Youth death in well Chimur । चिमूर हादरले! दोन दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह

Youth death in well Chimur

Youth death in well Chimur : चिमूर [३१ मार्च ]: चिमूर तालुक्यातील मदनापूर शिवारात आज सकाळी एका युवकाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. राहुल मंगल शेंडे (वय २१, रा. मदनापूर) असे या घटनेतील मृत युवकाचे नाव आहे.

चंद्रपुरातील नामवंत डॉक्टरची ३५ लाखांनी फसवणूक

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल हा गेल्या दोन दिवसांपासून घरी नव्हता. त्याचे आई-वडील मदनापूर हेटी येथे राहतात. राहुल हा मदनापूर येथील आजीकडे राहून ट्रॅक्टर चालक म्हणून काम करीत होता. त्याला दारूचे व्यसन होते. मदनापुरातील बिरजे यांच्या विहिरीच्या काठावर वडाच्या झाडाच्या सावलीत तो झोपला होता. आज सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास काही नागरिकांना विहिरीत राहुलचा मृतदेह तरंगताना आढळून आला. Chimur police investigation death

या घटनेची माहिती मिळताच मदनापूर ग्रामस्थांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.

राहुलच्या मृत्यूमुळे मदनापूर गावात शोककळा पसरली आहे. चिमूर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *