Category: ग्रामीण वार्ता

ग्रामीण वार्ता (Gramin Varta) विभागात वाचा news34.in वर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बातम्या आणि घडामोडी. शेतकरी योजना, ग्रामपंचायत राजकारण, स्थानिक विकास प्रकल्प, कृषी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स येथे उपलब्ध आहेत. चंद्रपूर ग्रामीण भागातील समस्या, यशोगाथा आणि सकारात्मक बदलांना आम्ही प्राधान्य देतो. ग्रामीण भागातील विश्वासार्ह माहितीसाठी नियमित भेट द्या.

  • Bhadravati sand mining news । “खबरदार! खबऱ्याचा कारनामा उघड: रोजच्या रोज रेती तस्करी, प्रशासन गप्प का?”

    Bhadravati sand mining news

    Bhadravati sand mining news : भद्रावती तालुक्यातील काही घाटातून अवैधरित्या रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर व टिप्पर ची माहिती प्रशासनाला येथील खबऱ्या देऊन त्या माध्यमातून त्या वाहनावर कारवाई केली जाते त्यानंतर हाच खबऱ्या या घाटातून दररोज मोठ्या प्रमाणात रेती तस्करी करत असल्याचा प्रकार सुरू आहे.

    चंद्रपुरात सुगंधित तंबाखूचा साठा जप्त, वसीम, जयसुख व गुप्ता अजूनही मोकाट


    चंद्रपूर, वरोरा , भद्रावती पोलिसांचे काही अधिकारी महसूल विभागाचे अधिकारी , वन विभागाचे काही अधिकारी यांच्यासोबत या खबऱ्याने आपली चांगलीच ओळख निर्माण केली आहे मी उच्चशिक्षित व उद्योजक आहे असे भासवून हा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जवळीक साधतो त्यानंतर हा सगळा प्रकार करतो. sand mafia in Maharashtra

    गेल्या कित्येक महिन्यापासून हा पिपरी घाटातून गवराळा मार्गे चारगाव घाटातून विजासन मार्गे रात्रंदिवस बिनधास्त ट्रॅक्टर व टिप्पर द्वारे रेती तस्करी करतो याच्यावर प्रशासनाने आतापर्यंत एकही कारवाई केली नाही तसेच या खबऱ्याशी जे रेती तस्कर जोडले आहे त्यांनाही प्रशासनाचे अभय आहे जे रेती तस्कर याची ऐकत नाहीत त्यांची खबर प्रशासनाला देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडत आहे.

    तालुक्यातील पिपरी व चारगाव घाट या रेती तस्करांनी पूर्णपणे शासनाच्या करोडोच्या महसूल बुडविल आहे, पिपरी घाट पोकळ करून ठेवला आहे मात्र प्रशासन छोट्या छोट्या कारवाया करताना दिसत आहे मात्र या प्रकारामुळे मोठ्या तस्करांना यांचा आशीर्वाद असल्याचे दिसून येत आहे.

  • sudhir mungantiwar on gharkul yojana sand । रेतीचा प्रश्न सोडवणार! मुनगंटीवारांचा पुढाकार; 3,528 घरकुलांची कामे मार्गी लागणार?

    sudhir mungantiwar on gharkul yojana sand

    sudhir mungantiwar on gharkul yojana sand : घरकुल योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून, ग्रामीण व शहरी गरजू कुटुंबांना घराची सोय व्हावी यासाठी ही योजना राबवली जाते. मात्र, पोंभुर्णा तालुक्यातील अनेक घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध न झाल्यामुळे घरबांधणीच्या कामात विलंब होत आहे. घरबांधणीसाठी आवश्यक असलेली रेतीची अडचण सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. Free sand for rural housing

    चंद्रपुरात भाजप भवनासाठी आमदार किशोर जोरगेवार देणार १ एकर जमीन

    राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन विस्तृत चर्चा करण्यात येईल. चर्चेतून लाभार्थ्यांना अधिक सुलभतेने रेती मिळण्याचा मार्ग मोकळा होईल आणि पोंभुर्णा तालुक्यातील रेती आणि घरकुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. Sudhir Mungantiwar sand distribution

    पोंभूर्णा तालुक्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यासंदर्भात वनविश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी खासदार अशोक नेते, तहसीलदार पोंभुर्णा रेखा वाणी, गट विकास अधिकारी पंचायत समिती पोंभुर्णा विवेक बेल्लारवार, भाजपा प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम, सुलभाताई पिपरे,हरिभाऊ ढवस, विनोद देशमुख,राहुल संतोषवार,रोशन ठेंगणे, रवी मरपल्लीवार,राहुल पाल,अजित मंगळगिरीवार, दर्शन गोरंटीवार, ऋषी कोटरंगे, रवी गेडाम, तुळशीराम रोहनकर, बंडु बुरांडे,विस्तार अधिकारी प्रणय गरमडे, उप अभियंता प्रदीप बाराहाते आदिंची उपस्थिती होती.

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, अर्ज केल्यानंतर 15 दिवसाच्या आत रेती उपलब्ध करून द्यायचा निर्णय केला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी वेळेत होत नाही. पोंभूर्णा तालुक्यातील 3,528 अपूर्ण घरकुल पूर्ण करण्याकरिता 17 हजार 640 ब्राॅस रेतीची आवश्यकता आहे. घरकुलांना रेती उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यात आली असून काही अंशी रेती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

    घरकुल लाभार्थ्यांनी छोटे-छोटे घाट आरक्षित करून प्रत्येक गावातील घरकुलांना लागणारी रेती तहसीलदार आणि तलाठी यांच्या निरीक्षणात न्यायची. असा महाराष्ट्रातला पहिला प्रयोग करून आपण घरकुलांना मोफत रेती उपलब्ध करून द्यायची. रेती मिळण्यास येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याशी बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येईल. पोंभुर्णा तालुक्यातील रेती आणि घरकुलाच्या प्रश्न मार्गी लावणार असल्याचेही ते म्हणाले.

    त्यासोबतच, पोंभुर्णा तालुक्यामध्ये पाणीपुरवठ्याच्या 32 योजना कार्यान्वित आहे. ज्या गावांमध्ये फ्लोराइड युक्त आणि दूषित पाणी आहे त्याची माहिती घ्यावी. पाणीटंचाईमध्ये ट्युबवेल, विहिरी, सोलर पंप लावून पाण्याच्या योजना आखण्यात येईल, असे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

  • tiger attack on farmer । उमा नदीकाठी मृत्यूचं तांडव: वाघाने घेतला युवा शेतकऱ्याचा बळी!

    tiger attack on farmer

    tiger attack on farmer : मूल: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील चितेगाव येथे शनिवारी सकाळी एका युवा शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. शेषराज पांडुरंग नागोशे (वय 38) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. farmer killed by wild animal

    वन्यजीव आता तुमच्या दारात, संरक्षण भिंत कोसळली

    मिळालेल्या माहितीनुसार, शेषराज हे त्यांच्या शेतातील भाजीपाला पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. उमा नदीच्या परिसरात असलेल्या त्यांच्या शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    वाघाच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत:

    चितेगाव परिसरात वाघाचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. गुरुवारी याच वाघाने गावात घुसून एक गाय आणि एका गोऱ्ह्याला ठार केले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ही प्राणघातक घटना घडली. यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि गुराखी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नरभक्षक वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. tiger attacks in Maharashtra

    2025 मध्ये वाघाच्या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू:

    या घटनेमुळे परिसरात वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा वाढला आहे. 2025 या चालू वर्षात अवघ्या ४ महिन्यातच वाघांच्या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

    वन विभागाकडून पंचनामा:

    या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे नागोशे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • Tehsildar caught taking bribe । बल्लारपूरचे तहसिलदार लाच घेताना रंगेहात! महसूल विभागात खळबळ

    Tehsildar caught taking bribe

    Tehsildar caught taking bribe : चंद्रपूर जिल्हा गौण खनिज संपत्तीने संपन्न जिल्हा आहे त्यामुळे अवैध उत्खनन याठिकाणी मोठ्या प्रमाणात होते, मात्र प्रशासन त्यावर कारवाई न करता डोळेझाक करीत असल्याचे चित्र पुढे आले आहे. जिल्ह्यातील बल्लारपूर येथे याउलट एक प्रकरण उघडकीस आले असून त्यामध्ये गौण खनिज प्रकरणी कारवाई न करणे बाबत तहसीलदार यांनी २ लाख २० हजारांची लाच मागितल्या प्रकरणी १ एप्रिल रोजी अटक करण्यात आली असून तलाठी हे रजेवर असल्याने त्यांचा शोध सुरु आहे.

    चंद्रपूरमध्ये प्रदूषणाचा उच्चांक

    बिल्डिंग मटेरियल सप्लाय चे काम करणारे एक व्यक्ती आपल्या शेतातील माती\मुरूम काढून लेव्हलिंग चे काम करीत होते त्यावेळी कवडजई साजाचे तलाठी सचिन रघुनाथ पुळके व तहसीलदार अभय अर्जुन गायकवाड यांनी मुरूम काढण्याची परवानगी नसल्याने २ ट्रॅक्टर व १ जेसीबी जप्त करण्याची तयारी दर्शविली त्या व्यक्ती/तक्रारदार यांचेवर कसलीही कारवाई न करण्याकरिता २ लाख २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. Bribery in revenue department

    तक्रारदार यांनी त्याचदिवशी म्हणजे २३ मार्च ला तहसीलदार व तलाठी यांना १ लाख १९ हजार ९०० रुपये दिले, उर्वरित १ लाख रुपयांसाठी तहसीलदार व तलाठी यांनी तक्रारदाराच्या मागे तगादा लावला असता त्यांच्या त्रासाला कंटाळून २६ मार्चला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली. Maharashtra government officer bribe

    तडजोडीतील १ लाख रुपये स्विकारण्याची तयारी बल्लारपूर चे तहसिलदार अभय गायकवाड व तलाठी सचिन पुळके यांनी मान्य केल्याच्या कारणावरून लाच प्रकरणात तहसिलदार अभय गायकवाड व तलाठी सचिन पुळके यांचेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाळ्यात अडकवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
    ही कारवाई नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, संजय पुरंदरे, सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक मंजुषा भोसले, रोशन चांदेकर, हिवराज नेवारे,अमोल सिडाम,प्रदीप ताडाम,सतीश सिडाम यांनी केली

  • Avinash Poiankar Surjagad Pustak । “अविनाश पोईनकर यांचे सुरजागडवरचं संशोधन: वाचकांना अंतर्मुख करणारं पुस्तक!”

    Avinash Poiankar Surjagad Pustak

    Avinash Poiankar Surjagad Pustak : चंद्रपूर : चंद्रपूर येथील प्रथितयश युवा लेखक, संशोधक, मुक्त पत्रकार अविनाश पोईनकर यांच्या ‘सुरजागड विकास विस्थापन?’ या बहुचर्चित संशोधन पुस्तकाचे नुकतेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आयोजित समता महोत्सवात प्रकाशन करण्यात आले. Surjagad Khan Prakalp Parinam

    चंद्रपूर जिल्ह्यातील लाल मिरची संकटात

    प्रसिद्ध अर्थतज्ञ व अझीम प्रेमजी विद्यापीठ बंगलोरचे प्रा.नीरज हातेकर, जनतेचा महानायकचे संपादक व सामाजिक कार्यकर्ते सुनील खोब्रागडे, भटक्या-विमुक्त चळवळीतील अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते अरुण जाधव, अकोला येथील सामाजिक कार्यकर्त्या व सरपंच रजनी पवार, हेमलकसाचे सामाजिक कार्यकर्ते चिन्ना महाका, कोरो संस्थेच्या मुमताज शेख, सुप्रिया जाण, कुणाल रामटेके, मेळघाटातील सामाजिक कार्यकर्त्या व सरपंच गंगा जावरकर, प्रमोद काळे, तुकाराम पवार यांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. Surjagad Lohkhanij Prakalp

    नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्यातील खाणग्रस्त आदिवासींच्या संघर्षाचे वास्तव मांडणारे हे महत्त्वाचे पुस्तक आहे. पुस्तकाला प्रख्यात विचारवंत व संपादक प्रा.सुरेश द्वादशीवार यांची प्रस्तावना व नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांचे ब्लर्ब आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे डॉ. कुमार सप्तर्षी, संविधान व नागरी हक्क विश्लेषक ॲड.असीम सरोदे, ज्येष्ठ समीक्षक व विचारवंत डॉ.प्रमोद मुनघाटे यांचे महत्त्वाचे अभिप्राय आहेत. यावेळी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला प्रख्यात विचारवंत रावसाहेब कसबे, सुजाता खांडेकर, अंजली मायदेव, संध्या नरे-पवार, सुभाष वारे, अभिजीत कांबळे, दिशा पिंकी शेख, डॉ. चंद्रिका परमार, भीम रासकर, डॉ. विभूती पटेल, सुरेश सावंत, संजय सोनवाणी आदी महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

    लेखक अविनाश पोईनकर आदिवासी व ग्रामीण विकास क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. गडचिरोलीतील अतिदुर्गम भागात राहून शोध पत्रकारितेच्या अंगाने त्यांनी हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे. सुरजागडसह प्रस्तावित खाणींमुळे स्थानिक आदिवासींवर होणारा परिणाम, भांडवलशाही धोरणे, माओवाद, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची भूमिका तसेच आदिवासींचे जल, जंगल, जमीन विषयक कायदे व त्याची सद्यस्थिती, आंदोलने व सर्वसामान्य आदिवासींची होणारी गळचेपी या पुस्तकात सविस्तर मांडली आहे. या संशोधनासाठी पुणे येथील साधना साप्ताहिकाने तांबे-रायमाने अभ्यासवृत्ती दिली होती. पुणे येथील हर्मिस प्रकाशनाने हे संशोधन पुस्तक प्रकाशित केले आहे.

  • red chilli market price today । “गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणणारी मिरची, स्वतःच रडली!”

    red chilli market price today

    चंद्रपूरच्या शेतकऱ्यांचे संकट – मिरची उत्पादकांना मोठा फटका

    red chilli market price today : चंद्रपर : (01 एप्रिल 2025) लाल मिरचीला नगदी पीक म्हणून ओळखले जाते. पारंपारिक पिकाऐवजी शेतकरी नगदी पिकाकडे वळत आहेत. परंतु खर्च जास्त आणि उत्पन्न् कमी होत असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील मिरची उत्पादक संकटात सापडले आहेत. सध्या भाव पडल्याने लाल मिरची झाडालाच आहे. तोड्याचा खर्च शेतकरऱ्यांना परवडणारा नसल्याने लाल मिरची झाडालाच आहे. मिरचीचातोडा करायचा कि नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. Chandrapur Mirchi Sheti

    चिमूर हादरले, विहिरीजवळ झोपला सकाळी मृतदेहचं आढळला


    चंद्रपूर जिल्ह्यात धानपिकाचे क्षेत्र सर्वात जास्त आहे. परंतु परंपरागत काळातपासून धानाचेच उत्पनादन घेत असल्याने शेतकरी नेहमीच संकटात सापडत आहे. त्यामुळे पारंपारीक पिकाऐवजी नवनवीन पिकाचे लागवड करण्यास शेतकरी पुढे येत आहे.धानासह कापूस, सोयाबीन, मिरची व बागायती पिकांकडे शेतकरी वळलाआहे. विशेष म्हणजे राजूरा, कोरपना, बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, गोंडपिपरी या परिसरात कापूस, सायोबीन, मिरची व बागायती पिकांची लागवड केली जात आहे. या वर्षात राजूरा, कोरपना सह जिल्ह्यात सुमारे बाराशे हेक्टरमध्ये मिरची पिकाची लागवड करण्यात आली आहे. Mirchi Bazar Bhav Mahiti

    सध्या मिरचीचा एक तोडा संपला आहे तर दुसरा तोडा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. परंतु तोडा होण्याच्या अगोदरच मिरची उत्पादक संकटात सापडला आहे. जिल्ह्यातून लाल मिरचीची निर्यात नागपूर सह अन्य राज्यात होते. परंतु अचानक भाव पडल्याने मिरची उत्पादक संकटात सापडला आहे. पहिल्या तोड्यात लाल मिरचीला 10 हजारापर्यंत भाव मिळाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पहिला तोडा आटोपून घेतला. त्यानंतर दुसऱ्या तोड्याची तयार सुरू असताना अचानक भाव पडले. फक्त् 5 ते 7 हजारावर आलेत. त्यामुळे मिरचीचा दुसरा तोडा करायचा कि नाही असा प्रश्न मिरची उत्पादकांना पडला आहे. red chilli cultivation cost per acre


    लागवड केल्यानंतर इतर पिकांपेक्षा मिरचीची विशेष काळजी घेतली जाते. या पिकाला किडींचा जास्त धोका असतो. त्यापासून वाचविण्यासाठी शेतकरी महागडी औषधी खरेदी करून फवारणी करतात. बुरशीजन्य किडींचा धोका हा नेहमीच असल्याने शेतकरी विशेष काळजी घेत असतात. शिवाय हंगामभरही मशागत करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात यावर खर्च होतो. मिरचीच्या तुलनेत अन्य पिकांना भाव जास्त नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक हलाखीची होत आहे. त्यामुळेच शेतकरी मिरची सारख्या नगदी पिकाकडे वळत आहे.


    मिरचीचा तोडा करण्याचा खर्च हा मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे भाव पडल्याने लाल मिरचीचा तोडा करायची कि नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तोड्या अभावी शेतकऱ्यांच्या बागांमध्ये लाल मिरची झाडालाच दिसून येत आहे. प्रत्येक वेळी गृहिणीच्या डोळ्यात पाणी आणणारी लाल मिरची यावेळी स्वत:च झाडाला लाल होत आहे. पडलेल्या भावाने उसळी घेतली नाही तर लाल मिरची उत्पादकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. red chilli farming profit


    “दरवर्षी मी मिरचीची लागवड करतो. हे नगदी पीक असून लाल मिरचीला भाव चांगला मिळतो. मात्र यावर्षी सुरूवातीपासून लाल मिरचीचे भाव पडले आहेत. या वर्षी पहिला तोडा आम्ही 10 हजार प्रती क्विंटल प्रमाणे विकला. दुसऱ्या तोडा तोडण्याची वेळ आली आहे मात्र भाव 4 ते 5 हजार वर आले आहे. त्यामुळे मिरची लागवडीचा खर्चही निघणार नसल्यामुळे झाडाला असलेली लाल मिरची तोडायची की नाही असा प्रश्न आमच्या समोर आहे. ”
    : संतोषकुमार पावडे, शेतकरी बिबी (कोरपना)


  • Youth death in well Chimur । चिमूर हादरले! दोन दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह

    Youth death in well Chimur

    Youth death in well Chimur : चिमूर [३१ मार्च ]: चिमूर तालुक्यातील मदनापूर शिवारात आज सकाळी एका युवकाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. राहुल मंगल शेंडे (वय २१, रा. मदनापूर) असे या घटनेतील मृत युवकाचे नाव आहे.

    चंद्रपुरातील नामवंत डॉक्टरची ३५ लाखांनी फसवणूक

    मिळालेल्या माहितीनुसार, राहुल हा गेल्या दोन दिवसांपासून घरी नव्हता. त्याचे आई-वडील मदनापूर हेटी येथे राहतात. राहुल हा मदनापूर येथील आजीकडे राहून ट्रॅक्टर चालक म्हणून काम करीत होता. त्याला दारूचे व्यसन होते. मदनापुरातील बिरजे यांच्या विहिरीच्या काठावर वडाच्या झाडाच्या सावलीत तो झोपला होता. आज सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास काही नागरिकांना विहिरीत राहुलचा मृतदेह तरंगताना आढळून आला. Chimur police investigation death

    या घटनेची माहिती मिळताच मदनापूर ग्रामस्थांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.

    राहुलच्या मृत्यूमुळे मदनापूर गावात शोककळा पसरली आहे. चिमूर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

  • Chandrapur solar village । चंद्रपूर जिल्ह्यात क्रांती! सूर्याच्या ऊर्जेवर झगमगले सादागड हेटी गाव!

    Chandrapur solar village

    Chandrapur solar village : चंद्रपूर : आज दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सादागड हेटी गावाने एक ऐतिहासिक पाऊल उचलत जिल्ह्यातील पहिले ‘सौरग्राम’ होण्याचा बहुमान मिळवला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मुख्य मार्गदर्शक मा. मुख्य अभियंता श्री. हरीश गजभे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच मा. अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे मॅडम यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि मा. जिल्हाधिकारी महोदय यांच्या उस्फूर्त प्रतिसादामुळे हा प्रकल्प यशस्वी झाला. जिल्हा नियोजन सर्वसाधारण योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता आणि निधी वितरण आदेश त्वरित मिळवण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) मीना सालुंखे मॅडम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. Sadagad Heti solar initiative

    एसी बसविण्यासाठी चंद्रपुरातील डॉक्टरची ३५ लाखांनी फसवणूक

    याशिवाय, महावितरण मूल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता चंदन चौरसिया आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अथक प्रयत्न केले. तसेच, दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी ली. चंद्रपूरचे व्यवस्थापक श्री. सूरज बोमावर यांच्या त्वरीत प्रतिसादाने गावकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. या सर्वांच्या सहकार्यामुळे प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सावली तालुक्यातील सादागड हेटी गावाने ‘सौरग्राम’ बनण्याचा मान पटकावला आहे. Maharashtra rural solar power

    गावातील सौरऊर्जा प्रकल्पाचा आढावा सादागड हेटी हे गाव मूल पासून अवघ्या १० किमी अंतरावर असून सावली तालुक्यातील टेकाडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येते. गावात एक प्राथमिक शाळा आणि एकूण १९ घरे आहेत. प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत, येथील प्रत्येक घराच्या छतावर १ किलोवॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले. विशेष म्हणजे, शाळेसाठी देखील स्वतंत्रपणे १ किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प (विना अनुदान) उभारण्यात आला आहे. यामुळे गावात एकूण २० किलोवॅटची सौरऊर्जा निर्मिती केली जाणार असून, महिन्याला सरासरी २४०० युनिट वीज निर्मिती होईल.

    योजनेंच्या अंमलबजावणीतील सहकार्य आणि पुढील वाटचाल संपूर्ण गावाला सौर ऊर्जेने स्वयंपूर्ण करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ३ मार्च २०२५ रोजी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव अंतिम करण्यात आला. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत या प्रकल्पास मान्यता देण्यात आली. केवळ २० दिवसांत सर्व अडचणी दूर करत, महावितरण मूल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता चंदन चौरसिया आणि त्यांची टीम, मंडळ कार्यालयातील श्री. राठोड (उपकार्यकारी अभियंता), तसेच संबंधित सोलर एजन्सी यांच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे हा प्रकल्प यशस्वी झाला. दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी ली. चंद्रपूर यांनी आवश्यक वित्तसहाय्य पुरवल्याने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात आला. Government solar schemes for rural areas

    सादागड हेटी गावातील सर्व रहिवासी आदिवासी समाजाचे असून, त्यांच्या गावाने जिल्ह्यातील पहिले ‘सौरग्राम’ होण्याचा मान मिळवल्यामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे. शासनाच्या या योजनेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले असून, हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

  • Car bike accident case | ओव्हरटेकच्या नादात भीषण अपघात – चिमूरमध्ये एकाचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

    Car bike accident case

    Car bike accident case : चिमूर – पळसगाव (पिपरडा) विहीरगाव वरून चिमूर कडे भरधाव वेगात ओव्हरटेक करणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने एक ठार महिला ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक ३०/०३/२०२५ सायंकाळी ५.३० सुमारास घडली. Drunk driving accident case

    दुचाकी चोरीचा पोलिसांनी नाहीतर फिर्यादीने केला तपास


    पिपर्डा येथील भारत भेंडारे यांच्या घराचे वास्तूपूजन करून पती-पत्नी आपल्या मुलाला घेऊन आपल्या स्वगावी पवनी जिल्हा भंडारा कडे जात असतानाच विहीरगाव कडून दवाखान्यात जात असलेल्या भरधाव चारचाकी वाहनाने मागून धडक दिल्याने दुचाकीवरील महिला रिया राकेश जुमडे (३७, रा. पवनी )हिचा मृत्यू झाला.

    चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या महिलेला मृत घोषित केले आहे. तर त्याचे पती राकेश ताराचंद जुमडे (वय ३७)लहान मुलगा अद्वित राकेश जुमडे (४) हे जखमी आहेत.


    एमएच ३३ – एफ ५१५१ या क्रमांकाच्या चार चाकी वाहनाने समोर जाणाऱ्या दुचाकीला (क्र. एमएच ३६ – व्ही ५००१) जोरदार धडक दिल्याने महिला ठार झाली. तर या अपघातात तिचा पती राकेश ताराचंद जुमडे (वय ३७) लहान मुलगा अद्वित राकेश जुमडे (४) हा सुद्धा अपघातात जखमी झाला. हा अपघात रविवारला सायंकाळी साडे पाच च्या सुमारास घडला.

    Fatal road accident update


    दुचाकीला धडक देणारी चारचाकी ही विहीरगाव येथील मंगेश नन्नावरे यांची असल्याची माहिती मिळाली असून चालक विना लायसन्स व मद्यप्राशन करून गावातूनच भरधाव वाहन चालवीत जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

  • Majhi Shala Sundar Shala । शाळांमध्ये शिक्षणासोबत कौशल्यविकासावर भर – जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीने वाढला आत्मविश्वास!

    Majhi Shala Sundar Shala

    Majhi Shala Sundar Shala : 100 दिवस कृती आराखडयाअंतर्गत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी  आठवडयातून किमान दोन दिवस  क्षेत्रीय भेटी दरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या प्रकल्पांना भेटी देऊन कामाच्या प्रगतीची पाहणी करावी, अशा राज्य शासनाच्या सुचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

    चंद्रपूर वन अकादमी मध्ये अंतर्गत भ्रष्टाचार

     ‘मुख्यमंत्री माझी, शाळा सुंदर शाळा’ टप्पा-2 सन 2024-25  अंतर्गत जिल्हयात दुसरा क्रमांक मिळाला आहे. या शाळेत नाविन्यपूर्ण ‍विज्ञान व गणित प्रयोगशाळेतुन शिक्षण, इकोक्लब सदस्यामार्फत पर्यावरण जागृती व संरक्षण, मतदान जागृतीसाठी विद्यार्थ्यांचे पथकाद्वारे सादरीकरण, एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत उपक्रम, बाल  वाचनालय नियमित वापर, सावित्रीबाई फुले बचत बँकेच्या माध्यमातुन आर्थिक देवाण घेवाण, विपुल भारत अंतर्गत माता-पालक गटाची स्थापना व गट कार्यरत, आशा व अंगणवाडी सेविका मार्फत किशोर वयीन मुलींना मार्गदर्शन,  निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम राबविण्यात येतात. government education schemes for rural schools

    यावेळी जिल्हाधिका-यांनी शाळेत सुरु असलेल्या  प्रशंसनीय उपक्रमाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच विद्यार्थ्यांचे कौतुकसुध्दा केले. भेटी दरम्यान उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, तहसीलदार पल्लवी आखाडे, संवर्ग विकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी  आदी उपस्थित होते.