Category: ग्रामीण वार्ता

ग्रामीण वार्ता (Gramin Varta) विभागात वाचा news34.in वर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बातम्या आणि घडामोडी. शेतकरी योजना, ग्रामपंचायत राजकारण, स्थानिक विकास प्रकल्प, कृषी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स येथे उपलब्ध आहेत. चंद्रपूर ग्रामीण भागातील समस्या, यशोगाथा आणि सकारात्मक बदलांना आम्ही प्राधान्य देतो. ग्रामीण भागातील विश्वासार्ह माहितीसाठी नियमित भेट द्या.

  • TB free villages India । 208 ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त: चंद्रपूरचा ऐतिहासिक विजय

    TB free villages India

    TB free villages India : क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 208 ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 100 दिवस क्षयरोग दूरीकरण मोहीम 7 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली असून आज जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 24 मार्च रोजी या मोहिमेचा समारोप करण्यात आला. Chandrapur TB program

    चंद्रपूर मनपाने गांधी चौकात प्रसिद्ध केली थकबाकीदारांची नावे

    प्रियदर्शनी सभागृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललीतकुमार पटले, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. भास्कर सोनारकर, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. संदीप गेडाम, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे, डॉ. सौरभ राजुरकर, डॉ. वैभव आगलावे आदी उपस्थित होते.

    जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 15 ते 31 मार्च पर्यंत क्षयरोग पंधरवाडा साजरा करण्यात येत असून जिल्हा स्तरावर क्षयरोग जनजागृती करण्याकरीता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे. गावपातळीवरील लोकांच्या सहकार्याशिवाय टीबी मुक्त ग्रामपंचायत करणे शक्य झाले नसते. World TB Day 2025

    100 दिवस मोहिमेदरम्यान 4 लक्ष 81 हजार 455 अतिजोखिमेच्या व्यक्तींचे क्षयरोगाबाबत पडताळणी करण्यात आली. 3241 निक्षय शिबीर घेण्यात आले व 10886 लोकांची नॅट तपासणी करण्यात आली. 25059 व्यक्तींचे छातीचे एक्स- रे करण्यात आले असून 1114 नविन क्षयरुग्ण शोधून त्यांना औषधोपचार सुरू करण्यात आला.

    जनजागृती रॅलीचे आयोजन : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा क्षयरोग केंद्र चंद्रपूर येथून क्षयरोग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅलीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय व प्रभादेवी नर्सिंग महाविद्यालय येथील विद्यार्थी, वैद्यकीय अधिकारी, सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी व जिल्हा क्षयरोग केंद्र, येथील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. Rural TB eradication

    उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सत्कार : शहरी भागात उकृष्ट टीबी नोटीफिकेशन केल्याबद्दल डॉ. सौरभ राजुरकर, डॉ. शरयू पाझारे, डॉ. आनंद बेर्डले, डॉ. प्रविण पंत, डॉ. अमरीप बुक्काबार यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ. मंगेश भरडकर यांनी संक्षयित क्षयरुग्णांची माहिती दिल्याबद्ल तसेच प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत स्टील ऑथरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, मॉउंट कारमेल कॉन्व्हेट हायस्कूल, राजीव रतन हॉस्पीटल, घुग्घस, डॉ. कोमल मुनेश्वर,  अमित जयस्वाल, नदीम कुरेशी या सर्वांनी गरजू क्षयरुग्णांना पोषण आहार किट वितरीत केल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.

    विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस : क्षयरोगाची जनजागृती करण्याकरीता शहरी व ग्रामीण भागात चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच स्पर्धेत यशस्वी होणा-या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

    कार्यक्रमाचे संचालन हेमंत महाजन व अश्विनी चांदेकर यांनी केले. आभार डॉ. माधुरी टेंभे यांनी मानले.

  • Nippon project farmers protest | निप्पॉन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश! तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू

    Nippon project farmers protest

    Nippon project farmers protest : भद्रावती – प्रति एकरी दहा लाख रुपये अनुदान, प्रकल्पग्रस्त, कंपनी व एमआयडीसी मध्ये त्रिपक्षीय करार करणे व प्रकल्पग्रस्तांना नोकरीची हमी देणे या प्रमुख मागण्यांसाठी एक आठवड्यांपूर्वी मोर्चा काढून व निवेदन देऊनही शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याची दखल न घेतल्याने अखेर निप्पान प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे दिनांक 24 रोज सोमवारला सकाळी 11 वाजेपासून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. Nippon industrial land dispute

    चंद्रपूर midc परिसरात भीषण आग

    सदर धरणे आंदोलन हे पाच एप्रिल पर्यंत सुरू राहणार असून यादरम्यान रोज दहा ते सहा वाजेपर्यंत या आंदोलनात महिला, पुरुष प्रकल्पग्रस्त आपल्या परिवारासह क्रमाक्रमाने सहभागी होणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे प्रसिद्धी प्रमुख लिमेश माणूसमारे यांनी दिली आहे.

    धरणे आंदोलनाच्या पहिल्या दिवशी नानेबाई माथनकर, योगिता बदखल, सुनीता बदखल, भाग्यश्री बदखल, शारदा खापणे, मनीषा सावणकर, शुभांगी चोपणे, बेबी मेश्राम, रिता बोडेकर, इंदू गौरकर, चंद्रकला बावणे आदी महिलांनी पुढाकार घेत सदर आंदोलनात आपला सहभाग नोंदविलेला आहे.

    सदर आंदोलनाची दखल शासनाने न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे देण्यात आला आहे. सदर आंदोलनात निप्पान प्रकल्पग्रस्तांनी क्रमाक्रमाने सहभागी होऊन आपली ताकद दाखवावी असे आवाहन निप्पान प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे करण्यात आले आहे.


    या आधी सुद्धा आंदोलनं झाले असताना शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले तसेच वासुदेव ठाकरे यांना तडीपार करण्यात आले.यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत असून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील असे सांगितले.

  • Wcl Workshop theft case । चोरट्यांची सिनेस्टाईल चोरी! वेकोलि वर्कशॉपची भिंत फोडून 5.72 लाखांचा ऐवज लंपास

    Wcl Workshop theft case

    बल्लारपूरमध्ये धाडसी चोरी: वेकोलि वर्कशॉपला टार्गेट करून महागडे गियर पंप गायब!

    Wcl Workshop theft case : वेकोलि बल्लारपूर मधील वर्कशॉपच्या भिंतीला होल पाडून अज्ञातांनी डबल टेंडन्ट गेअर पंप व इतर भंगार असा एकूण ५ लाख ७२ हजार रुपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी पोलिसांनी २ आरोपीना अटक केली आहे.

    बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेकोलिच्या वर्कशॉप मध्ये चोरांची नजर पडली आणि त्यामधील लोखंडी साहित्यांची धाडसी चोरी करण्यात आली. यासाठी आरोपींनी एखाद्या चित्रपटासारखी कामगिरी करीत वर्कशॉपच्या भिंतीला होल पाडत त्यामधील महागड्या लोखंडी वस्तू २ मग टेंडन्ट गियर पंप आणि भंगार चा माल चोरून नेला. double tandem gear pump theft

    चंद्रपुरातील घुग्गुस मध्ये अतिशय संतापजनक प्रकार

    याबाबत सुरक्षा व्यवस्थापकाने बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, बल्लारपूर पोलिसांनी कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी याबाबत तपास सुरु करीत अज्ञात आरोपी व चोरी गेलेल्या मालाचा शोध सुरु केला.

    पोलिसांनी या चोरी प्रकरणात २० वर्षीय श्रीराज संग्राम बहुरिया राहणार सरदार पटेल वॉर्ड बल्लारपूर व २२ वर्षीय करण इंदू निषाद राहणार रामनगर सस्ती राजुरा याला अटक केली. आरोपीसोबत इतरही साथीदार होते अशी माहिती पोलिसांना तपासात प्राप्त झाली. stolen scrap metal recovery

    दोन्ही आरोपीनी चोरी केलेला मुद्देमाल वेकोलि वर्कशॉप च्या मागील भागात असलेल्या झुडपात लपून ठेवला होता. पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त केला.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या नेतृत्वात सपोनि मदन दिवटे, पोलीस कर्मचारी आनंद परचाके, रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, संतोष पंडित, सुनील कामतकर, पुरुषोत्तम चिकाटे, शरदचंद्र कारुष, वशिष्ठ रंगारी, मिलिंद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हाण, नासिर सय्यद, अनिता नायडू यांनी केली.

  • construction equipment distribution policies | तालुका स्तरावरच बांधकाम साहित्य वाटप करा; अन्यथा आंदोलन – मिनलताई आत्राम यांचा इशारा

    construction equipment distribution policies

    construction equipment distribution policies : भद्रावती: महाराष्ट्र शासनाच्या योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना सुरक्षा व आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात येते. सध्या हे साहित्य चंद्रपूर जिल्ह्यात एमआयडीसी केंद्रातून वाटप केले जात आहे. मात्र, ऑनलाईन पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे मागील काही दिवसांपासून हे साहित्य मिळणे बंद आहे. त्यामुळे मजूर व कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. construction safety equipment suppliers

    चंद्रपुरात तापमानाचा पारा वाढतोय, प्रशासनाने सुचविले उपाय

    यासंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख सौ. मिनलताई आत्राम यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन देत इशारा दिला की, बांधकाम साहित्याचे वाटप प्रत्येक तालुक्याच्या स्तरावर करण्यात यावे, अन्यथा आंदोलन छेडले जाईल.

    कामगारांचे हाल, प्रशासनाचा हलगर्जीपणा

    कामगारांना साहित्य वाटपासाठी अनेकदा एमआयडीसीमध्ये बोलावले जाते, मात्र नियोजित तारखेलाही साहित्य मिळत नाही. परिणामी, मजूर दोन-दोन दिवस तिथेच थांबतात. याठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. यामुळे कामगारांचे मोठे हाल होत आहेत. अधिकारी वर्गाच्या मनमानीमुळे हा प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    तालुका स्तरावरच वाटप करण्याची मागणी

    चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व मजूर एमआयडीसी केंद्रावर येऊन साहित्य घेतात. मात्र, साहित्य उपलब्ध नसल्याने निराश होऊन परतावे लागते. यामुळे त्यांचा रोजगार बुडतो आणि आर्थिक नुकसान होते. जर प्रत्येक तालुक्यातच बांधकाम साहित्याचे वाटप केले गेले, तर मजुरांना मोठा दिलासा मिळेल.

    तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलन

    या संदर्भात मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनाही निवेदन देण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घ्यावी आणि त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख सौ. मिनलताई आत्राम यांनी दिला आहे.

  • farmer fights tiger | वाघाच्या बछड्याने हल्ला केला, शेतकऱ्याने दिले जोरदार प्रत्युत्तर!

    farmer fights tiger

    farmer fights tiger : सकाळी शेतात काम करीत असताना वाघाच्या बछड्याशी शेतकऱ्याचा अचानक सामना झाला. बछड्याने शेतकऱ्यावर हल्ला केला.  त्याला प्रत्युत्तर म्हणून शेतकऱ्याने हल्ला परतावून लावला. काही वेळ दोघांमध्ये झुंज झाली, परंतु शेतकरी भारी पडल्याने वाघाच्या बछड्याला पळून जाणे भाग पडले. शेतकरी आणि बछड्यांमध्ये झालेला हा थरार ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदगाव जानी शेत शिवारात रविवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडला. या घटनेमध्ये शेतकरी गोवर्धन डांगे हे जखमी झाले. त्यांच्यावर ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. tiger attack in Chandrapur

    वाळू अभावी घरकुलाचे काम ठप्प, आमदार जोरगेवार यांनी विधानसभेत उपस्थित केला प्रश्न


    ताडोबा अभयारण्य असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे कुठेही, केव्हाही दर्शन होते. ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, शेतमजुरांना वाघ शेत शिवार, गावाशेजारी सहज बघायला मिळते. चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे दर्शन इतके शक्य झाले आहे, त्यामुळे शेतकरी शेतमजुरांना शेतावर जाताना काळजीनेच जावे लागत आहे. आज रविवारी ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदगाव ज्यांनी येथील 42 वर्षीय गोवर्धन डांगे गावापासून जवळ असलेल्या स्वतःचे शेतामध्ये सकाळी सव्वासात वाजता गेले होतें डांगे यांनी शेता मध्ये उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे आणि धानाला दिवस रात्र पंपाद्वारे पाणी द्यावे लागत आहे. tiger attacks on farmers

    त्यामुळे त्यांना शेतावर जाणे गरजेचे आहे. सकाळी शेतावरगेले आणि काम करू लागले. शेतासभोवती दूरवर जंगल नाही. तरीही अचानक एक वाघाचा बछडा शेतात येऊन धडकला. काम करीत असलेल्या डांगे यांच्या समोर तो अचानक पुढे आल्याने त्यांना धडकी भरली. वाघ मोठा असो की छोटा तो वाघ असते. त्या बछड्याने क्षणाचाही विलंब न करता थेट शेतकऱ्यावर हल्ला केला.  तेवढ्याच तत्परतेने बछड्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांने हल्ला परतावून लावला. Chandrapur tiger incidents

    शिकारी वृत्ती अंगात असलेल्या बछड्याने वारंवार त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात शीताफिने सदर शेतकऱ्यांनी हल्ले परतवून लावले. काही वेळ त्याच्याशी झुंज देऊन त्याचा हल्ला परतावत शेतकरी भारी पडला. आणि बछड्याला पळून जाण्याशिवाय मार्ग उरला नाही. तो पळून गेला. मात्र यामध्ये शेतकरी जखमी झाला. पुन्हा पुन्हा बछडा परतून येईल त्यामुळे भयभीत झालेल्या शेतकरी लगतच्या विहिरीत उतरला तेथूनच त्याने मोठ्या मुलाला फोनवरून माहिती दिली.

    मोठा मुलगा आणि गावातील शेकडो नागरिक शेत शिवारात दाखल झाले. वडील रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा झालेल्या आहेत. त्यांनी थराराची आपबीती कुटुंबियांना आणि नागरिकांना सांगितली. त्यानंतर त्याला लगेच ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. शेतकऱ्यांने झुंज केल्यामुळेच वाघाला पळून जावे लागले नाही तर पुन्हा एका शेतकऱ्याला जीवापासून मुकावे लागले असते.   

    तपाड परिसरात काही दिवसांपासून वाघ व बछड्यांचे दर्शन होत आहे. त्यापैकीच एखादा बछडा नांदगाव जानी शिवारात आला असावा असा संशय शेतकरी वर्तवित आहेत.


    ताडोबा असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघाला सहज पाहण्यासाठी अभयारण्यात जाण्याची गरज नाही तर शेत शिवारात गावालगत कुठेही वाघाचे दर्शन हमखास घेता येते. मात्र शेतकरी शेतमजूराणा कामावर जाताना धडकीच भरते. शेतशिवारात भटकंती करणाऱ्या वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

  • Maharashtra Job Fair for Graduates | थेट मुलाखत, थेट नोकरी – 29 मार्चला भद्रावतीत संधीचे सोने करा

    Maharashtra Job Fair for Graduates

    Maharashtra Job Fair for Graduates : चंद्रपूर : कोळसा आणि सीमेंट उत्पादन, ऊर्जा निर्मिती यासाठी ख्यातीप्राप्त असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील पदवीधर बेरोजगारांसाठी गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने 29 मार्चला सकाळी 10 ते 6 या वेळेत येथील भद्रावती येथील स्वागत सेलिब्रेशन येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

    चंद्रपुरातील घोडाझरी येथे पर्यटनाला गेलेल्या 5 युवकांचा मृत्यू

    नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्रातील सुमारे 40 नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी होणार असून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना त्याच ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. Govindrao Wanjari Foundation Jobs

    सदर रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदवीधर बेरोजगार सहभागी होऊ शकतील. तत्पूर्वी त्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. abhijitwanjari.com या वेबसाईटवर जाऊन ही नोंदणी करता येईल. नोंदणी झालेल्या उमेदवारांनी 29 मार्च रोजी नियोजित ठिकाणी शैक्षणिक पात्रतेचे सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

    संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित कंपनीना देण्यात आलेल्या क्रमांकाचे टोकण उमेदवारांना देण्यात येईल. त्यानुसार, संबंधित क्रमांकाच्या दालनात त्यांची मुलाखत होईल. निवड झालेल्या उमेदवारांना मेळाव्यातच नियुक्तीपत्र देण्यात येईल. या मेळाव्यात जास्तीत जास्त पदवीधर बेरोजगारांनी सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी केले आहे.

  • Ghoda Jhari Lake drowning incident । चंद्रपूरमध्ये भीषण दुर्घटना! पर्यटनाला गेलेल्या पाच तरुणांचा तलावात बुडून मृत्यू

    Ghoda Jhari Lake drowning incident

    Ghoda Jhari Lake drowning incident : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात असलेल्या घोडाझरी प्रकल्पावर पर्यटनासाठी गेलेले पाच मुले तलावात बुडाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज शनिवारी ( 15 मार्च) सायंकाळ चार वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी नागभीड पोलीस दाखल झाल्यावर त्यांनी शोधमोहीम राबवित पाचही युवकांचे मृतदेह बाहेर काढले.

    5 मुले ही जिल्ह्यातीलच चिमूर तालुक्यातील साटगाव कोलारी येथील होते. जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे , अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे व तेजस संजय ठाकरे अशी तलावात बुडालेल्या मुलांची नावे आहेत. यापैकी दोन सख्खे भाऊ असून दोन चुलत भाऊ आहेत. हे चार जण गावंडे कुटुंबातील आहेत. तर एका मित्राचा समावेश आहे. Ghoda Jhari lake news update

    चंद्रपुरात बस व ट्रकचा भीषण अपघात, वाहकाचा मृत्यू तर १५ प्रवासी गंभीर


    चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात घोडाझरी पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी ब्रिटिश कालीन तलाव आहे. तलाव व पर्यटनस्थळ असल्यामुळे येथे बारमाही पर्यटकांची गर्दी असते. शनिवार आणि रविवारी तलावावर बाहेरून पर्यटक येतात. आज शनिवारी चिमूर तालुक्यातील साट गाव कोलारी येथील जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे , अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे, तेजस संजय ठाकरे व आर्यन हेमराज हिंगोली हे सहा मुले पर्यटनासाठी आली होती. दुपारपासून त्यांनी घोडाझरी तलावावरील पर्यटनाचा आनंद घेतला.

    त्यानंतर त्यांना पोहावयाचे राहवले नाही. त्यामुळे सायंकाळी चारच्या सुमारास नळ पाणीपुरवठा योजना योजनेच्या विहिरी असलेल्या परिसरात सहा मुले पोहण्याकरिता तलावात उतरली. पाण्याची पातळी खोल गेल्याने आणि या परिसरात डोह असल्यामुळे सहाही जण डोहामध्ये बुडाले. त्यापैकी आर्यन हेमराज हिंगोली हा 16 वर्षाचा मुलगा कसाबसा वाचला तर उर्वरित जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे , अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे, तेजस संजय ठाकरे हे पाचही मुले तलावात बुडाली. पाच मुलांपैकी चार गावंडे कुटुंबातीलच आहेत.

    त्यामध्ये दोन सख्खे भाऊ आहेत. तर एका मित्राचा समावेश आहे. सर्व मुले 18 ते 22 वर्षे वयोगटातील आहेत. तलावातून वाचून बाहेर आलेल्या मुलाने सदर घटना घटनास्थळी असलेल्या नागरिकांना सांगितली. त्यानंतर तत्काळ नागभीड पोलिसांना माहिती देण्यात आली. अवघ्या काही वेळातच नागभीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पाचही मुले तलावातच बुडालेले आहेत. सदर घटनेची माहिती मुलांच्या कुटुंबीयांना साटगाव कोलारी येथे देण्यात आलेली आहे. पोलिसांनी घटनास्थळी प्राथमिक चौकशी सुरू करीत तात्काळ शोधमोहीम राबवित बुडालेल्या युवकांचे मृतदेह बाहेर काढले. rescue operation in Chandrapur

  • MSF security theft case | वेकोलि खाणीत खळबळ: सुरक्षा रक्षकांनीच केली चोरी

    MSF security theft case

    MSF security theft case : वेकोलि माजरी परिसरात बंद पडलेल्या भूमिगत खाणीच्या स्टोअर रूमचे संरक्षण करणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांवरच चोरीचा आरोप लागल्याने खळबळ उडाली आहे.

    माजरीचे पोलीस निरीक्षक अमित कुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्रीच्या पाळीत काम करणारे एमएसएफचे चार जवान अजय पाटील, भीमराव जाधव, परमेश्वर पवार, शरद पवार हे रात्रीच्या पाळीत कर्तव्यावर असताना भूमिगत खाण क्रमांक ३ च्या बंद स्टोअर रूममधून केबल चोरून रात्री पावणेएकच्या सुमारास जाळून त्यातून तांबे काढत होते. (Coal mine cable theft)

    वरोऱ्यात 2 किलो गांजा जप्त, एका आरोपीला अटक

    त्याचवेळी वेकोलिच्या सुरक्षा रक्षकांच्या गस्ती पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले आणि क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी एस.के. बैरवा यांना माहिती दिली. बैरवा यांच्या सूचनेनुसार सुरक्षा रक्षक शैलेश वानखेडे यांनी या चारही आरोपींविरुद्ध माजरी पोलीस ठाण्यात ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    माजरी पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक अमित कुमार पांडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध व्यवसाय करणाऱ्या आणि वेकोलिमध्ये लोखंड चोरी करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. असे असतानाही वेकोलिच्या स्टोअर रूममधून केबल चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने वेकोलिच्या अधिकाऱ्यांना एमएसएफच्या सुरक्षा जवानांवर संशय आला. (Chandrapur mine theft)

    त्यानंतर वेकोलिच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आणि अखेर रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

    प्रतिक्रिया

    नव्या पोलीस निरीक्षकांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कठोर कारवाईमुळे वेकोलिच्या खाणींमधून होणारी चोरी थांबली होती. तरीही स्टोअर रूममधून केबल चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने एमएसएफच्या जवानांवर संशय होता. वेकोलिच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या गस्ती पथकाच्या निगराणीत असतानाच हे जवान रात्रीच्या वेळी केबल जाळून तांबे काढताना पकडले गेले.

    एस.के. बैरवा (क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी), वेकोलि माजरी क्षेत्र

  • Warora crime news । चंद्रपूर पोलिसांचा मोठा दणका – वरोऱ्यात गांजासह आरोपी गजाआड!

    Warora crime news

    Warora crime news : होळी सणाच्या पार्शवभूमीवर चंद्रपूर पोलिसांचे अवैध धंद्यावर धाडसत्र मोहीम सुरु आहे. १३ मार्चला वरोरा पोलिसांनी गांजा वनस्पतीचे पाने, फुले व बिया असा एकूण १ किलो ९९२ ग्राम जप्त करण्यात आला, या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

    धुलीवंदनाच्या दिवशी दारू प्यालं तर…

    १३ मार्च वरोरा पोलीस पेट्रोलिंग करीत असतानां एक इसम टेम्भूर्डा चौकात संशयास्पद रित्या उभा होता, त्या इसमाच्या हातात बॅग बघून पोलिसाना संशय आला. पोलिसांनी त्या इसमाची चौकशी करीत बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये १ किलो ९९२ ग्राम गांजा वसंपत्ती व बिया आढळून आली. Drug smuggling latest news

    पोलिसांनी आरोपी प्रफुल किशोर रामटेके ला अटक करीत त्याच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची यशस्वी कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या नेतृत्वात सपोनि शरद भस्मे, पोउपनि दीपक ठाकरे, पोलीस कर्मचारी संदीप मुळे, विशाल राजूरकर, मोहन निषाद, दिलीप सूर, अमोल नवघरे, मनोज ठाकरे व महेश गावतुरे यांनी केली.

  • Chimur Protest । शंभूराजेंच्या अवमानाने उसळला जनसागर, चिमूरमध्ये आक्रोश मोर्चा

    Chimur Protest

    Chimur Protest : छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात सोशल मिडीयावर (इन्स्टाग्राम) अवमानकारक मजकूर टाकुन समाजात तेढ पसरविणाऱ्या चिमुरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज रविवारी (9 मार्च) चिमूर शहरातून निषेध आक्रोश मोर्चा काढण्यात आला. अशा घटनांची पुनरावृत्ती होवू नये याकरीता प्रशासनाने काळजी घ्यावी अशी मागणी केली. चिमूर बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून घटनेच्या निषेधार्थ नागरिक मोर्च्यात सहभागी झाले.

    वाळू तस्करविरोधात आपचे पोलीस अधीक्षकांना निवेदन


    येथील आरोपी अल्ताफ (सोनू) इमदाद शेख याने गुरूवारी सोशल मिडीयावर (इन्स्टाग्राम) छत्रपती संभाजी महाराजाच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) विरोधात अवमानकारक पोस्ट केली. दिवसभरानंतर या पोस्टच्या विरोधात तीव्र पडसाद उमटले. त्याच रात्री संभाजी ब्रिगेड संघटनेच्या शिवप्रतिष्ठाणचे कार्यकर्त्यांनी चिमूर पोलीस ठाण्यात सोशल मीडियावर अवमानकारक पोस्ट करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कारवाई करण्याकरता तक्रार दाखल केली.

    घटनेचे गांभीर्य लक्षात घेता चिमूर पोलिसांनी विविध कलमान्वये आरोपी अल्ताफ (सोनू) इमदाद शेख (वय 21) याला अटक केली. त्याच रात्री संभाजी चौकात संभाजी ब्रिगेड संघटनेच्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी संघटीत होऊन घटनेचा कडाडून निषेध केला. त्यानंतर आरोपीच्या चिकन दुकानाची तोडफोड करीत टायर जाळले. लगतच्या दुकानाचीही नासधूस झाली. रात्री बारा ते एकच्या सुमारास चिमूर शहरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. पोलीस प्रशासनाने वेळीच घटना नियंत्रणात आणली. Marathi News


    या घटनेचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले, आज रविवारी चिमूर शहरात सकाळी हिंदू समाजाच्या वतीने आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याकरिता आक्रोश निषेध मोर्चा काढण्यात आला. बालाजी मंदिर मंदिरापासून मोर्चाला सकाळी 10 वाजतापासून सुरुवात झाली. तत्पूर्वी शहरातून सकाळी 9 वाजता बाईक रॅली काढून सर्व बाजारपेठ बंद करण्यात आली. मुख्य मार्गाने निघालेला मोर्चा डोंगरवार चौक, नेहरु चौक, इंदिरा नगर नंतर तहसील कार्यालयात पोहचला. या ठिकाणी तहसीलदार श्रीधर राजमाने यांना निवेदन देण्यात आले. Religious Tension

    हिंदू समाजाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात अवमानकारक पोस्ट समाज माध्यमावर टाकल्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या आरोपीच्या विरोधात देशद्रोहाची कठोरकारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी निवेदनातून केली.त्यानंतर मोर्चा परत मासळ रोड, चावळी चौक, शिवाजी महाराज चौक, मुख्य बालाजी मंदिर येथे पोहचला. Hindu Community Protest

    या ठिकाणी मोर्चा विसर्जित करण्यात आला. हिंदू समाजाने काढलेल्या मोर्चामुळे आज चिमूर शहरातील बाजारपेठ सकाळपासून पुन्हा बंद ठेवण्यात आली. नागरिकांनी मोर्चा सहभागी होऊन या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला. पार्श्वभूमी लक्षात घेता चिमूर शहरात ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 16 अधिकारी, 82 अमलदार, 1आरसीपी पथक , 44 सैनिक, 44 होमगार्ड आदींची तैनाती करून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात आले आहे.