील सर्वोत्तम न्यायालयांपैकी एक होणार!

    Ballarpur new court building project

    Ballarpur new court building project : बल्लारपूर येथे नवीन न्यायालयाची इमारत उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून, या प्रकल्पासाठी रु. 36 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या इमारतीत सौरऊर्जा प्रणाली, अत्याधुनिक लिफ्ट सुविधा, महिला वकिलांसाठी हिरकणी कक्ष, डिजिटल सुविधांनी सुसज्ज ई-लायब्ररी, तसेच परिसराचे सौंदर्य खुलविण्यासाठी लँडस्केपिंग आदी अत्याधुनिक सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे. ही न्यायालयीन इमारत केवळ बल्लारपूरच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील उत्कृष्ट न्यायालयीन इमारतींपैकी एक ठरेल, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. Women lawyers’ facility Ballarpur

    बल्लारपूर विश्रामगृह येथे न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी, मुकेश टांगले कार्यकारी अभियंता,संजोग मेंढे उपअभियंता ,पवन सावरकर कनिष्ठ अभियंता, ॲड. आशिष धर्मपुरीवार, ॲड. आय.आर. सय्यद, ॲड बुराडे, ॲड. विकास गेडाम, ॲड. भाले, ॲड. लिंगे, ॲड उपाध्याय, ॲड. जिवणे, ॲड. पिंपळकर, ॲड. पोसलवार, ॲड. हस्ते, ॲड. आमटे, ॲड. खर्तड, ॲड. तित्रे, ॲड. गेडाम, ॲड. केशवानी, ॲड भाळे, ॲड. बाजपेयी, ॲड. अविनाश सिंग, ॲड. खनके आदीची उपस्थीती होती.

    चंद्रपूर जिल्ह्यात नवं महसुली गाव

    आमदार श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, भविष्यातील गरजांचा विचार करून, 100 वकिलांसाठी स्वतंत्र इमारत उभारण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सदर न्यायालयीन इमारतीमध्ये सोलर व्यवस्थेसह प्रत्येक मजल्यावर आरो मशीनसह स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. ई-लायब्ररी, वकिलांसाठी विशेष ॲडव्होकेट कॉन्फरन्स हॉल, महिलांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष, आधुनिक सुसज्ज स्वच्छतागृहे, तसेच सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. अखंड वीजपुरवठासाठी 200 केव्ही क्षमतेचा जनरेटर, तसेच महत्वाच्या दस्तऐवजांच्या सुरक्षिततेसाठी लॉकर्स आणि कॉम्पॅक्टरची व्यवस्था करावी. Ballarpur court construction approval

    वाहनांसाठी नियोजनबद्ध पार्किंग सुविधा याशिवाय, इमारतीसाठी उत्कृष्ट दर्जाचे टिकवुडचा फर्निचरसाठी वापर करण्याचे निर्देश संबंधितांना दिलेत. पुढील दोन ते तीन महिन्यांत वकिलांच्या उपस्थितीत या इमारतीचे भूमिपूजन करण्याचा निर्णय वकील परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू करण्यात येणार आहे. सदर इमारत महाराष्ट्राच्या उत्तम न्यायालयाच्या इमारतीपैकी एक असेल असा विश्वास देखील श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

  • Shankar Pat | शंकरपट – परंपरा आणि संस्कृती जिवंत ठेवणारी स्पर्धा – आ. किशोर जोरगेवार

    Shankar Pat

    शेणगाव येथे शंकरपटचे आयोजन; विविध जिल्ह्यांतील बैलजोडींनी घेतला सहभाग

    shankar pat : छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हते, तर ते एक विचार होते. त्यांनी ज्या तत्वांवर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ती मूल्ये आजही आपल्याला प्रेरणा देतात. त्यांच्या दूरदृष्टीत कृषी आणि पशुधन यांचे महत्त्व मोठे होते. आज येथे होणारी बैलजोडी शर्यत ही आपली परंपरा आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे कार्य करत असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    चंद्रपूर जिल्हा होणार क्रीडा हब – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) शेणगाव येथे तीन दिवसीय भव्य बैलजोडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. यावेळी प्रभाकर धांडे, ढोके गुरुजी, मंगेश चटकी, विजय बावणे, विजू मत्ते, दीपक खारकर, महेश जेणेकर आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

    ५ वर्षात चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात विविध विकासकामे

    यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, मागील पाच वर्षांत विविध विकासकामे करता आली. शहरी भागाचा विकास करत असताना ग्रामीण भागाच्या सर्वसमावेशक विकासावरही विशेष भर दिला. शेणगाव येथेही मोठा निधी दिला आहे. पुढेही या भागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. विकासकामे करत असताना धार्मिक आणि क्रीडा क्षेत्रातही मोठे काम सुरू आहे. चंद्रपूरच्या माता महाकालीचा प्राचीन इतिहास देशभर पोहोचविण्यासाठी महाकाली महोत्सवाला सुरुवात केली आहे. तसेच श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून राज्य पातळीवरील विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. (Kishor Jorgewar development projects)

    अशा स्पर्धांमुळे बैल पालनाची परंपरा कायम

    बैल हा आपल्या शेतीचा खरा साथीदार आहे. शेतीच्या कामात बैलांची भूमिका महत्त्वाची आहे आणि अशा स्पर्धांमुळे बैलपालनाची परंपरा अधिक जोमाने टिकून राहते. या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळते, त्यांच्या कष्टांना सन्मान मिळतो आणि आपली पारंपरिक कृषी संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते. आयोजकांनी या स्पर्धेसाठी विविध गटांसाठी आकर्षक बक्षिसे जाहीर करून शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य तो सन्मान दिला आहे. विशेष पारितोषिक विजेत्यांचा सन्मान करून त्यांनी ही परंपरा अधिक भक्कम केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी स्पर्धा पाहण्यासाठी गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Cement industry labor laws । कामगारांच्या न्यायहक्कांसाठी विजय वडेट्टीवार आक्रमक

    Cement industry labor laws

    सिमेंट कंपन्यांना दिला सडेतोड इशारा

    Cement industry labor laws : कामगार धाम गाळतो तेव्हाच कारखान्यातून उत्पादन तयार होते. कामगाराच्या समर्पित भावनेशी कुठलाही खेळ न करता त्यांना मिळणारे भत्ते, सुविधा व त्यांच्या न्यायिक हक्काबाबत  कुठलीही तडजोड नको. अशा सूचना राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार आ. विजय वडेट्टीवार यांनी अंबुजा सिमेंट कंपनी येथे आयोजित व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांना दिल्या. 

    तंबाखू नियंत्रणासाठी चंद्रपूर जिल्ह्यात भरारी पथकाची स्थापना

    औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात सिमेंट उत्पादक कारखान्यासह अन्यही मोठे उद्योग सुरू आहेत. या औद्योगिक क्षेत्रात कामगारांचा न्याय हक्क त्यांना मिळावा यासाठी युवक काँग्रेस सरचिटणीस तथा विजय क्रांती कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार सदैव प्रयत्नशील असतात.

    जिल्ह्यातील अनेक औद्योगिक कंपन्यांमध्ये विजय क्रांती संघटनेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली असून कामगारांचे अनेक प्रश्न सोडविले आहे. अशातच नुकत्याच चंद्रपूर जिल्ह्यातील अंबुजा सिमेंट कंपनी (Ambuja Cement worker issues) व एसीसी सिमेंट कंपनी यातील कामगारांनी स्वच्छ निवृत्ती किमान वेतन भत्ते (Minimum wage for cement workers) व इतर काही सुविधांबाबतच्या समस्या विजय क्रांती कामगार संघटने पुढे मांडल्या.

    कामगारांचा छळ करून नका

    या संदर्भात राज्याची माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी कंपनीच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावून समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जबरदस्तीने कामगारांना स्वेच्छा निवृत्ती देण्यात येऊ नये व कुठल्याही प्रकारे कामगाराचा छळ करण्यात येऊ नये अशा स्पष्ट सूचना आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.

    यावर अंमलबजावणी न झाल्यास योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी खडसावून सांगितले. आयोजित बैठकीस विजय क्रांती संघटना अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार, राजुरा चे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, विजय ठाकरे ,प्रवीण लांडगे, अंबुजा सिमेंट कंपनी तथा एसीसी सिमेंट कंपनीचे कामगार व विजय क्रांती संघटनेचे अन्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

  • Nippon Dendro Project Protest । निप्पॉन डेंड्रो प्रकल्पस्थळी तणाव – आमदारांच्या हस्तक्षेपानंतर कंपनीचे काम थांबले!

    Nippon Dendro Project Protest

    Nippon Dendro Project Protest : चंद्रपूर : निप्पॉन डेंड्रो प्रकल्पाकरीता संपादित करण्यात आलेल्या भद्रावती तालुक्यातील मौजा विजासन, रुयाड (रिठ), पिपरी (देश.), टोला, चारगांव, लोणार (रिठ), तेलवासा, कुनाडा, चिरादेवी व ढोरवासा या गावातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रशासनासोबत चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे आज, दि. १७ फेब्रुवारी २०२५ ला पोलिस बंदोबस्ताचा वापर करुन खाजगी कंपनीने काम सुरु केले होते. प्रकल्पग्रस्तांमार्फत विरोध होऊ नये, यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनाने प्रमुख चार प्रकल्पग्रस्तांना स्थानबद्ध करून ठेवले होते. या घटनेची माहिती शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांना मिळाली असता त्यांनी लगेच पोलिस स्टेशन गाठून स्थानबद्ध केलेल्या प्रकल्पग्रस्तांना बाहेर काढले व घटनास्थळी जावून कंपनीचे काम बंद पाडले.

    आगीत घर झाले भस्मसात, त्या महिलेला आहे मदतीची गरज

    या घटनेतून प्रशासनाचे दुटप्पी धोरण प्रकल्पग्रस्तांच्या नजरेस आले. परिणामी प्रकल्पग्रस्तांमध्ये रोष निर्माण झाला असून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी जिल्हा व तालुका महसूल तथा पोलिस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. सोबतच पुन्हा कंपनीचे काम सुरु झाल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.

    midc land acquisition issue

    उपअभियंता म.औ.वि.म. उपविभाग, चंद्रपुर यांचे कार्यालय, चंद्रपुर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ चंद्रपुर येथील भद्रावती औद्योगिक क्षेत्र विकसीत करण्यात आले आहे. सदर औद्योगिक क्षेत्राकरिता तालुक्यातील निप्पॉन डेंड्रो प्रकल्पाकरिता २८ वर्षे अगोदर संपादित करण्यात आलेली मौजा विजासन, रूयाळ, पिपरी, चारगाव, लोणार, तेलवासा, ढोरवासा, चिरादेवी, गवराळा येथिल जमिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ द्वारा संपादीत केले आहे.

    सदर भुखंड क. बी-०१ क्षेत्र ४३,०००० चौरस मिटर मेसर्स ग्रेटा एनर्जी लिमिटेड भुखंड क. बी-३ क्षेत्र ६३७४८०० चौ.मी मेसर्स न्यु इरा क्लीनटेक सोल्युशन प्रा. लि यांना वाटप करण्यात आली असुन सदर जमीनीचा रक्कमेचा भरणा कंपनीने केलेला आहे. (MIDC Land Acquisition Issue)

    चारगाव येथील सर्वे न.४६ क्षेत्र ७२.५६ हे.आर, लोनार रिठ येथील सर्वे न. ११० क्षेत्र १७६.५४ हे.आर, ढोरवासा येथील सर्वे न. ९१ क्षेत्र १६३. १६, रूयाड रिठ येथील सर्वे न. ५५ क्षेत्र ११९.७६ हे. आर, विजासन येथील सर्वे न. ५० क्षेत्र ११२.८० हे.आर एकुण सर्वे न. ३५२ क्षेत्र ६४४.८२ हे.आर. तसेच मे. ग्रेटा एनर्जी लि. यांना क्षेत्र ५५.०२ हे.आर ही जमिनीवरील अतीक्रमण काढुन कंपनीच्या ताब्यात देण्याकरिता आज दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ ला पोलीस बंदोबस्तात काम सुरु करण्यात आले. यासाठी पोलिस प्रशासन लाठी व हेल्मेटसह बंदोबस्ताचे तयारीने पोहोचले.

    प्रकल्पग्रस्तांचा विरोध होऊ नये म्हणून चार प्रकल्पग्रस्त प्रमुख वासुदेव ठाकरे, प्रवीण सातपुते, संदीप खुटेमाटे, आकाश जुनघरे यांना आज सकाळपासूनच स्थानिक पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करुन ठेवले. आमदार सुधाकर अडबाले वेळेवर आले नसते तर प्रशासन व कंपनी डाव साधण्यात यशस्वी झाले असते. परंतु, आमदार अडबाले यांच्या दणक्याने कंपनीला काम बंद करावे लागले. (Police Action on Land Protests)

    police action on land protests

    प्रकल्पग्रस्त एकरी दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान व प्रकल्पग्रस्त तथा प्रकल्पबाधित गावातील बेरोजगार यांना कौशल्यानुसार नोकरी देण्यात यावी, या मागणीसाठी चर्चा व बैठका करीत आहे. मात्र, प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता, मागण्यांची पूर्तता न करता, पोलिस बंदोबस्तात कंपनीचे काम सुरु करण्याची प्रक्रिया जिल्हा व तालुका प्रशासनाची दुटप्पी भूमिका दर्शवित असल्याचे यावेळी प्रकल्पग्रस्तांनी म्हटले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्त व गावकरी उपस्थित होते. (Nippon Dendro Maharashtra)

    दरम्यान आमदार सुधाकर अडबाले यांची कंपनीचे व्यवस्थापक व उपविभागीय अधिकारी यांचेशी चर्चा झाली असता शेतकऱ्यांसह पुढील बैठक व मागण्यांची पूर्तता होईपर्यंत काम सुरु करणार नाही, असे सांगण्यात आले.

  • State Level Handball Championship । महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला नवी दिशा – श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव

    State Level Handball Championship

    State Level Handball Championship : खेळ केवळ मनोरंजनाचा किंवा शरीरतंदुरुस्तीचा भाग नाही, तर तो शिस्त, संघर्ष, जिद्द आणि विजयाच्या प्रवासाचे प्रतीक आहे. आज येथे महाराष्ट्रभरातील नामांकित संघांनी सहभाग घेतला आहे, ही निश्चितच क्रीडा क्षेत्रासाठी उत्साहवर्धक बाब आहे. हँडबॉल सारखा वेगवान आणि चपळाईचा खेळ खेळताना, प्रत्येक खेळाडूने खेळाडूवृत्ती, संघभावना आणि मेहनतीचे महत्त्व लक्षात ठेवावे. या क्रीडा महोत्सवातून देश पातळीवर राज्याचे नाव लौकिक करणारे उत्कृष्ट खेळाडू घडावेत, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने आरोही बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने खुटाळा येथे राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य हँडबॉल असोसिएशनचे सचिव रणधीर सिंग, आरोही बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धीरज वर्मा, अशोक मत्ते, क्रीडा संयोजक बाल्मीक खोब्रागडे, खुटाळा माजी सरपंच गुड्डू सिंग, हँडबॉल असोसिएशन चंद्रपूरचे सचिव प्रकाश दुमाने, राशिद हुसेन, नकुल वासमवार, अमोल शेंडे, स्वप्निल पटकोटवार आदी मान्यवर उपस्थित होते.

    त्या महिलेला आहे मदतीची गरज, घराला लागलेल्या आगीत संसार उघड्यावर

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, राज्यभरातील युवा खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, त्यांची कौशल्ये विकसित व्हावीत आणि ते राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत, यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून नव्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल आणि महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला नवीन दिशा मिळेल. संघर्ष हाच खरा विजय असून सामना जिंकणारा संघच नाही, तर या स्पर्धेत सहभागी होणारा प्रत्येक खेळाडू विजयासाठी पात्र आहे. खेळाच्या माध्यमातून सशक्त समाज आणि सशक्त राष्ट्र घडविण्याचा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे.

    आपण दरवर्षी श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाचे आयोजन करत असतो. यंदाही हे यशस्वी आयोजन सुरू असून आपण विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचेही आयोजन केले होते. यात विदर्भातील १५० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. आपण आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेमुळे चंद्रपुरात अनेक कुस्तीपटू घडत आहेत. असे आयोजन नियमित करण्याचा पुढेही आमचा प्रयत्न असणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. (Chandrapur Sports News)

    ही स्पर्धा म्हणजे केवळ एक स्पर्धा नाही, तर ती महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीला मिळालेली नवी दिशा आहे. जीवनात संघर्षाला कसे सामोरे जायचे, अपयशावर मात करून यश कसे मिळवायचे, हे खेळ आपल्याला शिकवतात. त्यामुळे ‘खेलो इंडिया (Khelo India)’, ‘फिट इंडिया’ अशा मोहिमांद्वारे सरकारही क्रीडा क्षेत्राला भरघोस पाठबळ देत आहे. विजय किंवा पराजय हा क्षणिक असतो, पण जिंकण्याची मानसिकता आणि खेळाडूवृत्तीच तुम्हाला आयुष्यात मोठे बनवते. मैदानात उतरताना फक्त सामना जिंकायचा असा विचार न करता, खेळाचा आनंद घ्या, स्वतःला सिद्ध करा, असे आवाहन यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    chandrapur sports news

    या स्पर्धेत राज्यभरातील संघांनी सहभाग घेतला होता. २० वर्षांनंतर प्रथमच हँडबॉल स्पर्धेचे राज्यस्तरीय (Handball Tournament 2025) आयोजन करण्यात आले होते. काल, रविवारी या स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. यात नागपूर संघाने २६-११ अशा फरकाने अमरावतीच्या संघावर  दणदणीत विजय मिळविला. तर तृतीय क्रमांकासाठी झालेल्या कोल्हापूर विरुद्ध मुंबई या संघाच्या सामन्यात मुंबई संघाने २४-१० च्या फरकाने कोल्हापूर संघाचा पराभव केला. त्यानंतर हँडबॉल असोसिएशन चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अध्यक्ष अनिल धानोरकर, राज्य संघटनेचे पदाधिकारी सोर, नामदेव डावले, गुड्डू सिंग, मनोज ठेंगणे, विकी रामकृष्ण आदी मान्यवरांच्या हस्ते विजयी संघाला पुरस्कार वितरित करण्यात आला.

  • MSEDCL Electricity Connection Issue । “शेतकऱ्यांच्या विज जोडणी प्रश्नावर खासदार प्रतिभा धानोरकर आक्रमक, महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा”

    MSEDCL Electricity Connection Issue

    MSEDCL Electricity Connection Issue : खासदार प्रतिभा धानोरकर ह्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील नागरिकांच्या प्रश्नासाठी अनेक वेळा आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. सध्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी देण्याच्या प्रश्नावर त्या आक्रमक झाल्या असून विज द्या अथवा 2018 पासून जमा केलेल्या सुरक्षा रकमेवर व्याज द्या अन्यथा महावितरण च्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसह घेराव घालणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

    चंद्रपुरातील हा मार्ग राहणार बंद

    खासदार प्रतिभा धानोरकर ह्या नागरीकांच्या प्रश्नांबद्दल संवेदनशील असून सध्या त्यांनी 2018 पासून जिल्ह्यातील 1590 शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना विज (Agricultural Pump Power Connection) मिळवून देण्याकरीता सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. सदर शेतकऱ्यांनी वीज जोडणी करीता सुरक्षा ठेव देखील जमा केलेली आहे.

    या विषयासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्मरणपत्र लिहून शेतकऱ्यांची मागणी मान्य करण्याची विनंती केली आहे. उशीर झाल्यास सामान्य नागरीकांकडून विज बिलावर व्याज घेणारे महावितरण 2018 पासून शेतकऱ्यांना विज जोडणी देण्यास असमर्थ ठरले आहे.

    या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात शेतकऱ्यांना विज किंवा शेतकऱ्यांनी महावितरण कडे सुरक्षा ठेव स्वरुपात भरलेल्या पैशावर व्याज न दिल्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसह घेराव घालणार (Pratibha Dhanorkar Farmers Protest) असल्याचे खासदार धानोरकरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री काय भुमिका घेतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • Vijay Wadettiwar Development Work । आमदार विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांची बोलती केली बंद

    Vijay Wadettiwar Development Work

    Vijay Wadettiwar Development Work : एखादी काम हाती घेतल की ते पूर्णत्वास  नेल्याशिवाय स्वस्त न बसणारे व दिला शब्द समर्थपणे पुर्ण करणे अशी राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांची राजकीय क्षेत्रात ओळख आहे. याचाच प्रत्यय नुकताच सिंदेवाही व ब्रम्हपुरी तालुक्यांतील नागरीकांना आला असुन आपल्या अथक प्रयत्नातून आ.वडेट्टीवार यांनी मंजुर केलेल्या सिंदेवाही – पाथरी तसेच ब्रम्हपुरी – आरमोरी रेल्वे मार्गावरील उडाण पुलाचे बांधकाम सुरू झाल्याने नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी अफवा पसरविणाऱ्या विरोधकांची प्रचंड गोची होऊन बोलती बंद झाल्याची दिसून येते.

    आपल्या घराण्याला कुठलाही मोठा राजकीय वारसा नसताना स्वकर्तृत्वाच्या बळावर बड्या प्रस्थापितांना धक्का देऊन विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्याची जन्मभूमी  तर  गडचिरोली जिल्हा ही कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्राच्या मातीत विजय वडेट्टीवार नावरूपाने एक कणखर कर्तुत्ववान नेतृत्व उदयास आल. एक सामान्य कार्यकर्ता ते राज्याचे कॅबिनेट मंत्री व विरोधी पक्षनेते पदापर्यंत मजल मारून जनतेने दाखविलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता सार्थक ठरवीत प्रगल्भ इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पूर्वी चिमुर तर आता ब्रह्मपुरी मतदार संघाचा झपाट्याने विकास केला. (Sindewahi Pathari Flyover Project)

    जिल्हाधिकारी यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

    शेतकरी, कामगार, बेरोजगार युवक, शिक्षणार्थी विद्यार्थी, नोकरदार वर्ग तसेच इतर जनसामान्य यांच्या प्रश्नांना घेऊन शासन दरबारी समर्थपणे लढा देऊन वेळीच निकाली काढणे अशी आमदार विजय वडेट्टीवार यांची ख्याती आहे. त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेतेपदी असताना विरोधी बाकावरून आपल्या क्षेत्रासाठी हिरीरीने समस्या मांडून  सिंदेवाही ते पाथरी तसेच ब्रह्मपुरी ते आरमोरी या मार्गावरील रेल्वे फाटकावर वाहतूकदारांना तसेच शाळकरी विद्यार्थी व इतर जनसामान्यांना होत असलेला त्रास बघून प्रयत्नांची पराकाष्टा केली. याचे फलित म्हणून सिंदेवाही – पाथरी रेल्वे मार्गावरील उडान पुलाकरिता (९० कोटी) व ब्रम्हपुरी ते आरमोरी रेल्वे मार्गावरील उडान पुलाकरिता (७५ कोटी) इतका भरघोस निधी मिळवून दिला. तत्पूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक काळात माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विकासाचा झंजावात पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली होती. (Sindewahi Bramhapuri Road Projects)

    अशातच विरोधकांनी मतदार जनतेची दिशाभूल करण्यासाठी विविध अफवा पसरवून रेल्वे उडान पूल होणार नसल्याचे सांगत मतदारांना भ्रमिष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न चालविला. मात्र दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्नांची पराकाष्टा करणारे आ .विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेली सदर दोन्ही कामे प्रारंभ झाली असून नागरिकांमध्ये आनंद तर विरोधकांची बोलती बंद झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तत्पूर्वी सिंदेवाही – मूल मार्गावरील बेलघाटा व मूल ते चंद्रपूर मार्गावर प्रचंड वाहतूक असतानाही तद्वतच येथे उडानपुलांची नितांत गरज असतानाही येथील लोकप्रतिनिधी नागरिकांची तसेच वाहतूकदारांची समस्या सोडविण्यात आजवर असमर्थ ठरले आहे. (Government Road Projects India)

    मात्र माजी विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करून सर्वसामान्य नागरिक व वाहतूकदारांना होणारा नाहक त्रास या समस्याचे स्वबळावर निराकरण करण्यात यश प्राप्त केले आहे. निर्माणधीन सदर दोन्ही पुलाचे काम पूर्ण होताच सदर मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांच्या वेळेचा होणारा अपव्यय व वाहतुकीचा होणारा खोळंबा याला पूर्णविराम मिळणार असून ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र विकासाचे आणखी एक पाऊल पुढे टाकणार असे मत सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केलं जात आहे.

    :

  • District Collector School Visit । जिल्हाधिकाऱ्यांची विजासन शाळेला भेट: विद्यार्थ्यांसोबत संवाद, शैक्षणिक सुविधांची पाहणी

    District Collector School Visit

    District Collector School Visit : 100 दिवस कृती आराखड्याअंतर्गत वरिष्ठ अधिका-यांनी गावात भेटी देऊन शाळा, आरोग्य केंद्र आणि अंगणवाडी आदींची पाहणी करावी तसेच नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात, अशा सुचना राज्य शासनाच्या वतीने सर्व जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. याच अनुषंगाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी भद्रावती येथील विजासन शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

    चंद्रपूर ते मुंबई रेल्वे पुन्हा सुरु होणार, आमदार जोरगेवार यांचा पाठपुरावा

    यावेळी वरोराचे उपविभागीय अधिकारी जेनीथचंद्र दोन्तुला, भद्रावतीचे तहसीलदार श्री. भांडारकर, संवर्ग विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर, नगर पालिकेच्या मुख्याधिकारी शेळकी मॅडम, भद्रावती केंद्राचे केंद्रप्रमुख मोरेश्वर विद्ये आदी उपस्थित होते. (Government School Inspection)                                               

    यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी शाळेतील ऍस्ट्रॉनॉमी लॅबची विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी नियमितपणे अभ्यास करून जीवनात यश प्राप्त करावे. कठोर मेहनतीशिवाय दुसरा पर्याय नाही. आता पुढील महिन्यापासून परीक्षा सुरू होतील. त्याची चांगली तयारी करावी. तसेच शिक्षणासोबतच आपल्यातील कलागुणसुध्दा विकसीत करावे. यावेळी जिल्हाधिका-यांनी शाळेतील परस बागेची पाहणी केली तसेच शाळा, शालेय परिसर या सर्व बाबीविषयी समाधान व्यक्त केले.  (Chandrapur District Administration)

    या भेटीच्या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगन्नाथ भाऊ दानव, शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पेंदा, सहायक शिक्षक अमोल व-हाडे, जीवने मॅडम, चांदेकर मॅडम, डोंगरे मॅडम, सुरज उमाटे, दीपक कावटी व इतर मान्यवर उपस्थित होते.

  • Tadoba Zero Waste Initiative । “ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील गावांचा स्वच्छतेकडे प्रवास”

    Tadoba Zero Waste Initiative

    Tadoba Zero Waste Initiative : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील सर्व गावांमध्ये कचरा वर्गीकरण, कचरा विलगीकरण तसेच जबाबदारीने कचरा निर्मूलन इत्यादी मार्गाचा अवलंब करून गाव पातळीवरील घनकच-याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने ‘झिरो वेस्ट ताडोबा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहिमेसाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. हे थेट भद्रावती तालुक्यातील आष्टा गावात सकाळीच दाखल झाले. यावेळी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी उपस्थित होते.

    स्वच्छता मोहिमेदरम्यान जिल्हाधिका-यांनी गावातील नागरिक व शाळकरी मुलांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले. तसेच शेतक-यांना ॲग्रीस्टॅक योजनेची माहिती दिली. सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी तयार करून घ्यावे. संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी, सीएससी सेंटर, महाऑनलाईन (सेतू) केंद्र या माध्यमातून मोफत फार्मर आयडी तयार करून मिळेल, असे सांगितले. यावेळी जिल्हाधिका-यांनी गाव तिथे स्मशानभूमी, अंगणवाडी व गावातील इतर सर्व समस्या जाणून घेतल्या. (Tadoba Buffer Zone Waste Management)

    चंद्रपूर शहरासाठी स्वतंत्र जलस्रोत निर्माण करा – खासदार प्रतिभा धानोरकर

    दर मंगळवारी कोअर विभागातील पर्यटन बंद असल्याने सर्व जिप्सी वाहन चालक, मार्गदर्शक इत्यादी लोकांना समाविष्ट करून तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून हे अभियान राबविण्यात येते. प्रत्येक आठवड्याला वनविभागाद्वारे एका नवीन गावी स्वच्छता अभियान राबविण्यात येते. आष्टा हे गाव या उपक्रमात सहभागी होणारे 13 वे गाव ठरले. ताडोबा प्रशासनाव्दारे ही स्वच्छता मोहीम आखण्यात आली होती. तहसीलदार, गटविकास अधिकारी, वन कर्मचारी तसेच गावकरी अशा जवळपास 100 लोकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विलगीकरण केलेला 96.6 किलो प्लास्टिकचा कचरा गोळा करून प्रक्रियेकरिता देवाडा येथील विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आला. (Tadoba Tiger Reserve Cleanliness Drive)

    दर मंगळवारी राबवण्यात येणा-या या उपक्रमाद्वारे आजपर्यंत तब्बल 75 हजार किलो पेक्षा जास्त वाळला कचरा प्रक्रियेसाठी पाठवण्यात आलेला आहे. तर एकट्या मोहर्ली गावात ओल्या कचऱ्यापासून 30 हजार किलो पेक्षा जास्त कंपोस्ट खताची निर्मिती करण्यात आली आहे. या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून अनेक गावकरी, महिला बचत गट, विविध समाजसेवी संस्था तसेच इतर समाज घटक स्वयंस्फूर्तीने वनविभागाने सुरू केलेल्या या उपक्रमात सहभागी होत आहेत, अशी माहिती उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी यांनी दिली.